Home Blog Page 3658

बिहारचे मुख्यमंत्री खवळले – गरिबांवर उपचार न केल्यास डॉक्टरांचे हात तोडेल म्हणाले -पोलिस आणि प्रशासनावरही बरसले

0

मोतिहारी -रुग्णालयात गरीबांवर उपचार करताना हयगय केल्यास मी डॉक्टरांचे हात तोडून टाकेल.असा इशारा शुक्रवारी एका रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येथे दिला ते म्हणाले, उपचारात हयगय करणा-या डॉक्टरचे नाव लिहून चिठ्ठी माझ्याकडे पाठवा, आम्ही त्याला घरू बसवू. गरीबांवर अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. राज्यातील एकही कुटुंब भूमीहिन असणार नाही.अशीही घोषणा त्यांनी केली आहे
यापृवी झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले ,प्रशासन दलितांना सावत्र वागणूक देत आहे, ते चुकीचे आहे. भूमीहीन असणा-यांना कागदपत्रे मिळतात पण जमीन मिळवण्यासाठी त्यांना भटकत राहावे लागते. त्यामुळे याप्रकरणी ठोस कारवाई करण्यासाठी अभियान चालवले जाणे गरजेचे आहे. या अभियानात कामचुकारपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. आगामी काही वर्षात राज्यातील एकही कुटुंब भूमीहिन असणार नाही. सरकार सर्वांना जमीन उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करून घेण्यात विनाकारण विलंब करण्यासंदर्भात मांझी म्हणाले की, ‘अशा प्रकरणांची तक्रार आमच्याकडे करा. केवळ एक चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री, बिहार यांच्या नावाने पाठवा. त्याची लगेचच चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधिताला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल. तपासात उशीर करणा-या अधिका-यांनाही त्यांनी इशारा दिला. सहा महिन्यापेक्षा अधिक काळ एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी लागल्यास, कावाईसाठी तयार राहा असे, मांझी म्हणाले आहेत. दोन चार अधिका-यांवर कारवाई झाल्यास आपोआप परिस्थिती सुधारेल असे मांझी म्हणाले.

0

‘सलाम पुणे’आयोजित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ला कलावंतांच्या वतीने महाअभिषेक

maharshtra din 2014

0

‘ सलाम पुणे ‘ महाराष्ट्र दिन सोहळा २०१४

0

मराठी पत्रकार दिन २०१४

मिठाईत भेसळ-व्यापार्‍याला तीन वर्षे कैदेची शिक्षा

0

पुणे -बालुशाही या मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी येथील विलास माणिकचंद वैष्णव या व्यापार्‍याला तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेवती कंटे यांनी सुनावली आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी व्यापार्‍याला ऐन दिवाळीच्या तोंडावर शिक्षा झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांवर पालिकेच्या आरोग्य विभागाची करडी नजर राहणार असून अनेक व्यापार्‍यांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत व्यापारीवर्गाने शुद्ध व भेसळमुक्त मिठाई व अन्नपदार्थ विक्री करण्याचे आवाहन पालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी केले आहे. तसेच दिवाळीच्या काळात नागरिकांनी मिठाई खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी म्हटले आहे.
या खटल्याची अधिक माहिती देताना पालिकेच्या विधी सल्लागार अँड़ मंजूषा इधाटे म्हणाल्या, २ जुलै २00८ रोजी पुणे महानगरपालिकेचे अन्ननिरीक्षक अजित भुजबळ यांनी कसबा पेठ येथील वैष्णव यांच्या वैष्णव स्वीट्स या मिठाईच्या दुकानातून बालुशाहीचा नमुना अन्न भेसळप्रतिबंधक कायद्यांतर्गत विश्लेषणाकरिता घेतला होता. तपासणीअंती या पदार्थामध्ये अँल्युमिनियम फॉइल असल्याचा अहवाल पब्लिक अँनालिस्ट, राज्य आरोग्य प्रयोगशाळा यांनी दिला होता. त्यानुसार भुजबळ यांनी संपूर्ण तपास करून विलास वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने वैष्णव यांना तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांचा दंड सुनावला. मिठाईसारख्या खाद्यपदार्थावर शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. परंतु आरोपीने शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्याऐवजी अँल्युमिनियम फॉइलचा वापर केला आहे. अँल्युमिनियम हा पदार्थ मानवी आरोग्यास घातक आहे., असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे. या खटल्यात पुणे महानगरपालिके तर्फे अँड़ सुहास चौधरी व अँड़ प्रशांत यादव यांनी बाजू मांडली व प्रमुख विधी सल्लागार अँड़ इधाटे यांनी मार्गदर्शन केले.

लतादीदी म्हणजे राष्ट्रीयत्वाचा पुतळा — पं.हृदयनाथ मंगेशकर

0

पुणे- लतादीदीच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक आठवणी आहेत. दीदीचेव्यक्तिमत्व हेअतिशय मार्दवआहे, लातादीदीच्या बाबतीतील सर्वातमोठी गोष्ट म्हणजेती राष्ट्रीयत्वाचा पुतळा आहेअशा शब्दांत जेष्ठ संगीतकार व गायक पं. हृदयनाथमंगेशकर यांनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा गौरव केला.

समर्पित ‘स्वरप्रतिभा- २०१४’च्या यंदाच्या लता मंगेशकर गौरव दिवाळी अंकाचेप्रकाशनपं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्तेकेसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात पार पडले.त्यावेळतेबोलत होते. उपमहापौर आबा बागुल, भारती विद्यापीठाचेकार्यवाह डॉ. विश्वजित कदम, जेष्ठछायाचित्रकार सतीश पाकणीकर, संपादक प्रवीण प्र.वाळिंबे, कार्यकारी संपादक सुलभा तेरणीकर हेयावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंकाचेयंदाचे१० वेवर्ष आहे.
पं.हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, आमचेवडील गेलेतेव्हा मी चार वर्षाचा व दीदी १२ वर्षांची होती. ८५वर्षातल्या अनेक आठवणी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेदीदीचेव्यक्तिमत्व अतिशयमार्दव आहे.तीचा आवाज हलका आहे, हळुवार आहे,शरीर कोमल आहे. तसेच ती राष्ट्रीयत्वाचा पुतळाअसून ती पक्की भारतीय किंबहुना हिंदुस्थानी आहे. तिच्या घरात गेल्यानंतर पहिला पुतळा छ. शिवाजीमहाराजांचा आहे, त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा आणि तिसरा लोकमान्य टिळकांचा आहे. त्यावरून तीअगदी कडक हिंदुत्वनिष्ठ आहेअसेम्हटलेतरी हरकत नाही. पं.मंगेशकर म्हणाले, १९७१ मध्येभारत- बांगला देश युध्द सुरुअसताना पंडित नेहरूंचेदीदीला पत्र आले. देशासाठी लढणाऱ्या जवानांची सेवा करण्यासाठी,त्यांचीकरमणूक करण्यासाठी युद्धभूमीवर या असेआवाहन त्यांनी केलेहोते. मात्र, प्रसार माध्यमांमधल्यायुद्धाच्या बातम्या वाचून कोणी वादक दीदी बरोबर जाण्यासाठी तयार झाला नाही. त्यावेळी हर्मिनियाम वाजविण्यासाठी दीदीनेमला नेले. २२ दिवस ७०-८० कार्यक्रम दीदीनेजवानांसाठीविनामुल्य केले. युध्द सुरुअसताना एक चव्हाण नावाचा जवान स्फोटामध्येभाजला गेला होता. त्याचेसंपूर्ण शरीर भाजलेहोते. चेहरा मात्र शाबूत होता. एरवी कोणी जास्त आजारी असलेकी तेसहन होतनाही म्हणून भेटण्यासाठी न जाणारी दीदी त्याला भेटायला गेली. तेव्हा त्या जवानानेमाझेसंपूर्णशरीर भाजलेअसल्यानेमला दुखा:च्या काहीच संवेदना होत नाहीत, माझी एकच संवेदना जागृत आहेतीम्हणजेतुमचेगाणेऐकण्याची, असेसांगितले. दीदीनेतिच्या सुरेल आवाजात एका गाण्याचा पहिलामुखडा सादर केला आणि दुसरा मुखडा गायला लागणार तेवढ्यात डॉक्टरांनी दिदीचा हात दाबला. जवानाचेडोळेउघडेआहेत मात्र, त्यानेप्राण सोडलेआहेअसेडॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. हा अनुभव सांगूनपं.मंगेशकर म्हणाले, संगीत ही किती मोठी शक्ती आहेयाचा प्रत्यक्ष अनुभव मी त्यावेळी बघितला. शंकर वैद्य यांनी लतादीदीबद्दल केलेल्या वर्णनाची आठवण सांगताना पं.मंगेशकर म्हणाले, मंगळवारयान गेले. तेयान तेथेपाणी आहेका, माती आहेका याची जशी माहिती पाठवेल. तसेयान दुसऱ्याग्रहावरून पृथ्वीवर आलेतर तेयान पृथ्वी हा गाणारा ग्रह आहेअशी माहिती पाठवेल असेसांगितले.
आबा बागुल म्हणाले, सातत्याने१० वर्षेसंगीत क्षेत्रावर आधारित दिवाळी अंक काढणेही कौतुकास्पदबाब आहे. त्याचबरोबर वाळिंबेयांनी युवकांना प्रेरणा देणारा एक अंक काढावा असेआवाहन त्यांनीकेले. १५ वर्षांपुढील युवकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांनी काय करावे, आई-बाबांशी बोलावेकीमित्रांशी बोलावेयात त्यांचा गोंधळ उडालेला असतो. त्यांना मार्गदर्शन करणारी ‘ हॅलो माय फ्रेंड्स’ हीसंकल्पना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविणार असल्याचेत्यांनी सांगितले. सतीश पाकणीकर म्हणाले, भारतात एक गॅलॅक्सी अवतरली आहे, ती म्हणजे मंगेशकर कुटुंबीय. मनातअसलेल्या कुठल्याही भावनांचेबोट धरून नेतील तेस्वर म्हणजेमंगेशकरांचेस्वर आहेत असेगौरोद्गरत्यांनी काढले.लतादीदींच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रवीण वाळिंबेयांनी मंगेशकर कुटुंब हेकेवळ भारताला नव्हेतरजगालाच देणगी लाभल्याचेसांगितले. मंगेशकर कुटुंबातील पाचही भावंडांचेगायन संपूर्ण जगाला मोहित करणारेआहेअसेसांगून तेम्हणाले, जीवनातील प्रत्येक मूडमध्येआपल्याला मंगेशकर कुटुंबआठवते.
सुलभा तेरणीकर म्हणाल्या, संगीतातील, सौंदर्य, साहित्य व तत्वज्ञान या तीनही गोष्टी लतामंगेशकर या नावात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नीलिमा बोरवणकर यांनी मानले.

रुबी क्लिनिक डॉक्टरांना साडेअकरा लाख रुपयांचा दंड

0

पुणे :नऊ वर्षांच्या मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया करताना तिला भूल देण्याच्या औषधाचा जास्त डोस देण्यात आल्यामुळे तिला कायमचे अंधत्व आणि अपंगत्व आले. याप्रकरणी ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या रुबी हॉल क्लिनिक, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर या तिघांनी मुलीला साडेअकरा लाखांची नुकसानभरपाई द्यावी असा आदेश पुणे जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे. मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, मोहन पाटणकर आणि क्षितिजा कुलकर्णी यांच्या मंचाने हा निकाल दिला.
याप्रकरणी संतोष जगदाळे (रा. ओझर) यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे रुबी हॉल क्लिनिक, डॉ. अन्वय मुळे, डॉ. स्वामी मोहन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जगदाळे यांची नऊ वर्षांची मुलगी उर्मिला हिला छातीत दुखू लागल्याने तिला १८ डिसेंबर २00८ ला रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. मोहन यांनी तिला शस्त्रक्रिया करण्याआगोदर भूल दिली. यानंतर उर्मिला पंधरा दिवस झाले तरीही शुद्धीवर आली नव्हती. शुद्धीवर आली तेव्हा तिला तिची दृष्टी कमी झाल्याचे जाणवले.
यानंतर उर्मिलाचे वडील जगदाळे यांनी तिला मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे तिची तपासणी केली असता ऑपरेशन करताना प्रमाणाबाहेर भुलीचा डोस दिल्याने व ऑपरेशन व्यवस्थित न केल्याने तिची तब्येत खराब झाल्याचे आढळले. तिच्या उपचारासाठी जगदाळे यांना त्यावेळी साडेतीन लाख रुपये खर्च आला. परंतु दृष्टी गेल्यामुळे आणि अपंगत्व आल्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे केली होती.

अफजलखानाच्या फौजेशी संग नको – शिवसेना राहणार ठाम ?

0

पुणे – निकालाआधीच वृत्तवाहिन्यांनी निकाल ‘एक्झिट पोल’ म्हणून जाहीर करून -वारंवार हा ‘एक्झिट पोल’जनमानसावर बिंबवून तशीच मानसिकता तयार करण्याचे आरंभल्याने भाजप वगळता अन्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत आहेत दरम्यान भाजपचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहा ठरवतील असेही दिसत आहे भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मात्र महाराष्ट्राची दिल्ली सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे (म्हणजे ‘आप ‘ आणि काँग्रेस च्या सरकारची अवस्था काय झाली हे सर्वांना ठावूक आहे )भाजपच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे, की जर पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, तर शिवसेनेची मदत घेण्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवटच कायम ठेवावी. आणि अशा राजवटीत महाराष्ट्रांची अवस्था जटील होण्याची शक्यता आहे . मात्र अजूनही अनेकांना शिवसेनेची सत्ता येईल असे वाटत आहे . जर शिवसेनेला बहुमत मिळाले नाही तर अन्य प्रादेशिक पक्षांचा पाठींबा घेवूनही शिवसेना सरकार स्थापन करू शकेल . पण कोणत्याही परिस्थितीत आता अफजलखानच्या फौजेशी संग नको असा मतप्रवाह हि सेनेतून व्यक्त होताना दिसतो आहे. मतदानापूर्वी अफजलखान संबोधून ज्यांच्यावर हल्ला केला – ज्यांनी ‘उंदीर’ अशी संभावना केली अशा असंगाशी शिवसेना संग करेल काय ? या प्रश्नाचे उत्तर आता निकालानंतरच मिळणार आहे, नाही तर ‘मतदानापूर्वी शत्रू आणि मतदान संपते न संपते तोच गळ्यात गळे ‘सत्तेसाठी पुन्हा वाटाघाटी हे राजकारण पाहता पाहता महाराष्ट्राची जनता आती विटली आहे पण नेमके काय महाराष्ट्राच्या नशिबी येणार ? ते मात्र १९ ताखेलाच समजणार आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल १९ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधीच मुख्यमंत्रीपदावरुन दावेदारी सुरु झाली आहे. प्रदेश भाजपचे तीन दिग्गज – देवेंद्र फडणवीस ,पंकजा मुंडेआणि एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दावा अथवा त्यासंबंधीचा इशारा केला आहे. दरम्यान, पक्षाने निवडणुकीनंतरच्या रणनीतीला सुरवात केली आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे, की त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे की त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून निवडणूक लढविली आहे.
दुसरीकडे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पक्षाची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे. फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्यावर वेळोवेळी विश्वास व्यक्त केला आहे.४४ वर्षीय या नेत्याला संघाचा पाठिंबा सहज मिळू शकतो. मुख्यमंत्रीपदाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय संसदीय मंडळ ठरवेल. संसदीय मंडळ मला जी जबाबदारी देईल ती मला मान्य असेल, असे सांगण्यासही ते विसरले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे, की विरोधी पक्षनेत्याची ही माझी शेवटची वेळ आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन अंदाज लावता येऊ शकतो, की पक्ष सत्तेत येणार आहे याबाबत ते किती शाश्वस्त आहेत .
दरम्यान ‘एक्झिट पोल’हा काही निकाल नाही पण तरीही त्यावर सध्या बरेच विसंबून वागत असल्याने संशयाचे वातावरणही तयार होवू पाहते आहे

‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा पण सरकारवर दबाव टाकणार नाही -संघ परिवार

0

8175_0909_q1
लखनऊ-‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. त्यासाठी घाई करण्याची गरज नसून आम्ही सरकारवर कोणताही दबाव टाकणार नाही,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.. येथे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक शुक्रवारपासून सुरु झाली आहे. त्यानिमीत्त आयोजित पत्रकार परिषदते संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर या मुद्यावर सरकारच्यावतीने अद्याप काय केले गेले याची कोणतीही माहिती नाही. राममंदिराबद्दल संघाने भाजपला विचारणा करण्याची गरज नसल्याचे होसाबळे म्हणाले. भाजप सरकारला पूर्ण बहुमत आहे, 2019 पर्यंतचा त्यांच्याकडे अवधी आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ दिला पाहिजे. या मुद्यावर संघ सरकारच्या कामात दखल देऊ इच्छित नाही, असे होसाबळे यांनी सांगितले. तसेच भाजच्या जाहीरनाम्यातील या मुद्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलण अधिक उचित असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित संघ कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांवर अयोध्येतील शरयू नदी, राम आणि मंदिराची छबी आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुर परिस्थिती, सीमेवर सुरु असलेला गोळीबार यावर चर्चा झाल्याचे होसाबळे यांनी सांगितले. लव्ह जिहादच्या मुद्यावर ते म्हणाले, यावर संघाने फार आधीच चर्चा केली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी रणनीती आखली जाईल.दुसरीकडे समाजवादी पार्टीने लखनऊमध्ये होत असलेल्या या बैठकीला जातियवादी षडयंत्र म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘रास्वसंघ अशा बैठका घेऊन राज्याची वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे.’

जयललितांना जामीन -तामिळनाडूत जल्लोष…

0

amma_sr_2142590g
जयललितांना जामीन मंजूर झाल्याने तामिळनाडूत जल्लोषाचे वातावरण आहे. सगळीकडे आनंद साजरा केला जात आहे. समर्थक ठिकठिकाणी पेढे, मिठाईचे वाटप करत आहेत. एआईएडीएमके पक्षाचा आज 43 वा वर्धापन दिन आहे. याच मुहूर्तावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत जयललिताना दिलासा मिळाला आहे. जयललिता यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जयललिता यांना चेन्नईला जाता येणार आहे. जयललिता यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे.
जयललिता 27 सप्टेंबरपासून बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात होत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्या प्रकरणी जयललिता यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर जयललितांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी जामीनाची मागणी केली होती. जयललिता यांनी त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज असे आजार असल्याचे सांगितले होते.
जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याचे विचारात घेत जयललितांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यांना घरात उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना 18 डिसेंबरपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही. कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अद्याप ही शिक्षा रद्द करण्यात आलेली नाही. तसेच जयललिता यांच्या वकिलांना कोर्टाला आश्वासन दिले आहे की जयललिता पक्षातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करतील, अशी माहिती भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निकालानंतर दिली.

आसाराम यांचा चेहरा पाहाण्यासाठी अनुयायींनी केली गर्दी

0

जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत. आसाराम यांना गुरुवारी (16 ऑक्टोबर) कोर्टात सुनावणीसाठी आणले असता त्यांच्या अनुयायींनी एकच गर्दी केली. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली.
आसाराम यांचा चेहरा पाहाण्यासाठी लोक सकाळपासून कोर्ट परिसरात उपस्थित होते. आसाराम यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आले. अनुयायींनी हात जोडून आसाराम यांचा आशीर्वाद घेतला. आसाराम हे देखील हात उंचावून अनुयायींना आशीर्वाद ‍देताना दिसले.

विहिरीमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह- पुण्याच्या कृषी महाविद्यालयात खळबळ

0

पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध होण्याच्या भीतीने एका प्रेमीयुगुलाने शिवाजीगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ते दोघेही गेल्या २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.
अभिजित तिमय्या मांडे (वय १९) आणि यशोदा लक्ष्मण म्हेत्रे (वय २४, रा. दोघेही विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर बसस्थानकाजवळ) अशी आत्महत्या केलेल्या युगुलाची नावे आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीसआयुक्त रमेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एच. एन. शिरसाठ, उपनिरीक्षक दर्शन पाटील, प्रसाद पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, तो सध्या बेकार होता. तर यशोदाचे जास्त शिक्षण झाले नव्हते. ती घरातून शिवणकाम करीत होती. या दोघांच्या वडिलांचे निधन झाले असून ते आपापल्या आईसोबत राहात होते. यशोदा आणि अभिजित यांच्यात मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ती त्याच्याहून वयाने मोठी होती. विवाहाला विरोध होण्याच्या शक्यतेने दोघांनीही २ ऑक्टोबरपासून घर सोडले होते. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे

शिवसेना हा राजकीय शत्रू नाही – फडणवीस यांचा पुनरुच्चार तर राष्ट्रवादीचा पाठींबा कधीही घेणार नाही खड्सेंचे स्पष्टीकरण

0

मुंबई- शिवसेना हा राजकीय शत्रू नसल्याचे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा म्हटले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाला या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असून, कोणाच्याही पाठिंब्याची आम्हाला गरज भासणार नाही असे भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी म्हटले आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांनी विचारले असता खडसे व तावडेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला बहुमत मिळणार आहेच पण कदाचित नाही मिळाले तर आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नसल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल तसेच महाराष्ट्रातील येऊ घातलेले नवे सरकार बनविण्यात आमची प्रमुख भूमिका असेल असे पटेल यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का याची चर्चा सुरु झाली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवारी वाहिन्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारवादी असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांची साथ घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ व स्पष्ट बहुमत मिळवू असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत कधीही जाणार नाही असे वारंवार स्पष्ट केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, तरीही भाजप-राष्ट्रवादीत युती होईल अशी चर्चा माध्यमांत सतत केली जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा पाहता हे दोन पक्ष एकत्र येतील अशी बिलकूल शक्यता नाही. या दोघांनाही एकमेंकाची सोबत परवडणारी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी एक तर काँग्रेससोबत जाऊ शकतो अन्यथा शिवसेनेसोबत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तेवढे संख्याबळ नसेल असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला 80 पेक्षा जास्त व राष्ट्रवादीला 60 पेक्षा जास्त मिळाल्यास या दोघांची एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे.

दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार

0

दिवाळी भेट – डीझेल अडीच रुपये स्वस्त होणार
नवी दिल्ली – डिझेलच्या दरात लवकरच कपात केली जाणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रधान म्हणाले, डिझेलच्या दरात जवळपास अडीच रुपयांनी स्वस्त होईल, दोन राज्यातील आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर घोषणा होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घट होत असल्याने डिझेलच्या किरकोळ विक्रीवरील नफा वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना 3 रुपये 56 पैसे प्रति लिटर नफा मिळत आहे. परिणामी डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा येथे विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबरनंतर दर कपातीबाबत घोषणा होईल. यापूर्वी 8 सप्टेंबर 2010 रोजी डिझेल 3 रुपये 35 पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले होते.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी (14 ऑक्टोबर) पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात केली. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. डिझेलच्या दरात कपात झाल्यास सणासुदीच्या दिवसांत देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महागाई कमी होण्‍यास हातभार लागू शकेल. डिझेल दर कपातीलचा सकारात्मक परिणाम दळणवळण क्षेत्रात होत.
सरकारने पेट्रोलियम कंपन्यांवरील नियंत्रण हटवल्याने जानेवारी 2013 पासून डिझेलच्या दरात प्रति महिना 50 पैशाने वाढ केली जात आहे. मागील 20 महिन्यात डिझेलच्या दरात 19 वेळा वाढ झाली असून 11 रुपये 81 पैसे प्रतिलिटर प्रमाणे दर वाढले आहे.