Home Blog Page 3669

कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

unnamed

क्रीएटीव्ह फौंडेशन आणि कै.विश्वनाथ भेळके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड मधील डी.पी.रोड वर
भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी ही दिनांक २५ सप्टेंबर रोजी
घटस्थापना होणार असून रोज रात्री दांडिया खेळला जाणार आहे.
या वर्षी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फक्त महिलांसाठी लावणी चा कार्यक्रम यशवंतराव
चव्हाण नाट्यग्रहात होणार असून,३० सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता सप्तरंग महाराष्ट्राचे हा कार्यक्रम
होणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खरडेकर आणि विशाल भेलके यांनी सांगितले.
तसेच नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी च्या जाणीवेतून गरीब डोंगरी शाळा या संस्थेला धान्य
वाटप,तृतीय पंथीयाना साडी वाटप,मोफत आरोग्य शिबीर,अपंग मुलास सायकल वाटप,असे विविध
कार्यक्रम आयोजित केल्याचे ही संदीप खर्डेकर व विशाल भेलके यानी जाहीर केले.तसेच रविवार २८
सप्टेंबर रोजी महिलांची महा-आरती व कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दूध वाटप कार्यक्रम होणार
आहेत.सालाबाद प्रमाणे नागरिकांचा या सर्व कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभेल असे संदीप खर्डेकर
यांनी सांगितले.सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

युतीच्या भवितव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी घेणार निर्णय

0
Uddhav1विsonia_sharad_pawar_20090928(1)
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला सतत अल्टिमेटम दिल्यानंतरही काँग्रेसने हा विषय रेंगाळत कसा राहील याचीच दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
 भाजप व शिवसेना युतीचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलवाटोलवी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकमेंकांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्यात सुसंवाद असल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्याचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत अशीच टोलवाटोलवी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज चार वाजता मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यात पक्षाच्या विविध नेत्यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे यासाठी पक्षनेतृत्त्वाला साकडे घातले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रफुल्ल पटेलांनी आपण काँग्रेस नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे इतर नेत्यांना यावेळी सांगितले. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहावे, ही आम्हा नेत्यांची प्रामाणिक भावना आहे. पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत. जातीयवादी पक्षांचे मोठे आव्हान असताना या निवडणुकीलाही एकत्रपणेच सामोरे जावे, अशीच भूमिका राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. मात्र, जागावाटपाचा प्रश्न सोडवताना काँग्रेसने सन्मानजनक, सामंजस्यपूर्ण आणि अनुकूल असा प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पटेल यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. दिवस मोजकेच राहिल्याने काँग्रेसने जागावाटपाबाबत व्यावहारिक तोडगा काढवा, अशी बहुतेक नेत्यांनी आशा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल यांच्या संपर्कात आहे. त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी व तोडगा काढावा अशी भूमिका मांडली आहे. आमच्याही नेत्यांचे तेच मत आहे.
याचबरोबर शिवसेना-भाजप महायुतीवर आघाडीतील दोन्ही घटकपक्ष बारीक लक्ष ठेवून आहेत. ही युती फिसकटली तर राज्यात नवीनच राजकीय स्थिती तयार होईल. अशा स्थितीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपण सर्वाधिक जागा जिंकू शकतो असा विश्वास वाटतो. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती करून एकमेंकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरविले आहे. जेणेकरून आघाडीला चौथ्यांदा सत्ता हस्तगत कशी करता येईल हे पाहायचे हे धोरण ठरल्याने महायुतीचा फैसला झाल्याशिवाय आघाडीच्या जागावाटपाला वेग येणार नाही. तसेच अंतिम निर्णयही होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्त्वात जागावाटपात जवळपास समझोता झालेला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी किमान 134 ते 136 जागांची मागणी करीत आहे. विरोधी पक्षांची महायुती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला 130 च्या आसपास जागा सोडू शकते. मात्र, युतीचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घ्यायचा नाही हे दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे.