Home Blog Page 3671

निसर्ग कवी प्रा. शंकर वैद्य यांना श्रद्धांजली

0

5639_poetry_2

महाराष्ट्र शासन, कोमसाप आणि अनेक मोठे पुरस्कार मिळवणारे कवी म्हणजे प्रा. शंकर वैद्य. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे नवे लेखक, कवी, विद्यार्थी, रसिकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळालं. उत्तम शिक्षक आणि समीक्षक, ललित लेखक, वक्ते, सूत्रसंचालक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला, अशा बहुआयामी व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली!!

– विधानसभा अध्यक्ष, दिलीप वळसे पाटील

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको म्हणून भाजपची ताणाताणी

0

uddhav-amit-shah
महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आता सुवर्णसंधी आहे, असे बोलले जात असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने व मुंबईतील गुजराती समाजालाही शिवसेनेचा मुख्यमंत्री नको असल्याने युतीवर ‘पाणी’ सोडण्याची पूर्ण तयारी भाजपने केल्याचे विश्वसनीय गोटातून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे ​​२५ वर्षांची युती तुटण्याची घडी समीप येत असून आज, मंगळवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जावे, अशी मुंबईतील गुजराती समुदायाची इच्छा नाही. हे पद भाजपकडेच असले पाहिजे, असा आग्रह त्यांनी मोदी व अमित शाह यांच्याकडे धरल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही युतीत तणाव निर्माण केलेला नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
भाजपने रविवारच्या बैठकीत उमेदवारांच्या दोन याद्या सज्ज केल्या. शिवसेना व मित्रपक्षांसह महायुती होईल, असे गृहित धरून एक यादी; तर, शिवसेनेला वगळून दुसरी यादी तयार करण्यात आली आहे. त्यात चार छोट्या मित्रपक्षांना स्थान देण्यात आले आहे. महायुतीतील चारही मित्रपक्ष आपल्यासोबत राहतील, असे भाजपला वाटत आहे.

धर्मसंसदेची विचारधारा उद्ध्वस्त करू-शरद पवार

0

कोल्हापूर – ‘आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केलेली संसद मानतो. मात्र श्रध्दास्थानांबद्दल वाद निर्माण करून माणसामाणसातील अंतर वाढवणाऱ्या धर्मसंसदेचा विचार महाराष्ट्रातील कार्यकर्ता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. साईबाबांच्या जन्माचा मुद्दा काढून श्रध्दास्थानांविषयी वाद निर्माण करणारी ही कुठली धर्मसंसद? असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. त्यांना अधिकार कुणी दलिा हे विचारतानाच, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराजांबाबतही अशाच धर्मसंसदेने काही निर्णय घेतले होते. परंतु राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशी विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी बाेलून दाखवला.कोल्हापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते.
गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेमध्ये पवार यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणामध्ये काही मुलभूत गोष्टी मांडून राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. ‘लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी अपयश आले तरी धनंजय महाडिक यांना विजयी करून कोल्हापुरकरांनी पुरोगामी विचारांची कास सोडली नाही,’ असे सांगून पवार यांनी काेल्हापूरकरांचे जाहीर आभार मानले. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळेल याची अाम्ही काळजी घेतली. ऊसाला दराची तजवीज केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात कपात केली,’ याची आठवणही पवारांनी करून दलिी. शाहू महाराजांचे विचार पुन्हा मजबूत करण्याची आता वेळ आली आहे. हे राज्य पुन्हा समर्थपणे उभारण्यासाठी, काळ्या आईची सेवा करण्याऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी, तरूणांचे भविष्य फुलवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्ता द्या, असे आवाहनही पवारांनी केले.
सत्ता द्या, सर्वांना आरोग्यविमा
राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आल्यास ६५ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन, ६० टक्के शेती ठिबक सिंचनखाली आणण्यासाठी ७५ टक्के अनुदान, सर्वांसाठी आरोग्यविमा, इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, अल्पसंख्याकांसाठीच्या आझाद महामंडळाला २००० कोटींचे बजेट करू, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सिंमेटचे रस्ते आणि गटर्स करू अशी ग्वाही पवार यांनी दिली .
अंबाबाईच्या साक्षीने सांगताे-काेल्हापूरचा टाेल रद्द करताे–
खाेटी अाश्वासने देऊन माेदी सरकार सत्तेवर अाले. मात्र, शंभर िदवसांत त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे ‘अाता माझी सटकली, मला राग येताेय’, असे जनता म्हणत अाहे. पुन्हा सत्ता आल्यास राज्यातील राहलिेले प्रश्न १०० दिवसांत सोडवतो, काेल्हापूरचा टाेलही रद्द करताे, अंबाबाईच्या साक्षीने मी हे सांगताे अाहे,’ अशी घोषणा अजित पवारांनी के
मुंडेंचे काय झाले : भुजबळ
पीयूष गाेयल, गडकरी, जावडेकर अशी केंद्रातील मंत्र्यांची नावं. भाजपच्या कार्यकारिणीतही महाजन, सहस्रबुद्धे आहेत. पाशा पटेल, फुंडकर ही नावे का नाहीत? गोपीनाथ मुंडे यांना कसेतरी मंत्रिपद िदले. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजून कसा आला नाही?’ असा सवाल छगन भुजबळांनी केला.

कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

unnamed

क्रीएटीव्ह फौंडेशन आणि कै.विश्वनाथ भेळके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड मधील डी.पी.रोड वर
भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी ही दिनांक २५ सप्टेंबर रोजी
घटस्थापना होणार असून रोज रात्री दांडिया खेळला जाणार आहे.
या वर्षी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फक्त महिलांसाठी लावणी चा कार्यक्रम यशवंतराव
चव्हाण नाट्यग्रहात होणार असून,३० सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता सप्तरंग महाराष्ट्राचे हा कार्यक्रम
होणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खरडेकर आणि विशाल भेलके यांनी सांगितले.
तसेच नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी च्या जाणीवेतून गरीब डोंगरी शाळा या संस्थेला धान्य
वाटप,तृतीय पंथीयाना साडी वाटप,मोफत आरोग्य शिबीर,अपंग मुलास सायकल वाटप,असे विविध
कार्यक्रम आयोजित केल्याचे ही संदीप खर्डेकर व विशाल भेलके यानी जाहीर केले.तसेच रविवार २८
सप्टेंबर रोजी महिलांची महा-आरती व कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दूध वाटप कार्यक्रम होणार
आहेत.सालाबाद प्रमाणे नागरिकांचा या सर्व कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभेल असे संदीप खर्डेकर
यांनी सांगितले.सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

युतीच्या भवितव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी घेणार निर्णय

0
Uddhav1विsonia_sharad_pawar_20090928(1)
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला सतत अल्टिमेटम दिल्यानंतरही काँग्रेसने हा विषय रेंगाळत कसा राहील याचीच दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
 भाजप व शिवसेना युतीचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलवाटोलवी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकमेंकांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्यात सुसंवाद असल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्याचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत अशीच टोलवाटोलवी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज चार वाजता मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यात पक्षाच्या विविध नेत्यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे यासाठी पक्षनेतृत्त्वाला साकडे घातले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रफुल्ल पटेलांनी आपण काँग्रेस नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे इतर नेत्यांना यावेळी सांगितले. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहावे, ही आम्हा नेत्यांची प्रामाणिक भावना आहे. पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत. जातीयवादी पक्षांचे मोठे आव्हान असताना या निवडणुकीलाही एकत्रपणेच सामोरे जावे, अशीच भूमिका राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. मात्र, जागावाटपाचा प्रश्न सोडवताना काँग्रेसने सन्मानजनक, सामंजस्यपूर्ण आणि अनुकूल असा प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पटेल यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. दिवस मोजकेच राहिल्याने काँग्रेसने जागावाटपाबाबत व्यावहारिक तोडगा काढवा, अशी बहुतेक नेत्यांनी आशा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल यांच्या संपर्कात आहे. त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी व तोडगा काढावा अशी भूमिका मांडली आहे. आमच्याही नेत्यांचे तेच मत आहे.
याचबरोबर शिवसेना-भाजप महायुतीवर आघाडीतील दोन्ही घटकपक्ष बारीक लक्ष ठेवून आहेत. ही युती फिसकटली तर राज्यात नवीनच राजकीय स्थिती तयार होईल. अशा स्थितीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपण सर्वाधिक जागा जिंकू शकतो असा विश्वास वाटतो. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती करून एकमेंकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरविले आहे. जेणेकरून आघाडीला चौथ्यांदा सत्ता हस्तगत कशी करता येईल हे पाहायचे हे धोरण ठरल्याने महायुतीचा फैसला झाल्याशिवाय आघाडीच्या जागावाटपाला वेग येणार नाही. तसेच अंतिम निर्णयही होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्त्वात जागावाटपात जवळपास समझोता झालेला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी किमान 134 ते 136 जागांची मागणी करीत आहे. विरोधी पक्षांची महायुती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला 130 च्या आसपास जागा सोडू शकते. मात्र, युतीचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घ्यायचा नाही हे दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे.