मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराचे ‘मत ‘ संचलन-अंकुश काकडे
कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराने ‘मत ‘ संचलन केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आज येथे केला
मानकर यांच्या प्रचाराची सांगता फेरी आज कसबा मतदार संघातून काढण्यात आली , यावेळी काकडे , रवींद्र माळवदकर, नगरसेविका मनीषा बोडके , नगरसेवक विनायक हनाम्घर , भय्या दाखवे , करण मानकर , बाप्पू मानकर , दीपक जगताप , सुनील खाटपे , संजय मते ,सुरेश बांदल , गणेश नलावडे , चेतन मोरे , दत्ता सागरे , प्रवीण तरवडे ,पुष्पा गडे , वनिता जगताप आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना काकडे म्हणाले ,येत्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले होते . पण आता मात्र मत संचालन करण्यात आले , कसब्याच्या धास्तीनेच हे केले गेले दरम्यान आज राजपूत महासंघ , ओ बी सी महासंघ , मौलाना आझाद विचार मंच ,कुणबी समाज उन्नती मंडळ यांनी दीपक मानकर यांना पाठींबा जाहीर केला
यावेळी मानकर म्हणाले , कसब्याचा विकास , माणसाला माणसाची मदत , प्रत्येकाच्या जीवनमानाची प्रगती आणि सुखी समृद्धी संपन्न असा परिसर हेच आपल्या कामाचे उद्दिष्ट्य राहील कार्यकर्ते , नागरिक यांनी मला प्रचार काळात दिलेले योगदान मला कायम स्फूर्ती देणारे ठरेल , सर्वांनी मतदान करावे असे आवाहन हि त्यांनी केले
प्रचार संपला … हुश्श …।
मतदान हक्क बजवा – मोफत मोटार धुवून घ्या
पुणे-नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्स च्या वतीने नागरिकांना मोफत कार वॉश करून दिले जाणार आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार मोफत वॉश करून दिली जाणार आहे. ही सवलत मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक १५ ऑक्टोबर रोजी, सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत दिली जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी इको क्लीन कार्स, गांधीभवन, अंध शाळेजवळ, कोथरूड येथे ८८८८ ६१३१ ०० या क्रमांकावर संपर्क करावा.
नागरिकांनी मतदानाविषयी उदासीनता दाखवू नये. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेवून बाहेर जाण्यापेक्षा आपले राष्ट्रीय कर्त्यव्य आणि जबाबदारी म्हणून मतदान करावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन इको क्लीन कार्सचे श्रीराम टेकाळे यांनी केले आहे.
विनायक निम्हण यांची दुचाकी रॅली
शिवाजीनगर मतदारसंघात ‘काम करणार्यास मत’ या विचारांचे वारे मतदारसंघात वाहत आहे. मतदारसंघातील
हजारो ज्येष्ठ नागरीक, महिला,युवा वर्ग, खेळाडू, असे सारेच घटक ‘काम करणार्यास मत’ ही भावना व्यक्त करीत जाहीर पाठिंबा देत आहेत, याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आपल्या मतदारसंघाबरोबरच पुण्याचे महत्त्वाचे प्रश्नही मार्गी लागण्यासाठी निवडून आल्यानंतर मी जोरदार प्रयत्न करीन. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा आपली बहुमोल साथ मला द्याल, असे भावनिक आवाहन
शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस -पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी व्क्त केले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी त्यांनी दुचाकी रॅली काढली
ही रॅली मातंग मेळाव्यानंतर काँग्रेस भवन येथून सुरु झाली. ती शिवाजीनगर गावठाणातून बालगंधर्व मार्गे पुलाचीवाडी, प्रभात रोड, लॉ कॉलेज रस्त्याने फर्ग्युसन रस्ता, घोले रस्त्याने, पीएमसी कॉलनी, पांडवनगर, पत्रकारनगर, चतु:शुंगी, रेंजहिल येथून खडकी, औंधगाव येथून डीपी रस्त्याने परिहार चौक, बोपोडी गावठाण, वाकडेवाडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट मार्गे संगमवाडी, रामनगर येथे विसावली. जागोजागी नागरीकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी विनायक निम्हण यांच्याबरोबर रॅलीत आमदार दिप्ती चवधरी, सौ. निम्हण, उमेश वाघ, मुकारी अलगुडे, मनिष आनंद, सुरेश कांबळे, सुरेश कांबळे, कमलेश वायकर, राजेंद्र भुतडा, बंडू चव्हाण, संजय खडगे, अभय सावंत आदी सहभागी झाले होते.
मोदींच्या भाषणाचे वाहिन्यांवरील प्रक्षेपण पेड न्यूज ठरवा’
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील मॅडिसन चौकातील भाषण वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्याच्या प्रकाराला पेड न्यूज मानले जावे, अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.भाजपने रविवारी विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन मोदी यांचे भाषण रविवारी व सोमवारी विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर पाहण्याचे आवाहन केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने आयोगाकडे पत्र पाठवले असून त्यात या भाषणाबाबत तक्रार केली आहे. मोदी यांचे भाषण लाइव्ह दाखवले जात नसून ते आता पुनर्प्रक्षेपित होतेय. त्यामुळे तिला पेड न्यूज ठरवले जावे, अशी मागणी काँग्रेसने आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.
कोणतीही वृत्तवाहिनी एखाद्या नेत्याचे भाषण अर्धा -अर्धा तास दाखवत नाही. त्यामुळे मोदींचे भाषण हे स्पष्टपणे पेड न्यूजच आहे. मोदी यांचा अमेरिका दौरा हा केंद्र सरकारच्या खर्चाने झाला होता. त्यांना मिळालेल्या सुविधा वा स्वागत हे पंतप्रधान म्हणून मिळाले. त्यामुळे पंतप्रधान म्हणून केलेले भाषण हे एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी वापरणे चुकीचे असून हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे,’अशी तक्रार काँग्रेसने केली आहे.
पंतप्रधान म्हणून केलेले भाषण अशा राजकीय प्रचारात वापरण्यास आडकाठी केली नाही तर उद्या लाल किल्ल्यावरून केलेल्या वा संसदेत केलेल्या भाषणाचा वापरही राजकीय प्रचारासाठी करतील,अशी भीतीही काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पुण्याला भामा -आसखेड चे पाणी आणू -भाजपकडे जाहिरातबाजी साठी एवढा पैसा आला कुठून? अजित पवार
पुणे – पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेडचे पाणी आणू‘‘ अशी ग्वाही देत ज्यांनी सत्ताधाऱ्या वर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामीचे षड्यंत्र रचले त्या भाजपा सारख्या विरोधी पक्षाकडे जाहिरातबाजी साठी एवढा पैसा आला कुठून ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे केला राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्यासाठी कोथरूड येथील सभेत ते बोलत होते.
खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, बाबूराव चांदेरे, विजय डाकले, गणेश माथवड, गोविंद थरकुडे व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, “जुने पुणे, नवे पुणे या सर्वांचा विचार केला पाहिजे. कोणालाही कचऱ्याचा त्रास होणार नाही, अशी जागा निवडली आहे. पुणे देशातील महत्त्वाचे शहर असा नावलौकिक वाढावा, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करेल. भाजप नकारात्मक, चुकीच्या पद्धतीच्या जाहिराती दाखवत आहेत.
‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. “अरे… इथेच आहे महाराष्ट्र माझा.‘ जाहिराती करण्याकरिता एवढा पैसा आला कसा. टीव्हीवर दहा मिनिटांच्या बातम्यांत सहा मिनिटे जाहिराती असतात. महागाई कमी होईल. “अच्छे दिन‘ येतील असे जनतेला वाटले होते; पण सहा महिने झाले तरी आज काय परिस्थिती आहे. शंभर दिवसांत काळा पैसा आणणार होता त्याचे काय झाले.
देशाची जबाबदारी बघण्याऐवजी पंतप्रधान घसा बसेपर्यंत सभा घेत आहेत.विदर्भाच्या मुद्द्यावरून लोकांनी कोणाचे खरे मानावे. पंतप्रधानांचे, की पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे की त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे. उद्धव ठाकरेंच्या विचारात सातत्याने बदल होतात. कधी म्हणतात सरकारमधून बाहेर पडणार, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही पडणार. एकदा म्हणतात मुख्यमंत्री होणार, नंतर म्हणतात नाही होणार.‘‘ असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच
दाभोळ – जैतापूर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. आपल्या राज्याच्या वाट्याला केवळ 2 टक्के वीज मिळणार आहे. असे असताना केवळ 2 टक्के विजेसाठी मी येथील जनतेच्या जिवाशी 100 टक्के कोणालाही खेळू देणार नाही. हा प्रकल्प जर एवढा चांगला असेल तर तो प्रकल्प इतरत्र न्यावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
दापोलीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार सूर्यकांत दळवी यांच्या प्रचारार्थ शहरातील आझाद मैदानात ठाकरे यांची प्रचार सभा झाली. ते म्हणाले, “”हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे; मात्र राज्याचा मुख्यमंत्री दिल्लीच्या नेतृत्वाचा जर सेवक म्हणून राहणार असेल, त्यांच्यापुढे गुडघे टेकून नतमस्तक होत आपली शेपूट हलविणार असेल, तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे कदापि सहन करणार नाही. राज्याला अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली ठरविणार नसून राज्यातील जनताच ठरवेल.‘‘
“”मी राज्यभर प्रचारसभांच्या माध्यमातून दौरा करतोय. पण राज्यातील जनता कॉंग्रेस सरकारच्या नावाने आक्रोश करतेय, न्याय मागतेय, गांजलेली, पीडित जनता आता शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहत आहे. या माझ्या राज्यातील आशावादी जनतेला न्याय देण्यासाठी माझ्या हातात ताकद द्या,‘‘ असे आवाहन त्यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ सोडाच, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रही आणणार -उद्धव ठाकरे
मुंबई – दोन वर्षांत किमान ५0 योजना पूर्ण करण्याची ग्वाहीमुंबई : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र तोडणार्यांना विरोध तर राहणारच; पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही महाराष्ट्रात आणण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत केली. येत्या २0१६ साली शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव माझा मुख्यमंत्री साजरा करेल आणि त्या वेळी माझ्या कमीत कमी ५0 योजना पूर्ण झालेल्या असतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
या सभेत उद्धव ठाकरे महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शिवसैनिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आपल्या सभेची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. संपूर्ण भाषणात त्यांनी भारतीय जनता पार्टी तसेच मोदी यांच्यावरच टीका करण्यावर भर दिला. बडी बडी माणसे प्रचारासाठी मुंबईत आली आहेत. कानाकोपर्यात सभा घेत आहेत. गुजरातमधून बसेस भरून माणसे आणली गेली आहेत, असे ते म्हणाले. युती भाजपाने तोडली. तेव्हापासून केंद्रातील मंत्रिमंडळ महाराष्ट्रात फिरत आहे. या सगळ्यांचे मोबाईल नंबर लिहून ठेवा. निवडणुकीनंतर कोण फोन उचलतो का बघा. शिवसेनेचे प्रेम अनुभवले, आता धग सोसा. संकटे येवोत, वाटेत निखारे असोत, ज्वाळा असोत, हात सोडायचा नसतो. आता ‘अच्छे दिन’ आले तर साथ सोडली. महाराष्ट्रातील जनतेने ताट वाढून ठेवले होते. तुम्ही कर्मदरिद्रीपणा केला. आता एकट्याने सरकार बनवणार
असे ते म्हणाले.
भाजपात मुख्यमंत्रीपदाबाबत एकवाक्यता नाही. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे तुकडे होणार नाहीत म्हणतात तर त्यांचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा कायम असल्याचे सांगतात. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी विकास केलाच ना. सरकार कोणाचे हे महत्त्वाचे नाही तर मुख्यमंत्री महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीची भांडी घासणार नाही. दिल्लीपुढे झुकणार नाही. शेपूट हलवणार नाही. युती टिकवण्यासाठी यांच्या अटी स्वीकारल्या असत्या तर शिवसेना संपली असती. शिवसैनिक मला प्यारा आहे. जिंकल्यावर तर आपल्यासमोर नतमस्तक होणारच आहे; पण आता लढायला हिंमत दिल्याबद्दलही नतमस्तक आहे, असेही ठाकरे म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण स्वत:ला स्वच्छ म्हणतात. मग साबणाच्या जाहिरातीत काम करा. बिनकामाचे मुख्यमंत्री. गारपीट झाली, दुष्काळ पडला तरी यांच्या डोक्यावरचा कोंबडा हलत नाही. सिंचनाची फाईल उघडली असती तर अजित पवार यांची जयललिता झाली असती, असे ते म्हणतात. मग का नाही उघडली? राष्ट्रवादीचे उमेदवार वाघ यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. लक्ष्मण माने, लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले. सगळे राष्ट्रवादीचे. तेव्हा पृथ्वीराज झोपले होते का? त्या वेळी का नाही दिला राजीनामा? तेव्हा राजीनामा दिला असता तर आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री बनवले असते, असेही ठाकरे म्हणाले. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासही आपण तयार आहोत; पण एका सोप्या अटीवर. त्यांच्या घरी जायचे आणि एक ग्लास पाणी प्यायचे, असे म्हणत ठाकरे यांनी अजित पवार यांच्या पाण्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली.
शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकविला : पवार
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील शाळेतल्या मुलांना चुकीचा इतिहास शिकवला, त्या मोदींना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विधानसभा निवडणुकीत “छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ‘, अशी जी घोषणा दिली आहे त्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खिल्ली उडविली. तर उद्धव-राज एकत्र आल्यास आनंद होईल याअगोदरही मी या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही भाऊ एकत्र येऊन बंधुत्व सांभाळणार असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघे एकत्र आल्यास इतरांचाही त्रास कमी होईल, अशी कोपरखळी पवार यांनी मारली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशामध्ये शिवसेनेचेही योगदान मोठे आहे. आजपर्यंत भाजपला ज्या ज्या वेळी सत्तेत जाण्याची संधी मिळाली, त्या त्या वेळी शिवसेनेचा आधार त्यांना होता, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात पवार बोलत होते. गुजरातमध्ये सातवीच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांचा जन्म 1603 मध्ये शिवनेरी या राजवाड्यात झाल्याचे नमूद केले आहे; तर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा होते, अशी चुकीची माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले, की देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे दसऱ्याच्या दिवशीचे भाषण दूरदर्शनवरून दाखवण्यात आले. दूरदर्शन हे देशाच्या जनतेच्या मालकीचे आहे. कोणाचेही सरकार घटनेनुसार धर्मनिरपेक्ष असते. मात्र, मोदी सरकारला याचा विसर पडला आहे. दसऱ्याच्या दिवशीच नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमा झालेले असताना या सोहळ्याकडे सरकारचे लक्ष गेले नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.
याशिवाय, देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा ते भारताचे प्रतिनिधित्व करत असतात; पण मोदी यांच्या अमेरिकेतल्या भाषणाचा वापर भाजप प्रचारासाठी करत आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीकाही त्यांनी केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग शांतपणे योजना तयार करायचे, निर्णय घ्यायचे; पण त्याबाबत भाषण करून वाहवा मिळवत नव्हते. त्याउलट नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय दिसत नाहीत; पण भाषणबाजी मात्र जोरात करत आहेत. या दोन पंतप्रधानांमध्ये हा फरक असून, लोकसभेत जनता या भाषणबाजीला बळी पडली. या वेळी महाराष्ट्राची जनता मात्र बळी पडणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मोदींचे वर्तन गांधी आणि पटेलांच्या विचारांशी विसंगत – राहुल गांधी
रामटेक -पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा बांधण्याचे जाहीर करतात. परंतु मोदींचे वर्तन हे गांधी आणि पटेल यांच्या विचारांच्या विसंगत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील दौऱ्यात केली. रामटेक आणि बुलढाणा येथे आज, रविवारी राहुल गांधी यांच्या प्रचार सभा झाल्या.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे नाव सर्वच घेत आहे. त्यांची स्मारके उभे करण्याची घोषणा केली जात आहे. पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाळून राहुल गांधी म्हणाले, गुजरातमध्ये सरदार पटेलांचे स्मारक उभारण्याची घोषणा जे करत आहेत, ते आयुष्यभर त्यांच्या विचारांच्या विरोधात वागत आले आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रामटेक येथील सभेत केली. रामटेक येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘दोन ऑक्टबरला त्यांनी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. पण त्यांचे विचार ते आत्मसात करु शकलेले नाहीत.’ महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने फक्त काँग्रेस चालत असल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्षांनी यावेळी केला.
राहुल पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र गुजरातपेक्षा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्याच्या जडणघडणीत जनतेचे मोठे योगदान आहे. येथील जनतेने परिश्रमातून आणि रक्त आटवून महाराष्ट्राला घडवले आहे. असं असताना देखील गेल्या साठ वर्षांत येथे काहीच न झाल्याचे सांगणारे मोदी राज्यातील जनतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत’ असंही राहुल गांधी म्हणाले.
रामटेकमध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र व्हावे यासाठी काँग्रेस आग्रही असून त्यासाठी २०० कोटींची तरतूदही करण्यात आल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले , पंतप्रधान लोकसभेच्या निवडणूकीत सांगत होते, मी पंतप्रधान झालो तर चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवेल. पण सध्या देशात जे सुरु आहे, ते तुम्ही पाहात आहात. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा त्यांचे सैन्य लडाखमध्ये घुसखोरी करत होते. पाकिस्तान रोज आपल्या जवानांवर हल्ले करत आहे. त्यावर आपले पंतप्रधान आता म्हणत आहेत, की लवकरच सर्वकाही ठिक होईल. बोलणे सोपे असते, काम करणे आवघड असते, असा टोला त्यांनी हाणला.
आले इलेक्शन… … करू नका डोळे झाकून आमदाराचे सिलेक्शन
‘सबके साथ सबका विकास’ असे म्हणत ‘अच्छे दिन आनेवाले है’ च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या . लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भुइसपाट झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला एकमेकांची संगत कुसंगत वाटू लागल्याने एकमेकांनी मुख्यमंत्री पदावरून वाद वाढविला , तर दुसरीकडे गेली २५ वर्ष ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना’ चे सूर सुरात मिसळून गात गात आपल्या जागा वाढल्याचा साक्षात्कार भाजपला झाला व आता महाराष्ट्रात मोठी त्सुनामी घडविण्यासाठी आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी जोरदार मागणी सेनेकडे केली . जागावाटपावरून इकडे महायुतीत तर तिकडे आघाडीत बिघाडी झाली व शेवटी ऐन घटस्थापनेच्या दिवशीच प्रत्येकाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला . त्यामुळे ‘आमदार व्हायचय मला ‘असे म्हणणाऱ्या व निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्या लोकांची एकच गर्दी सर्वत्र दिसू लागली . प्रचाराला सुरवात झाली , प्रत्येक पक्ष ,उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करू लागला . कोणी ही हे शक्य आहे असे बोलू लागले ,कोणी सगळ्यात पुढे महाराष्ट्र माझा म्हणू लागले ,कोणी चला , उठा घडवू या नवा महाराष्ट्र , तर कुणी शिवछत्रपतींचा आशीर्वाद देवू मोदींना साथ’ असा नारा देत अरे कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’अशी हाकाटी झाल्याने सर्वच महाराष्ट्र हबकून गेला या सर्व गदारोळात जे लोक आपला महाराष्ट्र घडवू असे म्हणतात त्यांची गुणवत्ता काय ?हे मात्र पाहण्यास कोणी तयार नाही . तेव्हा दिवस आहेत इलेक्शन चे ,पुणे जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यात मुन्नाभाई एमबीबीएस ५ , कायद्याचे बोला म्हणणारे १३ तर जाऊ बाई जोरात च्या आवेशात २५ जनी नारीशक्ती ची ताकद आजमावत आहेत . प्रत्येक पक्षाने त्यांच्या उमेदवारांचे पक्षीय मेरीट नुसार सिलेक्शन केले असले तरी त्यांचे क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक असेच नाही म्हणायचे तर समाज हितासाठी असलेली मानसिकता काय आहे हे जरा पहा तर खरे .
१९५ – जुन्नर विधानसभा मतदारसंघ – गेली ६ पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यात आपली एकहाती छाप सोडणारे वल्लभ बेनके यांनी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी उमेदवारी मात्र आपल्याच घरात ठेवत आपली राजकीय ताकद सर्वाना दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर या वेळी निवडणूक लढणारया अतुल बेनके (बीई सिव्हिल ) यांना शिवसेनेच्या आशा बुचके (७ वी ), काँग्रेसचे गणपत फुलवडे (बी एस सी ) ,भाजपाचे नेताजी डोके ( ८ वी ) मनसे चे शरद सोनवणे ( एफ वाय बी कॉम ) यांचे आव्हान असणार आहे .
१९६ – आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – लोकसभेला वेगळा तर विधानसभेला वेगळा निर्णय करणाऱ्या या मतदार संघात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ( एल एल बी , एल एल एम ,वृतपत्रविद्या ) यांना त्यांचे एके काळचे सहकारी शिवसेनेकडून अरुण गिरे ( बी ए ) भाजपा कडून जयसिंग एरंडे ( ११ वी ) यांच्याबरोबरच कॉंग्रेसच्या संध्या बाणखेले ( बी कॉम . एल एल बी ) यांनी आव्हान दिले आहे
१९७ – खेड -आळंदी मतदारसंघ – गेल्या अनेक वर्षापासून सेझ, चाकण विमानतळ या बरोबरच वाढत्या औद्योगिक गुन्हेगारी मुळे चर्चेत असलेल्या या मतदार संघात विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आ. दिलीप मोहिते (एस .एस . सी ) यांना शिवसेनेचे सुरेश गोरे ( बी कॉम ) भाजपचे शरद बुट्टे पाटील (एम ए राज्यशास्त्र ) यांच्याबरोबरच काँग्रेसच्या वंदना सातपुते ( एच एस सी ) यांचे आव्हान आहे
१९८ – शिरूर विधानसभा – सार्वजनिक वितरण (रेशन) प्रणालीत राज्यात पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. अशोक (बापू) पवार ( बी एस सी एयाग्री ,एल एल बी ) यांना भाजपा चे बाबुराव पाचार्णे (एच एस सी ),शिवसेनेचे संजय सातव ( एस .एस . सी) यांच्या बरोबर बहुजन मुक्ती पार्टीचे डॉक्टर मगन ससाणे (एम. बी .बि एस ) यांचे आव्हान आहे
१९९ – दौंड विधानसभा – विद्यमान राष्ट्रवादीचे आ. रमेश थोरात यांना रा स प कडून राहुल कुल , शिवसेनेचे राजन खट्टी ,काँग्रेस चे आत्माराम ताकवणे यांच्याबरोबर उद्योजक विकास (आबा ) ताकवणे यांचे आव्हान आहे
२०० – इंदापूर विधानसभा – राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो मंत्रिमंडळात महत्वाचे खाते मिळणाऱ्या काँग्रेस चे हर्षवर्धन पाटील ( बी कॉम एल एल बी) यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , राष्ट्रवादी चे दत्ता भरणे (एस वाय बी कॉम ), शिवसेनेचे विशाल बोंद्रे (डी एम ई ) भाजप चे न्यान्देव चवरे ( एस एस सी ) या दिग्गजांचे आव्हान आहे
२०१ – बारामती विधानसभा – राज्याचे माजी उप मुख्यमंत्री ,राष्ट्रवादीचे अजित पवार ( एस एस सी ) यांना भाजपचे बाळासाहेब गावडे (बी ए ) यांच्याबरोबरच शिवसेनेचे राजेंद्र काळे ( बी कॉम एल एल बी , जी डी सी ए ) व काँग्रेस चे आकाश मोरे ( बी ए एल एल बी ) या कायदे पंडितांनी आव्हान दिले आहे
२०२ – पुरंदर विधानसभा – शिवसेनचे विद्यमान आ. विजय शिवतरे (डी एम ई ) यांना राष्ट्रवादी चे अशोक टेकावडे (बी कॉम ) , काँग्रेस चे संजय जगताप (बी कॉम) यांच्या बरोबरच भाजप च्या संगीतादेवी निंबाळकर (बी .ए ) आव्हान दिले आहे
२०३ – भोर विधानसभा – काँग्रेस चे विद्यमान आ. संग्राम थोपटे ( बी ए ,राज्यशास्त्र ) यांना शिवसेनेचे कुलदीप कोंडे (११ वी ) राष्ट्रवादीचे विक्रम खुडवट (बी कॉम ) यांचे प्रमुख आव्हान आहे
२०४ – मावळ विधानसभा – भाजपचे संजय उर्फ बाळा भेगडे (बी कॉम ) यांच्या समोर राष्ट्रवादी चे माऊली दाभाडे (जुनी ११ वि फायनल ) , काँग्रेस चे किरण गायकवाड (डी सी ई ) शिवसेनेचे मच्छिन्द्र खराडे (बी कॉम ) यांनी आव्हान उभे केले आहे
२०५ – चिंचवड विधानसभा – अनाधिकृत बांधकामे नियमित करावी या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा देणारे माजी आमदार आणि आताचे भाजपचे उमेदवार लक्ष्मन जगताप (एस.एस सी ) यांना राष्ट्रवादीचे विठ्ठल तथा नाना काटे (११ वी) , शिवसेने चे राहुल कलाटे (बि. कॉम ) , काँग्रेस चे कैलास कदम ( एस.एस सी) मनसे चे अनंत कोऱ्हाळे ( बी कॉम ) यांच्याबरोबर निता ढमाले , मोरश्वर भोंडवे या अपक्षांनी घेरले आहे
२०६ – पिंपरी (राखीव) -राष्ट्रवादी चे विद्यमान आ. अण्णा बनसोडे (आयटी आय माशिनिष्ट ) यांना (एकूण ५ महिला ) रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट ) चंद्रकांता सोनकांबळे (एम ए ),मनसे च्या अनिता सोनावणे ( ७ वी) मंगल कांबळे ,आशा रणदिवे मीना खिलारे या नारीशक्ती बरोबरच शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार ( बि. कॉम एल. एल .बि ,) एम .ए (पाली भाषा ),कॉंग्रेस चे मनोज कांबळे ( बि. कॉम एल. एल .बि प्रविष्ट ) बहुजन समाज पार्टी चे क्षितीज गायकवाड (बी .एस .एल,एल एल बी ) या कायदे पंडितांनी घेरून ठेवले आहे
२०७ – भोसरी विधानसभा – पुणे जिल्ह्यात सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या ” नो उल्लू बानाविंग” चा उद्घोष चालू असलेल्या या मतदार संघात काट्याची लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादीचे आ. विलास लांडे (एस वाय बी ए -टिळक मुक्त विद्यापीठ -२०१३-१४) यांच्यासमोर अपक्ष व विद्यमान स्थायी सभापती महेशदादा लांडगे ( बी . कॉम ( २०१२) , विनायका मिशन्स विद्यापीठ , तामिळनाडू ), भाजपचे एकनाथ पवार ( आयटी आय ,१० वी) शिवसेनेच्या सुलभा उबाळे ( एच एस सी ,सायन्स ) यांचे आव्हान ठाकले आहे
२०८ – वडगाव शेरी – राष्ट्रवादीचे आ. बापू पठारे (९ वी ) यांच्यासमोर काँग्रेस चे चंद्रकांत छाजेड ( बि. कॉम एल. एल .बि ,एल एल एम ),शिवसेनेचे सुनील टिंगरे (डी सी ई ),भाजपचे जगदीश मुळूक (बी ए ),व आर पी आय चे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे (एम बी बी एस ,शरीर शास्त्र ) कडवी झुंज देत आहेत
२०९ -शिवाजीनगर विधानसभा – काँग्रेस चे विद्यमान आमदार विनायक निम्हण (एच एस सी ) यांना राष्ट्रवादी चे अनिल भोसले ( एस .एस सी ),भाजप चे विजय काळे (एस. एस. सी ) मनसे चे राजू पवार (११ वी) लढत देत आहेत
२१० – कोथरूड -शिवसेनेचे आ. चंद्रकांत मोकाटे ( बी ए राज्यशास्त्र विशारद ) यांना मनसे चे किशोर शिंदे (बी कॉम ,एम सी एम . एल एल एम .एम बी ए (प्रवी),भाजपच्या मेघा कुलकर्णी (एम एड ),कोन्ग्रेस चे उमेश कंधारे (बी कॉम )यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे (९ वी ) यांच्याशी सामना करावा लागत आहे
२११ – खडकवासला विधानसभा – मागिल विधानसभेत गोल्डन म्यान म्हणून गाजलेल्या स्व. रमेश वांजळे यांच्या या मतदारसंघातील विद्यमान भाजपा आ. भीमराव तापकीर (एच एस .सि ) यांची लढत कॉंग्रेस चे श्रीरंग चव्हाण (१० वी )शिवसेनेचे शाम देशपांडे (एम कॉम , एम पी एम ) राष्ट्रवादीचे दिलीप बराटे (एम एस डब्लु ) मनसे राजाभाऊ लायगुडे (७ वि) होत आहे
२१२ – पर्वती मतदारसंघ – विद्यमान भाजपा आ. माधुरी मिसाळ (बी कॉम ) यांची लढत काँग्रेस चे अभय छाजेड (बी एस सी ,एल एल बी ,वृत्तपत्रविद्या),राष्ट्रवादी चे सुभाष जगताप (एस. एस सी ) शिवसेनेचे सचिन तावरे ( बी कॉम),मनसे चे जयराज लांडगे ( एस. एस सी) यांच्याशी होत आहे
२१३ – हडपसर विधानसभा – शिवसेनेचे विद्यमान आमदार महादेव बाबर (एस. एस सी) यांना राष्ट्रवादी चे चेतन तुपे (एफ वाय ) कॉंग्रेस चे बाळासाहेब शिवरकर (बी ए ),मनसे चे व त्यांचे एके काळचे सहकारी नाना भानगिरे (एस. एस सी) आव्हान देत आहेत
२१४ -पुणे कॅन्टोमेन्ट – कॉंग्रेसचे विद्यमान आ रमेश बागवे (बी ए )यांना भाजपचे दिलीप कांबळे (बी ए),शिवसेनेचे परशुराम वाडेकर ( ८ वी) ,राष्ट्रवादीचे भगवान वैराट (१० वी) व मनसे चे अजय तायडे (एच एस सी ) आव्हान देत आहेत
२१५ – कसबा पेठ विधानसभा – भाजपचे गेले अनेक वर्ष नेतृत्व करणारे आ. गिरीश बापट (बी कॉम ) यांना या वेळी राष्ट्रवादीचे दीपक मानकर(जुनी अकरावी ) यांचे आव्हान आहे काँग्रेसचे युवकनेते रोहित टिळक (एम कॉम .एम पी एम ,डी लिट इतिहास ) या उच्च शिक्षता बरोबरच शिवसेनेचे प्रशांत बधे (एस एस सी )मनसे चे रवींद्र धंगेकर ( ८ वी) यांच्याशी सामना करावा लागत आहे
अर्थात शिक्षण हा घटक येथे महत्वाचाच नसला तरी खरोखर समाजहिता वर मनापासून निस्सीम प्रेम असणारी आणि त्यासाठी झटणारी ,तळमळ असणे महत्वाचे आहे याची पारख मतदार करतो काय ? कि धनशक्ती -दहशत – भूलभुलय्या याला भुलतो ? इतर सर्व गोष्टी आपण पारखून घेतो पण मतदान करताना आपल्या डोळ्यावर पक्षाची पट्टी बांधून आपण डोळे झाकून कसे मतदान करू शकतो हे एक न उलगडणारे कोडे आहेअसे मला वाटते … आपला -सदाभाऊ
दर वर्षी केलेल्या कामाचा अहवाल देईल – मानकर
पुणे -दरवर्षी मी केलेल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सदर करेल असे आज कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी चे उमेदवार दीपक मानकर यांनी जाहीर केले ,मानकर यांना विविध संघटनांचा पाठींबा आज जाहीर करण्यात आला तेव्हा बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले
क्रांतिवीर लहूजी शक्ती सेना ,गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती संघ , महारष्ट्र ब्यांड कलाकार उत्कर्ष संघटना आदी संघटनांनी कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी चे उमेदवार दीपक मानकर यांना आपला पाठींबा जाहीर केला . शंकर भावू तलाठी , लोपाताई भगत ,भालचंद्र खडके, विजयराजे खंडागळे, भावूसाहेब जगधने , रघुनाथ जगधने आदी मान्यवरांनी यावेळी आपण मानकर यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले
मानकर म्हणाले कित्येक योजनांचा कोटयावधीचा निधी वाया जातो आहे , योजनांची अपुरी माहिती – पाठपुरावा वेळेत न करणे यामुळे हे होत आहे कसब्यात अजून भरपूर विकासकामे व्हायला हवीत . कास्ब्याचे सुशोभीकरण , स्वयंरोजगार केंद्र ,पाणीपुरवठा . जलनिस्सारण -पाणीपुरवठा , ऐतिहासिक स्थळांचा विकास , सामाजिक कार्यक्रमांसाठी समाज मंदिरे अशा विविध प्रकल्पांचे स्वप्न मी पाहतो आहे ते साकार करण्यासाठी मतदारांनी मला पाठींबा देण्यासाठी उत्साहाचे वातावरण केले आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे
रमेश बागवे यांना विविध संघटना , संस्थाचा पाठींबा
पुणे – कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांना विविध सामाजिक संघटना , संस्थानी पाठींबा दिला आहे . यामध्ये महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर रायकर , असोसिएशन ऑफ ऑटो कन्सलटन्ट पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब घोडके , जाणींव संघटना प्रणित हातगाडीवाले , फेरीवाले , पथारीवाले , खोंचा , सायकल , स्टोलवाले संघटनाचे पुणे शहर अध्यक्ष सतीश जगताप , दिलासा जन विकास संस्थचे अध्यक्ष भारती पंखेवाले , आर्क ऑफ प्रेयर फेलोशिपचे रेव्ह. अमर कांबळे , जमात-इ-इस्लामी हिंदचे पुणे जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख यांनी आपली पाठींबाचे पत्र देऊन रमेश बागवे यांना जाहीर पाठींबा दिला आहे .
भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्र्क्रांत हंडोरे यांच्या आदेशान्वये रमेश बागवे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे . भीमशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे , पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे व पुणे जिल्हा सचिव प्रदीप कांबळे यांनी पाठिंब्याचे पत्र देऊन जाहीर पाठींबा देण्यात आला आहे .
एकच ध्येय, शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास- विनायक निम्हण
पुणे-गेली 15 वर्षे शिवाजीनगर मतदारसंघाचा गतीमान विकास हेच ध्येय ठेऊन मी काम केले. विनायक निम्हण यांनी मतदारसंघातील पायाभूत नागरी सुविधांमध्ये भर पडावी, यासाठी आमदार निधी आणि विशेष निधीचा 100 टक्के वापर केला. गरीबातील गरीब माणसाचे जीवनमान उंचवावे, रस्ते, पाणी, वाहतूक, कचरा निर्मूलन, आरोग्य, शिक्षण याबरोबरच रोजगार, पर्याारण संवर्धन, व्यायमशाळांचा प्रसार, महिलांचे आर्थिक सुबत्तीकरण आदी प्रत्येक बाबतीतच कामे करून विकासकामांना गती दिली. दूरदृष्टी आणि जिद्द या जोडीला नागरीकांचा विश्वास राहिल्याने मी हा विकास साधू शकलो. विकास ही कायमची प्रकि‘या असून विकासाची ही गती राखण्यासाठी या निवडणुकीत आपण मला पुन्हा विजयी करावे, असे आवाहन शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी आज पदयात्रेच्या समाप्तीप्रसंगी नागरीकांना केले.
विनायक निम्हण रविवारी सकाळी वडारवाडी परिसरात पदयात्रा काढून मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मत कोणाला-काम करणार्याला’ अशा घोषणांनी सारे वातावरण दुमदुमून गेले.. यावेळी नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी मंत्री सुरेश नवले, युवक काँग‘ेसचे धहराध्यक्ष कैलास पवार, रामदास पवार, औज धोत्रे, दत्तू कुसाळकर, सदानंद जोशी, बी.टी. देवकर, शिवाजी जाधव, विष्णू जाधव, शिवराम पवार, विनोद मंजाळकर, बंटी वडार, राकेश विटकर, अनिल अलगुडे, रिझवान शेख आदी उपस्थित होते. निम्हण म्हणाले, शिवाजीनगर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या जागरुक मतदारसंघ असून येथील नागरीकांनी गेली 15 वर्षे कामावर विश्वास दाखविला, , यामतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा अहवाल मी घरोघर
पोहोच केला आहे. अजून खूप कामे पुढील पाच वर्षात मार्गी लावायची असून राज्य व केंद्र सरकारचा वाढीव निधी या विकासकामांसाठी मी आणेल, असे ते म्हणाले. या जोडीलाच पुणे शहराच्या विकासातील मुबलक पाणीपुरवठा, मेट्रो
प्रकल्प, रेल्वेचे हडपसर टर्मिनल, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढत्या रोजगारासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन अशा कामांसाठीदेखील या शहरातील आमदार म्हणून मी पाठपुरावा करीत राहील, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहर ग्लोबल सिटी बनत असताना पुण्याचे पुणेरीपण हरवू नये, यावर माझा भर असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, यावर माझा आधीप्रमाणेच भर राहणार आहे. मतदारसंघात केलेल्या विकास कामांबद्दल माहिती देताना ते म्हणाले, की पुण्यातील पहिला उड्डाणपूल विद्यापीठ चौकात झाला, पहिला ग‘ेडसेपरेटरही माझ्याच मतदारसंघात झाला. पुणे महापालिकेचे अनेक विकासप्रकल्प मार्गी लागण्यासाठी व राज्य शासनाच्या योजनांची अमलबजावणी होण्यासाठी मी सातत्याने काम करीत राहिलो. पाण्याचा थेंब न
थेंब वाचावा यासाठी ‘पाणी बचाओ’ आंदोलन तर केलेच, शिवाय नादुरुस्त गळके हजारो नळ स्वखर्चाने दुरुस्त केले.
व्यायाम, खेळाची मला आवड असून माझ्या आमदारनिधीतून 75 हून व्यायामशाळांना तसेच पोलिसांच्याही व्यायामशाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला, हॉकीची पंढरी समजल्या जाणार्या खडकीमध्ये अॅस्ट्रोटर्फ मैदान उभारले, तसेच पदके मिळवणार्या खेळाडूंना दीड कोटींची रक्कम राज्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी आग‘ही राहिलो, असे सांगून निम्हण म्हणाले की, पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ‘ुण हत्या विरोधी जागरण आणि सायकलचा वापर वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मिर असा सायकल प्रवास तीन टप्प्यात केला. दरवर्षी कि‘केट, कॅरम अशा क‘ीडास्पर्धांचे आयोजन, वस्त्यांतील तरुणांनादेखील खेळासाठी मैदान मिळवून देणे अशी अनेक कामे माझी वर्षानुवर्षे चालूच राहिली, असे ते म्हणाले.
‘जय हो…अभय हो’ नारा देत भव्य वाहन रॅली
पुणे- हातात पंचाजेचित्र व पंजाचेचित्र असलेलेझेंडेघेवून दुचाकी व चारचाकी वाहनांवर स्वार
झालेलेशेकडो कार्यकर्तेव महिला, ‘जय हो..अभय हो’चा नारा, स्पीकरवर वाजणाऱ्या ‘नवीन वादळ
घुमतया..अभय छाजेड नावाचं’ या गीतानेदुमदुमून गेलेलेवातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात
पर्वती विधानसभा मतदारसंघाचेकॉंग्रेस –पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगटाचेउमेदवार अॅड. अभय
छाजेड यांनी भव्य वाहन रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघच पिंजून काढला.
रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत अभय छाजेड यांनी भव्य वाहन रॅलीचेआयोजन केलेहोते.
सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठेपुतळ्यापासून या भव्य वाहन रॅलीला प्रारंभ झाला. तरुणांबरोबरच
महिलांचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय होता.’बघता काय ..सामील व्हा’, ‘आपका हाथ.. कॉंग्रेस के
साथ’, ‘जय हो..अभय हो’, अशा घोषणा देणाऱ्या महिला कार्यकर्त्या, हातात पंजाचेचित्र, व झेंडे
घेवून तेहवेत फिरविणारेतरुण कार्यकर्तेअसलेली सुमारेदोन किलोमीटर अंतर असलेल्या या भव्य
वाहन रॅलीमुळेविजयी मिरवणुकीचेस्वरुप आलेहोते. स्वत: अभय छाजेड हेनगरसेवक मिलिंद काची
यांच्या दुचाकीवर मागेबसून मतदारांना मतदान करण्याचेआवाहन करत होते. रस्त्यानेअत्यंत
शिस्तबद्ध,वाहतुकीला अडथळा न येवूदेता मतदारांना आवाहन करीत निघालेल्या या भव्य वाहन रॅलीला
मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घराच्या बाहेर येवून व रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदार
छाजेड यांना शुभेच्छा देत होते. या भव्य वाहन रॅलीमध्येउपमहापौर आबा बागुल, माजी उपमहापौर
प्रसन्ना जगताप,नगरसेवक मिलिंद काची, शंकर पवार, युवराज शहा, डॉ. स्नेहल पाडळे, मुकेश धीवार,
सचिन आडेकर, बालाजी तेलकर, रवी ननावरे, प्रकाश आरणे, महेश वाबळे, सुनील शिंदे, यासीन शेख,
तसेच सौ. मृणाल छाजेड यांच्यासह शेकडो कार्यकर्तेव महिला सहभागी झाल्या होत्या.
तत्पूर्वी रविवारी पहाटेछाजेड यांनी पद्मावती-संभाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन काकड
आरती केली. त्यांच्यासमवेत अनिल सातपुतेव टिळेकरमामा हेउपस्थित होते. त्यानंतर छाजेड यांनी
तळजाई टेकडीवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.जेष्ठ नागरिकांनी
छाजेड यांना आशीर्वाद देत तळजाई टेकडी वाचविण्याची विनंती केली. टेकडीच्या हिरवळीसाठी व
विकासाला आपण प्राधान्य देणारा असल्याचेछाजेड यांनी यावेळी सांगितले. मोरेवस्तीला भेट देवून
त्यांनी तेथील रहिवाशांना मतदान करण्याचेआवाहन केले. त्यांच्यासमवेत महेश वाबळे, प्रकाश आरणे,
द.स. पोळेकर, वैभव सेठिया, अनिल महाडिक आदी कार्यकर्तेउपस्थित होते. त्यानंतर छाजेड यांनी
गोवर्धन सोसायटी व पर्वतीदर्शन सोसायटीला भेट देवून तेथील नागरिकांशी समस्यांबाबत चर्चा
केली वाहतुकीचा प्रश्न, मेट्रो. टोल याबाबत येथील रहिवाशांनी आपली मतेव्यक्त केली.शहराच्या
वाहतुकीच्या प्रश्नामध्येआणि मेट्रोसाठी आपण जातीनेलक्ष घालून पाठपुरावा करूअसेआश्वासन
छाजेड यांनी यावेळी दिले. त्यांच्यासमवेत उपमहापौर आबा बागुल, अरुण सिंघवी, विजयकांत कोठारी,
श्री सुरतवाला, अनिल नहार आदी उपस्थित होते.
दरम्यान, अभय छाजेड हेमहाराष्ट्र अॅथेलेटिक्स संघटनेचेउपाध्यक्ष असल्यानेछाजेड यांच्यासाठी
जेष्ठ क्रीडासंघटक व मार्गदर्शक राम भागवत, सुरेश गुजराथी, धनंजय दामले, डॉ.मधुकर झंवर,
महेश मेढेकर, शाम कोठारी, काका पवार, मधुकर तापकीर यांच्यासह आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूतृप्ती
मुरगुंडे, आशियाई अॅथलिट प्रतिक निनावे, तसेच राष्ट्रकुल युवा विजेती भाग्यश्री शिर्के, आशियाई
विजेता अनिश जोशी, राष्ट्रीय विजेती योनिया शिंदेव ज्युली बधे, सुरक्षा जाधव आदि खेळाडूंनी तसेच
पुणेशहरातील प्रल्हाद सावंत, मनोज भोरे, प्रकाश तुळपुळे, चंद्रकांत शिरोळेंसह अनेक राष्ट्रीय
क्रीडासंघटकांनीही दहा हजार आवाहन पत्रेघरोघरी वाटून अभय छाजेड यांना आपला पाठींबा व्यक्त
केला आहे.
आबांचे वक्तव्य चुकीचेच पण भावनेच्या भरात ;त्यामुळे विषय वाढवू नये- शरद पवार
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निदंणीय आहे. आबांचे वक्तव्य चुकीचेच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफीही मागितली, त्यामुळे विषय वाढवू नये, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील मतदार गोंधळलेला नसून तो अधिक सजग झाला आहे, त्यामुळे मतदार राज्याच्या हिताचा निर्णय घेतील, याची खात्री असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी वार्तालाप केला.
पवार म्हणाले, यंदा स्वतंत्र लढत असल्याचे ही महत्त्वाची निवडणूक आहे. आतापर्यंत 60 गुणांचे काम केले असून 40 गुण मतदारांच्या हातात असल्याचेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. आबांनी आपल्याच तासगाव मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार सुधाकर खाडेने ‘निवडणूक होईपर्यंत तरी बलात्कार करायला नको होता’ असे म्हणत खळबळ माजवून दिली आहे.




