Home Blog Page 3663

आंबेगाव शिरुर मधील राष्ट्रवादीची दहशत मोडून काढू – खा .आढळराव-पाटील

0

जांबूत-
आंबेगाव शिरुरचे आमदार म्हणून अरुण गिरेंच्या रूपाने अरुणोदय होणार आहे, त्याचबरोबर शिवशाहीचे सरकार येणार आहे. राष्ट्रवादीची ही दहशत आपण मोडून काढू असे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांच्या प्रचारार्थ ते टाकळीहाजी, जांबूत (ता. शिरूर) येथे बोलत होते. या वेळी टाकळीहाजी येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश चोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खा.आढळराव पाटील म्हणाले की, या माणसाने सोज्वळ असल्याचा मुखवटा धारण केला आहे. प्रत्यक्षात बुरख्यामागे भीषण वास्तव दडले आहे. आंबेगावच्या जनतेला ते आता पूर्णपणे समजले आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र शासनाच्या एमकेसीएलचा दोन हजार कोटींचा घोटाळा समोर आणला आहे.
या वेळी बोलताना अरुण गिरे म्हणाले की, या वेळी बदल घडणार व आंबेगाव-शिरूर मतदारसंघावर भगवा फडकणारच आहे. खासदार आढळराव-पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वा खाली या मतदारसंघाचा आपण विकास करणार आहोत. या वेळी उपजिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, बी. डी. आढळराव-पाटील, गणेश जामदार, माउली घोडे, बाळासाहेब वाघ, पारभाऊ गावडे, लक्ष्मण घोड, नागरिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

केळकर रोड आरक्षणाचा प्रश्न सोडवणार – डॉ. रोहित टिळक

0

rohit

केळकर रस्त्यावर डीपी रोडचे आरक्षण असल्याने अनेक वाड्यांचा विकास थांबला आहे. या रस्त्यावरचे आरक्षण महापालिकेने पर्यायी नदीपात्रातील रस्त्यावर टाकले असल्याने केळकर रोड आरक्षण उठवण्याचा प्रश्न तातडिने सोडवू असे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट आघाडीचे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी आज येथे सांगितले.
या शिवाय प्रस्तावित विकास आराखड्यातील काही तरतुदी कशा त्रासदायक आहेत याच्या तक्रारी अनेक नागरीकांनी आजच्या प्रचार फेरी दरम्यान डॉ. टिळक यांच्याकडे मांडल्या आहेत. त्यातही लक्ष घालू असे सांगत त्यांनी नागरीकांना आश्वस्त केले. दुपारी केसरी वाड्यापासून डॉ. टिळक यांनी प्रचार फेरी सुरू केली. त्यांच्या समावेत आमदार अनंतराव गाडगीळ, गोपाळ तिवारी, प्रणेती टिळक, बाळासाहेब दाभेकर, कसबा मतदारसंघाचे प्रचार समन्वयक वीरेंद्र किराड, डॉ. सायली कुलकर्णी आदी मान्यवर तसेच काँग्रेसचे स्थानिक तरूण पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केसरीवाड्यातील गणरायचे दर्शन घेत प्रचारफेरी सुरू झाली. मोदी गणपती जवळ डॉ. टिळक यांचे फटाक्यांच्या माळा उडवून दणदणीत स्वागत दाभेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. नारायण पेठे आणि शनिवार पेठेतील अनेक वाड्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्या आहेत. यातील जुने भाडेकरू आवर्जून डॉ. टिळक यांच्या स्वागतासाठी खाली येऊन थांबल्याचे चित्र बघायला मिळाले. आजचा प्रचार फेरीत डॉ. सायली कुलकर्णी यांच्या सर्व सहका-यांनी लालरंगाचे बांधलेले फेटे लक्ष वेधून घेत होते. मोदी गणपती, पत्र्या मारूती, लोखंडे तालीम, फुटका बुरूज, मुठेश्वर मंडळ, कबीर बाग परिसर, विनायक मंडळ अशा मार्गावर प्रचार फेरी झाली. अनेक ठिकाणी डॉ. टिळक यांना वैयक्तीक ओळखणारे घरी नेण्यासाठी उत्सुक होते. आजच्या प्रचार फेरीचा मार्ग मोठा असून सर्वांच्या समावेत चालत जाणेच डॉ. टिळक यांनी पसंत केले. प्रत्येक गणपती मंडळाजवळ कार्यकर्तेही डॉ.टिळक यांचे स्वागत करण्यासाठी थांबलेले दिसले. गणपतींचे दर्शन घेत व आरती करत प्रचार फेरी सुरू होती. अखेर अनाथ हिंदू महिला आश्रमाजवळ प्रचारफेरीचा समारोप झाला.

ओट्यांच्या घरांना मालकीहक्क देऊ : अभय छाजेड

0

अप्पर-सुप्परच्या काही भागांत अजूनही पाण्याचे व ड्रेनेजचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला आणि या भागातील ओट्यांच्या घरांना मालकीहक्क मिळवून देण्यासाठी, आपण निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य देणार असल्याचे पर्वर्ती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गटाचे उमेदवार अँड़ अभय छाजेड यांनी सांगितले. त्यांनी रविवारी संपूर्ण अप्पर-सुप्पर इंदिरानगरचा परिसर पदयात्रेद्वारे पिंजून काढला.

अँड़ अभय छाजेड यांच्या पदयात्रेला अप्पर इंदिरानगर येथील पासलकर चौकातून सुरुवात झाली. त्यांच्यासमवेत स्वीकृत नगरसेवक रमेश सोनकांबळे, विजयराव मोहिते, विजय पवार, चव्हाणसर, रवी नलावडे, मखांबलेताई, डॉ. सौ. अहिरे, जयकुमार ठोंबरे, संतोष हराळे, बंडू नलावडे आदी प्रमुख कार्यकर्ते, तसेच शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पासलकर चौकातून पुढे अप्पर भागातील प्रत्येक गल्ली न् गल्ली, वसाहती, चाळींच्या घराघरांत जाऊन अभय छाजेड यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. सुवासिनी अगदी रस्त्यावर येऊन अभय छाजेड यांना औक्षण करीत होत्या. ही पदयात्रा पुढे अण्णा भाऊ साठे वसाहत, संपूर्ण इंदिरानगर, न्यू गणेशनगर, महेश सोसायटी, तुकाईनगर असे मार्गक्रमण करीत पुष्पम गॅस एजन्सी येथे समाप्त झाली. पदयात्ना सुरू असताना अप्पर आणि २७६ ओटा नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. सतत जाणारी वीज व इतर प्रश्नांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना छाजेड यांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्यानंतर लगेचच अधिकार्‍यांना फोन करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात होता.

लालमहालास महत्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार

0

6
पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघात असणार्‍या लालमहालास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व मिळवून देण्यास माझा प्रयत्न राहणार असून, छत्रपती शिवाजीमहाराजांना आयुष्यभर साथ देणारे सरदार झांबरे, गायकवाड, पासलकर आदींचा वैभवशाली इतिहासही जगापुढे आणणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिले.
शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबा मतदारसंघात प्रसिद्ध ऐतिहासिक लालमहालाचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्‍या स्मारकात रूपांतर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये उपलब्ध जागेचा नेटका वापर करून महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकाचा सचित्र इतिहास पुतळे व म्युरल्सच्या माध्यमातून आपण उभा करणार आहोत, त्याचबरोबर महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य उभारणीपर्यंतच्या काळात त्यांना जीवाभावाची साथ करणारे कसब्यातील शिलेदार ज्यांचा उल्लेख केवळ आज ऐतिहासिक पुस्तकांपुरताच र्मयादित राहिला आहे अशा झांबरे, गायकवाड, पासलकरांबरोबरच शिवा काशिद, जीवा महाले, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे आदि मावळ्य़ांच्या स्मृतिदेखील सचित्र स्वरूपात जिवंत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लालमहालास लागूनच असलेल्या जागेमध्ये ऐतिहासिक प्रसंगावर आधारित लेझर शोचे आयोजन, बागेचे सुशोभीकरण अशी एक शिवसृष्टीच निर्माण करण्याचा आपला मानस आहे.
यावेळी मानकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भय्या डाखवे, राजेंद्र कदम, गणेश नलावडे, प्रवीण तरवडे, एकलव्य गुंजाळ, संजय पासरेकर, किरण परदेशी, तात्या कुलकर्णी, सुरेश परदेशी, श्रीमती वनिता जगताप, वंदना नलवडे, देशकर ताई, जयश्री कडबाने, विमल यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो साभार – सुशील राठोड )

काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या- नितीन गडकरी

0

लातूर – काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे. लक्ष्मीपूजनाअगोदरच लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचारातून पैसा कमवला व जमवला असल्याने ते धन जरूर घ्या; पण मतदान भाजपच्या उमेदवारांना करा, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा येथील सभेत केले. सोनिया गांधींवर टीका करताना त्यांची भाषा मात्र घसरली.
गडकरी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्या ही राज्याची ओळख झाली आहे. राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज आहे. ७० हजार कोटींचा खर्च होऊन सिंचनाऐवजी मंत्र्यांचे खिसे ओले झाले.सोनिया आयी हे, रोशनी लायी है, असा नारा देणारी सोनियाही गेली व रोशनीही गेली आहे, अशी टीका नितीन गडकरी यांनी या वेळी केली सरकार आणा, राज्य लोडशेडिंगमुक्त करू २४ तास वीज देऊ. खताच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करू. २५ लाख बेकारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

अमेरिका – चीन -जपान भारतात गुंतवणूक करणार –मोदी दौऱ्याचा प्रचार

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पार पडलेला अमेरिका दौरा अपयशी ठरल्याचे रान विरोधी पक्षांनी उठवले असले, तरी . या दौऱ्यातील अधिकृत सूत्रांनी मात्र मोदी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. या दौऱ्याचे फलित म्हणजे आगामी तीन वर्षात देशात ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे.असा दावा केला आहे
साधारणतः नऊ वर्षांपूर्वी (२००५मध्ये) अमेरिकेने मोदी यांचा व्हिसा नाकारला होता. या मुद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्यात एका शब्दाचीही चर्चा झाली नाही. किंबहुना कोणत्याही चर्चेत हा विषय पुढेही आला नाही,’ अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. शिवाय मोदी यांची ही भेट दोन्ही देशांतील सर्व समीकरणे बदलवणारी ठरल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ‘हा दौरा दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध वेगळ्या आणि वरच्या पातळीवर नेऊन ठेवणारा राहिला,’ असेही सूत्रांनी नमूद केले.
मोदींचा हा दौर पार पडल्यानंतर ‘यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल’ने (यूएसआयबीसी) आगामी तीन वर्षांत अमेरिका भारतात ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. ‘यूएसआयबीसी’च्या या घोषणेचे ‘फिक्की’नेही स्वागत केले असून, त्यामुळे देशाच्या विकासाला गती आणि प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच, भारत मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होण्याकडे हे पहिले पाऊल असल्याचेही ‘फिक्की’ने म्हटले आहे.
अमेरिकेकडून झालेली गुंतवणुकीची घोषणा त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या गुंतवणुकीच्या केवळ २० टक्केच आहे. केंद्रातील स्थिर सरकार आणि गुजरातप्रमाणेच देशाचा कायापालट घडविण्याची मोदींची असलेली क्षमता अमेरिका जाणून आहे. त्याचमुळे मोदींचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. अनेक उद्योगपती आणि गुंतवणूकदारांनी मोदींची भेट घेतली आणि भारतात गुंतवणुकीची इच्छाही प्रदर्शित केली. ‘यूएसआयबीसी’च्या सदस्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी आगामी तीन वर्षांमध्ये ४१ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची मोदींना ग्वाही दिली.
मोदी आणि ओबामा यांच्यात झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये केवळ तंत्रज्ञानावर आधारीत विषय आणि निवडणूक मोहिमांविषयीच चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही दे

गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ! नरेंद्र मोदी

0

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लुटारू टोळीने राज्याला व देशाला अनेक वर्षांपासून लुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या योजना न राबवणार्‍या राज्य शासनाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ असून देशाच्या अखंडता, एकतेसाठी राज्या-राज्यांत फूट पाडणार्‍यांना हद्दपार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.महाराष्ट्रात ही पहिलीच निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे आमची भाजपा-शिवसेना युती तुटली आहे; पण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला अतिशय आदर, श्रद्धा आहे. बाळासाहेबांनी अतिशय कष्टाने सेनेची स्थापना केली आहे. त्या वेळी अनेकांच्या टीकाही त्यांनी सहन केल्या आहेत. त्यांनी आपले आयुष्य शिवसेनेसाठी सर्मपित केले आहे. त्यांच्या संकल्प शक्तीचा मी आदर करतो. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की या निवडणुकीत शिवसेनेवर टीका करणार नाही. त्यांच्यावर टीका न करणे हीच माझी त्यांना आदरांजली ठरेल. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत नाही. काही तत्त्वे असतात. त्यामुळेच मी शिवसेनेवर टीका करत नाही, असे स्पष्टीकरण या वेळी नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथील सभेत दिले.

महाराष्ट्रात भाजपची सारी भिस्त मोदिंवरच – पृथ्वीराज चव्हाण

0

नाशिक / नांदगाव : राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना काँग्रेसनेही मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहरा नसून, मोदींच्या करिष्म्यावरच राज्यातील भाजप अवलंबून असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत मोदींच्या कितीही सभा घ्या, तरीही काही फरक पडणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वबळावर येणार नसल्याने भाजपने युतीची भाषा सुरू केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या आज (दि.५) जिल्ह्यात हरसूल आणि नांदगाव येथे सभा झाल्या. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार निर्मला गावित यांच्या प्रचारार्थ हरसूल येथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. मोदींच्या आडून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत आहे. यांना काय आदिवासी, शेतकर्‍यांचे दु:ख कळणार, असा सवाल उपस्थित करीत मोदींच्या सभा होतील, ते भुरळ पाडतील, यावर राज्यातील भाजप अवंलबून आहे; मात्र मोदींच्या सभांना भुलायला जनता खुळी नाही. स्वबळावर येणार नसल्याची जाणीव झाल्याने गडकरींनी युतीची भाषा सुरू केली आहे. मुंबईचे उद्योग अहमदाबाद येथे नेऊन मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीने राज्यात राष्ट्रपती राजवट लावून भाजपला अप्रत्यक्ष सत्ता दिली आहे, याचा जाब जनतेने राष्ट्रवादीला विचारावा, असेही चव्हाण यांनी सांगितले. खिचडी सरकार येण्यापेक्षा काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला प्रदेश सरचिटणीस रमेश श्रीखंडे, माजी आ. निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.

व्रतस्थ दाम्पत्याची जीवनगाथा रूपेरी पडद्यावर

0

prakash

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो…. आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा आता चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे , “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या मराठी चित्रपटामधून. अॅड. समृद्धी पोरे यांचे निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर साकारत असून डॉ. मंदाकिनीं आमटेंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असणार आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ आणि ‘लय भारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणा-या झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेमलकसाला १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलिकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. शिक्षणाअभावी असलेलं अज्ञान, नक्षलवादी भाग, पोलिसी अत्याचार, शहरीकरणाचा वाराही जिथे पोहचलेला नाही असं जीवन तेथील आदिवासी जगत होते. त्यांना आरोग्याचं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत मुख्य प्रवाहात आणणं हे काम जेवढं जिकिरीचं तेवढंच आव्हानात्मकही होतं. हे आव्हान पेलत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आदिवासीपाड्यांमध्ये ज्ञानाचं नंदनवन फुलवलं. या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. व्रतस्थ समाजसेवी बाबा आमटेंचं समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्याने, त्यांच्या सहका-यांनी आणि आमटेंच्या तिस-या पिढीनेही आचरलेल्या एका विलक्षण जीवनप्रवासाची, या सा-यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा मराठी चित्रपट.

बाबा आमटे यांनी अभिनते नाना पाटेकर यांना आपला मानसपुत्र मानलं होतं. विकास आणि प्रकाश सोबत नाना हा आपला तिसरा मुलगा आहे असं ते कायम म्हणत. नाना पाटेकरांनीही हे नातं बाबांच्या हयातीत आणि त्यानंतरही जपलं. प्रकाश आमटेंचं कार्य, आयुष्य नानांनी अगदी जवळून बघितलं आहे. त्यामुळे ही भूमिका त्यांच्यासाठी जेवढी सोपी तेवढीच आव्हानात्मक आणि जबाबदारीचीही होती. नानांनी ती जबाबदारी प्रेमाने स्वीकारत ही भूमिका साकारली आणि आज जगभरातील विविध चित्रपट महोत्सवामंध्ये त्यांचं कौतुक होत आहे. सोनाली कुलकर्णीनेही मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत जीव ओतला आहे. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा कसदार अभिनय आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचं प्रेरणादायी कार्य याची उत्तम सांगड असलेला “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका साकारली आहे. महेश अणे यांचे छायाचित्रण तर अभिषेक रेडकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. गुरू ठाकूर यांच्या गीतांना राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. “मला आई व्हायचंय” या चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे, गोल्डन ग्लोबच्या रेणूका हावरे यांची सहनिर्मिती आहे तर प्रस्तुती झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची आहे.

क्षणभर इथे फुलल्या …बऱ्याच आशा, बऱ्याच अपेक्षा

0

भाऊ तुमच्याच सोबत राहू … देवदासींचा मानकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अरे चल तिकडे , ये अबे निकल जल्दी, तुझे मिलनेका नही क्या? भाऊ आलाय आमचा ।दिपक भाऊ । । आणि पाहता पाहता सारे दीपक मानकर यांच्या प्रचार फेरीत सामील झाल्या . म्हणाल्या , भाऊ तुम चिंता मत करना … तुम हीच आयेगा चुनके … हम आपके पिछे नही ,साथ रहेंगे । ये दत्ता है ना आपका, बडा खयाल रखता है हमारा …भाऊ । तुम भी खयाल रखना, हमारे बाल बच्चे यहा ना रहे ,आगे जाये, पढे -लिख्खे -कुछ बने … भाऊ. ये तो अब आपही करोगे? वरना हमारी फिकीर है किसीको भाऊ ? तुम चुन् के आवोगे तो दिवाळी धुम् धाम् से मनायेंगे भाऊ।
मोठ्ठ्या , आशेने , जिव्हाळ्याने एक ना अनेक संवाद चक्क बुधवारपेठेत ऐकायला येत होते , इज्जतदार -प्रतिष्ठित म्हणविणारे जिथे जायला नको म्हणतात पण ज्यांच्यामुळे शहरे आणि कुटुंबे यांच्या प्रतिष्ठा जपल्या जातात … त्यांना दीपक मानकर यांच्याशी खूप काही बोलायचे होते …काहींनी लगेचच आपल्या मागण्या एका निवेदनाद्वारे भावूंकडे सोपविल्याही … प्रचाराच्या धामधुमीत हि मानकर यांनी त्यांच्याशी इथे संवाद साधला . काळजी करू नका , स्वप्ने जरूर पहा आपण ती साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू , गुंडगिरीला घाबरू नका , पुढच्या पिढीला तरी चांगले जीवनमान देण्याचा मनोदय ठेवता आहात, निश्चितच मी मदत करेल … असे सांगून दीपक भाऊ निघाले … दत्ता सागरे , बालाजी तेलकर त्यांच्या मागे निघाले पण भावूंची चर्चा सुरूच होती … एक हि तो है … हमारी सुनेगा , हमे आगे ले जायेगा । नही तो यहा कौन किसीका होता है ? बऱ्याच अपेक्षा ,बऱ्याच आशा क्षणभर इथे फुलल्या … कोण जाणो पुन्हा त्या उमलतील कि उमटणारच नाही ?

(फोटो साभार -सुशील राठोड )

पूरग्रस्तांची वाढीव बांधकामे नियमित करून देऊ-विनायक निम्हण

0

गोखलेनगरमधील पूरग्रस्तांना मालकी हक्काची घरे शासनाने दिली. मात्र, या घरांभोवती असलेली वाढीव बांधकामांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. ही वाढीव बांधकामेही नियमित करून देऊ. तसेच शासनाने म्हाडासाठी सध्या अडीच एफएसआय दिलेला आहे. आपण तीन एफएसआय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आलेलो आहे. आणि त्याचा इथून पुढेही पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार काँग्रेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी बोलून दाखविला. याबरोबरच कस्तुरबा गांधी वसाहत, इंदिरा वसाहतीतील नागरीकांना त्यांच्या सध्याच्या घराच्या जागेवरच दुमजली घरे शासनातर्फे बांधून देऊ, असेही निम्हण यांनी सांगितले.
निम्हण म्हणाले, गोखलेनगरमधील पूरग‘स्तांना शासनाने मालकी हक्काची घरे दिली. परंतु, या घराभोवतीच वाढीव बांधकामेही झाली. ती पाडून टाकण्याला आपला विरोध असून अशी बांधकामे नियमित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तसेच म्हाडाच्या घरांसाठी तीन एफएसआय मिळविण्यासाठीही प्रयत्न करु. सुशिक्षित युवा वर्गाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठीही कसोशिने प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कुणी बेरोजगार राहणार नाही. तसेच आरोग्याच्या समस्या, स्वच्छता, वीज, पाणी या स्थानिक समस्या सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आजपर्यंत निवडून येऊन अनेकांनी पदे मिळविली. मान, सन्मान मिळवला. मात्र, तेच लोक आज केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करीत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, असे खडे बोलही आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना निम्हण यांनी सुनावले. निम्हण यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रविवारी सकाळी त्यांनी गोखलेनगर परिसर पिंजून काढला. पदयात्रेनंतर झालेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी हजारो युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. एस. के. कुसाळकर शेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यापासून महिलांनी औंक्षण करून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा गोलघर, लाल चाळ, पीएमसी कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, निलज्योती, पाचपांडव सोसायटी, वैदवाडी आदी भागातून मार्गस्थ झाली.
नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक विनोद ओरसे, मनोहर नांदे, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष उमेश वाघ, शिरीष धोत्रे, प्रविण डोंगरे, सनद शेख आदी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मतदारांना मत देण्याचे आवाहन करतानाच सांगितले की, कस्तुरबा गांधी वसाहत व इंदिरा गांधी वसाहतीतील नागरीकांना ते सध्या राहत असलेल्या घरांच्या जागेवरच शासनाकडून दुमजली घरे बांधून देऊ. एसआरए ही बिल्डरांच्या फायद्याची स्किम आहे. त्यामुळे नागरीकांनी बिल्डरांच्या पैशाला तसेच दबावाला बळी पडू नका. आपली घरे कदापिही बिल्डरांच्या घशात जाऊ देऊ नका, असे आवाहनही नागरीकांना केले. याबरोबरच आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून मी आपल्याला मत मागत आहे. तुमच्या आजपर्यंतच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच तुमची मान शरमेने खाली जाईल, असे कोणतेही काम मी आजपर्यंत केले नाही, इथून पुढेही करणार नाही. त्यामुळे काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहनही निम्हण यांनी मतदारांना केले.
शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मिळाला. पदयात्रेत हजारो पुरुष व महिला कार्यकर्त्यांसह नगरसेविका शशीकला गायकवाड, सचिन खंदारे, अक्षय मकासरे, विजय चौधरी, दिनेश चौधरी, अक्षय अडागळे, गणेश शिंदे, अमर गायकवाड, सुनंदा मकासरे, शारदा पुनावळे, धनंजय बिराजदार, विलास निम्हण, तात्या नलावडे, संजय तारडे, सुभद्रा कुंभार, प्रमोद कांबळे, अलका गडशी, नीना खंडाळे, संगीता घोगरे, सुधीर जोगदंड, दीपक धस आदी उपस्थित होते.

रेल्वे वसाहतीचे प्रलंबित प्रश्न सोडवू- ताडीवाला रोड परिसर झोपडीमुक्त करू-रमेश बागवे

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांची आज प्रभाग क्रंमांक २२ मधील ताडीवाला परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . ताई लक्षात ठेवा पंजा , दादा लक्षात ठेवा पंजा, आले रे आले पंजावाले असे नारे देत पदयात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते सहभागी झाले होते . फटाक्यांच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात येत होते .

हि पदयात्रा डॉ. नायडू रुग्णालय वसाहत , काची वस्ती , प्रायव्हेट रोड , लुंबिनीनगर , पत्र्याची चाळ , आर. बी. तीन , इमारत , सिद्धार्थ नगर झोपडपट्टी , इंदिराविकास नगर, पानमळा झोपडपट्टी , स्वीपर चाळ , नदीकाठची झोपडपट्टी , खड्डा झोपडपट्टी , रेल्वे के टाईप चाळ , उल्हास नगर झोपडपट्टी , डिझेल कॉलनी , महात्मा फुले वसाहत , संगीता झोपडपट्टी , भाजी मार्केट , जगताप मळा , चव्हाण चाळ , लडकतवाडी येथे समारोप करण्यात आला .

या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले कि , ताडीवाला रोड परिसरात आपल्या आमदार निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत , नदीकिनारी पुरापासून बचावासाठी सीमा संरक्षण भिंत बांधण्यात आली , संजनाबाई भंडारी विद्यालयात विकासकामे , हिंदू – मुस्लिम – लिंगायत- ख्रिचन स्मशान भूमीमधील विकास कामे , मोफत रुग्णवाहिका , शववाहिका , डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची पुनरबांधणी , युवकासाठी व्यायामशाळा , महिला बचत गटासाठी समाजमंदिर , खाजगी सोसायटीसाठी विकासनिधी आदी विकास कामे केल्याने आपण सर्वांनी कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले , तसेच येथील रेल्वे वसाहतीचे प्रलंबित प्रश्न सोडवून ताडीवाला रोड परिसर झोपडपट्टी मुक्त करण्याचे आश्वाशन दिले .

या पदयात्रेत स्थानिक नगरसेविका लता राजगुरू , माजी महापौर रजनी त्रिभुवन , माजी नगरसेविका चांदबी नदाफ , सुजित यादव , मेहबूब नदाफ , संतोष हंगारगी , जमसू शेख , पापा परदेशी , संदीप कांबळे , शंकर स्वामी , मगन चौधरी , संजय परदेशी , नागेश कामठे , अविनाश पुजारी , उत्तम कांबळे , कोसिबीन डिसोझा , मीरा शिंदे , अंजू सोळंकी , सुनंदा पाटोळे , प्रगती कांबळे , रफिक शेख , असिफ खान , गोकुळ धेंडे , शंकर म्हेत्रे , सुनील चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते

अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा,व्यसनाधिनता, गुंडगिरीचा नायनाट व्हावा-विनायक निम्हण

0

a
समाजातील वाढती अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा, रुढी परंपरा, चालिरीती यांना बळी पडून नागरीकांची होणारी फसगत व त्यातून वाढलेली व्यसनाधिनता, गुंडगिरी या सर्वांचा समुळ नायनाट व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेस-आरपीआय (कवाडे गट)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.
प्रियदर्शनी मित्र मंडळ व मनिष आनंद यांच्यावतीने शुक्रवारी रात्री खडकी येथे आयोजित करण्यात आलेल्या रावणदहन कार्यक्रमप्रसंगी निम्हण बोलत होते. निम्हण यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी कर्नल पांडे, संजय खडसे, दादा कचरे, पूजा आनंद, अजय निम्हण, समीर धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले, समाजातील वाईट प्रवृत्ती वाढतच चालल्या आहेत. त्यांचे त्यांना वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता आहे. रावणदहनच्या निमित्ताने समाजातील अशा सर्व वाईट प्रवृत्ती नाहीशा करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा करावी. यावेळी खडकी परिसरातील तब्बल ७ ते ८ हजार नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दरम्यान, शनिवारी सकाळी राजभवन परिसरात काढलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘पारधी समाजाचे अध्यक्ष सुनिल काळे पदयात्रेत सहभागी झाले होते. कॉंग्रेसला मत म्हणजे विकासाला मत, विनायक निम्हण आगे बढो’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही पदयात्रा पडाळ वस्ती, भाऊ पाटील रोड, कांबळे वस्ती मार्गे चंद्रमणी संघ येथे विसावली. यावेळी रमाताई भोसले, मीरा माने, राहूल गायकवाड, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राजू पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

जो दिल्लीचे ऐकेल आणि दिल्ली ज्याचे ऐकेल असे सरकार द्या – मोदी

0

modi_mumbai

मुंबई – दिल्ली ज्याचे ऐकेल आणि दिल्लीचे ऐकेल असे सरकार दिले तरच महाराष्ट्राचा विकास येईल महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत ज्यांचे सरकार आहे, त्या भाजपचेच राज्यातही सरकार निवडून देणे आवश्यक आहे. स्पष्ट बहुमत जनतेने द्यावे. यावेळी थोडेसे चुकलात तर `त्यांना’ जी नशा चढेल त्यात संपूर्ण देश बरबाद होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमुंबईतील सभेतून महाराष्ट्राला दिला.
ज बरदस्तीने घर रिकामे करणे, प्लॉट खाली करणे, गरीबांच्या झोपड्यांवर कब्जा करणे अशा प्रवृत्तींपासून मुंबईकरांना मुक्तता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे मित्र केवळ आपल्यावर टीका करण्यात धन्यता मानतात. कदाचित पाच महिन्यांपूर्वीचा अनुभव ते विसरले असावेत. माझ्यावर जेवढी टीका कराल तेवढे सणसणीत उत्तर जनता तुम्हाला देईल, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी टीकाकारांना दिला.
या राज्यात दरवर्षी ३ हजार ७०० शेतकरी आत्महत्या करीत असताना, गेल्या सरकारमधील कृषी मंत्री काय करीत होते, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जातीय दंगे होणारे राज्य असल्याची टीकाही त्यांनी केली. १५ वर्षांत सर्वात जास्त दहशतवादी घटना या राज्यात घडल्या. सर्वात अधिक ​जीवितहानी येथे झाली. मात्र किती गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. कधी मुख्यमंत्री तर कधी गृहमंत्री बदलून जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
६० वर्षे राज्य करणारे आपल्याकडे ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. मी छोटा माणूस आहे. मी छोट्या माणसांसाठी छोटी-छोटी कामे करीन, असे सांगून देशातील प्रत्येक गरीब नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्याच्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. शून्य पैशात खाते उघडता येणार असून, माझ्या इमानदार पाच कोटी गरीब कुटुंबांनी तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे मोदी यांनी सांगितले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी अत्यंत अवघड मार्गाने जावे लागत असे. चीनच्या राष्ट्रपतींशी बोलून सर्व वयोगटातील यात्रेकरूंना मोटारीने जाता येईल असा मार्ग उपलब्ध करून घेतल्याचे मोदी म्हणाले. देशाला मलेरिया, डेंग्यू आणि टीबीपासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेबरोबर औैषध संशोधनाचा करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
झोपडीधारकांच्या आयुष्याचे कायापालट करण्याचे आपले स्वप्न आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक झोपडीधारकाला हक्काचे, राहण्यायोग्य व सर्व नागरी सुविधा असलेले निवास देण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला. मुंबईत चांगल्या दर्जाची मेट्रो आमचे सरकार आणेल, नवी मुंबईतील एअरपोर्टचे काम मार्गी लावून त्याचे उद्घाटन आमच्या कार्यकाळात होईल. सागरी सेतू पूर्ण करू. खासगीकरणाद्वारे मुंबईतील उपनगरी लोकल सेवा उच्च दर्जाची करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. व्यासपीठावर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार होते.

नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे–नारायण राणे

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारानिमित सोमवार पेठमधील नरपतगीर चौकाजवळ कोपरा सभा संपन्न झाली . या सभेस कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे , अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी , प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नगमा , महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे , पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बालगुडे , उमेदवार रमेश बागवे , आमदार अनंतराव गाडगीळ , विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेवक अविनाश बागवे , माजी महापौर रजनी त्रिभुवन , स्थायी समिती माजी अध्यक्ष अनिस सुंडके , सदानंद शेट्टी , रशीद शेख , हाजी नदाफ , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सर्व माजी उपाध्यक्ष व नगरसेवक , कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सांगितले कि , नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे , त्यांनी मुंबई मधील भारतीय रिसर्व्ह बँकेचे मुख्यालय गुजरात मध्ये हलविण्याचा प्रयत्न असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून असणारी मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम होत आहे . मुंबई मध्ये समुद्रकिनारी असणारी गोदी मधून मालवाहतुकीचे काम चालते , हि गोदी स्थलांतर करून या गोदीतील असंख्य कामगारांना बेरोजगार होणार आहेत . त्यातून त्यांनी महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न तसेच वेगळा विदर्भ करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव त्यांनी रचला आहे . भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीमध्ये शिवछत्रपतीचा आशीर्वाद मागता परंतु महाराज उत्तम प्रशिक्षक होते , त्यांनी जनतेला फसविण्याचे काम केले नाही . नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बारा मंत्र्यांवर गुन्हे आहेत . त्यामुळे भाजपला सत्ता मिळवायची आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका उद्धव ठाकरे कधी आमदार झाले नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे , कॉंग्रेसने नेहमीच विकासकामांच्या जोरावर प्रचार केला , जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना कॉंग्रेसने राबविल्या . या विकासकामांवरच महाराष्ट्राला नंबर वनचे राज्य आहे . अजित पवार यांनी देखील सत्तेमध्ये असताना मुख्यमंत्रीबरोबर काम केले , तेव्हा अजित पवारांनी का विरोध केला नाही असा सवाल त्यांनी व्यक्त केला , पुण्याचे विकास पुरुष म्हणजे रमेश बागवे , त्यासाठी जनतेने रमेश बागवे यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .

यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले कि , कॉंग्रेसने विकासकामांच्या जोरावरच जनतेला मते मागत आहे त्यामुळे विकासकामे केल्यामुळेच मागील वेळी मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ झोपडपट्टी मुक्त करून मतदार संघाचा विकास करण्यसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी संगीता तिवारी , विठ्ठल थोरात , रशीद खिजर , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , करण मकवानी , नगरसेवक अविनाश बागवे आदींनी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जगताप यांनी केले .