
(लेखक -प्रा . हरी नरके )
सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो.
राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय. बहुजनवादाचा बुरखा घालून पेरलेला उग्र आणि मुजोर सत्ताधारी जातीयवाद पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. काही मस्तवाल नी जातीयवादी नेत्यांना लोकांनी नाकारले आहे. नवे जागृत मतदार तयार होत आहेत. आम्हाला गृहीत धरणे आणि विद्वेषासाठी वापरून घेणे गेले ५०वर्षे चालूये, ते आम्ही यापुढे खपऊन घेणार नाही, असे सांगत विद्यमान जातीय मतब्यांकांना भगदाडे पडत आहेत. पैसा, पेड माध्यमांचा उपयोग करणे, “नोटा”चा वापर, हे वाढत आहेत. मतदारांनी निर्धार केला तर काही मुजोर जातीयवादी असे सरदार, मनसबदार, जहागिरदार, पाटील, देशमुख आणि संस्थानिक पराभूतही होऊ शकतात. पर्याय असेल तर मतदार नक्की तिकडे वळतात, असे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होते असे मला वाटते.
सत्यशोधक चळवळीच्या पुण्याईवर महाराष्ट्राचा सामाजिक चेहरामोहरा बदलला गेला. त्याचेही एक समाजशास्त्रीय महत्व जरूर होते. मात्र लवकरच निवडणुकीच्या तंत्रावर पकड मिळवलेल्या सत्ताधारी, उग्र आणि मुजोर जातीयवादी टोळ्यांनी बहुजनवादाचा मूळ विचार आणि सामाजिक ध्येयवाद बाजूला ठेऊन शिवछत्रपती आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे केवळ नामस्मरण करीत वाटचाल सुरू केली. त्यांना या महापुरूषांच्या विचारधारेशी काहीही देणेघेणे नव्हते. वापर तेव्हढा करायचा होता. ही केवळ तोंडपाटीलकी होती. त्यातून सत्तेचा पाया आकुंचित झाला. एकजातीय चेहरा आक्रमक बनू लागला. पण हे लोक चतूर असल्याने त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने विरोधी छावणीच जातीयवादी असल्याचा जोरदार डांगोरा पिटला. राज्यात तीनचार समाजाच्याच संघटित मतब्यांका होत्या. त्याच्या जोरावर कधी त्यात युतीच्या नावावर आघाडी नी आघाडीच्या नावावर युती करण्यात आली नी सत्तेच्या चाव्या नी तिजोर्या कब्ज्यात ठेवण्यात आल्या. १९८० च्या दशकात प्रथमच नव्या जाणीवांचा मतदार तयार होऊ लागला. १९९५ ला त्याचा परिणामही दिसला. पण त्याला अवघ्या ५ वर्षात कोप्च्यात ढकलण्यात जुनेजाणते यशस्वी झाले. त्यानंतर गेल्या १५ वर्षात राज्य ज्या दिशेने जात होते ती नवी मोगलाईच होती.
या निवडणुकीत जाहीरपणे विदर्भातील काही नेत्यांची नावे घेऊन राज्य “त्यांच्या” ताब्यात देणार काय? अशी उग्र जातीयवादी मांडणी केली गेली. तिला मतदारांनी धुडकाऊन लावले हे बरे झाले. बाबा-दादा-आबा परत आले असले तरी ते मतदारांनी दिलेल्या या फटकार्याचा गर्भित अर्थ समजू शकतील काय?
राज्यातील स्वत:ला पुरोगामी/परिवर्तनवादी म्हणवणार्या अनेक पढीक पंडीतांना राज्यातील सामान्य मतदारांना जे दिसते ते अजुनही दिसत नाही. हे महाभाग आजही १८१८ ते १९६० याच काळात वावरत आहेत. ते ज्यांना जातीयवादी म्हणून ठोकीत आहेत ते समावेशक बनलेत नी ज्यांना पुरोगामी म्हणून ते डोक्यावर मिरवीत आहेत ते जातीयवाद्यांचे आश्रयदाते नी पोशिंदे बनलेले आहेत. राज्याची शिक्षण, माध्यमे, प्रशासन, राजकारण या सगळ्यांची सुत्रे आज ज्यांच्या हातात एकवटली आहेत ते जेव्हा उघड नी जहरी जातीयवादाचे प्रवक्ते बनतात तेव्हा संतुलन ढासळते आणि मग परिवर्तन अटळ बनते. तथापि या परिवर्तनाचे आकलन करण्याची क्षमता विद्यमान तथाकथित पुरोगाम्यांकडे आहे काय? याचे उत्तर लवकरच मिळेल.
मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो.
(लेखक -प्रा . हरी नरके )
उग्र आणि मुजोर जातीयवाद पराभवाच्या दिशेने… प्रा . हरी नरके
आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही-उद्धव ठाकरे
मुंबई- सरकार स्थापनेसाठी माझ्याकडे अद्याप कोणीही प्रस्ताव दिलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू. मात्र, आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान संध्याकाळी सव्वासात वाजता भाजपच्या कार्यालयातून ठाकरे यांना फोने आल्याचे सूत्रांनी सांगितले साडेसात वाजता भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरु असल्याचे वृत्त आले हि बैठक झाल्यानंतर भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे हि समजले
तत्पूर्वी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वरील विधान केले.
ते म्हणाले, ‘अखंड महाराष्ट्र ठेवण्याचे कोणी आम्हाला वचन देत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. तसेच, जर कोणाला शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर ते प्रस्ताव घेऊन येतील.‘तुम्ही स्वतःहून भाजपकडे प्रस्ताव घेऊन जाणार का असे विचारले असता ते म्हणाले, जर मी प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्यांनी नाही म्हणून सांगितले तर काय.. त्यामुळे सध्या मी शांत आहे. त्यांना जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा असेल त्यांनी खुशाल घ्यावा. त्यांचे धन्यवाद.
महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवसेना जपेल. आम्हाला अपेक्षित होतं तेवढं यश मिळालं नाही, मात्र मतदारांनी जी साथ दिली तीच कायम ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हरियानात भाजपला स्पष्ट बहुमत
चंदीगड- हरियाना विधानसभेच्या 90 जागांपैकी 46 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला असून महाराष्ट्रात बहुमतापासून दूर राहिलेला भाजप हरियानामध्ये मात्र प्रथमच बहुमतापर्यंत ऐतिहासिक वाटचाल केली आहे. कॉंग्रेसपक्षाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
हरियानातील पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष : 47
भारतीय राष्ट्रीय लोकदल : 19
कॉंग्रेस : 15
हरियाना जनहित कॉंग्रेस : 2
शिरोमणी अकाली दल : 1
बहुजन समाज पक्ष : 1
अपक्ष : 5
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या
भाजपला सरकार स्थापनेसाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचा हात पुढे …
भाजपला सर्वाधिक 123 जागा/शिवसेनेला 63 /काँग्रेस 42 /राष्ट्रवादी 41/ मनसे -01
मुंबई – विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले असून, भाजपला सर्वाधिक 123 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांची गरज असून, भाजपला आणखी 22 जागांची गरज आहे. शिवसेनेला 63जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळत नाही, असे दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी, महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे यासाठी पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीने त्यांची ही भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आपणहून पाठिंबा जाहीर केल्याने भाजप त्याचा स्विकार करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनने प्रचारादरम्यान भाजपवर जहरी टीका केली होती. त्याने भाजप दुःखावल्याचे त्यांच्या अनेक नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकते, असे विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे, त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, ‘केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभारी आहोत.’ दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात कोणताच पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही असे दिसत असल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देण्याचे काही वेळापूर्वीच घोषित केले होते. त्यावर स्पष्ट उत्तर देण्याचे शहा यांनी टाळले आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे ठामपणे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत असलेली 25 वर्षांपासूनची युती आम्ही तोडली नाही, असे ते वारंवार सांगत होते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सेनेची मदत घेणार का, या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. युतीच्या काळात भाजप राज्यात 119 जागा लढत होता. केवळ तीन जागांवरुन युती तुटली आणि आम्ही बहुतेक सर्व जागा लढल्या आणि 123 पर्यंत जागांवर आज यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 2009 मध्ये भाजपला 14 टक्के मते मिळाली होती, ती यंदा दुप्पट, अर्थात 28 टक्क्यांच्या जवळपास गेली असल्याचे शहांनी सांगितले.
‘हर हर मोदी ‘ ?
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरुन पाठिंबा देणारअशी घोषणा राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली आहे;लोकसभेत काँग्रेस चे पानिपत केल्यानंतर आता राज्याराज्यात हि नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसू लागला आहे पुण्यासह अनेक ठिकाणी आता बहुसंख्य मतदाराने जणू ‘ हर हर मोदी ‘ चाच नारा दिला आहे .मोदींनी लोकसभा आणि विधानसभेला देखील केलेला झंजावती प्रचार ;सभांचा जोरदार मारा ,या घटनाही ऐतिहासिक म्हणाव्यात अशाच ठरल्या . महाराष्ट्राच्या मतमोजणीचा आढावा घेतला तर …
इथे चालला नाही मराठी बाणा; नाही चालली मराठी अस्मिता ;इथे नाही चालली गांधी घराण्याची परंपरा , आणि नाही चालले अन्य काही … फक्त चालली ‘ हर हर मोदी ‘ ची लाट … महाराष्ट्राला भाजपचा असा खास चेहरा नाही अशी परिस्थितीजन्य टीका होत असतानाही , महाराष्ट्रात मोदींचाच झंझावात चालला मोदींचाच करिष्मा चालला या निष्कर्षाला येता येईल अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत . औरंगाबाद (पूर्व) मधून भाजपचे अतुल सावे यांचा विजय झाला आणि कॉंग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा धक्कादायक पराभव झाला त्यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील , नारायण राणे , बाळा नांदगावकर, सतेज पाटील सारख्या दिग्गजांना या मोदी झंजावातात घरी बसावे लागणार आहे
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
1. पुणे (शिवाजीनगर) – विजय काळे (भाजप) विजयी
2. पुणे (खडकवासला) – भाजपचे भीमराव तापकीर विजयी
3. पुणे-( कसबा) – गिरीष बापट विजयी (भाजप)
4.पुणे (छावणी )- दिलीप कांबळे- (भाजप )
5. पुणे (पर्वती) – माधुरी मिसाळ (भाजप)
6. पुणे- कोथरूड- मेधा कुलकर्णी – ( भाजप)
7. पुणे (हडपसर ) – योगेश टिळेकर (भाजप) विजयी
8. ओवळा माजीवडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी
9. पुरंदर – शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी, काँग्रेसच्या संजय जगतापांना हरवलं
10. नागपूर पश्चिम – भाजपाचे सुधाकर देशमुख विजयी,
11. नागपूर पूर्व भाजपाचे कृष्णा खोपडे विजयी..
12. सातारा- कोरेगाव राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे 30हजार मतांनी विजयी
13. घाटकोपर पूर्व भाजपाचे प्रकाश मेहता जिंकले
14. फलटण – राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण विजयी
15. दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण विजयी
16. इंदापूर – हर्षवर्धन पाटील पराभूत; राष्ट्रवादीचे दत्ता भरणे विजयी
17. दिंडोशी- शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी
18. मुंबई – भायखळ्यात एमआयएमचे वारिस युसूफ पठाण विजयी
19. कणकवली – नितेश राणे विजयी
20. गुहागर – भास्कर जाधव विजयी, भाजपचे विजय नातू पराभूत
21. सांगोला- शेकापचे गणपतराव देशमूख विजयी
22. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
23. इंदापूरमधून काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील पराभूत, राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे विजयी
24. अचलपूरमधील अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांचा विजय
25. मालाड – काँग्रेसचे अस्लम शेख विजयी
26. ऐरोली- राष्ट्रवादीचे संदीप नाईक विजयी
27. ठाणे शहर- भाजपचे संजय केळकर विजयी
28. लोहा- शिवसेनेचे प्रतापराव चिखलीकर विजयी
29. अपक्ष आमदार बच्चू कडू पाटील तिसऱ्यांदा विजयी
30. कोपरी-पाचपखाडी – शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी
31. रावेर – भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी
32. नांदगाव- छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ विजयी
33. मोर्शी – भाजपचे अनिल भोंडे विजयी
34. वरळी – सचिन अहिर यांचा पराभव, शिवसेनेच्या सुनिल शिंदेंचा विजय
35. शिवडी – बाळा नांदगावकर यांचा पराभव, शिवसेनेच्या अजय चौधरींचा विजय
36. जळगाव ग्रामिणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी
37. शिरपूर – काशिराम पावरा – काँगेस
38. शिरूर – भाजपाचे बाबुराव पाचर्णे विजयी
39. लातूर – अहमदपूर मधून अपक्ष विनायकराव पाटील विजयी..
40. लातूर शहर -अमित देशमुख विजयी- काँग्रेस
41. खेड-आळंदी – शिवसेनेचे सुरेश गोरे विजयी
42. नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप), वसंत गीतेंचा पराभव
43. कागल – हसन मुश्रीफ- राष्ट्रवादी
44. मेहकर – संजय रायमुलकर (शिवसेना)
45. धुळे शहरमधून भाजपचे अनिल गोटे विजयी
46. राजापूर- राजन साळवी – शिवसेना
47. तिवसा – यशोमती ठाकूर – काँग्रेस विजयी
48. जत – विलासराव जगताप (भाजप)
50. मावळ – भाजपाचे बाळा भेगडे 27 हजार मतांनी विजयी
51परांडा – राष्ट्रवादीचे राहुल मोटे विजयी
52. चिपळूण- सदानंद चव्हाण- शिवसेना
53. नवापूर – सुरुपसिंह नाईक – काँग्रेस
54. बोरिवली – विनोद तावडे यांचा विजय
55. नागपूर – देवेंद्र फडणवीस – भाजप
56. इगतपुरी – निर्मला गावित (काँग्रेस)
57. भोकर – अमिता चव्हाण (काँग्रेस) विजयी
58. सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी)
59. पुसद – मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
60.परांडा – राष्ट्रवादीचे राहुल मोटे विजयी
61. दिग्रज – संजय राठोड (शिवसेना )
62. बाळापूर – बळीराम शिरस्कार – भारिप
63. मालेगाव बाह्य – दादा भुसे (शिवसेना)
64. कुडाळ – शिवसेनेचे वैभव नाईक विजयी, नारायण राणे पराभूत
65. शिर्डी – काँग्रेसच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय
66. मुलुंड – भाजपचे सरदार तारासिंह विजयी,
67. पुसद- राष्ट्रवादीचे मनोहर नाईक विजयीपरांडा – राष्ट्रवादीचे राहुल मोटे विजयी
68. नांदगाव – राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ विजयी
69. नंदुरबार – विजयकुमार गावित – भाजप
70. इस्लामपूर – जयंत पाटील – राष्ट्रवादी
71. देवळाली – योगेश घोलप – शिवसेना
72. येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी
73. सिन्नर – राजाभाऊ वझे – शिवसेना
74. जुन्नर – शरद सोनवणे – मनसे
75. श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे १३१ मतांनी विजयी
76. नाशिक – निफाड – अनिल कदम – शिवसेना
77.उल्हासनगर – राष्ट्रवादीच्या ज्योति कलानी 1962 मतांनी विजयी
78. जळगावमध्ये अपक्ष शिरीष चौधरी विजयी
79. सोलापूर मध्य – प्रणिती शिंदे विजयी
80. बेलापूर – भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी
81. मानखुर्द – समाजवादी पक्षाचे अबु आझमी विजयी
82. सावंतवाडी – शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी
83. राजापूर – राजन साळवी (शिवसेना) विजयी
84. नवापूर – सुरुपसिंह नाईक (काँग्रेस) विजयी
85. देगलूर – सुभाष साबणे (शिवसेना) विजयी
86. महाड – भरत गोगावले (शिवसेना) विजयी
87. यवतमाळ – मदन येरावार (भाजप) विजयी
88. दहिसर – मनीषा चौधरी (भाजप) विजयी
89. बुलडाणा – हर्षवर्धन सकपाळ (काँग्रेस) विजयी
90. उस्मानाबाद – राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी) विजयी
91. पालघर – विजय घोडा (शिवसेना) विजयी
92. केज – संगीता ठोंबरे (भाजप) विजयी
93. मेळघाट – प्रभुदास भिलावेकर (भाजप) विजयी
94. नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) विजयी
95. नाशिक पूर्व – बाळासाहेब सानप (भाजप) विजयी
96. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (शिवसेना) विजयी
97. वसई – हितेंद्र ठाकूर (बविआ) विजयी
98. मिरज – सुरेश खाडे (भाजप) विजयी
99. मुक्ताईनगर – एकनाथ खडसे (भाजप) विजयी
100. बल्लारपूर – भाजपचे सुधीर मुनगंटीवार विजयी
101. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे (भाजप) विजयी
102. बडनेरा – रवी राणा (अपक्ष) विजयी
103. कळवण – जीवा गावित (माकप) विजयी
104. उमरखेड – राजेंद्र नजरधने (भाजप) विजयी
105. मालेगाव मध्य – आसिफ शेख (काँग्रेस) विजयी
106. हिंगोली – तानाजी मुटकुळे (भाजप) विजयी
107. कोल्हापूर – अमल महाडिक (भाजप) विजयी
108. खानापूर – अनिल बाबर (शिवसेना) विजयी
109. विक्रोळी – सुनील राउत (शिवसेना) विजयी
110. बोईसर – विलास तरे (बविआ) विजयी
111. कळमनुरी – संतोष तरफे (काँग्रेस) विजयी
112. चिखली – राहुल बोंद्रे (काँग्रेस) विजयी
113. अंधेरी (पश्चिम) – अमित साटम (भाजप) विजयी
114. अकोले – वैभव पिचड (राष्ट्रवादी) विजयी
115. शहादा – उदयसिंह पडवी (भाजप) विजयी
116. जळगाव – संजय कुटे (भाजप) विजयी
117. भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस) विजयी
118. आंबेगाव – दिलीप वळसे (राष्ट्रवादी) विजयी
119. नागपूर दक्षिण – सुधाकर कोहळे (भाजप) विजयी
120. शेवगाव – मोनिका राजळे (भाजप) विजयी
121. पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप) विजयी
122. वडाळा – कालिदास कोळमकर (काँग्रेस) यांचा विजय
123. मुंबई (अणुशक्तिनगर) तुकाराम काते (शिवसेना) विजयी
124. नाशिक पश्चिम- भाजपच्या सीमा हिरे विजय
125. मुरबाड- भाजपचे किसन कथोरे विजयी
126. सिंदखेडा- भाजपचे जय़कुमार रावल विजयी
127. घाटकोपर- भाजपचे प्रकाश मेहता विजयी
128. मुंलुंड- भाजपचे सरदार तारासिंग विजयी
129. बीड (आष्टी) – भीमराव धोंडे (भाजप) विजयी
130. वांद्रे- पश्चिम – आशिष शेलार (भाजप) विजयी
131. करमाळा – नारायण पाटील (शिवसेना) विजयी
132. मुंबई (चारकोप) योगेश सागर (भाजप) विजयी
133. दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना) विजयी
134. रामटेक – मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप) विजयी
135. दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी) विजयी
136. गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) विजयी
137. औसा – बसवराज पाटील (काँग्रेस) विजयी
138. अमरावती – सुनील देशमुख (भाजप) विजयी
139. मुखेड – गोविंद राठोड (भाजप) विजयी
140. पंढरपूर – भारत भालके (काँग्रेस) विजयी
141. बार्शी – दिलीप सोपल (राष्ट्रवादी) विजयी
142. सातारा (कोरेगाव) – शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
144. सावनेर – काँग्रेसचे सुनिल केदार विजयी
145. कल्याण-पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष) विजयी
146. दर्यापूर – रमेश बुंदेले (भाजप) विजयी
147. बीड – पंकजा मुंडे (भाजप) विजयी
148. मुंबई (गोरेगाव) – विद्या ठाकूर (भाजप) विजयी
149 तासगाव – आर आर पाटील (राष्ट्रवादी) विजयी
150- पाचोरा – किशोर पाटील (शिवसेना) विजयी
151 धुळे (ग्रामीण) – कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) विजयी
152 साक्री – सीताराम धनाजी अहिरे (काँग्रेस) विजयी
153चोपडा – बळिराम चंद्रकांत सोनावणे ( शिवसेना) विजयी ,
154भुसावळ – संजय सावकारे (भाजप) विजयी,
155एरंडोल – चिमणराव पाटील (शिवसेना) विजयी
156 मलकापूर – चैनसुख संचेती (भाजप) विजयी
157आकोट – भारसाकळे प्रकाश (भाजप), विजयी
158आकोला (पश्चिम) – गोवर्धन शर्मा (भाजप) विजयी
159 मूर्तिजापूर – हरीश पिंपळे (भाजप) विजयी
160 वाशिम – लखन मलिक (भाजप) विजयी
161 कारंजा – राजेंद्र पटनी (भाजप) विजयी
मोदींच्या जादूने दिग्गजांना झोपविले
इथे चालला नाही मराठी बाणा; नाही चालली मराठी अस्मिता ;इथे नाही चालली गांधी घराण्याची परंपरा , आणि नाही चालले अन्य काही … फक्त चालली ‘ हर हर मोदी ‘ ची लाट … महाराष्ट्राला भाजपचा असा खास चेहरा नाही अशी परिस्थितीजन्य टीका होत असतानाही , महाराष्ट्रात मोदींचाच झंझावात चालला मोदींचाच करिष्मा चालला या निष्कर्षाला येता येईल अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत . औरंगाबाद (पूर्व) मधून भाजपचे अतुल सावे यांचा विजय झाला आणि कॉंग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा धक्कादायक पराभव झाला त्यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील , नारायण राणे , बाळा नांदगावकर, सतेज पाटील सारख्या दिग्गजांना या मोदी झंजावातात घरी बसावे लागणार आहे
पराभूत झालेले प्रमख उमेदवार
1 कोल्हापूर- सतेज पाटील (कॉंग्रेस)
2 औरंगाबाद (पूर्व) – रांजेद्र दर्डा (कॉंग्रेस)
3 उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
4 बेलापूर- गणेश नाईक (राष्ट्रवादी)
5 कुडाळ- नारायण राणे (कॉंग्रेस)
6 इंदापूर- हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी)
7 जळगाव- सुरेश जैन (शिवसेना)
8 श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
9 अमरावती- रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)
10 शिवडी- बाळा नांदगावकर (मनसे)
11 खेड- दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
12 शिरूर- अशोक पवार (राष्ट्रवादी)
13 नाशिक- वसंत गीते (मनसे)
14 दर्यापूर- अभिजीत अडसूळ (शिवसेना)
15 पुणे- रमेश बागवे (कॉंग्रेस)
16 भायखाळा- गीता गवळी (अखिल भारतीय सेना)
पुणेकरांनी अनुभवली सुरेल सारंगीची मैफल
धृवज्योती घोष यांच्या सारंगी वादनाने जिंकली रसिकांची मने
पुणे -सांस्कृतिक पुण्यात नृत्य, गायन व वादनाच्या अनेकमैफिली होत असतात पण सारंगीची मैफील होणे म्हणजे जरा दुर्मिळच योग. परंतु, उद्गार संस्थेने आयोजित केलेल्या आवर्तन या कार्यक‘माच्या माध्यमातून ही दुर्मिळ मैफीलही पुणेकरांना अनुभवता आली. प्रसिद्ध सारंगी वादक पंडीत धृवज्योती घोष यांच्या सुरेल सारंगी वादनाने उपस्थितांची मने जिंकली. रसिक पुणेकरांच्या तुडुंब प्रतिसादात एस. एम. जोशी सभागृह येथे हीमहेफील पार पडली.
पं रोहिणी भाटे यांना मानवंदना देण्यासाठी उद्गार संस्थेच्या अध्यक्षा व प्रसिद्ध कथक नृत्यांगना डॉ सौ. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून आवर्तन या अनो‘या मैङ्गलीचे आयोजन करण्यात आले होते. गायनाचा वारसा लाभलेल्या पं घोष यांच्या सुरेल सारंगी वादनाने या या कर्यक‘माची सुरूवात झाली. वरबा व श्री रागाचे सौंदर्य आपल्या सुरेल सारंगी वादनातून पं. घोष यांनी हळुवार उलगडले. परदेशातील वादक यु जी नाकागावा यांनी सारंगीच्या सहवादनातून पं. घोष यांना उत्तम साथ दिली. तर प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद यांनी (तबला) दिलेल्या साथीने मैङ्गल आणखीनच रंगत गेली. सुरेल सारंगीप्रमाणे आपल्या सुरेल आवाजातून पं. घोष यांनी गायलेल्या जानकीनाथ सहाकरे हे भजन सादर केले. सारंगी हे खरे तर भारतीयच वाद्य परंतु, आपल्याकडील विद्यार्थी ते शिकण्यासाठी पुढे येत नाही. परदेशातील लोक मात्र हे वाद्य शिकण्यात रस घेतात याचा विचार होणे गरजेचे असल्याचे पं. घोष यांनी यावेळी सांगितले.
अपर्णा पानसे व अस्मिता चौगुले यांनी कथक नृत्याचा अविष्कार सादर केला. उठाण, तोडे, गिनती अशा विविध प्रकाराच्या साहय्याने त्यांनी कथक नृत्यातील पैलू उलगडले. दशयज्ञ या त्यांच्या नृत्यरचनेने रसिकांची मने जिंकली. आनंद देशमुख यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले.
स्वतः ला विजय तर मिळाला …
बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले तर
कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले त्यांनी विलासकाका पाटील उंडाळकरा यांचा पराभव केला आणि
कणकवलीतून कॉंग्रेसचे नितेश राणे विजयी झाले लातुर शहरातून कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजिव अमित देशमुख विजयी झाले
नारायण राणे,बाळा नांदगावकर पराभूत – छगन भुजबळ विजयी
कुडाळमधून कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक विजयी झाले आहेत शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव,झाला येथून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी झाले आहेत येवल्यातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ विजयी झाले आहेत कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे सुभाष भोईर विजयी तर शिर्डीतून कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी तसेच सिन्नरमधून शिवसेनेचे राजाभाऊ वझे यांचा विजय तर माणिकराव कोकाटेंचा पराभव झाला आहे देवळालीतून शिवसेनेचे योगेश घोलप विजयी झाले आहेत धुळे शहरातून भाजपचे अनिल गोटे विजयी झाले आहेत
नागपूर पश्चिममधून भाजपचे देवेंद्र फडणवीस 52 हजार मतांनी विजयी झाले आहेत
विजयी उमेदवारांची यादी – देवळाली – योगेश घोलप – शिवसेना /येवला – छगन भुजबळ – राष्ट्रवादी/ सिन्नर – राजाभाऊ वझे – शिवसेना /पुणे – शरद सोनवणे – मनसे /पुणे – पर्वती- माधुरी मिसाळ – भाजप/ नाशिक – निफाड – अनिल कदम – शिवसेना /कोथरूड- मेधा कुलकर्णी – भाजप /मालेगाव मध्य – आसिफ शेख – काँग्रेस/ कुडाळ – वैभव नाईक – शिवसेना /कसबा – गिरीष बापट – भाजप/ पुसद – मनोहर नाईक -राष्ट्रवादी/इस्लामपूर – जयंत पाटील – राष्ट्रवादी/ अमळनेर – शिरीष चौधरी – अपक्ष/ इस्लामपूर- जयंत पाटील- राष्ट्रवादी /मुलुंड- सरदार तारासिंह- भाजप /सिन्नर- राजाभाऊ वझे- शिवसेना /नंदूरबार- विजयकुमार गावीत- भाजप/ पुसद- मनोहर नाईक- राष्ट्रवादी/ कुडाळ- वैभव नाईक- शिवसेना/ शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील- कॉंग्रेस /कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर- शिवसेना /मालेगाव- शेख आसिफ शेख रशिद- कॉंग्रेस/ बाळापूर- बळीराम शिरसकर- भारिप /नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप /नवापूर – सुरुपसिंग नाईक – कॉंग्रेस
पुण्यात आठ ही जागांवर भाजपचा झेंडा
विजयी आमदार
* भाजप : गिरीश बापट (कसबा), माधुरी मिसाळ (पर्वती), प्रा. मेधा कुलकर्णी (कोथरूड), दिलीप कांबळे (कॅन्टोंमेंट), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), विजय काळे (शिवाजीनगर), योगेश टिळेकर (हडपसर), भीमराव तापकीर (खडकवासला), लक्ष्मण जगताप (चिंचवड), बाबूराव पाचर्णे (शिरूर), राहुल कुल (दौंड), संजय भेगडे (मावळ)
* शिवसेना : गौतम चाबुकस्वार (पिंपरी), विजय शिवतारे (पुरंदर), सुरेश गोरे (खेड)
*राष्ट्रवादी : अजित पवार (बारामती), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), दत्तात्रय भरणे (इंदापूर)
*काँग्रेस : संग्राम थोपटे (भोर)
*मनसे : शरद सोनावणे(जुन्नर)
पुणे – पुणे शहरातील आठपैकी ८ आणि जिल्ह्यातील ४ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने ‘राष्ट्रवादी’ आणि काँग्रेसला धुळीस मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊन तीनवर आले, तर काँग्रेसचे अस्तित्व केवळ एका मतदारसंघापुरते उरले. शिवसेनेचा ‘धनुष्य-बाण’ गेल्यावेळेप्रमाणेच तीन ठिकाणी चालला. राज्यभर कपाळमोक्ष झालेल्या मनसेने पुणे जिल्ह्यातील जुन्नरची एकमेव जागा ‘राष्ट्रवादी’कडून खेचून घेत लाज राखली.
लोकसभा निवडणुकीतील ‘मोदी लाट’ विधानसभेच्या निकालातही काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्ध्वस्त करून गेल्याचे चित्र पुण्यात दिसले. मोदींनी पिंपरी आणि बारामतीत सभा घेतली होती. शिवसेनेच्या गेल्यावेळच्या दोन जागा भाजपने खेचून घेतल्या; परंतु पुरंदरसह पिंपरी आणि खेड या दोन नव्या जागा जिंकत शिवसेनेने पुण्यातील संख्याबळ कायम राखले.
पुणे शहरातील आठही जागा जिंकण्याचा पराक्रम भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच केला. भाजपच्या गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. कोथरूडची जागा अपेक्षेप्रमाणे भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेकडून खेचून घेतली. शिवाजीनगरमध्ये विनायक निम्हण यांचा विजयाचा चौकार मारण्याचा प्रयत्न भाजपच्या विजय काळे यांनी हाणून पाडला.
बारामतीत अजित पवारांनी नेहमीच्या सहजतेने ८९ हजार ७९१ मतांनी प्रचंड विजय मिळवला. पवार दिलीप वळसे-पाटील यांनीही आंबेगाव सहज जिंकले. पवार आणि पाटील हे दोघेही सहाव्यांदा आमदार झाले. इंदापुरात दत्तात्रय भरणे यांनी पंधरा हजार मतांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांना हरवत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला. मात्र, हा आनंद राष्ट्रवादीला साजरा करता आला नाही. कारण, वडगावशेरी, जुन्नर, चिंचवड, पिंपरी, भोसरी, शिरूर, दौंड या गेल्या वेळच्या सात जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या.
भाजपचे मित्र महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने दौंड येथे राहुल सुभाष कुल यांच्या माध्यमातून राज्यातील एकमेव जागा जिंकली.
विजय काळे, जगदीश मुळीक, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर (भाजप), गौतम चाबुकस्वार (शिवसेना), महेश लांडगे (अपक्ष) पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले, तर विनायक निम्हण, रमेश बागवे (काँग्रेस), दिलीप मोहिते, अशोक पवार, विलास लांडे, अण्णा बनसोडे, बापू पठारे, रमेश थोरात, (राष्ट्रवादी), चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर (शिवसेना) या १० विद्यमान आमदारांना प्रभाव पत्करावा लागला
गेल्या पाच महिन्यांत तिसरा पक्षप्रवेश करत ऐनवेळी भाजपत आलेल्या लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमध्ये विजय मिळवला.
माधुरी मिसाळांचे तब्बल ६९ हजार ७० हे मताधिक्य हा प. महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा विजय ठरला. सलग पाचवा विजय मिळवणारे भाजपचे गिरीष बापट पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात ‘सीनियर’ आमदार ठरले.
१९९५ पासून आमदार आणि मंत्री असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील पहिल्यांदाच पराभूत झाले
डिझेलच्या दरात 3.37 रुपये कपात
नवी दिल्ली – पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. लिटर मागे 3.37 रुपये दरकपात करण्यात आली आहे. डिझेलचे दर आता तेल कंपन्याच ठरविणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज शनिवारी झालेल्या बैठकीत डिझेलच्या किंमती सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर घरगुती वापराच्या गॅसचे अनुदान पुन्हा थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. पेट्रोलनंतर आता डिझेल किंमतीवरील सरकारी नियंत्रण उठविण्यात आले आहे. त्याच बरोबर गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी गॅस दर निश्चित करण्यात आले आहे. ५.६१ प्रति युनिट असे नवीन गॅस दर निश्चित करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ८.२ डॉलर प्रति युनिटचे दर देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने ती फेटाळून लावली असल्याचे दिसते. नवीन गॅसचे दर १ नोव्हेंबरपासून लागू होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
बेळगावी प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी मराठी भाषिकांचा मोर्चा
बेळगाव-केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर बेळगावी करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कर्नाटक राज्योत्सवदिनी म्हणजेच (ता. १ नोव्हेंबर) काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील होते.
सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत पुराव्यांना बाधा पोहचेल, असे निर्णय कर्नाटक सरकारला घेता येऊ नयेत म्हणून दिल्लीतील वकिलांशी समितीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. नामांतराचा निषेध म्हणून सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी होऊन अस्मितेचे दर्शन घडविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी बैठकी नंतर दिली.
किर्लोस्कर मध्ये पावणेदहा हजाराची पगारवाढ
नाशिक -नाशिक मधील अंबड येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, या कंपनीत ९६४५ रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. ही पगारवाढ पुढील तीन वर्षांसाठी असून, सामंजस्य वेतनकरारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने आर. आर. देशपांडे यांनी, तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश पाटील, जनरल सेक्रेटरी अशोक उशीर, यांनी स्वाक्षरी केली. यामुळे दिवाळीपूर्वीच कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.
९,६४५ रुपयांची सीटीसी पगारवाढ, त्या व्यतिरिक्त पेड हॉलीडे एकने वाढविण्यात आला आहे, कामगारांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली असून डी.ए. पॉइंटमध्ये ०.१ पैशाने वाढ, रिटायरमेंट गिफ्ट रक्कमेत २,५०० रुपयांची वाढ तर एल.एस.एम.बी. योजना नवीन लागू करण्यात आली आहे. मयताच्या वारसास ५० हजार रुपयांची मदत यावर्षीपासून व्यवस्थापनाने दिली आहे. मुला-मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपये विवाहकर्ज म्हणून देण्याची योजना, हजेरी बक्षीस योजनेमध्येही वाढ करण्यात आली आहे.
युनियन आणि व्यवस्थापनाच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शंतनु धर, शीतल कोठारी, कृष्णा गावडे, मंदार पराशरे, मकरंद देवधर, तर युनियन कमेटीकडून अध्यक्ष महेश पाटील, सेक्रेटरी अशोक उशीर, सहसचिव विजय कुलकर्णी, खजिनदार अरुण जाधव यांनी सहभाग घेतला होता. कामगार विकास मंचचे माेलाचे मार्गदर्शन युनियनला करारासाठी मिळाल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.
पुन्हा होणार अण्णा हजारेंचा आंदोलन ‘एल्गार ‘
अहमदनगर- आमच्या मागण्या आम्ही सोडून दिलेल्या नाहीत , सरकार कोणाचे का असेनात , परदेशी बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा आणि त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर आंदोलन करणार असा इशारा आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे
परदेशी बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या मुद्द्यावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले , यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. शंभर दिवसांत काळा पैसा पर आणू या घोषणेचा केंद्रातील भाजप सरकारला विसर पडला काय असा सवाल हजारे यांनी केला आहे.
परदेशात भाषणं करून प्रश्न सुटणार नाहीत, दिलेली वचनं पाळा असा सल्ला हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. सार्वजनिक हितासाठी तांत्रिक मुद्दे नव्हे तर नैतिकतेला महत्त्व द्या असंही हजारे यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी, परदेशी बँकांमध्ये ठेवलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आणि त्या खातेदारांची नावे जाहीर करण्याचे तोंड भरून आश्वासन देत सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारने काल, शुक्रवारी यूपीएच्या पावलावर पाऊल टाकत खातेदारांची माहिती उघड करण्यास सुप्रीम कोर्टात नकार दिला होता. काळ्या पैशांसंदर्भातील माहिती देणाऱ्या देशांशी भारताचा ‘दुहेरी करनिर्धाण करार’ (डीटीएए) असून, त्याअंतर्गत ती माहिती उघड करता येत नसल्याचे सरकारने म्हटले होते.






