Home Blog Page 3603

सीमेबाहेर जावून २० दहशतवादी ठोकले – भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

0

नवी दिल्ली-मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला करून आपल्या १८ जवानांची हत्या करणाऱ्या बंडखोरांना भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी म्यानमारच्या हद्दीत घुसून या हल्ल्यात हात असलेल्या एनएससीएन (के) आणि केवायकेएल या गटांच्या २० बंडखोरांचा खात्मा केला. या मोहिमेत भारतीय पथकाची कोणतीही हानी झाली नसून, लष्कराने प्रथमच आपल्या सीमेच्या बाहेर कारवाई केली आहे.

४ जूनला मणिपुरात लष्करावर झालेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून ही कारवाई करण्यात आली. बंडखोर सीमा ओलांडून भारतात येतात, सुरक्षा दलांना लक्ष्य करून हल्ले घडवतात आणि पुन्हा सीमेपलीकडे पळ काढतात, असे लक्षात आल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सीमेबाहेर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या १८ जवानांना ठार करणाऱ्या बंडखोरांविरोधात कडक पवित्रा घेत, भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी म्यानमारच्या हद्दीत महत्त्वपूर्ण कारवाई करत या हल्ल्यात हात असलेल्या एनएससीएन (के) आणि केवायकेएल या गटांच्या १५ बंडखोरांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कराने प्रथमच आपल्या सीमेच्या बाहेर लष्करी कारवाई केली आहे.

उच्चभ्रू महिला वकिलाने दारू पिऊन केले अपघात – २ ठार – भाऊ ‘मॅगी’ वर बंदी येते , दारूवर का नाही ?

0
मुंबई- वरिष्ठ कार्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने दारूच्या नशेत फूल टू तर्रर्र होऊन विरुद्ध दिशेने भरधाव व बेजबाबदारपणे ऑडी कार चालवून समोरून येणार्‍या टॅक्सीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टॅक्सीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.दारूची नाश कित्येक आयुष्याची दुर्दश अशी वारंवार परिस्थिती दिसत असताना आणि सरकार हि दारुबाबत  करीत असताना  ‘मॅगी’ वर बंदी आणणारे सरकार दारू वर का बंदी आणीत नाही असा  विचारला जावू लागला आहे दारू पिवून अनेकांच्या हातून अपघात-अपराध होतात , त्यापैकी उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींकडून झालेल्या  चर्चा रंगते पण दारूवर बंदी मात्र आणण्याचा साधा प्रस्ताव हि येत नाही हे आश्चर्य आहे . 
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ‘मरीन प्लाझा’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये जान्हवीने आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी केली. या पार्टीत तिने भरपूर दारू ढोसली. त्यावेळी तिने 6 पेग व्हिस्की रिचवली. घटनेच्या वेळी जान्हवी दारूच्या पूर्ण नशेत होती. अपघातानंतर नशेत असताना पोलिसांनी जान्हवीला पोलिस ठाण्यात आणले तेथेच ती रात्रभर झोपली. त्यामुळे अपघातानंतर तब्बल सात तासांनी म्हणजेच मंगळवारी सकाळी 9 वाजता तिचा जबाब नोंदवला गेला
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम करते. तसेच जान्हवी रिलायन्स कंपनीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. जान्हवी चेंबूर परिसरात राहत असून रिलायन्समित्रांसोबत पार्टी केल्यानंतर जान्हवी आपल्या Audi Q3 या कारने हॉटेलातून बाहेर पडली. यावेळी तिने 6 पेग रिचवले होते. दारूच्या नशेत असलेली जान्हवी ताशी 120 च्या वेगाने ऑडी कार चालवत होती. ईस्टर्न फ्री वेवर विरुद्ध दिशेने भरधाव ऑडी कार चालवू लागली. अपघातापूर्वी जान्हवीने सुमारे 11 किलोमीटर चुकीच्या दिशेने प्रवास केला.\डॉकयार्ड रोडवर दोन मारूती स्विफ्ट कारला धडक देता-देता वाचली.

 या वाहनचालकांनी तिचा पाठलाग केला; मात्र भरधाव वेगात असल्याने तिला गाठता आले नाही.
 जान्हवीच्या कारने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. टॅक्सी चालक सय्यद हुसेन पांजरपोळ टनेलपासून सबुनवाला कुटुंबियांना घेऊन चालले होते.जेव्हा अपघात झाला तेव्हा पाठीमागून पाठलाग करणारी मारूती स्विफ्ट गाडी तेथे हजर झाली, जे लोक जान्हवी पाठलाग करीत होते.ऑडी आणि ओम्नी टॅक्सीची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ऑडी कारचे टायर फाटले, इंजिनचा काही भाग तुटला. हा अपघात इतका भीषण असतानाही ऑडीतील जान्हवीला खरचटलेदेखील नाही. ऑडी टॅक्सीला धडकताच कारमधील अपघातविरोधी एअर बलून फुगले आणि जान्हवी बचावली मात्र आत अडकून राहिली. लोकांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर जान्हवीला चेंबूरमधील आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
नशेत चुर्रर झालेली जान्हवी पोलिस स्टेशनमधील महिला सेलमध्ये झोपी गेली.जान्हवी जेव्हा उठली तेव्हा तिच्या लक्षात आले की पोलिस ठाण्यात आहे. तेव्हा ती रडू लागली. तिने हॅंगओव्हरची तक्रारही केली.त्यानंतर
 पोलिसांनी आरोपी जान्हवीचा जबाब नोंदवला.

बजरंगी भाईजान ईद ला येणार -पहा मेकिंग ची झलक

यावर्षी ईदच्या मुहूर्तावर  रिलीज होणाऱ्या  सलमान खानच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमा च्या  ट्रेलरच्या मेकिंगचा व्हिडिओ 7जूनला रिलीज करण्यात आलाय. 1.40 मिनिटांच्या या व्हिडिओत सिनेमाचे बिहाइंड द सीन्स दाखवण्यात आले आहेत. यापैकी अनेक सीन्सची झलक आपल्याला टीजरमध्ये बघायला मिळाली आहे. व्हिडिओत सेल्फी ले ले रे गाणे, काश्मीर, सलमान-करीनाची सायलिंगसह अनेक सीन्स बघायला मिळत आहेत. एका सीनमध्ये दिग्दर्शक कबीर खान चित्रपटात काम केलेल्या लहान मुलीला सीन समजावतांना दिसतायेत.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा सलमान खान फिल्म्स या बॅनरमध्ये तयार झाला आहे. सलमानसह या सिनेमात करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

युरोपातील सगळ्यात मोठी बॅंक ‘एचएसबीसी’ ५० हजार कर्मचारी काढून टाकणार –

हॉंगकॉंग- युरोपातील सगळ्यात मोठी बॅंक ‘एचएसबीसी’ ५० हजार कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरु करण्‍यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी मंगळवारी जाहीर केले. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. जवळपास २० टक्के कर्मचार्‍यांची कपात केली जाणार आहे. परिणामी, एचएसबीसी यासाठी आपली गुंतवणूक मर्यादा सीमित केली आहे. ज्यात जास्त जोखीम असेल तिथे बँंक२९० अब्ज डॉलर्सने कमी गुंतवणूक करणार आहे.कपात केल्यानंतर एचएसबीसीमध्ये फक्त२ लाख ८हजार  कायमस्वरुपी कर्मचारी उरतील. २०१० मध्ये बॅंके मध्ये एकूण२ लाख ९५ हजार कर्मचारी होते. दरम्यान २०१४ मध्ये ही संख्या २ लाख ५८ हजारवर आली होती. आता बॅंकेने सुमारे५० हजार कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कपाती प्रक्रीया २०१७पर्यंत चालणार आहे.

ब्राझिल आणि तुर्की येथील बँकेच्या शाखेतून जवळपास २५ हजार तर मुख्य शाखेतून २२ते २५ हजार कर्मचार्‍यांना घरी बसवण्यात येणार आहे. गुंतवणूकदार आणि विश्लेषकांना मार्गदर्शन देण्यापूर्वी एचएसबीसीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुलिवर यांनी हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजला ही धक्कादायक माहिती दिली. स्‍टुअर्ट गुलिवर हे आपला सगळ्या मोठा स्‍ट्रॅटजिक प्‍लानचा आढावा गुंतवणूकदारांना दिला.

“युनिक इंग्लिश मीडियम स्कूल’चा दहावीचासलग चौथ्या वर्षी 100 टक्के निकाल

पुणे :

“ईगल एज्युकेशन सोसायटी’ संचलित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील “युनिक इंग्लिश मीडियम ऍण्ड ज्युनियर कॉलेज स्कूल’चा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

सायली गायकवाड हिने 94.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. अपूर्वा जाधव हिने 93 टक्क्यांसह दुसरा, तर अवंतिका टेकाळे हिने 90.40 टक्क्यांसह तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, प्राचार्य जयश्री जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

नेत्रतज्ज्ञांसाठी आयोजित “ऑक्युलोप्लास्टी फॉर एव्हरीवन’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न

unnamed

पुणे :
“पुणे ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी’, “दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ आणि “ऑक्युलोप्लास्टिक असोसिएशन ऑफ इंडिया’ यंाच्या संयुक्त विद्यमानेे नेत्रतज्ज्ञांसाठी नुकतेच “ऑक्युलोप्लास्टी फॉर एव्हरीवन’  या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारची नेत्रतज्ज्ञांसाठी पहिलीच एकदिवसीय कार्यशाळा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पार पडली.

या कार्यशाळेमध्ये डॉ. माधव भट (अध्यक्ष, “पुणे ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी), पद्‌मश्री डॉ.अशोक ग्रोवर, डॉ. अप्जीत कौर (अध्यक्ष, ऑक्युलोप्लास्टीक असोसिएशन ऑफ  इंडिया) आदी नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्र तज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांनी केले होते.

या कार्यशाळेमध्ये डोळ्यांचे कॅन्सर, केमोथेरपीच्या उपचार पद्धती,  नेव्हिगेशन शस्त्रक्रिया तंत्राचा उपयोग, कॉस्मॅटिकशस्त्रक्रिया, कृत्रिम डोळे, बोटॉक्स अशा नवीन दुर्मिळ शस्त्रक्रिया पद्धती अशा विविध विषयांवर नेत्रतज्ज्ञांनी सादरीकरण केले.

या कार्यशाळेमध्ये भारत, बांग्लादेश आणि नायजेरियामधून 180 नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले होते.

अश्रुंसंबंधी ग्रंथींचे व्यवस्थापन या विषयी डॉ. रघूराज हेगडे, कृत्रिम डोळे या विषयी डॉ. रमेश मूर्ती,  सौंदर्यशास्त्र संयोजन उपचार पद्धती विषयी डॉ. मिलिंद नाईक, चेहऱ्याचे वृद्धत्व या विषयी डॉ.देबराज शोमे, पापण्यांची दुर्मिळ शस्त्रक्रिया या विषयी डॉ. पूनम जैन या सारख्या अनेक महत्वाच्या शस्त्रक्रियांविषयी विविध तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

गैरव्यवहार चव्हाट्यावर आणू पाहणाऱ्या पत्रकाराला पोलिसांनीच जिवंत जाळले -भारतातील घटना …

0

नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूरमधील एका पत्रकाराला पोलिसांनीच जिवंत जाळून टाकल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार राममूर्ती यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळं त्यांची अशी क्रूरपणं हत्या करण्याता आल्याचा आरोप पत्रकाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.तर पोलिसांनी मात्र या पत्रकारानेच आत्महत्या केली असा दावा केला आहे .
जोगेंद्र असं या पत्रकाराचं नाव आहे. जोगेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी राममूर्ती यांच्याविरोधात वर्तमानपत्रात तसंच फेसबुकवर लिखाण केलं होतं. राममूर्ती यांच्या बेकायदा खाणींबद्दल व भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणांवर जोगेंद्र यांनी प्रकाश टाकला होता. त्यामुळं राममूर्ती त्यांच्यावर संतापले होते. जोगेंद्र यांना विविध प्रकरणात अडकविण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, त्यात यश न आल्यामुळं पोलिसांनीच त्यांना जाळून मारल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.

शाहजहाँपूरचे पोलीस अधीक्षक यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ‘जोगेंद्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली.’

गुरुनानक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा दहावी आणि बारावीचा १०० टक्के निकाल

1 2 3 4 5

पुणे कॅम्पमधील रेसकोर्सजवळील गुरुनानक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला . यंदा दहावीमध्ये अगमजोतकौर चौधरी या विद्यार्थीने ९५ टक्के प्राप्त करून शाळेत प्रथम क्रांमाकाने उत्तीर्ण झाली . तर दुसरा क्रमांक ओमकार ओमादीने ९४ टक्केने उत्तीर्ण झाला . तिसरा क्रंमांक गुरुप्रेम सिंहने ९० टक्के गुण प्राप्त केले . शाळेत अन्य विद्यार्थीदेखील प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाले.

बारावीच्या निकालात वाणिज्य या शाखेमध्ये प्रथम क्रमांक हरनीतसिंह जौलीने ८६ टक्के गुण मिळविले तर दुसरा क्रमांक शास्त्र शाखेतील अभिषेक लिमकर याने ८५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकावर राहिला .

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनदन शाळा समितीचे अध्यक्ष सरदार प्रकाशसिंग घई , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष हरमिंदरसिंग घई , सरचिटणीस चरणजितसिंग सहानी , शाळेचे सचिव सरदार तरमिंदरसिंग व्होरा , खजिनदार सरदार कुलजितसिंग चौधरी ,  शाळेच्या मुख्याध्यापिका सुबीनकौर जग्गी , प्रशासक भूपिंदरकौर सहानी व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे अभिनदन करण्यात आले .

शाळेच्या मुख्याध्यापिका  सुबीनकौर जग्गी यांनी निकालाबाबत सांगितले कि , शाळेतील शिक्षकांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली . त्यासाठी पालकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्याची माहिती पालकांना देण्यात आली . अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्याकडून जादा अभ्यास करून घेण्यात आला . या सर्व प्रयत्नातून १०० टक्के निकाल लागला .

अभिनेत्री निशा परुळेकर च्या मुलीचे घवघवीत यश …

0

मराठीतील लाडकी अभिनेत्री निशा परुळेकर हिच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे .

मयुरी असे तिचे नाव आहे मुंबईतील कांदिवली इस्ट येथील चिल्ड्रन अकेडेमि स्कूल ची विद्यार्थिनी असलेल्या मयुरीने संस्कृतमध्ये चक्क १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे . ९६ टक्के गुण मिळवून तिने दहावीत घवघवीत यश मिळविले – सांस्कृतिक क्षेत्रातील मैत्रीपूर्ण अशा ‘सलाम पुणे’ संस्थेच्या वतीने संतोष चोरडिया यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे .

आप चा कायदामंत्री च बनावट पदवीच्या आरोपात गजाआड …

नवी दिल्ली – अरविंद केजरीवालच्या सरकारमध्ये कायदामंत्री असलेले जितेंद्र तोमर यांचा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बनावट पदवी सादर केल्याचा आरोप आहे. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी ट्वीट द्वारे ही माहिती दिली आहे.नरेंद्र मोदी हे आप चे पद्धतशीर खच्चीकरण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला
कोणत्याही नोटीसशिवाय दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांना अटक करून हौज खास ठाण्यात नेण्यात आले. मोदी सरकार अशा प्रकारे आम आदमी पार्टीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी लावला आहे.
संजय सिंह म्हणाले की, जितेंद्र तोमर यांचे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टात विद्यापीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे तोमर यांची पदवी बनावट नसल्याचेही सांगितले आहे. तरीही केवळ दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे अटक करण्यात आल्याचे सिंह म्हणाले. दिल्ली पोलिस, उपराज्यपाल आणि मोदी सरकार आम्हाला खटले आणि पोलिसांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमची लढाई सुरुच राहणार असल्याचे, संजय सिंह म्हणाले.
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील तोमर यांना अटक करण्याची योजना सोमवारी सायंकाळी तयार करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र तोमर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

जगाला सावरण्याची ताकद भारतीय संस्कृतीतच -खासदार अमर साबळे

पुणे- : जगाला सावरण्याची ताकद भारतीय संस्कृतीतच असल्याचे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
नर्‍हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँँड एज्युकेशनल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार संजय नहार, चाटे एज्युकेशनल ट्रस्टचे फुलचंद चाटे (शैक्षणिक), योगेश टिळेकर (राजकीय) यांचा सत्कार करण्यात आला. सुधाकर जाधवर यांचाही या वेळी वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी ‘उडान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
साबळे म्हणाले, ”जगात क्रांती या भुकेलेल्या माणसाने केल्या आहेत. शून्यातून विश्‍व निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.”
सामाजिक कार्य व राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारून राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्‍या अभिमत विद्यापीठ निर्माण करण्याची संकल्पा आहे, असे सुधाकर जाधवर यांनी सांगितले.
या वेळी आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सभापती मंगलदास बांदल,प्रा . फुलचंद चाटे अँड. दिलीप जगताप, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेविका युगंधरा चाकणकर, विकास दांगट, अँड. दिलीप जगताप, डॉ. एकनाथ खेडेकर, सुनील जाधव, बाबासाहेब सांगळे, बाळासाहेब पोकळे, हरिदास चरवड, शैलेश पगारिया, ए. आर. सानप, भरत टिळेकर उपस्थित होते. शादरूल जाधवर यांनी प्रास्तविकात ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य दीपक भामरे यांनी आभार मानले.

s s c चाटे क्लासेस ची यंदा हि बाजी … १२५० विद्यार्थी ९० टक्क्यांवर … १०० टक्के निकाल

0

* Again Chate Group Proved
Proof of Leadership……
*Achieved Milestone Results
In SSC Board-2015…….
* Satara road branch 52 Students scored marks
above 90% ……
*Rajesh Thorve Scored- 99%
(Sci.,Maths,Soc. Sci. and
Sanskrit – 100/100, Eng.-95,
Mar.-92)……..
1255 students scored marks above 90% all over maharshtra.
Congratulations!!!!!!!!

बारावी विज्ञान , जे इ इ (मेन ) सह सीईटी त हि चाटे यांच्या विद्यार्थ्यांचे सातत्य  Medical cet 2015 toppers.
बारावी विज्ञान , जे इ इ (मेन ) सह सीईटी त हि चाटे यांच्या विद्यार्थ्यांचे सातत्य
Medical cet 2015 toppers.

नापासांना ऑक्टोबर पर्यंत थांबावे लागू नये – तावडे

0

मुंबई

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी आक्टबारची वाट पहावी लागते. यात विद्यार्थ्यांचं संपूर्ण एक वर्ष वाया जातं. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होतं. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार निकालानंतर त्यांना लगेचच संधी देण्याचं विचार करतंय. पुढच्या वर्षापौन नापास झालेल्यांना लगेचच महिनाभरात पुन्हा परीक्षा देत येईल यासाठी काय पावले उचलावी लागतील याचा आमि विचार करतो आहे अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगेच परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. पण सरकारचा हा निर्णय पुढच्या वर्षापासून लागू होईल. पुढच्या वर्षी मे महिन्यात निकाल लागल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येईल, असा सरकारचा विचार आहे. यामुळे फेरपरीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशही घेता येईल. ऑक्टोबरच्या परिक्षेने वर्ष वाया जातं. म्हणूनच १० वी, १२ वी साठी पुढच्या वर्षी पासून पुनःपरीक्षा लवकर घेऊ, असं तावडे म्हणाले.

यंदा राज्यात दहावीत ८% विद्यार्थी नापास झालेत. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करता येईल का? हे देखील शाळेने पहावं. तसंच या वर्षी फेरपरीक्षा घेता येऊ शकते का? याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, असंही तावडेंनी सांगितलं.

मुंबई -गुजरात -कोकण ला ‘अशोबा’ वादळाचा धोका ?

0
मुंबई-  मुंबई व गुजरातच्या अरबी समुद्रात पुढील ३६ तासांत अशोबा नावाचे धोकादायक चक्री वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात पुढील ४८तासांत मुसळधर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ दक्षिण पश्चिम मुंबईपासून सुमारे ४७० किमी आणि ओमानच्या दक्षिण पूर्वमधील मसीरा टापूपासून ९६० किमी दूर होते अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे
 हवामान खात्याने अशीही भीती व्यक्त केली आहे की, उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने हे वादळ पुढील ३६तासांत धोकादायक तुफानी वादळ येऊन धडकू शकते. अशोबा वादळाच्या भीतीने उत्तर आणि उत्तर पश्चिमच्या दिशेने समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये असा इशारा दिला आहे.
या वादळामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४८ तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. समुद्रात असणा-या मच्छिमारांना किना-यावर येण्यास सांगितले आहे. या क्षेत्रात उठणारे हे ३६ वे मोठे चक्रीवादळ असणार आहे त्यामुळे श्रीलंकेने त्याचे नामकरण ‘अशोबा’ असे केले आहे.

पुण्याच्या खासदारांचा आटापिटा …

0
unnamed
पुणे- डॉक्टर आणि विमा कंपन्या यांच्या हटवादात ‘ क्याश लेस मेडिक्लेम  ‘ चा तिढा पूर्णपणे सुटल्याचे  दिसत नसतानाच आता पंतप्रधानांच्या  नावे असलेल्या ४ चांगल्या योजना तमाम पुणेकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी आटापिटा चालविला आहे . आता यात हि त्यांना ब्यांका आणि विमा कंपन्या यांच्यावर अवलंबून राहावे लागणार असल्याने त्यांनी सर्व ब्यांका आणि विमा कंपन्यांना याबाबत बैठक घेवून आढावा मागून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत प्रसंगी या योजना तमाम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आता स्वयंसेवी संस्थांची मदत हि घेतली जाईल असे हि या बैठकीत सांगितले आहे याबरोबरच कोणत्याही कागदपत्रांची बंधने न लादता प्रधानमंत्री जनधन  योजने अंतर्गत सर्वांची खाती उघडून घ्या असे आदेश हि दिले आहेत त्याच बरोबर ज्या ब्यांका यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण करतील  सहाय्य करणार नाहीत त्या ब्यांका  बद्दल १८००२३३६३०२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे हि आवाहन केले आहे .

प्रधानमंत्री जन धन योजना , सुरक्षा विमा योजना , जीवन ज्योती विमा योजना , आणि अटल पेन्शन योजना  या सर्व योजना नागरिकांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केल्या आहेत या योजनेसंदर्भात त्यांनी आज ब्यांका आणि विमा कंपन्या यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर श्री शिरोळे आणि महाराष्ट्र ब्यांकेचे विभागीय व्यवस्थापक आर हरी कुमार यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत लोकजागृती करण्याचे हि आवाहन केले .

ते म्हणाले , १२ रुपयात वर्षभरासाठी २ लाखाचा अपघात विमा , ३३० रुपयात २ लाखाचा मृत्यू पश्चात मिळणारा जीवन विमा , यासह १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठी १ ते ५ हजार रुपयांची पेन्शन योजना अशा चांगल्या योजना २८ सप्टेंबर पासून सुरु झाल्या मात्र अजूनही त्या पुण्यातील १०० टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत . त्यास गती देणे महत्वाचे आहे . आजतागायत १ लाख ९५ हजार नागरिकांची जन धन योजने अंतर्गत कुटुंब खाती उघडण्यात आली आहे यात अजूनही ५ टक्के गरजू लोक सहभागी झालेले नाहीत त्यना सहभागी करून घेणे गरजेचे आहे . प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अवघ्या १२ रुपयात मिळणारी सुविधा असून अद्याप या अंतर्गत केवळ ४ लाख लोक सहभागी झाले आहेत , जीवन ज्योती विमा योजनेत २ लाख २० हजार तर अटल पेन्शन योजनेत केवळ १ हजार ११७ लोक सहभागी झाले आहेत . १०० टक्के लोक यात कसे सहभागी होतील यासाठी पथनाट्ये आणि आदी स्वरूपात जागृती करण्यात येईल आणि स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळे  यांची हि मदत घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे . याशिवाय आता जिल्हाधिकारी स्तरावर बैठका घेवून अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क ठेवला जाईल .

pradan-matri-atal-pension-yojna pradhan_matrei_jandhan_scheme Social-Security-Schemes