Home Blog Page 3612

अरिजित सिंगचा मधाळ स्वर मराठीतही

क्यों की तुम ही हो…, मेरी आशिकी,

मुस्कुराने की वजह तुम हो’,

में रंग शरबतों का’,

कभी जो बदल बरसे

 

एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज… अरिजित सिंग.

‘आशिकी २’ च्या यशाला अरिजित सिंगने एक वेगळी उंची गाठून दिली. छोट्या-मोठ्यांच्याही ओठांवर रुळणाऱ्या या गाण्यांनी अरिजित सिंगची मोहिनी सर्वच वयोगटांत पसरवली आहे. ही स्वरमयी जादू आपल्याला लवकरच मराठीतही अनुभवता येणार आहे. जिगवी प्रोडक्शन प्रस्तुत येस आय कॅनया मराठी चित्रपटाद्वारे अरिजित सिंगचा आवाज मराठीतही ऐकायला मिळणार आहे. पावलांना मार्ग कळे ना…या अक्षय खोत यांनी लिहिलेल्या गीताला अरिजित सिंगने आपल्या मधाळ आवाजाने चारचाँद लावलेत. नुकतेच या गीताचे ध्वनिमुद्रण पार पडलं.  

अमित शाह यांच्या कथेवर आधारलेला येस आय कॅनहा चित्रपट वडील आणि मुलाचे नातेसंबंध अधोरेखित करतो. दिग्दर्शिका संगीता राव आणि अभिजीत गाडगीळ या द्वयींनी मिळून पटकथा लिहिली असून संवाद अभिजीत गाडगीळ यांचे आहेत. येस आय कॅनचे छायांकन नरेन गेडीया यांचे आहे. अक्षय खोत यांच्या गीत-संगीताने सजलेला येस आय कॅनहा नक्कीच विशेष ठरेल.

येस आय कॅनचित्रपटात राजेश शृंगारपुरे,  नीना कुलकर्णी,  मिहीर सोनी,  मृणाल ठाकुर,  परेश गणात्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येस आय कॅनलवकरच चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट तर्फे पो! नावाचे विदेशी रुचकर चवीचे स्नॅक्स बाजारात

0

पुणे,: घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट्स एलएलपी.  हा संजय घोडावत ग्रुपचा FMCG विभाग या उद्योगातील झपाट्याने वाढणारा ब्रँड आहे.  त्यांनी भारतीय ग्राहकांसाठी स्नॅक्स मधील नवीन उत्पादन श्रेणी आणली आहे . कंपनीने स्नॅक्स फुड ची एक नवीन श्रेणी PO! या नावाने सुरु केली आहे. या नवीन श्रेणी मध्ये पोटॅटो चिप्स , स्टिकीज (Corn extruded snacks) आणि Thinlets (Potato sticks) यांचा समावेश आहे

PO! च्यामाध्यमातून भारतीय ग्राहकाला विदेशी चवीचे स्नॅक्स सुयोग्य किमतीत विकत घेता येणार आहेत. या उत्पादनांचा मुख्य उद्देश म्हणजे परवडणार्या दरात भारतीय ग्राहकाला उच्च दर्जाचे उत्पादन देणे असा आहे. यानवीन उत्पादनांतून शहरी आणि निम-शहरी भागातील तरुण पिढीला केंद्रित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतीय ग्राहकाला रुचेल असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चवींचे केलेले सुयोग्य मिश्रण अशी हि उत्पादने असणार आहेत. PO! द्वारे ग्राहकाला एक विशेष आणि विस्तृत श्रेणी अनुभवायला मिळणार आहे, इटालियन फूड प्रेमींसाठी पिझ्झा फ्लेवर, मेक्सिकन फूड प्रेमींसाठी जॅलपेनो फ्लेवर तसेच इस्टर्न टॅंगो ज्युसी चवी साठी थाईस्वीट चिली अशा प्रकारच्या अनेक चवी उपलब्ध करण्यात आले आहे.

सामान्य भारतीय ग्राहकांना रुचेल अशी उत्पादनांची विस्तृत श्रेणी असणार आहे.या विस्तृत श्रेणीची सुरुवात रु.१० प्रती पॅक पासून आहे.

संजय घोडावत ग्रुपचे संचालक श्रेणिक घोडावत यावेळी बोलताना म्हणाले,भारतात असणाऱ्या याक्षेत्रातील प्रमुख कंपनींचे सध्या ३ते४ चफ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत, हि तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने आमची उत्पादने सुरुकरण्यात आलेली आहेतअपुऱ्या range मुळे ग्राहक इम्पोर्टेड उत्पादनांक डेवळतो जो कि भारतीय उत्पादनां पेक्षा तुलेनेने जास्त आहे.  PO! च्यामाध्यमातून आम्ही एक विशेष श्रेणी सुरु करीत आहोत ज्यात जगभरातील विविध फ्लेवर्स असतील.”

ही नवीन उत्पादन श्रेणी भारतीय ग्राहकांशी आणि बाजारपेठेशी असणारी आमची बांधिलकी दर्शवते.  ही नवीन श्रेणी ग्राहकांना नवीनच व आणि अनुभव देईल अशी मला विश्वास आहे. खूप संशोधन करून हे फ्लेवर्स तयार करण्यात आले आहेत आणि आम्हाला खात्री आहे कि भारतीय बाजारपेठेत आमच्या यानवीन प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल व या फूडक्रांती ची या उद्योगात प्रशंसा होइल.

कंपनीने नाविन्यपूर्ण अशा packaging च्या सहाय्याने या नवीन श्रेणी तून एकक्रांती याउद्योगक्षेत्रात आणली आहे. PO ! ची सर्व उत्पादने आकर्षक अशा पॅक मध्ये असणार आहेत. जास्तीतजास्त विदेशी फ्लेवर्स स्नॅक्स मध्ये आणून ग्राहकाला आंतरराष्ट्रीय फ्लेवर्स भारतीयदरात देणे संजय घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट चे ध्येय आहे.

Ghodawat consumer products बद्दल

विविध क्षेत्रात कामकरणाऱ्या कोल्हापूर, महाराष्ट्र स्थित संजय घोडावत ग्रुपच्या FMCG अंतर्गत घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट हा विभाग आहे. ‘स्टार’ या नावाने घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट  ने ग्राहक उत्पादन क्षेत्रात सुरुवात केली. ‘स्टार’ या नावाला साभाविक आणि प्रचंड प्रमाणात भारतीय निमशहरी आणि ग्रामीण बाजारात प्रतिसाद मिळाला. गाठीशी असणारा अनुभव, विचारक्षमता, देवाण-घेवाण साधने आणि नेटवर्कच्या साहाय्याने इतरांना जे अशक्य झाले तेथे ग्रुप पोहचू शकला.स्टार हा आज च्याघडीतील कन्झ्युमर प्रॉडक्ट  मधील महत्वाचा ब्रँड  बनला आहे तसेच ग्राहक निष्ठा आणि मागणी अनुभवत आहे. जागतिक पातळीवर सर्वात मोठा कन्झ्युमर ब्रँड बनण्याचे ध्येय घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट हे तीव्र वृद्धीच्या मार्गावर आहे.

तयार असलेल्या विहीर, बोअरवेलच्या वीजजोडणीसाठी 27 पर्यंत मुदतवाढ

0

पुणे,  : शेतात विहीर किंवा बोअरवेल तयार आहे परंतु

वीजजोडणी नाही अशा शेतकर्‍यांना कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी

देण्याच्या धडक कार्यक्रमास पुणे परिमंडलात येत्या दि. 27 एप्रिलपर्यंत

मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे परिमंडलातील ज्यांच्या शेतात विहीर किंवा बोअरवेल उपलब्ध आहे

व कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणीची मागणी आहे, अशा शेतकर्‍यांनी नवीन

वीजजोडणीचा ए-1 अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दि. 27 एप्रिल 2015

पर्यंत संबंधीत उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन

महावितरणने केले आहे.

तसेच ज्या शेतकर्‍यांच्या कृषीपंपासाठी वीजजोडणी उपलब्ध आहे परंतु

विहीर किंवा बोअरवेल खचल्यामुळे, बुजल्यामुळे किंवा निकामी झाल्यामुळे

पाण्याचा उपसा होत नसतानाही वीजदेयक येत आहे, अशा शेतकर्‍यांनी

वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून घ्यायचा असल्यास त्यांनी दि. 27

एप्रिल 2015 पर्यंत संबंधीत उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी किंवा असलेली वीजजोडणी

कायमस्वरुपी खंडित करण्यासाठी कृषीपंपधारकांनी टोल फ्री असलेल्या

180020033435 आणि 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे

आवाहन महावितरणने केले आहे.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या ‘कुशल’ची न्यूझीलंडमध्ये बाजी ‘ओशानिया’ जागतिक कौशल्य स्पर्धेत पटकावले कांस्य पदक

0

1

पुणे : कुशल क्रेडाई पुणे मेट्रोने प्रशिक्षण दिलेल्या टिकम सिंग आणि परशुराम नायक या दोन कामगारांनी न्यूझिलंड येथे झालेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्यांनी बांधकाम व इमारत निर्माण तंत्रज्ञान या गटात भाग घेतला होता.  नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) पाठविण्यात आलेल्या संघाचा ते महत्वपूर्ण भाग होते. ही स्पर्धा १३ ते १७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली.

न्यूझीलंड येथे झालेल्या या स्पर्धेत टीकम सिंग यांनी ‘भिंती व फरशीवरील टाईलिंग'(वॉल अ‍ॅन्ड फ्लोअर टायलिंग) या कौशल्य गटात तर परशुराम नायक यांनी ‘विटांचे बांधकाम’ (ब्रिक लेईंग)  या गटात कांस्य पदक मिळवले. विटांचे बांधकाम यासाठी(ब्रिक लेईंग) श्री. कवीश थकवानी तर ‘भिंती व फरशीवरील टाईलिंग’यासाठी (वॉल अ‍ॅन्ड फ्लोअर टायलिंग)श्री. मदन ठोंबरे स्पर्धकांसोबत गेले होते यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी प्रशिक्षण घेतले आणि यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेतला.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री. शांतीलाल कटारिया यांनी या मोठ्या यशाबद्दल विजेत्यांचे अभिनंदन करून ते पुढे म्हणाले, की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) प्रथमच बांधकाम तंत्रज्ञानातील या प्रकारासाठीच्या स्पर्धेसाठी हा संघ पाठवण्यात आला होता. तरीसुद्धा कामगारांनी त्यांच्या परिपूर्ण प्रयत्नांनी आपल्या देशाचे नाव जगासमोर उंचावले याचा मला  अभिमान वाटतो.

हे यश सांघिक कार्यामुळे आणि कुशलच्या सुकाणू समितीतील श्री. कवीश थकवानी व श्री. मदन ठोंबरे या दोन सदस्यांनी स्पर्धकांना दिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणामुळे  प्राप्त होऊ शकले, अशी भावना कुशलचे व्हाईस चेअरमन श्री. रणजीत नाईकनवरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावर्षीच्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये मध्ये भारताशिवाय कोरिया, कॅनडा, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांनी भाग घेतला होता. एनएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. दिलीप चिनॉय यांनी कुशलच्या संघाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करून या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

“ऍप’द्वारे पुन्हा पावकी-निमकी भेटीला ! पावकी निमकी पाढ्यांचे “अंकनाद ऍप’द्वारे पुनरुज्जीवन!

0

1

पुणे :

पावकी -निमकी पाढे “अंकनाद’ ऍपद्वारे पुन्हा भेटीस आले असून, “निर्मिती इपिक’ या संस्थेद्वारे त्याचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. प्रा. प्र. चि.शेजवलकर, “कॉलेज ऑफ इंजिनियरींग’ चे प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आणि ऍड. अजय वाघ (रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 चे रोटेरियन युथ डायरेक्टर) यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 21 एप्रिल रोजी “लोकमान्य टिळक संग्रहालय’ (केसरी वाडा) येथे या ऍपचे उद्‌घाटन झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार नामजोशी यांनी केले.

यावेळी बोलताना शेजवलकर म्हणाले, “सध्या शालेय स्तरावर पाठांतर कमी होत आहे हे योग्य नाही. आता अंकनाद मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे  मुलांना हसत खेळत पाढे पाठांतर करता येणार आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

ऍड. अजय वाघ म्हणाले, “बदलत्या तंत्रज्ञानचा वापर करून “अंकनाद’ या ऍप्लिकेशनद्वारे पाढे पाठांतर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.’

या ऍप विषयी माहिती देताना सौ. निर्मिती नामजोशी म्हणाल्या, “गणित हा विषय कोष्टकांवर अवलंबून असतो. “बे एके बे’, “बे दुणे चार’, “बेत्रिक…..’पाढे !  याप्रमाणे मराठी भाषेने पावकी निमकी, सवाकी, दीडकी एकत्र अशी तयार केलेली ही अष्टके म्हणजे विश्वाला दिलेली देणगी होय. याच्या वापरातून उच्चार शास्त्रावर, स्मरणशक्तीवर आणि आत्मविश्वासावर निश्चित परिणाम होतो. हा ज्ञानठेवा आजकाल शाळांमधून तसेच घरांमधून नामशेष झाला आहे. गणकयंत्राच्या अथवा संगणकाच्या अधीन झाल्याने आपल्या मेंदूच्या क्षमतेचा वापर कमी झाला आहे. “अंकनाद’ हे मोबाइल ऍप आपल्यापर्यंत आम्ही संगीतबद्ध करून आणले आहे.
“अंकनाद’ या ऍप्लिकेशनद्वारे बालवाडीपासून ते पदवी पश्चात शिकणाऱ्यांसाठी हे ऍप्लिकेशन उपयुक्त आहे.’

सौ. निर्मिती नामजोशी यांनी या “अंकनाद ऍप’ला संगीतबद्ध केले आहे. श्रृती आवटे या लेखिकेने या पाढ्यांना स्वर साज चढविलेला आहे. अपूर्वा धराधर आणि प्रियंका डोळे यांनीसुद्धा स्वर दिला आहे.

वसुंधरा दिनानिमित्त “ऍलर्ट’ संस्थेतर्फे पर्यावरण विषयक माहितीपट

0

1

पुणे :

“ऍलर्ट’ (असोसिएशन फॉर लिडरशीप एज्युकेशन रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग) या पर्यावरण जागृतीसाठी कार्यरत संस्थेतर्फे “होम’ हा पर्यावरणविषयक माहितीपट दाखविण्यात आला. एरियल फोटोग्राफीद्वारे पृथ्वीची विलोभनीय रूपे, वैविध्य आणि मानवजातीकडून पर्यावरणाला असलेला धोका याचे चित्रण या माहितीपटात होते.

“इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व’ केंद्र येथे “वसुंधरा दिना’निमित्त हा माहितीपट दाखविण्यात आला. ऍलर्टच्या संस्थापक, खासदार ऍड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या.

पृथ्वी आणि पर्यावरण वाचविण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. नीला विद्वांस, रवी चौधरी, ऍड. नानासाहेब साळुंखे, अशोक राठी, मनाली भिलारे, शशिकला कुंभार, सौ. मृणालिनी वाणी हे उपस्थित होते.

विकास आराखड्यासही हवी एक्सपायरी डेट : डीएसके

0

पुणे :  कोणत्याही शहराच्या विकासाची नियोजनबद्ध आखणी ही दूरदृष्टीकोनातून व्हावी. किमान शंभर वर्षानंतर भेडसावणाऱ्या समस्यांचा त्यात विचार व्हायला हवा. परंतू आपल्याकडे मात्र याचा प्रकर्षाने अभाव जाणवतो. शहराचा विकास आराखडा तयार करताना केवळ काही वर्षापुरताच विचार केला जातो. या विकास आराखड्यास मंजुरी मिळण्यास होणारी दिरंगाई, लोकप्रतिनिधींची उदासीनता, शासकीय निष्क्रियता या कारणास्तव शहराच्या वाढीच्या तुलनेत तो आराखडा कधीच मागे पडलेला असतो. त्यामुळे औषधांप्रमाणेच विकास आराखड्यासही एक्सपायरी डेट हवी, असे मत प्रसिद्ध व्यावसायिक व डीएसके समूहाचे अध्यक्ष श्री डी. एस. कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.

मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी, न्यास यांच्या स्नेहसेवा संस्थेच्या वतीने निवारा आश्रमाच्या सभागृहात श्री. डी. एस. कुलकर्णी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुणे शहराला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रामुख्याने या मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा झाली. पायाभूत सुविधांच्या बाबतीत पाश्च्यात्य देशांच्या तुलनेत आपला देश कुठे मागे पडतोय हे अनेक उदाहरणांचे दाखले देत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक नाविण्यपूर्ण उपाय योजनांचेही त्यांनी पर्याय सुचविले. श्री श्याम भुर्के यांनी ही मुलाखत घेतली.

कुलकर्णी म्हणाले की, रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असल्याने पुणे, मुंबई, बंगळूर आणि दिल्ली या शहरांत सर्वाधिक स्थलांतर होते. साहजिकच तेथील पायाभूत सुविधांवर ताण येतो तसेच शहराची अनियोजित वाढ झाल्याने बकालीकरणही वाढते. यामुळे त्या शहराचे संपूर्ण रूपच बदलून जाते. हे चित्र बदलण्यासाठी सखोल व दूरदृष्टीने नियोजन व्हायला हवे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा अशा मूलभूत सुविधांसह किमान १०० किलोमीटरपर्यंत शहराचा विकास व्हावा. महत्वाची शहरे जलवाहतूकीने एकमेकांना जोडली जावीत. सार्वजनिक वाहतूकीत सुधारणा व्हावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण व पुर्नवापर करण्यावर भर द्यावा. रहदारी, पार्किंग सारखे प्रश्र्न टाळण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलाव्यात, असे अनेक पर्याय श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सुचविले. तसेच शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या भागात ट्राम कशी सोयीस्कर व परवडणारी ठरेल, हे देखील त्यांनी पटवून दिले.

एका स्मार्ट शहराचे प्रारूप आम्ही ड्रीम सिटीच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवत आहोत. संपूर्ण खासगी बळावर उभारण्यात येणार्या प्रकल्पाच्या नव्हे तर या ड्रीम सिटीचा आदर्श घेऊन सरकारने पुणे व इतर शहरांची नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करावी, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्री. सुरेश ताम्हणकर यांनी आभार मानले.

शशांक, दीपिका संगे सागरिकाचा रोमॅंटिक “यारा….”!!

0
1
झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची” या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण ही कोणती ही अफवा नसून “सागरिका म्युझिक” च्या “यारा…” या नवीन रोमॅंटिक ड्यूएट गाण्यासाठी शशांक केतकर आणि गायिका दीपिका जोग यांनी पार्श्वगायन केले असून ह्या गाण्याचा व्हिडीओ सुद्धा त्याच्यावरच चित्रित करण्यात आला आहे.
मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक नवोदित गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असलेल्या सागरिका म्युझिकच्या सागरिका बाम या नेहमीच नवीन टॅलेंटच्या शोधात असतात. दीपिका ही केवळ टॅलेंटड नसून ती व्हर्सटाईल आहे. तिचं “यारा…” हे सॉफ्ट रोमॅंटिक गाणं मी रिलीज करण्याचे  तसेच त्याचा उत्तम व्हिडीओ तयार करण्याचे मी ठरविले. शशांक हा खरंच खूप गुणी अभिनेता आहे. आपल्या संतुलित अभिनयातून शशांकने अपेक्षेपेक्षा अधिकच चांगले काम केले असल्याचे सागरिका बाम यांनी आवर्जून सांगितले.
मुळात मी अभिनेता आहे त्यामुळे कॅमेरा फेस करणे हे माझ्यासाठी कठीण नसून माईक फेस करणे खरंतर थोडे अवघड होते. माझी आणि दीपिकाची ओळख तशी फार जुनी आहे. विलेपार्ल्यातील तिच्या घरी अनेक वेळा जॅमिंग सेशन्स मध्ये मी आवर्जून जायचो. गाणे गुणगुणायचो भविष्यात आपणही एखाद्या गाण्यासाठी पार्श्वगायन करू अशी कल्पना माझ्या डोक्यात होती आणि ती दीपिका, जसराज, हृषिकेश आणि सौरभ यांच्या उत्तम सहकार्यामुळे आज पूर्ण झाली. सागरिका बाम यांनी याआधीही तयार केलेले व्हिडिओ मी पाहिलेले असून त्यांच्यासोबत  काम करण्याचा अनुभव उत्तम होता. मला खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल अशी आशा अभिनेता शशांक केतकर यांनी व्यक्त केली.
मला खूप मस्त वाटते आहे. सागरिका मॅडम यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. ह्या गाण्याचा व्हिडीओ करताना सुरुवातीला थोडे दडपण होते पण शशांकने कॅमेरा संदर्भात दिलेल्या टिप्स खूप उपयोगी ठरल्या असे गायिका दीपिका जोग हिने सांगितले.
“यारा… ” या सुमधुर गाण्याचे शब्द गीतकार वैभव जोशी यांनी लिहिले असून संगीत जसराज जोशी, सौरभ भालेवर आणि हृषिकेश दातार या त्रिकुटाने दिले आहे. “तेव्हाची कविता कोरी” या गाण्यासाठी देखील या तीन संगीतकारांनी सागरिका सोबत आधी काम केलेले आहे. या गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांना  सागरिका म्युझिकच्या युट्युब चॅनेल पाहता येणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी चित्रकारांचा मदतीचा हात

0

पुणे:

पुण्यातील चित्रकार कलावंत आणि रसिकांच्या चित्र-मित्र परिवाराच्या वतीने ‘अर्थात’ विशेष कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीमधून संकलित होणार्‍या निधीतील लक्षणीय वाटा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षण खर्चासाठी देण्यात येणार आहे.

‘अर्थात’ कलाप्रदर्शन पुण्यामध्ये आपटे रस्त्यावरील हॉटेल ‘रॅमी ग्रँड’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, अशी माहिती प्रा. चंद्रशेखर कुमावत, संजय कांबळे आणि राजेंद्र देशपांडे यांनी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पुण्यात होणारे ‘अर्थात’ प्रदर्शन दिनांक 24, 25 आणि 26 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या उपक्रमाद्वारे प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीमधून संकलित झालेला निधी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या सुमारे 350 मुला मुलींना प्रत्येकी 10,000/- याप्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रा. डॉ.वि.दा.कराड, पी.ए.इनामदार, डॉ.शिवाजीराव कदम, भारत देसडला आणि डॉ. दत्ता कोहिनकर आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाची संकल्पना ‘शार्प मास कम्युनिकेशन प्रा.लि.’ यांची असून, शार्प उद्योग समूहाचे या उपक्रमास सहकार्य लाभले आहे.

भारतभरातील नामवंत चित्रकारांच्या निवडक व निमंत्रित चित्रकृतींचा या प्रदर्शनामध्ये सहभाग असणार आहे. यामध्ये ‘अर्थात’ हे पहिले चित्रप्रदर्शन आहे. अर्थात ही प्रदर्शनशृंखला असून, महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पुढील काळात अशी कलाप्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत

जेसीबीने भूमिगत वीजवाहिनी तोडली; एमजी रोड परिसरात वीजपुरवठा सुरळीत

0

पुणे,: महापारेषण कंपनीची वाहिनी टाकण्याचे काम करणार्‍या कंत्राटदाराच्या जेसीबीने

महावितरणची भूमिगत वाहिनी तोडल्यानंतर विस्कळीत झालेला एमजी रोड, कौन्सील हॉल परिसरातील

वीजपुरवठा  (दि. 21) सायंकाळी 6 वाजता सुरळीत झाला.

याबाबत माहिती अशी, की महापारेषण कंपनीच्या मुंढवा ते जीआयएस रास्तापेठ या उपकेंद्गादरम्यान

132 केव्ही क्षमतेची भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी 11.45 वाजता भारत

फोर्जच्या गेटसमोर या भूमिगत वाहिनीसाठी खोदकाम सुरु असताना महावितरणच्या अलंकार 1 व 2 या

दोन्ही 22 केव्ही क्षमतेच्या भूमिगत वाहिन्या तुटल्या. परिणामी एमजी रोडमधील काही भाग, कौन्सील हॉल,

आगरकरनगर, क्विंन्स गॉर्डनमधील सरकारी निवासस्थाने, शांती कुंज सोसायटी, ऑयनॉक्स, राजेंद्गसिंग मिल्ट्री

इन्सिट्यूट, सर्कीट हाऊस, एल.के. कॉर्पोरेशन परिसर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीजपुरवठ्याच्या दोन्ही वाहिन्या तुटल्यामुळे तसेच भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने विजेची पर्यायी व्यवस्था

उपलब्ध होऊ शकली नाही. तथापि जहॉगिर हॉस्पीटलचा वीजपुरवठा तातडीने पर्यायी व्यवस्थेतून सुरु

खोदकामात तुटलेल्या दोन्ही 22 केव्ही भूमिगत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम लगेचच सुरु करण्यातआले.

प्रभारी मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत, अधीक्षक अभियंता श्री. अंकुश नाळे यांनी भेट देऊन दुरुस्ती

कामाची पाहणी केली. यानंतर सायंकाळी 6 वाजता अलंकार 1 ही भूमिगत वाहिनी पूर्ववत जोडण्यात आली

व त्याद्वारे सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणच्या संबंधीत

कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत.

आई मुलीच्या नात्यावर असलेल्या ब्लॅंकेट सिनेमाचा मुहूर्त संपन्न

0

1

पुणे

मराठी सिनेमात नवनवीन विषयावर प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद देखील  मिळत आहे. मराठीची ही वाटचाल आणखी यशस्वीरित्या होत आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक नामवंत कलाकर दिले आहेत. त्यांचीच पुढची पिढी आपली सिनेसृष्टी घडवत आहे. अशीच एक नव्या दमाची फळी ‘ब्लॅंकेट’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  लाईट्स, कॅमेरा, अक्शन म्हणत ‘ब्लॅंकेट’ सिनेमाच्या मुहूर्ताचा clap नितीन मनमोहन यांनी नुकताच पुण्यात दिला. आई मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. सिनेमातील आपलं वेगळेपण जपणारा असा हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाची कथा अतिशय साधी आहे. एक सहा वर्षांची लहान मुलगी, ती आणि तिची आई सोबत असणारे दारिद्र्य आणि कचऱ्याचे डोंगरा ऐवढे ढीग. या सगळ्यातही फुलणारं त्या दोघींमधील भावविश्व या सिनेमात पहायला मिळणार आहे. राज गोरडे आणि आशुतोष गोविंदराव यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. होरीझोन मोशन पिक्चर्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार असून डॉ सुरेश तेलंग आणि आशुतोष गोविंदराव हे सिनेमाचे निर्माते  आहेत तर मुकुंद लोखंडे सहनिर्माते आहेत.  नंदिता धुरी, सिद्धी तेलंग, अथर्व बागेवाडी, आशुतोष गोविंदराव, राज गोरडे, रेवती लिमये, ऐश्वर्या जाधव, अनिकेत बर्वे असे काही नवीन चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची मुळ संकल्पना राज गोरडे यांची असून अनिकेत गायकवाड, राज गोरडे तसेच आशुतोष गोविंदराव यांनी मिळून कथा लिहिली आहे. या सिनेमाचं शुटींग येत्या १२ मे पासून सुरु होणार आहे.

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस (डायल 108) रुग्णवाहिका सेवा मार्चअखेर 2,68,497 जणांना लाभ

0

पुणे :

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेतून आपत्कालीन परिस्थितीत रूग्ण सेवा सुरू असून, मार्च 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार 2 लाख 68 हजार 497 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.

‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी ‘बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील‘औंध उरो रुग्णालयात’ या सेवेचे प्रमुख केंद्र व ‘रिस्पॉन्स सेंटर’ आहे.

‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.

मार्च 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार राज्यातील रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन ‘108’ सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (11, 876), अकोला (4702), अमरावती (9336), औरंगाबाद (11, 929), बीड (7709), भंडारा (3324), बुलढाणा (6768), चंद्रपूर (5218), धुळे (5112), गडचिरोली (1190), गोंदीया (3982), हिंगोली (4317), जळगांव (9847), जालना (4957), कोल्हापूर (12,603), लातूर (8727), मुंबई (22, 314), नागपूर (10, 044), नांदेड (10, 711), नंदूरबार (3767), नाशिक (13, 119), उस्मानाबाद (5508), परभणी (4525), पुणे (18,998), रायगड (3840), रत्नागिरी (2927), सांगली (9017), सातारा (8983), सिंधुदूर्ग (2330), सोलापूर (11, 837), ठाणे (12,623), वर्धा (2173), वाशिम (3493), यवतमाळ (8633), पालघर (1258).

डायल 108 रूग्णवाहिकेमध्ये मार्च अखेर पर्यंतच्या तपशीलानुसार 2913 प्रसुती करण्यात आल्या. 78,503 महिलांना प्रसुति दरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा देण्यात आली. 821 रूग्णांना रूग्णवाहिकेतील अत्याधुनिक व्हेंटीलेटर सुविधेच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. ‘डिफिब्रिलेटर’च्या मदतीने 92 रूग्णांना सेवा देण्यात आली.

‘वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘108 टोल फ्री’ रूग्णवाहिका सेवेमुळे मार्च 2015 पर्यंतच्या कालावधीत 2 लाख 68 हजार 497 लोकांचे जीव वाचले.’, अशी माहिती ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली.

मुंबईकडे जाणारी एस.टी बस पांगोळी (खंडाळा) येथे महामार्गावरून दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात स्थळी सेवेच्या 6 अद्ययावत रूग्णवाहिकांनी दहाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सोलापूरजवळील टेंभूर्णी येथे नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या 3 अद्ययावत रूग्णवाहिकांनी विसाव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.  गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविण्यासाठी ‘डायल 108’ च्या रूग्णवाहिका डॉक्टर आणि सहाय्यकांसह उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यावेळी ‘इमर्जन्सी गो -टीम’ ही सेवा प्रथमच आप्तकालीन सेवेमध्ये राबविण्यात आली.

याआधी पुणे, सातारा, पंढरपूर या तीन जिल्ह्यांतून जाणार्‍या वारी मार्गावर या वर्षी प्रथमच 108 सेवेच्या आपत्कालीन रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमुळे वारीदरम्यान विविध कारणांनी दरवर्षी होणार्‍या साधारण 25 ते 30 वारकर्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन यावर्षी हे प्रमाण सहापर्यंत खाली आणण्यात यश आले. तसेच भीमाशंकरजवळ माळीण गावात दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या (‘डायल 108’) 28 अद्ययावत रुग्णवाहिकांनी पूर्णवेळ मदतकार्य केले. एकवीरा यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी 10 अद्ययावत रूग्णवाहिकांची सेवा देण्यात आली.
—————————————————————————

नितीन देसाईंनी उलगडला कलादिग्दर्शनातला प्रवास

0

मराठी सिनेसृष्टीला सोनेरी दिवस दाखवणाऱ्या चित्रपती डॉ.व्ही शांताराम यांच्या व्ही शांताराममोशन पिक्चर ट्रस्टच्यावतीने युवाव प्रस्थापित चित्रकर्मींसाठी आयोजित केलेल्या सिने कल्चरल सेंटरच्या पहिल्या चर्चासत्राचे पहिलं पुष्प ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गुंफले. 

आपल्या कलादिग्दर्शनाचा प्रवास उलगडताना कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची व मेहनतीची यशोगाथा त्यांनी मांडली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाला मिळालेला कला दिग्दर्शनाचा पुरस्कार हा माझ्यासाठी टर्निग पाँईट ठरला असं सांगत या क्षेत्रात येताना चिकाटी आणि अभ्यासूवृत्ती महत्त्वाची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

चाणक्य, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या सारख्या मालिकांपासून ते ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘देवदास’ या सारख्या असंख्य चित्रपटांच्या सेट्सच्या निर्मितीसाठी केलेला तेथील संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक स्थानांचा अभ्यास, कला दिग्दर्शनाचे बारकावे याच्या चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या, तसेच  सेट्सच्या निर्मितीची प्रात्यक्षिकं त्यांनी याप्रसंगी सादर केली. बी.डी.डी. चाळीपासून सुरु झालेला प्रवास,कला दिग्दर्शन क्षेत्रातला संघर्ष, मातब्बर निर्माता-दिग्दर्शकांची मिळालेली साथ, मिळालेला मान-सन्मान, पारितोषिक आणि भविष्यातील योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिपप्रज्वलन केले. या उपक्रमाचे संकल्पनाकार हर्षल बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक केलं तर सूत्रसंचालन अमित भंडारी यांनी केलं. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्या या उपक्रमाची झालेली दमदार सुरुवात प्रस्थापित व युवा चित्रकर्मींसाठी मार्गदर्शक ठरेल अशी भावना उपस्थित चित्रकर्मींनी बोलून दाखवली. श्री. किरण शांताराम यांनी नितीन देसाई यांचे आभार व्यक्त केले. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक करतअसे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत असे आवर्जून नमूद केले.

मल्हारी मार्तंडच्या गडावर ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमातील हिरोच्या एन्ट्री साँगचे चित्रिकरण

0

यळकोट… यळकोट… जय मल्हार, सदानंदाचा यळकोट… या जय घोषात जेजुरी नगरी दुमदुमली. हळदीच्या भंडाऱ्याने पिवळी झालेल्या जेजुरीचे तेज अधिकच वाढले होते. कॅरी ऑन मराठा या आगामी सिनेमातील हिरोच्या एन्ट्रीचे साँग या ठिकाणी शूट करण्यात आले. जेजुरीच्या मातीतच असलेला जोश, उर्जा आणि उत्साह चित्रीकरणादरम्यान पाहायला मिळाला. मराठी सिने सृष्टीत अनेक महत्वाचे बदल घडून येत आहेत… चांगल्या स्क्रिप्ट सोबतचं मराठी सिनेमाला उत्तम दिग्दर्शन तसेच छायांकनही मिळालंय  अनेक नवीन चेहरे इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत… बॉलीवूडच्या बरोबरीला मराठी सिनेमा उतरलाय…. असाच एक आगळा वेगळा विषय घेऊन आगामी  कॅरी ऑन मराठा हा सिनेमा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  ‘कॅरी ऑन मराठा’ या सिनेमाच दिग्दर्शन संजय लोंढे हे करत असून गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुळकर्णी या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नंदा आर्ट्स अँड वॉरीअर्स ब्रदर्स मोशन पिचर्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे …. जेजुरी येथील प्रसिद्ध मल्हारी मार्तंडाच्या मंदिरात अगदी भावनिक पण धमाल अशा गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलंय. गुरु ठाकूर यांनी हे गाणं लिहिल असून सुजित कुमार यांनी कोरीओग्राफी केली आहे. अरुण प्रसाद यांनी सिनेमाच्या छायांकनाची धुरा सांभाळली आहे…या सिनेमाच काही शुटींग बाकी असून  मुंबई, जेजुरी, कोल्हापूर, बदामी, कर्नाटक या ठिकाणी सिनेमाचं शुटींग झालं आहे …सिनेमात एन्टरटेनमेन्ट मसाला असून तो नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी या सिनेमाच्या टीमची आशा आहे.

मराठी सिनेमात पहिल्यांदाच एका स्त्री अभिनेत्रीने साकारली तृतीयपंथीयाची भूमिका!!

0
सत्य घटनेवर आधारित “ऋण” १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात!!
श्री समर्थ इंटरनॅशनल फिल्म्स’ च्या मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांची निर्मिती असलेला, विशाल गायकवाड दिग्दर्शित ” ऋण” या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी सिनेमातील मुख्य अभिनेत्री नारायणी शास्त्री, दिग्दर्शक विशाल गायकवाड, अभिनेते जयराज नायर, संगीतकार सिद्धार्थ आणि संगीत हळदीपूर कॅमेरामन नजीब खान आणि संवाद लेखक अजितेम जोशी आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थितीत होती.
शिक्षणासाठी एका खेडेगावातून शहरात आलेल्या एका गरीब मुलाची राहण्याची, खाण्याची आणि जगण्याची होणारी ससेहोलपट आणि त्यातून त्याला बाहेर  काढण्यासाठी अशा एका व्यक्तीचे प्रयत्न ज्या व्यक्तीला समाजात माणूस म्हणून स्वीकृती नाही, कारण ती एक तृतीयपंथीय आहे. अशा या समाजातील दोन पूर्णपणे वेगळ्या असलेल्या समाजातील व्यक्तींच्या नाजूक संबंधांवर आधारित “ऋण” सिनेमाची कथा असून ही कथा एका सत्य घटनेवर आधरित आहे.
“ऋण” सिनेमातून अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी तब्बल दहा वर्षानंतर मराठी सिनेमात पुनरागमन झाले आहे. मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री अभिनेत्री तृतीयपंथीयाची आव्हानात्मक अशी भूमिका साकारणार असून ही भूमिका नारायणी शास्त्री यांनी अगदी उत्तमपणे साकारली आहे. जेव्हा या  सिनेमाची स्क्रिप्ट मला ऐकवण्यात आली त्याच क्षणी मला ती खूप आवडली. एका स्त्रीसाठी हे पात्र साकारण हे किती आव्हानात्मक असून शकते याचा अंदाज मला स्क्रिप्ट वाचतानाच आला होता. तृतीयपंथीयांबद्दल समाजात जी टिंगल केली जाते ती खऱ्या अर्थाने योग्य नसून देवानेच त्याना समाजात स्त्री, पुरुष यांच्याबरोबर या तृतीयपंथीयांना बनविले आहे. आपल्या जशा काही अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याही काही अपेक्षा, भावना, इच्छा आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. असा हा नाजूक आणि तितकाच सामाजिक विषय केवळ मराठी सिनेमांमधूनच रसिकांनपर्यंत पोहोचवता येऊ शकतो कारण या मराठी रसिक श्रोत्यांकडूनच त्याला योग्य तो न्याय मिळू शकतो असे अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी माझे वजन तब्बल १५ किलोने वाढविले असून डबिंगसाठी ही मी तेवढीच जास्त मेहनत घेतल्याचे नारायणी यांनी आवर्जून नमूद केले
सिनेमातील ही मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी जेव्हा मी नारायणी यांना भेटलो तेव्हा मला बोलायला काहीच सुचत नव्हते. कारण माझ्या या सिनेमात तुम्ही तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार का? असे कसे विचारणार हा मला प्रश्नच पडला होता पण त्यांनी स्क्रिप्ट वाचली आणि त्यांना ती भावली व  त्यांनी लगेच होकार दिला. या सिनेमाचे निर्माते मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांनी मला उत्तम पाठबळ दिले. सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या असून सिनेमातील गाणीही श्रवणीय अशी आहेत आणि ती आपल्या सर्वाना आवडतील अशी आशा सिनेमाचे दिग्दर्शक विशाल गायकवाड यांनी व्यक्त केली.
“ऋण” सिनेमात अभिनेते मनोज जोशी आणि राजेश्वरी सचदेव या हिंदीतील नामवंत कलाकारांबरोबरच ओमकार गोवर्धन, अनंत जोग, विनय आपटे, विजय पाटकर, उषा नाईक, विवेक लागू, जयराज नायर आदी या प्रसिद्ध कलाकारांच्या ही महत्वपुर्ण भूमिका आहेत. सिनेमाची कथा विशाल गायकवाड यांची असून पटकथा विनोद नायर तर संवाद अजितेम जोशी यांनी लिहिले आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कॅमेरामन नजीब खान यांनी या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफार म्हणून काम पाहिले असून संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांनी केले आहे. गुरु ठाकूर आणि प्रकल्प वाणी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीताना हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी संगीत हळदीपूर आणि सिद्धार्थ हळदीपूर यांचे सुमधुर संगीत लाभले असून “ऋण” सिनेमातून या संगीतकार जोडीने  मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
तर अशी ही एक आगळी वेगळी प्रेमकथा असलेला सत्य कथेवर आधारित “ऋण” सिनेमा येत्या १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.