Home Blog Page 3653

उद्धव ठाकरेंनी माफी मागितली तरच युती … भाजपची शर्त ?

0

मुंबई, दि. २९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांची अफझल खानाच्या फौजे शी , निजामशाहीशी तुलना करणारी आणि अशी अनेक वक्तव्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार काळात केलीउत त्यामुळे आता सत्तेत सोबत यायचे असल्यास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शाह यांची माफी मागा अशी अट भाजपातर्फे उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.यामुळे खळबळ उडाली आहे
राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने मंगळवारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. मात्र या सर्वात त्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. निवडणूक प्रचारारादरम्यान भाजपाचे अनेक नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर ‘सामना’च्या अग्रलेखांतूनही भाजपावर तोफे डागत त्यांनी मोदींचा बापही काढला, या सर्व गोष्टींमुळे भाजपा नेतृत्व दुखावले गेले असून उद्धवनी जाहीररित्या किंवा वैयक्तिक पातळीवर असो पण माफी मागायलाच हवी असा पवित्रा असे भाजपा नेत्यांनी घेतला आहे.
एका केंद्रीय नेत्याच्या सांगण्यानुसार, भाजपा- शिवसेना यांची युती होईलच, पण त्यासाठी थोडा काळ लागू शकतो. पंतप्रधान आणि अमित शाह यांच्याविरोधात त्यांच्या वक्तव्यांमुळे आम्ही नाराज असून त्यांना याची जाणीव व्हायला हवी अशी आमची इच्छा आहे. या वक्तव्यांबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे त्या नेत्याने सांगितले.
राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा करणा-या शिवसेनेचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तर दुसरीकडे भाजपाने जास्त जागा जिंकत सत्तास्थापनेसाठी दावाही केला आहे. मात्र त्यात सेनेला कोठेही स्थान दिलेले दिसत नाही. त्यामुळे सत्तेत वाटा हवा असेल तर भाजपाची अट मान्य करत माफी मागण्याशिवाय सेनेकडे दुसरा पर्याय नाही. आता सेना भाजपाच्या या दबावतंत्रापुढे झुकून माफी मागेल की विरोधी पक्षात बसणे पसंत करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच हे स्पष्ट होईल.

राज्यपाल हे भाजपचे एजंट -केजरीवाल

0

नवी दिल्ली -दिल्लीचे राज्यपाल हे भाजपचे एजंट असून राष्ट्रपती राजवट म्हणजे मागच्या दाराने राज्यपालांमार्फत भाजपचेच सरकार असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे . भाजपचेच दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राज्याचे राज्यपाल नजीब जंग हे ‘भाजपचे एजंट’ असल्याचाआरोप केला आहे. दिल्लीचे राज्यपाल मागच्या दाराने भाजपचं सरकार चालवत आहेत. घटनेचं पालन न करता भाजपचे एजंट असल्यासारखेच ते वागत आहेत, असे विधान केजरीवाल यांनी केलं आहे.
दिल्लीत गेले पाच महिने राष्ट्रपती राजवट असल्याने सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे राज्यपाल आणि केंद्र सरकारला मंगळवारी खरमरीत शब्दांत फटकारले होते. त्यानंतर राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने आपण भाजपसह सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसात सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी नमूद केलंय. पण . ‘येत्या काही दिवसांत बैठक कशासाठी?, ‘राज्यपालांनी आजच सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय घेऊन गुरुवारी सुप्रीम कोर्टात त्याबाबत माहिती द्यावी’, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.

सॅमसंग मोबाईल स्वस्त झाले

0

मुंबई -भारतीय बाजारपेठेत स्वस्त स्मार्टफोनचा वाढता ट्रेंड पाहून स्मार्टफोन मोबाइलमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या सॅमसंगने भारतातील गॅलक्सी स्मार्टफोनच्या किंमती आता बऱ्याच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या केलेली किंमत कपात लक्षणीय आहे भारतीय बाजारपेठेत टिकून राहावयाचे असल्यास काळाची पावले ओळखून त्यानुसार निर्णय घावे लागतात. त्यामुळेच सॅमसंगने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
सॅमसंगने कोणताही गाजावाजा न करता गॅलक्सी स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. यामध्ये गॅलक्सी Ace NXT, गॅलक्सी स्टार अँडवांस, गॅलक्सी ग्रँण्ड नियो, गॅलक्सी S3 नियो आणि गॅलक्सी नोट ३ नियो यांचा समावेश आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची ३३,९०० रु. किंमत होती.आता २४,३७८ किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी ग्रँण्ड नियो हा स्मार्टफोन १८,४५० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता
१३,६६८ रु. किंमतीला उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी S3 नियोची सध्याची किंमत २०,९१० रु. आहे. नियो लाँचिंगच्या वेळी याची किंमत २६,२०० रु. होती. म्हणजेच हा स्मार्टफोन जवळजवळ ५,२९० रुपयाने स्वस्त करण्यात आला आहे.
जुलैमध्ये सॅमसंग गॅलक्सी Ace NXT ७४०० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर हा स्मार्टफोन ६६२० रु. किंमतीत उपलब्ध आहे.
जुलैमध्ये सॅमसंग गॅलक्सी स्टार अँडवांस ७४०० रु. किंमतीला लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर हा स्मार्टफोन ६७९० रु. किंमतीत उपलब्ध आहे.

काळा पैसा दडवणाऱ्या तब्बल ६२७ जणांची यादी न्यायालयात

0

नवी दिल्ली -विदेशी बँकामध्ये काळा पैसा दडवणाऱ्या तब्बल ६२७ जणांची यादी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे सोपवली आहे. ही यादी बंद लिफाफ्यात सरकारने दिली असून हा लिफाफा कोर्ट आजच पुढील तपासासाठी ‘एसआयटी’कडे सुपूर्द करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
यादीतील ३०० जण अनिवासी भारतीय आहेत तर ३२७ जण भारतीय नागरिक आहेत. अनिवासी भारतीयांवर कारवाई करणे अशक्य आहे तर अन्य ३२७ जणांची चौकशी होऊन त्यातून हा काळा पैसा असल्याचे निष्पन्न झाले तर कारवाईचे पाऊल उचलणे शक्य होणार आहे. या यादीत प्रामुख्याने एचएसबीसी बँकेच्या जिनिव्हा शाखेत खाती असलेल्यांची नावे असून ही यादी भारताला फ्रान्स सरकारकडून मिळाली होती, असे सूत्रांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने हा बंद लिफाफा स्वत: उघडण्यास नकार देताना विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि उपप्रमुख हे दोघेच हा लिफाफा उघडतील आणि तपासाचा अहवाल नोव्हेंबर अखेरपर्यंत कोर्टाकडे सादर करतील, असे निर्देश दिले. ‘एसआयटी’ हे आमचंच एक अंग आहे आणि त्यावर कोर्टाचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून कायद्याच्या चौकटीत राहून पुढची कारवाई करण्यात येईल, असेही खंडपीठाने नमूद केले. सरकारने एकून तीन बंद लिफाफे कोर्टाकडे दिले आहेत. पहिल्या लिफाफ्यात संबंधित देशांशी झालेल्या करारांचा दस्तावेज, दुसऱ्या लिफाफ्यात विदेशात बँकखाती असणाऱ्यांची नावे तर तिसऱ्या लिफाफ्यात सरकारने केलेल्या आजवरच्या तपासाचा ‘स्टेटस रिपोर्ट’ होता, असे सांगण्यात आले.
स्विस बँकेसह विदेशातील बँकांमध्ये काळा पैसा असलेल्या सर्वच खातेधारकांची नावे जाहीर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी चांगलीच चपराक दिली होती. अशा लोकांचे हित जपण्याचा खटाटोप तुम्ही करू नका, अशी तंबी देत, आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सर्वच ‘ब्लॅक मनी’वाल्यांची नावे सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यामुळेच ही यादी सरकारच्या कस्टडीतून बाहेर येऊ शकली आहे.

सृष्टी चित्रप्रदर्शन २९ ऑक्टोबरपासून

0

पुणे :
सृष्टीची विविध रूपे अँक्रेलिक रंगाच्या साहाय्याने चित्रबद्ध केलेल्या चित्रकार राजीव चव्हाण यांचे ‘सृष्टी’ चित्रप्रदर्शन २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान सुरू होत आहे.

या प्रदर्शनामध्ये फुलपाखरांचे रंग, आकार, हालचाली चित्रबद्ध केलेल्या पाहायला मिळणार आहेत. पुणे, मुंबई या शहरांमध्ये त्यांची प्रदर्शने यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत. हे प्रदर्शन सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकार नगरजवळील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जवखेडा दलित हत्याकांडाची चौकशी व्हावी- पिरजादे

0

पुणे-

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे दलितांची हत्या जातीय द्वेषातून झालेल्या अमानुष तिहेरी हत्याकांडच्या आरोपींना तात्काळ अटक करावी , त्यांच्यावर कठोर कारवाई करावी , अशी मागणी दलित – अल्पसंख्यांक समाजाचे नेते इम्तियाझ यांनी केली आहे .

दलितांवर अन्याय अत्याचार वाढतच चालले आहेत, हि यादी वाढत जाण्याआधीच दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घातला पाहिजे . या दलित हत्याकांडाचा जाहीर निषेध असो, दलितांवर अत्याचार करणाऱ्याना अटक करा . या तपासाबाबत होत असणाऱ्या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली .पुरोगामी महाराष्ट्राला हि घटना काळिमा फासणारी आहे . अन्यथा दलित व अल्पसंख्यांक समाज या हत्तेच्या निषेधार्थ देशव्यापी जन – आंदोलन उभे राहील .

गोपीनाथ मुंडेंच्याच आशीर्वादाने फडणवीस मुख्यमंत्री –खर्डेकर

0

2
पुणे-.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदी निवडीबद्दल नागरिकानी परस्पराना मिठाई भरवुन आनंद व्यक्त केला.या वेळी भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक दिलिप उंबरकर,राजाभाउ पाटील,ओ.बी.सी.आघाडीचे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड,युवा मोर्चा चे चिट्णीस पवीत सहानी,प्रकाश पाटील,शीख जनसेवा संघाचे चरणजीत सहानी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले ” देशात नरेंद्र-राज्यात देवेंद्र ही घोषणा कशी वाटते…? यावर स्मितहास्य करत “चांगली घोषणा आहे” असे म्हणनारे दिलदार लोकनेते कै.गोपीनाथजी मुंडे यांच्याच आशिर्वादाने आज देवेंद्रजींसारखे तरुण.तडफदार,कर्तुत्ववान मुख्यमंत्री महराष्ट्राला लाभले असुन ते निश्चितच राज्याला विकासाकडे नेतील व देशातील एक नंबरचे राज्य बनवुन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करतील असा विश्वास ही संदीप खर्डेकर यानी व्यक्त केला.
या वेळी फ्लेक्स लावुन शहराचे सौंदर्य न बिघडवता सामाजिक कार्यासाठी निधी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्याने शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यक र्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीचे स्वागत केले.
शहरातील शनिवार, कसबा, नारायण पेठ, पर्वती, तसेच उपनगरांमधील कोथरूड, वारजे, येरवडा, खडकी येथेही मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आले. दिवाळी झाल्यानंतरदेखील भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे स्वागत कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात केले.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई वाटप

0

yuu

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचारी बांधवाना करण मकवानी मित्र परिवारातर्फे दिवाळीनिमित मिठाई वाटप करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखानामध्ये मिठाई वाटप पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक करण मकवानी यांच्या हस्ते करण्यात आले . सफाई कर्मचारी बांधव आपला परिसर स्वछ ठेवत असतात , या स्वछतेमुळे आपला परिसर सुंदर राहतो , त्यामुळे या कर्मचारी बांधवाना मिठाई देताना वेगळा आनंद असतो असे करण मकवानी यांनी सांगितले .
यावेळी सफाई कर्मचारी विनोद देढे , अभिजित लेंगारे , प्रविण वाघमारे , प्रमोद शेंडगे , राहुल कांबळे , शिला जेधे , विमल साळवे , विजय गायकवाड , लियाकत सय्यद , प्रमोद खंडागळे , मंगल भिसे , महादेव थोरात , शिवनाथ गाडे , मुकादम व्ही. आर . बेल्लम आदींना मिठाई वाटप करण्यात आले .

पाथर्डी तालुक्यातील हत्याकांडाचा पतित पावन संघटनेकडून निषेध

0

yu
पुणे -पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे दलितांच्या वस्तीवर अमानुषरित्या घाला घालून तीन दलितांची हत्या करण्याच्या कृतीचा पतित पावन संघटना पुणे शहरच्यावतीने जाहीर निषेधार्त आंदोलन शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात जाहीर निदर्शने करण्यात आली . दलित हत्याकांडाचा जाहीर निषेध असो … अटक करा अटक करा दलितांवर अत्याचार करणाऱ्यान अटक करा , अशा घोषणा देऊन पतित पावन संघटनेचे सर्व कार्यकर्ते बेलबाग चौकात उतरले होते . यावेळी पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील , उपाध्यक्ष विक्रम मराठे , प्रविण झंवर , कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर , सरचिटणीस मनोज पवार , विशाल गालफाडे , राम मोरे , गुरु कोळी , कुमार पंजावर , शशिकांत तोडकर , ओंकार चव्हाण , गणेश लडकत , अक्षय राउत , शशी कवडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी सांगितले कि , नगर जिल्ह्यात वारंवार दलित बांधनावर अन्याय आणि अत्याचार होत आहे , त्यासाठी हे अत्याचार थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली . तसेच पतित पावन संघटना पुणे शहर उपाध्यक्ष प्रविण झंवर यांनी सांगितले कि , या अन्याय अत्याचार करणाऱ्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही , या तपासाबाबत होत असणाऱ्या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली .

जिंकले … देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

0

मुंबई- स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला . या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.’केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा अखेर खरी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस हे कमी वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे दुसरे नेते असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे वयाच्या 37व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
आली दिवाळी …
फडणविसांनी दिली ५ जॅकेट ची ऑर्डर
आता खरी फडणवीसांची दिवाळी सुरु होत असून या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी तडकाफडकी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहेनागपूरच्या सीताबर्डीमधील गोविंदा कलेक्शन येथे फडणवीस यांचे कपडे नेहमी शिवले जातात. मात्र आता त्यांनी तडकाफडकी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहे. गोविंदा कलेक्शनचे बिट्टू मेहाडिया यांनी सांगितले, की गेली 20 वर्षे फडणवीस त्यांच्याकडूनच कपडे तयार करुन घेत आहेत. आता त्यांनी पाच जॅकेट्स आणि शर्ट व ट्राऊझर्सची ऑर्डर दिली आहे. त्यांचे हे सर्व कपडे मेहाडिया यांनी तयार करुन ठेवले आहेत. हे ड्रेस फडणवीसांचे मित्र मुंबईला घेऊन जाणार आहेत. यातीलच एखादा ड्रेस परिधान करुन फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी शर्ट आणि ट्राऊझर्स असाच त्यांचा पेहेराव होता. देवेंद्र यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या सल्ल्याने जॅकेट वापरण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यांना रिंकल फ्री कपडे जास्त आवडतात, असे मेहाडिया यांचे म्हणणे आहे.

उद्योजक चोरडिया यांची आत्महत्या

0

पुणे- प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र अजय चोरडिया यांनी चिंचवड येथील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी घडली. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय चोरडिया हे पंचशील हॉटेलचे चेअरमन होते.
घटनेची माहिती मिळताच चोरडिया यांना चिंचवडमधील निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजले नाही.

नरेंद्र मोदी हे ;मुकेश- अनिल अंबानींचे नाव दडवत आहेत -केजरीवाल

0

नवी दिल्ली-केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील काळ्या पैसा साठविणाऱ्या तीन भारतीयांची नावे सुप्रीम कोर्टाकडे दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज एकूण १५ जणांची नावं जाहीर केली. या यादीत रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, अनिल अंबानी, जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल या देशातील बड्या उद्योगपतींच्या नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने निवडक लोकांचीच नावं जाहीर केली असून जे शक्तिशाली उद्योगपती आहेत त्यांची नावं गुप्त ठेवली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
काळा पैसा परदेशी बँकांमध्ये ठेवणाऱ्या सर्वच्या सर्व ८०० जणांची नावं सरकारने जाहीर केल्यास खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान सुरु होईल असं केजरीवाल म्हणाले.
केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियाना’त देशभरात एकूण ९ अॅम्बेसेडर जाहीर केले असून त्यातील एक जणाचे खाते असल्याचे केजरावील म्हणाले. परंतु ते पंतप्रधानांच्या जवळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.
दरम्यान केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सोमवारी सादर केलेल्या काळे पैशेवाल्यांच्या यादीत राजकोटचे व्यापारी पंकज चिमनलाल लोढिया यांच्या नावाचा खुलासा झाला आहे. लोढिया यांचे स्विस बँकेत खाते असल्याचे समोर आल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. राजकोट आणि सौराष्ट्र येथे रियल इस्टेट आणि सोने-चांदीचे मोठे व्यापारी असलेले श्रीजी ट्रेडिंग कंपनीचे मालक पंकज लोढिया यांनी आपल्याकडे काळेधन नसल्याचे म्हटले आहे. आपले नाव या यादीत आल्याने मलाच आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘आमची जेवढी संपत्ती आहे ती आम्ही प्रात्पिकर विभागाकडे जाहीर केलेली आहे.’ कर सल्लागारांसोबत चर्चा करून पुढे काय करता येईल हे ठरविणार असल्याचे, ते म्हणाले.
लोढिया यांच्या श्रीजी कंपनीचे मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, हैदराबाद, विजयवाडा, कोलकाता, जयपुर, कोच्ची आणि बंगळुरुसह अनेक शहरांमध्ये कार्यालय आहे. ही कंपनी सोन्याचे बिस्कीट आणि सोन्याचे दाणे यांचा गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापर करते.याशिवाय प्रदीप बर्मन डाबर समुहाचे संचालक आहेत. तसेच राधा टिम्बलू गोवा येथी खाण व्यावसायिक आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळा पैसा चौकशी प्रकरणामध्ये या तिघांशिवाय इतर चार काँग्रेस नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यात यूपीए सरकारच्या एका माजी राज्यमंत्र्यांचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे.

… तर महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका – शरद पवार

0

मुंबई -भाजप आणि शिवसेना यांच्यातील बिघडलेले संबध पाहता पुढच्या सहा महिन्यांतही महाराष्ट्रावर पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ शकतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार करू, असे विधानही त्यांनी केले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनतर सत्तास्थापनेचा खेळ रंगला असताना त्यात अगदी पहिल्या दिवसापासूनच पवारांची राष्ट्रवादी चर्चेत आहे. राष्ट्रवादीने न मागता भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला. त्यामुळे शिवसेनेची तर कोंडी झालीच शिवाय भाजपलाही शिवसेनेला आणखी बॅकफुटवर ढकलण्यासाठी बळ मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
भाजपला राष्ट्रवादीने एकतर्फी पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता पवारांनी आधीचा सूर बदलला. ‘आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही आणि विरोधही केलेला नाही. सभागृहात भाजपवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर राष्ट्रवादीचे आमदार मतदानात भाग घेणार नाहीत’, असे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले नाही तर पुढच्या सहा महिन्यांतही राज्यावर निवडणुका लादल्या जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे पवारांनी पुढे स्पष्ट केले.
घोटाळ्यांचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी भाजपपुढे शरण गेल्याच्या बातम्या पवारांनी नाकारल्या. भाजप-राष्ट्रवादी ‘गुफ्तगू’चा पृथ्वाराज चव्हाणांचा आरोपही त्यांनी फेटाळल्या. ‘पृथ्वीराज तीन वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते काय करत होते. ते झोपले होते का?, असा हल्लाच पवार यांनी चढवला.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार आहे का?, अशी काही जुळवाजुळव होतेय का?, असे विचारले असता पवार यांनी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तर दिले. अशा जरतरच्या प्रश्नांवर मी उत्तरे देत नाही. काही काँग्रेस नेत्यांना असं वाटत असेल पण पक्षाची ती भूमिका असेल, असे मला वाटत नाही. काँग्रेस पक्ष खरंच याबाबत गंभीर असेल तर जाहीरपणे तसं त्यांनी बोलायला हवं. त्यानंतरच त्यावर चर्चा होऊ शकते, असे पवार म्हणाले. शिवसेनेला आम्ही पाठिंबा दिल्याने पुरेसा आकडा तयार होईल, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केल

पुणे ते अक्कलकोट पायी पालखीचे उत्साहात प्रस्थान

0

m2

m3

m4

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने श्री स्वामी समर्थांची महाराष्ट्रातील मानाची पहिली पुणे ते अक्कलकोट पायी पालखीचे पुण्यातून उत्साहात प्रस्थान झाले. भैरोबानाला मधील देडगे बंधू यांच्या निवासस्थानी हि पालखी मुक्कामी होती . त्यानंतर पहाटे अभिषेक महापूजा सुर्यकांत देडगे आणि विजया देडगे यांच्या हस्ते झाली . त्यानंतर आरती करण्यात आली . यावेळी स्वामी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले . यावेळी ज्योती हॉटेलचे दिनेश हेगडे आणि दिनेश हेगडे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती . यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र आलामखाने , माजी अध्यक्ष राजेंद्र देशमुख , विक्रांत देडगे , अभिषेक चौघुले , आदित्य चौघुले , रुपाली म्हेत्रे , सुजाता बनकर , संध्या रासकर , वैशाली जमदाडे , संगीता शिंदे , अनिकेत चौघुले , रमेश चौघुले , चंद्रकांत चौघुले , राजेंद्र चौघुले , सौरांगी बनकर , रूपा देडगे , रवींद्र रासकर आदी स्वामी भक्त उपस्थित होते .

या पायी पालखीमध्ये ” गाय आणि पालखी वाचवा ” हा संदेश असलेल्या केशरी टोप्या घालून हरिचंद्र तावरे , जगन्नाथ विसापुरे , रामचंद्र पानसरे , सुर्यकांत भोसले , प्रकाश माने आदींनी हा सामाजिक संदेश देऊन पालखीमध्ये सहभागी झाले होते . या पालखीमध्ये मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी झाले होते .

दिपोत्सवाने छत्रपतींना मुजरा

0

10403311_732881010131743_6765141443130587463_n
पुणे-सनईचौघड्याचे वादन, क्षणाक्षणाला दिली जाणारी तुतारीची सलामी लहानांपासुन थोरापर्यंतीची दिप प्रज्वलित करण्याची लगबघ, श्री शिवछत्रपतींचा होणारा जयघोष अशा शिवमय वातावरणात शिवजयंती महोत्सव समिती तर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २0१४ पर्व ३ रे अंतर्गत एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्याला आठसहस्त्र पारंपरिक दिव्यांची भव्य मानवंदना देण्यात आली.
दिपोत्सवाचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे, जयंत पवार, आमदार विजय काळे, नगरसेवक विशाल तांबे, बाळासाहेब बोडके, बाळासाहेब लांडगे, प्रताप परदेशी तसेच शिवजयंती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पासलकर, जेधे, बांदल, कंक, मालुसरे, पायगुडे, कोंडे, ढमढेरे, सणस, शिळीमकर, निवंगुणे, करंजावणे, कडु, धुमाळ, काकडे, मोहिते यांच्या वंशजांकडुन दिप प्रज्वलित करून करण्यात आले. पुतळ्याचे वजन तब्बल ८000 किलो असल्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशी ८000 पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. पुणोकरांनी काही क्षणातच ८000 पणत्या प्रज्वलित केल्यामुळे संपुर्ण परिसर प्रकाशमान झाला. शिवछत्रपतींचा भव्य अश्‍वारूढ एकसंघ कास्टींग केलेला हा जगातील एकमेव पुतळा आहे. पुतळ्याला ८६ वर्षे पुर्ण झाली आहेत. शिवछत्रपतींना ८000 पणत्यांची मानवंदना देणारा हा भारतातील एकमेव उपक्रम आहे. दिपोत्सवाला महिला व लहान मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दिपोत्सवाच्या यशस्वी नियोजनामध्ये समितीच्या सदस्यां बरोबर असंख्य पुणोकरांचा यशस्वी वाटा दिसुन आला. पाडवा दिपोत्सव, शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणूक, शिवराजाभिषेक सोहळा या दिनी श्री शिवछत्रपतींना भव्य मानवंदना देण्याची समितीने यशस्वी प्रथा पाडल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, दत्ता पासलकर, दिपक घुले, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, रवी कंक, किरण देसाई, राजाभाऊ पासलकर,रणजीत शिंदे, निलेश जेधे, गिरीश गायकवाड व सर्व सदस्यांनी दिली.