Home Blog Page 3622

आउटलूक मॅगझीनचे संपादक विनोद मेहता यांचे निधन

0

नवी दिल्ली

ज्येष्ठ पत्रकार आणि आउटलूक मॅगझीनचे संपादक विनोद मेहता यांचे दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. अनेक अवयव निकामी झाल्याने आज सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी दिली. मेहता ७३ वर्षांचे होते.
मेहतांचा जन्म पाकिस्तानमध्ये रावळपिंडीत १९४२ ला झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. विनोद मेहता यांचं ‘लखनऊ बॉय’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा ते १९७४ मध्ये डेबोनियर मॅगझीनचे संपादक झाले. यानंतर संडे ऑब्झर्व्हर, इंडियन पोस्ट, द इंडिपेंडेंट, द पायोनियर आणि शेवटी आउटलूक या मॅगझीनचे ते संपादक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसंच पत्रकारितेचे मोठे नुकसान आहे, अशी भावना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मेहतांचे निधनानंतर व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मेहतांचं निधन धक्का देणारं आणि दुःखदायी असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी म्हटलंय. दुःख व्यक्त केलं आहे. मेहतांना देशभरातील माध्यमांमधून तसंच विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

जबरदस्त आवाजाने व्हाईट हाऊस हादरले

0

वॉशिंग्टन : कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या अमेरिकेच्या ‘व्हाइट हाऊस’च्या परिसरामध्ये शनिवारी मोठ्या आवाजासह आगीच्या ज्वाळा पसरल्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ‘व्हाइट हाऊस’च्या ‘साऊथ लॉन’जवळील रस्त्यावरून हा आवाज आला. . साऊथ लॉनच्या बाजुने हा धमाकेदार आवाज ऐकू येताच तेथील सुरक्षा विभागाने या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करून तपासाची चक्रे फिरविली. अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे कुटुंबियांसोबत हेलिकॉप्टर व्हाईट हाऊस परिसरातील तळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाचा हा जोरदार धमाका झाला. गुप्तचर सेवा अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत पत्रकार कक्षाकडे धाव घेत त्यात सर्व पत्रकारांना आतच ठेऊन कुलुप घातले. सुदैवाने ओबामा आणि त्यांचे कुटुंब साऊथ लॉनमध्ये नव्हते. ते हेलिकॉप्टरने अ‍ॅण्ड्र्यूज एअर फोर्स तळाकडे जाणार होते.

 या आवाजानंतर एका हातगाडीला आग लागल्याचे ‘व्हाइट हाऊस’चे प्रवक्ते ब्रायन लेरी यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाला जवळच एका वाहनाजवळ संशयास्पद वस्तू सापडली. मात्र, त्याचा आगीशी काहीही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पब मधील इंग्रजी गाण्याला विरोध करताना आदित्य पांचोली अडकला मारहाणीच्या आरोपात -अटक …

0
मुंबई – इंग्रजी गाणी नकोत हिंदी गाणी लाव असे सांगताना पब मध्ये ख्यातनाम अभिनेत्यावर मोठा बाका प्रसंग मुंबईत उदभवला, एका अभिनेत्याला जर अशा प्रसंगांना पब मध्ये सामोरे जावे लागत असेल तर अन्य ग्राहकांचे काय होत असेल ? हा प्रश्न आता निर्माण होणार आहे . बॉलीवूडच्या चित्रपटांत ,केवळ नशिबानेच मागे राहिलेल्या आदित्य पांचोलीला एका फाइव्ह स्टार पबमध्ये मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.यावेळी आदित्यला अपमानाला सामोरे जावे लागल्याने पब चे बाऊंसर्स आणि त्याच्यात बाचाबाची झाली हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायोलॉजी पबमध्ये ही घटना घडली.
आदित्य पांचोलीने शनिवारी रात्री ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील युही येथे असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये आदित्य पांचोलीने बाऊंसर्सना मारहाण केली. पबमध्ये हिंदी गाणी वाजवली जात नसल्याने आदित्य पांचोली नाराज होता, असे  सांगितले जात आहे. त्यानंतर आदित्यने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याआधीही आदित्य पांचोलीला काही वेळा मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आदित्य पांचोलीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची कोठडीत रवानगी करायची की, जामीन द्यायचा  यावर निर्णय होणार आहे.

 

 

दक्षिण पुण्याला महापौर ,सभागृहनेता आणि आता स्थायी अध्यक्षपद देखील ….

0

राष्ट्रवादी+काँग्रेस+मनसे = स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम पुणे महापालिकेचा नवा ‘पॅटर्न’

पुणे-राज्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करून राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या गळ्यात  स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ  अगदी सन्मानाने घातली . पुण्याच्या दक्षिण भागात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वाढता प्रभाव पाहून त्याच नेत्यांमध्ये आपसात स्पर्धा लावून देण्याचे हे राजकारण आहे कि
परंतु, नाशिकच्या स्थायी समितीचा विचार करूनच त्यांनी ही बेगमी केली आहे याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत . त्यांच्या तीन मतांनी अश्विनी कदम यांचा विजय सोपा केला. महापौर -सभागृहनेते आणि आता स्थायीसामिती अध्यक्ष असे ३ पदाधिकारी पुण्याच्या दक्षिण भागाचे प्रतिनिधित्व करणारे असून तिघेही राष्ट्रवादी चे आहेत .
पुणे महानगरपालिका ही वेगवेगळ्या ‘पॅटर्न’साठी ओळखली जाते. राज्याच्या राजकारणाला नवनवे ‘पॅटर्न’ देणाऱ्या पुणे महानगरपालिकेत आज आणखी एक पॅटर्न अस्तित्वात आला आहे. राष्ट्रवादीला काँग्रेससोबतच मनसेनंही पाठिंबा देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचा १२ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. स्थायी समिती सभापतीपदी निवडल्या गेलेल्या कदम या तिसऱ्या महिला आहेत. त्यांना मिळालेल्या १२ मतांमध्ये तीन मतं मनसेची आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं पुण्यातील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हं होती. परंतु, काँग्रेसचे चंद्रकांत ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अश्विनी कदम यांचा विजय निश्चित झाला. कारण, राष्ट्रवादीची सहा आणि काँग्रेसची तीन मतं त्यांच्या पारड्यात पडणार होती. असं असतानाही, कितीतरी महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये तटस्थ राहणाऱ्या, मनसेच्या तीन सदस्यांनीही अश्विनी कदम यांनाच पाठिंबा दिला.

सलग चौथा विजय-भारताची विंडीजवर मात-भारत उपांत्यपूर्व फेरीत

0
पर्थ – चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे.
जेरॉम टेलरच्या तेज गोलंदाजीपुढे रोहित शर्मा व शिखऱ धवन अनुक्रमे सात व नऊ धावा करत तंबूत परतल्याने भारतीय प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती. विराट कोहलीचा जम बसत असतानाच रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना मार्लन सॅम्युअलकडे झेल गेल्याने ३३ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. फक्त १४ धावा करत केमर रॉचच्या चेंडूवर यष्टिरक्षक रामादिनकडे झेल गेल्याने अजिंक्य रहाणे बाद झाला.
 तीन चौकार व एक षटकार लगावत कर्णधार धोनीने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचा तेज तर्रार गोलंदाज जेरॉम टेलर व आंद्रे रसेल या गोलंदाजांचे आव्हान होते.  आठ षटकांमध्ये टेलरने ३३ धावा देत रोहित शर्मा व शिखर धवन या पहिल्या फळीतील फलंदाजांना तंबूत परत पाठवले. तसेच आंद्रे रसेल ने ४३ धावा देत विराट कोहली व रविंद्र जडेजा यांचा बळी घेतला होता. कर्णधार धोनी व रविचेंद्र अश्विन यांच्या टिकून राहण्याने भारताला विजय सहज शक्य झाला.

पुण्यातला AIB Knockout शो रद्द- ७ दिवसात तिकिटांचे पैसे परत करणार

0

Untitled Untitled1

पुणे- बॉलिवूडशी संबंधित वादग्रस्त शो एआयबी (ऑल इंडिया बकचोद) च्या आयोजकांनी 7 मार्च रोजी पुण्यात होणारा लाईव्ह शो रद्द केला आहे. शो रद्द झाल्याची माहिती एआयबीच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या शो नंतर याबाबत वाद उसळला होता . गेला दीड महिना आम्ही या भानगडीत अडकून पडलो आहे. मात्र, यातून आम्ही बाहेर येत लवकरच नव्या शो द्वारे तुमच्यासमोर येऊ. शो रद्द करावा लागल्याने तुम्हाला जो मनस्ताप झाला आहे त्याबद्दल आम्ही खेद करतो. तुमच्या तिकीटाचे पैसे सात दिवसात परत केले जातील.

गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! – वारकरी प्रबोधन महासमिती

0

पुणे-  नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केलाया कायद्याची मागणी वारकर्‍यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होतीकाँग्रेस शासनाच्या काळात मुंबईनागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चेजेल भरो आंदोलनमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्‍हेने प्रयत्न केले आहेतअखेर या लढ्याला १९ वर्षांनी यश आलेत्याविषयी प्रथम युती शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन गोवंश हत्याबंदी कायद्यापाठोपाठ आता महाराष्ट्र शासानाने विशेष गोसंवर्धन खाते तयार करून या क्षेत्रातील एका अभ्यासू तज्ञ व्यक्तीला गोसंवर्धन मंत्री म्हणून नेमावेअशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्षमहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री ह..रामेश्‍वर महाराज शास्त्री यांनी समस्त वारकर्‍यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.

     महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात हजारो कत्तलखाने काढून दरवर्षी कोट्यवधी देशी गायींची कत्तल होत आहेदेशी गोवंश नष्ट केला जात आहेदेश वाचावाअशी वारकर्‍यांची भूमिका आहेगायबैल वाचविलेतर शेती आणि शेतकरी वाचेल आणि देश वाचेलअस्सल देशी गायीपासून पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेले गोमूत्रशेणापासून यार केलेले पंचगव्यगोवर्‍यातसेच दुधदहीतूप मिळतेया सर्व गोष्टी हिंदु धर्मांत पवित्र मानल्या आहेतयामुळे गीतागंगा आणि गाय यांचे रक्षण झाले पाहिजेस्वत:भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीच्या सेवेसाठी या देशात अवतार घेतला आहे.

      राज्यात गोपालन करणार्‍या अनेक संघटना आणि गोप्रेमी व्यक्ती आहेतशासनाने त्यांना सर्व सहकार्य करावेगायी सांभाळणार्‍यांना आर्थिक साहाय्य करावेगोशाळांसाठी वनखात्याच्या उपलब्ध असलेल्या जमिनी द्याव्यातगायीचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकर्‍यांना लक्षात यावेयासाठी एक शासकीय समिती स्थापन करून राज्यभर शिबिरे घ्यावीतज्याप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालय आहेकुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री आहेतसेच गोसंवर्धन खाते तयार करावे आणि राजस्थानच्या धर्तीवर गोसंवर्धन मंत्री नेमावाअशा आमच्या मागण्या आहेतत्याचा शासनाने विचार करावीअसेही त्यांनी म्हटले आहे.

महिलादिनी ‘स्त्रियांमधील हार्मोनविकार’ विषयावर महिला डॉक्टरांसाठी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन

0

पुणे:

महिलांमधील हार्मोनविकार या विषयावर महिला डॉक्टरांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या‘एन्डोक्रायनोलॉजी विभागा’तर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. 8 मार्च 2015 या महिलादिनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील सौद बहावान सभागृहामध्ये (आठवा मजला, मेन बिल्डींग) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला रूग्णांना व महिला डॉक्टरांना मधुमेह, थायरॉइड, स्थुलपणा, पॉलिसिस्टीक ओव्हरीज, ऑस्टिओपोरॅसिस यांसारख्या हार्मोनविकारांची माहिती मिळण्यासाठी तसचे या आजारांविषयी अनेक प्रश्‍न डॉक्टर व रूग्णांमध्ये असतात त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

महिलादिनाचे औचित्य साधून, डॉक्टर स्त्रियांचे प्रबोधन एक स्त्री व एक डॉक्टर म्हणून होणे गरजेचे आहे. त्याकरीता ही कार्यशाळा फक्त महिला डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. वैशाली देशमुख (एन्डोकायनोलॉजी विभाग प्रमुख) यांनी दिली.

डॉ. वैशाली देशमुख, डॉ. धनंजय केळकर, डॉ. अरूंधती खरे, डॉ. रमा वैद्य, डॉ.वगीश अय्यर, डॉ. प्रेमा वर्तकवी, डॉ. अनीश बहल, डॉ. अमेय जोशी, डॉ. नितीन पाटणकर, डॉ. गीता धर्माती, डॉ.चेतन देशमुख, डॉ.धनश्री भिडे, डॉ. संजय फडके हे तज्ज्ञ महिला डॉक्टरांसाठी ‘स्त्रीयांमधील हार्मोनविकार’ यासंबंधी प्रशिक्षण व जागरूकता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

2017 पालिका निवडणूक- ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या सर्व पदाधिकारी नगरसेवकांची बैठक

0

पुणे :

2017 च्या पालिका निवडणुक तयारीसाठी विकासकामांचा आढावा आणि नियोजनासाठी पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने मार्गदर्शनरपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक शहरातील सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष, ब्लॉग अध्यक्ष, सेल अध्यक्ष अशा सर्वांसाठी एकत्रित रविवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष कर्णे गुरूजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापौर धनकवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीविषयी पक्ष संघटनेला माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या,‘महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासद नोंदणीवर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. नगरसेवक कार्यकर्त्यांनी कशा दृष्टीने पुढील काळात काम केेले पाहिजे याविषयी विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा आणि नियोजन, नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यकर्त्यांनीही केलेल्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या.

संघटनात्मक बांधणीसाठी पुण्यात रा.स.प. चा मेळावा

0

पुणे :

सदस्यता नोंदणी आणि संघटनात्मक बाबींची चर्चा करण्यासाठी ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चा राज्यस्तरीय मेळावा पुणे येथे घेण्यात आला. नित्यानंद सभागृह, सिंहगड रस्ता येथे झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे होते. उपाध्यक्ष दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी मार्गदर्शन केले.

पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख डॉ.उज्वला हाके यांनी महिलादिन कार्यक्रम आयोजनाची माहिती दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांच्या एप्रिल महिन्यात येत असलेला वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग खटके, पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातांब्रेकर, सर्व जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

प्रशांत सरोदे क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

0

1

पुणे – दि कॉन्फडरेशन ऑफ दि रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाई-महाराष्ट्र, या संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरचे बांधकाम व्यावसायिक प्रशांत सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हॉटेल वेस्टइन, पुणे येथे काल झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी  एकमताने सरोदे यांच्या नावाला सहमती दिली.  क्रेडाई महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष अनंत राजेगांवकर आणि क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सरोदे यांच्या नावाची घोषणा सभेत केली.

 २०१५ -१७ या कालावधीसाठी संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची आणि ५ उपाध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी – शांतीलाल कटारिया (पुणे) आणि उपाध्यक्षपदी राजीव पारेख  (कोल्हापूर) , प्रमोद खैरनार (औरंगाबाद), सुनील भायभंग (नाशिक) आणि शैलेश वानखेडे (अमरावती)  निवड करण्यात आली. नागपूर येथील महेश साधवानी यांची संघटनेच्या मानद सचिवपदी तर पुण्याचे अनुज भंडारी यांची मानद खजिनदारपदी आणि राजेश गांधी(सोलापूर),रसिक चव्हाण(नवी मुंबई), महिंद्र जैन(रत्नागिरी) यांची संघटनेच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.

क्रेडाई महाराष्ट्र ही संपूर्ण महाराष्ट्रातील ३९ शहर शाखा असलेली शिखरसंस्था असून तिचे २६०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक सभासद आहेत. या शिखरसंस्थेत दर दोन वर्षानी नवीन अध्यक्षाची  निवड केली जाते.  बांधकाम क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणाचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम अनेक वर्ष ही संस्था करीत आहे.

‘आयएमईडी’च्या वतीने आयोजित ‘सी-गुगली 2015’ स्पर्धेची सांगता

0
1

पुणे :
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) च्या ‘कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅण्ड सिस्टीम स्टडिज्’ विभागाच्या वतीने आयोजित ‘सी-गुगली-2015’ स्पर्धेची सांगता झाली. ही स्पर्धा आयएमईडी कॅम्पस, पौैड रोड येथे नुकतीच झाली. ही स्पर्धा आंतरमहाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थि सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर आणि धनंजय गोखले working as a CATALYST in the field of project management ) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रा. सत्यवान हेंबाडे, सुजाता मुळीक यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.  डॉ. अजित मोरे, प्रा. आर.व्हि.महाडीक, प्रा.एस.जोगळेकर, प्रा. पी. पवार, डॉ. एन. एन. महाजन, डॉ. एच. पाडळीकर आदी उपस्थित होते.
‘सी-गुगली-2015’ मध्ये डिव्हाईस एकत्र करणे, एसक्युएल लोडस्टर, डीए वीन-सी-कोड, लॅन गेमिंग (एनएफएस), प्रकल्प सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडगाव खुर्द शाखेचे उद्घाटन

0
2

पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडगाव खुर्द शाखेचे आणि पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ राऊत, बाळासाहेब कोकरे, महासचिव बाळासाहेब दोडतले, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडीप्रमुख डॉ. उज्ज्वला हाके, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, सयाजी पाटील, संतोश बिचुकले, सचिन शेंडगे उपस्थित होते.

टिपू सुलतानची तलवार विजय मल्ल्या यांनी भारतात आणली … आता टिपू ची राम नामक अंगठी कोण भारतात आणणार ?

0

टायगर ऑफ म्‍हैसूर नावाने ओळखला जाणारा हैदराबादचा मुस्लिम राजा टीपू सुलतानची तलावार भारतामध्‍ये आणण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. त्‍यावेळी उद्योगपती आणि राज्‍यसभेचे माजी खासदार विजय मल्‍याने इंग्‍लडमध्‍ये जाऊन हि तलवार खरेदी केली होती . म्‍हैसूर संस्थानाचा 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतान ‘राम’ असे नाव कोरलेली अंगठी वापरत होता असा इतिहास आहे .१७९९ मध्ये  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात मारला गेल्‍यानंतर राजा सुलतानच्‍या बोटातील अंगठी काढून घेण्‍यात आली. या ऐतिहासीक अंगठीचा 1.45 लाख पाउंड म्हणजेच 1.43 कोटी रुपयांत लंडनमध्‍ये गेल्या २०१४मध्ये  लिलाव करण्‍यात आला होता. लिलावात ही अंगठी ज्‍या व्‍यक्तिने खरेदी केली त्‍याचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले होते. अलीकडे  ही अंगठी परत भारतात आणली जावी आशी मा‍गणी राज्‍यसभेत खासदार मुनव्वर सलीम यांनी केली आहे.
सेंट्रल लंडनच्या क्रिस्टी लिलावगृहाकडे असलेल्‍या माहितीनुसार या राम नामक टिपू सुलतानाच्या अंगठीचे वजन 41.2 ग्राम आहे. त्यावर देवनागरी लिपीत ‘राम’ नाव कोरले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात सन 1799 मध्ये र्शीरंगपट्टणममध्ये टिपूचा मृत्यू झाला होता. ड्यूक ऑफ वेर्लिगटन आर्थर बेलेसले नावाच्‍या व्‍यक्तिने त्यांच्या मृतदेह हाती लागल्यानंतर बोटातून ही अंगठी काढून घेतलेली होती, असे सांगण्‍यात येते. टिपू सुलतान यांना ‘टायगर ऑफ म्हैसूर’ या नावानेही ओळखले जाई. म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांचे धाकटे पुत्र असलेले टिपू हे लढवय्या राजा, विद्वान व कवीही होते. अशा राजाचा ऐतिहासीक ठेवा देशात परत आणण्‍यासाठी राज्‍यसभेत प्रयत्‍न केला जात आहे.

‘व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमने कशी साजरी केली होळी… ?

0
3 4 5 2
अनिष्ट रुढींचे दहन करणाऱ्या होळीच्या सणानिमित्ताने ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या आगामी चित्रपटाच्या कलाकारांनी अनोखी होळी साजरी केली. पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहता इको फ्रेंडली
होळीचा पर्याय अवलंबित या चित्रपटातील कलाकार अविनाश नारकर, अतुल तोडणकर, गणेश मयेकर आणि सारा श्रवण यांनी यावेळी केर-कचरा, झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ कागद-पुठ्ठे यांचे दहन केले. तसेच समाजातील वाईट चालीरीतींचा बिमोड करीत राष्ट्राविकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञाही केली. सावरकरांच्या देशभक्तीपर विचारांनी प्रेरित पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचा संदेश देत ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ च्या ‘टीमने साजरी केलेली ही होळी सावरकरांसाठी मानवंदनाच ठरली.
रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित ‘व्हॉट अबाऊट सावरकर? या चित्रपटामध्ये सावरकरांच्या विचाराने भारावलेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे. रुपेश कटारे आणि नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.