मुंबई – भगवा आतंकवाद असा शब्द जन्माला घातला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार असेल तर शिवसेना विरोधात मतदान करील, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तेसाठी आम्ही लाचार नाहीत, एकटे बसण्याची तयारी आहेे, असे सांगतानाच सत्तेत सहभागासाठी अजून दोन दिवस वाट पाहा, असे म्हणत उद्धव यांनी अजून सकारात्मक असल्याचेही दाखवून दिले.
शिवसेनेचे आमदार व खासदारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या वेळी पक्षाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. सत्तेत सहभागाबाबत उद्धव म्हणाले, विधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल त्यावर आमचा पाठिंबा अवलंबून असेल. अध्यक्षांचे नाव सर्वानुमते जाहीर व्हावे. तसेच देशातील हिंदूंना संपवण्याची भाषा केली जात आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधात बसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यावर उद्धव म्हणाले, खुद्द शरद पवार यांनीच नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नव्हता, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाच याबाबत विचारा.
अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार होते; मग त्यांना विमानतळावरून परत का बोलाविले, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता उद्धव म्हणाले, की मीच अनिल देसाई यांना परत बोलाविले. जर भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल तर आम्हाला सत्तेत रस नाही. आम्हीही मोकळे आहोत. लाचारी पत्करून कदापि सत्तेत जाणार नाही. मला कोणाबरोबर जायचे असेल तर मी उघड भूमिका घेईन. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी शपथ घेतली होती. ते सरकार पुढे तेरा दिवसांनी पडले. वाजपेयींचे सरकार पवार यांनीच पाडले होते, याची आठवण करून देतानाच प्रभू हे आज भाजपचे मंत्री बनले आहेत याचे आश्चर्य वाटते.
राज्यातील भाजप सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय 12 नोव्हेंबरला घेण्यात येईल. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. अधिवेशनात जर सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसणार आहोत. भाजप कोणता निर्णय घेतो यावरच शिवसेनेची पुढील भूमिका असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.
सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही – उद्धव ठाकरे
केवळ सुरेश कलमाडींचा म्हणून ‘ पिफ’ ला अनुदान दिल्याचे स्पष्ट ?
पुणे- केवळ सुरेश कलमाडी यांच्यामुळे राज्य सरकारच्या अधिकृततेची मोहोर उमटलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) चित्रपटांच्या अनुदानासाठी पात्र नसल्याची माहिती आता समोर आली आहे.पिफ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील नामांकन किंवा पारितोषिक मिळवलेल्या चित्रपटांना थेट अनुदानासाठी पात्र ठरवण्याचा नियम राज्य सरकारने यापूर्वी केला आहे. दरम्यान यापूर्वी राज्य सरकारने मराठी चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी नियुक्त केलेल्या समिती मध्ये एका पत्रकाराची केलेली नियुक्ती संशयास्पद आणि वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
मराठी चित्रपटांना अनुदान देण्याबाबतची नवीन नियमावली गतवर्षी राज्य सरकारने जाहीर केली. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मराठी चित्रपटांना अनुदानासाठी थेट पात्र ठरवण्याचा नियम करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार, इंडियन पॅनोरमासह ऑस्कर, बर्लिन, कान्स, बुसान, रॉटरडॅम अशा जगभरातील महत्त्वाच्या अकरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची यादीच राज्य सरकारने केली आहे. भारतात मुंबईतील मामि, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असतानाही या महोत्सवांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, २०१०मध्ये ‘पिफ’ला महाराष्ट्राचा अधिकृत महोत्सव म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र, या यादीत पिफचाही समावेशनाही
पिफ हा राज्य सरकारचा अधिकृत महोत्सव आहे असे आज पर्यंत भासविण्यात येत होते सरकारकडून महोत्सवाला निधी उपलब्ध करून देण्यात येतो; तसेच महामंडळही महोत्सवाला निधी देते. त्यामुळे या महोत्सवातील पारितोषिकप्राप्त मराठी चित्रपटाला थेट अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात यावे. याबाबत नवनिर्वाचित सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत भूमिका मांडून पाठपुरावा करावा यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पाटकर यांच्यावर दबाव येत असल्याचे वृत्त आहे . पिफ साठी एकूण होणारा खर्च याबाबत आता चौकशीची मागणी झाल्यास गैर वाटणार नाही असे दिसते अह्हे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या
मराठी ला अभिमान वाटेल असा अभिनेता – सुबोध भावे ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या – ९ नोव्हेंबर
फँड्री मराठी सिनेमा ११० देशांमध्ये प्रदर्शित होणार
पुणे-
राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा फँड्री सिनेमा डिजिटल माध्यमातून ११० देशांमध्ये प्रदर्शित करत आहोत अशी माहिती येथे निर्माते निलेश नवलाखा यांनी दिली
शिवाय आता आय-ट्यूनस्, गूगल प्ले आणि फेसबुकवर पाहायला मिळणार आहे. निर्माते विवेक कजरिया आणि निलेश नवलखा हे पुन्हा एक नवीन वाटचाल करत आहेत. मराठी सिनेमांना जागतिक स्तरावर घेऊन जात असतानाच त्यांनी सिख्या एंटरटेन्मेंट आणि सिनेकॅरॅवान या उपक्रमाशी सोबत करून फँड्री सिनेमा डिजिटल माध्यमातून ११०देशांमध्ये प्रदर्शित करत आहेत.असे सांगितले
सिनेकॅरॅवानचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकिय संचालक अपूर्व बक्षी याविषयी सांगतात, की सिनेमा वितरणातील त्रास कमी करून योग्य उठाव देणे ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. एकाचवेळी सर्वाधिक विभागांमध्ये आणि माध्यमांमधून सिनेमा वितरीत आणि प्रदर्शित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
फँड्री हा अत्यंत शक्तिशाली सिनेमा असून ते जगभरात जायलाच हवा. आम्हाला हा प्रवास निलेश आणि विवेक यांच्यासोबत करण्यात खूप आनंद आहे.
सिनेकॅरॅवानच्या व्यवस्थापकिय संचालक पूजा कोहलीम्हणाल्या , की विवेक आणि निलेश सारख्या निर्मात्यांना वितरणाच्या खिडक्या बंद होताना दिसत आहेत आणि भारतातफोर जीचे आगमन होत असल्याने इंटनटेवरही कार्यक्रमांची मागणी प्रचंड वाढणार आहे. याची त्यांना जाणीव आहे. डिजिटल आणि मोबाईल प्लॅटफॉर्म हे प्रेक्षकांपर्यंत पोहण्यासाठी सर्वाधित कार्यक्षम ठरणार आहे.
भाजपचे दगाबाजीचे राजकारण सुरूच – शिवसेना भवनावर गर्दी
मुंबई – आता सध्या म्हणजे रविवारी ९ नोव्हेंबर रोजी शिवसेनाभवनावर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ‘ भाजप हाय हाय ‘ च्या घोषणा देण्यात येत आहेत .शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत.शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सेना भवनात आगमन झाले आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे भाजपाबाबत ची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहे.
विधानसभा गटनेता निवडीसाठी ही बैठक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. राज्यसभा खासदार अनिल देसाई मंत्रीपदाची शपथ न घेता -शपथविधीवर बहिष्कार टाकून दिल्लीहून रविवारी दुपारी परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यामुळे शिवसेनेकडून होणार्या या शक्ती प्रदर्शनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांकडून ‘भाजप हाय हाय’च्या घोषणा दिल्या जात आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. रविवारी मोदींच्या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट, 14 राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न झाल्याचे खासदार आनंदराव अडसुळ यांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई दिल्ली विमानतळावरुनच मुंबईला परतले आणि थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या असल्याचे चित्र आहे. मातोश्री येथील बैठकीनंतर सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना झाले.
रविवारी दुपारी शिवसेनेच्या खासदारांची सेना भवनात बैठक होणार होती . या बैठकीत केंद्रात भाजपसोबत राहायचे की नाही, यावर निर्णय घेणार असल्याची चर्चा होती . शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनाही आज सायंकाळ पर्यंत राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याऐवजी सेना विरोधीपक्षात बसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जागतिक दयाळू दिन साजरा

जागतिक दयाळू दिनानिमित व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्सच्यावतीने पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्ये सादर करून त्यांनी समाजाला सर्वावर दयाळूपणे , विन्रमतेने प्रेम केले तर त्याचा परिणाम समजावर होतो . सर्व जगात आज जागतिक दयाळू दिनानिमित २९ दिशामध्ये हा दिवस साजरा होतो . त्यामध्ये आज पुण्यात महात्मा गांधी रस्त्यावर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्यू सादर करून संदेश दिला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नागरिकांना फुले देऊन प्रेमाचा संदेश दिला . हातावर ” स्वभाव नम्र ठेवा ” हा संदेश लिहण्यात आला होता . यामध्ये व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्स , डान्स ओ फिट , डान्स फ्लोर स्टुडीओ आणि रायझेइंग इन्स्टस्ट्यूट परफोर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला . अशी माहिती लाईफ वेस्ट इनसाईड इंडियाच्या प्रतिनिधी इरा घोष यांनी माहिती दिली . यामध्ये २९ देशामधील प्रतिनिधी तसेच , व्हिकटोरिया किड्स एज्युकेअर्सचे चेअरमन डॉ. रॉबिन घोष , शारदा घोष , नगरसेवक शैलेंद्र बिडकर , रुपाली बिडकर , डॉ. किशोर शहाणे , शाळेचे शिक्षक वर्ग , आणि विद्यार्थ्यांचे पालकवर्ग आदी मान्यवर सहभागी झाले होते .यावेळी नागरिकांना फुले देऊन सामाजिक संदेश असलेले कार्ड्स वाटप करण्यात आले .
व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्स हि समाजासाठी वेगवेगळे कार्यक्रम समाजामध्ये जनजागृतीसाठी राबवित असतात , त्यातून हा जागतिक दयाळू दिनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला .
ऑस्ट्रेलिया खंडावर फडकला तिरंगा…वाजली राष्ट्रगीताची धून….
खंडातील १० सर्वोच्च शिखरे आनंद बनसोडेच्या नेतृत्वाखाली केली सर… प्रथम भारतीय टीम होण्याचा मान.
“वर्ल्ड पीस सेव्हन समिट” मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलिया मधील “ऑसी १०” हे गिर्यारोहणातील आव्हान पूर्ण.
भारताचा एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या “वर्ल्ड पीस सेव्हन समिट” या मोहिमेतील चवथे खंड ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसिस्को व इतर १० सर्वोच्च शिखरे नुकतेच सर करण्यात आले. २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर च्या दुपारपर्यंत आनंदच्या नेतुर्त्वाखाली भारतातील ८ जणांनी हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे “ऑसी-१० आव्हान” हे पूर्ण करणारी पहिली भारतीय टीम असा मान या टीम ला मिळाला असून यासोबत इतर अनेक रेकॉर्ड यांच्या नावे झाले आहेत.या टीम मध्ये आनंदसहित मुंबई व पुणे येथील शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश राठोड व तारकेश्वरी भालेराव ही जोडपी व दिल्ली येथील आकाश जिंदाल, मुंबई मधून संजना दलाल , औरंगाबाद येथील मनीषा वाघमारे, जयपूर येथील साची सोनी या मुलीही या भारतातील प्रथम “ऑसी- १०” या आव्हानात्मक मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.या मोहिमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आनंदने “युनायटेड नेशन्स वूमन” च्या “हीफॉरशी” या “स्त्री-पुरुष समानता” या विषयावर असलेल्या मिशनचा प्रसारासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत टीम मधील इतर सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेची शपत शिखराच्या सर्वोच्च उंचीवर घेतली.आनंदने ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरावरही भारताचे राष्ट्रगीत वाजवले असून ४ खंडाच्या सर्वोच्च उंचीवर राष्ट्रगीत वाजवणारा जगातील एकमेव गिर्यारोहक बनण्याचा मान त्याला मिळाला आहे.
आनंदचे गुरु सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदने या भारतातील प्रथम मोहिमेची आखणी केली होती. या अंतर्गत अनेक बाबतीत आगळ्या वेगळ्या ठरलेल्या या मोहिमेत ३ जोडप्यांचा समावेश या टीम मध्ये केला गेला होता.
आनंद बनसोडे यांच्याकडून झालेले विविध रेकॉर्ड-
1. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च दहा शिखरे “ऑसी-१०” हे आव्हान पूर्ण करणारा गिर्यारोहक व प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व.
2. आनंद व जयपूरच्या साची सोनी हिने भारताचा सर्वात मोठा तिरंगा ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च उंचीवर नेहून एखाद्या शिखरावर सर्वात मोठा तिरंगा फडकवला.मान.
3. माउंट एव्हरेस्ट (१९ मे २०१२), माउंट एल्ब्रूस (१७ जुलै २०१४) व माउंट किलीमांजारो (१५ ऑगस्ट २०१४) व माउंट कोसिस्को (२ नोव्हेंबर २०१४) हे चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर.
4. एव्हरेस्ट, माउंट एल्ब्रूस, माउंट किलीमांजारो व माउंट कोसिस्को वर भारताचे राष्ट्गीत गिटारवर वाजवून जागतिक रेकॉर्ड.
5. भारताच्या संविधानाची प्रस्तावना ऑस्ट्रेलिया खंडाच्या सर्वोच्च शिखरावर प्रथमच आनंद मार्फत गेली.
6. युनायटेड नेशन्स च्या हिफॉरशी या मिशनच्या प्रसारासाठी आनंदने केली मोहिमेची आखणी.
यांनी केले “ऑसी-१०”आव्हान पूर्ण-
आनंद बनसोडे (टीम लीडर), साची सोनी, अंजली व शरद कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, मनीषा वाघमारे, आकाश जिंदाल.
महाराष्ट पोलीस दलातील जवान-
सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस दलातील दिनेश राठोड व तारकेश्वरी वाघमारे यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील ५ सर्वोच्च शिखरे सर केली असून असे करणारे ते महाराष्ट्रातील प्रथम पोलीस ठरले आहेत.
याशिवाय मुंबई येथील संजना दलाल हिने ३ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत.
पुढील मोहीम –
आनंद आता पुढे दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणार आहे.
पुढील १० शिखरे सर केली –
१. माउंट कोसिस्को
२. माउंट टाउनसेंड
३. माउंट त्वानाम
४. माउंट राम्सहेड
५. माउंट इथररिज
६. माउंट राम्सहेड नॉर्थ
७. माउंट आलिस रोव्सोन पीक
८. माउंट अब्बोट पीक
९. माउंट साउथ वेस्ट ऑफ अब्बोट पीक
१०.माउंट कॅरुथर पीक
भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात काकड आरतीची सांगता
पुणे — भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात काकड आरतीची उत्साहात सांगता झाली . सकाळ पासूनच मंदिरात सर्वांचे स्वागत कपाळावर चंदन लाऊन स्वागत करण्यात येत होते. यावेळी महापूजा करण्यात येउन काकड आरती करण्यात आली . यावेळी ह. भ. प. संदीप महाराज पळसे यांचे कीर्तन झाले , विणेकरी दीपक चव्हाण , ज्ञानोबा घोड , नंदकुमार जगताप , तेजेन्द्र कोंढरे , संदेश दिवेकर , अशोक साळुंखे , प्रमोद बेंगरूट , अप्पा मानकर , गोळे मामा , राजू इंदलकर ,, लक्ष्मण घोड , दत्ता घोड , झारे मामा , चिंचवडे मामा , रंजना भोसले , चंद्रकला भोसले , कुंदा बेंगरूट , छाया भोसले , ताराबाई क्षीरसागर , सिंधूताई पवार , उज्वला कोरे , शशिकला राउत , ताराबाई बेंगरूट आदी उपस्थित होते .
सर्वांनी शेवटी महाप्रसादाचा लाभ घेतला .
” डेंग्यू पासून होणारे लक्षण आणि उपाय ” या माहितीपर जनजागृतीपर पत्रकांचे वाटप
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , पुणे शहरच्यावतीने पुणे कॅम्प भागात ” स्वछ भारत अभियान ” राबविण्यात आले .तसेच ” डेंग्यू पासून होणारे लक्षण आणि उपाय ” या माहितीपर जनजागृतीपर नागरिकांना पत्रकांचे वाटप करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील कुरेशी मस्जिद ते भोपळे चौक दरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व कार्यकर्त्यांनी पुणे शहराचे अध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेला कचरा गोळा करण्यात आला . यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शैलेश उग्राल , अल्पसख्यांक अध्यक्ष बशीर शेख , अशोक चटपेल्ली , बालम परदेशी , तरुण दत्ता , प्रतिक परदेशी , मोहीन कुरेशी , सुशील खंडेलवाल , किशोर सिंगवी , शहनाझ शेख , तन्वीर सय्यद , शैलेश मोहिते, सागर मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

क्रीएटीव्हिटी आणि डिझाइन क्षेत्राला जगभर मागणी : वंका
पुणे. : पैसा आणि तंत्रज्ञान या निकषांवर पूर्वी व्यवसाय चालायचा. परंतू, आता परिस्थिती बदलली आहे, जगभरातील नामवंत कंपऩ्यांनी आपले उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी क्रीएटीव्हिटी आणि डिझाइन यांचा वापर करताना दिसून येत आहेत. ही कौशल्ये आत्मसात करणार्यांना जगभर मागणी असल्याचे मत मायक‘ोसॉप्ट कंपनीचे संचालक सुर्या वंका(यूजर एक्सपिरीयन्स, अमेरिका) यांनी येथे केले.
डीएसके इंटरनॅशनल स्कूल ऑङ्ग डिझाइन (आयएसडी)चा पदवीप्रदान सोहळा डीएसके सुपइन्ङ्गोकॉमच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मायक‘ोसॉप्ट कंपनीचे संचालक सुर्या वंका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डीएसके समूहाचे अध्यक्ष डी एस कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी डीएसके कॅम्पसचे मु‘य कार्यकारी अधिकारी निनाद पानसे उपस्थित होते.
डी एसके इंटरनॅशनल स्कूल ऑङ्ग डिझाइनची पदवी प्रदान केलेली ही चौथी बॅच होती. प्रोडक्ट, डीजिटल, आणि ट्रान्सर्पोटेशन या तीन शाखांमधील एकूण ३४ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यात प्रोडक्ट या शाखेमध्ये एकूण १५, डीजिटल मध्ये १० आणि ट्रान्सर्पोटेशन शाखेचे ८ अशा एकूण ३४ विद्यार्थ्यांंचा समावेश होता. यावेळी पदवी प्राप्त केलेल्या विद्याथ्यार्ंंनी तयार केलेले विविध नावीण्यपूर्ण डिझाइनचे सादरीकरण करण्यात आले. अभ्यासक‘माच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना विद्यार्थ्यांनाही यावेळी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सायरिल रौङ्गीतला, साईनाथ अजवायन, नयनी क्षीरसागर यांना अनुक‘मे प्रोडक्ट, ट्रान्सर्पोटेशन आणि डीजिटल या शाखेमध्ये बेेस्ट डिझाईनचा ऍवार्ड देण्यात आला तर सिमॉन लेब्लांक याने २०१४ चा स्टूडंट ऑङ्ग द ईअरचा पुरस्कार पटकाविला. टाटा, जॉन्सन कंट्रोल्स, ऑरेंज, कोल्हार यासार‘या नामवंत कंपनीतील तज्ञ अधिकार्यांनी विद्यार्थ्यांचे परिक्षण केले.
यावेळी श्री. डी एस कुलकर्णी म्हणाले, डीएसके इंटरनॅशनल स्कूल ऑङ्ग डिझाइनची अल्पावधीतच झालेली यशस्वी वाटचाल पाहून समाधान वाटत आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, एवढे मोठे व्हा की, तुमचे यश पाहताना माझी मान अभिमानाने उंचावेल. यावेळी गणेशवंदना, दीपप्रज्वलन आणि यांच्या साथीने हा समारंभ पारंपारिक पद्धतीने पार पडला. विविध शहरातून, राज्यातून नव्हे तर देशातून येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक व शिक्षकही मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
भीमराव सातपुते यांचे निधन
पुणे मनपाचे सेवानिवृत्त कामगार भीमराव हिरामण सातपुते वय ८२ वर्षे यांचे ८ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी २ मुले १ मुलगी सूना, नातवंडे व जावई आहे.
८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावरती वैकुंठ येथे अंत्यसंकार करण्यात आले त्यावेळी त्यांचे कुटूंब तसेच सामजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

‘मिस्टर अन्ड मिसेस’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या नाटकांना सर्वोत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार प्रदान
पुणे- सलाम पुणे च्या वतीने ‘मिस्टर अन्ड मिसेस’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या दोन नाटकांना यावेळी सर्वोत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले तर पुण्यातील प्रसिध्द गायक चन्द्रशेखर महामुनी आणि जळगावचे ज्यु. अमिताभ बच्चन – शशिकांत पेडवाल यांना आणि पुण्यातील एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांना ‘सलाम ‘ पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी एस एम जोशी सभागृहात चक्क ‘बिग बी ‘ अवतरले आणि सभागृहात एकच एकच कल्ला उडाला , या बिग बी ने मोठ्ठी धमाल रसिकांसमवेत उडविली … नाटक – सिनेमा यासह नृत्य , संगीत एकपात्री अशा सर्व कला क्षेत्रातील जाणकारांना , वैशिष्ट्यपूर्ण कलाकारांना , ज्येष्ठ रंगकर्मींना सन्मानित करून , त्यांच्या आणि नवोदितांच्याही कलाविष्काराचे कार्यक्रम सातत्याने सादर करून ‘सलाम पुणे’ या संस्थेने महारष्ट्रातील कला व संस्कृती जोमाने पुढे नेण्याच्या चळवळीला लक्षणीय गती दिली आहे त्यामुळे या संस्थेलाच आम्ही सलाम करतो अशी भावना येथे काल मराठी रंगभूमी दिन सोहळ्यात या बिग बी ने म्हणजे ज्युनिअर अमिताभ बच्चन अर्थात शशिकांत पेडवाल यांनी व्यक्त केली .
आनंद इंगळे , विद्याधर जोशी चिन्मय मांडलेकर , मधुरा साटम , अभिजित साटम , अजित भुरे , प्रियदर्शन जाधव , तसेच अनिरुद्ध जोशी, अजित भुरे .ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार निर्माता निलेश नवलाखा , अभिनेत्री डिम्पल चोपडे , मयुर लोणकर , दिग्दर्शक शिव कदम . दीपक सवाखंडे , वैभव पगारे , अभिनेत्री पूजा पुरंदरे . अभिषेक लोणकर , उषा शेट्टी , अनिल सोनपाटकी, संगीतकार हर्षित अभिराज,आदी रामचंद्र , निखिल महामुनी , भाग्यश्री पेंध्ये , सोनिया बर्वे ‘प्रेमाचे साईड इफेक्ट ‘ चे निर्माते विलास मेहेर , दिग्दर्शक कौस्तुभ कुलकर्णी ,आदी कलावंत तसेच वरिष्ठ पत्रकार अरुण लोणकर उपस्थित होते .
चंद्रशेखर महामुनी यांनी आपल्या खास अदाकरीत देव आनंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली तर भाग्यश्री पेंध्ये आणि अनुप कुलथे यांनी तबला आणि व्हायोलीन ची जुगलबंदी सादर केली ज्यु. बिग बी ने तर कार्यक्रमात धमाल उडविली . त्यांनी हॉट सीटवर केलेली प्रश्नोत्तरे आणि अमिताभ यांचे विविध चित्रपटात सादर केले संवाद , गाणी यामुळे रसिकांनी अक्षरशः प्रेक्षागृह डोक्यावर घेतले .रेखा -जया बच्चन पासून ते अभिषेक -ऐश्वर्या पर्यंतच्या बहारदार गप्पा त्यांनी येथे रसिकांशी केल्या . चिन्मय मांडलेकर ,आनंद इंगळे यांनी आपल्या मनोगतातून ‘ सलाम पुणे ‘ने सांस्कृतिक क्षेत्रात सर्वाधिक कार्यक्रम करून मराठी कलावंत आणि कलेला उत्तुंग प्रोत्साहन देणारे व्यासपीठ निर्माण करून दिल्याचे सांगितले सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन आणि संयोजन केले , मकरंद माळवे यांनी सूत्रसंचालन केले .
अनियंत्रित विकासाचा भस्मासुर रोखा : ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे :
नऱ्हे -आंबेगाव येथे पाच मजली इमारत कोसळल्याने पुण्यातील विकासाच्या भस्मासुराशी निगडीत अनेक प्रश्न समोर आलेले असल्याने नूतन मुख्यमंत्री यांनी हा अनियंत्रित भस्मासुर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थे तर्फे करण्यात आली आहे .
अतिक्रमण काढणारी यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे येणे आवश्यक आहे असे हि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत म्हणले आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थेचे सचिव ललित राठी यांनी या मागणीबाबत माहिती दिली .
नव्याने बांधलेली, एक मजला अनधिकृत असलेली आणी कम्प्लिशन सर्टिफिकेट नसलेली पाच मजली इमारत कोसळल्यामुळे पुण्यातील वैध -अवैध बांधकामांचा वेग , त्यांना परवानग्या देणाऱ्यांची जबाबदारी ,इमारतींचे परीक्षण -गुणवत्ता नियंत्रण आणी अनियंत्रित विकासाचा भस्मासुरा संबंधी अनेक प्रश्न समोर आले आहेत
यापूर्वीही तळजाई पठार येथे अनधिकृत इमारत कोसळण्याची घटना घडलेली आहे . टेकड्यांवरील अतिक्रमण वाढत आहे . नव्याने समाविष्ट गावांमध्ये अतिक्रमण वाढत आहे . दुसरीकडे विकास आराखड्याशी संबंधित गोष्टी प्रलंबित आहेत.
जिल्हा प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः ची यंत्रणा नाही ती मिळविण्यासाठी ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ ने मागील सरकार कडेही प्रयत्न केले होते . ती गरज पूर्ण करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जाणार आहे .
“पतियाळा’च्या महाराजांप्रमाणे पुण्याचे महापौर महागडी कार कचरा निर्मुलनासाठी वापरणार का ? राष्ट्रीय समाज पक्षाचा सवाल
पुणे :
स्वातंत्र्यपूर्व काळात 1930 मध्ये पतियाळाचे राजे भूपिंदर सिंह यांनी महागडी “रोल्स रॉईस’ कार कचरा वाहतुकीसाठी ठेवली होती, त्याप्रमाणे घन कचरा वाहतुकीच्यासाठी राखीव निधीतून महागडी कार स्वतःसाठी घेण्याचा निर्धार करणारे पुण्याचे महापौर त्या गाडीचा कचरा निर्मुलनासाठी थोडा तरी उपयोग करतील का? असा सवाल “राष्ट्रीय समाज पक्षा’ने विचारला आहे. पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर यांनी पत्रकाद्वारे हा उपरोधिक प्रश्न विचारला आहे.
पुण्याचा कचरा निर्मूलनाचा प्रश्न गंभीर आहे. उरळीचे डम्पिंग बंद होण्याच्या मार्गावर असताना नवी जागा डम्पिंगसाठी उपलब्ध होत नाही. अशावेळी कचरा शहरात वर्गीकृत करून त्यावर प्रक्रिया करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी कचरा वर्गीकरण, जन जागृती, प्रक्रिया या मार्गाचा आग्रह पालिकेने सर्व प्रभागात धरायला हवा होता. त्याऐवजी निधीची वर्गीकरणाद्वारे पळवा पळवी करून महागड्या कार खरेदी करण्याचा अवलंब महापौर आणि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस करीत आहे. हे अत्यंत अनुचित आहे.
महागडी कार स्वताच्या पैशातून घेवून पालिकेला भेट देण्याची क्षमता असलेले नेते जनतेच्या पैशाची उधळ पट्टी का करतात? असा प्रश्नही राष्ट्रीय समाज पक्षाने विचारला आहे.
पतियाळाचे राजे भूपिंदर सिंह महाराजांनी ज्याप्रमाणे देशाचा आत्म सन्मान राखण्यासाठी महागडी “रोल्स रॉईस’ कार कचरा वाहतुकीसाठी ठेवली त्याप्रमाणे कचरा वर्गीकरणासाठी पुणेकर नागरिकांच्या कर रुपी निधीचा सन्मान राखण्यासाठी महापौर महागडी कार कचरा वाहतूक, कचरा निर्मुलनासंबंधी जनजागृती यासाठी वापरून आदर्श निर्माण करणार का? असा उपरोधिक सवाल या पत्रकात करण्यात आला आहे.
“महापौरांनी आपला हट्ट सोडून द्यावा किंवा किमान आठवड्यातील एक दिवस हि गाडी कचरा विषयक जनजागृतीसाठी वापरून निधीचा योग्य कारणासाठी उपयोग करून पापक्षालन करावे. कचरा वेचकांना आठवड्यातून एकदा कामाच्या ठिकाणावरून घरी सोडावे’ असा सल्लाही या पत्रकात देण्यात आला आहे.
पारधी समाज विकास संघटनेच्यावतीने नायडू रूग्णालयामधील रुग्णांना फळेवाटप
शहरात वाढत जात असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या आरोग्यासाठी पारधी समाज विकास संघटनेच्यावतीने नायडू रूग्णालयामधील रुग्णांना फळेवाटप करण्यात आली . पारधी समाज विकास संघटनेचे नेते यशवंत नडगम , संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार , उपाध्यक्ष सुरेश चॉकलेट पवार , कार्याधक्ष भाऊसाहेब पवार , जावेद शिंदे , चेतन शिंदे , मीटर पवार , ताई पवार , गणेश थोरात , सतीश दाभाडे , अंजू पवार , सुनील गोरे , प्रमोद दाभाडे , तानाजी वाघमारे , संग्राम थोरात , संजना पवार आदी उपस्थित होते .





