Home Blog Page 3633

कार्यकर्त्यांच्या साहित्यिक लिखाणाची समाजाला गरज : डॉ. कोतापल्ले

0

प्रा. मनोहर हिबारे यांच्या 6 पुस्तकांचे प्रकाशन

पुणे :
सरंजामशाहीच्या प्रभावाखालील मराठवाड्याला नवे भान देण्याचे काम ‘युक्रांद’ सहित अनेक सामाजिक संस्थांनी केले. या कार्यकर्त्यांनी माणसांची जिद्द, निष्ठा यांचे साहित्यिक लिखाण करण्याचे काम केल्यास ती महत्त्वपूर्ण नोंद ठरेल’ असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.

‘युक्रांद’ च्या चळवळीतील मराठवाडयातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.मनोहर हिबारे यांच्या 40 वर्षांच्या सामाजिक कामातील अनुभवानंतर तयार झालेल्या सहा पुस्तकांचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ.वासुदेव मुलाटे, अन्वर राजन यांच्या हस्ते झाले. तेव्हा डॉ. कोतापल्ले बोलत होते. बुधवारी सायंकाळी एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘शब्दांचं चांदणं’ (कवितासंग्रह), ‘निवडणूक प्रचाराचे तंत्र’, ‘फुले विचार आणि मुक्त रेखाटने’,‘सप्तरंगी मॉरिशस’, ‘नामिक अनामिकांच्या व्यक्तिरेखा’ आणि ‘दोन एकांकिका’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

डॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘प्रा मनोहर हिबारे यांच्या लिखाणात निझामशाहीच्या जोखडातून संरजामशाहीच्या जोखडातून जाग्या झालेल्या मराठवाड्याचे प्रतिबिंब पडले आहे. मराठवाड्याला नवे भान देण्याचे काम ‘युक्रांद’सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रा. हिबारे यांनी केले. माणसांची जिद्द, निष्ठा, कार्यकर्त्यांचे जीवन यांच्यावर कार्यकर्त्यांनीच लिखाण करणे साहित्यात आवश्यक आहे. हे योगदान महत्त्वपूर्ण साहित्यिक नोंद ठरेल. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जीव ओतला, त्यांची साहित्याने नोंद घेतली पाहिजे.’
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘परिवर्तनाची भूक असलेल्या मराठवाड्याला ‘युक्रांद’ने सामाजिक कामाची प्रयोगशाळा मानले. त्यातून प्रा. मनोहर हिबारे यांच्यासारखे कृतीशील कार्यकर्ते तयार झाले. अन्याय झाला की, जोरदार आवाज उठवणे, आणि रस्त्यावर प्रश्‍न सोडवणे ही या चळवळीची खासियत होते. पाश्‍चिमात्य समाजाप्रमाणे आपल्या समाजानेही आपापले अनुभव लिहिण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे प्रगती होईल. नवनवीन अनुभव लिहिणारा कार्यकर्ता हा उत्तम साहित्यिक होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.

लेखन, अभिव्यक्तीवर येत असलेल्या आक्रमणांची बंधनांची नोंद घेत अन्वर राजन यांनी सरकार अस्तित्वात आहे की नाही, अघोषित सेन्सॉरशीप आहे का? हाच प्रश्‍न पडतो, असे सांगितले. अंजली कुलकर्णी, धनंजय झाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भावसार, संदीप बर्वे, डॉ. उर्मिला सप्तर्षी इत्यादी उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल विनोद यांचे निधन

0
vithhal vinod
पिंपरी – ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक गगन झेपचे संपादक विठ्ठल शिवराम विनोद (वय ६१ वर्ष) यांचे चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. 
त्यांच्या मागे १ मुलगा, पत्नी असा परिवार आहे. आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता लिंकरोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात  आले 
विठ्ठल विनोद यांना काल रात्री छातीत त्रास  होत असल्याने घराजवळील चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 काल पिंपरी पालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. नागकुमार यांचे निधन तर आज ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल विनोद यांचे निधन, एक अधिकारी आणि दुसरे ज्येष्ट पत्रकार असा दोन व्यक्तीच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती अधिकारातील कार्यकर्ते अशीही विठ्ठल विनोद यांची ओळख होती. त्यांना हेरॉल्ड, कानोसा आदी वृत्तपत्रांमधून त्यांनी काम केले होते. 

कान्हेफाट्याजवळ अपघातात 3 ठार

0

1421907668

पुणे-टेम्पो आणि झायलो मोटारीची सामोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जन ठार तर पाच गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास कान्हे फाटा येथील सूर्या ढाब्यासमोर झाला. सर्व जखमींवर सोमाटणे येथील बडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत भाऊसाहेब भानुदास घोडकेसुभाष सोपान भसावेत्रिंबक खाडे (सर्व रा. पाथर्डीजि. नगर) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राजेंद्र चिमाजी भसावेकृष्णा भगवान घोडकेभाऊसाहेब रामा मुंडेगोपीनाथ निवृत्ती घोडकेपार्वती अदिनाथ भसावेअर्चना खाडे,मच्छिंद्र कारभारी घोडके आणि एक दिड वर्षांचा मुलगा (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. पार्थर्डीजि. नगर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरहून आलेली झायलो मोटार (एमएच ०४ ई एक्स १३४६) मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान टेम्पो (एमएच १४ जीजी ७०६५) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास कान्हे फाटा येथील सूर्या ढाब्यासमोर आले असता भरधाव वेगातील टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो थेट रस्ता दुभाजक ओलांडून झायलोसमोर आला. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने टेम्पो आणि झायलो मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जन ठार तर पाच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील बडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 
 

दोन गुंठे जागेत बांधकामास आता ८ दिवसात परवानगी -विकसन शुल्क नाही -दलालाची गरज नाही …

0

पुणे- तुमच्या मालकीची दोन गुंठ्यांपर्यंतची जागा आहे. त्यावर घर बांधायचे, त्यासाठी वास्तुविशारद (आर्किटेक्‍ट)ची गरज नाही, बांधकाम विकसन शुल्क भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या बांधकाम नकाशांपैकी एखादा आराखडा निश्‍चित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला, तरी बांधकाम करता येणार आहे. “टाइप प्लॅन‘ची ही योजना सरकारकडून बुधवारी राज्यात लागू करण्यात आली. पुणे, महाबळेश्‍वर, कोल्हापूर-इचलकरंजी, सांगली-मिरज, नागपूर, चंद्रपूर-बल्लारपूर, नाशिक, अहमदनगर,जळगाव-भुसावळ, औरंगाबाद-जालना, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, राजगड, मुंबई महानगर प्रदेश, अकोला-वाशीम प्रदेश.येथे हि योजना लागू राहणार आहे
महापालिकेच्या हद्दीबाहेर आणि नगररचना योजना मंजूर असलेल्या जिल्ह्यात राज्य सरकारकडून या योजनेंतर्गत बांधकाम करण्यास परवानगी देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कायद्यात (एमआरटीपी ऍक्‍ट) बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांत दोन गुंठ्यांपर्यंतच्या जागेत केवळ अर्ज केल्यानंतर बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे. नव्या बदलानुसार अर्ज केल्यानंतर आठ दिवसांत ही परवानगी देणे जिल्हाधिकाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बांधकाम परवानगीसाठी लागणारा वेळ, त्यासाठी भरावे लागणारे भरमसाट शुल्क, वास्तुविशारदाला द्यावे लागणारी शुल्क (फी), यामधून सर्वसामान्य नागरिकांची सुटका तर होणारच आहे; परंतु बेकायदा बांधकामालाही आळा बसण्यास मदत होणार आहे.
कायद्यातील या तरतुदीमुळे 300 ते 400 चौरस फुटांपासून ते दोन गुंठ्यांपर्यंत (दोन हजार चौरस फूट) बांधकामांसाठी केवळ एका अर्जावर परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी नगररचना विभागातर्फे सात विभागांत 56 प्रकाराचे बांधकाम नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जागामालकांना जागेच्या क्षेत्रफळानुसार बांधकाम आराखडा निवडण्याची सुविधाही राहणार आहे. यापैकी एक आराखड्यानुसार बांधकाम नकाशा निवडून जिल्हाधिकारी अथवा प्रांत अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करावा लागणार आहे. या बांधकाम नकाशांची प्रत आणि त्यासोबत करावयाचा अर्जाचा नुमना www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज करणेदेखील ऐच्छिक असणार आहे. मात्र राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेला बांधकाम नकाशा सोडून बांधकाम करावयाचे झाल्यास संबंधितांना प्रचलित कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यामध्ये मात्र संबंधित जमीनमालकांना कोणतीही सवलत मिळणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

1 2 3 4 5 6 7

अण्णा हजारे पुन्हा तटस्थ ? दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर जनलोकपालसाठी आंदोलन करणार।

0

राळेगणसिद्धी- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांना साथ दिली नाही ,केजरीवाल यांना बहुमत मिळाले नाही तेव्हा अण्णांनी मी केजरीवाल बरोबर त्याच्या प्रचारासाठी जायला हवे होते असे विधान केले होते , मात्र आता याखेपेलाही अण्णा निवडणुकीच्या राजकारणापासून दूरच राहत असून , आपच्या केजारीवालांना आशीर्वाद द्यायला तयार नसल्याचे दिसते आहे , अण्णांचा आशीर्वाद मिळेल अशी आशा केजरीवाल व्यक्त करत असतानाच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बेदींना फोडून आप ला मोठ्ठे आवाहन दिले आहे या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी आपली संपूर्णतः भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करण्यात येणार असून, किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाविषयी आपणास काहीही बोलायचे नाही. मी राजकारणापासून दूर असल्याचे  आहे.
जनलोकपाल आंदोलनात सहभागी झालेल्या बेदी यांनी थेट भाजपत प्रवेश केला असून, त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. याविषयी पत्रकारांनी हजारे यांना छेडले असता ते म्हणाले, की बेदी यांच्या राजकारणप्रवेशाविषयी मला काहीही भाष्य करायचे नाही. भाजपप्रवेशापूर्वी त्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, ‘सिद्धीविनायक’ हिटलिस्टवर

0

मुंबई – पाकिस्तानमधील जिहादी गटांकडून सिद्धीविनायक मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याची नेमकी शक्‍यता गुप्तचरांनी वर्तविल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशाच्या या आर्थिक राजधानीमधील बंदोबस्त प्रचंड वाढविण्यात आला असून; संपूर्ण शहरामधील सुरक्षा व्यवस्था “हाय अलर्ट‘वर ठेवण्यात आली आहे.
भारताच्या गुप्तचर विभागाने (आयबी) यासंदर्भातील नेमकी माहिती मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे , त्यांच्या वृत्तानुसार असे समजते कि , जमात-उद-दवा, लष्करे तैयबा, जैश-उल-मुहम्मद आणि हिझबुल मुजाहिदीन या पाकमधील चार दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांचे चार गट करुन, ते याआधीच भारतामध्ये पाठविले आहेत. हे दहशतवादी गट 28 जानेवारीच्या आधी देशामध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची शक्‍यता गुप्तचरांनी वर्तविली आहे. या चार गटांपैकी एक महाराष्ट्रामध्ये, एक राजस्थानमध्ये, एक उत्तर प्रदेश; तर अखेरचा गट पथक उडिशामध्ये आल्याचे गुप्तचरांनी म्हटले आहे.मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दहशतवादी सिद्धीविनायक मंदिरात हल्ला घडवून आणू शकतात.  ‘जमात-ऊल-दावा’, ‘लष्कर-ए तैयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या असून चौघांपैकी एक महाराष्ट्रात,  दुसरी राजस्थानात,  तिसरी उत्तर प्रदेशात आणि चौथी उडिशात पाठवण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये सिद्धीविनायक मंदिरास विशेषत्वाने लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता आहे. या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असलेल्या कोणत्याही मंगळवारी हा हल्ला घडविण्यात येण्याचा अंदाज गुप्तचरांनी वर्तविला आहे. मुंबईमध्ये आलेल्या दहशतवादी गटाचे नेतृत्व अब्दुल्ला अल-कुरेशी हा दहशतवादी करत असून त्यामध्ये पंचविशीच्या वयोगटां मधील

सेंट मायकल वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमवेत रमेश बागवेंचे स्नेहभोजन

0

1

पुणे-मातंग एकता आंदोलन सारसबाग पाळणाघर संघटनेच्यावतीने माजी आमदार रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित गुरुवार पेठमधील सेंट मायकल वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले माजी आमदार रमेश बागवे यांनी विद्यार्थ्यान समवेत भोजन करून आपला वाढदिवस साजरा केला . वसतिगृहाच्या आवारात हा कार्यक्रम झाला . यावेळी मातंग एकता आंदोलन पुणे शहर अध्यक्ष सुरेश अवचिते , मातंग एकता आंदोलन सारसबाग पाळणाघर संघटनेचे अध्यक्ष प्रविण लांडगे , वसतिगृहाच्या वार्डन सीमा आरोळे , विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड , नामदेव आरडे , अशोक नलावडे , आकाश आरडे , गणेश सकट , गोरख जाधव , सुखदेव लांडगे , संतोष नलावडे , राहुल मिसाळ , पंकज हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते .

    यावेळी माजी आमदार रमेश बागवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्या , त्यासाठी अभ्यास करा , मेहनत करा , संस्काराची जोपासना करा , त्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यसाठी संगणक देण्याचे आश्वासन दिले .

 यावेळी क्लेमंट लाझरस , शंकर डिंबर , सुरेखा खंडागळे , मीरा भिगे , ताराबाई आगलावे , अर्जुन रणदिवे आदी उपस्थित होते .

“पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’तर्फे “वेदा कलोत्सव 2015′ चे पुण्यात आयोजन

0
पुणे :
“पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’च्या “व्हिज्युअल ऍनिमेशन डिझाइन ऍकॅडमीतर्फे “वेदा कलोत्सव 2015′ चे आयोजन 26 ते 28 जानेवारी दरम्यान पुण्यात आझम कॅम्पस येथे करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक ऋषी आचार्य, संयोजक स्वतंत्र जैन यांनी ही माहिती दिली.
या कलोत्सव अंतर्गत आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होणार आहेत. त्यात बॅटल ऑफ बँडस्‌, लोगो डिझाइन, कॅरिकेचर कॉम्पिटिशन, क्ले मॉडेलिंग, फोटोग्राफी, फेस पेटींग, शॉर्ट फिल्म, प्रश्नमंजुषा, नृत्य-गायन स्पर्धांचा समावेश आहे. पाच लाखांची एकूण पारितोषिके दिली जाणार आहेत.
 नावनोंदणीसाठी संपर्क 8888808544 अधिक माहितीसाठी kalotsav.mcesociety.org
प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) एम.सी.ई.सोसायटीच्या “आर्ट ऍण्ड पै इंटरनॅशनल’ च्या वतीने दोन दिवसीय आर्ट आणि ऍनिमेशन प्रदर्शन सर्वांसाठी खुले होणार आहे. प्रदर्शनाची वेळ दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 आणि दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 अशी असणार आहे.

तब्बल तेरा गाण्यांनी नटलेला ‘एक तारा ‘

0

अजय अतुलच्या संगीताला टफ फाईट देणारे  संगीत आणि सुपरस्टार च्या दिशेला संतोष जुवेकरची घोडदौड जो चित्रपट सुरु करेल तो’ एक तारा ‘ नावाचा मराठी चित्रपट आता रसिकांचे खास संतोष जुवेकरची आकर्षण बनला आहे

कानांना तृप्त करणारं, मनाला भिडणारं, आत्म्याशी हितगुज करणारं संगीत.. संगीत ही अशी कला आहे ज्यात गाणारा आणि ऐकणारा दोघेही एकाचवेळी स्वर्गीय आनंदानुभव घेतात. गीत, संगीत आणि गायकी यांच्या सुरेल मिलाफाचा आविष्कार नवनव्या तऱ्हेने सादर केले जाऊ लागलेत. अविश्रांत केलेली कलेची साधना, खडतर प्रवासाची वाट, प्राप्त सिद्धीसाठी केलेली धडपड आणि आपलं अढळ स्थान टिकवताना होणारी होरपळ.. ही साधारण सर्वच क्षेत्रातील कलावंतांची हकीकत. अशाच एका ताऱ्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर येणार आहे. रईस लष्करिया निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित महत्वाकांक्षी संगीतमय चित्रपट ‘एक तारा’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

रिअलिटी शोज् मधून पुढे येणारा एक कलाकार आपल्या कलागुणांच्या होणार्या कौतुकाने कसा हरखून जातो. मिळालेली प्रसिद्धी, वैभव आणि मुळात नावलौकिकाकडे कसा पाहतो, त्याला येणारे अनुभव त्यातून स्वतःला नक्की काय मिळालं-काय गमावलं या साऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना दिसेल. प्रसिद्धी मिळवणं आणि टिकवणं यामधली मनाची घालमेल वाढवणारी तारेवरची कसरत करताना आपण खरंच काही मिळालं का.. याचा उहापोह ‘एक तारा’ करतो.

संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित, उर्मिला निंबाळकर, सागर करंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई आणि चैतन्य चंद्रात्रे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक तारा’ ची कथा लिहिली आहे अवधूत गुप्ते,सचिन दरेकर यांनी तर पटकथा-संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.  सादिक लष्करीया, विशाल घाग सहनिर्मित विशाल देवरुखकर यांचे सहदिग्दर्शन लाभलेल्या ‘एक तारा’चं छायांकन  अमलेंदूचौधरी यांचे असून शैलेश महाडिक कला दिग्दर्शक आहेत. संकलक इम्रान महाडिक, फैझल महाडिक तर वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केली आहे. ‘एक तारा’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे यातील गाण्यांची गंमतच न्यारी आहे. तब्बल १३ गाण्यांचा रसास्वाद ‘एक तारा’मधून रसिकप्रेक्षकांना घेता येणार आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी ‘एक तारा’ साठी लिहिलेली वेगवेगळ्या बाजाच्या गीतांना अवधूत गुप्तेंनी स्वरसाज चढवून न्याय दिलाय. तरुणांच्या आवडी-निवडी जपत.. बोली शब्दांची योग्य सांगड घालत, ओठी रुळणारी ‘जिंदगी हे झाड’, ‘ठोक साला’, ‘विसर तू (रॉक)’, ‘हर काश में’, ही वेड लावणारी गुरु ठाकूरची गीते तर अवधूत गुप्तेंच्या लेखणीतून ‘येड लागलं’, ‘देवा तुझ्या नावाचं येड लागलं’, ही दोन भक्तिमय गीतं खरोखरीच उत्तमरीत्या सांधली गेलीयेत. तसेच ‘वाली तू लेकरांचा’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘चालते नाणे’ आणि ‘अर्ध्या हळकुंडानं’ हे मॉडन भारुडही खासचं जमून आलंय. चित्रपटातील गाण्यांच्या बाजाप्रमाणे सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम, विदित पाटणकर, मुग्धा कऱ्हाडे आणि अवधूत गुप्ते या कसलेल्या गायकांकडून त्यांच्या सुरेल स्वरात गाऊन घेतली आहेत. तसेच अवधूत गुप्तेंच्या मैत्रीखातर दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि साउंड रेकॉर्डीस्ट अवधूत वाडकर यांनीही आपल्या आवाजाची कमाल दाखवली आहे.

 

वडिल-मुलीच्या नात्याची अनोखी कहाणी ‘असे हे कन्यादान’

0

झी मराठीची नवी कौटुंबिक मालिका

प्रत्येक वडिलासाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडिल हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट धरता येतो अशी हक्काची व्यक्ती म्हणजे वडिल हे मुलींना माहित असतं. ज्यांचं बोट धरून इवलीशी पाऊलं चालायचं शिकतात ते वडिलच असतात, पहिल्यांदा सायकल शिकतांना मागे आधार देणारा आणि आत्मविश्वास देणारा हात वडिलांचाच असतो. ज्यांच्या कुशीत झोपल्यावर सर्व भीती दूर होऊन शांत झोप लागते, ज्यांच्या खांद्यावर बसून केलेल्या सफरीत सारं जग खुजं वाटतं, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी जो दिवस रात्र राबतो, आपल्या डोळ्यात फुलणारी स्वप्न पुर्ण करण्यासाठी जो धडपडतो तो आपला लाडका बाबाच असतो. खरं तर मुलगा आणि वडिलापेक्षा मुलीचं आणि वडिलाचं नातं अधिक घट्ट असतं असे अनेक जण म्हणतात आणि काही अंशी ते खरंही आहे. मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाच्या गप्पा सुरू होतात. जिला आपण लाडाने वाढवलं ती एक दिवस नांदायला जाताना आपलं घर सोडून जाणार हे निश्चित असतं आणि यासाठी वडिलांनी आपल्या मनाची तयारीही केलेली असते. मुलीसाठी योग्य वर नि घर निवडणं आणि तिचं कन्यादान करून तिची पाठवणी करणं याबद्दलचे स्वप्न मुलीच्या वाढण्यासोबतच वडिलांच्या डोळ्यात वाढत असते. हे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारा आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना सर्वात जास्त हळवा होणारा माणूस हा मुलीचा बाबाच असतो. आपल्या मुलीची पाठवणी करतांना त्याच्या डोळ्यासमोरून आठवणींचे असंख्य पट सरकत जातात आणि त्या आठवणी डोळ्यांतील आश्रूंद्वारे बाहेरही येतात. प्रत्येक मुलीची आणि वडिलाची गोष्ट ही बहुतेकवेळा अशीच असते. वडिल मुलीच्या काहीशा अशाच नात्याची, त्यांच्या स्वप्नाची आणि तिच्या कन्यादानाची गोष्ट बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतून. येत्या शनिवारी २४ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे अभिनेते शरद पोंक्षे यात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत तर नवोदित अभिनेत्री मधुरा देशपांडे मुलीच्या भूमिकेत आणि नायकाच्या भूमिकेत प्रसाद जवादे दिसणार आहे.

‘असे हे कन्यादान’ची कथा आहे सदाशिव किर्तने (शरद पोंक्षे) या अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिका-याची आणि त्याच्या कुटुंबाची. मुंबईत राहणारे किर्तने हे महानगरपालिकेत उच्च पदावर आहेत. कार्यालयात आपल्या कडक शिस्तीमुळे सर्व कर्मचा-यांमध्ये त्यांचा दरारा आहे. खोटं बोलणं, भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी या गोष्टींची किर्तनेंना भयंकर चीड आहे. जी शिस्त कार्यालयात तिच घरातही. पत्नी उमा, मुलगी गायत्री आणि मुलगा तेजस असा किर्तनेंचा परिवार. उमा ही गृहीणी तर तेजस आणि गायत्री दोघांचही शिक्षण सुरू आहे. गायत्री कॉलेजला जाते तिला नृत्याची आवड आहे. गायत्री आणि सदाशिवरावांचं नातं खूप हळवं आहे.

सदाशिवराव जेवढे शिस्तप्रिय आहेत तेवढेच प्रेमळ वडिलही आहेत. गायत्रीला काय हवंय नकोय, तिला काय आवडतं काय नाही, तिचे छंद, तिचे हट्ट या सगळ्या गोष्टी त्यांना नीट माहित आहेत. गायत्रीचे सर्व हट्ट आणि लाडही ते पुरवतात पण त्याचीही त्यांची एक वेगळी पद्धत आहेत. मुलांनी एखादी गोष्ट मागितल्यास ती लगेच दिल्यावर त्याची किंमत उरत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी द्याव्या असं त्यांचं मत… खरं तर त्यांचे संस्कार आणि शिस्तीमुळे गायत्रीनेही कधीच कोणती वायफळ किंवा अनावश्यक गोष्ट त्यांच्याकडे मागितली नाही. आपल्या वडिलाबद्दल तिच्या मनात प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते दोघे जरी एकमेकांचे मित्र नसले तरी आपल्या कोणत्याही मित्र मैत्रिणीपेक्षा आपले बाबा आपल्याला चांगलं समजून घेतात असा विश्वास गायत्रीला आहे. बाबांचा आनंद तोच आपला आनंद असं गायत्री मानते. तिच्यावर आणि तिने घेतलेल्या सर्व निर्णयांवर बाबांनाही विश्वास आहे. आपला प्रत्येक निर्णय ती बाबांनाच विचारून घेते. या परिस्थितीत गायत्रीच्या आयुष्यात कार्तिक येतो. गायत्री कॉलेजच्या एका स्पर्धेत नृत्य करताना कार्तिक तिला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने “हॅपी गो लकी” असलेला कार्तिक खरं तर मोठा उद्योगपती आहे. त्याचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. पहिल्याच भेटीत गायत्रीच्या प्रेमात पडलेला कार्तिक तिला लग्नाची मागणी घालतो आणि तिथुन तिचं आयुष्य नव्या वळणावर येतं त्याचीच कथा म्हणजे असे हे कन्यादान’ ही मालिका.

या मालिकेत सदाशिवरावांच्या भूमिकेत शरद पोंक्षे आहेत तर गायत्रीची भूमिका मधुरा देशपांडे साकारत आहे. उमाच्या भूमिकेत गायत्री देशमुख आणि कार्तिकच्या भूमिकेत प्रसाद जवादे आहे. याशिवाय मालिकेत तेजस डोंगरे, राधा कुलकर्णी, रूचिका पाटील, सरीता मेहंदळे आणि निनाद लिमये याही कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शशांक सोळंकी यांच्या सेव्हंथ सेन्स मिडियाची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन गौतम कोळी यांनी केलं आहे. आयुष्याच्या विविध टप्यांवर आपल्या मुलीसाठी कधी मित्र कधी तत्वेता तर कधी मार्गदर्शक बनणा-या बाबाची ही कहाणी ‘असे हे कन्यादान’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय २४ जानेवारीपासून दर सोमवार ते शनिवार सायं. ७.३० वा. फक्त झी मराठीवर.

परवानाधारक स्टॅालचालकांच्या पुर्नवसानासाठी सहकारनगरमध्ये आधुनिक मंडई उभारणारः सभागृह नेते सुभाष जगताप.

0

सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या हस्ते अधिकृत परवान्यांचे स्टॅालधारकांना वाटप

पुणे : गजानन महाराज चौक व गोळवलकर रस्त्यावरील परवानाधारक स्टॅालचालकांचे पुर्नवसन करण्यासाठी सहकारनगर परिसरात नव्या अत्याधुनिक मंडईची उभारणी करण्यात येईल असे मत सभागृह नेते सुभाष जगताप यांनी व्यक्त केले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुढील काळात महापालिकेस परवानाधारक स्टॅालचालकांचे पुर्नवसन करावेच लागणार आहे. तेव्हा, परवानाधारकांनी आपले परवाने विकू नयेत. देशातील आठव्या क्रमाकांचे शहर म्हणुन पुण्याची ओळख असून या शहरात रोजगार करण्याची सुवर्णसंधी परवानाधारक स्टॅालचालकांना मिळाली आहे. येथून पुढे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने अतिक्रमण करु नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

ढुमे क्रिडासंकुल, सहकारनगर क्रमांक दोन येथे स्टॅालधारकांना अधिकृत स्टॅालचा परवाना वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे, अतिक्रमण निरिक्षक श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरिक्षक शशिकांत टाक, दिलीप कांबळे(अरुंदेकर), महापालिका फेरीवाला समितीचे सदस्य दिनेश खराडे, अनंत कामत व मनोज बिडकर हे उपस्थित होते. या प्रसंगी ३५ परवान्यांचे वाटप सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

रमेश शेलार, सुवर्णा चांदणे, शाखिबी शेख, गंगेश लोंढे, शेखर सोंडे व सरस्वती खंडाळे यांना प्रातिनिधी स्वरुपामध्ये परवान्याचे वाटप करण्यात आले.

 

गुणदायी ;परवडणाऱ्या औषधांचे संशोधन आवश्यक – आबेदा इनामदार

0
इमर्जिंग ट्रेंन्डस इन फार्मसी राष्ट्रीय कार्यशाळा
 
पुणे :
विविध रोगांना होण्याआधी रोखण्यासाठी संशोधन जसे आवश्यक आहे, तसेच गुणदायी तरीही परवडणाऱ्या  औषधांवर संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत आबेदा इनामदार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) यांनी व्यक्त केले.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ च्या सहकार्याने आझम कॅम्पसच्या पीएआय हायटेक सभागृहात येथे झालेल्या “इर्मजिंग ट्रेडस्‌ इन फार्माक्युटिकल आर ऍण्ड डि ऍण्ड ड्रग डिसकव्हरी’या विषयावरच्या कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना प्रा. इरफान शेख अध्यक्षस्थानी होते.
आबेदा इनामदार म्हणाल्या, “मानवी प्रयत्न हे रोगांचा अटकाव करण्याकडे आहेत. रोग होऊ नये ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  त्याचबरोबर रोग झाला तर बचाव करण्याचे, उपचाराचे कमी वेळेत असरकारक औषधांवर संशोधनाचा भर हवा.’
प्रा. इरफान शेख म्हणाले, “मानवी जीवन उन्नत आणि समाधानी होण्यासाठी फार्मा कंपन्यांनी संशोधनाचा वापर करावा.नवे प्रयोग समोर येण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या ठरतात. ‘
डॉ. वंदना पत्रावळे, डॉ. मरीयम रेघागी, डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. नसरीन शेख, डॉ. पद्मा देवराजन, डॉ. अमिता कर्णिक, डॉ. के. एस. जैन, डॉ. चंदशेखर राऊत या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने झालेल्या या राष्ट्रीय कार्यशाळेत अनेक संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम उपस्थित होते.

वीजचोरीची ६४०१प्रकरणे उघडकीस ; ६० कोटी रुपयांची वसुली

0

case-stud8

 

महावितरणच्या दक्षता विभागाकडील फिरत्या पथकाची कामगिरी

पुणे, दि. १९ :- महावितरणच्या पुणे परिक्षेत्रातील दक्षता व सुरक्षा विभागाकडे कार्यरत असणा-या फिरत्या

पथकांनी जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ मध्ये ६४०१ विज चोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे

उघडकीस आणली आहेत. त्या ग्राहकांना विज चोरी, त्यापोटी आकारणी करण्यात आलेला दंड, व व्याज

यामध्ये ६२.३८ कोटी रुपयांच्या देयकांची आकारणी करण्यात आली असून त्यापैकी रु. ६० कोटी रुपयांची

वसुली करण्यात आली आहे.

राज्यातील १३ जिल्हयांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे परिक्षेत्राच्या दक्षता व सुरक्षा विभागाने गेल्या

वर्षभरात १४९४४ वीज संचाची तपासणी केली. महावितरणाचे संचालक (दवसु) व अप्पर पोलीस

महासंचालक श्री एस.पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनान्वये व पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर श्री

शिवाजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली १६ भरारी पथकांनी एकूण ६४०१ वीजचोरी व विजेच्या अनधिकृत

वापराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामध्ये ४०४७ प्रकरणात ४.१८ कोटी रुपयांच्या विजेची चोरी

केल्याचे स्पष्ट क्षाले. त्यांच्याविरुध्द विद्युत कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली. उर्वरित

२३५७ ग्राहकांनी ५८.२० कोटी रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर व इतर अनियमीतता केल्याचे आढळून

आले. या सर्व ग्राहकांना दंड, व्याज व वीज वापराच्या देयकांसह एकूण ६२.३८ कोटी रुपयांच्या देयकांची

आकारणी करण्यात आली आहे. त्यातील अंदाजे ६० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

वीजहानी कमी करण्यासाठी पुणे परिक्षेत्रातील सोलापूर, उस्मानाबाद,बीड, लातूर,

परभणी,कोल्हापूर,रत्नागिरी, सांगली, सातारा, नांदेड, हिंगोली, पुणे, व कुडाळ या जिल्हयातील वीजचोरी व

अनधिकृत वीजवापर शोधण्यासाठी दक्षता व सुरक्षा विभागाचे १६ पथके कार्यरत आहेत. वीजचोरी किंवा

विजेच्या अनधिकृत वापराचा प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती लेखी किंवा ०२०-२६०५६१७०,

२६०५०४३५ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी,असे आवाहन उपसंचालक कमांडर श्री शिवाजी

इंदलकर यांनी केले आहे.

प्रगत तंत्रज्ञानाच्या सहायाने आता ग्राहकांकडील मीटरचे वाचन स्वयंचलीत यंत्रणेने करण्याची प्रक्रिया

टप्प्याटप्प्याने सुरु क्षाालेली असुन त्याअन्वये आता मीटर वाचनासह मीटरमध्ये फेरफार करणा-या संशयित

ग्राहकांची माहिती उपलब्ध होणार आहे. अशा ग्राहकांवर दक्षता व सुरक्षा विभाग नजर ठेऊन त्यांच्याविरुध्द

नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती उपसंचालक कमांडर श्री शिवाजी इंदलकर यांनी दिली.

०१४ ते डिसेंबर २०१४ मध्ये ६४०१ विज चोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे

उघडकीस आणली आहेत. त्या ग्राहकांना विज चोरी, त्यापोटी आकारणी करण्यात आलेला दंड, व व्याज

यामध्ये ६२.३८ कोटी रुपयांच्या देयकांची आकारणी करण्यात आली असून त्यापैकी रु. ६० कोटी रुपयांची

वसुली करण्यात आली आहे.

राज्यातील १३ जिल्हयांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे परिक्षेत्राच्या दक्षता व सुरक्षा विभागाने गेल्या

वर्षभरात १४९४४ वीज संचाची तपासणी केली. महावितरणाचे संचालक (दवसु) व अप्पर पोलीस

महासंचालक श्री एस.पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनान्वये व पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर श्री

शिवाजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली १६ भरारी पथकांनी एकूण ६४०१ वीजचोरी व विजेच्या अनधिकृत

वापराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामध्ये ४०४७ प्रकरणात ४.१८ कोटी रुपयांच्या विजेची चोरी

केल्याचे स्पष्ट क्षाले. त्यांच्याविरुध्द विद्युत कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली. उर्वरित

२३५७ ग्राहकांनी ५८.२० कोटी रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर व इतर अनियमीतता केल्याचे आढळून

आले. या सर्व ग्राहकांना दंड, व्याज व वीज वापराच्या देयकांसह एकूण ६२.३८ कोटी रुपयांच्या देयकांची

आकारणी करण्यात आली आहे. त्यातील अंदाजे ६० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

वीजहानी कमी करण्यासाठी पुणे परिक्षेत्रातील सोलापूर, उस्मानाबाद,बीड, लातूर,

परभणी,कोल्हापूर,रत्नागिरी, सांगली, सातारा, नांदेड, हिंगोली, पुणे, व कुडाळ या जिल्हयातील वीजचोरी व

अनधिकृत वीजवापर शोधण्यासाठी दक्षता व सुरक्षा विभागाचे १६ पथके कार्यरत आहेत. वीजचोरी किंवा

विजेच्या अनधिकृत वापराचा प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती लेखी किंवा ०२०-२६०५६१७०,

२६०५०४३५ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी,असे आवाहन उपसंचालक कमांडर श्री शिवाजी

इंदलकर यांनी केले आहे.

प्रगत तंत्रज्ञानाच्या सहायाने आता ग्राहकांकडील मीटरचे वाचन स्वयंचलीत यंत्रणेने करण्याची प्रक्रिया

टप्प्याटप्प्याने सुरु क्षाालेली असुन त्याअन्वये आता मीटर वाचनासह मीटरमध्ये फेरफार करणा-या संशयित

ग्राहकांची माहिती उपलब्ध होणार आहे. अशा ग्राहकांवर दक्षता व सुरक्षा विभाग नजर ठेऊन त्यांच्याविरुध्द

नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती उपसंचालक कमांडर श्री शिवाजी इंदलकर यांनी दिली.

पुणे परिमंडलात ३५ लाख वीजग्राहकांकडून ४६० कोटींच्या देयकांचा ऑनलाईन भरणा, एटीपी मशीनद्वारे १७९ कोटींचा भरणा..

0

पुणे : महावितरणने सुरु केलेल्या वीजदेयकांच्या ऑनलाईन भरणा सुविधेला पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. सन २०१४ मध्ये पुणे परिमंडलातील ३५ लाख २९ हजार ६३९ वीजग्राहकांनी ऑनलाईनद्वारे तब्बल ४६० कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबीलांचा भरणा केलेला आहे. दरम्यान, एटीपी (एनी टाईम पेमेंट) या मशीनच्या माध्यमातून पुणे परिमंडलात गेल्या वर्षभरात ९ लाख ३२ हजार १५० ग्राहकांनी १७९ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा महावितरणने आपल्या ग्राहकांना घरबसल्या वीजदेयक भरता यावे यासाठी ऑनलाईन पेमेंट, एसएमएसद्वारे वीजबील भरणे, शिवाय रांगेत उभे न राहता एटीपी (एनी टाईम पेमेंट) मशीनच्या मदतीने वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी वीजदेयके ऑनलाईन भरण्याच्या सुविधेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजबील भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबंॅकींगद्वारे वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणे परिमंडलात सन २०१३ मध्ये २८ लाख ३१ हजार ७९५ वीजग्राहकांनी ३५६ कोटी ७८ लाख रुपयांचा ऑनलाईन वीजदेयकांचा भरणा केला होता. या तुलनेत ऑनलाईन वीजदेयके भरणार्‍या ग्राहकांची संख्या सन २०१४ मध्ये ३५ लाख २९ हजारांवर गेली आहे. तसेच ऑनलाईन रकमेचा भरणाही ४६० कोटी रुपयांवर गेला आहे. पुणे परिमंडलाची ही संख्या सलग दोन्ही वर्षात राज्यात सर्वाधिक आहे. महावितरणने पुणे परिमंडलातील शहरी भागांत २० एटीपी मशीन्स बसविलेल्या आहेत. सन २०१४ मध्ये पुणे परिमंडलात ९ लाख ३२ हजार १५० वीजग्राहकांनी या मशीन्सच्या माध्यमातून १७९ कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबीलाचा भरणा केलेला आहे.

सई च्या बोल्ड करीष्म्याचे वेध आता बॉलीवूड ला हि — सई ची ‘सेक्सी सविता भाभी’ची भूमिका असलेला हिंदी हंटर २० मार्चला

0

2234_untitled-4

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच आपल्या  बोल्ड रुपाचा करिष्मा आता हिंदी सिनेमातदाखवणार  आहे. तिच्या या आगामी हिंदी सिनेमाचे नाव आहे ‘हंटर’. खरं तर पठडीबाहेरच्या आणि बोल्ड भूमिकांसाठी सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिच्या बोल्ड अवतारामुळेच ती चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे. मराठीत बिकिनी परिधान करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर आता सई ‘हंटर’मध्येही बोल्ड रुपात झळकण्यास सज्ज झाली आहे.

 या सिनेमात सईने ‘सेक्सी सविता भाभी’ची भूमिका साकारली आहे. सईसोबत ‘हेट स्टोरी’ फेम अभिनेता गुलशन देवैया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सईसोबतच राधिका आपटेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमातील सीन्सप्रमाणेच संवादसुद्धा बरेच बोल्ड आहेत.
 ही एका मुलाची कथा असून त्याच्या आयुष्यात येणाऱया तीन मुलींपैकी सई एक आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात राधिक आपटे आणि सई ताम्हणकरने भरपूर एक्सपोज केले आहे असे म्हणतात . येत्या 20 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.