‘अच्छे दिन ‘ ची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून निषेध – युवक शहराध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
हिंद तरुण मंडळाच्यावतीने मोफत शववाहिनी ….
हिंद तरुण मंडळाच्यावतीने स्व. विनीत पटेल व स्व. मधुकर गिरमकर यांच्या स्मरणार्थ मोफत शववाहिनी वाहिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले . पुणे कॅम्प भागातील हिंद तरुण मंडळाच्या आवारात हा लोकार्पण सोहळा पार पडला . या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री , हिंद तरुण मंडळाचे पंचवार्षिक अध्यक्ष व पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बरकत मुजावर , नगरसेवक विनोद मथुरावाला , नगरसेवक अतुल गायकवाड , नगरसेविका रुपाली बिडकर , जनसेवा बँकेचे संचालक सचिन यादव , अड. प्रशांत यादव आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
या कार्यक्रमाचे उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्तविक दिलीप गिरमकर यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल ओव्हाळ यांनी केले तर आभार हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष आभार अतिश कुराडे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश भोज , अक्रम शेख , संदीप रेड्डी , गणेश तिप्पापुरकर , अमोल भोज , राजेंद्र गिरमकर , नितीन बत्तेल्लु , सौरभ परदेशी , गौरव परदेशी , संजय भोपे , निखिल बत्तेल्लु , राजेश नवलीकर , सनी कुराडे आदींनी विशेष परिश्रम घेतले .
या मोफत शववाहिनी वाहिकेसाठी नागरिकांनी ८४११९९११४४ या मोबाईलवर संपर्क साधावा
महिला सक्षमीकरण अभ्यास समितीच्या अंदमान दौर्यात खासदार, अॅड.वंदना चव्हाण यांचा सहभाग
पुणे :
केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरण अभ्यास समितीच्या अंदमान दौर्यात खासदार अॅड.वंदना चव्हाण सहभागी झाल्या होत्या. या दौर्यादरम्यान आदिवासी महिला, बचतगट आणि सरकारी प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. या समितीने कोलकाता, चेन्नई, पोर्ट ब्लेअर येथेे ही भेटी दिल्या. कामाच्या ठिकाणी असलेली व्यवस्था आणि लैंगिक छळ तसेच तुरुंगातील महिलांच्या समस्या याचाही अभ्यास समितीने केला.
दि. 15 मे 20 मे दरम्यान हा अभ्यास दौरा आयेाजित करण्यात आला होता. एअर पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया, एअर इंडिया, बँक ऑफ इंडिया अशा ठिकाणी उच्चपदस्थ महिलांची कामाची व्यवस्था आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अंदमान जेलमधील महिलांच्या भेटी घेउन त्यांना जामिन मिळतो का ? तेथे लैंगिक छळ कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली की नाही ? याबाबत अभ्यास करण्यात आला.
या समितीचा अहवाल संसदेत सादर करण्यात येणार आहे, असे खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.
झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मध्ये एलिझाबेथ एकादशी
बालपणीच्या गंमतीसोबतच मुल्यांची जपणूक करणारा, सहज सुंदर कथानक असणारा, बालकलाकारांच्या निरागस अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा आणि यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा मान मिळवत सुवर्णकमळावर आपलं नाव कोरणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ७ वा. या चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ झी मराठीवर होत आहे.
बालपणाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगताना आपण कायम ‘लहानपण दे गा देवा’ किंवा ‘रम्य ते बालपण’ सारख्या ओळी वापरतो. कारण लहानग्यांचं आपलं एक वेगळं भावविश्व असतं. त्या विश्वात स्वार्थ, हेवे दावे, ताण तणाव या गोष्टींना फारसा वाव नसतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद शोधत जगण्याचा हा काळ असतो. असंच काहीसं भावविश्व आहे पंढरपूरचा ज्ञानेश आणि त्याची बहिण मुक्ता उर्फ झेंडूचं. वडिलांचं निधन झालेलं त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी आईवर आहे. घरची परिस्थिती बेताची पण त्याचा परिणाम ना मुलांच्या शाळेवर झाला ना अभ्यासावर. यांच्या या छोट्या कुटुंबात अजून एक सदस्य आहे तो म्हणजे ज्ञानेशच्या वडिलांनी बनवलेली अनोखी सायकल – एलिझाबेथ. ज्ञानेशचे वडील वैज्ञानिक त्यामुळे विज्ञानाची एक वेगळी दृष्टी ज्ञानेशलाही मिळालीय. अभ्यासात हुशार असणा-या ज्ञानेशला किर्तनाचीही आवड आहेच पण त्यातही तो न्यूटनचे दाखले एवढ्या बेमालूमपणे देतो की किर्तनालाही वेगळा अर्थ प्राप्त होतो. अशा या छानशा कुटुंबावर एक संकट येतं. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही मुलं कशी मार्ग काढतात त्याची कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट.
आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारी करत पंढरपुरला जाणा-या वारक-यांच्या जीवनावर, त्यांच्या प्रवासावर आधारीत कथा आपण अनेक चित्रपटांतून बघितल्या होत्या परंतू ‘एलिझाबेथ एकादशी’ मधून प्रथमच त्यापलिकडची एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळाली ज्याची प्रशंसा सर्वच स्तरातून झाली. संतांच्या अभंगवाणीसोबतच शास्त्रज्ञांच्या शोधांच्या नियमांचे दाखले देत अध्यात्म आणि विज्ञान याची निराळी सांगड या चित्रपटातून घालण्यात आली. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. यात काम करणारी मुलं म्हणजे झेंडू, ज्ञानेश, गण्या त्यांचा निरागस अभिनय, त्यांचे संवाद तुफान लोकप्रिय झाले होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) या चित्रपटाने उत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘संत तुकाराम पुरस्कार’ पटकावला होता. याशिवाय अनेक मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं. आपल्या देशासहित परदेशातही मराठीचा झेंडा उंचावणा-या आणि बालपणाशी पुन्हा आपलं नातं जोडणा-या या ‘एलिझाबेथ एकादशी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ७ वा. झी मराठीवर होत आहे.
विजय कुंभार यांचे महापालिका आयुक्तांना पत्र – भष्टाचाराबाबतची आपली अनमोल वचने
सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना आज पाठविलेले पत्र जसेच्या तसे येथे देत आहोत
——————————–
प्रती , दिनांक – २६ मे २०१५
श्री.कुणाल कुमार
आयुक्त, पुणे महानगरपालिका
पुणे
विषय – भष्टाचाराबाबतची आपली अनमोल वचने
महोद्य
मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात आपण ’शहराचा आर्थिक विकास होत असेल तर भ्रष्टाचाराचा बाउ करण्याची आवश्यकता नाही’ असे विचार प्रकट केल्याचे वाचले. त्याचप्रमाणे सुशासनाच्या निकषांमध्ये जागतीक बँकेनेही भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याच्या मुद्याला अत्यंत शेवटचे स्थान दिले असल्याचा दावा करून आपण या वादात आपले विचार जागतीक बँकेशी सुसंगत असल्याचाही युक्तिवाद केला आहे.जागतीक बँकेलाही आपले विचार ऐकून धक्का बसेल .खरेतर आपल्या सुशासनाच्या निकषांचा असा अर्थ कुणी काढेल याचा विचार जागतीक बँकेने कधीही केला नसेल.
चीन मध्ये मोठय प्रमाणावर भ्रष्टाचार झाला तरी तीथे विकास झाल्याचे उदाहरण देउन आपण आपला दावा सिद्धदेखील करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व वाचून आश्चर्य वाटले नाही. उलट पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करण्यास आवश्यक असणारी महत्वाची गुणवत्ता आपल्याकडे असल्याने हा कार्यकाळ आपण पूर्ण करणार याबाबत आमच्या मनात आता कोणतीही शंका उरलेली नाही.
आम्ही आतापर्यंत, सुशासनाचे सर्व निक़ष पाळले तर भ्रष्टाचाराला फारसा वाव उरत नाही म्हणून सुशासनाच्या निकषांमध्ये ’ भ्रष्टाचारावर नियंत्रण‘ या मुद्द्याला सर्वात शेवटचे स्थान दिले गेले असावे असे समजत होतो.असो. शेवटी आपली विचारांची बैठक ही अनुभवातून पक्की झाली असल्याने आपले म्हणणे कदाचित खरे असेलही.
आता प्रश्न एवढेच उरतात की आतापर्यंतच्या आपल्या कार्यकाळात किती विकास कामे करण्यात आली. त्यात विकासाचे आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण काय होते? आर्थिक विकासामध्ये भष्टाचाराचे प्रमाण किती असावे, याबाबतीत आपला अनुभव काय आहे ? आपण याची काही निश्चित टक्केवारी ठरवली आहे का? असल्यास ती माहिती आपण पालिकेतील आपल्या सहका-यांना दिली आहे का? असल्यास त्याची माहिती सार्वजनिक करावी . म्हणजे गरजूंना आपल्या अभ्यासपूर्ण निमंत्रणाचा लाभ उठवता येईल.कळावे
उत्तराच्या प्रतिक्षेत
आपले
Nagrik Chetna Manch Surajya Sangharsh Samiti
Maj. Gen. SCN Jatar (Retd) Vijay Kumbhar
Telephone: + 912024475366 / + 919970093533 www.surajya.org
A 102 Neel Sadan, 1426 Sadashiv Peth, Pune 411030 vijaykumbhar.blogspot.in
Visit us at <http://www.nagrikchetna.com> 09923299199
“पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या विविध सेलच्या अध्यक्षांमध्ये होणार बदल शहराध्यक्षांनी 27 मे पर्यंत मागवले अर्ज
पुणे :
पुणे शहर “राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या वतीने पक्षातील विविध सेलच्या (विभागांच्या)अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात येत असल्याने इच्छुकांचे अर्ज खासदार, शहराध्यक्ष ऍड.वंदना चव्हाण यांनी मागविले आहेत.
यामध्ये महिला,युवक, विद्यार्थी, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी,अल्पसंख्यांक, सेवादल, ग्राहक, क्रीडा,पर्यावरण,युवती, सांस्कृतिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, भटक्या विमुक्त जाती जमाती,कामगार या सर्व विभागाच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी दिनांक 26 मे व 27 मे 2015 रोजी शहर कार्यालयात अर्ज करावेत,असे खासदार, शहराध्यक्ष ऍड.वंदना चव्हाण यांनी पत्रक ाद्वारे कळविले आहे.
तिरूपतीच्या दर्शनाला गेलेल्या बारामतीच्या 7 तरूणांचा अपघाती मृत्यू
बारामती- तिरुपतीकडे निघालेल्या बारामती तालुक्यातील सात जणांचा कर्नूल ते चित्तूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्देवी अंत झाला. वीस ते पंचवीशीतील युवकांच्या अकाली मृत्यूने बारामती तालुक्यावर आज शोककळा पसरली.
बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे व देऊळगाव रसाळ येथील ऋषीकेश पोपट गवळी, अनिल सत्यवान गवळी, शेखर बापूराव गवळी, सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, नागेश बाळासाहेब खराडे हे त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच 42- के- 2443) तिरुपतीक़डे निघाले होते. पहाटे अडीचच्या सुमारास कर्नूल चित्तुर महामार्गावर आंध्रप्रदेशातील चांगलामारी गावानजिक ही स्कॉर्पिओ अपघातग्रस्त झाली. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपशिल अद्याप प्राप्त झाला नाही.
आज सकाळी बारामतीत ही बातमी येऊन धडकल्यावर देऊळगाव रसाळ व उंडवडी गावावर शोककळा पसरली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती व अपघाताचे ठिकाण यांच्या सतत संपर्कात राहून अजित पवार यांनी एकीकडे स्थानिक कुटुंबाना धीर तर दिलाच पण यंत्रणा हलवून त्यांनी मदतीसाठीही सातत्याने प्रयत्न केले.
29 व्या अगरवाल परिवार परिचय संमेलनास चांगला प्रतिसाद
पुणे:
‘अग्रसेन समाज मार्केटयार्ड’च्या वतीने आयोजित 29 व्या ‘अगरवाल परिवार परिचय संमेलन’ला चांगला प्रतिसाद मिळाला. हे संमेलन रविवार, दिनांक 24 मे रोजी ‘एस. एस. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ (दत्तवाडी), पुणे येथे पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आर.एल.अगरवाल होते.
हे अगरवाल परिवार परिचय संमेलन विनामूल्य असते. आत्तापर्यंत या संमेलनाद्वारे 84 विवाह जमले असून, संमेलनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.यावेळी जगदीश गोयल,मदन अगरवाल,रविंद्र अगरवाल, अनिल गोयल आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आर.एल.अगरवाल म्हणाले, ‘अगरवाल समाजातील उपवर युवक युवतींना विवाह विषयक चर्चेच्या भेटीची, परिचयाची संधी मिळावी म्हणून ‘अगरवाल परिवार परिचय संमेलन’ आयोजन करण्यात येते. अगरवाल समाजातील कुटुंबाचा परिचय वाढणे या प्रमुख हेतूने दर रविवारी आयोजित करण्यात येते. जास्तीत जास्त अगरवाल समाजातील कुटुंबांनी या परिवार परिचय संमेलनात सहभागी व्हावे, या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.’
‘अगरवाल परिवार परिचय’तर्फे परिचय संमेलन ‘आर. एल. अगरवाल इंग्लिश मीडियम स्कूल’ दत्तवाडी पुणे येथे दर रविवारी दुपारी 3 वाजता होत असून, हा कार्यक्रम विनामूल्य आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9561220000 (आयोजक) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने भव्य जनजागृती अभियानाचे आयोजन
आयु्ष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा… सिद्धांत २९ मे रोजी ….
सध्या मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले आहेत. सिनेमाच्या निमित्ताने हाताळले जाणारे आशयघन विषय सामान्यांना जगण्याची नवी दृष्टी देणारे आहे. फॅण्ड्री, शाळा आणि अनुमती या सिनेमांची नावे आग्रहाने घेता यासारख्या अभिरूचीसंपन्न आणि आणि दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणाऱ्या निर्मितीसंस्थेचा नवा सिनेमा सिद्धांत येत्या २९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘नवलाखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’चे निलेश नवलखा आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया या दोघांसोबत यंदा ‘व्हर्च्यू एण्टरटेन्मेण्ट’चे अमित अहिरराव देखील सहभागी झाले आहेत. आयु्ष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा… जगण्याचं भान देणारा आणि आयुष्यातील अनेक पेचप्रसंगाची उकल करू पाहणारा असा हा ‘सिद्धांत’ सिनेमा आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, किशोर कदम, गणेश यादव, सारंग साठ्ये, नेहा महाजन, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सुरज सातव, बाबा आफळे आणि कांचन जाधव यांच्या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.
संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे आणि गीतकर सौमित्र (किशोर कदम) यांच्या जोडगोळीने सजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध केले ते गायक शंकर महादेवन आणि मकरंद देशपांडे यांनी. चवीने चवीने जगणे…, थोडेसे आहे गुंतलेले…, घट्ट काही सुटले… चित्रपटाचा आत्मा असलेली ही गाणी प्रेक्षकांना आवडणारी आहेत.
विशेष म्हणजे या सिनेमाची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. सिद्धांत या मराठी सिनेमाची निवड टोरांटो येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साउथ अमेरिका (IFFSA ) तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात आली आहे. हा सिनेमा आजोबा अप्पा ठोसर म्हणजेच विक्रम गोखले आणि त्यांचा नातू वक्रतुंड ठोसर म्हणजेच अर्चित देवधर यांच्या आयुष्याभोवती फिरतो. त्यांच्यामधल्या नात्याचा एक अतूट धागा हा गणिताचा सिद्धांत आहे. हा सिनेमा जसजसा खुलत जातो तसतसे नात्याचे नवनवे पदर उलगडत जातात, पण या सगळ्याला गुंफणारा जो धागा आहे… तो प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा आणि तत्त्वांचा. या आशयघन कलाकृतीला चार चाँद लावणारा अभिनय ‘सिद्धांत’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही.
जगण्याला अर्थ देणारा आजोबा आणि नातू यांच्या नात्याला एका वेगळ्या अर्थाने अधोरेखित करणारा असा हा सिनेमा आहे. आजपर्यंत कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असणारे विवेक वाघ या सिनेमाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत “आतापर्यंत ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’, ‘शाळा’, ‘फँड्री’, ‘अजिंक्य’ अशा एकापेक्षा एक सरस सिनेमांच्या आरेखनात अन् कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाला, पण दिग्दर्शना पलीकडच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची जाणीव सकारात्मक अर्थाने झाली. जगण्याला वास्तवाला भिडणा-या, सिनेमाने मनात जागा केली आहे”. माझ्यावर विश्वास टाकणा-या निर्मात्यांचा आणि माझ्या दिग्दर्शनातील पदार्पणात मला सांभाळून घेणा-या कलाकारांचा आणि माझ्या टीमचा आभारी आहे. असे विवेक वाघ यांनी ‘सिद्धांत’ विषयी बोलताना सांगितले.
नात्यांचा वेध घेणारा… आयुष्याचं सूत्र शोधताना त्यामधल्या प्रश्नांच्या गणिताची उकल करणारा असा हा ‘सिद्धांत‘ येत्या २९ मे २०१५ राज्यभरात प्रदर्शित होईल.
डीएसके ‘वेदांत’ आणि ‘नभांगण’ गृहप्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
पुणे :आपल्या नाविन्यपूर्ण गृहप्रकल्पांची वेगळी छाप पडणाऱ्या डी. एस. कुलकर्णी
डेव्हलपर्सच्या हडपसर येथील डीएसके ‘वेदांत’ आणि सिंहगड रोड येथील डीएसके विश्व मधील
‘नभांगण’ या गृहप्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा अनुक्रमे दि.२३ व २४ मे रोजी उत्साहात पार
पडला. मागच्या महिन्यात ‘आधी घर पैसे नंतर रिटर्न्स’ या योजनेत ४ नव्या कोऱ्या
प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. याच ४ प्रकल्पापैकी ‘वेदांत’ आणि ‘नभांगण’चे
भूमिपूजन यावेळी डीएसके परिवाराच्या अनोख्या प्रथेनुसार, गृहप्रकल्पात नोंदणी केलेल्या
सदनिकाधारकांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी समूहाचे अध्यक्ष डी. एस.
कुलकर्णी,डीएसके समूहाच्या संचालिका सौ. हेमंती कुलकर्णी आणि सौ. भाग्यश्री कुलकर्णी उपस्थित
होत्या.
या प्रकल्पांविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हडपसर येथील ‘वेदांत’ या
गृह्प्रकल्पापासून एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, शाळा, मॉल्स, मल्टीप्लेक्स, हॉटेल्स आणि विविध
अत्यावश्यक सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. सध्याच्या तरुणांची विशेषतः आय टी
क्षेत्रात काम करणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिम्नैशियम, क्लब हाऊस, पार्टी लॉंन्स, लहान
मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया त्याचबरोबर सुशोभित लैन्डस्केपिंग आदी सोयी उपलब्ध करण्यात
आल्या आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात साकारलेला दर्जेदार गृहप्रकल्प हे
या डीएसके ‘नभांगण’ चे वैशिष्ट आहे. डीएसके विश्व मधील ‘नभांगण’ ही सातवी फेज आहे.
त्यामध्ये १२ मजल्याच्या ५ इमारती असून त्यात प्रशस्त २ व ३ बीएचके फ्लॅटची रचना
करण्यात आली आहे. हिरवाईने नटलेल्या शांत व रम्य वातावरणात साकारण्यात आलेल्या या
प्रकल्पामध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची ऐसपैस जागा, कार्यक्रमासाठी प्रशस्त पार्टी
लॉन यांसारख्या सुखसोयी खास ग्राहकांसाठी आम्ही येथे उपलब्ध करून दिल्या आहेत.
सदनिकाधारकांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या प्रथेबाबत ते म्हणाले की, स्वत: च्या घराचे
भूमिपूजन करण्याची संधी सदनिकाधारकांनाच मिळाल्याचा आनंद नेहमीच आम्हाला लाभत
आला आहे. आपल्या घराच्या जागेचे खरे मालक तुम्हीच आहात मी फक्त कॉन्ट्रॅक्टर आहे.
आज तुमच्याच हस्ते भूमिपूजन केल्यावर मुलीचा साखरपुडा झाल्या सारखे वाटते आहे.
भूमिपूजन झाल्यावर लगेचच कामाला सुरुवात करणे आणि त्याच दिवशी ग्राहकांना घराचा
ताबा देण्याची तारीख सांगणे हे आमचे वैशिष्टय आहे. यानुसार ऑगस्ट २०१८ ला डीएसके
‘वेदांत’ आणि ‘नभांगण’च्या ग्राहकांना घर सुपूर्त करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील
हेमंती कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
शांत परिसरात, वेदमंत्रांच्या व सनई- चौघड्याच्या गजरात भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात
पार पडला. नंतर उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
चौकट
कुठलेही काम चांगले होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असते. हीच गोष्ट
मला डीएसके डेव्हलपर्समध्ये प्रकर्षाने जाणवते. या समूहाशी निगडीत असणारी प्रत्येक व्यक्ती
माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी जोडली आहे आणि आता माझे कुटुंबही या परिवारात
सहभागी होत आहे याचा मला खूप आनंद होतोय असे मत तेथील उपस्थित दांपत्याने व्यक्त
केले.
समलिंगी जोडप्यांना विवाहास कायदेशीर मान्यता – असा निर्णय घेणारा आयर्लंड ठरला जगातील पहिला देश
लंडन –
समाज जीवनात हेटाळणीचा विषय ठरलेल्या समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील ६२ टक्के जनतेने समलिंगी विवाहांच्या बाजूनं कौल दिला असून आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे.
समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का, या मुद्द्यावर आयर्लंडमध्ये जनमत घेण्यात आलं होतं. देशातील ४३ पैकी ४० क्षेत्रांतून या मुद्द्यावर लोकांनी मतं मांडली. यामध्ये समलिंगी विवाहास मान्यता देण्याच्या म्हणजेच, ‘येस’च्या बाजूने ६२.३ टक्के मते मिळाली. ‘नो’ गटातील प्रमुख नेत्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
आयर्लंडमध्ये १९९३मध्ये समलिंगी संबंधांना मान्यता देण्यात आली होती. तर २०१०मध्ये त्या देशाने समलिंगी जोडप्यांना ‘नागरी साहचर्य’ म्हणून मान्यता दिली. मात्र, नागरी साहचर्य आणि विवाह यामध्ये मूलभूत फरक असून विवाहाला राज्यघटनेचे संरक्षण आहे. तर नागरी साहचर्याला घटनेचे संरक्षण नाही. समलिंगी जोडप्यांना घटनेचे संरक्षण देण्यासाठी जनमताचा आधार घेण्यात आला.
कारबायकर.कॉम – इ-कॉमर्स उद्योग क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी
कारबायकर.कॉम हे पोर्टल फक्त थोड्याशा वापरलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या कार विकणे व खरेदी करणे या साठी निर्माण केलेले ऑनलाईन पोर्टल असून आता सध्या ते मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठी मर्यादित आहे. नजीकच्या भविष्यकाळात पश्चिम भारतातील अनेक शहरांमधून त्याच्या शाखा सुरु करायच्या आहेत. नजीकच्या भविष्यकाळात पश्चिम भारतातील अनेक शहरांमधून त्याच्या शाखा सुरु करायच्या आहेत. या दोन शहरांच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण सेल्स मध्ये किमान १०% वाटा आमच्या कंपनीचा असावा असे आमचे उद्दिष्ट आहे व हे उद्दिष्ट २०१६ सालच्या पहिल्या तिमाहीत आम्हाला गाठावयाचे आहे, असे कंपनीच्या संचालिका श्रीमती वर्षा वैद्य वार्ताहर परिषदेत म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या कि आमचा सेल्स वाढवा यासाठी आम्ही पुण्याच्या ‘द सॉलवंटस’ या ब्रांडीन्ग कंपनी बरोबर करार केला आहे.
सध्याच्या कारच्या किमती व बाजारात आलेल्या विविध कंपन्यांच्या ब्रान्डेड कार्स लक्षात घेता सर्वसामान्य ग्राहकांना या किमती परवडणाऱ्या नाहीत. स्वतःची कार घेणे हे सर्व सामान्य लोकांसाठी फक्त स्वप्नच न राहता ते स्वप्न साकार करता यावे यासाठी हि कंपनी आम्ही सुरु केली आहे असे या प्रसंगी त्या म्हणाल्या.
या क्षेत्रातील सर्वेक्षणानुसार दररोज किमान १०००० एवढे ग्राहक वापरलेल्या जुन्या कारच्या मार्केटला भेट देतात असे दिसून आलेले आहे. हि बाब लक्षात घेऊन कार घेणे हि बाब सर्व सामन्यांच्या आवाक्यात कशी आणता येईल? व अशा लोकांची कार घेण्याची इच्छा पूर्ण करता येणे शक्य आहे. या जाणीवेतून आम्ही हि कंपनी सुरु केलेली आहे असे कंपनीच्या संचालिका श्रीमती वर्षा वैद्य शेवटी म्हणाल्या.
जपान येथे होणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघ घोषित
येत्या ५ जून ते ८ जून रोजी जपान कीत्ताकेशू येथे आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतातून खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये १. अशोक कुमार, ६५ कि.ग्र (पंजाब), २. कुमार पवार, ६५ कि.ग्र (महाराष्ट्र), जय सिंग, ६० कि.ग्र (पंजाब), ४) सिद्धार्थ वानखेडे, पुरुष फिटनेस (महाराष्ट्र), ५) समीर परापुराथे दिल, ६० कि.ग्र (दिल्ली), ६) सचिन गलांडे, ८५ कि.ग्र (महाराष्ट्र), ७) मिस करुणा पी. वाघमारे. महिला फिटनेस (महाराष्ट्र), ८) पुष्पेंद भारती, ६५ कि.ग्र (चंडीगड), ९) अमित चौधरी, ८५ कि.ग्र (महाराष्ट्र), १०) सिद्धांत मोरे, पुरुष फिटनेस (महाराष्ट्र), ११) डॉ. संजय मोरे, सरचिटणीस (महाराष्ट्र), १२) मनोहर पांचाळ, टीम मॅनेजर (महाराष्ट्र), १३) शंकरन व्यंकटेशस्वामी दिकारमन, टीम कोच (दिल्ली). १४) राहुल कारूस, सहाय्यक कोच (महाराष्ट्र) हे आहेत.
एशियन बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष शेख अब्दुला बिन रसीद अल खलीफ (बहरीन) व सरचिटणीस डॉ.संजय मोरे (भारत) हे असून या संघटनेला ऑलिम्पिक कॅान्सील ऑफ एशिया (ओ.सी.ए) ची मान्यता असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिटनेस या संघटनेस आय, ओ. सी. वाडा, स्पोर्टस अॅकोर्ड वर्ल्ड गेमची मान्यता आहे.
जगामध्ये १९६ देश आंतरराष्ट्रीय फेडरेशनला संलग्न असल्यामुळे १९४२ पासून या संघटनेचे काम चालू आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अनॅाल्ड॔, काय ग्रिन, फिलहीथ, डेनीस वूल्फ या संघटनेचे अधिकृत खेळाडू आहेत. या संघटनेत जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सहभागी होण्याचा खेळाडूंना अभिमान वाटतो.
या स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खेळाडूंना भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष श्री. रणजीत मोहिते – पाटील, सरचिटणीस डॉ. संजय मोरे, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, खा.चंद्रकांत खैरे यांनी शुभेच्छा दिल्या.
येत्या ५ जून ते ८ जून रोजी जपान कीत्ताकेशू येथे आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे एशियन बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी नुकत्याच पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
15 जूनपर्यंत ‘उद्यमगौरव’ व ‘सेवागौरव’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
धडाडीचे उद्योजक आणि सेवाव्रतींना‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’गौरविणार
पुणे:
सचोटीने व्यवसायाचा आदर्श उभा करणारे पुण्यातील व्यापारी कै. शेठ चिमणलाल गोविंददास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’च्या वतीने व्यापार व उद्योग क्षेत्रात सचोटीने व धडाडीने काम करणार्या दोन यशस्वी उद्योजकांना ‘उद्यमगौरव पुरस्कार’ तसेच आरोग्य व शैक्षणिक / सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्ती/संस्थांना गौरविण्यात येणार आहे. दोन व्यक्ती किंवा संस्थांना ‘सेवागौरव पुरस्कार’ अशा चार पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कारांचे यंदाचे 17 वे वर्ष आहे. ही माहिती ‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’चे प्रमुख विश्वस्त मोहन गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रभरातून अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्जाची मुदत दिनांक 15 जून 2015 पर्यंत आहे. महाराष्ट्रभरातून मिळविण्यात आलेल्या माहिती व अर्जांमधून पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्था यांची निवड होते.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक 5 जुलै 2015 रोजी होणार आहे. ‘उद्यम गौरव पुरस्कार’ आणि ‘सेवागौरव पुरस्कारा’चे स्वरूप प्रत्येकी 15 हजार रूपये, प्रशस्तिपत्रक व स्मृति चिन्ह असे आहे.
या पुरस्कारासाठी ‘प्रबोध समूह’ 1070 शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्र.5, पुणे 411 002 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : 020 24481501, 24481502 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.







