Home Blog Page 3615

नारायण राणेंच्या निकटवर्तीयाच्या खुनाचा प्रयत्न रिव्हॉल्वर नादुरुस्त झाल्याने फसला

0

मुंबई -काँग्रेस नेतेनारायण राणेंच्या  निकटवर्तीयाच्या खुनाचा प्रयत्न रिव्हॉल्वर नादुरुस्त झाल्याने फसला नारायण राणे यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या गणेश कासवणकर यांच्यावर अज्ञात  हल्लेखोराने कासवणर यांच्यावर रिव्हॉल्वर रोखले पण ते लॉक झाल्याने त्याला पळ काढावा लागला. रविवारी भरदिवसा ही थरारक घटना घडली…
एल्फिस्टनच्या रेल्वे पुलावरून गणेश कासवणकर चालले होते. पुलाच्या मध्यभागी येताच अचानक एकजण मागून आला आणि त्याने खांद्यावर हात ठेवत छातीला रिव्हॉल्वर लावली. त्याने लगेचच ट्रिगर दाबले पण रिव्हॉल्वर लॉक झाली. या घटनेने मला धक्का बसला. मात्र त्याचवेळी त्याला जोरात झटका दिल्याने तो हल्लेखोर पुलाच्या कठड्यावर आपटला. आणि पुलावरून धावतच मी खाली आलो, अशी माहिती कासवणकर यांनी दिली.
पुलावरून उतरताच मी लोकांना मदतीचं आवाहन केलं आणि मोठी गर्दी जमा झाली. काही मिनिटात एक दुचाकी स्वार आला आणि हल्लेखोर त्याच्या पाठिमागे बसला. दोघे प्रभादेवीच्या दिशेने गेले. आणि त्यानंतर पोलिसांना तिथूनच फोन केला, असं कासवणकर म्हणाले. परळ पुर्वेला ते राहतात.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला आहे आणि परिसरातील सीसी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विविध ठिकाणच्या 
सीसी टी व्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. तसंच कासवणकर यांच्या माहितीनुसार हल्लेखोराचे स्केच आम्ही तयार केले आहे. आणि माहितीसाठी सूत्रांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सलमान खान बेवडा तर नारायण राणे माकड –भडकावू ओवेसी बरळला

0

मुंबई -ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीम चे भडकाऊ नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बॉलिवूड स्टार सलमान खान याला ‘बेवडा साहब’म्हटले आहे. तर , काँग्रेसचे उमेदवार नारायण राणें यांना माकडाची उपमा दिली आहे. नारायण राणे माकडासारख्या उड्या मारून या पक्षातून त्या पक्षातून जात असल्याचे सांगत लक्ष्य केले. सलमान-ओवेसींत खुन्नस आहेहे सर्वांनाच ठावूक आहे .महाराष्ट्रात गोमांस बंदी घातली आहे पण त्याऐवजी दारूबंदी केली असती तर मुंबईत गाड्याखाली सापडून लोकांचे मृत्यू तर टाळता आले असते सांगून  सलमानला  ही हिट अँड रन प्रकरणावर लक्ष्य केले.

खासदार ओवेसी यांनी रविवारी सायंकाळी मुंबईतील वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ओवेसी यांनी सर्वच प्रस्तापित पक्षांवर व नेत्यांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असणा-या अभिनेता सलमान खानच्या सध्या सुरु असलेल्या हिट अँड रन प्रकरणावरून त्याला जोरदार लक्ष्य केले. सलमान खान हा एक बेजबाबदार व्यक्ती आणि बेवडा साहब असल्याचे सांगत टीका केली. ओवेसी यांनी जानेवारी 2014 मध्येही सलमान खानला लक्ष्य केले होते. त्यावेळी ओवेसी यांनी सलमान खानचा ‘जय हो’ हा सिनेमा न पाहण्याचे आवाहन केले होते.जानेवारी 2014 मध्ये सलमान खानने भाजपचे तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यादिवशी मकर संक्रातीनिमित्ताने सलमानने मोदींसमवेत पतंग उडवला होता तसेच मोदींची जोरदार स्तुती केली होती. ओवेसींच्या आवाहनानंतर सलमान खानने जोरदार व बिनधास्त वक्तव्य केले होते. जो व्यक्ती चांगले काम करतो त्याचे गुणगाण करणे गुन्हा ठरत नाही. ओवेसींसारख्या लोकांकडे लक्ष न देणेच योग्य असते असे सलमानने ओवेसींना सुनावले होते.सलमानने गुजरातमध्ये जाऊ मोदींच्या मांडीला मांडी लावून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत असे सांगत ‘जय हो’ वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हापासून सलमान-ओवेसींत खुन्नस सुरु आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित ससून रुग्णालयातील बालरुग्णांना बिस्कीट वाटप

0

13

पुणे-भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित भारतीय जनता पार्टी मंगळवार पेठशाखेच्यावतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील बालरुग्णांना भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस  संदीप खर्डेकर यांच्याहस्ते बिस्कीट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन भाजपचे पदाधिकारी सतीश गायकवाड यांनी केले होते . यावेळी माजी नगरसेवक दिलीप उंबरकर , चरणजितसिंग सहानी ,राजाभाऊ पाटील ,  रवींद्र वालिया , भिकनदास सुपेकर , दीपक कदम , बबलू लोखंडे , नवनाथ कांबळे , गणेश कुटे , स्वप्नील फडतरे , संदेश वाघमारे , स्वप्नील गजरमल , बाबा धुमाळ , युसुफ शेख आदीनी या कार्यक्रमाचे संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले .

सतीश राजवाडेंची भाईगिरी

0
दिग्दर्शनामध्ये आपलं नाणं  खणखणीत वाजवल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे अभिनयातही आपली चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी ‘टाईम बरा वाईट’ या सिनेमात  सतीश राजवाडे एका आगळ्या वेगळ्या हटके भूमिकेत दिसणार आहेत. सतीश राजवाडे यांची ही भूमिका त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या चित्रपटात सतीश राजवाडे चक्क भाईगिरी करताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना सतीश राजवाडे म्हणाले  की, मला स्वतःला  ही भूमिका करायला मजा आली. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास ही सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला.
आयुष्यात ‘वेळ’ कधीच, कुणासाठी थांबत नाही, आजच्या धावपळीच्या जगण्यात वेळेचं महत्त्व आपण जाणतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही वेळ केव्हा चांगली असते तर केव्हा वाईट, याच कथाबीजावर बेतलेला ‘टाईम बरा – वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येतोय. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध संकलक राहुल भातणकर ‘टाईम बरा – वाईट’  चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करताहेत.
नेहमीच्या परिघाबाहेर वेगळा कथाविषय प्रेक्षकांना ‘टाईम बरा – वाईट’ सिनेमात पहाता येणार असून मराठीतील अनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेत. यात सतीश राजवाडे, आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘वी. आर. जी. मोशन पिक्चर्स प्रा. लि.’ निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे यांनी ‘टाईम बरा वाईट’ चित्रपटाची निर्मिती केली असून सह निर्माता बाहुल आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा दिग्दर्शनात आता नवी ‘क्रांती’..

0

पुणे,

 

तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय… ज्याची कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला काकण हा सिनेमा येत्या 10 एप्रिल 2015 रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती मुंबईत झालेल्या दिमाखादार सोहळ्यात जाहीर करण्यात आली. या सिनेमाचं आकर्षण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांची निर्मिती मँगोरेंज प्रॉडक्शन्सचे असून कथा-पटकथा- संवाद अन् गीते क्रांती रेडकर आणि मंगेश दत्त यांचे असून बिथिन दास यांची सिनेमॅटोग्राफी आहे तर महेश कुडाळकर यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 1970च्या काळातील एक प्रेमकथा इतकंच या सिनेमाचं मर्यादित स्वरूप नाही. तो काळ आपल्यासमोर उभा करणं अन् प्रेम या संकल्पनेतील उदात्त स्वरूपाची गोष्ट जी गोष्ट आपल्या आजच्या जगण्यातून हरवत चालली आहे. त्या गोष्टीला अधोरेखित करण्यात आले आहे.

काकण म्हणजे बांगडी… काकण ही एक शोकांतिका आहे… एका तरूण प्रेमी युगुलाची… ज्यांची त्या काळात एकमेकांपासून ताटातूट झाली आहे अन् कालांतराने ते एकमेकांसमोर येतात… त्या काळात तरी नियती त्यांच्यासोबत उभी राहते… नेमकं त्यांच्या प्राक्तनात काय लिहिलंय… हे आपल्याला सिनेमात उलगडत जातं. अत्यंत तरलपणे आयुष्यातील भूतकाळ अन् वर्तमान काळाची सांगड इथे घातली गेल्याचं आपल्याला दिसतं. कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हे सारं काही चित्रित करण्यात आलं आहे.

याप्रसंगी दिग्दर्शनाचं आव्हान पेलणारी क्रांती रेडकर म्हणाली की, आजच्या संगीत प्रकाशन सोहळ्यामधल्या गाण्यांनी एक मैफल सजली… त्यावर दमदार परफॉर्मन्स झाले… संगीतकार अन् गायकांनी या सोहळ्यामध्ये इंद्रधनु खुलवलं. आज मी खूप खूष आहे. यासोबत क्रांतीने पुस्ती जोडली ती म्हणाली की, दिग्दर्शन क्षेत्रात मी अपघाताने आले नाही. सिनेमाच्या तांत्रिक बाबी मला कायम आकर्षित करत राहिल्या होत्या. फिल्ममेकिंगकडे त्यामुळेच वळले. त्यामुळेच ज्यावेळी या सिनेमाची गोष्ट लिहिली अन् माझ्या आप्त स्वकीयांना ऐकवली. माझ्या आईवडिलांनी त्याक्षणी हा सिनेमा तू दिग्दर्शित करण्याचा सल्ला दिला… कारण तू या गोष्टीला न्याय देऊ शकतेस असा त्यांचं म्हणणं होतं.हा सिनेमा पूर्ण होणं हा माझ्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव होतापण त्याक्षणी माझी संपूर्ण टीम कुटुंब, या क्षेत्रतील सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून हा सिनेमा पूर्ण करू शकले हे मी जाणीवपूर्वक इथे नमूद करू इच्छिते. माझ्या टीमने प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहे, त्यांचे या सिनेमाच्या पूर्णत्त्वामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. त्यांची मी उतराई होऊ शकत नाही.दिग्दर्शनातील पदार्पणाच्या एका हुकमी एक्क्यानंतर आता क्रांती आपल्यासमोर गीतकार म्हणून येत आहे. काकण सिनेमातील दोन गाण्यांचे शब्द हे तिच्या लेखणीतून साकार झाले आहेत. क्रांतीचं ‘सुकी पोळी’ हे गाणं श्रीराम अय्यरच्या स्वरसाजाने अधिक गहिरं झालं आहे तर हमसिका अय्यरने मनाला साद घालणारे ‘साजणा’ सारखं दुसरं गाणं गायलं आहे. या गाण्याला गीतलेखनाला साह्य केलं आहे ते ओंकार मंगेश दत्त या गुणी गीतकाराने. या सिनेमातील आणखी तीन गाण्यांना ओंकारच्या शब्दकळेने अधिक खुलवलं आहे. तर अजय सिंघासारख्या प्रतिभावंत संगीतकाराच्या परिसस्पर्शाने संगीत एका वेगळ्या उंचीवर गेलं आहे. चर्चेत असलेल्या काकणच्या टायटल ट्रॅकला ख्यातनाम गायक शंकर महादेवनने आपल्या अनोख्या शैलीत पेश केलं आहे अन् त्यांना साथ लाभली आहे ती गुणी गायिका नेहा राजपालची. या सोबत श्रीराम अय्यरचे गोपी दादा… हे गाणं अन् वेड्यांचे घर उन्हात हे गाणं स्वप्नील बांदोडकरच्या मधाळ आवाजात ऐकताना अधिक रंगतदार वाटते.

रंगला टाइमपास २ चा संगीत ध्वनीप्रकाशन सोहळा

0

13 14 11 12 16 17 18 20 22 23

‘मला वेड लागले प्रेमाचे’ म्हणत गेल्या वर्षी समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला चित्रपट म्हणजे ‘टाइमपास’. कुमारवयात मनात फुलणा-या प्रेमाच्या भावना त्यावर आधारीत सुंदर कथा, जबरदस्त संवादांनी भरलेली पटकथा, कलाकारांचा तगडा अभिनय आणि सोबतीला तेवढंच सुमधूर संगीत. या सर्वांच्या आधारावर ‘टाइमपास’ या चित्रपटाने इतिहास रचला. यात प्रथमेश परबने साकारलेल्या दगडूला आणि केतकी माटेगावकरने साकारलेल्या प्राजक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या दोघांच्या लवस्टोरीने सर्वांची मने जिंकली. टाइमपास या चित्रपटाच्या शेवटी दगडू आणि प्राजक्ताची लवस्टोरी पूर्ण झाली नव्हती पण चित्रपट संपताना पडद्यावर to be continued… अशी अक्षरे झळकली तेव्हाच या चित्रपटाचा दुसरा भाग (सिक्वल) येणार हा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आणि तेव्हापासून टाइमपास २ ची उत्कंठा सुरू झाली. या नव्या चित्रपटात दगडू -प्राजक्ता कोण असणार याचे आढाखे बांधले जाऊ लागले, शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या. प्रेक्षकांनी तर आपापले पर्याय निर्मात्यांना सुचवायला सुरूवातही केली आणि प्रेक्षकांच्या या आतूरतेने निर्मात्यांना तात्काळ ‘टाइमपास २’ आणायला भाग पाडले. अनेक सुमधुर आणि धम्माल गीतांनी सजलेल्या या ‘टाइमपास २’ चित्रपटाच्या ध्वनीप्रकाशनाचा सोहळा बॉलिवुडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना सचिनजी म्हणाले की, “रवी जाधव हा कमालीचा हुशार दिग्दर्शक आहे हे त्याने आजवरच्या त्याच्या सर्वच चित्रपटांमधून सिद्ध केलंय. ‘टाइमपास’ या चित्रपटाने यशाचे सर्व विक्रम मोडत जो इतिहास घडवला तसंच यश ‘टाइमपास २’ ला ही मिळो.” या चित्रपटाला शुभेच्छा देताना रितेश म्हणाला की, “या चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यापासूनच तो पूर्ण चित्रपट मला कधी बघायला मिळेल याची उत्सुकता लागलीये. हा टीपी २ सर्व प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि भरघोस यश मिळवेल याची मला खात्री आहे.” या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव, संगीतकार चिनार – महेश, गीतकार मंगेश कांगणे, चित्रपटाची निर्मिती करणा-या अथांश कम्युनिकेशन्सच्या मेघना जाधव, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, बिझनेस हेड निखिल साने, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइमपासच्या या सिक्वलमध्ये दगडू आता झालाय रॉकी आणि या रॉकीची भूमिका साकारतोय हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव तर प्राजक्ता साकारतेय गुणी अभिनेत्री प्रिया बापट. मोठा झालेला दगडू म्हणजेच रॉकी चाळ सोडून गेलेल्या प्राजक्ताच्या शोधात निघालाय हे या ‘टाइमपास २’ चं कथानक. ‘टाइमपास’ प्रमाणेच ‘टाइमपास २’ चं वैशिष्ट्य ठरणार ते यातील धम्माल आणि रोमॅंटिक गाणी. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत दिलंय चिनार-महेश यांनी. ‘टाइमपास २’ या चित्रपटात एकूण ७ गाणी असून त्यात रोमॅंटिक, धम्माल डान्स नंबर, विरहगीत  अशी विविध मूड्सची गाणी आहेत. यातील सध्या सर्वत्र गाजत असलेलं गाणं म्हणजे बॉलिवूडमधला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने गायलेलं ‘वॅऊ वॅऊ’ हे गाणं. अॅम्ब्युलंसच्या सायरनवर धरलेला ठेका आणि सर्वांना ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं आहे. याव्यतिरिक्त यात ‘प्राजू’ हे गीत गायलंय महालक्ष्मी अय्यर आणि ऋषिकेश कामेरकर याने तर ‘मदन पिचकारी’ हे गाणं अपेक्षा दांडेकर आणि प्रसिद्ध बॉलिवुड रॅपर इश्क बेक्टरने गायलंय. गायलंय. ‘तू मिला’ हे रोमॅंटिक गाणं शाल्मली खोलगडे आणि निखिल डिसुझा यांनी गायलं असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं ‘दगडू सावधान’ हे भन्नाट गीत गायलंय ऋषिकेश कामेरकर, चिनार खारकर, विवेक नाईक यांनी. याशिवाय प्रेमातील हळवेपणा व्यक्त करणारं ‘सुन्या सुन्या’ हे गीत आदर्श शिंदे आणि केतकी माटेगावकर यांनी स्वरबद्ध केलंय. ‘टाइमपास’ मधील ‘ही पोली साजूक तुपातली’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. याच गाण्याचा ठेका धरत ‘ही पोली साजुक लेलेची रं हिला परबाचा लागलाय नाद’ हे धम्माल टाइमपास गाणं गायलंय आनंद शिंदे यांनी.

‘टाइमपास’च्या जबरदस्त यशानंतर तीच टीम ‘टाइमपास २’ घेऊन येतेय. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास २’ चं दिग्दर्शन केलंय रवी जाधव यांनी. चित्रपटाची कथा रवी जाधव यांचीच असून त्यांनी प्रियदर्शन जाधव, क्षितिज पटवर्धन यांच्या सोबतीने पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचं छायालेखन वासुदेव राणे यांनी तर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलंय. चित्रपटात प्रियदर्शन आणि प्रियासह वैभव मांगले आणि भाऊ कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटाच्या यशानंतर एस्सेल व्हिजनचा हा नवा चित्रपट येत्या १ मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

आणि डी एसके गप्पांमध्ये उलगडले सुखी जीवनाचे रहस्य …. उलगडले

0

पुणे : ”प्रत्येकजण आपल्या स्वतंत्र विचाराने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सहजीवनात स्वतंत्र
विचारांना  तेवढाच मान दिला तर संसार अधिक छान पद्धतीने फुलतो” अशा गोड शब्दात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-
टिकेकर यांनी त्यांच्या सुखी संसाराचे रहस्य रसिकांसमोर उलगडले.

गेली ३५ वर्ष कलाकार म्हणून आणि नवरा बायको म्हणून एकमेकांना साथ देत असलेल्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर आणि उदय टिकेकर यांनी त्यांच्या कलाजीवनाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.  डी. एस. कुलकर्णी फौंडेशन आयोजित डीएसके गप्पांमध्ये काल राजेश दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. राजेश दामले यांनी आपल्या खुमासदार शैलीने या दांपत्याच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास पुणेकरांसमोर उलगडला.
उदय टिकेकर म्हणाले,  ”कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते.  आपण त्या व्यक्तीला तिच्यातल्या चांगल्या- वाईट गोष्टींसकट स्वीकारल्याने तिचा आपल्या बद्दलचा आदर वाढतो.”
आरती अंकलीकर- टिकेकर म्हणाल्या ,”आम्ही एकाच प्रकारच्या कलाक्षेत्रात असलो तरी एकमेकांशी स्पर्धा करत
नाही  याउलट परस्परांच्या कलेचा आणि त्याच्या विचारांचा स्वीकार करतो. आम्ही परस्परांच्या प्रत्येक कामाचे गुण- दोष
एकमेकांना सांगतो  त्यातुनच मग आपले काम अधिकाधिक चांगले कसे होत जाईल याकडे याकडे लक्ष देतो त्यामुळेच आमच्यातील
मैत्रीचं नातं अजूनही कायम आहे.”   डी. एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के यांनी यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

इंग्रजीच्या दुराग्रहापोटी सातत्याने मराठी भाषेवर अन्याय … शरद पवारांची खंत

0

2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

घुमान -इंग्रजी भाषेच्या दुराग्रहापोटी मराठी भाषेवर सातत्याने अन्याय झाल्याची भावना आज येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी व्यक्त केली ते म्हणाले ,इंग्रजी भाषेचा दुराग्रह धरणे हे कितपत संयुक्तिक आहे. मी जगभरात प्रवास केला आहे. जर्मनी, रशिया, इटाली, फ्रान्स, जापान, चीन, कोरीया अशा कितीतरी प्रगतीशील देशांमध्ये स्वदेशी भाषेचा पुरस्कार केला जातो. स्वभाषेचा वापर करून ते देश वैज्ञानिक प्रगतीत, उदयोग व संशोधनात मागे राहिले नाहीत. पण भारतीयांना भीती का वाटावी? .1960 साली मुंबईत 52 टक्के लोक मराठी भाषिक होते; आज तीच संख्या 22 टक्क्यांवर आली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या भागातही मराठी भाषिकांचे प्रमाण खालावले आहे. मराठी शाळा शहरातून हद्दपार होत चालल्या आहेत. मराठी शाळेतून शिकणे हा नव्या पिढीला कमी पणा वाटतो. पालकांचाही दृष्टीकोन तसाच होत चालला आहे. मान्य आहे की, माहितीयुगात जग जवळ येत चालले आहे आणि स्वभाषेने इतका व्यापक संवाद साधता येत नाही. पण विमानप्रवास, कलाक्षेत्रे, शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आधुनिक ठिकाणी दोन मराठी माणसेही परस्परांशी मराठीत बोलत नाहीत. दाक्षिणात्य राज्यांनी हेतूपूर्वक भाषिक संस्कृती जतन केली आहे. त्यांनी इंग्रजीही उत्तमरीत्या ज्ञात केली आहे आणि स्वभाषेचाही पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रात मात्र मराठी माणूस असे संतुलन राखण्यात कमी पडतो. महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ठोस पाऊले उचलली गेली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.भाषावार प्रांतरचनेतील त्रुटींमुळे मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात विभागला गेला. महाराष्ट्रातच मराठी भाषा मागे पडत चालली आहे तर इतर राज्यांमधील मराठीची अवस्था काय वर्णावी ? कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, धारवाड या मराठी भाषिकांवर व मराठी भाषेवर सतत अन्याय होत आहे. माझे पक्षातील सहकारी व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांचा या व्यासपीठावरून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी बेळगावात जाऊन मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला. पण आबा ठाम राहिले.

घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी केलेलं भाषण वाचा …

88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री प्रकाशसिंह बादल, संमेलनाचे उद्घाटक माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे, स्वागताध्यक्ष श्री. भारत देसडला, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक श्री गुरुदयालसिंग,, डॉ. माधवी वैद्य, श्री.  साहित्य संमेलन महामंडळाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्मानयीय पाहुणे व संतश्रेष्ठ नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या घुमान गावी प्रचंड संख्येने जमलेले मराठी व अमराठी सारस्वत आणि साहित्य रसिक… मी आपणां सर्वांचे मनापासून स्वागत करतो.यंदाचे साहित्य संमेलन माझ्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. कारण यावर्षी मी हॅट्रिक पूर्ण करतोय ! 86 व्या चिपळूण, 87 व्या सासवड आणि 88 व्या घुमान अशा सलग तीन संमेलनांला मला हजेरी लावण्याची संधी मिळाली. मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे याबद्दल आभार व्यक्त करतो.

आज घुमान येथे आल्याचा मला मनापासून आनंद होत आहे.

आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती ।
जालीसे विकृती । पापतापा ।।

चालिले देखोनी वैष्णव जगजेठी।
उभविती वैकुंठी । गुढीया देव ।।

संत नामदेवांनी वरीलप्रमाणे जसे विठ्ठलभक्तांच्या वारीचे वर्णन केले आहे, अगदी तसाच आनंद आजचा सोहळा पाहताना वाटत आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण नुकताच साजरा झाला आहे. आजचा शानदार सोहळा पाहून वैकुंठातील देव देखील गुढ्या उभारत असतील असे म्हणावयास हरकत नाही. कारण या संमेलनाच्या निमित्ताने केवळ साहित्य प्रसाराची आणि भागवत धर्माची पताकाच पुन्हा फडकली जात नाही, तर महाराष्ट्र-पंजाब मैत्रीचे, धार्मिक मिलाफाचे, दोन विभिन्न संस्कृतींच्या संगमाचे नवे पर्व सुरू होत आहे. साहित्य संमेलनाच्या सभामंडपाचे श्री गुरू नानक देवजी असे साजेसे नामकरण केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन !

मुझे इस बात की बहुत खुशी हैं की, यह संमेलन पंजाब में हो रहा हैं । इस संमेलन की कामयाबी में बादल साहब की नेतृत्ववाली पंजाब सरकार ने बहुत बडा योगदान दिया हैं। मुझे कहने में गर्व हैं की, हिंदुस्थान के आझादी संग्राम में पंजाब राज्य का और खास कर शीख समाज का महत्वपूर्ण योगदान हैं । आझादी मिलने के उपरांत भारत देश पर जब-जब हमलें हुए तब -तब हमारें बहादूर शीख भाईंयोंने देश की रक्षा के लिए बहुत बडी किमत दी है । भारतवर्ष में अनाज की जब भी कमी थी, तब पंजाब के मेहनती किसान भाई-बहनोंने देश की भूख मिटानें के लिए अपना पसीना बहाया हैं । और मुझें खुशी हैं की बादल साहब इनका नेतृत्व कर रहें हैं । अभी हाल ही में भारत सरकार ने उन्हें पद्मविभूषण सें सम्मानित कर कें उनकी देशवासींयों के प्रति सेवा का स्मरण रखा । मुझे कई सालों से उनकें साथ काम करने का मौका मिला । मुझे याद हैं की, बादल साहब, स्व. देवीलालजी और मैंने दिल्ली शहर में सबसे बडी रैली का आयोजन किया था । इससे किसांनो की समस्यांओ की ओर देश के समस्त देशवासीयों का और राज्यकर्ताओंका ध्यान गया । मुझे याद हैं की, जब बादल साहब, बरनाला साहब और लोंगोवालजी पंचमढी के जेल में पंजाब आंदोलन के कारण बंद थे, तब कोई रास्ता निकालने के लिए भारत सरकारने मेरे कंधो पर जिम्मेदारी दे दि थी । पिछले दस सालों सें कृषि मंत्रालय की मेरे उपर जिम्मेदारी थी । तब अनाज की उपज के नये कीर्तीमान स्थापित हुए और निर्यात में तो पूरी दुनिया में भारत का अहम स्थान रहा । इसमें पंजाब के किसानों का योगदान सराहनीय था । इन्ही किसानों के साथ बादल साहब का तब भी नेतृत्व था और आज भी हैं ।

इस मराठी साहित्य संमेलन में आये हुए पंजाब के साथीयों को आज मैं मराठी के बारें में कुछ बताना चाहता हु ।

देश के क्लासीक लँगवेजेस में मराठी एक अनोखी भाषा हैं । सारी दुनिया में जितनी भी भाषाएँ बडी संख्या में लोग बोलते हैं , उन सबमें संख्या के क्रम में मराठी भाषा दसवें नंबर पर हैं । इतनें बडे पैमाने पर बोली जाने वाली इस भाषा के इतिहास में आज का दिन इस लिए महत्वपूर्ण हें की, महाराष्ट्र सें दूर आप के हार्दिक सहयोग से संत बाबा नामदेव जी की कर्मभूमी में यह संमेलन संपन्न हो रहा हैं । इस संमेलन में शरीक होने के लिए महाराष्ट्र से आये मराठी भाषा प्रेमींयों का पंजाब सरकारने दिल खोल के स्वागत किया हैं। संमेलन की सारी व्यवस्थाओं का बडे उत्साहोंके साथ जिम्मा उठाया हैं। संयोजकों की ओर से मैंने आपके सहयोग के लिए छोटी सी बिनती की थी, उसे आप सबने और खास तौर पर पंजाब सरकारने, हमारे उमीद से जादा सर-आँखो पर बिठाया । जिस हर्ष के साथ हम महाराष्ट्रवासीयोंके लिए आपने इतना कुछ किया, उसे हम कभी भुल नही सकते। इस लिए व्यक्तिगत रूप से मैं आपका तहे दिलसे शुक्रिया अदा करता हूँ । साथ ही हम सब की ओर सें यह कहना चाहता हूँ की, आने वाले अनेक सालों तक आपका यह स्वागत महाराष्ट्र की मराठी जनता याद करेगी । इस देश की राष्ट्रीय एकात्मता के इतिहास में पंजाब और महाराष्ट्र का यह ऐतिहासिक मीलन है। जिसे मिसाल की तौर पर याद किया जाएगा । यह संमेलन मराठी भाषा का उत्सव हैं। कई वर्षों से इसे बडी धूमधाम से मनाया जाता है । आपकी अनुमती से मेरें विचार मैं मराठी भाषा में पुनः रखना चाहता हूँ ।

माझं गाव कवी मोरोपंतांची बारामती वारकरी मार्गावरच असल्याने अगदी लहानपणापासून मी पंढरीची वारी पाहत आलो आहे. पंढरीचा विठ्ठल ‘जे का रंजल्या-गांजल्यांचा’ देव, दीन-दुबळयांचा, पददलितांचा, कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा देव ! आषाढी – कार्तिकीला विठ्ठलाच्या दर्शनाला हे सारे वारकरी कष्टी जीवनातून वेळ काढून, दैनंदिन दुःख विसरून, ऊन वारा-पावसाची तमा न बाळगता ‘ग्यानबा-तुकारामाचा’, ‘विठ्ठलनामाचा’ गजर करीत शेकडो मैल प्रवास करतात, हे मी पाहत आलो आहे. वारकऱ्यांच्या या ‘न थकण्यामागे’ एक रहस्य आहे. विठ्ठल मंदिरात प्रवेश केल्यावर नामदेव पायरीला स्पर्श करताच त्यांच्या अंगी नवी ऊर्जा येते. संत नामदेवांनी आयुष्यभर इतकी प्रचंड भ्रमंती केली त्याचं स्मरण होताच थकवा राहणार तो कसा ?

आज घुमानमध्ये अगदी तसाच ओसंडून वाहणारा उत्साह मला तुम्हा साहित्यप्रेमींमध्ये दिसत आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संत महात्म्यांनी भागवत धर्माचा, मानवतेचा प्रसार केला. संत नामदेवांनी तर विठ्ठल भक्तीची व वारकरी संप्रदायाची पताका उत्तर भारतात फडकविली. “नामा तयाचा किंकर, तेणे केला हा विस्तार” अशी संत नामदेवांच्या योगदानाची महती आपण अभिमानानं सांगतो. आज त्यांनी केलेल्या अमोल कार्याची प्रचीती येत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन विभिन्न प्रांतांतील जनतेत सुसंवाद घडून येत आहे. शीख संप्रदायाचे दहावे गुरू गोविंदसिंह यांच्या हौतात्म्यानं पवित्र झालेल्या हुजूर साहिब नांदेड या धर्मस्थळामुळे महाराष्ट्र ज्याप्रमाणे पंजाब राज्याशी जोडला गेला त्याच प्रमाणे संतश्रेष्ठ नामदेवांच्या घुमान येथील वास्तव्यामुळे दोन्ही राज्ये, दोन संप्रदाय एकमेकांशी जोडले गेले आहेत.

इ.स. 1326 च्या सुमारास नामदेव गुजरात, राजस्थान व तेथून पंजाब भागात गेले आणि घुमान गावी काही वर्षे वास्तव्य केले. नामदेव कालीन ‘घुमान’ जंगलराईचा भाग होता. वायव्येकडून सतत आक्रमणांचा ओघ चालू असतानाही नामदेवांनी तेथे 18 वर्षे वास्तव्य केले, महंमद तुघलकाचाही त्रास सहन केला. परंतु वारकरी धर्माची पताका अखंड फडकावित ठेवली. घुमान येथील वास्तव्यकालात नामदेवांनी हिंदी भाषेत पद्यरचना करून संतसाहित्यात मोलाची भर घातली. या पद्यांपैकी 61 पद्यांचा समावेश ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात आहे. घुमान येथे नामदेवांचे अनेक शिष्य झाले. त्यांचे अनेक शिष्य भागवत धर्माच्या परंपरेनुसार जाती पंथांच्या पलिकडले होते. बहोरदास हे पंजाबी शिंपी, भटीवालचे जाल्लो सुतार, घुमान जवळील सखोवाल गावचे लध्धा खत्री हे किराणा मालाचे व्यापारी अशा काही नावांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. शीख धर्माचा उदय नामदेवांच्या नंतर सुमारे 100 वर्षांनी झाला त्यामुळे संत नामदेवांच्या आचार व विचाराने मानवतावादी शीख धर्माच्या उदयासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार होण्यास मदत झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

माझ्या माहितीप्रमाणे बहोरदासाचे वंशज आजही घुमानच्या नामदेवांच्या मंदिराची – साधनास्थळाची व्यवस्था पाहतात. घुमानवासीयांनी बाबा नामदेवांच्या भक्तांनी या संगमरवरी साधनास्थळाची उत्तम व्यवस्था ठेवली आहे याबद्दल पंजाब सरकारचे व घुमानवासीयांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. घुमान येथील नामदेव मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात आजही यात्रा भरते. माझ्या माहितीप्रमाणे पंजाबातील बहुसंख्य शिंपी समाज नामदेव संप्रदायी आहे, त्यांना ‘चिम्बा’ म्हणतात व आश्चर्याची बाब म्हणजे ते वारकऱ्यांप्रमाणे गळ्यात तुळशीच्या माळा वापरतात. पंजाब प्रांतातील शिंपी समाजासाठी घुमान उत्तरेकडील पंढरपूरच आहे.

संयोजकांनी साहित्यसंमेलनासाठी एका संतस्थळाची केलेली निवड सार्थ आहे. कारण मराठी साहित्याची सुरुवातच संतसाहित्यापासून झाली. महानुभाव चक्रधरस्वामी, ज्ञानेश्वर यांचे विचार व शिकवण संतसाहित्यात प्रतिबिंबित झाल्याने मराठी साहित्याचा उगम व विकास झाला. मुकुंदराजांच्या विवेकसिंधू पासून उगम पावून ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव घेत मराठी साहित्य आज संत, पंत, तंत या साहित्य परंपरांच्या पुढे जाऊन तळागळापर्यंत पोहोचले आहे. नामदेवांनी मराठी साहित्यात अनमोल योगदान दिले आहे. आत्मचरित्रपर अभंग, कृष्णचरित्रपर अभंग, तीर्थावळी, बाळक्रीडा व संतचरित्रे यांचा समावेश नामदेवांच्या साहित्यात होतो. नामदेवांना श्रीकृष्णाच्या बाललीला वेड लावत.

दुडदुड पळती, मुखी घाली माती, शेणात लोळती, दोघेजण ।
नंदाच्या पुढील ओढीताती ताटा, मिटक्या मटमटा, वाजविती ।।

कृष्ण आणि बलराम यांच्या बाललीलेचं इतकं मूर्तिमंत वर्णन त्याची साक्ष देतात.

श्रीकृष्ण वनात जाताना गोपींच्या देहभान हरवलेल्या अवस्थेचे वर्णन देखील नामदेवांनी खूप सुंदर रीतीने केले आहे.

विंचरिता वेणी, तेथे राहे फणी, करिता भोजनी, ग्रास मुखी ।
उदकाचे कुंभ गोपिकाचे शिरी, यमुनेच्या तिरी, वेडावल्या ।।

नामदेवांच्या पद्यरचनांतून भक्तिरस, वात्सल्य, कारुण्य शब्दागणिक पाझरते. त्यांच्या वाणीत गोडवा आहे. मला वाटतं याची अनुभूती तुम्हाला या काव्यपंक्ती ऐकून आली असेल.

ज्याप्रमाणे साहित्यसंमेलनाची स्थळ निवड सार्थ आहे, त्याचप्रमाणे संमेलनाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची झालेली निवड देखील औचित्यपूर्ण आहे. संत तुकारामांचे वंशज असलेले सदानंद मोरे हे स्वतः संत साहित्याचे, इतिहास व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. संत-महात्म्यांनी दिलेली मानवतेची शिकवण, ज्ञानेश्वरांनी पसायदानातून दिलेला विश्वात्मक शांतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना हाती घेतील याचा मला विश्वास आहे.

संतवाङ्मयात सर्व संतांनी सांगितलेली मूल्यशिक्षण व्यवस्था आणि विश्वात्मक शांतीचा संदेश जो ज्ञानदेवांनी पसायदानातून दिला त्याची आज जगाला नितांत गरज आहे. आजही जगात शांततेचे नोबेल पारितोषिक स्वतंत्रपणे दिले जाते. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी शांतीचा संदेश जगाला दिला. शांती म्हणजे केवळ ‘पीस ऑफ माइंड’ नव्हे ! शांती म्हणजे समाधानाला सखोल जाणीव देणे! इतरांना तृप्त करीत स्वतः तृप्त होणे… याला शांती म्हणतात! ‘मार्गाधारे वर्तावे आणि विश्व हे मोहरे लावावे’ ही शांतता संतांनी विश्वाला शिकविली. चर्चमध्ये दरवर्षी नाताळला तीच प्रार्थना करतात. शाही इमाम दरवर्षी रोजेचे उपवास सोडताना सुद्धा अल्लापाशी शांतताच मागतात. कारण शांती हा वैचारिक अधिष्ठानाचा पाया आहे. कुठलाही विचार क्रांतीतून, युद्धातून रुजत नाही. पण विचाराची बैठक व फलश्रुती जर शांतीत होत असेल तर तो विचार चिरंजीव ठरतो. म्हणूनच गांधीजींच्या पुतळ्याची गरज ब्रिटनला वाटते आणि अमेरिकेलाही वाटते. युनोतही बैठक संपल्यानंतर शांतीचीच प्रार्थना होते. संत वाङ्मय टिकण्याचे सगळयात मोठे तत्त्व मनःशांती आहे. गाडी ओढणाऱ्या हमालालाही पसायदान ऐकल्यानंतर शांत झोप लागते आणि मुंबईच्या पेडर रोडवर राहणाऱ्या धनिकालाही पसायदानाने शांती मिळते. हे जे सुख आहे या आत्मसुखाला संतांनी विश्वात्मक देव मानले आणि माणसा-माणसांतला देव पाहिला. म्हणून संतांनी जातीला कधीही स्थान दिले नाही. मानवतेला स्थान दिले. अशा प्रकारच्या साहित्याची गरज आजही साहित्य संस्थांकडून व्यक्त केली जाते. त्याचे भान साहित्यिक म्हणविणाऱ्या सर्वांनी ठेवावे अशी अपेक्षा कुणी केली तर ते चुकीची ठरू नये.

नवी पिढी संतांची शिकवणच नाही तर मराठी भाषाच विसरत चालली आहे. वाढत्या शहरीकरणाचा व आधुनिकीकरणाचा हा परिणाम आहे. मुंबईचे उदाहरण घेता 1960 साली मुंबईत 52 टक्के लोक मराठी भाषिक होते; आज तीच संख्या 22 टक्क्यांवर आली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या भागातही मराठी भाषिकांचे प्रमाण खालावले आहे. मराठी शाळा शहरातून हद्दपार होत चालल्या आहेत. मराठी शाळेतून शिकणे हा नव्या पिढीला कमी पणा वाटतो. पालकांचाही दृष्टीकोन तसाच होत चालला आहे. मान्य आहे की, माहितीयुगात जग जवळ येत चालले आहे आणि स्वभाषेने इतका व्यापक संवाद साधता येत नाही. पण विमानप्रवास, कलाक्षेत्रे, शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आधुनिक ठिकाणी दोन मराठी माणसेही परस्परांशी मराठीत बोलत नाहीत. दाक्षिणात्य राज्यांनी हेतूपूर्वक भाषिक संस्कृती जतन केली आहे. त्यांनी इंग्रजीही उत्तमरीत्या ज्ञात केली आहे आणि स्वभाषेचाही पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रात मात्र मराठी माणूस असे संतुलन राखण्यात कमी पडतो. महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ठोस पाऊले उचलली गेली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

भाषावार प्रांतरचनेतील त्रुटींमुळे मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात विभागला गेला. महाराष्ट्रातच मराठी भाषा मागे पडत चालली आहे तर इतर राज्यांमधील मराठीची अवस्था काय वर्णावी ? कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, धारवाड या मराठी भाषिकांवर व मराठी भाषेवर सतत अन्याय होत आहे. माझे पक्षातील सहकारी व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांचा या व्यासपीठावरून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी बेळगावात जाऊन मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला. पण आबा ठाम राहिले.

मराठी सत्तेच्या विस्ताराने मराठी भाषाही विस्तारली. इंदौर, ग्वाल्हेर, उज्जैन भागात आजही मराठी मोठया प्रमाणावर बोलली जाते, याचे समाधान वाटते. हरियाणा, ओरीसा, गुजरात, आंध्र, तामिळनाडू आदी भागातही मराठी माणूस आहे परंतु तिथे मराठी भाषेचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हरियाणातील मराठी माणसांना रोड मराठा म्हणतात. पानिपत युद्धानंतर काही मराठा मंडळी हरियाणातच स्थायिक झाली. दिल्लीत असताना ही मंडळी मला अभिमानानं भेटायला येतात. ते मराठी आहेत, पण आता मराठी भाषेची जागा हरियाणवीने घेतली आहे. इतर भागात असे होऊ नये म्हणून कंबर कसावयास हवी. घुमान येथे साहित्य संमेलन घेणं त्यादृष्टीने महत्वाचं ठरतं.

मराठी भाषेपासून नविन पिढी दूर जाण्याचं, मराठी शिकण्यात निरुत्साह असण्याचं कारण मराठी भाषा आधुनिकतेची कास धरत नाही असं काही मंडळी म्हणतात. मराठी भाषा केवळ ज्ञानभाषा न राहता ती विज्ञान भाषा होणे यासाठी गरजेचे आहे. मराठी भाषेत त्या दिशेने प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाले आहेत. श्रीधर केतकरांनी मराठी ज्ञानकोषाचे संपादन केले, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशींनी मराठी विश्वकोषाचे अविस्मरणीय असे काम केले. त्यांनी मराठी भाषेला विज्ञान, तंत्रज्ञानातील अनेक चांगले व समर्पक शब्द मराठीला दिले. पण ऐतिहासिक कार्य करणाऱ्यांच्या कष्टाचं चीज होत नाही. डॉ. केतकरांचा मृत्यू वयाच्या 53 व्या वर्षी पुण्याच्या ससून रुग्णालयात हालाखीत झाला.

आज विज्ञानासंबंधी सुबोधपणे लिहिणारे डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. निरंजन घाटे ही मंडळी खूप महत्वाचे कार्य करीत आहेत. मला येथे उल्लेख करण्यास आनंद वाटतो की, यावर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार डॉ. नारळीकरांच्या ‘चार नगरातले माझे विश्व’ या ग्रंथाला मिळाला. एका वैज्ञानिकाच्या साहित्यप्रतिभेचा गौरव होणं हे मराठी माणसासाठी भूषणावह आहे तसेच मराठी भाषेच्या संवर्धनाचा शुभसंकेत आहे. ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला यंदाचा भारतीय साहित्यातील प्रतिष्ठीत असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. डॉ भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या पंचविशीतच कोसलाच्या रूपाने मराठी कादंबरीचे परिमाण बदलले होते. नेमाडेंचे साहित्य मराठी भाषेसाठी एक समृद्ध खजिना आहे. पाश्चिमात्य भाषेतील लेखकांना त्यांची का अडगळ व्हावी हे मला मात्र उमजत नाही. डॉ भालचंद्र नेमाडेंचा ‘देशीवाद’ सिद्धांत हा खळबळजनक, कांतिकारी स्वरूपाचा आहे. स्वतः इंग्रजी भाषेतून पदवीधर असलेले, इंग्रजी भाषा विद्यापीठातून शिकवणारे डॉ. नेमाडें त्यांना मराठी भाषेची 21व्या शतकातील अवस्था जाणवल्याखेरीज इंग्रजी भाषेला शिक्षणातून हद्दपार करावयास सांगणारे धाडसी मत मांडणार नाहीत. संत एकनाथांनी जसे मराठीचे पुनरुत्थान केले तसे पुनरुत्थान करण्यासाठी नेमाडेंसारखी अभ्यासू व धाडसी मंडळी नवसाहित्यिकांना प्रेरक ठरतील यात शंका नाही. डॉ. भालचंद्र नेमाडे यांचं व डॉ. जयंत नारळीकरांचं या व्यासपीठावरून मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

इंग्रजी भाषेचा दुराग्रह धरणे हे कितपत संयुक्तिक आहे. मी जगभरात प्रवास केला आहे. जर्मनी, रशिया, इटाली, फ्रान्स, जापान, चीन, कोरीया अशा कितीतरी प्रगतीशील देशांमध्ये स्वदेशी भाषेचा पुरस्कार केला जातो. स्वभाषेचा वापर करून ते देश वैज्ञानिक प्रगतीत, उदयोग व संशोधनात मागे राहिले नाहीत. पण भारतीयांना भीती का वाटावी? असो, अमृताच्याही पैजा जिंकणारी मराठी इतक्या लवकर पराभूत होणे नाही.

आज या व्यासपीठावरून मी पंजाबचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. प्रकाशसिंग बादल यांच्याविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता प्रकट करतो. माझ्या हाकेला त्यांनी साद दिली नाही असे कधीही घडले नाही. त्यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र व पंजाबचे उपमुख्यमंत्री श्री. सुखबीरसिंग बादल व केंद्रीय अन्न प्रक्रीया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांचेही मनापासून आभार मानतो. संयोजक मंडळी केव्हाही त्यांना भेटोत, त्यांनी नेहमीच सकारात्मक व सर्वोतोपरी मदत केली. हे साहित्य संमेलन पंजाब सरकारने शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर केला आहे. याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.घुमान स्थळास राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. पंजाबचे माननीय मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माझी विनंती की याबाबत त्यांनी पाठपुरावा करावा.साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातील मंडळी घुमान या पवित्र ठिकाणी एकत्र आलीत. एका वेगळया बंधनात सारे बांधले गेलेत. पण संमेलनाच्या सांगतेनंतर पुन्हा आपापल्या मार्गी लागतात. नामदेवांच्या उक्तीने सांगावयाचे झाले तर

बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ।
वोघ बारा वाट । मुरडताती ।।

बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा ।
तृण रानोमाळा । पांगलेसे ।।

पण माझी विनंती आहे की, पंजाब-महाराष्ट्र नव्या मैत्रीचं हे पर्व सुरू झालेले आहे. नामदेवांनी विस्तार केलेल्या या मानवधर्माची पताका सतत फडकावित ठेवणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे.

मला निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो व घुमान येथील या ऐतिहासिक साहित्यसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!
जय हिंद, जय पंजाब, जय महाराष्ट्र, जय मराठी!!!

 

… तर झाले असते केंद्रीय महिला मंत्री स्मृती इराणी यांचेही चेंजिग रूममध्ये चित्रीकरण …

0
पणजी (गोवा)-  मॉल मध्ये कपडे ट्राय करण्यासाठी असलेल्या चेंजिग रूम मध्ये छुपे कॅमेरे बसवून अनेक महिलांचे गोव्यात चित्रीकरण झाल्याच्या च ठिकाणी चक्क केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही खरेदी केली आणि त्या ‘त्या ‘चेन्जिग रूम मध्ये गेल्या . बापरे … पहा कुठे काय होवू शकते … पण दक्ष असलेल्या या मंत्री महिलेने येथे असलेला स्पाय कॅमेरा ओळखला आणि … तब्बल  चार महिने येथे असे चित्रीकरण झाल्याचा प्रकार उघडकीस आणला  .
त्याचे असे झाले । सध्या गोव्यात सुटीवर गेलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आज दुपारी त्या गोव्यातील कलंगूट बीचजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये गेल्या असता त्यांना एक चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा असल्याचे आढळून आले. हा मॉल फॅब इंडिया कंपनीचा आहे. या घटनेनंतर इराणींनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांना बोलवून घटनेची माहिती दिली. लोबो यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लागून सुट्ट्या आल्याने केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी कटुंबियांसह गोव्यात सुटी घालवायला आल्या आहेत. आज दुपारी फॅब इंडियाच्या कलंगूट येथील शॉपिंग मॉलमध्ये त्या खरेदीला गेल्या होत्या. मॉलमध्ये त्यांनी काही कपडे खरेदी केले. चेंजिंग रूममध्ये त्या गेल्या असता तेथे त्यांना एक स्पाय कॅमेरा आढळून आला. त्यानंतर त्यांनी पती झुबेन इराणींना माहिती दिली व तो कॅमेरा ताब्यात घेतला. इराणींनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर लोबोनी कलंगूट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, हा स्पाय कॅमेरा मॅनेजरच्या केबिनमधील संगणकाला जोडलेला होता. तो संगणक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या संगणकात गेल्या चार महिन्यापासूनच्या क्लिप सापडल्या आहेत. पोलिसांनी ट्रायल रूममधील सर्व फुटेज ताब्यात घेतले आहे, असे लोबो यांनी सांगितले.

अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ चे लाक्षणिक उपोषण

0

पुणे:

पुण्याचा विकास आराखडा (डीपी) पुणेकर नागरिकांची प्रतिनिधी असलेल्या महानगरपालिकेला करू  न देता राज्य शासनाने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’, पुणे शहरच्या वतीने आज दि. 3 एप्रिल रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवास स्थानाजवळ हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, अशी माहिती ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ चे शहराध्यक्ष अजित बाबर यांनी दिली. या एक दिवसीय उपोषणाला सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना अजित बाबर म्हणाले, पुणेकरांच्या पालिकेतील प्रतिनिधींनी तयार केलेला विकास आराखडा राजकीय हेतूने घिसाडघाईने राज्य शासनाने ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे विकास आराखड्याच्या प्रक्रियेला विलंब होऊन विपरित परिणाम होणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानासमोर लाक्षणिक उपोषण करून आम्ही पुणेकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राज्य शासनाच्या घिसाडघाईचा निषेध करीत आहेत.

यावेळी दीपक मानकर, रुपाली चाकणकर, श्रीकांत पाटील, सुनील बनकर, श्‍वेता होनराव, राकेश कामठे, हरीश ओव्हाळ  उपस्थित होते.

दिग्गज साहित्यिकांची समाजाला गरज -विश्वास पाटील

0

पुणे : नव्या लेखकांनी साहित्यापेक्षा टीव्ही मालिका लिहिण्याला जास्त प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेत

चांगले साहित्यक उरलेले नाहीत अशी खंत प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त

केली. आपल्या या  भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी  नवीन लेखकांनी कस लावायला हवा, असे मत

त्यांनी व्यक्त केले.

डी.एस. कुलकर्णी फौंडेशनतर्फे घरकुल लॉंन्स येथे दि. २ ते ५ एप्रिलपर्यंत डीएसके गप्पांचे आयोजन करण्यात

आले आहे. दि. २ एप्रिल रोजी या गप्पांमध्येप्रा. मिलिंद जोशी यांनी विश्वास पाटील यांची

मुलाखत घेतली. ‘पानिपत’ या कादंबरीच्या मागचा इतिहास आणि प्रेरणा तसेच  त्यातून मनाला चटका देणारे

अनुभव यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर दिलखुलासपणे मांडले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या

विचारपेक्षा मला अजून खूप साहित्यकृतींवर लेखन करायचे आहे असे ते म्हणाले.

डीएसके उद्योगसमूहाचे श्री. डी.एस. कुलकर्णी आणि डी.एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के

यावेळी उपस्थित होते.

पाटील  म्हणाले,  निसर्गानेच मला इतिहासाच्या जवळ नेल्यामुळे माझ्याकडून उत्तमोत्तम कादंब-यांचे लेखन

होऊ शकले. ‘पानिपत’ हा  मराठ्यांच्या पराक्रमाचा आरसा आहे. याबद्दल आपल्याला अभिमान असायला

हवा.  काही वर्षांपासून मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे जात असताना मराठी साहित्य मात्र बांधावरच सीमित राहिले आहे

अवघ्या पन्नास रुपयांत सोनोग्राफी, गर्भवतींसाठी मोफत

0

पुणे – महापालिकेच्या चार रुग्णालयांमध्ये अवघ्या पन्नास रुपयांमध्ये, तर गर्भवतींसाठी मोफत सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. पुढील महिन्यापासून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. सुनील तोरे यांनी दिली.
खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी अडीचशे ते सातशे रुपये शुल्क आकारले जाते. गरीब रुग्णांसाठी हे शुल्क भरणेही कठीण होते. त्यामुळे मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे हॉस्पिटल, येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल आणि मगरपट्टा येथील कोद्रे या चार दवाखान्यांमध्ये पन्नास रुपयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात अन्य सुविधाही अशाप्रकारे सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. गेल्या महिन्यात महापालिकेने एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सवलतीच्या दरात डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

भारत बनेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश …. मात्र वर्चस्व राहील हिंदूंचेच …वॉशिंग्टन प्यू रिचर्स सेंटर चा अहवाल

0

वॉशिंग्टन – जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत इ.स. 2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर भारत हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला जगातील पहिलाच देश ठरेल, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.
प्यू रिचर्स सेंटरने जगातील धार्मिक लोकसंख्येचा अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याचा आजचा सुस्साट वेग पाहता, २०५० पर्यंत जगातील सर्वाधिक मुस्लिम इंडोनेशियाऐवजी भारतात असतील, अशी आकडेवारी या  जागतिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. अर्थात, मुस्लिमांची संख्या ‘सुपरफास्ट’ वाढली, तरी भारतात हिंदू धर्मियांचंच वर्चस्व राहील, आणखी ३५ वर्षांनीही देशात हिंदूंचीच लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा जास्त असेल, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.
२०५० पर्यंत हिंदूंची लोकसंख्या जगात तिसऱ्या क्रमांकांवर येईल, जगात १.४ अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या १४.९ टक्के हिंदू असतील. ख्रिश्चन धर्म ३१ टक्के (२.९ अब्ज) लोकसंख्येसह जगातील सर्वात मोठा धर्म असेल, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा फक्त एक टक्क्यानं कमी, म्हणजेच २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज प्यू अभ्यास केंद्राच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लिम आज इंडोनेशियात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तिथे मुस्लिमांची संख्या २०२.९ दशलक्ष इतकी आहे. पाकिस्तानात २०१०च्या गणनेनुसार १७ कोटी ८० लाख ९७ हजार मुस्लिम लोकसंख्या आहे, तर भारतात सुमारे १७ कोटी ६० लाख मुस्लिम राहतात. परंतु, देशात मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं पुढच्या ३५ वर्षांत, इंडोनेशियापेक्षा जास्त मुस्लिम भारतात असतील, असं सर्वेक्षणात म्हटलंय. देशातील हिंदुत्ववादी संघटनांना त्यामुळे आयता मुद्दाच मिळालाय. हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सल्ले देणारी मंडळी आता अधिक सक्रिय होऊ शकतात. परंतु, २०५० मध्येही भारत हे हिंदूबहुल राष्ट्रच असेल, असं याच संशोधकांनी आश्वस्त केलं आहे. उलट, आज जगात चौथ्या क्रमांकावर असलेला हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर येईल, असं गणित त्यांनी मांडलंय.
आज कुठलाच धर्म न मानणाऱ्यांची संख्या हिंदू धर्मियांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांनंतर त्यांचा क्रमांक लागलो. पण, पुढच्या काही वर्षांत हिंदू धर्मीय त्यांना मागे टाकू शकतात. बौद्ध धर्मियांच्या लोकसंख्यावाढीचा दर कमी असल्यानं त्यांची संख्या फार वाढणार नाही, असंही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय.
इस्लाम मानणाऱ्यांची संख्या जगभरात तुफान वाढतेय, हे या सर्वेक्षणातून अधोरेखित झालंय. २०१० मध्ये जगात २.१७ अब्ज ख्रिस्ती धर्मीय होते आणि मुस्लिमांची संख्या १.६ अब्ज होती. पण, हे अंतर झपाट्यानं कमी होत चाललंय. लोकसंख्यावाढीचा आजचा ट्रेंड कायम राहिल्यास २०७० मध्ये ख्रिस्ती धर्माला मागे टाकून मुस्लिम धर्म जगातील सर्वात मोठा धर्म ठरेल, असा तर्कही सर्वेक्षणात बांधला आहे.

यानुसार इ.स. 2050 पर्यंत जगातील हिंदूंच्या लोकसंख्येत 34 टक्‍यांपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच जगातील एकूण लोकसंख्येपैकी 14.9 टक्के हिंदू लोकसंख्या असेल. कोणत्याही धर्माशी संबंधित नसणाऱ्या 13.2 टक्के लोकसंख्येला मागे टाकून हिंदूंची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर पोचेल, असेही या अहवालात म्हटले आहे. मुस्लिम धर्मियांच्या लोकसंख्यावाढीचा वेग हा जगात सर्वाधिक असेल. तर भारतामध्ये हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असेल. तसेच इतर कोणत्याही राष्ट्राच्या तुलनेत भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. सध्या जगात ख्रिश्‍चनांची लोकसंख्या सर्वाधिक असून इतर कोणत्याही मोठ्या धर्मापेक्षा मुस्लिमांची वाढ वेगाने होत आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग कायम राहिला तर इ.स. 2070 पर्यंत जगात मुस्लिम धर्मियांची संख्या सर्वाधिक असेल असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यभरातील अनधिकृत बांधकामे होणार नियमित

0

मुंबई – येत्या पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महापालिका क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंबंधीचे प्रकरण उच्च न्यायालयात असल्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालयाला विनंती करून सर्वे करण्यासाठी वेळ मागितला जाईल आणि त्यामुळे 70 ते 75 टक्‍के बांधकामे नियमित होऊ शकतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

लक्ष्मण जगताप, योगेश टिळेकर, नरेंद्र पवार, प्रा. मेधा कुलकर्णी यांनी पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याच्या आवश्‍यकतेबाबतची लक्षवेधी विचारली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करून नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठी मुंबई महापालिका आयुक्‍त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्‍त केलेल्या समितीने दिलेला अहवाल शासनाने तत्त्वत: स्वीकारला आहे. या अहवालात सर्व महापालिका क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामाचा आढावा घेण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांची वर्गवारी करण्यात आली आहे. या अहवालामध्ये केलेल्या शिफारशींसाठी विधि व न्याय विभागाचा अभिप्रायदेखील प्राप्त झाला आहे. अद्याप महसूल विभागाचा अभिप्राय आलेला नाही. तो आल्यानंतर या अहवालात आवश्‍यक फेरफार केला जाईल. येत्या पंधरा दिवसांतच याविषयीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान, नव्याने अनधिकृत बांधकामे निर्माण होऊ नयेत यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, असाही इशारा फडणवीस यांनी दिला.

पिंपरी-चिंचवडमध्ये 66 हजार 324 अनधिकृत बांधकामे असून, ते काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. यापैकी 70 ते 75 टक्‍के बांधकामे नियमित होऊ शकतात. त्यासाठी सर्वे करण्याची आवश्‍यकता असून, न्यायालयाकडे त्यासाठी वेळ मागितला जाईल. न्यायालयाचा अवमान न करता विनंती करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दक्षिण पुण्यातील २ नेत्यांचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु ?

0

पुणे -महापौर-उप महापौर- स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता अशी चार हि पदे दक्षिण पुण्याच्या प्रभागांना दिली गेल्यानंतर जणू यातील ज्येष्ठ आणि खमके असणार्या २ नेत्यांचे वर्चस्व आता कमी करण्याचे राजकीय डावपेच आखले जात असावेत असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे
मध्यंतरी एकावर पडलेली आयकर खात्याची रेड , त्यानंतर आपल्या भागात विविध आकर्षक  प्रकल्प उभारण्यात अग्रेसर असलेल्या नेत्याच्या प्रभागातील एका सभागृहाबाबत आणि आता अन्य ऊकरून  काढण्यात येणारे प्रकरणे पाहता या २ नेत्यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे मात्र या मागे कोणी बडा नेता आहे कि स्थानिक राजकारण आहे याबाबत मात्र निश्चित माहिती अद्याप कोणी सांगू शकत नसल्याची स्थिती आहे
या सर्व चर्चेला कारण घडले ते असे … महापालिकेतील आजवरच्या उपमहापौरांचा स्नेहमेळावा घेऊन त्यांचा गौरव करण्याचा उपमहापौर आबा बागूल यांच्या पुढाकाराने घेतलेल्या कार्यक्रमाचा खर्च देण्यास पक्षनेत्यांनी नकार दिला आहे. हा कार्यक्रम महापालिकेचा नव्हताच, अशी भूमिका घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेत आजवरच्या५३ उपमहापौरांचा सन्मान करण्यासाठी गेल्या महिन्यात बालगंधर्व रंगमंदिरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बागूल यांनी सर्व उपमहापौरांची माहिती संकलित करून कार्यक्रमात त्यांचा “लोकसखा‘ पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेत आला तेव्हा पक्षनेत्यांच्या बैठकीत हा विषयच दप्तरी दाखल करण्यात आला. महापालिकेच्या शिष्टाचाराप्रमाणे हा कार्यक्रम झाला नसून त्याला महापालिकेचा कोणीही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम महापालिकेचा नसल्यामुळे या कार्यक्रमाचा खर्च देण्यास पक्षनेत्यांच्या बैठकीत नकार दिल्याची माहिती महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी दिली. महापालिकेच्या कार्यक्रमाच्या पत्रिका पालिकेच्या प्रेसमध्येच छापल्या गेल्या पाहिजेत; तसेच या कार्यक्रमाच्या खर्चाची कोणतीही बिलेही सादर करण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, हा कार्यक्रम महापालिकेचा नव्हता; तर बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे भाडे आकारणार का आणि महापालिकेचा लोगो वापरून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांची बेकायदा छपाई करण्यात आल्याने काय कारवाई करणार, या प्रश्‍नाला मात्र महापौरांनी बगल दिली.
दरम्यान उपमहापौर आबा बागुल यांनी याप्रकरणी असे म्हटले आहे कि , केवळ “इगो‘मुळे पक्षनेत्यांनी कार्यक्रमाचा खर्च देण्यास नकार दिला. वास्तविक, पक्षनेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ती केवळ समन्वय समिती आहे. हा विषय नियमाप्रमाणे सर्वसाधारण सभेत येणार असून तसे पत्र नगरसचिवांना दिले आहे. असे असले तरी या कार्यक्रमाचा खर्च मी देण्यास तयार आहे. हेतूपुरस्सर हा विषय फेटाळण्याचे महापौरांचे कृत्य निषेधार्ह आ