.शिवसेना व भाजपच्या युतीवर अखेर आज शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे भाजप व शिवसेना नेत्यांत आज दुपारी 12 वाजता मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती अभेद्य असल्याची घोषणा विनोद तावडे व संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या बैठकीला महायुतीतील मित्रपक्षांना न बोलावल्यामुळे ते नाराज झाले आहेत. हवे तर आमच्या जागा घ्या पण युती तोडू नका असे म्हणणाऱ्या मित्रापक्षांच्यावर आता परीक्षेची आहे मात्र योग्य जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी दिला आहे.
युतीतील सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला नवा प्रस्ताव दिला. त्यानुसार शिवसेना 150, भाजप 124 तर उर्वरित चार घटकपक्षांना 14 जागा देण्यावर या दोन्ही पक्षांत एकमत झाले. याबाबतची माहिती सायंकाळी मित्रपक्षांतील नेत्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याकडून संमती मिळाली की महायुतीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजप-सेनेतील वाद आता संपला असल्याचे दिसत असले तरी महायुतीतील इतर घटकपक्ष नक्कीच नाराज आहेत. चार घटकपक्षांना मिळून केवळ 14 मिळणार आहे.
गेल्या 25 वर्षापासून युती टिकविण्यासाठी शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, सुभाष देसाई, तर भाजपकडून ओम माथूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.
खासदार राजू शेठ्ठी यांनी या प्रस्तावावर अधिक बोलण्यास नकार दिला. जो काही प्रस्ताव असेल तो आम्हाला सांगितला जाईल त्यानंतर यावर भाष्य करता येईल. मात्र, आम्ही यांचे भांडण मिटावे यासाठी किमान 18 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापेक्षा कमी जागा घेणे अशक्य असेल.
खासदार रामदास आठवले यांनी सांगितले की, घटकपक्षांना किमान 20-22 जागा मिळाल्या पाहिजेत. यातील आरपीआयला किमान 8-10 जागा दिल्या तरच महायुतीत राहू अन्यथा वेगळा विचार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असा इशारा आठवले यांनी दिला.
महापुरातून तरली भाजपा -सेना युती ; आता मित्रपक्षांना त्यागाची संधी
कर्मवीरांनी घडविला महाराष्ट्र -महापौर दत्ता धनकवडे

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पदमविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंतीनिमित रयत शिक्षण संस्थेच्यावतीने स्वारगेट जवळील होल्गा चौकात त्यांच्या अर्धपुतळ्यास पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे , विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव ,माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले , संस्थेचे आजीव सदस्य किसन रत्नपारखी , अशोक जगदाळे ,प्रा. संभाजी शिंदे , पांडुरंग गाडेकर , डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पथारी संघटनेचे मनोहर परदेशी , माजी सहसचिव गोपाळ विद्यासागर , साधना मुलींची शाळा मुख्याध्यापिका विद्या पवार , साधना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय दवडे , के. के . घुले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड , रयत सेवक को ऑप बँकेचे संचालक संजय बांदल , वाघिरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप बनकर , महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब शेंडगे , आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्या मंजुश्री बोबडे , आजीव सेवक पंडितराव जगताप , साधना मुलांची शाळा पर्यवेषक विजय शितोळे , आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आपले विचार माद्ताना सांगितले कि , दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था सुरु केली . आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था गणना होत आहे . शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल चालू आहे . नव्या युगाची आधुनिक माहिती तंत्रज्ञाची कास संस्थेने धरलेली आहे , हि महत्वपूर्ण बाब आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले तर मान्यवर पाहुण्याचे स्वागत अड . राम कांडगे , तर आभार विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी मानले . यावेळेस संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुष्पमाला वाहून अभिवादन केले .
खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगणारा लव्ह फॅक्टर लवकरच . . .
हल्ली मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत,गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होते आहे,ज्याला रसिक प्रेक्षक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत,प्रेम या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट गेल्या काही दिवसात आले त्याला युवकांचा भरघोस प्रतिसाद देखील मिळतो आहे.
मुक्ताई फिल्म प्रोडक्शन्स निर्मित,किशोर विभांडिक लिखित-दिग्दर्शित लव्ह फॅक्टर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.आजची तरुण पिढी खर्या प्रेमाला पोरकी झाली आहे,त्याग म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग अशी खरी प्रेमाची व्याख्या सांगणारा हा सिनेमा आहे,आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे,केवळ शारीरिक आकर्षण,सौंदर्य यापलीकडे खरं प्रेम आज अभावानेच पाहायला मिळतं,अश्याच विषयावर भाष्य करणारा लव्ह फॅक्टर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे,या चित्रपटात राजेश शृंगारपुरे प्रथमच रोम्यांटिक भूमिकेत दिसेल त्याच्या सोबत खुशबु तावडे,कुशल बद्रिके इ. कलाकारांची बडी फौज आहे.
प्रेमाची वेगळी व्याख्या सांगणारा “लव्ह फॅक्टर” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन किशोर विभांडिक यांनी संभाळल असून मुकुंद सातव हे निर्माते आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण – मयुरेश जोशी,नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे,कला दिग्दर्शन – नझीर शेख,निर्मिती व्यवस्थापक – अजय सिंग,स्थिर छायाचित्रण – सुमित रांगणेकर यांचे असून गीतकार मंगेश कांगणे यांच्या शब्दरचनेवर चिनार महेश या संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला असून चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे.
निसर्ग कवी प्रा. शंकर वैद्य यांना श्रद्धांजली
महाराष्ट्र शासन, कोमसाप आणि अनेक मोठे पुरस्कार मिळवणारे कवी म्हणजे प्रा. शंकर वैद्य. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे नवे लेखक, कवी, विद्यार्थी, रसिकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळालं. उत्तम शिक्षक आणि समीक्षक, ललित लेखक, वक्ते, सूत्रसंचालक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला, अशा बहुआयामी व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली!!
– विधानसभा अध्यक्ष, दिलीप वळसे पाटील
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको म्हणून भाजपची ताणाताणी

महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आता सुवर्णसंधी आहे, असे बोलले जात असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने व मुंबईतील गुजराती समाजालाही शिवसेनेचा मुख्यमंत्री नको असल्याने युतीवर ‘पाणी’ सोडण्याची पूर्ण तयारी भाजपने केल्याचे विश्वसनीय गोटातून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे २५ वर्षांची युती तुटण्याची घडी समीप येत असून आज, मंगळवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जावे, अशी मुंबईतील गुजराती समुदायाची इच्छा नाही. हे पद भाजपकडेच असले पाहिजे, असा आग्रह त्यांनी मोदी व अमित शाह यांच्याकडे धरल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही युतीत तणाव निर्माण केलेला नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
भाजपने रविवारच्या बैठकीत उमेदवारांच्या दोन याद्या सज्ज केल्या. शिवसेना व मित्रपक्षांसह महायुती होईल, असे गृहित धरून एक यादी; तर, शिवसेनेला वगळून दुसरी यादी तयार करण्यात आली आहे. त्यात चार छोट्या मित्रपक्षांना स्थान देण्यात आले आहे. महायुतीतील चारही मित्रपक्ष आपल्यासोबत राहतील, असे भाजपला वाटत आहे.
धर्मसंसदेची विचारधारा उद्ध्वस्त करू-शरद पवार
कोल्हापूर – ‘आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केलेली संसद मानतो. मात्र श्रध्दास्थानांबद्दल वाद निर्माण करून माणसामाणसातील अंतर वाढवणाऱ्या धर्मसंसदेचा विचार महाराष्ट्रातील कार्यकर्ता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. साईबाबांच्या जन्माचा मुद्दा काढून श्रध्दास्थानांविषयी वाद निर्माण करणारी ही कुठली धर्मसंसद? असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. त्यांना अधिकार कुणी दलिा हे विचारतानाच, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराजांबाबतही अशाच धर्मसंसदेने काही निर्णय घेतले होते. परंतु राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशी विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी बाेलून दाखवला.कोल्हापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते.
गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेमध्ये पवार यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणामध्ये काही मुलभूत गोष्टी मांडून राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. ‘लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी अपयश आले तरी धनंजय महाडिक यांना विजयी करून कोल्हापुरकरांनी पुरोगामी विचारांची कास सोडली नाही,’ असे सांगून पवार यांनी काेल्हापूरकरांचे जाहीर आभार मानले. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळेल याची अाम्ही काळजी घेतली. ऊसाला दराची तजवीज केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात कपात केली,’ याची आठवणही पवारांनी करून दलिी. शाहू महाराजांचे विचार पुन्हा मजबूत करण्याची आता वेळ आली आहे. हे राज्य पुन्हा समर्थपणे उभारण्यासाठी, काळ्या आईची सेवा करण्याऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी, तरूणांचे भविष्य फुलवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्ता द्या, असे आवाहनही पवारांनी केले.
सत्ता द्या, सर्वांना आरोग्यविमा
राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आल्यास ६५ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन, ६० टक्के शेती ठिबक सिंचनखाली आणण्यासाठी ७५ टक्के अनुदान, सर्वांसाठी आरोग्यविमा, इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, अल्पसंख्याकांसाठीच्या आझाद महामंडळाला २००० कोटींचे बजेट करू, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सिंमेटचे रस्ते आणि गटर्स करू अशी ग्वाही पवार यांनी दिली .
अंबाबाईच्या साक्षीने सांगताे-काेल्हापूरचा टाेल रद्द करताे–
खाेटी अाश्वासने देऊन माेदी सरकार सत्तेवर अाले. मात्र, शंभर िदवसांत त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे ‘अाता माझी सटकली, मला राग येताेय’, असे जनता म्हणत अाहे. पुन्हा सत्ता आल्यास राज्यातील राहलिेले प्रश्न १०० दिवसांत सोडवतो, काेल्हापूरचा टाेलही रद्द करताे, अंबाबाईच्या साक्षीने मी हे सांगताे अाहे,’ अशी घोषणा अजित पवारांनी के
मुंडेंचे काय झाले : भुजबळ
पीयूष गाेयल, गडकरी, जावडेकर अशी केंद्रातील मंत्र्यांची नावं. भाजपच्या कार्यकारिणीतही महाजन, सहस्रबुद्धे आहेत. पाशा पटेल, फुंडकर ही नावे का नाहीत? गोपीनाथ मुंडे यांना कसेतरी मंत्रिपद िदले. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजून कसा आला नाही?’ असा सवाल छगन भुजबळांनी केला.






