Home Blog Page 3665

स्वछ भारत अभियानमध्ये व्यापारी सहभागी

0

q

स्वछ भारत अभियान अंतर्गत पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावर पुणे कॅम्प मर्चंटस असोसिएशनतर्फे सर्व व्यापारी बांधव स्वछता मोहीममध्ये सहभागी झाले होते .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळामधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृत फेरीचे खाऊ देऊन स्वागत केले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार , पुणे कॅम्प मर्चंटस असोसिएशनचे सदस्य पराग शहा , सुशील खंडेलवाल , राहुल काळे , कावस पंडोल , उगम गुंदेचा , हितेश शहा , केतन शहा , मनीष मेहता , हेतल शहा , अमर शहा , सुनील मुथ्था , नीरव शहा ,भावेश दवे , पुनीत ग्रोवर , राहुल रांका , कुशल ओसवाल , रोहन खंबाटा , बोमन बरूचा आदी व्यापारी बांधव सहभागी झाले होते .

निम्हण यांची गावठाण परिसरात प्रचार फेरी

0

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रस व रिप. पक्षाचेउमेदवार विनायक निम्हण यांनी शिवाजीनगर
गावठाण परिसरात प्रचार फेरी काढली.
निम्हण यांनी आज सकाळी चतु:शृंगी देवी, रोकडोबा आणि श्रीरामाचेदर्शन घेऊन प्रचारफेरीला सुरुवात
केली. ढोल-ताशांच्या गजर आणि विनायक निम्हण यांनाच विजयी करा, अशा निनादात संपूर्ण वातावरण
निम्हणमय झालेहोते. जागोजाग तेनागरीकांशी संवाद साधून मत देण्याचेआवाहन करीत होते. नागरीकही
त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेचित्र होते. ‘सिंघम’च्या धर्तीवर ‘निम्हण’ ची
गाणी लक्षवेधक ठरली. या प्रचारफेरीत तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरीक, महिलाही मोठ्या संख्येनेसहभागी
झाल्या होत्या. शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा देवस्थानपासून सुरुझालेली ही प्रचारफेरी नाथ गल्ली, मोरे
पथ, भागुबाई पांडुरंग खेडेकर पथ, कै. पांडुरंग खेडेकर चौकातून तात्याबा साधुजी पथ मार्गेमार्गस्थ झाली. पुढेती
कै. बाबुराव पिसेपथमार्गेकै. महादेव तुकाराम खेडेकर चौकात आली. या चौकात महिलांनी निम्हण यांचेऔंक्षण
केले. त्यानंतर प्रचारफेरी शिवाजी व्यायाम मंडळमार्गेवरची आळी तालीम, रामगढिया बोर्ड, सिताई मार्ग,
मुंजोबा तरुण मंडळासमोरून विठ्ठल मंदिराजवळ आली. इथेनिम्हण यांनी श्री विठ्ठलाचेदर्शन घेतले. पुढेही
फेरी युसुफ खुदाबक्ष शेख मार्गानेमहापालिका भवनजवळ निघाली. तिथून सिद्धार्थ चौक, जैन मंदिर
परिसरातील नागरीकांना मत देण्याचेआवाहन करीत छत्रपती शिवाजी पुतळा चौकामार्गेजुना तोफखाना, साई
बाबा मंदिरामार्गेराजीव गांधीनगरमध्येआली. या ठिकाणीही त्यांचेजंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण राजीव
गांधी वसाहत पिंजून काढत प्रचारफेरी कामगार पुतळा वसाहतीजवळ थांबली. यावेळी नागरीकांनी निम्हण यांनी
केलेल्या कामाचेकौतुक केले. निवडणूकीत काँग्रेसच विजयी होईल आणि निम्हण इतिहास घडवतील, असा
विश्‍वास व्यक्त केला.
माझी निष्ठा मतदारांप्रती असल्यामुळेमी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. यापुढेआता
आपल्याला ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, बेरोजगार युवक, निराधार, विधवा परितक्त्या महिलांसाठी भरीव
कार्य करायचेआहे. हेकार्य तडीस न्यायचेअसून त्यासाठी आपलेपाठबळ आवश्यक आहे, अशी अपेक्षा
निम्हण यांनी व्यक्त केली.

जुन्या वाड्यांचे सर्व प्रश्न सोडवणार – डॉ. रोहित टिळक

0

कसबा पेठ हा पुणे शहराचे भूषण असलेली एक ऐतिहासिक पेठ आहे. बारा बलुतेदारांसह सर्व समाज इथं गुण्यागोविंदाने आजही नांदत असून पुण्याची वाडा संस्कृतीचे जतन येथेच होत आहे. येथील वाडे जुने आहे याची मला जाणिव आहे. पण सर्वच वाड्यांचे प्रश्न सारखे नसल्याने ते एकत्रित सोडवण्याऐवजी प्रत्येक वाड्याचे प्रश्न स्वतंत्रपणे सहजसुटू शकतात आणि ते मी सोडविन असे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट आघाडीचे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी आज येथे सांगितले.

पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन टिळक यांनी पदयात्रेव्दारे मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या समावेत काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच तरूण नव्या पिढीतील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक बुवा नलावडे, अरूण को-हाळकर, जयसिंग भोसले, विद्या भोकरे, रोहन भांड, नरेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक चौकाचौकात मंडळांचे कार्यकर्ते टिळक यांचे उत्साहाने स्वागत करत होते.

कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा सुरू झाली. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन टिळक यांनी मतदारांशी संवाद साधला. मोटे मंगल कार्यालय, सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, तांबट हौद, तांबट आळी, शिंपी आळी, गुंडाचा गणपती, व्यवहारे आळी, साततोटी चौक, योजना हॉटेल, गावकोस मारूती, झांबरे चावडी, नवदीप मंडळ, फडके हौद, लोणार आळी, लोणार आळी, दूधभट्टी परिसर, सोन्यामारूती चौक, सिटी पोस्ट, श्रीकृष्ण टॉकीज, सायकल दवाखाना, म्हसोबा मंदीर येथे पदयात्रेचा समारोप झाला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विनंतीवरून जयश्री बागुल यांची माघार

0

आबा बागुल यांच्यावर अन्याय झाला हाकाटी पिटत त्यांच्या सौभाग्यवती जयश्री बागुल यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली होती मात्र आज खुद्द आबा बागुल यांनीच प्रसिद्धीपत्रक काढले आणि … पृथ्वीराज चव्हाण यांच्या विनंतीवरून जयश्री बागुल यांनी रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले , प्रत्यक्ष बागुल यांनी आपल्या सहीनिशी दिलेले पत्रक येथे पहा आणि वाचा …

पदयात्रा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी -गाठी

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित घोरपडी भागात आज झालेल्या पदयात्रेत जेष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शुभेछा दिल्या आज सकाळी घोरपडी प्रभाग क्रंमांक ४१ पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा वार्डचा सात येथे पदयात्रे द्वारे घरोघरी जाऊन प्रचार केला . .

आजची पदयात्रा घोरपडी गाव मधील अनंत टाकीज , श्रावस्तीनगर , बालाजीनगर , श्रीनाथनगर , निगडेनगर , संपूर्ण बी. टी. कवडे रोड , डोबरवाडी परिसर , जांभुळकर मळा , प्लेझंट पार्क , चिमटा वस्ती , बंगला नंबर २या भागामध्ये प्रचार करून व्हिक्टोरिया रोड येथे समारोप झाला .

या पदयात्रेत माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , माजी नगरसेविका मंगला मंत्री , प्रदीप परदेशी , अरविंद अंगिरवाल ,तुषार मंत्री , पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , मुन्ना शेख , संजय वाघमारे , रमेश पोळ , राजेश राजोरे , टोनी फ्रान्सिस , किशोर पाटे , योगेश घोडके , संजय त्रावडन, नासीर खान , सागर नवगिरे , रेणुका रजपूत , मीना काकडे , शांती कटमणी, मधुकर चांदणे, गंगाधर शर्मा आदी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते

आदित्य ठाकरे गुरुवारी पुण्यात

0

शिवशाहीची पहाट उगवते आहे , मी तयार आहे , तुम्ही तयार आहात ? असा तरुणाईला सवाल करणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे गुरुवारी पुण्यात येत आहेत ,पर्वती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन तावरे यांच्या प्रचारार्थ 2 ऑक्टोबरला (गुरुवारी) दुपारी 2 वाजता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पर्वर्ती मतदारसंघात शिवसेनेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे, असे बाळा ओसवाल यांनी सांगितले.‘आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित असून, या सत्तेचा उपयोग गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला ताकद देण्यासाठी केला जाईल,’ अशी ग्वाही पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे यांनी आज दिली. मी तळागाळाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता असून, आमदार झाल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
पर्वती मतदारसंघातील शिवसेनेतर्फे महर्षीनगर येथे महिला मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. त्या वेळी तावरे बोलत होते.
उपशहर प्रमुख बाळा ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, कौस्तुभ देशपांडे, नितीन कांबळे, अर्जुन जानगवळी, आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल ?-पृथ्वीराज चव्हाण

0

तुळजापूर : उद्धव ठाकरे , राज ठाकरे मोदींसह भाजपवर बरसात असताना , नारायण राणे यांच्यानंतर आता काँग्रेस चे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर सूड उगवू पाहत आहेत, महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल असा सवाल करीत महारष्ट्रातील जनतेने त्यांना वेळीच योग्य उत्तर गरजेचे आहे असे म्हटले आहे
मोदी यांनी JNPT कडचा सगळा व्यापार गुजरात बंदराकडे वळविला आहे , मुंबईचे महत्व कमी करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत असे गेल्या २४ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी म्हटले होते आता चव्हाण यांनी हि महाराष्ट्राला मोदींपासून सावध राहण्याची गरज प्रतिपादित केली आहे
तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले , हि सागरी सुरक्षा अकॅडमीसारखे अनेक प्रकल्प गुजरातकडे वळविले जात आहेत. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूक असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्रावर सूड उगवला जात असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून एकप्रकारे भाजपासोबत हातमिळवणी केली, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल, असा सवाल करीत गुजरातकडे जाणारी मुंबई महाराष्ट्राने १०५ जणांचे हौतात्म्य देऊन मिळविली. त्याचाच सूड मोदी उगवत असून, केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे तीन विभाग गुजरातला नेले. मुंबईतील गोदी बंदरही गुजरातमध्ये हलविले. यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार का? असा सवालही त्यांनी केला.
व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, तुळजापूरचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती.

आघाडीच्या काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करू – गडकरी

0

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे निर्माण होण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. नागरिकांनी घरातील सोने-नाणे व जागा विकून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचाप्रयत्न केला जाईल. त्यासाठी शहरातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार आणि चंद्रकांता सोनकांबळे या तीन उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (दि. ३0) केले.
चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवड, केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी मतदारसंघातील उमेदवार एकनाथ पवार आणि पिंपरी मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, खेड-आळंदी मतदारसंघातील उमेदवार शरद बुट्टे पाटील, भोर मतदारसंघातील उमेदवार शरद ढमाले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, वसंत वाणी, माजी शहराध्यक्ष भगवान मनसुख, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीनिवास बढे, अँड़ सचिन पटवर्धन, शहर सरचिटणीस राजू दुर्गे, मोहन कदम, कामगार आघाडीचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शीतल शिंदे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, अशोक सोनवणे, भाजयुमोचे मोरेश्‍वर शेडगे आदी उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष देशातील सर्वांत मोठे जातीयवादी पक्ष आहेत.जोपर्यंत जनता बाबा, आबा आणि दादा यांच्या गाड्या भंगारात विकत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार नाही.आम्ही गेल्या १00 दिवसांत मुस्लीम समाजाच्या विरोधात एकही निर्णय घेतलेला नाही. जात, पंथ व धर्मावर भाजपला कधीच राजकारण करायचे नाही. त्तसेच विकासाच्या बाबतीत भाजप भेदभाव करणार नाही. मात्र काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय देशाचे भविष्य घडणार नाही, असे ते म्हणाले.
आ. जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडमधील जनतेने राष्ट्रवादीऐवजी भाजपवर प्रेम केले असते, तर शहराचे शांघाय झाले असते. देशातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारे हे शहर आहे. तरीही शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. राष्ट्रवादीने शहरातील लोकांना केवळ समस्या दिल्या. आज नागपूर शहराची राज्यातील व देशातील अन्य महापालिकांच्या बरोबर तुलना होते. तशा सुविधा नागपूर शहरात आणल्या. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये सुविधा आणून शहराचे शांघाय होण्याचे प्रय▪करा, असे आवाहन त्यांनी गडकरी यांना केले. तसेच अनधिकृत बांधकामे व अन्य समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची जेवढी बदनामी झाली, ती कमी होण्यासाठी प्रय▪करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार एकनाथ पवार, पिंपरी मतदारसंघाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, खेड-आळंदी मतदारसंघाचे उमेदवार शरद बुट्टे-पाटील व माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे शहर सरचिटणीस मोहन कदम यांनी केले.

लक्ष्मण जगताप यांना मतदार आता वाऱ्यावर सोडतील

0

1412076829

लक्ष्मण जगताप यांनी १०० दिवसात ३/४ पक्ष बदलले , पक्षाने मोठ्ठी ताकद देवूनही असे वागणाऱ्या उमेदवारांना मतदारहि आता वाऱ्यावर सोडतील अशी टीका करतानाच त्यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘ खबरदार, माझ्याशी गाठ आहे ‘ असा इशारा दिला
पिंपरी – ‘पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच उमेदवारांचा प्रचार करा. कोणी गडबड केली, गद्दारी केली आणि दिवसा एक व रात्री एक असे करणार असाल तर गाठ माझ्याशी आहे. ज्यांना पक्ष बदलायचाय त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा,‘‘ अशा कठोर शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले. लक्ष्मण जगताप यांच्या भाजपतील प्रवेशावर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘शंभर दिवसांच्या आत तीन-तीन, चार-चार पक्ष बदलणाऱ्या व्यक्तींवर जनता विश्वास ठेवत नाही. पक्षाने त्यांना एवढी मोठी ताकद दिली असताना ते पक्षाला अशा पद्धतीने सोडत असतील, तर ते मतदारांनाही वाऱ्यावर सोडायला मागे-पुढे पाहणार नाही.
चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी रहाटणीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. “पिंपरी‘साठी आकुर्डीतील हॉटेलमध्ये आणि “भोसरी‘साठी मोशीतील हॉटेलमध्ये बैठक झाली. भारतीय जनता पक्षातर्फे चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतील त्यांचे समर्थक नगरसेवकही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. आमदार जगताप समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते “कमळा‘चा प्रचार करत असल्याच्या तक्रारी पवार यांच्या कानावर होत्या. पक्षाची पदे लाटून बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांमुळे लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होईल, अशी भीती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याने पवार यांनी सर्वांनाच सुनावले. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा लांडगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे, शमीम पठाण, नगरसेवक रामदास बोकड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल कलाटे उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘गेल्या वेळी तुम्ही अपक्षांना निवडून आणले. या वेळी तसे चालणार नाही. दिवसा एक, रात्री एक हे आता खपवून घेतले जाणार नाही. पक्षाशी गद्दारी करायचीच असेल, तर नगरसेवकपदाचे राजीनामे द्या, अन्यथा आम्हाला पदे देता येतात, ती काढूनही घेता येतात. जो काम करेल त्याला मी ताकद देईन, पण राष्ट्रवादीशिवाय दुसरा विचार कोणी करू नये. पक्षामुळे तुम्हाला आणि मला किंमत आहे, हे विसरू नका.‘‘

रा स प लढणार ६ जागांवर

0

पुणे :राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत सहावी जागा कन्नड (मराठवाडा ) येथे मिळाली आहे .भारतीय जनता पक्षाशी जागावाटपातून हि जागा मिळाली आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर पुण्यातून इ मेल द्वारे यांनी हि माहिती दिली .
मारुती राठोड हे कन्नड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत . राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात ६ जागा लढवत आहे . उमेदवार आणि मतदारसंघ पुढीलप्रमाणे

१. दौंड :राहुल कुल
२. माण :शेखर गोरे
३. कळमनुरी :माधवराव नाईक
४. गंगाखेड :रत्नाकर गुट्टे
५. भूम -परंडा -बाळासाहेब पाटील
६. कन्नड :मारुती राठोड

दगडूशेठ गणपती मंदीर परिसर सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावणार

0

पुणे-जुलै महिन्यात फरासखाना पोलिस ठाणे परिसरात झालेल्या स्फोटामुळे इथल्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दाट लोकवस्ती असल्यामुळे अशा विघातकी घटकांवर नजर ठेवण्यास पोलिसदल कमी पडत आहे. तसेच इथल्या नागरिकांची सुरक्षादेखील महत्वाची आहे या भागात भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.अशा घटना घडण्याचे एकमेव कारण म्हणजे अपुरी सुरक्षा व्यवस्था आहे. लोकसंख्येच्या मानाने पर्याप्त पोलिस दल नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. सत्तेत आल्यास पोलिसदलाचे मनोधैर्य व संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार असे कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गिरिश बापट यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ५० मध्ये सांयकाळी पाच वाजता प्रचार पदयात्रा सुरु झाली. तुळशीबाग गणपती येथून सुरु झालेली ही पदयात्रा व्यापार्यांच्या भेटी घेत बाबूगेणू चौकाकडे निघाली तेथून मंडई पोलिस चौकी भागात व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या समजून घेत शिंदेआळी येथे पदयात्रा आली. त्यानंतर बाजीराव रोड, नातूबाग गणपती, बुरुडआळी, शनिपार, कुमठेकर पथ करत शर्मिली चौकात या पदयात्रेचे समापन करताना गिरिश बापट यांनी स्थानिकाशी संवाद साधला.
यावेळी कसबा मतदारसंघाचे राजेश येनपूरे, नगरसेवक अशोक येनपूरे, नगरसेवक दिलीप काळोखे, दिपक रणधीर, अशोक वझे, उदय जोशी, प्रदिप इंगळे, विनायक कदम, भारत निझामपुरकर, राहुल भाटे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, दिपक पोटे, सुहास
कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, निलेश कदम, प्रमोद कोंढरे, अरविंद कोठारी, रत्नदीप खडके, अक्षय संभूस, सुनिल रसाऴ, उपेंद्र चिंचाळकर, हेरंब पवळे, उदय कांबळे, सलिम काझी, सौ. गिरिजा बापट, रागिनी खडके, मोहना नातू, योगिता गोगावले, निर्मला कदम, विजया हंडे, रीना सपकाळ,
रूपाली कदम, शोभा गोखले, वैशाली नाईक आदी उपस्थितहोत्या.

आबा बागुलांवर अन्याय – जयश्री बागुलांचा लढा

0

आबा बागुलांवर अन्याय – जयश्री बागुलांचा लढा
काँग्रेस पक्षाने पर्वती मतदार संघातून उमेदवारी देताना आबा बागुल अन्याय त्यंच्या पत्नी जयश्री बागुल यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल तर केलाच पण आता प्रचारालाही प्रारंभ केला आहे त्यामुळे त्यांची माघार होईल कि खरोखर त्या लढा देतील हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे
आबा बागुल आता उपमहापौर आहेत , पक्षनेता , स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे त्यांनी पक्षात भूषविली असली तरी त्यांचा या मतदारसंघात विकास कामांचा झपाटा हि प्रचंड आहे , मोफत काशीयात्रा सुरु करून त्यांनी जणू याबाबत राजकारण्यांना एक आगळा वेगळा मार्गच दाखविला . या मतदार संघात विविध लक्षवेधी प्रकल्प त्यांनी राबविले , घरा – घरात प्रत्येक माणसाशी संपर्क ठेवला या अनुषंगाने आज अजिंक्य मंगल कार्यालयात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे , स्वर्गीय नगरसेवक अरुण धिमधिमे यांची पत्नी वैशाली धिमधिमे , ओ बी सी महासभेचे प्रदेश अध्यक्ष पी बी कुंभार , क्रिकेट असोसिशन चे उपाध्यक्ष झुबेर पूनावाला , झोपडपट्टी जनविकास परिषदेचे विश्वास दिघे , गुलाबराव ओव्हाळ तसेच बाळासाहेब भांबरे आदींनी यावेळी जयश्री बागुलांना पाठींबा देणारी आणि काँग्रेस ने दिलेल्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त करणारी भाषणे केली हेमंत बागुल यांनी या मेळाव्याचे आयोजन केले

भरत जाधव आणि अमृता सुभाष ही जोडी रुपेरी पडद्यावर!!

0

‘सत्या व्हिजन अचिव्हर्स स्पेक्ट्रम फिल्म्स’ च्या कल्पना सेट्टी, संगीता बालचंद्रन आणि सहनिर्माते प्रणव विनोद पाठक यांची पहिली-वहिली सिनेनिर्मिती असलेला सांगितला बालचंद्रन दिग्दर्शित ‘चिंतामणी हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
‘चिंतामणी’ सिनेमाची कथा ही एका मध्यमवर्गीय माणसाच्या असामान्य कर्तुत्वाची आहे. मुंबईच्या चाळीत आपल्या बायको आणि मुली सोबत राहणारा ‘चिंतामणी’ आपल्या घरच्यांच्या आणि स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा परिस्थितीमुळे भागवू शकत नाही त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनांची ही गोष्ट आहे. श्रीमंत माहेर असलेली प्रेमविवाह करून आणलेली बायको, सासऱ्यांच्या मते कुचकामी ठरलेला तिचा पती चिंतामणी. आपले बाबाही सुपरहिरो असावेत अशी माफक इच्छा असलेली १० वर्षाची मुलगी. त्यांच्या अपेक्षेला चिंतामणी कधीच उतरलेला नसतो. मध्यमवर्गीय वृत्ती आणि पैसा आड येतो. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात पण त्यासाठी धमक लागते पण तीदेखील या चिंतामणीत नाही. ‘आल अंगावर घेतलं शिंगावर’ खरय अगदी अशीच गोष्ट चिंतामणीच्या आयुष्यात घडते. वर्तमानपत्र आणि अनेक इतर माध्यमातून आज विविध प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपण आवर्जून वाचतो ही. परंतु …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘चिंतामणी’ हा सिनेमा पहावा लागेल.
सिनेमाची कथा जशी सिनेमाच्या सुरुवातीला मला जशी सांगण्यात आली तशीच ती पडद्यावर उतरवली याचा मला जास्ती आनंद असून दिग्दर्शिका संगीता बालचंद्रन यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले. आजवर रसिक प्रेक्षकांनी मला अनेक भूमिकांमधून पाहिले आहे परंतु या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केला.
आजवर अनेक सिनेमांमध्ये मी काम केले असून अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ असून ही संधी मला संगीता बालचंद्रन यांनी दिली यासाठी मी त्यांची आभारी असल्याचे अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सांगितले.
‘चिंतामणी’ सिनेमात अभिनेते भरत जाधव, अभिनेत्री अमृता सुभाष, रुचिता जाधव आणि बालकलाकार तेजश्री वालावलकर यांच्या मुख्य भूमिका असून उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के आणि मोनिका दबडे यांच्याही भूमिका ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची कथा दीपक अनंत भावे यांची असून पटकथा आणि संवाद किरण श्रीनिवास कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी लिहिले आहेत. या सिनेमात तीन वेगळ्या बाजाची गाणी असून ही गाणी अरविंद जगताप, सागर खेडेकर आणि संजीव कोहली यांनी लिहिली असून या तिन्ही गाण्यांना संजीव कोहली यांनीच संगीत दिले आहे. सुरेश सुवर्णा यांनी सिनेमाचे कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.
येत्या ३१ ऑक्टोबरला …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते का ? हे ‘चिंतामणी’ सिनेमातून आपल्याला उलगडणार आहे.

रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून सकाळी झाला . रमेश बागवे आणि त्यांच्या पत्नी सौ. जैन्नब बागवे यांनी खना नारळाने ओटी भरून भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. आजचा प्रचार प्रभाग क्रंमांक ४७ हरकानगर , राजेवाडी या भागात झाला .
भवानी माता मंदिर , प्रथम – जुना मोटार स्टण्ड , सरस्वती सोसायटी , पदमजी चौकी , कादरी मंझील , जिज्ञाचा मार्गसा वसाहत , मिलिंद मंडळ , जयभीम मंडळ , एस. आर. ए. वसाहत , पत्र्याची चाळ , प्रगतीशील मंडळाच्या गल्लीमधून , कॉलनी नंबर १२ , बाहेर निघून ए. डी. कॅम्प चौक , किराड हॉस्पिटल , संत कबीर चौक , भोर्डे आळी , इस्लामपुरा . रास्ते मांग वाडा , राजेवाडी , भवानी पेठ पोलिस लाईन , पदमजी चौकातून निशात टाकीज , गाडी अड्डा , मंजुळाबाई चाळ , वॉचमेकर चाळ , गणपत भोई चाळीतून चुडामण तालीम चौक , नवीन हिंद समोरून चुडामण तालीम वसाहत , बाहेर निघून ७१७ भवानी पेठ कब्रस्थान मागे , हरकानगर वसाहत , ५१२ भवानी पेठ , मेमजादे अपार्टमेंट , बर्फाचा कारखाना , तबेला , नानेशा कॉर्नर अशा मार्गाने समारोप झाला .
या पदयात्रेत पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, हाजी नदाफ , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक अविनाश बागवे , माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक संगीता पवार , करण मकवानी , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विनोद संघवी , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेवक सुधीर जानजोत, स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख ,अनिस सुंडके ,पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित दरेकर , रमेश अय्यर , जया किराड , विठ्ठल थोरात , वाल्मिक जगताप , रफिक शेख , सोमनाथ किराड , विरु किराड , झोपडपट्टी सेलच्या महिला अध्यक्षा सुरेखा खंडागळे , भगवान धुमाळ , राजेश शिंदे , राजाभाऊ चव्हाण , बबलू सय्यद , स्मिता मुळीक, चेतन अग्रवाल , सुनील घाडगे , जोस्वा रत्नम , जोसेफ अंथोनी , रशीद खिजर , व कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते .