पुणे – शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी हवामान अंदाज प्रदर्शित करणारे फलक वेधशाळे तर्फे लावण्यात आले आहे परंतू हे फलक इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहे.यात मराठी भाषा डावलण्यात आली आहे त्यामुळे मनसे पर्यावरण विभागा तर्फे श्री राजेश माळी ,वेधशाळा ,पुणे यांना पत्रा द्वारे हे फलक मराठी भाषेत करण्याचे निवेदन देण्यात आले.त्यांनीही हे मान्य करीत असल्याचे सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष श्री संजय भोसले , वसंत खुटवड ,सीताराम तोंडे पाटील ,रवि सहाणे ,नितिन जगताप , गणेश धुमाळ , तेजस साठये ,दुर्गादास रामवत आदी उपस्थित होते.
हवामान खात्याचे फलक मराठी भाषेत करण्याची मनसेची मागणी
घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई :- राज्यातील सुमारे 1.75 कोटी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा
शुभारंभ मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि. 23 जून रोजी विधानभवन मुंबई येथे
करण्यात आला. या योजनेमुळे वार्षिक सुमारे 1300 दशलक्ष युनिटसच्या विजेची बचत होणार असून कमाल
मागणीच्या काळात सुमारे 500 मे.वॅ. विजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात
प्रतिबल्ब सुमारे 180 रुपयांची वीज बिलात बचत होणार आहे.
केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना जाहीर केली असून
या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महावितरणच्या भांडुप परिमंडलातील
ग्राहकांना प्रातिनिधीक तत्वावर मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.
या योजनेमध्ये घरगुती ग्राहकांना प्रत्येकी 7 वॅट क्षमतेचे 2 ते 4 बल्ब देण्यात येतील. हे बल्ब रु. 100
रोखीने किंवा रु. 105 या दराने मासिक योजनेच्या हप्त्यानेही घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शुन्य
व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा वीज दरावर किंवा
महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही. तसेच तीन वर्षात मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी
राहणार आहे. केंद्र शासनाच्या EESL कंपनीद्वारे पारदर्शक निवीदा प्रक्रियेने बल्ब खरेदी करण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकास द्वारे व प्रत्यक्ष
कक्षावर भेटून या बल्बसाठी नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा
कार्यालय, बील भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यांत येतील.EESL
कंपनीमार्फत घरपोच सेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळया ठिकाणी स्थानिक
पातळीवरील लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने बल्ब वाटपाचे कार्यक्रम घेण्यांत येणार आहेत.
या कार्यक्रमास केंद्रीय विदयुत संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार श्री. किरीट सोमय्या,
आमदार श्री. राज पुरोहित, अप्पर मुख्य सचिव श्री. मिना, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. मुकेश खुल्लर,
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओम प्रकाश गुप्ता, संचालक (प्रकल्प) श्री. प्रभाकर शिंदे, संचालक
(संचालन) श्री. अभिजीत देशपांडे, EESL चे मानव संसाधन प्रमुख श्री. ए.के. अरोरा, प्रकल्प
व्यवस्थापक श्री. दिपक कोकाटे, व्यवस्थापक श्री. शरद चंद्र, रिलायन्स व टाटा कंपनीचे अधिकारी प्रामुख्याने
उपस्थित होते.
कोथरूड, वारजे परिसरात सव्वादोन तास वीज खंडित
पुणे, दि. 23 : महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा बंद पडल्याने मंगळवारी (दि. 23) कोथरूड
विभागातील कोथरूड, वारजे, डेक्कन आदी परिसरातील 50 टक्के भागात सकाळी 8.40 ते 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता
याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या फुरसुंगी उपकेंद्गातून 132 केव्ही वाहिनीद्वारे कोथरूड विभागात
वीजपुरवठा करण्यात येतो. तथापि आज सकाळी न्याती परिसरात मृत पक्षी या वाहिनीच्या विद्युत बाधीत क्षेत्रात
आल्याने वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड विभागात होणारा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी 9.22 पर्यंत
डेक्कन व कोथरूड परिसरातील 50 टक्के भागात एनसीएल व गणेशखिंड उपकेंद्गातून पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात
आला. दरम्यान महापारेषणकडून पावसामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून 132 केव्ही वाहिनीची पाहणी करण्यात आली
व सकाळी 11 वाजता ही वाहिनी कार्यान्वित झाली. सोबतच कोथरूड विभागातील सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीतझाला अशी माहिती महावितरण ने कळविली आहे
सलमानखान च्या ‘सुलतान’चा टीझर रिलीज…
मराठी सिनेमा पूर्ण झाल्यानंतर टीझर-ट्रेलर -प्रोमो रिलीज होतात- यंदाच्या ईद ला सलमान खान चा ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित होतो आहे . त्याची चर्चा असतानाच यशराज फिल्म ने पुढच्या वर्षातल्या ईद ला सलमान खान चा ‘सुलतान ‘ रिलीज करण्याचे जाहीर करीत त्याच टीझर हि रिलीज केला आहे . अवघ्या ३३ सेकंदाच्या या टीझर ने फिल्मी मार्केटमध्ये नाव रुजवायला प्रारंभ केला आहे
विविध ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार
पुणे- पहिल्या फटका ऱ्या नंतर अनेक ठीकांनी दरडी कोसळण्याचे प्रकार होत असून पर्यटकांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे पुण्यातील कात्रजवळील शिंदेवाडी येथे दरड कोसळली आहे. तेथून एकेरी वाहूतूक सुरु आहे.तर आज पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कल्याणमार्गे नगरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पुण्यातील कात्रजवळील शिंदेवाडी येथे दरड कोसळली आहे. तेथून एकेरी वाहूतूक सुरु आहे.
हास्य विनोदात रंगला ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ सोहळा
छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळा’ नुकताच संपन्न झाला.कॉमेडी अवॉर्ड्स म्हणजे विनोदाचा तडका असणारच आणि या सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदारसादरीकरणाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाने.हृषिकेश जोशी सर्वोत्कृष्ट नायक(पोश्टर बॉईज ) तर सर्वोत्कृष्ट नायिका सोनाली कुलकर्णी(अगं बाई अरेच्चा २) ठरली.वैभव मांगले यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (टाईमपास २) तर नेहा जोशी हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री(पोश्टर बॉईज) पुरस्कार पटकावला.समीर पाटीलयांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा (पोश्टर बॉईज) पुरस्कार मिळवलातर समीर पाटील, चारुदत्त भागवत (‘पोश्टर बॉईज’) यांना सर्वोत्तम लेखनासाठी गौरवण्यात आले.
नाटक विभागातील पुरस्कारांमध्ये ‘ऑल द बेस्ट २’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान देवेंद्र पेम यांनी ‘ऑल द बेस्ट २’साठी पटकावला.सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार‘गोष्ट तशी गमतीची’या नाटकासाठी मंगेश कदमयांना प्रदान करण्यात आला. तरसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लीना भागवत यांना‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता भूषण कडू (सर्किट हाऊस) तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पूजा नायक(पहिलं पहिलं) ठरली. विशेष लक्षवेधी अभिनेत्याचा ज्युरी पुरस्कर मयुरेश पेमला(ऑल द बेस्ट २)मिळाला.
पुनरूज्जीवित नाटकाच्या पुरस्कारांमध्ये ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने बाजी मारली. याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून भरत जाधव तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाकरिता केदार शिंदे याची निवड करण्यात आली. प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्कारांमध्ये हास्यकवी रामदास फुटाणेव लावणीसाठी योगदान देणाऱ्या कांताबाई सातारकर यांचा गौरव करण्यात आला.
हास्य-विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री व मकरंद अनासपुरेयांनीकेले.या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली. नेहा पेंडसे, मानसी नाईकव पूजा सावंत या अभिनेत्रींच्या दिलखेचक नृत्यविष्काराने सर्वांची मने जिंकली.मयुरेश पेम वकोरिओग्राफर सॅड्रीकच्या नृत्याच्या जलव्याने चांगली रंगत आणली. सचिन पिळगांवकर यांनी श्रुती मराठे, संस्कृती बालगुडेयांच्या साथीने किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरतया सोहळ्यात अनोखे रंग भरले.विजय पाटकर व आरती सोळंकी धमाल गाण्यावर बेधुंद नाचले. तरसंतोष पवार, कमलाकर सातपुते, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हेमांगी कवी,सिद्धार्थ जाधवयांच्या बहारदार स्किटसने उपस्थितांना मनसोक्त हसवले.
धम्माल विनोदी परफॉर्मन्सेस, आकर्षक नृत्याविष्कार आणि दिग्गजांच्या उपस्थितीने सजलेला‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी १२ जुलैलासायं. ६.३० वा.‘झी टॉकीज’वर प्रक्षेपित होणार आहे.
पी.एम.पी.एम.एल. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कार्यालयाचे अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन
पुणे :
पी.एम.पी.एम.एल. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कार्यालयाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रमपी.एम.पी.एल कॅन्टिन बिल्डींग, शंकरशेठ रोड येथे पार पडला.
उद्घाटनस्थळी अजित पवार (माजी उपमुख्यमंत्री) यांनी वृक्षारोपण केले तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी युनियनने अजित पवार यांचा पुणेरी पगडी देवून सत्कार केला. पी.एम.पी.एम.एल. कामगारंाचे प्रश्नाबाबत दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रशांत जगताप, सोमनाथ आप्पा शिंदे, युनियन अध्यक्ष किरण थेउरकर, सुनिल नलावडे, हरीष ओहोळ, विशाल कदम, विवेक कदम, आनंद जगताप आदी उपस्थित होते. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले व उत्तम मोरे यांनी आभार मानले.
प्रशांत जगताप यांनी युनियनची वाटचाल व भविष्यात करण्यात येणारी कामे याविषयी कामगार मार्गदर्शन केले. कामगारांना वेतनकरारपोटी फरकाची रक्कम देण्यामध्ये प्रसंगी उपोषण करून देखिल कामगारांच्या न्याय मागण्या पुर्ण करून देऊन कामगारांना फरकापोटी रू 90 कोटीची पहिल्या टप्प्याची रक्कम आपल्या युनियनने मिळवून दिली असल्याचे सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर शंकुंतला धराडे, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अतुल शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रसाद शेट्टी, प्रशांत जगताप, रूपाली चाकणकर, मोहनसिंह राजपाल आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी राजकुमार राव यांची नियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केली .
राजकुमार राव गेली तीस वर्षापासून कॉंग्रेस पक्षाचे निष्टावंत सक्रिय कार्यकर्ते आहे . रास्ता पेठ पावर हाउस येथे ते राहत त्यांनी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीच्या शहर प्रतिनिधी पासून त्यांनी काम केले आहे . त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर सोमवार पेठ येथून निवडणूक लढविली . त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली . पुणे धर्मप्रांतच्या अनेक समित्यावर काम केले आहे . होली एंजल चर्चचे माजी सचिव , पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीसपदी काम केले आहे . ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या पुणे सदस्य , रोटरी क्लब ऑफ हडपसरचे सदस्य आहेत .
या पदाच्या माध्यमातून समाजातील सामाजिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे . असे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .
‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ म्युझिक लाँच
सिने तारे-तारकांची झगमग, बहारदार संगीताची मेजवानी अशा जोशपूर्ण वातावरणात ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते चित्रपटाच्या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. म्युझिक लाँचच्या वेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते. चित्रपटाचे पोस्टर लाँच व चित्रपटातील गीतांची झलक याप्रसंगी दाखविण्यात आली. वेगवेगळ्या जॉनरची ४ धमाकेदार गाणी ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ मध्ये ऐकायला मिळणार आहेत. कथानकाला साजेशी अशी सिनेमातली गाणी असून प्रफुल कार्लेकर व मधु कृष्णा या द्वयीने संगीत दिलंय.
यातल्या ‘रेशमी रुमाल’ या तडफदार आयटम साँगवर भाऊ कदम, गिरीजा जोशी, चिन्मय उदगीरकर, आरती सोलंकी यांनी ताल धरलाय. शिवाय ‘तूच तू’ हे एक रोमँटिक गाणं व ‘पप्पी दे’ हे प्रसिद्ध गाणंही या सिनेमात आहे. ‘वाजलाचं पाहिजे’ हे धमाल टायटल साँग ही सगळ्यांना आवडेल असचं आहे. मंदार चोळकर व हरिदास कड यांनी चित्रपटातील गाणी शब्दबद्ध केली असून आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी रोहित राऊत व प्रवीण कुंवर यांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.
चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे. सह-निर्मात्याची जबाबदारी हेमंत अणावकर तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे.
शालेय साहित्य खरेदीला विलंब-विद्यार्थी गणवेश,बूट,दप्तर,वह्यांपासून वंचित; महिनाअखेर पर्यंत साहित्य खरेदी न झाल्यास आंदोलन-संदीप खर्डेकर
पुणे-
200 रुपये टोल भरून घ्या अनुभव … मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली …
पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. एक्स्प्रेसवेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.सकाळी सव्वादहाच्या सुमारास हि दुर्घटना घडली खोपोलीहून पुण्याच्या दिशेने जाणा-या एका एक्सयुव्हीवर दगड पडल्यामुळे गाडीतील दोघे जखमी झाले आहेत.यापूर्वी सन 2005 आणि 2008 मध्ये अशा प्रकारच्या दरडी कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत घाटातील आठ ते दहा किलोमीटरच्या दरडप्रवण क्षेत्रात 26 हजार चौरस मीटर लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. या जाळीमुळे छोटे-मोठे दगड अडत होते.
माथेरानमध्ये भिंत कोसळून ५ ठार -दापोलीत दरड कोसळून ५ ठार
नेरळ/रत्नागिरी
माथेरानच्या पायथ्याशी नेरळमध्ये मोहाची वाडी येथे आज पहाटे ५.३० वाजता एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला.तर रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये तीन घरांवर आज पहाटे दरड कोसळल्याने पाच गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत
मोहाची वाडी मधील किसन दिघे, सुनंदा दिघे, स्वप्नेश दिघे, अर्चना दिघे आणि जाई बाई कदम यांचा भिंतीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू झाला. प्रांताधिकारी राजेंद्र बोरकर आणि तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तातडीने भिंतीचा ढिगारा उपसला आणि सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले.
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे नेरळमध्ये शोकाकूल वातावरण आहे. माथेरानच्या पायथ्याशी राहणा-यांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान खासदार श्रीरंग बारणै,पालकमंत्री प्रकाश मेहता,आमदार सुरेश लाड ,उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये तीन घरांवर आज पहाटे दरड कोसळल्याने पाच गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दरड उपसण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दाभोळमधील टेमकरवाडीवर आज दरडीचे संकट कोसळले. लोक गाढ झोपेत असतानाच दरड कोसळल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेली घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले. सर्व मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून ५० जणांची टीम आणि तीन जेसीबींच्या सहाय्याने सध्या ढिगारा उपसण्याचे काम केले जात आहे.
विषारी दारूचे बळी ९८ …
मुंबई: मालवणीमधील विषारी दारुच्या बळींची संख्या 98 वर पोहोचली आहे. या घडीला 45 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी ममता यादव, आणि ग्रेसी आन्टी या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सात जणांना जेरबंद करण्यात आलं आहे. तर याप्रकरणी आधीच एकूण 8 पोलीस आणि 4 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
मालाडच्या मालवणी परिसरात विषारी दारू प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सुरु असलेलं हे मृत्यूचं तांडव कायम आहे.दरम्यान, याप्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येक एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचं, मुंबई उपनगर पालकमंत्री विनोद तावडे यांनी केली. ही मदत तातडीने पीडित कुटुंबियांना देण्यात येईल, असं तावडे म्हणाले. सोमवारी याबाबतची कागदपत्र तपासून प्रत्यक्ष मदत देण्यात येईल.दरम्यान, तावडे यांनी अतिरिक्त पोलिस आयुक् फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी शेखर चेन्ने आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा, तसंच या भागातील सर्व दारू भट्ट्या उखडून काढा, असे आदेश दिले.
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांची पदवी बनावट-संजय निरुपम यांचा आरोप
पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून तावडेंनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. मात्र, या विद्यापीठाला अभियांत्रिकी पदवी देण्याची कोणतेही परवानगी नाही. तसेच या विद्यापीठाला यूजीसीने अनधिकृत म्हणजेच बनावट ठरवले असल्याचे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. राज्याचा शिक्षणमंत्रीच बनावटगिरी करीत असेल तर काय म्हणायचे? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसने तावडेंचा राजीनामा मागितला आहे.
पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. आणि ही पदवी मी कधीही लपवलेली नाही. प्रतिज्ञापत्रात ही पदवी मी स्पष्टपणे लिहिलेली आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळावा म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे यांच्या सप्रे व इतर सरांनी एक ब्रिज कोर्स सुरु केला होता. या कोर्सला मी १९८० मध्ये प्रवेश घेतला. हा कोर्स अर्धवेळ शिक्षण व अर्धवेळ इंटर्नशिप असा होता. मी १९८४ ला हा कोर्स करून पास झालो. सदर कोर्सला शासन मान्यता नाही हे मला प्रवेश घेताना सांगण्यात आले होते. त्याच्या जोडीला अशी मान्यता आम्ही घेणार नाही ही सप्रे सर व इतरांची भूमिका होती. जी मला माहिती होती व मान्यही होती. पुढे कालांतराने मनोहर जोशी ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यानंतर जोशी यांचे कुणी विरोधक कोर्टात गेल्याने सदर कोर्सवर कोर्टाकडून बंदी आली व विद्यापीठाने तो कोर्स तात्काळ बंद केला.
या कोर्सला शासन मान्यता नसल्याने मी कधीही पासपोर्टसाठी पदवीधारकांना असणारे लाभ घेतलेले नाहीत. ना मी कधी स्वतःची पदवीधारक मतदार म्हणून नोंदणी केली आहे. या कोर्स शिवायचे माझे शिक्षण १२ वी पास इतके आहे व ते मी लपवलेले नाही, असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.
अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला
काबुल -अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.संसदेच्या परिसरात चार स्फोट झाल्याची आणि गोळीबार सुरू असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी संसदेचे कामकाज सुरू असल्याचेही कळते. दरम्यान, अफगाणिस्तानमधील सारे खासदार सुरक्षित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. एक हल्लेखोर संसदेच्या परिसरात घुसला असल्याचेही वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या इमारतीच्या तळभागात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. संसदेत हजर असलेले खासदार, अधिकारी, पत्रकार यांचे संसदेबाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संसदेचे कामकाज सुरू असताना परिसरात प्रचंड सुरक्षा ठेवण्यात येते, असे असून देखील हल्लेखोर आत शिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संसदेच्या परिसरात काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.






