Home Blog Page 3606

१०१ कल्याणजी आनंदजी हिट्स डीव्हीडी चे अनावरण

आपल्या विलक्षण प्रतिभेने हिंदी चित्रपट संगीतात सुवर्णकाळ निर्माण करणाऱ्या संगीतकारांमधील आघाडीचं नाव म्हणजे कल्याणजी आनंदजी..! शेकडो चित्रपटांतील हजारो सुमधुर गीतांतून या जोडीने रसिकांचे अपार मनोरंजन केले.

 

या जोडगोळीने संगीत दिलेल्या गाण्याचे संकलन ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट्स’ या डीव्हीडी च्या रुपात शेमारू एण्टरटेनमेन्टने प्रकाशित केले आहे. नुकतेच या डीव्हीडी चे अनावरण ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आनंदजी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संगीत दिग्दर्शक कल्याणजी यांचे सुपुत्र विजू शहा, शेमारू एण्टरटेनमेन्टचे अध्यक्ष बुद्धीचंद मारू आणि शेमारू एण्टरटेनमेन्टचे व्यवस्थापकीय संचालक अतुल मारू उपस्थित होते.

 

शेमारू एण्टरटेनमेन्टने विविध मूडमधली गाणी संकलित करून जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे मनोगत आनंदजीनी व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शेमारू एण्टरटेनमेन्टने ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट्स’ या डीव्हीडीचे अनावरण करून आपले रजत वर्ष साजरे केले.

 

कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी निवडक १०१ गीते तीन डीव्हीडीच्या संचात संग्रहित केली आहेत. या डीव्हीडी मध्ये कल्याणजी आनंदजी यांच्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाची मनोरंजक माहितीही समाविष्ठ करण्यात आली आहे. जंजीर, ब्लॅकमेल सारख्या चित्रपटात गाण्यांना जराही वाव नसताना या जोडीने त्यात सिच्युएशन्स निर्माण करून गाणी दिली आणि ती सगळी गाणी हिट झाली त्या गाण्यांचाही समावेश या डीव्हीडी मध्ये आहे.

 

छलिया, ब्लफमास्टर, सरस्वतीचंद्र पासून सफर, ब्लॅकमेल, जंजीर, मुक्कदर का सिकंदर, लावारिस आदी गाजलेल्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांची जादू ‘१०१ कल्याणजी आनंदजी हिट’ या डीव्हीडीच्या रुपात पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे.

हिंदी अभिनेते सुशांत सिंग यांच्या शुभहस्ते देशभक्तीपर “प्रतिज्ञा” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

1 2
मुंबई- चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते, आपल्या आजुबाजुला समाजात घडत असणाऱ्या घटना चित्रपटात परिवर्तित होत असतात, असाच देशभक्तीपर आधारित विषय घेवून येत आहेत दिग्दर्शक माणिक. निर्मल प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत एम. केशव निर्मित “प्रतिज्ञा” चित्रपटाचा मुहूर्त नुकताच प्रसिद्ध हिंदी अभिनेते सुशांत सिंग यांच्या शुभहस्ते मुंबईत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
सिया पाटील, उषा नाडकर्णी, मिनाक्षी जोशी, अशोक शिंदे, अनु पाटील, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, अमित शिंगटे आणि प्रशांत मुंढे (बाल कलाकार) अभिनित या चित्रपटाची पटकथा- सवांद- गीते – अनिल नलावडे यांचे असून संगीत धीरज सेन यांचे आहे.
देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना कुठे ना कुठे आपल्या देशातील कुणीतरी मदत करत असतात अशांना आपण भारतीयच धडा शिकवू शकतो असे आव्हानात्मक कथाबीज असलेल्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होत असून मराठीत प्रथमच इतका धाडसी विषय हाताळल्यामुळे सिनेमाची आधीच जोरदार चर्चा सुरु आहे.

‘ लेट्स चेंज ’ व ‘ डब्बा गुल ’ या दोन चित्रपटांचे मुहूर्त

मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या रमेश देव प्रॅाडक्शन  आणि अपार एंटरटेण्मेंटची  निर्मिती असलेल्या लेट्स चेंज  व डब्बा गुल या दोन चित्रपटांचे  मुहूर्त करण्यात आले. वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप दिला आणि दोन्ही चित्रपटांचे मुहूर्त करण्यात आले. यापैकी लेट्स चेंज  सिनेमा हिंदी असून ‘डब्बा गुल हा मराठी भाषेत बनणार आहे. सामाजिक आशयाची किनार लाभलेले हे दोन्ही चित्रपट अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहेत. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित आर्य करीत आहेत.

लेट्स चेंज आणि डब्बा गुल या दोन्ही सिनेमांमध्ये स्वच्छता हा मूळ मुद्दा आहे. आज स्वच्छता अभियानाचा मुद्दा ऐरणीवर असताना लेट्स चेंज आणि डब्बा गुल हे दोन सिनेमे जनमानसांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतील, अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही चित्रपटांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘लेट्स चेंज’ या चित्रपटाची कथा स्वच्छता अभियानाभोवती गुंफण्यात आली आहे. हा एक डॅाक्युड्रामा आहे. यात केवळ प्रबोधन करण्यात आलेलं नाही. या चित्रपटाचा विषय विद्यार्थ्यांवर आधारित आहे. ते एक मोहिम राबवतात आणि त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात. त्यामुळे कोणालाही उपदेशाचे डोस न पाजता अतिशय मनोरंजक शैलीत एक मसालेदार चित्रपट  बनवण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक रोहित आर्य यांनी दिली. तुम्ही स्वतः झाडू मारू नका, पण किमान १५ मिनटे काढून जिथे काम चालू आहे तिथे जाऊन त्यांचा उत्साह तरी वाढवायला हरकत नाही हेच या लेट्स चेंज मध्ये सांगण्यात आल्याचं आर्य म्हणाले.

डब्बा गुल हा मराठी चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित आहे. आज सरकारतर्फे ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. पण या स्वच्छतागृहांच्या उभारणीतही भयंकर भ्रष्टाचार होत आहे. याचा पर्दाफाश डब्बा गुल या चित्रपटात केला जाणार आहें. एकूणच स्वच्छतेसोबत करप्शनच्या मुद्द्यावरही डब्बा गुलद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. दोन पत्रकारांच्या माध्यमातून ही कथा मांडली जाणार आहे. जर इच्छा असेल तर कोणतंही काम अगदी सहजतेने करता, येत हा संदेश दोन्ही चित्रपटांद्वारे देण्यात येणार असल्याचं रमेश देव यांनी मुहूर्ताप्रसंगी सांगितल.

“नागरिक”ला “प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५”ची १४ नामांकने!

0

राज्य चित्रपट पुरस्कारात खणखणीत मोहोर उमटविणा या साची एण्टरटेनमेंट निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शीत “नागरिक” चित्रपटाला प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५ची  तब्बल १४ नामांकने मिळाली आहेत. राजकारण आणि पत्रकारिता यातील संघर्ष आणि सर्वसामान्य जनता यावर आधारित असणारा हा चित्रपट येत्या १२ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये ‘सर्वात्कृष्ट सामाजिक चित्रपट’ठरलेला “नागरिक” हा चित्रपट कवि महेश केळुसकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी त्याला आकार दिला असून ‘प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५’ने उत्कृष्ट चित्रपटा सोबतच तब्बल १४ नामांकने देण्यात आली आहेत.

‘प्रभात चित्रपट पुरस्कार २०१५’ने दिलेली नामांकने पुढीलप्रमाणे आहेत. उत्कृष्ट चित्रपट(साची एण्टरटेनमेंट), उत्कृष्ट दिग्दर्शक(जयप्रद देसाई), उत्कृष्ट कथा(महेश केळुसकर), उत्कृष्ट पटकथा(जयप्रद देसाई, महेश केळुसकर), उत्कृष्ट संवाद(महेश केळुसकर), उत्कृष्ट पाश्र्वसंगीत(टब्बी – परेख), उत्कृष्ट रंगभूषा(विक्रम गायकवाड), उत्कृष्ट कला दिग्दर्शक(सुकांत पाणीग्रही), उत्कृष्ट छायाचित्रण(देवेंद्र गोलतकर), उत्कृष्ट संकलन(गोरक्षनाथ खांडे), उत्कृष्ट ध्वनी संयोजन(रसुल पोकुट्टी व अमृत प्रीतम), उत्कृष्ट खलनायक (मिलिंद सोमण), उत्कृष्ट अभिनेता (सचिन खेडेकर) आणि उत्कृष्ट अभिनेत्री (देविका दफ्तरदार).

सर्वसामान्य पत्रकार श्याम जगदाळे अर्थात कथानायक सचिन खेडेकर आणि राजकारणी विकास पाटील अर्थात मिलिंद सोमण यांची जबरदस्त जुगलबंदी आणि त्याबरोबरच टिपिकल राजकारणी माणिकराव भोसलेच्या भूमिकेत नटश्रेष्ठ दिलिप प्रभावळकर यांनी ओतलेला प्राण, समाजवादी कार्यकर्ती नीलिमातार्इंच्या भूमिकेत नीना कुळकर्णी, नायिकेच्या भूमिकेत देविका दप्तरदार, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे, नितीन भजन या कलाकारांनी या चित्रकथेत रंग भरले आहेतच. पण त्याचबरोबर आणखी एक आकर्षण म्हणजे या चित्रपटात ‘श्रीराम लागू’यांनी ‘नाना चिटणीस’ नावाचा बुजुर्ग तसेच अनुभवी राजकारणी रंगविला असून त्यांची ही पूर्ण लांबीची भूमिका बऱ्याच दिवसांनी रसिकांना पहायला मिळणार आहे. त्यांच्या साथीला सुलभा देशपांडे या ज्येष्ठ अभिनेत्रीनेही ‘नागरिक’मध्ये भूमिका रंगवली आहे.

“नागरिक” मधील ‘शाहिरी’हे देखील वेगळे आकर्षण असून शाहीर संभाजी भगत यांच्या स्वतंत्र भूमिकेच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना मांडणाऱ्या शाहिरीने चित्रपटात वेगळेपणा आणला आहे. गीतलेखन संभाजी भगत आणि चंद्रशेखर सानेकर यांनी केले असून संगीत रचना व पाश्र्वसंगीत टब्बी – परीक यांचे आहे. पाश्र्वगायन संभाजी भगत यांच्यासोबत आजचे आघाडीचे गायक सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन यांनी केले आहे. या चित्रपटाचे ध्वनी संयोजन ऑस्कर विजेते रसुल पोकट्टी यांचे असून प्रॉडक्शन डिझाईनचा भार सुकांत पाणीग्रही यांनी उचलला आहे. वेशभूषा ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांच्या साथीने पौर्णिमा ओक यांनी केली आहे.

महेश नवमी निमित्त पुरस्कारांचे वितरण

 
समाजाने नव्या संकल्पना स्वीकाराव्यात :जयप्रकाश सोमाणी 
पुणे :

‘ समस्त माहेश्‍वरी समाज’ आणि संस्थांतर्फे  ‘महेश नवमी’ उत्सवाचे आयोजन करण्यात  आले होते . यामध्ये विविध पुरस्कारांचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .

‘समाज गौरव पुरस्कार’ – जगन्नाथ मुंदडा, भगीरथ भुतडा यांना जयप्रकाश सोमाणी ,हिरालाल मालू यांच्या हस्ते देण्यात आला .  ‘जीवनगौरव पुरस्कार’  जयप्रकाश मुंदडा, श्रीकांत मुंदडा यांना , ‘स्वाध्याय सेवा पुरस्कार’ -कांतीलाल मालपाणी यांना   खेलरत्न पुरस्कार  सुरज राठी यांना देण्यात आला

शनिवारी  ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला .

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे जयप्रकाश सोमाणी म्हणाले ,’ माहेश्वरी समाजाने आता नव्या संकल्पना स्वीकारून प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे . श्रीमंत होण्यापेक्षा समृद्ध होण्याकडे लक्ष दिले पाहिजे . तरुण पिढीला समाज विचारांकडे वळविले पाहिजे ‘ हिरालाल मालू यांनी महेश नवमी निमित्त होत असलेल्या उपक्रमांबद्दल आनंद व्यक्त करून समाजात त्यानिमित्ताने विचारांचे आदान प्रदान होत असल्याचा आनंद व्यक्त केला  ‘
रविवार 31 मे रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आणि युवती महिला प्रबोधन कार्यक्रमाचे सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत आयोजन करण्यात आले होते

उत्सव समितीतर्फे गोविंद मुंदडा, जुगल किशोर पुंगालिया, त्र्यंबकदास मुंदडा, भगीरथ राठी,  राकेश माहेश्‍वरी, राजेंद्र डागा, सचिन चांडक, रामेश्‍वर लाहोटी, अशोक राठी, उमेश झंवर, अनिल राठी, जयप्रकाश सोनी, रमेश जाजु, धीरज मुंदडा, सुभाष भट्टड, सुरेश नावंदर, शेखर सारडा आदी मान्यवर उत्सव यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले

दगडूला २१ व्या वर्षी तर विशाखा ला ४१ व्या वर्षी म्हाडाची लॉटरी …

0

मुंबई: ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा प्रथमेश परब आणि विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना यंदा म्हाडाचं घर मिळालंय. आज रंगशारदामध्ये झालेल्या लॉटरीमध्ये या दोघांना घर मिळालं.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रथमेश मराठी सिनेसृष्टीत आला असून प्रथमेशला घर मिळाल्यानं परब कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रथमेश सध्या चित्रिकरणासाठी परदेशात असून प्रथमेशची आई प्रिया परब रंगशारदामध्ये उपस्थित होत्या. प्रथमेशच्या ऐवढ्या वर्षाच्या कष्टाचं चीज झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.१ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी कोणाला मुंबईत हक्काचं घर मिळतं याकडे सर्वच अर्जदारांचं लक्ष लागलं होतं. टाईमपास फेम प्रथमेश परबला म्हाडा पावली असून त्याचं मुंबईत हक्काचं घर साकारण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं. प्रथमेश परबला कलाकार वर्गात प्रतीक्षानगर इथल्या मध्य उत्पन्न गटातील घराची लॉटरी लागली आहे. तरअभिनेत्री विशाखा सुभेदारला कलाकार गटात मुलुंडच्या गवाणपाडा इथल्या मध्य उत्पन्न गटातील घराची लॉटरी लागली

१०० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या समुद्रात ब्ल्यू व्हेल मासा दर्शन होवू लागले कोकणात … १७ फुट लांबीचा मासा आज आढळला ।

0

रत्नागिरी -कोकणचा समुद्र किनारा आता पर्यटकांनी फुल असताना राजापूरमधील साखरी नाटे समुद्रकिनारी १७ फूट लांबीचा महाकाय व्हेल मासा लाटांसोबत वाहत आला . आणि आज शनिवारी या माशाला पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसोबतच पर्यटकांनी मोठीच  गर्दी केली . आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा मासा समुद्र किनारी आला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या माशाची लांबी १७ फूट तर रुंदी ४ फूट आहे. करड्या रंगाची कातडी आणि अंगावर पांढरे ठिपके असे रुप असलेल्या या माशाबाबत संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. या माशाचा लिलाव केला जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या समुद्रात व्हेल माशांचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे. पंधरावड्यापूर्वीच सिंधुदुर्गच्या समुद्रात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे दिसले होते. विशेष म्हणजे तब्बल १०० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या समुद्रात ब्ल्यू व्हेलचे दर्शन झाले होते.

“मुलांच्या करीयर निवडीत पालकांचा सहभाग महत्वाचा”- गृहराज्यमंत्री राम शिंदे

कार्यक्रमाचे  … पहा फोटो । 2 3 4 5 6 7

पुणे – माझ्या आईवडिलांचा नुकताच पुण्यात सत्कार झाला. ते अशिक्षित असल्याने मला नऊ ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले. सध्या बदलत्या काळाबरोबरच शिक्षण क्षेत्रात होणा-या बदलांमुळे पालकांनीही जागरूक राहून आपल्या मुलासाठी योग्य करीयर निवडण्यात सहभाग घेतला पाहिजे. आवडते करीयर मुलांना मिळाले की ते पुढे नक्कीच चांगले नागरीक होतील आणि हाच चांगल्या समाजनिर्मितीचा पाया आहे त्यामुळे मुलांच्या करीयर निवडीत पालकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज येथे केले.

पुणे संस्कृती वैभव ट्रस्ट आणि ड्रीम्स टेलीफिल्म प्रा. लिमिटेड यांनी आयोजित केलेल्या 16 व्या दोन दिवसांच्या करीयर महोत्सवाचे उदघाटन बालगंधर्व रंगमंदीर येथे शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार वंदना चव्हाण, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झग़डे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी, ज्येष्ठ विधीज्ञ भास्कररावा आव्हाड, पुणे एज्युकेशन अकॅडमीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, अहमदनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष उत्तमराव करपे, शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी मिनाक्षी राऊत, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक संजय चोरडिया, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कुमार बिल्डर्सच्या मुख्यकार्यकारी अधिकारी कृती जैन, प्रविणमसालेवाले – सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, गायत्री चौधरी आणि रवी चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी अहमदनगर मित्र मंडळाच्यावतीने भास्करराव आव्हाड आणि करपे यांनी राम शिंदे यांचा खास सत्कार केला.

राम शिंदे म्हणाले, आमच्यावेळी करीयर निवडणे वगैरे काही नव्हते. पण आज जेव्हा महोत्वातील स्टॉल्सचे उदघाटन केले त्यावेळी मला माझ्या बारावीत आणि दहावीत असलेल्या मुलींची आठवण झाली. त्यांच्यासाठी किमान दोन तास याच प्रदर्शनात घालवून महिती घ्यावी असे वाटते. कारण आज शिक्षणक्षेत्राचा व्याप मोठा झालेला असल्याने अनेक प्रकारच्या करीयरच्या संधी तरूणांच्या समोर आहेत. त्याची महिती स्वताने मिळवायची म्हटले तर त्यातच वर्ष निघून जाईल. त्यामुळे इथे प्रदर्शनात जी महिती उपलब्ध आहे ती आपल्या मुलांसाठी पालकांनी घेऊन त्यांच्या करीरय निवडीत सहभागी होऊन मुलांना त्यांच्या आवडीचे करीयर मिळवून द्यावे.

ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड म्हणाले, आमच्या शैक्षणिक काळात फक्त पास की नापास इतकंच महत्वाचे होते. त्यामुळे करीयर म्हणजे काय हे महितीसुद्धा नव्हते. पण ते दिवस राहिलेले नाहीत या क्षेत्रातही स्पर्धा असल्याने करीयर निवडण्याला महत्व प्राप्त झाले आहे. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या गेली पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. त्यात किती बदल होत गेले हे मी बघितले आहेत. तसेच दरवर्षी नव्याने निर्माण होणारी करीयर क्षेत्रांची महिती मुलांना, पालकांना एका छताखाली मिळणे गरजेचे झाले असल्यानेच हा करीयर महोत्सव महत्वाचा आहे.

प्रास्तविक करताना महोत्सवाचे संचालक रवी चौधरी म्हणाले, पंधरावर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण आज अशाच प्रकारचे महोत्सव अनेक ठिकाणी भरत आहेत यावरूनच याचे महत्व किती वाढले आहे हे समजते, यंदाच्या करीयर महोत्सवाची महिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी संयोजन समितीने व्हॉटसअप, फेसबुक, व्टीटर अशा नव्या तंत्रज्ञान व सोशल मिडियाचे मदत घेतली. तसेच या महोत्वात येणा-या विद्यार्थी पालकांना नव्या काळाच्या बर्गर, पिझ्झा अशा पदार्थांची ओळख करून देण्याचाही प्रयत्न कॅफे वॉरच्या माध्यमातून केला आहे.

यावेळी सौरभ गाडगीळ, विशाल चोरडिया आणि कृती जैन यांना करीयर जनरेशन नेक्स्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर महापालिकेच्या बाबूराव सणस शाळेतील विद्यार्थीनी सुवर्णा जगदाळे आणि राजीव गांधी इलर्निंग स्कूलचा विद्यार्थी विशाल म्हात्रे यांचा खास गौरव करण्यात आला. या दोघांनीही बारावीच्या परिक्षेत 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. उदघाटन समारंभानंतर पुरस्कार विजेत्यांसह महेश झगडे आणि वंदना चव्हाण यांच्या प्रकट मुलाखती राजेश दामले यांनी घेतल्या. मुलाखतीनंतर दीर्घायु या करीयर विशेषांकाचे प्रकाशन महेश झगडे यांनी केले.

या मुलाखतील सौरभ गाडगीळ यांनी येत्या दोन वर्षात पीएनजीच्या पन्नासपेक्षा जास्त शाख सुरू करायच्या असल्याचे सांगून, पीएनजीचे पब्लिक इश्यू काढण्याचे धेय्य ठेवले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर 1999 नंतर सोन्याचांदीच्या व्यापाराचे रूपांतर कॉर्पोरेट उद्योगात कसे होत गेले हे सांगितले. कृती जैन यांनी कूल (कुमार अर्बन डेव्हलपमेंट लिमिटेड)ची संकल्पना स्पष्ट केली. उद्योगाची सीइओ पर्यंतचा प्रवास कसा झाला, वडिलांची साथ कशी मिळाली, यापुढे कुमार तर्फे बदलत्या काळानुरूप कशा प्रकारच्या सिटी किंवा कॉलनीज उभ्या करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. विशाल चोरडिया यांनीही घरचा व्यवसाय असला तरी कशा प्रकारे सर्व कामाची महिती घेतली हे सांगितले आणि यापुढ फक्त मसालाच्या व्यवसायावर अवलंबून न रहाता अन्न प्रक्रिया उद्योगात फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणार असल्याचे सांगितले. पीएमआरडीएचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी पीएमआरडीए नेमकी काय काम करणार असल्याचे स्पष्ट केले. खासदार वंदना चव्हाण यांनी राजकारण हे करीयरही चांगले आहे पण त्यात य़ेऊ इच्छिणा-या मुलांना त्यांच्या घरच्यांनी भक्कम पाठिंबा देण्याची गरज आहे असे सांगितले.

या महोत्सवातील प्रदर्शनात डी वाय पाटील कॉलेज, सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, अम्ब्रोशिया, रायसोनि इन्स्टिट्यूट, सिद्धांता आणि एमआयटी कॉसेज, यासह अनेक नामवंत शिक्षण संस्थांनी स्टॉल्स येथे लावले आहेत. पुरंदरे हॉस्पिटॅलिटीच्या सहकार्यांना शहरातील 60 कॅफेजची स्पर्धा येथे असून या स्टॉल्सवर बर्गर, पिझ्झा, हॉट डॉग्ज, सॅंडविचेस अशा पदार्थांची प्रत्यक्षिके करून दाखवण्यात येत आहेत. या शिवाय प्रवेशासाठी लागणारे आधार कार्ड काढणे, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमेसाइल, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखलाही या महोत्सवात काढून देण्याची सुविधा संयोजकांनी दिली आहे. येथे येणा-या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 2 मिनिटांची आय़ लव्ह पुणे या विषयावर लघुपट तयार करण्याची स्पर्धा प्रथमच घेण्यात आली आहे. या महोत्सवाचे संयोजन गायत्री चौधरी, प्रा. प्रताप बामणे, प्रा. भुवनेश कुलकर्णी, सिद्धेश पुरंदरे आणि दशरथ कुलधरन यांनी केले आहे.

उदघाटनानंतर दिवसभरात विविध विषयांच्या प्राध्यपकांची व्याख्याने झाली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. महोत्सवात उद्या रविवारी सकाळी 9 पासून व्याख्याने सुरू होणार असल्याचे महोत्सवाचे संचालक रवी चौधरी यांनी सांगितले.

महापालिकेनेच नदीपात्राला बनविले डम्पिंग ग्राउंड – खा. वंदना चव्हाण यांचा आरोप /राष्ट्रवादीचे आंदोलन/आयुक्त कुणाल कुमार होणार जागे ?

 खा. वंदना चव्हाण महापालिका आयुक्त कुणाल कुमारयांना कळकळून नदीची अवस्था दाखविताना … पहा फोटो ।
6 1 2 3 4 5
पुणे:
 
खा. वंदना चव्हाण यांनी नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा आणि कचऱ्यासंदर्भात पुणे मनपाला वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेले होते. दोन दिवसांपूर्वीच दि. २८ मे रोजी, संभाजी पुलाच्या खालील नदीपात्रात महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्या सह त्यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी नदीपात्रात महानगरपालिकेनेच राजरोसपणे कचऱ्याचे ४ कंटेनर, मुरूम, दगड आणि फारश्या टाकलेल्या दिसून आल्या होत्या. तसेच नदीपात्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर फोर व्हीलरचे पार्किंग केले जात असल्याचे दिसून आले होते. आयुक्तांनी याबाबत दखल घेवून त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु आज रोजी खा. वंदना चव्हाण यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली असता पूर्वीच्या ४ कंटेनर च्या जागी आता १० कचऱ्याचे कंटेनर ठेवले गेले होते. तसेच त्यातील कचरा पेटवून दिला होता. तसेच निकामी झालेले कंटेनर देखील गोडावून सारखे नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. नदीपात्रात तयार करण्यात येत असलेल्या जोग्गिंग ट्रेक साठी अनेक गाड्या भरून मुरूम, दगड आणि फरश्या टाकण्यात आल्या होत्या.
आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुद्धा काहीही कारवाई न करता मनपाने आणखी त्यात भर घातल्याने खा. वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत आयुक्त स्वत: येवून याबाबत जोपर्यंत ठोस पावले उचलत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी खा. वंदना चव्हाण म्हणाल्या कि, “नदीपात्राला महानगरपालिकेने डंपिंग ग्राउंड बनविले आहे. बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला जावू नये याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. नदीची वहन क्षमता कमी होईल असे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी नसताना तेथे बाहेरून मुरूम, दगड आणि फारश्या आणून विकासकामे केली जात आहेत.  ती कामे तातडीने थांबवावीत आणि नदीपात्रातील पार्किंग बंद करावे अशी त्यांनी मागणी केली.” नंतर आयुक्त कुणाल कुमार आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली आणि तेथील निकामी कंटेनर, कचरा, मुरूम, दगड आणि फारश्या एका तासात उचलला जाईल असे आदेश प्रशासनाला दिले. याबाबत मनपा पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल.

दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्यामहिला शाखेच्या नुतनीकृत वास्तूचे उद्घाटन

unnamed

पुणे:
दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला शाखेचे उद्घाटन शनिवारी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताझ सय्यद यांनी केले. हुंडेकरी कॉम्प्लेक्स, नाना पेठ येथे ही महिलांसाठीची शाखा आहे.

बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना’ या दोन सेवा योजनांचे ग्राहकांसाठी उद्घाटन करण्यात आले. बँकेच्या 26 शाखांमध्ये ही योजना ग्राहकांसाठी खुली करण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी सांगितले. यासाठी ‘भारतीय जीवन बीमा महामंडळ’ आणि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीशी करार करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी ‘ओरिएंटल इन्शुरन्स’चे अभिषेक शेंडीकर, ‘जीवन बीमा निगम’चे वरिष्ठ शाखा प्रबंधक एस्.एल.हरिदास, शाखा व्यस्थापक अजय यादव, बँकेचे संचालक एस.ए.इनामदार, अझिम गुडाखुवाला, चिरागउद्दीन शेख, मुन्नवर शेख, तस्लिम शेख आदी संचालक वर्ग अधिकारी तसेच चाँद शेख, दानिश शेख, यामिन अन्सारी, शाहीद इनामदार (गोल्डन ज्युबिली ट्रस्टचे संस्थापक), जंगबहाद्दूर मन्द्रुपकर, अहमद शेख, इम्तिहाज मुल्ला, अब्दुल कादीर खान, लुकमान खान, सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मध्यरात्रीपासून बारा टोल नाके पूर्णपणे बंद , तर 53 टोल नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसना सूट

0
मुंबई – “टोलमुक्त महाराष्ट्र‘ अशी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने (ता. 31) मध्यरात्रीपासून बारा टोल नाके पूर्णपणे बंद करण्याचा, तर 53 टोल नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसना सूट देण्याच्या निर्णयावर आज शिक्‍कामोर्तब केले. यामुळे राज्यातील 12 टोल नाक्‍यांना एक जूनपासून कुलूप लागणार आहे. तर 53 पथकर स्थानकांवर कार, जीप व एसटी बसेसना टोलमुक्‍ती मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने आज जारी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 11 टोल नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील एक टोल नाका, असे एकूण 12 टोल नाके आहेत.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 27 टोल नाके व रस्ते विकास महामंडळाकडील 26 टोल नाके अशा एकूण 53 टोल नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसेसना सूट देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
या नाक्‍यांवर कार, जीप व एसटी बसेसना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे या वाहनांना पथकरात सूट असल्याची फलक लावण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
बंद होणारे टोल नाके
1) वडखळ : अलिबाग-पेण-खोपोली
2) शिक्रापूर : वडगाव-चाकण-शिक्रापूर
3) मोहोळ : मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप
4) डोंगर : वडगाव-चाकण-शिक्रापूर
5) कुसळंब : टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-लातूर
6) अकोले (खु) : नगर-करमाळा-टेंभुर्णी
7) सप्तशृंगी : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
8) नांदुरी : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
9) ढकांबे : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदूरी-सप्तशृंगीगड
10) तापी पूल : भुसावळ-यावल, भुसावळ-अमोदा-न्हावी, अमोदा-फैजपूर
11) रावणटेकडी : खामगाव (बुलडाणा) बाह्य वळण रस्ता
12) तडाली : रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (चंद्रपूर)

पोलिसच चालवीत होते ड्रग माफियाचा धंदा … आमची मुंबई ? ५ पोलिस अधिकारी पकडले …

0
मुंबई- ड्रगमाफिया लेडी म्हणून पुढे आलेल्या शशिकला उर्फ बेबी पाटणकर हिला या व्यवसायात सर्वतोपरी मदत करणे – ड्रग धंद्यातील  तिचे अन्य स्पर्धक संपविणे यासाठी राज्य पोलिस दलातील काही जणांची १ टोळी कार्यरत होती अशी माहिती आता उघड झाली आहे हि कोणत्या हिंदी सिनेमातील स्टोरी नाही तर वास्तवता   आहे या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री 5 वरिष्ठ पोलिस अधिका-यांना अटक केली आहे.
अमली पदार्थविरोधी पथकातील आझाद मैदान युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले, पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्योतीराम माने यांच्यासह पोलिस शिपाई यशवंत पार्टे अशी अटक केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची नावे आहेत. हे सर्व पोलिस कर्मचारी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटकेत असलेली ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर हिच्याशी संपर्कात असल्याचे समोर आले आल्यानंतर गुन्हे शाखेने हे पाऊल उचलले आहे. या सर्वांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचा तत्कालीन कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्याकडे लाखो रुपयांचा एमडी (110 किलो) ड्रग्ज सापडला होता. याप्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर बेबी पाटणकरचेही नाव समोर आले होते. काळोखेला सदर ड्रग्ज बेबी पाटणकरने दिल्याचे स्पष्ट होताच सातारा व मुंबई पोलिस बेबीच्या मागावर होते. मात्र बेबी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होती. अखेर तांत्रिक तपासात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी बेबीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. अखेर काही दिवसानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तिलाही अटक केली. पुढे केलेल्या तपासात पाच पोलीस बेबीच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बेबीच्या संपर्कात असलेल्या सर्वच पोलिसांची चौकशी गुन्हे शाखेने केली होती. यात काही धक्कादायक माहिती पुढे आली.
अमली पदार्थविरोधी पथकातील आझाद मैदान युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले यांनी एमडी ड्रग विकणा-या तस्करांविरोधात मोहिम उघडली होती. मात्र गोखलेंनी ही कारवाई बेबी पाटणकरचा व्यवसाय वाढविण्यासाठीच केल्याचे उघड झाले. आता सर्व पोलिस अधिका-यांना अटक करून प्रत्येक कारवाईची झाडाझडती गुन्हे शाखा पुन्हा नव्याने घेणार आहे. बेबीला सुरक्षित करण्यासाठी, बेबीचा धंदा वाढण्यासाठी गोखले यांनी तिचे स्पर्धक कारवाईच्या नावाखाली नामशेष केले असे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’च्या तस्करीतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार असून यामध्ये काही अतिवरिष्ठ पोलिस अधिका-यांची देखील नावे पुढे येण्याची शक्यता तेव्हा वर्तवण्यात येत आहे.

गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला तिलांजली- आता फडणवीसांची अमीर खान समवेत महाराष्ट्राला ‘सप्तपदी स्वच्छतेची’

Aamir-Swacch-04 aamir-fadnavis-l3

मुंबई: दिवंगत नेते आर आर पाटील यांनी सुरु केलेल्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला आता तिलांजली देण्यात आली असून स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी स्वच्छतेची’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. अभिनेता आमीर खान या अभियानाचा ब्रँड अँबेसिडर असून मुंबईत  अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

विकासाच्या वाटचालीत स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच आमीर खानसोबत दुष्काळावर चर्चा झाली असून, जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीर मदत करायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान फडणवीस सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे नाव का बदलले असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

“गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानाने राज्यातच नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला होता. दिवंगत नेते आर आर पाटील यांनी ही संकल्पना राबवली होती. मात्र फडणवीस सरकार आमीर खानला ब्रँड अम्बेसिडर बनवत आहे. पण या अभियानाचं नाव बदलून, या सरकारने आपली पातळी दाखवून दिली”, असा घणाघात तटकरे यांनी केला.

खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचा खासदार निधीतून उभारलेल्या सभामंडपाचे विठ्ठलनगर-देहू येथे लोकार्पण

unnamed

पुणे :
श्रीक्षेत्र देहू-विठ्ठलनगर येथील सभा मंडपाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या लोकार्पण रविवारी झाले. जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला तळेकर, हवेली पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूचे सरपंच कांतीलाल काळोखे, उपसरपंच प्रशांत भालेकर उपस्थित होते. या सभामंडपाच्या उभारणीसाठी 12लाख रुपये खर्च आला आहे.