Home Blog Page 3700

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

0

शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. शिवसेनेने माजी महापौर सुनील प्रभु यांच्यासह विद्यमान चार आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.

शिवसेनेचे उमेदवार-
शिवडी – अजय चौधरी
माहिम – सदा सरवणकर
अंधेरी (पूर्व) – रमेश लटके
अंधेरी (पश्चिम) – जयवंत परब
वरळी – सुनील शिंदे
दिंडोशी – सुनिल प्रभु
कांदिवली पूर्व – अमोल कीर्तिकर
गोरेगाव – सुभाष देसाई
वांद्रे पूर्व – बाळा सावंत
जोगेश्वरी – रवींद्र वायकर
दहिसर – विनोद घोसाळकर
धारावी – बाबुराव माने
विलेपार्ले – शशिकांत पाटकर
कल्याण (प.) – विजय साळवी

‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…राज ठाकरे

0

raj-thakare_00080119
महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला हवी, बिल्डरांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसआरए योजना सरकारनेच राबवली पाहिजे, गुन्हेगारी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व वाहनांना डिजिटल नंबरप्लेट लावल्या पाहिजेत, मराठी संस्कृतीची १०० मंदिरे उभारली पाहिजेत, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ, तरुणांना रोजगार मिळावे यासाठी रोजगार कार्ड आदी असलेली म न से ची ब्ल्यू प्रिंट राज ठाकरे यांनी सादर केली महाराष्ट्र स्वायत्त करण्याचा, महिलांच्या नावावर घरांची नोंदणी केल्यास करात माफी देण्याचा अशा अनेक विषयांचा समावेश या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…हो, हे शक्य आहे’, अशी ‘कॅचलाइन’ घेऊन मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून सुमारे दोन ते अडीच तास या ब्ल्यू प्रिंटचे षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरे यांनी सादरीकरण केले. गेली नऊ वर्षे यासंदर्भात अभ्यास सुरू होता, या आराखड्याची वेबसाइट तयार करण्यात आली असून सुमारे तीन ते साडेतीन लाख शब्दांचा मजूकर त्यावर आहे, अशी माहिती राज यांनी यावेळी दिली.

सायकल रैली वर प्रचार करीत निम्हण यांचा अर्ज दाखल

0

nimhan

घटस्थापनेच्या दिवशीच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा व लेक वाचवा चा संदेश देत आ. विनायक निम्हण यांनी पूर्ण मतदार संघात सायकलवऱ फिरून उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांकडे २१ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असून पन्नासहून अधिक ठिकाणी निम्हण यांच्याकडे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. उमेदवारी अर्ज भरताना निम्हण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे
आमदार निम्हण यांच्या नावावर सोळा कोटी रुपयांची मालमत्ता असून यामध्ये २ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर, निम्हण यांच्या पत्नी स्वाती यांच्याकडे ५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. निम्हण कुटुंबीयांकडे ७१ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या चांदीच्या वस्तू, दागदागिने आहेत. यामध्ये हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. शहर आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी निम्हण कुटुंबीयांकडे १०० हेक्टरहून अधिक जमीन असल्याचे निम्हण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
१६ मोटारी –
आमदार विनायक निम्हण यांच्याकडे सोळा चारचाकी गाड्या असून यासर्वांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. निम्हण यांच्याकडे ७ हायवा, दोन आयशर, आय १०, टोरँग, डस्टर, होंडा ब्रायो, यासह टाटा टेम्पो आणि एक मर्शिडीज बेंन्स यांचा समावेश आहे. इतक्या गाड्या असतानाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र निम्हण यांनी सायकल रॅली काढून अर्ज भरणे पसंत केले.

श्री जगद्गुरू शंकराचार्य- विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना आणि सरकारी वकीलउज्ज्वल निकम यांच्या हस्ते पूजा संपन्न

0

ujjwal
nikamsir

दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला विविध रंगांची उधळण, दिव्यांची सजावट, प्रवचन या सर्व गोष्टींनी युक्त अशा मंगलमय वातावरणाने सारसबागेजवळील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टचे महालक्ष्मी मंदिर उजळुन निघाले. हजारोंच्या संख्येने भक्त देवीची, सरस्वतीची,महालक्ष्मीची, कालीची पुजा मनोभावाने, प्रेमाने करण्यासाठी एकत्रित आले होते. पार्वतीची पुजा या उत्सवाचा महत्वाचा भाग मानतात, तसेच माता शैलापुरी उजव्या हातात त्रिशुळ धारण आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैलावर विराजमान असते या देवीची पुजा करणे आणि हा उत्सव साजरा करणे हा प्रत्येक भक्ताला खुप मोठा आनंदाचा क्षण होता .
श्री. जगद्गुरू शंकराचार्य- श्री. विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थित घटस्थापनेचा विधी करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि काली यांना खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी करावयास मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि धार्मिक मंदिराची स्थापना केल्याबद्दल मी विश्वकर्मा कुटुंबाचा आभारी आहे.’
संध्याकाळची आरती सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.श्री. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘या भक्तीपूर्ण उत्सवात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. यादेवळात तीन आदिशक्तींचा वास असून त्या तुम्हाला शांती आणि समृद्धी देतील.’
मंदिराच्या सर्व कर्मचारयानी अविरत घेतलेल्या कष्टामुळे मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण होते. तसेच मंदिरात येणारया सर्व भक्तांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या मंदिराच्या सर्व कर्मचारयानी रात्रंदिवस मेहनत घेतली. या मंदिरात सर्व पंथाचे, जाती धर्माचे, भक्त एकत्रित आले त्यामुळे या मंदिरात विविधतेत एकता दिसली.

२५ वर्षांच्या अहंकारी नेतृत्वाचा अस्त होणार – आढळराव पाटील

0

q
आंबेगाव-शिरुर मतदार संघामध्ये इतिहास घडणार आहे.पंचवीस वर्षांचे अहंकारी व हुकुमशाही नेतृत्वाचा अस्त आता होणार असून अरुण गिरेंच्या रूपाने अरूणोदय होत या मतदार संघावर भगवा फडकणार आहे असा ठाम विश्‍वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मलठण (ता. शिरुर)येथे व्यक्त केला. शिवसेनेने ३९ गावातील तरुणांचा मेळावा आयोजीत केला होता.
या भागातील विकासाठी रावडेवडी येथे साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव रद्द करायला लावला. लोकप्रतिनिधी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. डिंभा धरणाचे काम लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या कारकिर्दीत झाले. डिंभा धरण स्वत: बांधल्याच्या अविर्भावात सांगतात. या वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे प्रचाराला माणसे नाही. त्यांचा प्रचार भीमाशंकरचे संचालक त्यातले ही काही आपलाच प्रचार करत आहे.
शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे म्हणाले की, लोकांना फार काळ फसवता येत नाही. त्यामुळे आता मतदार संघात बदलाचे वारे वाहत आहे. दुष्काळी भागातील जनतेला झुलवत ठेवले म्हणजे चार-पाच निवडणुका पाणी देतो, म्हणून सांगत जिंकता येतात ही त्यांची वृत्ती आहे.
सह-संपर्कप्रमुख अविनाश रहाणे, प्रा. राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांनी आपले विचार मांडले. या वेळी उपजिल्हा प्रमुख संजय सातव पाटील, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, युवासेनेचे गणेश जामदार, बाळासाहेब वाघ, विक्रम पाचुंदकर, गुलाबराव धुमाळ, बबनराव पोकळे, किरण देशमुख, सोपानराव जाधव, राज गायकवाड, माउली घोडे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.

वळसे पाटील यांचा झंजावती प्रचार सुरु

0

घटस्थापनेच्या मुहूर्तावर वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आज सहाव्यांदा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी तुतारीची ललकारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा, जोश भरणारी गाणी, टाळ्यांचा कडकडाट सर्वत्र फडकणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज आणि ओसंडून वाहणारी गर्दी अशा उत्सवी वातावरणात वळसे पाटील यांच्या यांच्या प्रचाराचा जोरदार आरंभ झाला
शिरूरचे आ. अशोक पवार, आ. जयदेव गायकवाड, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन भोर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व पराग मिल्क फुड्सचे चेअरमन देवेंद्रशेठ शहा, खेडचे माजी आ. अँड़ रामभाऊ कांडगे, शिरूरचे माजी आ. पोपटराव गावडे, आंबेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गुजर, सूर्यकांत थोरात, गंगूताई वाघ, विष्णूकाका हिंगे, बाळासाहेब घुले, प्रमोद वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, शंकरराव ढोबळे, पुंडलिकदादा थोरात, सुदाम खिलारे तसेच वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे हे उपस्थित होते. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले तेवढेच आंबेगाव तालुक्यातील सर्वच समाजाच्या लोकांनी दिले. उत्तर पुणे जिल्ह्यात झालेली सर्व विकासकामे तुमच्या समोर आहेत. त्या जोरावर मी आणखी एक संधी मागत असल्याचे आवाहन वळसे पाटील यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, वळसे पाटील यांनी निरगुडसर, अवसरी खुर्द व अवसरी बुद्रुक या भागांचा दौरा केला व भैरवनाथ मंदिरात नारळ फोडला . वळसे पाटील म्हणाले, आजपर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. मात्र, त्या प्रत्येकवेळी मी केवळ विकासावर भर दिला. छोट्यातील छोट्या माणसाला मोठे करण्याची ताकद शरद पवार यांच्या विचारात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मी स्वत:, अजित पवार व सुनील तटकरे या मंत्र्यांनी काम केल्यामुळे आज राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. खुद्द भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय वीजमंत्री पियूष गोयल यांनी या कामाचे कौतुक करून अन्य राज्यांना या कामापासून धडा घेण्याचे आवाहन केले आहे.walse patil

राष्ट्रवादी ने हि सोडली काँग्रेस ची साथ

0

शिवसेना-भाजपची 25 वर्षे जुनी युती संपुष्टात आल्यानंतर अर्ध्या तासामध्येच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे जुनी आघाडीही तुटली. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ला पटेल यांनीच पत्रकार माहिती दिली यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील चारही प्रमुख पक्ष आणि म न से नेही १५३ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने हे पाचही पक्ष स्वबळावर विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, “गेली १५ वर्षे राज्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री यांनी कॉंग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. २००४मध्ये कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. तरीही राष्ट्रवादीने सौम्य भूमिका स्वीकारली. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दीड-दोन महिन्यांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाली. त्यावेळी आघाडी करू इच्छितो आणि जागावाटपाची चर्चा लवकर झाली पाहिजे, असे सांगितले. सोनिया गांधी यांनी त्यास अनुकुलता दर्शविली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची भूमिका मांडली. २००९ मध्ये लोकसभेचे खासदार जास्त असल्याने विधानसभामध्ये कमी जागा देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. २००४मधील फॉर्म्युला कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसपेक्षा दुप्पट जागा निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादीचेच सर्वाधिक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले आहेत. ही ताकद लक्षात घेऊन निम्म्या जागा देण्याची मागणी केली होती. हे जागावाटप लवकरात लवकर झाले पाहिजे, अशी मागणी आम्ही करत होतो. कधी ना कधी हा पेच सुटेल, अशी आशा होती.. १५ वर्षे सातत्याने तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला. पण दिल्लीवरून किंवा राज्यातूनही चर्चा झाली नाही.

मॉडेल मृण्मयीचे ‘मिस मॅच’ सिनेमातून अभिनयात पदार्पण!!

0

सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. सिनेमाची कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय याच्या जोरावर मराठी सिनेमाला छान दिवस आले आहेत. दिग्दर्शकही सिनेमाच्या मुख्य पात्रासाठी जुन्या चेहऱ्यांपेक्षा नवीन चेहऱ्यांना पसंती देत असल्याचे चित्र सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये पहायला मिळत आहे.
‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमात ‘मृण्मयी कोलवालकर’ हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता भूषण प्रधान आणि मृण्मयी कोळवलकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.
‘मिस मॅच’ या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेज वर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट त्याच्या असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
सिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून मानस यांचे संगीत लाभले आहे. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या गायकांनी या सिनेमातील गाणी गायली असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘मिस मॅच’ सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.

पुणे नवरात्रो महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

0

abba

aaba
उपमहापौर आबा बागुल यांच्या ‘ पुणे नवरात्रो महोत्सवाचे आज शानदार उद्घाटन झाले . या वेळी महापौर दत्ता धनकवडे , माजी खासदार सुरेश कलमाडी , सचिन पिळगावकर , दिपाली सय्यद तसेच नंदकुमार बानगुडे घनश्याम सावंत आदी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले
मातृभक्ती ही माझ्या स्वभावातच असून, गेले ५८ वर्षे मी आईची पूजा करत आहे. आई हेच खरे ‘देवीचे’ स्वरूप असून, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच मी मजल मारू शकलो, अशी भावना सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी व्यक्त केली.
. नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात सिनेअभिनेते अनंत जोग, दै.पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन बोरा, प्रकाश मुलाबागल,दीपाली सय्यद, मोतीलाल निनारीया यांना लक्ष्मीमाता कला संस्कृ ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
पिळगांवकर म्हणाले की, माझी आई ही माझ्यासाठी आदर्श मैत्रीण, मार्गदर्शिका तसेच सर्वकाही आहे. पुण्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी तब्बल ५0 हजार जणांना काशी यात्रेला नेवून मातृप्रेमाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सध्याच्या काळात अशा प्रकारचे राजकीय पुढारी अभावानेच आढळतात. पुण्याचे प्रेक्षक हे रसिक प्रेक्षक असून, त्यांच्याकडून दिलेली दाद ही मनाला चांगलीच सुखावून जाते. यामुळेच पुण्यात बागूल यांच्या कार्याला मिळालेला उदंड प्रतिसाद ही त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने करण्यात आली. रत्नाकर शेळके यांच्या डान्स अँकॅडमीने सादर केलेल्या ‘भारतीय पारंपरिक नृत्य’ लावणी नृत्य, पाश्‍चिमात्य नृत्यांचा सुंदर मेळ घालत सादर केलेल्या ‘फ्युजनला’ प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. नवरात्रीच्या संध्येला ‘लेझर शो’ ने व्यासपीठावर चांगलीच रंगत आणली होती. तसेच ‘देवीच्या गोंधळाने’ प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली.

घटस्थापनेच्या दिवशीच शिवसेनेशी असलेला 25 वर्षांपासूनचा घरोबा भाजपने तोडला

0

मुंबई- शिवसेना- भाजपचा 25 वर्षांपासूनचा घरोबा -मैत्री जी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी कायम जतन केली होती ती अमित शहा यांच्या भाजप अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घटस्थापनेच्या दिवशीच आज गुरुवारी सायंकाळी अखेर तुटली. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत ज्येष्‍ठ नेते प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे यांनी सेना आणि भाजपची 1989 मध्ये युती केली होती. अखेर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपने घटस्फोट घेतला.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला आणि ठाकरे यांना हिरवा कंदील दाखवायचाच नाही यावरून हि ताणाताणी अखेर तुटली .
शिवसेना – भाजपची युती संपुष्टात आल्याची माहीती भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. खडसे म्हणाले, भाजपला मुख्यमंत्रीपद हवे, असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आम्ही ११९ जागा पहिल्यापासून लढवत होतोच, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आता काय करायचे असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.असे ते म्हणाले
दरम्यान युती तोडण्याचा निर्णय मुंबईतून नव्हे तर आतापर्यंत स्पष्ट झाले आहे . अमित सहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा प्रत्येक भाषणात ‘ महाराष्ट्रात सरकार भाजपचे येईल असे सेना – ठाकरे आणि महायुतीचा उल्लेख जाणूनबुजून टाळला, तेव्हाच हि युती तुटल्याच चित्र निर्माण झाले होते . पण काही महाराष्ट्रातील दिल्लीत बसलेल्या नेत्यांनी युती तोडणे चांगले नाही असा सल्ला दिल्लीश्वरांना दिला आणि चर्चा होत राहिली अखेर घटस्थापनेच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा झाली

मनसेचा वसंत मोरेंना धक्का ? लांडगे , धंगेकर ,लायगुडे , भानगिरे , तायडे ,शिंदे यांना उमेदवारी

0

पुणे- खडकवासला किंवा हडपसर या दोन्ही हि मतदारसंघातून म न से ने वसंत मोरेंना उमेदवारी दिली नाही तर खडकवासल्यातून राजाभावू लायगुडे ,हडपसर मधून नाना भानगिरे , पर्वतीतून जयराज लांडगे पुणे लष्कर मधून अजय तायडे , कसब्यातून रवी धंगेकर ,कोथरूड मधून किशोर शिंदे , चिंचवड मधून अनंत करोळे ,पुरंदर मधून बाबा जाधवराव , भोर मधून संतोष दसवडकर , दौंड मधून राजाभाऊ तांबे , आळंदी -खेद मधून समीर ठिगळे , शिरूरमधून संदीप भोंडवे यांना उमेदवारी दिली आहे विधानसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणाऱ्या मनसेने आपल्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. मनसेच्या यादीत अखिलेश चौबे हा एकमेव उत्तर भारतीय चेहरा असून त्यांना कांदिवली पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजच मनसेची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट समोर येत असून त्याआधी ही यादी जाहीर करून मनसेने आपले ‘मिशन इलेक्शन’ सुरू केले आहे.मनसेचे सरचिटणीस आणि विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी ही यादी प्रसिद्धीला दिली आहे.त्यांचे स्वतःच्या नावाचा -मतदारसंघाचा मात्र यात समावेश दिसत नाही मनसेने विद्यमान आमदार नितीन सरदेसाई यांना माहिममधून, प्रविण दरेकर यांना मागठाणेमधून, मंगेश सांगळे यांना विक्रोळीतून, शिशिर शिंदे यांना भांडुप पश्चिममधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून पुन्हा तिकीट दिले आहे. नसेचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघातून मनसेने दिलीप लांडे यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर मलबार हिलमधून अॅड. राजेंद्र शिरोडकर, दिंडोशीतून शालिनी ठाकरे, अंधेरी पश्चिममधून रईस लष्करिया, वांद्रे पूर्वमधून शिल्पा सरपोतदार, ओवळा-माजिवडातून सुधाकर चव्हाण यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना सोडून मनसेवासी झालेले सिंधुदुर्गातील माजी आमदार परशुराम उपरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार
नंदुरबार -गुलाबसिंग वसावे
नवापूर – महादेव वसावे

धुळे
धुळे ग्रामिण- अजय माळी

जळगाव
रावेर – जुगल पाटील
भुसावळ – रामदास सावकारे
जळगाव शहर – ललित कोल्हे
एरंडोल – नरेंद्र पाटील
चाळीसगाव – राकेश जाधव
पाचोरा – दिलीप पाटील

विदर्भ
बुलडाणा- संजय गायकवाड
चिखली – विनोद खरपास
सिंदखेड राजा – विनोद वाघ
जळगाव जामोद – गजानन वाघ

अकोला
रिसोड – राजू राजेपाटील
धामणगाव-मोर्शी – ज्ञानेश्वर धानेपाटील
अकोट – प्रदीप गावंडे
अकोला पश्चिम – पंकज साबळे
मुर्तिजापूर – रामा उंबरकर

तिवसा – आकाश वराडे
दर्यापूर – गोपाल चंदन
अचलपूर – प्रवीण तायडे
हिंगणघाट- अतुल वंदिले
वर्धा – अजय हेडाऊ
काटोल- दिलिप गायकवाड
हिंगणा -किशोर सराईकर
नागपूर मध्य – श्रावण खापेकर
नागपूर पश्चिम -प्रशांत पवार
तुमसर – विजय शहारे
भंडारा- मनोहर खरोले
तिरोरा – दिलिप जयस्वाल
गडचिरोली -मिनाताई कोडाप
राजुरा – सुधाकर राठोड

ठाणे
विक्रमगड – भरत हजारे
नालासोपारा – विजय मांडवकर
भिवंडी ग्रामीण – दशरथ पाटील
शहापूर – ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण प. – प्रकाश भोईर
अंबरनाथ – विकास कांबळी
कल्याण पूर्व – नितीन निकम
ओवळा माजीवडा – सुधाकर चव्हाण
बेलापूर – गजानन काळे

मुंबई
बोरिवली – नयन कदम
मागाठणे – प्रविण दरेकर
मुलुंड – सत्यवान दळवी
विक्रोळी – मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम – शिशिर शिंदे
जोगेश्वरी पू- भालंचद्र अंबुरे
दिंडोशी – शालिनी ठाकरे

कांदिवली पू- अखिलेश चौबे
चारकोप – दीपक देसाई
अंधेरी पश्चिम – रईस लष्करीया
अंधेरी पू- संदीप दळवी
विलेपार्ले – सुहास शिंदे
चांदिवली – ईश्वर तायडे
घाटकोपर प.- दिलिप लांडे
घाटकोपर पूर्व-सतिश नारकर
कुर्ला – स्नेहल जाधव
कलिना- चंद्रकांत मोरे
वांद्रे पू- शिल्पा सरपोतदार
शीव- कोळीवाडा – बाबा कदम
वडाळा – आनंद प्रभू
माहिम – नितीन सरदेसाई
वरळी – विजय कुरतडकर
भायखळा – संजय नाईक
मलबार हिल – अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेवी – इम्तियाज अमीन

कोकण
रत्नागिरी
दापोली – वैभव खेडेकर

सिंधुदुर्ग
सावंतवाडी – परशुराम उपरकर

रायगड
पनवेल – केसरी पाटील
कर्जत – जे पी पाटील
उरण – अतुल भगत
पेण – गोवर्धन पोलसानी
महाड – सुरेंद्र चव्हाण

पुणे
जुन्नर – शरद सोनावणे
खेड-आळंदी – समीर ठिगळे
शिरुर – संदीप भोंडवे
दौंड – राजाभाऊ तांबे
पुरंदर – बाबा जाधवराव
भोर – संतोष दसवडकर
चिंचवड – अनंत कोराळे
कोथरुड – किशोर शिंदे
खडकवासला – राजाभाऊ लायगुडे

कोल्हापूर
चंदगड – दिवाकर पाटील
करवीर – अमित पाटील
शिरोळ – विजय भोजे

सांगली
सांगली – स्वाती शिंदे
खानापूर – भक्तराज ठिगळे
तासगाव – सुधाकर खाडे
जत – भाऊसाहेब कोळेकर

सोलापूर
सोलापूर शहर (उ) – अनिल व्यास
अक्कलकोट – फारुख शाब्दी
माळशिरस – किरण साठे

सातारा
कोरेगाव – युवराज पवार
माण – धैर्यशील पाटील
कराड (उ) – राजेंद्र केंजळ
कराड (द) – अॅड. विकास पवार
पाटण (द) – रवींद्र शेलार

मराठवाडा
निलंगा – अभय साळुंखे
औसा – बालाजी गिरे
उमरगा – विजय क्षीरसागर
तुळजापूर – अमर कदम
उस्मानाबाद – संजय यादव
परांडा – गणेश शेंडगे
करमाळा – जालिंदर जाधव
मोहोळ – दिपक गवळी

पीएनजीतर्फे ३५ हजारापासून ६ लाखांपर्यंतचे मंगळसूत्र कलेक्शन

0

पी.एन.जी. डायमंडच्या वतीने तीनपदरी सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे हिर्‍यांचा वापर केलेले विविध कलाकुसरीच्या मंगळसूत्रांचे कलेक्शन बाजारात सादर केले आहे. हे मंगळसूत्र वजनाला हलके, आकर्षक असून त्याची किंमत ३५ हजार ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे.
हे कलेक्शन प्रसिद्ध मराठी मालिका ‘होणार सून मी ह्या घरची फेम’ सेलिब्रेटी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी सादर केले. यावेळी पी.एन.जी. डायमंडचे अक्षय गाडगीळ व रोहन गाडगीळ, पद्मिनी गाडगीळ, नुपूर आडकर व कल्याणी गाडगीळ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रोहन गाडगीळ म्हणाले, पीएनजीच्या वतीने मंगळसूत्राची चेंजओव्हर पेंडंट डिझाइन केली असून, त्यात मध्यभागी बसवलेला खडा बदलता येतो. ज्या स्त्रियांना मोठय़ा लांबीचे मंगळसूत्र घालायला आवडते, त्यांच्यासाठी पी.एन.जी. डायमंडने ‘डायमंड अटॅचमेंट’च्या स्वरूपात नवी संकल्पना सादर केली आहे. यामध्ये हिर्‍याच्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांवर भर देण्यात आला असून त्यामुळे ते जास्त आकर्षक दिसते.
ही मंगळसूत्रे पारंपरिक असूनही वापरण्यास सोयीची आहेत. त्यामुळे नोकरदार स्त्रियांना त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल. हे कलेक्शन पी.एन.जी. डायमंड्सच्या लक्ष्मी रोड, पौड रोड आणि बंड गार्डन येथील दालनांमध्ये उपलब्ध आहे.

रमेश बागवे,विनायक निम्हण,रोहित टिळक,संग्राम थोपटे,हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारीजाहीर

0

उमेदवारी वाटपात काँग्रेस ची बाजी
मुंबई – महायुती आणि आघाडीमधील जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तोडग्याची वाट न पाहता ११८ उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने आघाडी घेतली.पुण्यातील ;पुणे कॅन्टोन्मेंट : रमेश बागवे,शिवाजीनगर : विनायक निम्हण,कसबा पेठ : रोहित टिळक,भोर : संग्राम थोपटे आणि इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे . सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपल्या ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढवला असून अद्यापही १७0 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नसल्याने राष्ट्रवादीसाठी तडजोडीचे दरवाजे खुले ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने या पहिल्या यादीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड), उद्योगमंत्री नारायण राणे (कुडाळ), पतंगराव कदम (पळूस-कडेगाव), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), अमित देशमुख (लातूर शहर), सदाशिवराव पाटील (खानापूर), मदन पाटील (सांगली), अशोक निलंगेकर (निलंगा), महेश गणगणे (अकोट), जयवंत आवळे (हातकणंगले), सा.रे. पाटील (शिरोळ) यांच्यासह काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या अशक्य अटींमुळे आघाडी अशक्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता धूसर वाटत होती. काँग्रेस आघाडीमध्ये बुधवारपर्यंत जागावाटपाचा तिढा चालूच होता. राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा हव्या होत्या. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली होती. राष्ट्रवादीनेही सुरुवातीला स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद देऊन काँग्रेसला एक दिवसाची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या १४४ जागांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नव्हता.
उमेदवार पुढील प्रमाणे –
कृष्णा हेगडे (विलेपार्ले), नसीम खान (चांदीवली), प्रवीण छेडा (घाटकोपर पूर्व), चंद्रकांत हांडोरे (चेंबुर), कृपाशंकर सिंग (कालिना), बाबा सिद्दीकी (वाद्रे पूर्व), श्रीमती वर्षा गायकवाड (धारावी), जगन्नाथ शेट्टी (सायन कोळीवाडा), कालीदास कोळमकर (वडाळा), मधुकर चव्हाण(भायखळा), अँड़ सुशीबेन शहा (मलबार हिल), अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती अँनी शेखर (कुलाबा), महेंद्र घरट (उरण), रविंद्र पाटील (पेण), मधुकर ठाकुर (अलिबाग), हर्षवर्धन पाटील (इंदापुर), संग्राम थोपटे (भोर), विनायक निम्हण (पुणे – शिवाजीनगर), रमेश बागवे (पुणे कॅन्टोनमेंट), रोहित टिळक (कसबापेठ), बाळासाहेब थोरात (संगमनेर), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपुर), सत्यजीत तांबे पाटील (अहमदनगर शहर), त्रिंबक भिसे (लातूर ग्रामीण), अमित देशमुख (लातूर शहर), अशोक पाटील निलंगेकर (निलंगा), बसवराज पाटील (औसा), किसन कांबळे (उमरगा), मधुकरराव चव्हाण (तुळजापुर), विश्‍वनाथ चाकोते (सोलापूर शहर उत्तर), कु. प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट), दिलीप माने (सोलापूर दक्षिण), मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), राजेंद्र देसाई (राजापुर), नारायण राणे (कुडाळ), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), सत्यजीत कदम (कोल्हापूर उत्तर), जयंत आवळे (हातकणंगले), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), अप्पासाहेब एस. आर. पाटील (शिरोळ), मदन पाटील (सांगली), डॉ. पतंगराव कदम (पलुस-केडगाव), सदाशीवराव पाटील (खानापुर). के. सी. पडवी (अक्कलकुवा), पद्माकर वळवी (शहादा), स्वरूपसिंग नाईक (नवाबपुर), धनाजी अहिरे (साक्री), शामकांत सनेर (सिंदखेडा), काशीराम पावरा (शिरपूर), शिरीष चौधरी (रावेर), जोत्स्ना विसपुते (जामनेर), हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), राहुल बोंद्रे (चिखली), दिलीपकुमार सानंदा (खामगाव), महेश गंगणे (अकोट), सय्यद नतीकोद्दीन खतीब (बाळापुर), अमित झनक(रिसोड) विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), यशोमती ठाकुर (तिवसा), केवलराम काळे (मेळघाट), अनिरुद्ध देशमुख (अचलपुर), अमर काळे (आर्वी), रणजित कांबळे (देवळी), सुनील केदार (सावनेर), प्रफुल्ल गुडदे (नागपुर दक्षिण-पश्‍चिम), सतिष चतरुवेदी (नागपुर दक्षीण), अभिजीत वंजारी (नागपुर पुर्व), डॉ. अनेश माजीद अहेमद (नागपुर मध्य), विकास ठाकरे (नागपूर पश्‍चिम), डॉ. नितीन राऊत (नागपुर उत्तर), सुबोध मोहिते (रामटेक), प्रमोद तितीरमारे (तुमसर), सेवक वाघे (साकोळी), गोपालदास अग्रवाल (गोंदिया), रामरतनबापु राऊत (आमगाव), आनंदराव गेडाम (आरमोरी), सगुणा ताळंदी (गडचिरोली), सुभाष धोटे (राजुरा), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), अविनाश वारजुरकर (चिमुर), वामनराव कासावार (वणी), प्रो. वसंत पुरके (राळेगाव), विजयराव खडसे (उमरखेड), महादेवराव पवार (हादगाव), डी. पी. सावंत (नांदेड उत्त्तर), ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड दक्षीण), रावसाहेब अंतापुरकर (देगलुर), हनुमंतराव पाटील (मुखेड), संतोष तर्फे (कळमनुरी), भाऊराव पाटील (हिंगोली), रामप्रसाद बोर्डीकर (जिंतुर), कैलास गोरंट्याल (जालना), अब्दुल सत्तार (सिल्लोड), कल्याण काळे (फुलंब्री), जितेंद्र देहाडे (औरंगाबाद पश्‍चिम), डॉ. राजेंद्र दर्डा (औरंगाबाद पुर्व), डॉ. दिनेश परदेशी (वैजापूर), शेख असीफ शेख रशीद (मालेगाव मध्य), शाहु खैरे (नाशीक मध्य), निर्मला गावीत (इगतपुरी), राजेंद्र गावीत (पालघर), मायकेल फुर्ताडो (वसई), शोएब खान (भिवंडी पश्‍चिम), श्रीमती प्रभात पाटील (ओवळा-माजीवाडा), नारायण पवार (ठाणे), शीतल म्हात्रे (दहीसर), सप्रा चरणसिंग (मुलुंड), राजेश शर्मा (जोगेश्‍वरी पूर्व), राजसंह धनंजय सिंग (दिंडोशी), भारत पारेख (चारकोप), अस्लम शेख (मालाड पूर्व), बलदेव खोसा (वर्सोवा), अशोक जाधव (अंधेरी पूर्व), सुरेश शेट्टी (अंधेरी पश्‍चिम),

भाजप ची ऑफर मी धुडकावली /पक्षातील विरोधकांची मला पर्वा नाही – निम्हण यांचा दावा

0

पुणे -भाजप ची ऑफर मी धुडकावली ,त्यांच्याकडे माझा सामना करु शकेल असा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारच नाही असा दावा करून विद्यमान आमदार विनायक निम्हण हे सायकल फेरी काढून गुरुवारीदि २५ रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी किमान 200 सायकलस्वार कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती निम्हण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
निम्हण म्हणाले, “”शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करून सायकलवरून जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. सोमेश्‍वर मंदिरातून सकाळी साडेआठ वाजता फेरीस प्रारंभ होईल. मतदारसंघात सर्वत्र फिरून दुपारी दोनच्या सुमारास अर्ज दाखल करणार आहे.‘‘ या निवडणुकीदरम्यान कोठेही शोभेच्या दारूची आतषबाजी करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.””कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्‍चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘
शिवाजीनगरमधून कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार, हे नक्की आहेच; परंतु पक्षाने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तरी मी कॉंग्रेसचाच प्रचार करणार आहे, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करायची, असा माझा विचारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी भाजप प्रवेशाची चर्चा होती, त्याबाबत ते म्हणाले, “”भाजपमध्ये येण्यासाठी मला “ऑफर‘ होती; परंतु मी गेलो नाही. पक्षात विरोधक आहेत; पण त्यांची पर्वा न करता मी काम करणार आहे. केलेल्या विकासकामांच्या बळावर मतदार मला पुन्हा निवडून देतील यात शंका नाही. भाजपकडे मतदारसंघासाठी उमेदवारही नाही, हेच माझ्या यशाचे गमक आहे.‘‘
कॉंग्रेस भवनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुकारी अलगुडे, बळीराम सावंत, सुरेश कांबळे, शशिकला गायकवाड, कैलास पवार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, रणजित गायकवाड, संगीता कचरे, शहानवाज कर्नळकर, सनी निम्हण आदी उपस्थित होते. मात्र, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी अनुपस्थित होते.
याबाबत विचारणा केली असता निम्हण म्हणाले, “”कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्‍चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘असेही निम्हण यांनी सांगितले.

दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सतर्फे ‘अनंतसृष्टी’ गृहप्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे शनिवारी उद्घाटन

0

कान्हे फाटा येथे निसर्गरम्य परिसरात साकारलेला भव्य प्रकल्प
पुणे, दि. २४ सप्टे : ‘अनंतसृष्टीच्या पहिल्या (फेज १) आणि दुसऱ्या टप्प्याच्या (फेज २) यशस्वीतेनंतर ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे ‘अनंतसृष्टी’च्या तिसऱ्या (फेज ३) टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. कान्हे फाटा परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये, ३५ एकरच्या परिसरामध्ये वसलेल्या फेज ३ प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी फ़्लॅट बूक करणाऱ्यांना स्व. दाजीकाका गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे १ लाख रुपयांपर्यंतचे ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’चे वाऊचर भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’ तसेच ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हे उपस्थित राहणार आहेत, ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’च्या संचालिका वैशाली गाडगीळ, ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या संचालिका राधिका गाडगीळ, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल ताविलदार व प्रसिद्ध बांधकाम विषयक लेखक आणि ब्लॉगर रवी करंदीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने कान्हे फाटा येथे २७ आणि २८ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अनंतसृष्टीच्या या प्रकल्पास भेट देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या मॉडेल कॉलनी येथील कार्यालयातून, खास वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याठिकाणी निसर्गरम्य परिसराच्या अनुभवाबरोबरच सँपल फ़्लॅट, शो फ़्लॅट व प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या तळेगाव-कान्हे फाटा भागामध्ये निसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी हे अनंतसृष्टीचे वेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळे रस्ते आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. थोडक्यात, ‘अनंतसृष्टी म्हणजे निसर्ग व अत्याधुनिक सुखसोयी यांचा सुंदर मिलाफ आहे.