Home Blog Page 3640

तालिबान्यांचा हैदोस सुरूच – अफगाणिस्तानच्या बँकेवर हल्ला

0

वाशिंग्टन – पेशावरमधल्या शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून १३२ निरागस मुलांची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं अख्खं जग हादरलेलं असतानाच, आज बुधवारी अफगाणिस्तानातील एका बँकेला तालिबानींनी लक्ष्य केलं आहे. आत्मघाती स्फोट घडवत, गोळीबार करत चार दहशतवादी बँकेत शिरले असून अफगाणच्या सुरक्षा फौजांसोबत त्यांची चकमक सुरू आहे. बँकेत अनेक नागरिक अडकले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानं सगळ्यांच्या काळजात धस्स झालंय.
दक्षिण अफगाणिस्तानच्या हेल्मांड प्रांतातील बँकेवर हा दहशतवादी हल्ला झालाय. बॉम्बचा धमाका आणि गोळीबार ऐकून बँकेतील काही कर्मचारी मागच्या दारानं बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत अनेक ग्राहक, खातेदार असताना हा हल्ला झालाय. अनेक सरकारी कर्मचारी पगार घेण्यासाठी बँकेत आले आहेत. त्यांची नेमकी संख्या कळू शकलेली नसली, तरी नागरिकांचा जीव धोक्यात असल्यानं प्रशासनानं युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे.
चार तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी एकानं आत्मघाती स्फोट घडवला, तर तिघेजण बँकेत शिरून अंदाधुंद गोळीबार करताहेत. अफगाणच्या सुरक्षा जवानांनी बँकेला घेराव घातला असून दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक बुधवारी दुपारपर्यंत सुरू असल्याचे वृत्त होते

दहशत वाद्यांवरील फाशीबंदी उठविली -११ तालिबान्यांचे मुडदे पाडले

0

इस्लामाबाद-तालिबान्यांनी पेशावरच्या शाळेवर भ्याड हल्ला करून १३२ निरागस मुलांचा बळी घेतल्याने पाकिस्तानचं सरकार खडबडून जागं झालं असून या घटनेला काही तास उलटायच्या आतच पाकिस्तानात असलेली ‘फाशीबंदी’ उठवण्यात आली आहे.आज पाक सैन्याने ११ तालिबान्यांचे मुडदे पाडले. पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या प्रकरणात फाशीवर असलेली बंदी उठवण्याच्या मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयावर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती पाकिस्तान सरकारचे प्रवक्ते मोहिउद्दीन वाणी यांनी आज दिली.
पेशावर हल्ल्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांविरोधात तीव्र संताप उसळला आहे. त्यामुळेच शरीफ सरकारने लोकभावना ओळखून तातडीने दहशतवादाविरोधात मोहीम तीव्र करण्यासाठी पावले उचलली आहेत. ड्रोन हल्ल्यात आज पाक सैन्याने ११ तालिबान्यांचे मुडदे पाडले. त्यानंतर नुकतीच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात दहशतवाद्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. ‘१३२ मुलांचे बळी घेणारा हा हल्ला क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारा आहे. या निष्पापांचे प्राण आम्ही वाया जाऊ देणार नाही. निरागस, निष्पाप मुलांचे चेहरे डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला दहशतवाद संपवावा लागणार आहे. पाकिस्तानी सैन्य त्यासाठी पू्र्ण सक्षम आहे. दहशतवाद्यांविरोधात आम्ही धडक कारवाईही सुरू केली आहे. लवकरच आम्ही ही किड पाकिस्तानातून उखडून फेकू. दहशतवादाचा सफाया करू’, असा विश्वास शरीफ यांनी या बैठकीत व्यक्त केला.
पेशावरचा हल्ला ही पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना आहे. या हल्ल्यात जी मुलं गतप्राण झाली त्या सर्वांना शहीद ठरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही शरीफ पुढे म्हणाले.

पाकिस्तानमधील हल्ल्याने भारत हि शोकाकुल

0

नवी दिल्ली- पाकिस्तानात सैनिकी शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराधांना आज संपूर्ण भारतभर श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन मिनिटं मौन पाळून शाळा-शाळांमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, संसदेनेही या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.
तालिबानी सैतानांनी निष्पाप मुलांचे निर्दयीपणे प्राण घेतल्याने जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध होत आहे. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 मुले आणि 9 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर चर्चा करून घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारतातील शाळांनाही दहशतवादाविरुद्ध एकता दाखवण्यासाठी दोन मिनिटांती स्तब्धता बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आव्हान मोदींनी केले आहे. त्यांच्या अपीलनंतर बुधवारी सकाळी बहुतांश शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
शरीफ यांच्याशी फोनवर चर्चा करताना मोदींनी घटनेबाबत तीव्र दुःख जाहीर केले. संकटाच्या या काळात भारत तुमच्याबरोबर उभा असल्याचे मोदी शरीफ यांना म्हणाले. नवाज शरीफ पेशावरहून इस्लामाबादला परतल्यानंतर या दोघांमध्ये ही चर्चा झाली. मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या या चर्चेबाबत मोदींनी ट्वीटद्वारे माहिती दिली.
शिक्षणाच्या मंदिरात निरागस बालकांची झालेली ही हत्या म्हणजे केवळ पाकिस्तानच्या नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या विरोधातील हल्ला असल्याचे मोदी शरीफ यांना म्हणाले. संपूर्ण जगाला या घटनेमुळे वेदना झाल्या आहेत. त्यामुळे मानवतेवर विश्वास असणा-या देशांनी ठरवून दहशतवाद संपरवायला हवा असेहील मोदी म्हणाले. दोन्ही देशांतील मुलांना दहशतवादाच्या अंधकारापासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचेही ते शरीफ यांना म्हणाले.

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘लोकमान्य -एक युगपुरूष ’ चा संगीत प्रकाशन सोहळा

0

1

2

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”अशी सिंहगर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे नेते, भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक अशा एक ना अनेक बिरूदावली ज्यांना सन्मानाने आणि आदराने बहाल करण्यात आल्या ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. कोकणात जन्मलेले बाळ गंगाधर टिळक वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आले. या शहराला आपली कर्मभूमी करत त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि कार्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली आणि ब्रिटीशांविरूद्धच्या लढ्याला प्रखर बनवत त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडलं. ख-या अर्थाने जनसामान्यांचा जहाल नेता असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित “लोकमान्य – एक युगपुरूष”हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. चित्रपटाची खास झलक, त्यातील प्रेरणादायक गाणी आणि पोवाड्यांच्या सुरावटीने भारावून गेलेल्या वातावरणात सुप्रसिद्ध निर्माते-अभिनते-दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर आणि लोकप्रिय गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे संगीतकार अजित-समिर, दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेते सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, निर्मात्या नीना राऊत, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, गायक, गीतकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आपल्या प्रखर वाणीने आणि कर्तृत्वाने क्रांतीचं स्वरूप देणा-या लोकमान्यांच्या आयुष्यावरचा हा पहिलाच चित्रपट. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यात लोकमान्यांची मुख्य भूमिका साकारत आहेत. याप्रसंगी या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले की, “लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर जिथे जिथे आपण उभे असू तिथून देशप्रेमाचीच स्पंदने आपल्याला जाणवतात आणि ती जाणवलीच पाहिजेत. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या महान युगपुरूषाची भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले हे मी त्यांचेच आशीर्वाद मानतो.” चित्रपटात सुबोध भावेंचा लुक हा लोकमान्यांशी हुबेहुब मिळतोय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक रसिक प्रेक्षकांकडून मिळत आहे. याबद्दल सुबोधला विचारले असता ते म्हणाले की,“एखाद्या दगडाला शेंदूर लावल्यानंतर त्याला देवपण लाभतं. त्या शेंदुरामागे लोकांची श्रद्धा आणि विश्वास असतो. मी स्वतःला असाच एक दगड मानतो ज्याला अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने शेंदूर लावण्याचं काम रंगभूषाकार विक्रम गायकवाड , दिग्दर्शक ओम राऊत आणि संपूर्ण टीमने केलंय. माझ्या या भूमिकेचं, लोकमान्यांसारखं दिसण्याचं श्रेय त्यांचंच आहे. त्यांच्यामुळेच मी लोकमान्य साकारू शकलो.” असंही प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं.

“लोकमान्य -एक युगपुरूष”या चित्रपटाची कथा जेवढी टिळकांच्या आयुष्याची आहे तेवढीच ती त्यांच्या विचारांची आहे. त्यांचे विचार हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. हा केवळ लोकमान्यांच्या आयुष्याचा पट नसून तो त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी विचारांचा पट आहे” असं मत निर्मात्या नीना राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

“लोकमान्यांचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे याच विचारातून हा चित्रपट बनवल्याची भावना दिग्दर्शक ओम् राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. “लोकमान्यांची वैचारिक जडण-घडण, त्यांचा राजकीय-सामाजिक जीवन प्रवास, त्यांचं शैक्षणिक धोरण, ब्रिटीशांविरूद्ध पुकारलेला स्वराज्यासाठीचा लढा, असहकार आंदोलन, चाफेकर बंधूंची शौर्यगाथा या आणि अशा किती तरी ऐतिहासिक घटनांचा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. शाळेतील पाठ्यपुस्तके आणि इतिहासातील धडे यापुरतंच लोकमान्यांचं कार्य मर्यादित न राहता त्यांचे देशभक्तीची जाज्वल्य भावना प्रेक्षकांपर्यंत विशेषतः तरूणांपर्यंत त्यांना आवडेल अशा माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोकमान्य मधून केलाय” असेही ओम् राऊत यांनी सांगितले. हाच धागा पकडत अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी “हे विचार ज्या पिढीपर्यंत पोचवायचे आहेत त्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणा-या तरुणाची भूमिका मी या चित्रपटात साकारतोय. लोकमान्यांच्या विचारांनी आणि कार्याने भारावून गेलेला आजच्या काळातील तरूण यात प्रेक्षकांना बघायला मिळेल” असं मनोगत चिन्मयने व्यक्त केलं.

“चित्रपटाच्या ट्रेलरने आणि त्यातील गाण्याने आपण खूप भारावून गेलो असून ओमने हे शिवधनुष्य पेलल्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन करेन. आपल्या पहिल्याच चित्रपटातून लोकमान्यांसारखा ‘लार्जर दॅन लाईफ’ विषय निवडण्याचं काम त्याने केलंय आणि त्यात त्याला भरभरून यश मिळेल” अशा शुभेच्छा अभिनेते सचिन पिळगावकर यांनी याप्रसंगी दिग्दर्शक ओम राऊत आणि टीमला दिल्या. तर या चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आपण लोकमान्यांशी निगडीत एका महत्त्वपूर्ण प्रोजेक्टचा भाग झालो हे मी माझं भाग्य समजतो अशी भावना गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.

या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकूर, अजित परब, गणेश चंदनशिवे, उषा बिजुर यांनी शब्दबद्ध केली आहेत तर शंकर महादेवन, नारायण परशुराम आणि नंदेश उमप यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. सुबोधला रंगभूषेतून लोकमान्यांच्या रुपात उतरवण्याचं काम प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी केलं आहे तर वेशभूषा महेश शेरला यांची आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे तर संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांचे आहे. चित्रपटाची कथा-पटकथा ओम् राऊत आणि कौस्तुभ सावरकर यांची आहे.

यावर्षी ‘टाइमपास’,‘फॅंड्री, ‘लय भारी, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत

नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0

मातंग एकता आंदोलनच्यावतीने नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला . वाढदिवसानिमित बचतगटाच्या माध्यमातून काशेवाडी भागातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले . सकाळी भवानी पेठ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडीअममधील जॊगिंग ट्रेकवरील नागरिकांनी स्नेह भेट घेऊन अविनाश बागवे यांना वाढदिवसाच्या शुभेछा दिल्या . त्यानंतर काशेवाडी मधील जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी दुचाकी आणि चारचाकी मोफत ऑनलाइन चालक परवाना देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक अविनाश बागवे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , अरुण गायकवाड , दयानंद अडागळे , संजय साठे , गणेश शेंडगे , सुनील घाडगे , जयदीप शेलार , सुरेश अवचिते , सुरेखा खंडागळे , फरझाना खान , दशरथ यादव , विनोद सोळंकी , सुनील परदेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सर्वत्र खोदाई…ना फलक-ना रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन… (संदीप खर्डेकर यांचे महापालिका आयुक्तांना पत्र )

0

प्रती,
मा.कुणालकुमार,
आयुक्त.पुणे मनपा.
विषय-कोथरुड मधील खोदाईचे काही प्रातिनिधिक फोटो पाठवत आहे.
1) कर्वे नगर चौक.
2) काकडे सिटी समोर.
3) होटेल निसर्ग समोरची गल्ली.
4) संगम प्रेस ते करिष्मा चौक रस्ता.
5) रेल्वे म्युझियम समोरची गल्ली.
6) शामाप्रसाद मुखर्जी उद्यान,पटवर्धन बाग.
महोदय,यापुढे जेथे खोदाई होइल तेथे कामाचे फलक असतील असे मनपा ने जाहीर केले होते.तसेच खोदाई झालेले रस्ते त्वरित पूर्ववत डांबरीकरण केले जातील असा ही नागरिकांचा समज होता.मात्र ना फलक ना जेथे काम पूर्ण झाले आहे तेथे रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन.पुनहा एकदा मनपा चा ढिसाळ कारभार अधोरेखित झाला आहे.खोदाई करणारया विविध कंपन्यांकडुन 6500 रुपये प्रती मीटर येवढी रक्कम स्वीकारल्यानंतर तर मनपा ने लगोलग रस्ते पुनर्डांबरीकरण करणे आवश्यकच आहे.मात्र याबाबत काहीच कार्यवाही दिसुन येत नाही.आता तर एका मोठया मोबाईल कंपनीने सुमारे दीडशे कोटी भरुन खोदाईची परवानगी मागितली आहे.यास साधारण तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याचे ही समजते.मग मनपा ने खोदाई केलेले रस्ते पूर्ववत करण्याचे ही नियोजन/ठेकेदार निश्चिती/टेंडर प्रक्रिया केली असेलच ?? क्रुपया त्याचा तपशील जाहीर करावा व हे खोदलेले रस्ते पूर्ववत कधी होतील याचा ही खुलासा करावा अशी आग्रही मागणी करत आहे.श्री.विवेक खरवडकर यांनी यासंदर्भात घोषणा केली होती व त्यास वृत्तपत्रात ही प्रसिद्धी मिळाली,
मात्र मनपा च्या बहुतांश घोषणा हवेत्च विरतात,आरंभशूर अशीच आता मनपा ची ख्याती आहे.
(याविषयी येत्या दोन दिवसात आपणास एक खुले पत्र पाठवेन) तोपर्यंत वरील मुद्द्यांचा खुलासा करावा ही विनंती.

आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,क्रीएटिव्ह फौंडेशन.
मो-9850999995
9823052596
2

3

4

5

“पै आय.टी.ऑलिम्पियाड’मध्ये 8 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

0

पुणे :

“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “पै इंटरनॅशनल लर्निंग रिसोर्सेस सेंटर’तर्फे चौथ्या “पै आय टी ऑलिंपियाड’चे आयोजन करण्यात आले होते. हे ऑलिंपियाड शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी आझम कॅम्पस मध्ये घेण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या माहिती तंत्रज्ञान विषयक ऑलिंपियाडमध्ये 8 हजार विद्यार्थी देशभरातून सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने हे ऑलिम्पियाड घेण्यात आले.
शालेय आणि कनिष्ट महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑलिम्पियाड मध्ये अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या आयेशा शेख या र्उीली -कनिष्ठ गटामध्ये तर रेवती श्रीनिवासन (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे) या ङळेपी- वरिष्ठ गटामध्ये विजेते ठरले.

पारितोषिक वितरण “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, रूपेश शहा (आयआयटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई), मुनव्वर पीरभॉय (संस्थापक, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट), रोबोमाइंड’चे संस्थापक क्रिस बास्तियापिल्ले, प्रा.इरफार शेख, ऑलिम्पियाडचे संयोजक आणि “पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’चे प्राचार्य ऋषी आचार्य, स्वतंत्र जैन आदी उपस्थित होते.

विजेत्यांना लॅपटॉप, ऍपल आयपॅड, ऍंड्रॉईड टॅबलेट, मोबाईल अशी पारितोषिके देण्यात आली. इरफान शेख यांनी आभार मानले.

सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी अधिक निधीची तरतूद हवी : खासदार सुप्रिया सुळे

0

नवी दिल्ली, दि.१६- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शून्यकाल प्रहरात सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी अधिकचा निधी केंद्राने उपलब्ध करून द्यावा असा मुद्दा उपस्थित केला.
केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेली सांसद आदर्श ग्राम योजना ही अतिशय चांगली आणि ग्रामविकासाला चालना देणारी आहे. केंद्राने यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे. तो वाढवून दिला तर ही योजना अधिक चांगल्या रीतीने राबविता येईल. ही संकल्पना अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलल्यास ही योजना यशस्वी होण्यास अधिकच मदत होणार आहे. अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. आज प्रत्येक गाव आदर्श ग्राम योजनेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, दरवर्षी या योजनेचा आढावा घेत असतांना या गोष्टी केंद्राने विचारात घ्याव्यात असेही त्या म्हणाल्या.

भारतीय दिवानगी … ? ‘ लिंगा ‘ चित्रपटाच्या पोस्टर ची पूजा अर्चा -तिकीटांसाठी हाणामारी – ५ दिवस आगाऊबुकिंग फुल्ल

0

चेन्नई – रजनिकांत अभिनीत ‘लिंगा’ काल (१२डिसेंबर) रिलीज झाला आहे. परंतु चेन्नईमध्ये त्यांच्या चाहत्यांनी फस्ट शोसाठी गुरुवारी रात्रीच थिएटरबाहेर गर्दी केली.अनेक ठिकाणी प्रेक्षकांनीच या चित्रपटाच्या पोस्टरची पूजा केली नारळ फोडले , उदबत्त्या लावल्या . बातम्यांनुसार, चेन्नईच्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनमध्ये अॅडवान्स बुकिंग येत्या पाच दिवसांसाठी फुल हाऊसफुल आहे. अशीच परिस्थिती तामिळनाडूमधील इतर शहरांमध्येसुध्दा आहे.
तामिळनाडूमध्ये सिनेमागृह चालक , सिनेमा कंपनी यांच्याव्य्तारिक्त प्रेक्षकांनी स्वंयस्फुर्तीने रजनिकांत यांचे पोस्टर्स लावलेले होते यावरूनच रजनिकांत यांच्या चाहत्यांच्या दिवानगीचा अंदाजा लावला जाऊ शकतो. या पोस्टर्सच्या माध्यमातून चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लाखो प्रेक्षकांनी त्यांचा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अनेक ठिकाणी चाहत्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक ठिकाणी प्रेक्षक तिकीट न मिळल्याने नाराज होऊन परतले तर काहींनी तोडफोड केली.

हलकी फुलकी मजेदार कॉमेडी ‘प्रेमासाठी कमिंग सून ‘

0

Premasathi-Coming-Suun-Marathi-Movie
सिनेमाच्या नायकावरच का सारे अवलंबून असावे ? असा प्रश्न मनात ठेवून जाणारा आणि सहायक अभिनेते , खलनायक , नायिका , छोटे छोटे रोल करणारे पात्र एखादा सिनेमा किती रंजक करू शकतात हे पहायचे असेल तर हा सिनेमा नक्की पाहायला हवा . मराठी परंपरेतील एक हलकी फुलकी मजेदार कॉमेडी म्हणून ‘प्रेमासाठी कमिंग सून ‘ या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करता येईल .
अदित्य (अदिनाथ कोठारे) हा एक होतकरू तरूण.. अदित्यच्या आजीने (सुहास जोशी) त्याच्यासाठी अंतराचे (नेहा पेंडसे) स्थळ आणले आहे. अंतराचा सांभाळ तिचे मामा (विजय पाटकर) व मामीने (रेशम टिपणीस) केलेला असतो. अदित्य व अंतराचा विवाह पार पडतो. लग्नाच्या पहिल्या सकाळीच अंतरा सोन्याचे दागिने घेऊन अदित्यच्या घरातून गायब होते. अदित्य शेवटी पोलिसांत जातो. तेथे अंतरा फसवेगिरीत अट्टल असल्याचे त्याच्या लक्षात येते. मग अदित्य याचा छडा लावण्याचे व अंतराला प्रेमाने जिंकण्याचे ठरवतो. दरम्यान अंतराने संग्राम कोलते पाटलांचे (जितेंद्र जोशी) स्थळ गाठलेले असते. अदित्य तेथे पोहोचतो. मग अंतराचे मनपरिवर्तन करून तिला प्रेमाने जिंकतो. आणि शेवट गोड होतो अशा आशयाची सर्वसाधारण कथा आहे . पण प्रेम म्हणजे काय असते – ते आजी नातवाच्या नात्यावरून स्पष्ट करणारी हि हि गोष्ट आहे असे मानता येईल . आपल्या मुलीचा सासरी हुंड्यावरून झालेला छळवाद आणि जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न यावरून एखाद्या मातापित्यांच्या जीवनाची शैली समाजावरच कशाप्रकारचा बदला घेण्याच्या मनस्थितीत पोहोचू शकते हे सांगणारी हि कथा आहे या दृष्टीकोनातूनही याकडे बघता येईल .
चित्रपटाच्या पूर्वार्धात रसिकांना खिळवून ठेवण्याचा सर्व भार सहायक अभिनेता असलेल्या विजय पाटकर यांनी समर्थपणे पेलला आहे एक विनोदी सहायक अभिनेता हा मुख्य नायक नायिका असतानाही अशा प्रकारचे कौशल्य दाखवू शकतो हे कथा आणि दिग्दर्शन यांचे महत्वाचे अंग मानावे लागेल . चित्रपटाच्या मध्यंतरानंतर जवळ पास खलनायक असलेला जितू जोशी भाव खावून गेला आहे . आदिनाथ कोठारे नायक आहे त्याने त्याचे काम ठीक केले आहे . नेहा पेंडसेने छान अभिनय केला आहे , रेशम टिपणीस चे वेगळे वळण भावणारे आहे . तिच्या मुलाची भूमिका केलेला तरुण तसेच नेहाच्या जाळ्यात अडकलेल्या कोकणातील तरुण वासू (नितीन जाधव ) , पुण्यातला तरुण केशव फडके (चिन्मय कुलकर्णी ) ,ओउरंगाबादचा तरुण जॉन धागे (योगेश शिरसाठ ) या कलावंतांनी हि सिनेमात चांगला रंग भरला आहे . . सिनेमोटोग्राफी तसेच संगीत विषयात म्हणजे एकूण गाण्यात आणि नृत्यामध्ये मात्र विशेष प्रभाव दिसत नाही पण मराठी रसिकांना विना टेन्शन मजेदार हलकी फुलकी अशी हि कॉमेडी नक्कीच एकदा तरी पाहायला आवडेल अशी आहे . अनुपकुमार पोतदार , संजय सांकला ,अमन विधाते मुलचंद देढीया असे चार निर्माते असून अंकुर काकतकर दिग्दर्शक आहेत
coming-suun-640x300

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजितदादा -भुजबळ -तटकरे यांची चौकशी करणार

0

नागपूर- राष्ट्रवादीचे बडे तीन नेते असलेले अजित पवार, सुनील तटकरे यांची जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी तर छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी चौकशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परवानगी दिली.

लाचलुचपत विभागाने या तिघांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित फाईल्सच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागितली होती. अखेर फडणवीस यांनी आज ती परवानगी देऊन टाकली आहे. दरम्यान, या त्रिकुटाच्या चौकशीला परवानगी दिली असली तरी त्यांची चौकशी कधी व कशी होणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरकारने आम्हा सर्वांची खुशाल चौकशी करावी. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही चौकशीला सामोरे जावू असे म्हटले आहे.

भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रचार करून दमदार यश मिळविले. विधानसभेतही भाजप सत्तेवर आला. मात्र, भाजपकडे बहुमत नसल्याने भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता. त्यामुळे भाजपवर राज्यभरातून सडकून टीका झाली होती. ज्या लोकांच्या विरोधात आरोप करून तुम्ही सत्तेत आला त्यांचाच पाठिंबा घेऊन भ्रष्टाचारुमुक्त सरकार कसे चालवणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे प्रथम शिवसेनेला सत्तेत सामील करून घेण्यास नकार देणा-या भाजपने जनतेचा रोष दिसताचा महिन्याच्या आतच शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतले. शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर 8 दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांच्या चौकशीला परवानगी दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. कोर्टातही याबाबत याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे कोर्टाने या नेत्यांची चौकशीला परवानगी दिली आहे. त्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांच्या चौकशीला परवानगी दिली आहे. राज्याचा लाचलुचपत विभाग या तिघांची चौकशी करेल. मात्र, ही चौकशी कधी व कशी होणार याबाबत कोणतेही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र, सरकारने कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात या तिघांच्या चौकशीला परवानगी दिल्याचे म्हटले आहे.

नथुराम गोडसेला देशभक्त ठरविण्याचा भाजपचा डाव ?

0

scan00041
नवी दिल्ली
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची पुण्यतिथी महाराष्ट्रात शौर्यदिवस म्हणून साजरा करण्यात आल्याची घटना गुरुवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी निदर्शनास आणून दिली. या कार्यक्रमात दोन आमदार सहभागी झाल्याचाही त्यांनी दावा केला.
या प्रकरणाकडे लक्ष वेधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही लिहिले होते. गांधींचा खून करणाऱ्यांचा शौर्य दिवस साजरा करणे ही देशाची परंपरा नाही. यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप दलवाई यांनी केला. या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ उडाला. आक्रमक झालेले काँग्रेस अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी, सरकार गांधींच्या मारेकऱ्याचे समर्थन करीत नसल्याचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले.
गोंधळ संपत नसल्याचे पाहून उपसभापती कुरियन यांना दोनवेळा कामकाज तहकूब करावे लागले. संसद भवनाबाहेर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ असल्याचे प्रशस्तीपत्र दिल्यामुळे नवा वादंग निर्माण झाला. गोडसे एक देशभक्त होता, गांधीजींनीही देशासाठी अनेक चांगली कामे केली, असे साक्षी महाराज संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मात्र, हा वाद पेटताच साक्षी महाराज यांनी कोलांटउडी मारली. आपण कधीही गोडसेला देशभक्त म्हटले नाही, असा दावा नंतर त्यांनी केला.

‘उषःकाल होता होता …’ ( (विजय कुंभार )

0

Shaniwarwada-Pune
पुण्याची मेट्रो ( काल्पनिक)
जमिनीवरुन धावणार की
भुयारातून जाणार …?
या विनोदी बातमीवर
आधारित
एक विडंबन …!
( उषःकाल होता होता
वर आधारित )
(~ कवी अज्ञात)
——————–
आकाशस्थ होता होता
भुमिगत झाली
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली||धृ||

आम्ही आता मेट्रोचीही
आस का धरावी,
जे कधीच नव्हते
त्याची वाट का पहावी.
कशी पीएमटीने जनता
गुदमरुन गेली,
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली.||धृ||

गल्लीबोळातुनी धावे आता
ही बीआरटी,
आम्हावरी अपघातांची
उडे धुळमाती;
आम्ही ते पुणेकर ज्यांना
एकही न वाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||

उभे पुणे झाले आता
एक बंदिशाला,
इथे पर्वतीचा वारा
धुराने जळाला.
कसे पुणे दुर्दैवी अन्
नागपुर भाग्यशाली;
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||

धुमसतात अजुनी इथल्या
वडाफचे निखारे,
अजुन भाडे मागत सुटती
रिक्षावाले सारे;
गाजरेच मेट्रोची ही
आम्हाला मिळाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली ..! ||धृ||

‘कॅशलेस’ की ‘युजलेस’?

0

( लेखक – राजेंद्र पाटील, पुणे – मो- ९८२२७५३२१९ )

वैद्यकीय विम्याची सुविधा देणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स, ओरिएन्टल इंडिया इन्शुरन्स, न्यू इंडिया आणि

युनायटेड इंडिया या चार प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुणे शहरातील ७५ रुग्णालयांमधील

वैयक्तिक वैद्यकीय विम्याची ‘कॅशलेस’ सुविधा १ डिसेंबर पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालयांनी त्यांचे ‘कॅशलेस’ सुविधा पुराविण्यासाठीचे दर कमी करावेत असे या कंपन्यांचे म्हणणे आहे तर

शहरातील हॉस्पिटल त्यांनी सुचविलेले दर मान्य करण्यास तयार नसल्याने अनेक दिवसांपासून सुरु

असलेल्या वादाची परिणीती ‘कॅशलेस’ सुविधा बंद होण्यात झाली आहे. यामध्ये सामान्य नागरिकांची मात्र

फरफट होत असून कुठलीही पूर्वसूचना न देता ही सुविधा बंद केल्याने आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया पैसे

नसल्याने पुढे ढकलण्याची वेळ रुग्णावर आली आहे. वैद्यकीय विम्याचे हप्ते भरणाऱ्या विमाधारकाला

अशा सुविधांपासून वंचित ठेवण्याचा अधिकार ना विमा कंपन्यांना आहे ना रुग्णालयांना. त्यामुळे दोघांनी

एकत्रित बसून लवकरात लवकर मध्यमार्ग काढून कॅशलेस’चा गोंधळ संपवावा अशीच सामान्य

विमाधारकांची अपेक्षा आहे व ती वावगी नाही.

वैद्यकीय विम्याची सुविधा देणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स, ओरिएन्टल इंडिया इन्शुरन्स, न्यू इंडिया आणि

युनायटेड इंडिया या चार प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी एकत्र येवून ‘जिप्सा’ कंपनी स्थापन केली

आहे. त्या कंपनीमार्फत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ‘पीपीएन’ (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) योजनेंतर्गत

कमी दरात ‘कॅशलेस’ सुविधा पुरविण्यासाठी प्रत्येक आजारानुसार ‘पॅकेज’ स्वरुपात दर निश्चित करून

त्यानुसार बिल आकारणी करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शहरातील रुग्णालयांना दिला आहे. मात्र, हे

दर रुग्णालयांना मान्य नसल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगलोर या शहरांप्रमाणे

रुग्णालयांना देण्यात येणारा दर द्यावा अशी मागणी रुग्णालयांची आहे तर मुंबई, बेंगलोर शहरांच्या

वर्गवारीत पुणे शहराची वर्गवारी करता येणार नाही या मुद्यावरून पुणे शहरासाठी विमा कंपन्यांनी प्रत्येक

आजारासाठी वेगळे ‘पॅकेज’ देऊ केले आहे.

मुळात वैद्यकीय संकल्पना यानिमित्ताने समजून घेणे आवश्यक आहे. अनेक लोकांनी एकत्र येवून

एकत्रितपै से जमा करून त्यातील एखाद्या व्यक्तीला आकस्मिकरित्या छोट्या-मोठ्या आजारपणासाठी

अथवा शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर त्याला त्याचा खर्च या जमा होणाऱ्या

रकमेतून व्हावा व आजारपणाच्या निमित्ताने त्याच्यावर येणारे आर्थिक संकट दूर व्हावे अशा प्रकारचा

सरळ सोपा अर्थ वैद्यकीय विम्याचा आहे. दरवर्षी त्यासाठी विमा कंपन्या विमा धारकांकडून वयानुसार

‘प्रीमियम’ आकारतात. त्यामाध्यमातून त्यांना विविध रुग्णालयातून ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध करून दिली

जाते. रुग्णाला अचानकपणे मोठा आजार अथवा शस्त्रक्रिया करायची झाल्यास पैसे न भरता त्याला

उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी हा खरातर वैद्यकीय विम्यामागचा हेतू आहे. मात्र, या हेतूलाच हरताळ

फासण्याचे काम विमा कंपन्या व रुग्णालयांकडून केले जात असेल तर विमाधारकांना वाली कोण असा

प्रश्न ‘कॅशलेस’ सुविधा बंद केल्याने निर्माण झाला आहे.

विमाधारक दरवर्षी ‘प्रीमियम’च्या स्वरूपात विमा कंपन्यांकडे जे पैसे भरतो तो एक ‘पब्लिक ट्रस्ट’चा पैसा

आहे. त्याच्यावर त्याचा अधिकार आहे, हे सरळ साधे सूत्र विमा कंपन्या व रुग्णालये यांनी लक्षात घायला

हवे. काही अपवाद वगळता अनेक रुग्णालयांमध्ये कशाप्रकारे रुग्णांना सेवा दिली जाते हे सर्वांनाच ज्ञात

आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण गेल्यावर अगदी रिसेप्शन पासून तर रुग्णालयात भरती झाल्यानंतर

त्याला कशी ‘ट्रीटमेंट’ दिली जाते याची चर्चा अनेकवेळा ऐकायला मिळते. विमाधारकाने वैद्यकीय विमा

काढलेला असला तरी रुग्णालयात गेल्यानंतर ‘कॅशलेस’ सुविधेची कशा पद्धतीने प्रक्रिया करायची ती

माहिती नसते. ती प्रक्रिया अथवा विमा कंपनी अथवा संबंधित कंपनीच्या ‘टीपीए’ (थर्ड पार्टी

अॅडमिनीस्ट्रेटर) कडे पाठपुरावा करून लवकरात लवकर ‘अप्रूव्हल’ येण्यासाठी तसेच डिस्चार्ज घेतल्यानंतर

अंतिम बिलाची उर्वरित रक्कम संबंधित कंपनीकडून येण्यासाठी पाठपुरावा हा खरेतर रुगालायाच्या

व्यवस्थापनाकडून केला गेला पाहिजे. अनेक वेळा काही अपवाद वगळता अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या

नातेवाईकांना हा पाठपुरावा कराव लागतो. रुग्णाला सोडून हा पाठपुरावा करणे सर्वांनाच शक्य नसते.

अशावेळी डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक तास रुग्णाला ताटकळत बसावे लागते. अथवा त्याने बिलाचे पैसे

भरून नंतर कंपनीकडे क्लेम करावा असे सांगितले जाते. याशिवाय अनेक रुग्णालयांमध्ये चांगला प्रशिक्षित

स्टाफची वानवा असते. त्याला कारण कमी वेतनामध्ये स्टाफ घेतला जातो.रुग्ण आणि रुग्णाच्या

नातेवाईकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा, रुग्णाबरोबर व त्याच्या नातेवाईकांबरोबर उद्धटपने

वागणे, कुठलीही माहिती नीटपणे न सांगणे अशा गोष्टींबरोबरच रुग्णाचा वैद्यकीय विमा आहे

म्हटल्यानंतर मनमानी दर लावणे असे प्रकार अनेकदा बघायला मिळतात. ज्यावेळी रुग्णालये त्यांना विमा

कंपन्यांनी देऊ केलेल दर नाकारतात त्यावेळी त्यांनीही मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण आपल्या

ग्राहकाला कुठल्या सुविधा देतो याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे मात्र तो होताना दिसत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे विमा कंपनीकडे असणारा पैसा हा ‘पब्लिक ट्रस्ट’चा पैसा आहे त्याच्यावर विमाधारकांचा

अधिकार आहे. विमा कंपन्या या कुठलेही उत्पादन करत नाही. जमा होणाऱ्या प्रीमियममधून त्यांना

क्लेमची रक्कम द्यावी लागते. तो कशाही प्रकारे ओरबाडून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते

ओरबाडणे थांबले तर दाव्यांचे गुणोत्तर प्रमाण ( क्लेम रेशिओ) कमी होईल व त्यामुळे आपसूकच

प्रीमियममध्ये घट होवून त्याचा फायदा विमाधारकाला होईल. रुग्णालयांचाही चांगला व्यवसाय होईल व

रुग्णालयांबाबत काही अपवाद वगळता समाजात निर्माण झालेले गढूळ वातावरण निर्मळ होण्यासाठी मदत

होईल. यासर्व गोष्टींचा विचार करून रुग्णालयांनी पुढे येवून काहीतरी मध्यमार्ग काढण्याची आवश्यकता

जशी रुग्णालयांची जबाबदारी आहे तशीच विमा कंपन्यांचीही जबादारी आहे हे त्यांनी विसरता काम नये.

विमा धारकांनी विश्वासाने विमा कंपन्यांकडे प्रीमियमच्या माध्यमातून पैसे जमा केले आहेत. त्याबदल्यात

उत्कृष्ट सेवा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांचीही आहे. अनेक वेळा रुग्णाला अथवा त्याच्या

नातेवाईकांना कंपनीकडून अथवा टीपीएकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. वेळोवेळी होणारे बदल

ग्राहक म्हणून प्रत्येक विमाधारकाला कळणे हा त्याचा ग्राहक म्हणून हक्क आहे. मात्र त्याकडे अनेकवेळा

दुर्लक्ष केले जाते. पुणे शहरातील ‘कॅशलेस’ सुविधा १ डिसेंबर पासून बंद झाली हे विमाधारकांना

वर्तमानपत्रातून अथवा प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यानंतर समजते याचा अर्थ काय? विमाधारकाने वर्षाचा हप्ता

भरताना त्याला ‘कॅशलेस’ सुविधा देण्याचे विमा कंपन्यांनी मान्य केले आहे. अशावेळी अचानकपणे परस्पर

त्यांनी देऊ केलेले दर रुग्णालयांना मान्य होत नाही म्हणून ‘कॅशलेस’ सुविधा बंद करण्यास सांगणे

कितपत योग्य आहे. याबाबत प्रत्येक विमाधारकाला माहिती देणे हे विमा कंपन्यांचे काम आहे. किमान

विमा कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयात याबद्दलची सविस्तर माहिती विमाधारकासाठी बोर्डवर लावणे

आवश्यक आहे. कॅशलेस’ सुविधा बंद केल्याने रुग्णांची ससेहोलपट होते याला कंपन्याही जबाबदार आहेत.

रुगालायांचे करण देवून ‘कॅशलेस’ सुविधा देऊ शकत नाही असे सांगून विमा कंपन्या आपली जबाबदारी

झटकू शकत नाही. केवळ प्रिमियाम गोळा करणे एवढेच काम विमा कंपन्यांचे आहे का? असा प्रश्न

यानिमित्ताने उपस्थित होतो. विमा कंपन्यांनीही केवळ एकाच बाजूने आपला हेकेखोरपणा न करता

रुग्णालयांना देऊ केलेले दर हे ते का मान्य करत नाहीत याचा विचार करावा व रुग्णालयाला व रुग्णाला

परवडतील अशा दरांच्या निश्चितीसाठी एक पाऊल पुढे येवून चर्चा करून याबाबत लवकरात लवकर

तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

विमा कंपन्या आणि रुग्णालये या दोघांचा विमाधारक हा ग्राहक आहे, याचे भान दोघांनीही ठेवायला हवे.

तो मोजत असलेल्या पैशातून त्याला योग्य व उत्कृष्ट सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ही दोघांचीही

जबाबदारी आहे. त्याचा विचार न करता आपापल्या पद्धतीने मनमानी करणे हे योग्य नाही. आज

पुण्यामध्ये अशा प्रकारचा विमा कंपन्या व रुग्णालये यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. उद्या दुसऱ्या

शहरांमध्येही असा वाद निर्माण होऊ शकतो. दोघांनीही पुढाकार घेऊन या वादातून लवकर काहीतरी चांगला

निर्णय घ्यावा व इतरांसाठी एक मार्गदर्शक आदर्श निर्माण करावा एवढीच अपेक्षा

deshdut

डॉ. सदानंद मोरे घुमान मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष

0

पुणे

पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. ‘संत साहित्याचे अभ्यासक दि.पु. चित्रे व भा.पं. बहिरट यांना हे अध्यक्षपद अर्पण करत आहे,’ अशी भावना डॉ. मोरे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

अध्यक्षपदासाठीच्या मतपत्रिकांची मोजणी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात झाली. डॉ. मोरे यांना ४९८ मते मिळाली. भारत सासणे (४२७ मते), अशोक कामत (६५) आणि पुरुषोत्तम नागपुरे (२) हे अन्य उमेदवार रिंगणात होते. महामंडळाचे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर निकाल जाहीर केला. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, स्वागताध्यक्ष भारत देसडला, मतमोजणी सल्लागार आणि पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रमोद भडकवाडे या वेळी उपस्थित होते.

कोणत्याही वादाविना ही निवडणूक झाली याचा आनंद वाटतो. संमेलनाध्यक्षपदासाठीचे सर्व उमेदवार ताकदीचे होते. त्यांची साहित्यिक उंची मोठी आहे, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. डॉ. मोरे यांना पहिल्याच फेरीत विजय मिळाल्याचे आडकर यांनी सांगितले.