Home Blog Page 3616

अश्विनी कदम यांनी वाढविला कर

0

पुणे – मिळकतधारकांना नावातील बदल अथवा दुरुस्तीसाठीही पैसे मोजावे लागणार आहेत; तसेच मिळकतकराच्या बिलावरील नावाच्या हस्तांतराच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. या संदर्भातील माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एखाद्या मिळकतीचे खरेदीखत करण्याऐवजी केवळ कंपनीच्या नावात दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी यापूर्वी शुल्क आकारण्यात येत नव्हते; परंतु यापुढे करपात्र रक्कम 1 ते 500 रुपयांपर्यंत 500 रुपये व त्यापुढील प्रत्येक शंभर रुपयांसाठी 30 रुपये आकारण्यात येणार आहेत; तसेच मिळकतीच्या खरेदीनंतर मिळकतकराच्या बिलांवरील नावाच्या बदलासाठी आतापर्यंत करपात्र रक्कम 1 ते 500 रुपये; तर त्यापुढील प्रत्येक शंभर रुपयांसाठी 15 रुपये आकारले जात होते. आता या रकमेत दुप्पट वाढ करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच यापुढे करपात्र रकमेच्या 1 ते 500 रुपयांपर्यत एक हजार रुपये व त्यापुढील प्रत्येक शंभर रुपयांसाठी 30 रुपये या दराने शुल्क भरावे लागणार आहे.

दरम्यान, मिळकतीच्या वारस नोंदणीच्या शुल्कातही दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे वारस नोंदीसाठी करपात्र रकमेच्या 1 ते 500 रुपयांपर्यंत 20 रुपये व त्यापुढील प्रत्येकी शंभर रुपयाला 15 रुपये या जुन्या दरानेच आकारणी होणार आहे.

राज्यात 7540 सौर कृषिपंप उभारण्याचा शासनाचा निर्णय ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळें यांची माहिती

0

मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सौर कृषिपंपाबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून या वर्षी

प्रायोगिक तत्वावर 7,540 सौर कृषिपंप उभे करण्याचे जाहीर केले आहे.  तसा आदेश राज्य शासनाने

काढल्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळें यांनी मुंबइ येर्थे सांगितले.

केंद्र सरकारने राष्ट्रीयस्तरावर 1 लाख सौर कृषिपंपासाठी 400 कोटीची तरतूद केली असून महाराष्ट्रात या

कृषिपंपासाठी  केंद्र शासनाचे 30 टक्के अनुदानाप्रमाणे 133 कोटी 50 लाख एवढे वित्तीय सहाय्य उपलब्ध

होणार आहे.  यात राज्यशासनाचे 5 टक्के आणि लाभार्थींचे 5 टक्के राहणार आहेत, उर्वरित  60 टक्के रक्कम

कर्जरुंपाने राज्य शासन लाभार्थींना उपलब्ध करूंन देणार आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळं व वर्धा या

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना प्राधान्याने होणार आहे.  तसेच धडक सिंचन योजनेंतर्गत विहीरींचा

लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील

शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळंत नसलेल्या भागातील शेतकरी,

महावितरणकडे पैसे भरूंनही तांत्रिक अडचणीमुळें जोडणीसाठी प्रलंबित असलेले शेतकरी  तसेच संबंधित शेतकरी

शेतजमिनीचा मालक व शेतजमिनीचे क्षेत्र 5 एकरपेक्षा अधिक असू नये व संबंधिताच्या विहिरीला सिंचनासाठी

पुरेसे पाणी असणे गरजेचे असल्याचेही  ऊर्जामंत्री ना.श्री. बावनकुळें यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या योजनेद्वारे 3, 5 आणि साडेसात अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपासाठी मान्यता देण्यात आली

आहे.  विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये ही योजना राबविली

जाणार असून लाभार्थींचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरित रक्कम वित्तिय संस्थेमार्फत कर्जाच्या स्वरुंपात

उभारण्यात येणार आहे.  या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती

करणार असून यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना

करण्यात येईल. तसेच यासाठीच्या कर्जाची परतफेड महावितरण कंपनीद्वारे टप्प्या-टप्प्याने करण्यात येईल,

असेही ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळें यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्रांच्या पीएला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

0
मुंबई- राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या पीएला५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. मिलिंद कदम असे अटक केलेल्या पीएचे नाव आहे. रणजित पाटील यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे असलेले विधी व न्याय विभागाचेही राज्यमंत्रीपद आहे. या विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांनी वर्ध्यातील एका वकिलाला नोटरी म्हणून नियुक्ती करण्यासाठी 4 लाख रूपयांत सौदा फिक्स केला होता. दरम्यान, थेट मंत्रालयातील अवर सचिव पदावर आरूढ असलेल्या अधिका-याने ही लाच घेतल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून संबंधित अधिका-याला मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावून पकडले असल्याची प्रतिक्रिया रणजित पाटील यांनी दिली आहे.गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी करण्यात येत असल्याचे प्रकरण मागील आठवड्यात समोर आले होते. भाजपच्या अंतर्गत हेव्या-दाव्यातूनच हा प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान मिलिंद कदमबाबत  मिळालेली माहिती अशी की, विधी व न्याय विभागाची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्याची कदम यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्र्यांशी संबंध येतो. मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यातील एका वकिलाची नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती केली होती. त्यासंबंधीची कागदपत्रे कदम यांच्याकडे आल्यानंतर त्याने शक्कल लावत थेट वकिलाशी संपर्क साधून नोटरी म्हणून तुमची आठवड्याभरात नियुक्ती होईल असे सांगितले व मुंबईला भेटायला बोलावले. त्यावेळी कदम यांनी अप्रत्यक्षरित्या लाचेची मागणी केली. संबंधित वकिल वर्ध्यातून मुंबईला भेटायला आल्यावर कदम याने वकिलाकडे ५ लाख रूपयांची मागणी केली. अखेर४ लाखांना सौदा पक्का झाला.

दुसरीकडे, संबंधित वकिलांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी परिचय असल्याने या वकिलाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना तुमची नियुक्ती झाल्याचे सांगितले. मात्र, कदम याने पैसे मागितल्याचे वकिलाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (एससीबी) तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार ट्रॅप लावण्यात आला. संबंधित वकिलाने कदमशी बोलणे करून सायंकाळी दादर परिसरात भेटायचे कबूल केले. त्यानुसार कदम व वकिल सीएसटीतील हॉटेल शिवाला येथे भेटले. त्यावेळी वकिलाने कदम यांना ५० हजार रोख दिले व उर्वरित रक्कम उद्या देतो असे सांगितले. हॉटेलमधून बाहेर पडताना पैशाचा पुडका असलेली बॅग कदम याने वकिलाकडून घेतली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कदम याला रंगेहाथ पकडले. एसीबी मिलिंद कदम यांची चौकशी करीत आहे.

मणिपुरी तरुणीच्या भूमिकेत सारा श्रवण

0

व्हॉट अबाऊट सावरकर?’ चित्रपटासाठी स्वीकारलं आव्हान

 

भूमिकांमधील आव्हान कलाकारांना नेहमीच खुणावत असतं. वास्तवात आपण जसे आहोत तसे पडद्यावर न दिसता आपल्यापेक्षा अगदी वेगळं पात्र साकारायला मिळावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. अभिनेत्री सारा श्रवण हिची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची इच्छा ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटाने पूर्ण केली आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीला कारकीर्दीच्या महत्त्वाच्या वळणावर ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ सारख्या मराठी चित्रपटात मणिपुरी तरुणीची  भूमिका साकारण्याची संधी लाभली.

रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब यांची  निर्मिती असलेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ हा सिनेमा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार मांडणारा आहे. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित  होऊन समाजात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या ध्येयवेडया तरुणाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सावरकरांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रातीलच तरुणांना स्फूर्ती देण्याचं काम केलं नाही, तर भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या विचारांनी पेटून उठलेले तरुण-तरुणी आहेत. पंजाबपासून मणिपूरपर्यंत पसरलेल्या सावरकरांच्या वैचारिक महासागरातील पाईक होण्याचं भाग्य एका तरुणीला लाभलं, हेच पात्र सारा श्रवणने  ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ चित्रपटात साकारलं आहे.

1

‘व्हॉट अबाऊट सावरकर? मध्ये साराने सुनीती सिंग नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे, या तरुणीच्या मनावर सावरकरवादी विचारांचा पगडा आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिमान मराठेच्या वैचारिक लढ्यात ती ठामपणे उभी आहे. सारा म्हणते कि, सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नसून ते संपूर्ण भारताचे होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव अमराठी लोकांवरही होता. मी साकारलेलं पात्र त्यांचंच प्रतिनिधित्व करणार आहे. तिरंग्यामुळे माझी आणि चित्रपटाच्या नायकाची भेट होते. त्यानंतर आम्ही एकजुटीने काम करतो. ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ मध्ये काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय तर होताच, पण बरंच काही शिकवणारा होता. नवीन कलाकारांच्या जोडीला मराठीतील दिग्गजांसोबत काम करताना जो अनुभव गाठीशी आला तो भविष्यात नक्कीच कामी येईल.

 

१७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात शरद पोंक्षे, विवेक लागू, अविनाश नारकर, अतुल तोडणकर, सारा श्रवण,श्रीकांत भिडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. निलेश मालप ,गगन बाया आणि नीती सिंग या चित्रपटाचे सहनिर्माते असून नागेश पुजारी कार्यकारी निर्माते आहेत. किंदर सिंग यांनी साहसदृश्यांचे दिग्दर्शन केलं असून नृत्य दिग्दर्शन श्रीकांत अहिरे यांचे आहे.रंगभूषा किरण सावंत यांनी केली आहे, तर वेशभूषा रीना मदाने यांची आहे. ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ मध्ये एका ध्येयवेडया तरुणाचा प्रवास रेखाटतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्याचा आढावा आणि विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे.

आता बच्चेकंपनी म्हणणार ‘आटली बाटली फुटली’

0
‘आटली बाटली फुटली’ याचा खरा अर्थ आतली बातमी फुटली. लहान मुलांच्या बोबड्या शब्दातून खेळता खेळता तयार झालेला हा शब्दप्रयोग आपण सर्वांनीच लहानपणी उच्चारलेला आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात स्वकेंद्री वृत्ती वाढताना दिसत आहे. इतरांचा विचार करण्याची, त्यांना मदत करण्याची  वृत्ती कमी होताना दिसत आहे. लहानपणी मुलांच्या मनावर जे बिंबवल जातं तशीच त्यांची जडणघडण मोठेपणी होत असते. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यात सहकार्याची भावना रुजवण्याच्या उद्देशाने निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी ‘आटली बाटली फुटली’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. छोट्या दोस्तांचा हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे.
रनिंग रिल प्रोडक्शन यांच्या विद्यमाने ‘आटली बाटली फुटली’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. लहान मुलांचे भावविश्व या चित्रपटातून उलगडणार आहे. टीव्ही, इंटरनेटच्या जंजाळात बच्चेकंपनी निखळ मैत्रीचा आनंद हरवून बसली आहेत. मैत्रीचे बंध त्यातला निखळ आनंद या चित्रपटातून लहानग्यांना अनुभवता येईल.
लहान  मुलांसाठी हा चित्रपट नक्कीच मोलाचा ठरेल असा विश्वास निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी व्यक्त केला. अमोल पाडावे दिग्दर्शित ‘आटली बाटली फुटली’ या चित्रपटात नवोदित बालकलाकारांचा सहज-सुंदर अभिनय पाहता येईल. यात शरयू  सोनावणे, विराज  राणे, आदित्य कावळे, अनय पाटील, श्रेयाली वहाने, पूर्वा शहा, जीवन करळकर, विभव बोरकर, समिहा सबनीस यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा  विक्रम चव्हाण यांनी लिहिली असून पटकथालेखन अमोल पाडावे यांनी केलं आहे. गीतरचना जन्मेजय पाटील, स्वप्निल जाधव यांची तर छायांकन अनिकेत के. यांनी केलं आहे. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील ‘आटली बाटली फुटली’, ‘सांग आई’ या सारखी धमाल गाणी हे या चित्रपटाचं वैशिष्टय ठरणार आहे.
मनोरंजनातून मूल्यांचा पाठ देणारा धमाल विनोदी तितकाच संवेदनशील चित्रपट लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच भावेल असा आहे.

पथनाट्य ते चित्रपट एक प्रवास अभिनेता कैलास वाघमारेचा!!

0

unnamed

मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे. अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.
जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्माला आलेल्या कैलासने कॉलेजमध्ये असताना अनेक पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य यामध्ये सहभाग घेऊन अभिनेता बनण्याचे स्वप्न हे उराशी बाळगले होते. एम. ए मराठी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई येथे नाट्यशास्त्राचे दोन वर्षाचे शिक्षण हे त्याने श्री. वामन केंद्रे यांच्याकडून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही लहान-लहान नाटकातून भूमिका साकारण्यास त्याने सुरुवात केली. याच दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी त्याची भेट झाली आणि सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी सुरु असलेल्या “माझी शाळा” या मालिकेत त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर संदेश भंडारे यांच्या “महादू” या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. संभाजी भगत यांच्या “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकामुळे कैलासला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख मिळाली.
आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची निर्मिती असलेला, पांडुरंग जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी “मनातल्या उन्हात” या सिनेमात कैलास अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. मराठी सिनेसृष्टीत आज एवेढे मोठ-मोठे अभिनेते असताना या सिनेमासाठी दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि संधी दिली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला या चित्रपटातील अभिनयासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. या चित्रपटातील माझी भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असून वय वर्ष २० ते ६५ वर्षापर्यंतची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारली आहे.चित्रपटातील भाषेचा लहेजाही पूर्णपणे वेगळा असल्याने मी त्यासाठी वेगळी मेहनत घेतली. एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना या सातत्याने घडत जातात आणि त्या परिस्थितीशी तो कसा समोर जातो याचे चित्रण “मनातल्या उन्हात” या सिनेमात तुम्हाला पाहता येणार असल्याचे अभिनेता कैलास वाघमारे यांनी सांगितले.
चित्रपटाची पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग के. जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे असून संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत. या  चित्रपटात अभिनेते  किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप बालकलाकार हंसराज जगताप,  मंथन पाटील आणि ओवेशिक्षा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत.विश्वराज जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.नागराज दिवाकर यांनी या चित्रपटाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे.
येत्या जून महिन्यात हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.

वाकडमध्ये चार दुकाने आगीत भस्मसात; सात तासांनंतर आग विझवण्यात यश –

0
0
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील  विशालनगरमध्ये एका व्यावसायिक-रहिवासी इमारतीतील चार दुकानांना आज  पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पहाटे तीन नंतर ही आग लागल्याचे रहिवाशांनी सांगितले. आग लागलेल्या दुकानापैकी एक आईलपेंट रंग विक्रीचे मोठे दुकान असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सहा-सात तासानंतरही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर महापालिकेच्या १२ बंबांनी सकाळी १० च्या सुमारास आग आटोक्यात आणली. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीचा तडाखा वर राहणा-या सर्व रहिवाशांना बसला. सुरक्षेसाठी इमारतीतील सर्व 60 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आईलपेंट कलरला आग लागल्याने या परिसरात धुराचे लोळ उठत होते.
वाकडमधील आयटी पार्कमधील लोक विशालनगर भागात राहतात. तेथील स्प्रिंग मिडोज या व्यावसायिक तथा रहिवासी इमारत आहे. या बिल्डिंगच्या खालीलभागात दुकाने आहेत तर वरच्या  मजल्यावर लोक राहतात. या इमारती खाली एक रंगाचे व हार्डवेअर दुकान आहे. यात सर्व रासायनिक व आईलपेंट रंगाचा मोठा साठा होता. पहाटे या दुकानाला अचानक आग लागली. रासायनिक रंग हे ज्वालाग्राही असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले. त्यामुळे शेजारच्या दुकानांनीही लागलीच पेट घेतला. दुकाने जळून खाक झाली आहेत तर इमारतीत धूर तयार झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

सनी लियोन करते आहे … पतीला बॉलीवूडचा स्टार

0
4 5 6 1 258627 11033028_649771855152387_264089113_n 2
मुंबई-सनी लियोन चा पती आता हिंदी भाषा आणि नृत्याचे धडे गिरवत आहे तर अभिनयाचे मार्गदशन हि तो खुद्द सनी लियोन कडूनच घेतो आहे . सनी आणि तिचा पती डेनीअल आता या निमित्ताने बॉलीवूड मध्ये चर्चेचा विषय बनत आहेत अर्थात चांगल्या चर्चेचा . …  अजून तरी …..
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असे करिअर घडवणारी सनी लियॉनचा पती डेनिअल वेबरने आता ‘डेंजरस हुस्न’ या सिनेमा द्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.  डेनिअल लवकरच ‘डेंजरस हुस्न’ सिनेमात झळकणार आहे.’डेंजरस हुस्न’ डेनिअलचा पहिला सोलो सिनेमा आहे. यापूर्वी तो सनी लिओनीच्या ‘जॅकपॉट’ सिनेमात कॅमियो भूमिकेत दिसला होता. डेनिअल ने नुकतेच डेंजरस हुस्न या रोमँटिक-हॉरर सिनेमाच्या पार्टी नंबर गाण्याच्या शूटिंग केले . विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रचंड प्रसिद्धी चित्रीकरणाच्या प्रारंभापासून म्हणजे मार्च च्या सुरुवातीपासूनच सुरु झाली आहे . सनी लियोन हे नाव आले कि प्रसिद्धी आलीच हे सूत्र त्यामागे आहे. ‘डेंजरस हुस्न’ चे फेसबुक वर पेज हि आहे त्यामधून तसेच यु ट्यूब वरून हि फोटो -चित्रीकरण सामायीचे व्हीडीवो क्लिप्स मुलाखती यांना बहर आला आहे
दिनेश शुक्लाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या या सिनेमात डेनिअल रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेशने सांगितले, ‘डेनिअल या सिनेमात गिटार वाजवणा-या म्यूझिशिअलच्या रुपात दिसणार आहे.’
विशेष म्हणजे, अभिनया क्षेत्रातून पदार्पण करणारा डेनिअल आपली पत्नी सनी लिओनीकडून टिप्स घेत आहे. डेनिअलच्या सांगण्यानुसार, ‘सनी दिवसभर माझ्या संपर्कात असते. ती मला कॅमेरा कसा फेस करायचा आणि चांगले हावभाव कसे द्यायचे याच्या टिप्स देत असते.’
डेनिअल सध्या हिंदी शिकत असून डान्स क्लासेससुध्दा ज्वॉइन केले आहेत. डेनिअलने सांगितले, ‘मी चांगला अभिनेता होण्याचा प्रयत्न करत आहे. मागील चार वर्षांपासून मुंबईमध्ये सनीचे काम सांभाळत होतो. मला याचे दु:ख आहे, की त्या काळात मी हिंदी शिकलो नाही. म्हणून आता दररोज सकाळी हिंदी शिकत आणि संध्याकाळी डान्स करतो.’

गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची सांगता

0

1 2 3

पुणे —
सुरूवातीला बरसलेल्या पर्जन्यधारा आणि त्यानंतर गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुमधुर स्वरातून प्रकटलेल्या
गीतरामायणातील ‘स्वरधारा’ यामध्ये चिंब झालेल्या हजारो रसिकांच्या उपस्थितीत गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याची सांगता आज रामनवमीच्या दिवशी झाली. गीतरामायणाच्या  हीरकमहोत्सवी सोहळ्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी श्रीधर फडके  यांनी आपल्या सुमधुर स्वरात गीतरामायणातील निवडक गाणी म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते या हीरकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त खास काढण्यात आलेल्या ‘ज्योतीने तेजाची आरती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रवींद्र वंझारवाडकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, श्रीधर माडगुळकर, धनंजय कुलकर्णी,  पृथ्वी एडिफीसचे अभय केले, ‘निरामय’चे योगेश चांदोरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी आपल्या भाषणात म्हणाले, ”गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी सोहळा पुण्यात होत आहे हे पुणेकरांचे भाग्य आहे कारण गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर यांच्यात  भक्तीभाव जागृत करण्याची अद्भुत किमया  आहे. स्वत; श्रीधर फडके  यांनी ही बाबूजींची किमया त्याच ताकदीने  जिवंत ठेवली आहे .त्यांचे हे सामर्थ्य वरचेवर वाढत राहो.’
गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले, गीतरामायणाचे आणि सर्वसामान्यांच्या जीवनाचे नाते इतके अतूट आहे की, गीतरामायण कितीही ऐकले तरी त्याची अवीट गोडी संपणारी नाही. सर्वप्रथम आकाशवाणीवर गीतरामायण प्रसारित करण्यात सीताराम लाड यांच्यासारख्या गोवेकरांचा मोलाचा वाटा  होता याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मे  महिन्यात गोव्यातही गीत रामायणाचाही सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी या स्मरणिकेच्या संपादिका अमृता संभूस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया  देसाई यांनी केले. महेश दाबक यांनी आभार मानले.
सांगता समारंभाचा प्रारंभ आज मधुकर सिधये यांच्या शंखवादनाने झाले. त्यानंतर कोल्हापूरच्या डॉ. भाग्यश्री मुळे यांनी गुजराती गीतरामायणातील ‘ विदाय शाने मारी लेता, ज्यां राघव त्यां साथे  सीता ‘ आणि ‘ हरण लावी द्यो मने अयोध्यानाथा’ हि दोन गाणी म्हटली यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या गुजराती गाण्यांचे स्वागत केले. ही  गाणी हंसराज ठक्कर यांनी गुजराती भाषेत अनुवादित केली आहेत.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी , ‘सेतू बांधा रे …’, सुग्रीवा साहस हे भलते…’, ‘शेवटचा करी विचार …’, ‘आज का निष्फळ होती बाण …’, ‘लीनते चारुते सीते …’, स्वामिनी निरंतर माझी…’, त्रिवार जयजयकार …’, ‘प्रभो मज एकाच वर द्या …’, ‘मज सांग लक्ष्मणा …’ आणि ‘गा बाळांनो ….’ ही गाणी म्हणून रसिकांची मने जिंकली. ;यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली.  गीतरामायणाचे  रसाळ निवेदन धनश्री लेले यांनी केले.
आज सायंकाळी पावसाळी वातावरण होते व काही वेळाने पावसानेही हजेरी लावली तरीही श्रोते उत्फूर्तपणे जमले होते. भारतीय शिक्षण मंडळ ( प. महाराष्ट्र ), संतोष पोतदार इव्हेंट्स ( पुणे ),  आणि पर्पल इव्हेंट्स (मुंबई ) यांच्यातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या गीतरामायणाच्या या हीरकमहोत्सवी सोहळ्याचे पृथ्वी एडिफीस, निरामय वेलनेस आणि भारती विद्यापीठ हे प्रायोजक होते.

मेधा पाटकरांनी दिली ‘आप ‘ ला सोडचिठ्ठी

0

मुंबई – लोकसभेत महाराष्ट्रात आप चा दारूण पराभव  स्विकारणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा निषेध करत  केजरीवाल यांना लक्ष्य करीत आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भूषण आणि यादव यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत ते निराधार आहेत, असे नमूद करताना पक्ष भलेही दिल्लीत जिंकला असेल पण राष्ट्रीय स्तरावर राजकीय पर्याय देण्यात पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत  पत्रकार परिषद घेऊनपाटकर यांनी  ‘आप’च्या नेतृत्त्वावर तोफ डागत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले
यादव आणि भूषण यांना आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. केजरीवाल आणि समर्थकांच्या मनमानीविरोधात पक्षातील एक मोठा गट नाराज असल्याचे दिसत आहे. त्यातूनच मेधा पाटकर यांनी बंडाचा पवित्रा घेत ‘आप’ला धक्का दिला आहे.
‘आप’च्या आजच्या बैठकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते. या घटनेचा आपण तीव्रपणे निषेध करत आहे, असे मेधा पाटकर म्हणाल्या. ‘आप’ या पक्षाचा सध्या तमाशा बनला आहे. पक्षात राजकीय तत्वांची पायमल्ली होत आहे, असा आरोपही मेधा पाटकरांनी केला.

‘कुशल ‘ची यशस्वी वाटचाल कौतुकास्पद : अजित गुलाबचंद

0
 हिंदुस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद
हिंदुस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद

पुणे :  बांधकाम  क्षेत्रांत कौशल्यावर आधारित कामगारांचा मोठा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी कौशल्य विकसाबरोबरच त्यांच्या उत्पादन क्षमतेतही वाढ व्हावी हे क्रेडाई कुशलचे  विशेष वैशिट्य आहे आणि त्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो कुशल करीत असलेले प्रयत्न  कौतुकास्पद आहेत त्यांनी त्यांचे काम असेच चालू ठेवून नरेंद्र मोदींच्या कौशल्य विकसाच्या प्रयत्नांना असाच हातभार लावला, असे प्रतिपादन हिंदुस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केलेक्रेडाई पुणे मेट्रो आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन  (एनएसडीसी)च्या  कुशल या उपक्रमाने यशाचा एक नवीन टप्पा यावर्षी गाठला असून एनएसडीसीने  कुशलला दिलेल्या २०,००० पेक्षा जास्त कामगारांना  प्रमाणित आणि प्रशिक्षित  करण्याचे लक्ष्य त्यांनी यशस्वीरीत्या पार केले याप्रसंगी ते बोलत होते.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे शंकर भाई देसाई आणि नीलकंठ जोशी,सारथी ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक योगेश शेंडगे,कुशलचे संयुक्त सचिव कपिल त्रिमल, सचिव अभिजित अचलारे यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षित झालेल्या कामगारांना अजित गुलाबचंद यांच्या हस्ते  प्रमाणपत्रही  देण्यात आलेअजित गुलाबचंद यांनी कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.  कुशलच्या प्रशिक्षणानंतर त्यांच्या कामात आलेले नैपुण्य आणि राहणीमानात झालेले सकारात्मक बदल यावेळी कामगारांनी बोलून दाखवले. गुलाबचंद पुढे म्हणाले, कुशालच्या उपक्रमात कामगारांच्या कामाची गुणवत्ता आणि आवड याला प्राधान्य देऊन त्यांच्या उत्पन्नातील वाढीवर लक्ष दिले जाते यामुळेच कुशलचे प्रशिक्षिण घेतलेल्या कामगारांची बांधकाम क्षेत्रतिल मागणी वाढत आहे.

यादव, भूषण यांची ‘आप ‘ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी

0

नवी दिल्ली –आम आदमी पार्टी (आप)च्या राष्ट्रीय परिषदेच्या प्रचंड गदारोळात झालेल्या बैठकीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठक सुरू असताना मध्येच प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव बाहेर आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, प्रशांत भूषण म्हणाले की, बैठकीमध्ये गुंडांना बोलावण्यात आले होते. काही आमदारांनीही गुंडागर्दी केली. कालच्या स्टींगमध्ये केजरीवाल जे लाथ मारून बाहेर काढण्याबाबत बोलत होते, ते त्यांनी आज करून दाखवले. बैठक पूर्णपणे खोटी आणि सुनियोजित असल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी केला. योगेंद्र यादव म्हणाले, मीटिंगदरम्यान बाऊंसर्सनी त्यांना ओढत बाहेर काढले. केजरीवाल यांनी भाषणादरम्यान गोपाल राय यांना राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्ष होण्यास सांगितले. पण त्यादरम्यानच मनीष सिसोदिया यांनी वोटिंग सुरू केली. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणा दरम्यानच कपिल मिश्र आणि इतर काही आमदारांनी गद्दारांची हकालपट्टी करा अशा घोषणा सुरू केल्या. केजरीवाल यांनीही संपूर्ण भाषणात आमच्यावर हल्ला केला. ते बैठकीच्या अध्यक्षांचे भाषण नव्हते, असे यादव म्हणाले.
हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केला आहे. बैठक पूर्णपणे एकांगी झाली, त्यात आपल्याला कोणत्याही मुद्यावर बोलू दिले नाही, असा आरोपही या दोघांनी केला आहे. बैठकीत गुंडांना बोलवण्यात आले होते. बाऊन्सर्सनी सहकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला चढवला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल म्हणाले की, मी योगेंद्र यादव  आणि प्रशांत भूषण यांच्याबरोबर काम करू शकत नाही. आता तुम्हीच मला सांगा की मी काय करायला हवे?
राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीपूर्वी शनिवारी पक्षाचे नेते संजय सिंह केजरीवाल यांचा बचाव करताना म्हणाले की, केवळ एका व्यक्तीला लक्ष्य केले जात आहे. यादव आणि भूषण यांनी दिल्लीत आम्हाला पराभूत करण्यात काहीही कसर सोडली नाही हे मी स्वतः सांगतो. तरीही केजरीवाल त्यांना काढण्याची भाषा करत नाहीत. ते तर म्हणतात तुम्ही पक्ष चालवा मी माझे आमदार घेऊन बाहेर पडतो.

संगीतकार अमर मोहिले मराठी चित्रपटनिर्मितीत – ‘ए फायनल’ या चित्रपटात मांडणार आंधळ्या मुलीची म्युझिकल कथा

0

 

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी चित्रपटसृष्टीत म्युझिशियन म्हणून दाखल झालेले आणि ‘ चेन्नई एक्स्प्रेस’, ‘शूटआइट अॅट वडाला’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सरकार’, ‘एक हसीना थी’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना आपल्या अविस्मरणीय पार्श्वसंगीताने चार चांद लावणारे हिंदीतील आघाडीचे संगीतकार अमर मोहिले आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. आपल्या ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’ या बॅनरअंतर्गत ते ‘ए फायनल’ या आगळ्यावेगळ्या म्युझिकल चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी चित्रपटांच्या दुनियेतील पार्श्वसंगीतातील एक आघाडीचं नाव असूनही अमर मोहिले यांनी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रनिर्मितीसाठी आवर्जून मायमराठीची निवड केली आहे.

‘अर्जुन’फेम लेखक–दिग्दर्शक एफ. एम. इलियास यांनी ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’च्या या पहिल्या चित्रपटाची धुरा उचलली आहे. कथा त्यांचीच असून त्यांनी व इब्राहिम अफगाण यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद इब्राहिम अफगाण यांचे असून संगीत व पार्श्वसंगीताची बाजू स्वत: अमर मोहिले यांनी सांभाळली आहे व चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी हरप्रीत मोहिले सांभाळत आहेत.

एका आंधळ्या व्हॉयलनिस्ट मुलीची संवेदनशील गोष्ट ‘ए फायनल’ मधून मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात एफ. एम. इलियास म्हणाले की, “कितीही मोठं संकट आलं तरी आयुष्य कसं उत्फुल्लपणे जगायचं, हे सांगणारी ही गोष्ट आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात बरेवाईट प्रसंग येत असतात, पण आयुष्य ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे हिंमत न हारता आयुष्याला अतिशय प्रसन्नपणे सामोरं जायचं असतं, हे या कथेच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केला आहे.”

यातील आंधळ्या मुलीची मध्यवर्ती भूमिका साकारणं हे मोठं आव्हान असून त्यासाठी आपण योग्य अभिनेत्रीच्या शोधात आहोत. प्रस्थापित अभिनेत्रींपैकी काहींचा विचार सुरू असून काही नव्या मुलींचीही ऑडिशन घेत आहोत. संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर तोलून धरेल, अशी क्षमता असलेल्या अभिनेत्रीची आपल्याला गरज असल्याचे ते म्हणाले.

अमर मोहिले यांनी चित्रपटनिर्मितीत प्रवेश करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “ज्येष्ठ संगीतकार व दिवंगत वडील अनिल मोहिले यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला होताच. त्या जोरावर हिंदीत पार्श्वसंगीतकार म्हणून यशस्वी झालो. पण निर्माता झालो तर पहिला चित्रपट मराठीच करायचा, हे आपण ठरवलं होतं. एफ. एम. इलियास यांच्या ‘भाई कोतवाल’ या चित्रपटाचं संगीत करत असतानाच त्यांच्याकडून ही कथा ऐकली, तेव्हा या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला,” असं अमर मोहिले म्हणाले.

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला झी नाट्यगौरवचा शानदार सोहळा

0

2

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

संगीत नाटकांपासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवास आज व्यावसायिक आणि प्रायोगिक या वाटांवरून यशस्वीपणे पुढे जात आहे. आज मराठीमध्ये या दोन्ही रंगभूमींवरून नव्या कल्पना, नवे विषय आणि नवे नाट्याविष्कार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सा-या नाट्याविष्कारांची आणि त्याच्याशी संबंधित कलाकार तंत्रज्ञ यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा पुरस्कार सोहळा म्हणजे झी गौरव. यावर्षीपासून मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांसाठी स्वतंत्र असा झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला. मराठी नाटकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच स्वतंत्र सोहळा मुंबईत २६ मार्चला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. नाट्यसृष्टीमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, घटना यांचा आढावा घेत गीत, नृत्य आणि प्रहसनांच्या माध्यमातून हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनीत ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने ७ पुरस्कार मिळवत सरशी घेतली तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘एक बाकी एकाकी’ ने सर्वोत्तम नाटकाचा मान मिळवला. आपल्या लेखणीतून वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, पार्टी, वासांसि जिर्णानी यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण नाटके मराठीच नव्हे तर जागतिक रंगभूमीला देणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राची महावाहिनी असलेल्या झी मराठीचा झी गौरव हा पुरस्कार म्हणजे चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलावंताच्या कार्याची योग्य दखल घेणारा एक मापदंड बनला आहे. यावर्षीपासून चित्रपटांसाठी  झी चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी झी नाट्यगौरव’ असे दोन पुरस्कार सोहळे होणार असल्यामुळे त्याबद्दल विशेष उत्सुकता होती. चित्रगौरवच्या रंगतदार कार्यक्रमानंतर नाट्यगौरवचा सोहळाही तेवढ्याच देखण्या पद्धतीने पार पडला. यात व्यावसायिक नाटकांमध्ये ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कळत नकळत’, ‘त्या तिघांची गोष्ट, ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ आणि ‘सर्किट हाऊस’ यामध्ये सर्वोत्कृष्ट नाटकासाठीची चुरस रंगली त्यात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाने हा मान मिळवत बाजी मारली. सर्वोत्कृष्ट  नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा, सहाय्यक अभिनेत्री, दिग्दर्शक आणि विशेष लक्षवेधी नाटक असे सात पुरस्कार मिळवत ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सर्वोत्कृष्ट लेखक मिहीर राजदा, अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत असे महत्त्वाचे पुरस्कार मिळवत गोष्ट तशी गमतीची’  हे नाटक यावर्षीचे सर्वोत्कृष्ट नाटक ठरले.

कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव प्रदान करतानाचा क्षण. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि कमलाकर सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पटेल म्हणाले की, “मी ज्या काळात नाटके दिग्दर्शित केली त्याकाळातल्या पिढीसाठी महेश एलकुंचवार जेवढे महत्त्वाचे नाटककार होते तेवढेच ते आजच्या पिढीसाठीही आहेत. त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या नाटकांचे केवळ मराठीतच नाही तर इतर भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही प्रयोग झाले त्यामुळे एलकुंचवार हे ख-या अर्थाने जागतिक रंगभूमीचे लेखक आहेत.” हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत मांडताना महेश एलकुंचवार म्हणाले की, “नाट्यलेखन हा कधीच माझा व्यवसाय नव्हता म्हणून नाटक लिहिणं हा माझ्या जगण्याचा अग्रक्रम बनला नाही. मला जगत राहण्यात प्रचंड मजा येते आणि ही मजा अनुभवतच मी नाट्यलेखन करतो. कारण लेखकपणाची झूल अंगावर पांघरली की जगणं बंद होतं मग आपण केवळ अनुभव  ‘शोधत’राहतो त्यात तांत्रिकपणा येतो आणि आपण अनुभव ‘घेणं’ विसरून जातो. अनुभवाचे एकेक झाड शोधण्याच्या नादात आपलं अरण्य हरवून जातं आणि ते अरण्य हरवण्याची मला जास्त भीती वाटते कारण एकदा का आपल्या जगण्यातलं नैसर्गिकपण हरवलं तर आपल्यातील सर्जकाची अखेर होते.” यावेळी बोलतांना त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्याबरोबरच्या तसेच मुंबईतील टोपीवाला लेनच्या शाळेत रंगणा-या नाटकांच्या आठवणी सांगितल्या.

मराठीतील विशेष नाट्यकृतींचा आढावा घेत हा गौरव सोहळा रंगला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘महाराष्टाची लोकधारा’, ‘आंधळं दळतंय’ यातील प्रहसनं आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’गीत सादर करून शाहीर साबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यानंतर ‘संगीत सौभद्र’, ‘वा-यावरची वरात’, ‘वाडा चिरेबंदी’ पासून ते आजच्या ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ पर्यंतच्या नाट्यकृतींना स्पर्श करत ह्या सोहळ्याची उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. यावर कळस चढवला तो ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने. पं. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजाने आणि अभिनयाने अजरामर झालेल्या या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘सूरत पियाकीया गाण्यांची जुगलबंदी रंगली ख्यातनाम गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्यात.या दोघांच्या गायकीने रसिक भारावून गेले. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संजय मोने आणि हृषिकेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे खुमासदार पद्धतीने निवेदन केले. अनेक मान्यवराच्या उपस्थितीत रंगलेला हा  झी नाट्य गौरवचा सोहळा येत्या एप्रिलला सायंकाळी वा. झी मराठीवरून प्रेक्षकांना बघायला मिळेल.

मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक बिनविरोध पी.ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

0

unnamed

पुणे:

दि. मुस्लिम को-ऑॅपरेटिव्ह बँक लि. पुणेची पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षणतज्ज्ञ पी.ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’ पॅनेल च्या 15 उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुस्लिम बँकेच्या 84 वर्षातील इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली.

27 मार्च 2015 ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती. पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’ पॅनेलचे 15 उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली त्यामुळे ‘अवामी महाज’ पॅनेलचे 15 उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

1931 साली स्थापन झालेली मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक ही 550 कोटी ठेवी असलेली, राज्यात 27 शाखा असलेली आणि ग्रॉस एनपीए 5 टक्के असलेली अग्रगण्य बँक आहे. शिक्षणतज्ज्ञ पी.ए.इनामदार यांनी मुस्लिम बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला तेव्हा बँकेच्या ठेवी फक्त 5 कोटी होत्या. आता त्या 550 कोटींवर पोहोचल्या आहेत. पी.ए.इनामदार हे सातत्याने 38 वर्षे निवडून येत असल्याने वरिष्ठ संचालक ठरले आहेत.
‘अवामी महाज’च्या बैठकीत पी.ए. इनामदार आणि विजयी संचालकांना पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.

मुस्लिम  को-ऑपरेटिव्ह बँक विजयी उमेदवारांची नावे :

पी.ए. इनामदार, शफी दिल्लीवाले (बँकेचे विद्यमान अध्यक्ष), अ‍ॅड. शेख महबूब इलाहीबक्ष, खान लुकमान हाफिजुद्दिन, सय्यद अली रझा इनामदार, अझीम गुडाखूवाला, खान खुदादोस्त मुस्तजाब खान, एस.एम. इक्बाल, शेख चिरागुद्दीन नुरुद्दीन, शेख मुनव्वर रहिमतुल्ला, काझी मुमताझ सय्यद, इनामदार तबस्सुम शौकत, तडवी डी. आर. (अनुसूचित जाती), सय्यद अल्लताफ हैदर (इतर मागासवर्गीय), शिकलगर इम्तियाझ काजी (भटक्या