Home Blog Page 3613

अभिनेता सलमान खान ‘हिट अँड रन‘ 6 मे रोजी निकाल

0
मुंबई – तेरा वर्षांपूर्वीच्या ‘हिट अँड रन‘ प्रकरणी आरोपी अभिनेता सलमान खान याच्याविरोधातील खटल्यावर अंतिम निकाल 6 मे रोजी लागणार असल्याचे आज (मंगळवार) मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार रवींद्र पाटील यांची जबानी ग्राह्य धरू नये, अशी मागणी सोमवारी आरोपी सलमानच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आली. आज या खटल्याच्या अंतिम निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार होती. न्यायालयाने या प्रकरणावर 6 मे रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. सलमानला या प्रकरणात शिक्षा झाल्यास दहा वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सलमानचे अंगरक्षक असलेल्या पाटील यांनी यापूर्वीच पोलिसांना जबाब दिला आहे. मात्र आता ते हयात नसल्यामुळे त्यांची उलटतपासणी घेता आलेली नाही, असे कारण देऊन सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी पाटील यांच्या जबानीला विरोध केला. मात्र, पाटील यांची उलटतपासणी घेण्याची संधी यापूर्वी बचाव पक्षाला दिली होती, असा दावा अभियोग पक्षाच्या वतीने न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यापुढे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. पाटील या प्रकरणात मूळ तक्रारदार आहेत. न्यायालयाने दोन वर्तमानपत्रांत आलेल्या खटल्याविषयीच्या बातम्यांची गंभीर दखल घेतली. अपघाताच्या घटनेचा पुन्हा आढावा घेताना पोलिसांनी काढलेली छायाचित्रे या बातम्यांसोबत प्रसिद्ध झाली आहेत. खटला अंतिम टप्प्यात असताना अशाप्रकारे छायाचित्रे प्रसिद्ध करून फेरतपास केला जाऊ शकत नाही, असे सलमानच्या वतीने केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानने मद्यधुंद अवस्थेत वांद्य्रातील कार्टर रोडवर लॅण्डक्रुझर गाडी बेदरकारपणे चालवून फूटपाथवर झोपलेल्या काही जणांना चिरडले होते. या अपघातात एक ठार, तर चार जण जखमी झाले, असा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 17 साक्षीदारांची जबानी नोंदविली आहे. सदोष मनुष्यवधासह प्राणघातक इजा पोहोचविणे, बेदरकारपणे गाडी चालविणे आदी आरोपही त्याच्यावर आहेत.

बाबा रामदेव यांना हरियाणाचे ब्रँड अँम्बेसिडर

0
सोनीपत /पानीपत – योगगुरु बाबा रामदेव यांना हरियाणाचे ब्रँड अँम्बेसिडर करण्यात आले आहे. राज्यात योग आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचाही दर्जा दिला जाणार होता, मात्र रामदेव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, पंतप्रधान आपले आहेत, सरकार आपले आहे, हरियाणाचे मुख्यमंत्री आपले आहेत. मग बाबाला बाबाच राहु द्या, मला कॅबिनेट मंत्रिपद नको आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर, आरोग्य मंत्री अनिल विज, शिक्षण मंत्री रामबिलास शर्मा उपस्थित होते.
सोनीपत येथील राय स्पोर्टस स्कूलमध्ये आयोजित सोहळ्यात बाबा रामदेव यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याआधी हरियाणा सरकारने बाबा रामदेव यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. हा वाद चिघळत असल्याचे दिसल्यानंतर रामदेव यांनी कॅबिनेट दर्जा स्विकारण्यास नकार दिला.
रामदवे म्हणाले, की हरियाणामध्ये योगाचा प्रचार करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या वाहनाने आणि स्वखर्चाने फिरेल. त्यासोबतच त्यांनी हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात एक योग केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले. सरकारी शाळांमधील पीटी शिक्षक आणि योगाचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बाबा रामदेव म्हणाले, हरियाणामध्ये पतंजलीपेक्षाही मोठे योगकेंद्र तयार केले जाईल. जे देशातील सर्वात मोठे योगकेंद्र असेल. देशात हर्बल पार्क खूप असतील पण येथे हर्बल वन तयार केले जाईल. या वनात सर्व प्रकारच्या जडी-बुटींची झाडे असतील.येथे संशोधक विद्यार्थ्यांनाही मोठी संधी असेल.

६०० कोटी किंमतीचे २५० किलो हेरॉइन पाकिस्तानी बोटीतून पकडले

0
पोरबंदर

पोरबंदर किनाऱ्याजवळ घुसखोरी करणारी पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली असून बोटीवरील ८ तस्करांना अटक करण्यात आली आहे. या बोटीत तब्बल ६०० कोटी किंमतीचे २५० किलो हेरॉइन आढळून आले असून सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आला आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
इंटेलिजन्सकडून या बोटबाबत आधीच सुरक्षा यंत्रणांना इनपूट्स देण्यात आले होते. त्यानुसार तटरक्षक दलाची संग्राम ही युद्धनौका तसेच नौदलाचे डोर्नियर विमान शनिवारपासूनच समुद्रमार्गे पोरबंदर किनारपट्टीच्या दिशेने येणाऱ्या या बोटवर पाळत ठेऊन होते. पोरबंदरजवळ ही बोट धडकताच बोटीला चहुबाजून घेरून ताब्यात घेण्यात आले. बोटीतील आठही जण कोणताही प्रतिकार न करता सुरक्षा यंत्रणांना शरण आले. त्यामुळे हे तस्करच असावेत, असे प्रथमदर्शनी तरी दिसत आहेत. अटक केलेल्या आठ जणांपैकी पाच जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच पोरबंदरपासून ३६५ सागरी मैलावर एका घुसखोर पाकिस्तानी बोटवर तटरक्षक दलाने कारवाई केली होती. ही बोट भारतीय हद्दीत घुसल्याने तटरक्षक दलाने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्ग बदलून ही बोट कराचीच्या दिशेने वेगाने पळण्याचा प्रयत्न करू लागल्याने तटरक्षक दलाने ही बोट उडवून दिली होती. या कारवाईत बोटीतील चौघे जण ठार झाले होते. या कारवाईवरून नंतर बरंच काहूर माजलं होते. या बोटीत दहशतवादी होते की नाही?, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे. अशावेळी पोरबंदरजवळच पुन्हा एक पाकिस्तानी बोट पकडली गेल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राजा परांजपे ही व्यक्ती नव्हे तर संस्था होती –दिलीप प्रभावळकर

पुणे- राजा परांजपे यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील आनंदयोग आहे. राजा परांजपे ही व्यक्ती

नव्हती तर ती मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक संस्था होती अशा शब्दांत जेष्ठ कलावंत  दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या

भावना व्यक्त केल्या.

राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजा परांजपे महोत्सवाचा समारोप समारंभ भरत नाट्यमंदिर येथे पार

पडला. जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारत देसडला,प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, खजिनदार अजय राणे

हे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रभावळकर म्हणाले, राजा परांजपे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक दिशा दिली. नैसर्गिक अभिनय शैली शाळेचे ( स्कूल

ऑफ नॅचरल अॅक्टिंग) ते शिक्षक होते. ते अगदी सहज बोलायचे.  त्यांचा अभिनयही सुंदर असायचा. त्यांनी विविध

सिनेमांमधून विविध विषय हाताळले. विविध विषय हाताळण्यावर त्यांची हुकुमत होती. त्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती

ही  आजची ताजी कलाकृती वाटते. मुकचित्रपटापासून कारकीर्द सुरु केलेले राजाभाऊ अनेक वेळेला चित्रपटाला

‘बॅकराऊंड म्युझिक’ देण्यासाठी हार्मोनियम वाजवायचे. तसेच ते पत्त्यांची जादू व सायकलींच्या कसरती करायचे असे

राजा परांजपे यांचे अनेक पैलू प्रभावळकर यांनी उलगडले. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने मला माझ्या पुढच्या

कारकिर्दीसाठी स्फूर्ती मिळाली आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

श्रीकांत मोघे म्हणाले, राजाभाऊंसारखा दुसरा दिग्दर्शक नाही. गायकांना जशी घराणी असतात तसे राजाभाऊंचे मास्टर

विनायकांचे घराणे होते. मराठी चित्रपटांना आता खूप चांगले दिवस आले आहेत असे सांगून ते म्हणाले, राजाभाऊंसारखी

अत्यंत प्रतिभावान व श्रीमंत माणसे त्याकाळात होती. मात्र, मराठी समाज जाणकार नव्हता. त्यांनी या माणसांना मोठे

बनवायला हवे होते.

भारत देसडला यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जोशी          यांनी केले.

आभार अजय राणे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी लेखक व गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. माझा माझ्यावर

आहे त्यापेक्षा अनेकदा दिग्दर्शकाचाच माझ्यावर जास्त विश्वास वाटतो.असे अनेक वेळेला झाले आहे व त्यातूनच आपण

विविध भूमिका साकारल्या अशी प्रांजळ कबुली प्रभावळकर यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

माझी खरेतर नैसर्गिक अभिनय शैली वापरण्याची पद्धत आहे.परंतु ती शैली मी चिमणरावांची भूमिका करताना वापरली

नाही तर कार्टून प्रमाणे भूमिका केली असे त्यांनी सांगितले. चिमणरावांचा चेहरा, प्रतिमा, यामुळे मी लोकांपर्यंत

पोहोचलो. परंतु नंतर मला ते नकोसे झाले होते, कारण लोक ते विसरायला तयार नव्हते.मात्र नंतर मी त्यातून बाहेर

पडलो अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. नातीगोती मधील भूमिका व गांधीजींची भूमिका ही मी तयारी

करून केली होती . काही भूमिका या करता करता तर काही पटकन केलेल्या भूमिका होत्या असे त्यांनी सांगितले. चौकट

राजाची आपली भूमिका ही उत्स्फूर्ततेने केलेली भूमिका होती असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

बॉलिवूडमधील बहुतेक ‘गे’ नॉर्मल असल्याचं ढोंग करतात,’

मुंबई–

‘बॉलिवूडमध्ये ‘गे’ लोकांचा भरणा आहे, पण ते तसं दाखवत नाहीत. बॉलिवूडमधील बहुतेक ‘गे’ नॉर्मल असल्याचं ढोंग करतात,’ असा गौप्यस्फोट भाजपच्या खासदार व अभिनेत्री किरण खेर यांनी केला आहे.
अलीकडेच खेर यांनी गे, लेस्बियन, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर (जीएलबीटी) लोकांच्या एका संस्थेसोबत काम सुरू केलं आहे. या समाजाकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलणं हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. ‘भारतात अजूनही गे किंवा लेस्बियन लोकांची थट्टा केली जाते. त्यांच्याकडं तिरस्कारानं पाहिलं जातं. यात बदल होण्याची गरज आहे. बॉलिवूड याकामी मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी चेंबूर मध्ये अभिष्टचिंतन सोहळा, कार्यकर्ता मेळावा

0
 

मुंबई:

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त  मुंबई येथे अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. 19 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी पाच वाजता आंगण मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार डेपोजवळ, चेंबूर येथे हा मेळावा होईल,अशी माहिती प्रवक्ते  दीपक बिडकर यांनी दिली

या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, कार्यक्रमाच्या उद्घाटक पंकजा मुंडे (महिला व बालकल्याण मंत्री), रामदास आठवले,  खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोटेे, एकनाथ खडसे, विनोद तावडेे, सुभाष देसाई, चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, प्रकाश मेहता, राम शिंदे, विजयबापू शिवतारे, रासप आ.राहुल कुल, सुजितसिंह ठाकूर, नारायण पाटील, तानाजी सावंत, रत्नाकर गुट्टे, पुंडलिक काळे, शेखर गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वेब साईट चे उद्घाटन यावेळी होणार आहे .रासप  प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत ,महासचिव बाळासाहेब दोड्तले ,मुंबई रासप अध्यक्ष अजित पाटील मेळाव्याची तयारी करीत आहेत

बाळू मावशी धुमाळ यांच्या सांप्रदायिक दिंडीचे जगन्नाथपुरीच्या यात्रेचे प्रस्थान! 200 वारकर्‍यांचा यात्रेमध्ये सहभाग

0

पुणे ः
निरक्षर असलेल्या पण स्वकष्टाने भंगारमाल गोळा करण्याच्या व्यवसायातून पुढे आलेल्या सौ.बाळू मावशी सुदाम धुमाळ यांच्या पुढाकाराने वारकरी संप्रदाय (महाराष्ट्र), विठ्ठल रुक्मिणी मंदीर (माणगगवारेवाडी) सेवा समिती व रिहे पिंपळोली यांच्या वतीने जगन्नाथ पुरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 16 एप्रिल 2015 रोजी जगन्नाथ पुरी यात्रेस प्रस्थान केले. दिनांक 19 एप्रिल ते 23 एप्रिल 2015 रोजी होणार्‍या या जगन्नाथपुरी यात्रेत 200 वारकरी सहभागी झाले आहेत.

यात्रेचे संयोजन सौ. बाळू मावशी सुदाम धुमाळ (माण, मुळशी), ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांनी केले आहे.

या यात्रेच्या नियोजन समितीमध्ये नामदेव सोपान शिंदे, सीताराम विठ्ठल चव्हाण, विठ्ठल बाळकु शिंदे, पोपट तुकाराम वाघ, माणिकराव शिंदे, विलास रामचंद्र शिंदे, विठ्ठल गुजर, चंद्रकांत रोडे, बबन बलकवडे, विनायक गुजर आदींचा समावेश आहे.  जगन्नाथ पुरी यात्रेत अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.

बाळूमावशी या हिंजवडीजवळ माण (गवारेवाडी) च्या रहिवासी असून, गेली अनेक वर्षे त्यांचा भंगारमालाचा व्यवसाय आहे. या आधी भंगार गोळा करण्याच्या व्यवसायातून मजल मारून गवारेवाडी येथे त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या भव्य मंदिराची उभारणी केली आहे. त्यांच्या पुढाकारातून 83 वारकर्‍यांनी पुण्याहून विमानाने दिल्ली येथे जाऊन पुढे हरिद्वार, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे तीर्थयात्रेसाठी मुळशी तालुका सांप्रदायिक दिंडीचे आयोजन केले होते.

जुन्नर जवळ बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

0

पुणे –

पुण्यातील जुन्नर जवळ खामुंडी गावाच्या परिसरात बिबट्याने एका पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला. बिबट्याच्या तावडून या मुलाला आपली सुटका करता आली नाही आणि बिबट्याने त्याला ठार मारून झुडूपात सोडून दिले. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळे बसवले असून त्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही
प्रविण दुजवडे असे या पाच वर्षाच्या मुलाचे नाव. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला गावापासून दूर नेऊन ठार मारले. त्यांच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह झुडुपांमध्ये आढळला.
दरम्यान, या आधी देखील जुन्नर परिसरात बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला होता. रेणूका वाघमारे नावाची एक मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली होती. रेणुकाला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात तिच्या कुटुंबियांना यश आले होते. रेणुका जखमी झाली होती, अद्यापही तिच्यावर उपचार सुरू आहे.

वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून येरवडा तुरुंगास महिला कैद्यांसाठी रुग्णवाहिका

0
पुणे :

एड  .वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून येरवडा तुरुंगास महिला कैद्यांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली . रुग्णवाहिका सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज दि . १६ एप्रिल रोजी सकाळी झाला . तुरुंगातून महिला कैद्यांना रुग्णालयात हलविण्याची आधीची व्यवस्था असुरक्षित होती . या  रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक सुसज्य यंत्रणा आहे . महिला कैद्यांच्या प्रसूती काळात होणारी गैरसोय या  रुग्णवाहिका मुळे टाळता येणार आहे . खा वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने या रुग्णवाहिकेसाठी निधी देण्यात आला आहे .

यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या , महिला कैद्यांना उपचारासाठी, तपासणीसाठी आणि सुरक्षिततेसाठी त्वरित रुग्णालयात नेता यावे यासाठी हि रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल . या साठी खासदार निधीतून ९. ५० लाख रुपये निधी देण्यात आला आहे . ‘

यावेळी कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई , नगरसेवक अनिल टिंगरे , नगरसेवक मीनल सरवदे , एड म. वि . अकोलकर , मंगेश गोळे , रवी  चौधरी , मिलिंद बालवडकर , दत्तात्रय गायकवाड , एड औदुंबर खुने -पाटील , इक्बाल शेख, मनाली भिलारे, रजनी पाचंगे , सुनीता  मोरे , बबलू  जाधव  आदि उपस्थित होते

यावेळी बोलताना कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई म्हणाले , ‘ खा वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेसाठी आम्ही आभारी आहोत . तुरुंगामध्ये कैद्यांचे नातेवाईक भेटायला  आल्यावर त्यांना तासंतास ताटकळत रस्त्यावर बसावे लागते , यावेळी अपघाताची शक्यता असते . त्यांच्यासाठी अभ्यागत कक्ष (Wetting Room ) शेड  करावी अशी विनंती आम्ही वंदना चव्हाण यांना करीत आहोत . या विनंतीस खा वंदना चव्हाण यांनी मान्यता दिली आहे .

पोलिस अधिक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीबारातच शेतकरी महिलेचा मृत्यू -मुंबई हायकोर्ट

0
पुणे- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 2011 साली झालेल्या गोळीबारात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी केलेल्या गोळीबारातच एका आंदोलक शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने ठेवला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षक संदीप कर्णिक यांच्यावर कारवाई करा व त्याबाबतचा रीतसर अहवाल कोर्टात सादर करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. संदिप कर्णिक यांच्या गोळीने कांताबाई ठाकर या आंदोलक शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याचे बॅलस्टिक अहवालात स्पष्ट झाले आहे. मावळ गोळीबार प्रकरणी आय जी खंडेलवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन बॅलस्टिक अहवाल सादर केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
 मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरांसाठी पाईपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केली होती. मात्र, यास मावळ तालुक्यातील शेतक-यांनी विरोध केला होता. त्यावेळी भारतीय किसान मोर्चातर्फे 9 ऑगस्ट 2011 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्ष या नात्याने शिवसेना-भाजप हे पक्ष सहभागी झाले होते. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव गावाजवळ शेतकरी किसान मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यावेळी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतक-यांचा मृत्यू झाला होता.

मृतांपैकी कांताबाई ठाकर या आंदोलक महिलेचा मृत्यू पोलिस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी झाडलेल्या पिस्तुलाच्या गोळीमुळेच झाल्याचा दावा करण्यात येत होता. याबाबत आय. जी. खंडेलवाल यांनी याचिका दाखल केली होती. त्यासोबत खंडेलवाल यांनी बॅलिस्टिक अहवाल सादर केला. पोलिसांच्या गोळीबारानंतर कांताबाई ठाकर उताराच्या दिशेने धावल्या. त्याच वेळी कर्णिक यांनी गोळीबार केला होता. ही गोष्ट कर्णिक यांच्या जबाबातून व गोळीच्या बॅलिस्टिक अहवालातून स्पष्ट होते, असा दावा याचिकेकर्त्याने केला होता व तो कोर्टाने ग्राह्य धरला आहे.
 मुंबई हायकोर्टाने खंडेलवाल यांनी कोर्टात सादर केलेल्या बॅलिस्टिक अहवालाचा संदर्भ घेऊन कोर्टाने सांगितले की, मावळ गोळीबार प्रकरणाचा तपास करताना बॅलस्टिक अहवालाचा विचार का केला गेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाचा नव्याने चौकशी करावी. तसेच कर्णिक यांच्यावर काय कारवाई केली याचा रीतसर अहवाल सादर करावा असे आदेश काढले आहेत.

सेंट मेरी चर्चवर हल्ला

0

आग्रा-
हरियाणा, पश्चिम बंगाल, जबलपूरमध्ये चर्चवर झालेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज आग्रा येथील चर्चला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं आहे. आग्र्याच्या कँटॉन्मेंट परिसरातील सेंट मेरी चर्चवर पहाटे झालेल्या हल्ल्यात मदर मेरीचा पुतळा फोडण्यात आला असून येशूच्या गळ्यात साखळी अडकवली आहे. या प्रकारानं ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्यात.
सेंट मेरी चर्चच्या पार्किंगमधून पहाटे साडेतीनच्या सुमारास अलार्मचा आवाज आल्यानं एकच खळबळ उडाली. सगळ्यांनीच पार्किंगमध्ये धाव घेतली, तेव्हा तिथे काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर, चर्चमध्ये जाऊन पाहणी केली असता, मदर मेरीच्या पुतळ्यासह चार पुतळे फोडल्याचं फादर मून यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी हा प्रकार कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी लहान येशूचे डोके मदर मेरीच्या हातात ठेवण्यात आल्याची माहिती फादर मून यांनी दिली. येशूच्या गळ्यात कुत्र्याची साखळी अडवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणार असल्याचं चर्चच्या व्यवस्थापनानं जाहीर केलं आहे.
गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील एका कॉन्व्हेंट शाळेत ७१ वर्षीय ननवर बलात्कार करून चर्चवर हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं. दोन बांगलादेशी नागरिकांनी हा प्रकार केला होता. त्यानंतर, २० मार्चला मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चर्चमधील धार्मिक कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे समाजात तणावाचं वातावरण असतानाच, आज आग्र्यात सेंट मेरी चर्चवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. त्याची तक्रार रकाबगंज पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आली आहे. २४ तासांत हल्लेखोरांना अटक करा, अशी मागणी संतप्त ख्रिस्ती नेत्यांनी केली आहे.

दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षस्थानी पी.ए.इनामदार उपाध्यक्षपदी मुमताझ सय्यद यांची निवड

0

पुणे:

दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी पी.ए. इनामदार आणि उपाध्यक्षपदी कु. मुमताझ सय्यद यांची नियुक्ती झाली आहे. गुरूवारी झालेल्या नवनियुक्त संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे शहर) विनायक कोकरे यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. ही नियुक्ती 2015-2020 या काळासाठी आहे. मावळते अध्यक्ष शफी दिल्लीवाले यांच्याकडून पी.ए.इनामदार यांनी सूत्रे स्वीकारली. या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती.

मुस्लिम सहकारी बँकेच्या 27 शाखा असून पुण्यात मुख्य कार्यालय आहे. 1931 साली स्थापन झालेल्या या बँकेच्या  500 कोटी ठेवी आहेत.

‘आर्थिक भक्कम पायावर ही बँक उभी आहे. नावात मुस्लिम असले तरी सर्व समाजातील लोकांच्या ठेवी आणि कर्जांचा समावेश बँकेत आहे. भारतात बँकिंग क्षेत्रात विशेषत: सहकारी स्थित्यंतरे होत असतानाच्या बदलांची जाणीव असणारी आणि तसे बदल घडविणारी ही बँक आहे. बँकेला आणखी प्रगती प्रथावर नेण्यासाठी प्रयत्न करू’, असे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कर्मचारी वर्गाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा उत्सव व्हावा ज्येष्ठ साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

0

पुणे,  : जगात एकमेव भारत देशाची राज्यघटना ही सर्वसामान्य लोकांना अर्पण करण्यात आलेली

आहे. सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटनेमुळे देशाचे मालक बनता आले आहे. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर त्यांच्या विचारांचा उत्सव झाला पाहिजे, असे मत

ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्री उत्तम कांबळे यांनी आज (दि. 14) व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ

येथे आयोजित कार्यक्रमात श्री. उत्तम कांबळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. प्रभाकर देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे माजी संचालक श्री.

उत्तमराव झाल्टे, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. निळकंठ वाडेकर व श्री. रामराम मुंडे यांची उपस्थिती होती.

श्री. उत्तम कांबळे म्हणाले, की भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचे विश्लेषण केले तर डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांनी अनेक ग्रंथ लिहून त्याची उत्तरे शोधली आहेत. सोबतच राज्यघटनेतून सर्व भारतीयांना समान

मताचा अधिकार, समान मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. डॉ. बाबासाहेबांचे विचार आणखी शेकडो वर्ष जीवंत

ठेवण्याची गरज आहे. हे विचार अंगिकारले नाही तर ते संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांच्या विचारांचा उत्सव होणे आवश्यक असल्याचे श्री. कांबळे म्हणाले.

यावेळी श्री. उत्तमराव झाल्टे यांच्यासह मुख्य अभियंता सर्वश्री निळकंठ वाडेकर, रामराव मुंडे, श्री. प्रभाकर देवरे

यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता श्री. संजीव भोळे यांनी केले तर सूत्रसंचालन

श्री. उद्धव कानडे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी आभार मानले.

यावेळी महावितरणचे श्री. उद्धव कानडे यांचा श्री. उत्तम कांबळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला

महावितरण व महापारेषणमधील अभियंता, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने

उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व संघटनांच्या संयुक्त समितीने पुढाकार घेतला.

सुमनताई पाटलांचा विक्रमी विजय- 1,31,236 मते मिळाली -विरोधी उमेदवारांची अनामत जप्त

0
सांगली- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी 1 लाख 12 हजार 963 मतांनी विक्रमी विजय मिळवला आहे.सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे सुमन पाटील यांना एकूण 1 लाख 31 हजार 236 मते मिळाली तर स्वप्निल पाटील यांना फक्त 18 हजार 273 मते मिळाली. कमी मते मिळाल्याने स्वप्निल पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असले तरी तासगावात आबांच्या दुखद निधनामुळे राष्ट्रवादी व पाटील कुटुंबिय या विजयाचा आनंद साजरा करणार नाहीत. भाजपचे बंडखोर उमेदवार व अपक्ष स्वप्निल पाटील यांचे सुमन पाटील यांनी डिपॉझिट जप्त केले आहे.
तासगाव येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरवात झाली. 19 फेर्‍यांमध्ये संपूर्ण निकाल जाहीर करण्‍यात येणार आहे. तासगाव पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सुमनताई पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. सुमन पाटील यांच्याविरोधात सर्वच उमेदवार अपक्ष असल्याने व एकाही बड्या पक्षाचा उमेदवार नसल्याने सुमन पाटील यांच्या मतांत प्रत्येक फेरीत मोठी वाढ होत राहिली व ती अखेरपर्यंत राहिली.

नारायण राणेंच्या पराभवाचा आणि सेनेच्या विजयाचा विनायक निम्हण यांच्याकडून जोरदार जल्लोष

0
12 13 14
पुणे-
राजकारणात कोणी कुणाचा मित्र नसतो असे म्हणतात  तेच खरे असल्याची प्रचीती आज पुण्यात आली – नारायण राणे यांचा वांद्र्यात दारूण पराभव झाल्यानंतर दीर्घ काळ पुण्यातील नारायण राणेंचे कट्टर समर्थक असलेले सध्या शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष  विनायक निम्हण यांनी जोरदार जल्लोष करीत सेनेच्या विजयाची आणि राणेंच्या पराभवाची उंच पताका फडकावली आहे वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीमती तृप्ती सावंत यांच्या विजयानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने टिळक पुतळा (मंडई) येथे शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते साखर व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा 19 हजार 8 मतांनी पराभव करीत त्यांना धूळ चारली . . शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52 हजार 711 मते मिळाली आहेत. तर, नारायण राणेंना 33 हजार 703 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार राजा रहेबर खान यांना केवळ 15 हजार 50 मते मिळाली व ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले.
आज सकाळी 8 वाजता वांद्रे पूर्वच्या समाज मंदिर सभागृहात मतमोजणी सुरू झाली. मात्र तृप्ती सावंत यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत राणेंना पिछाडीवर ढकलले होते. राणेंची ही पिछाडी कायम राहिली व उत्तरोत्तर फेरीत ती वाढतच गेली. अखेर तृप्ती सावंत यांनी राणेंचा 19 हजारांहून अधिक मतांनी दारूण पराभव केला.