Home Blog Page 3594

महाराष्ट्रासह परराज्यातही किल्लाची घोडदौड ; दुस-या आठवड्यात चित्रपटगृहांची संख्या ३०० वर

 

पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या आणि बॉक्स ऑफिसवर कोटी कोटी उड्डाणे घेणा-या एस्सेल व्हिजन प्रस्तुत ‘किल्ला’ चित्रपटाने दुस-या आठवड्यात आगळा वेगळा विक्रम केला आहे. या आठवड्यात किल्लाच्या चित्रपटगृहांची संख्या वाढली असून ती २२५ वरून ३०० वर गेली आहे शिवाय रोजच्या खेळांची संख्या ७२० तर आठवड्याच्या खेळांची संख्या ५०४२ एवढी झाली आहे. महाराष्ट्रासह किल्लाची घोडदौड दिल्ली, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेशातही सुरू असून अनेक अमराठी भाषिकही या चित्रपटाचा आनंद घेत आहेत. चित्रपटाची कथा चांगली असली की प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देतात हे किल्लामुळे परत एकदा सिद्ध झालं आहे. किल्लाला मिळणा-या या प्रचंड प्रतिसादामुळे किल्ला टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘किल्ला’ प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी चर्चेत होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आणि विविध पुरस्कार सोहळ्यांत मिळालेले मानाचे पुरस्कार आणि तेथील प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या प्रतिक्रियांमुळे किल्लाबद्दल उत्सुकतेचं वातावरण होतं. या वातावरणात ‘किल्ला’ प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. पहिल्या आठवड्यात ‘किल्ला’ महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर २२५ चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला होता. यावेळी रोजच्या खेळांची संख्या ४२५ एवढी होती. दुस-या आठवड्यात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होत असताना ‘किल्ला’ दुस-या आठवड्यात किती चित्रपटगृहांमध्ये बघायला मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. परंतू रसिक प्रेक्षकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि चित्रपटाबद्दल तयार झालेलं सकारात्मक वातावरण यामुळे दुस-या आठवड्यात किल्लाच्या चित्रपटगृहांची संख्या वाढून ती ३०० वर पोहचली. चित्रपटाला सब टायटल्स असल्यामुळे अनेक अमराठी भाषिक प्रेक्षकही हा चित्रपट बघून त्याबद्दल सोशल नेटवर्क साइट्सवर भरभरून बोलत असल्याचं चित्र बघावयास मिळत आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “आर्कीटेक्चर पदवी’ परिक्षेत पहिल्या चार मध्ये “अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी

पुणे:

“महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटीच्या “अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या तीन विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “आर्कीटेक्चर पदवी’ परीक्षेमध्ये पहिल्या चार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. यामध्ये शार्वेय सालकर (प्रथम क्रमांक), वैष्णवी मगर (द्वितीय क्रमांक), मारिया दानावाला (चौथा क्रमांक) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एकाच महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी “टॉपर्स’मध्ये येण्याचा मान यामुळे “अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ ने मिळविला आहे. “महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पी.ए.इनामदार आणि प्राचार्य लिना देबनाथ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्राचार्य, शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम हेच त्यांच्या यशाचे श्रेय आहे.

डायल 108 रुग्णवाहिका वारकऱ्यांच्या सेवेत पालखी मार्गावर तैनात

पुणे :

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या सुसज्ज “डायल 108′ रुग्णवाहिकांची सेवा यंदाच्या वर्षी देखील पालखी मार्गावर वारकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

“गोल्डन अवर्स’ मध्ये तातडीचे उपचार देणाऱ्या डायल 108 च्या 60 ते 65 रुग्णवाहिका सुरूवातीपासून शेवटपर्यंत सतत पालखीबरोबर राहणार आहेत. पालखी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून देहू आणि आळंदी या दोन्ही मार्गांवर स्वतंत्रपणे रूग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे. पालखीबरोबर वारकऱ्यांना आरोग्य सुविधा तसेच पालखी मार्गावर तातडीचे वैद्यकिय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती “महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.

मागील वर्षी “डायल 108′ या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या 56 रुग्णवाहिकांनी तब्बल 29,972 वारकऱ्यांची सेवा केली. वारी मार्ग आणि पंढरपूर येथे 56 अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेल्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. दरवर्षी साधारण 25 ते 30 वारकऱ्यांचा मृत्यू विविध कारणांनी वारीदरम्यान होतो. मागील वर्षी हे प्रमाण डायल 108 रूग्णवाहिका सेवेमुळे  सहापर्यंत खाली आणण्यात यश आले होते.

पालखी मार्गावर कोणतीही आपत्कालिन वैद्यकीय मदत लागली तर सुसज्ज रुग्णवाहिका 108 क्रमांक डायल केल्यावर उपलब्ध असतील. त्यात व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वसन) अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही या रुग्णवाहिकेत असणार आहेत. पुणे ते पंढरपूर मार्गावर ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल त्याठिकाणी काही ऍम्ब्युलन्स सेवेत राहणार आहेत.  ही सेवा विनामूल्य असणार आहे, मात्र रुग्णालयातून घरी सोडणे, अथवा खासगी रुग्णालयात दाखल होणे यासाठी ही रुग्णवाहिका सेवा देता येत नाही. रूग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्यास नजीकच्या सरकारी रूग्णालयात या डायल 108 रूग्णवाहिकांच्या मार्फत दाखल करण्यात येते.

26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. “अपघात’, “जळीत’, “विषबाधा’, “हदयविकार’, “अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.

unnamed

जगात दरवर्षी पाच लाख मुलांना अंधत्व- डॉ. रमेश मूर्ती

जागतिक “डॉक्टर्स डे’ निमित्त
“बालअंधत्व’ विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन

unnamed
पुणे :

“जागतिक डॉक्टर्स डे’च्या निमित्त बाल नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांच्या वतीने “बालअंधत्व : उपचार आणि दिशा’ या विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. “एक्सिस क्लिनिक’ या नेत्रोपचार केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ.रमेश मूर्ती म्हणाले, “जगातील डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात बाल अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढत जाणारे प्रमाण ही धक्कादायक बाब आहे. जगात दरवर्षी पाच लाख मुलांना अंधत्व येते. आफ्रिका आणि एशियामध्ये 75 टक्के अंध मुले राहतात, तर भारतात 14 लाख अंध मुलांपैकी जवळ-जवळ 50 टक्के मुले योग्य वयात उपचार न झाल्याने अंधत्वाचे बळी पडले आहेत.’

बालअंधत्वाच्या उपचाराविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “बाल अंधत्व हे योग्य उपचाराने टाळता येते. नॉर्मल मुलांनाही दृष्टीदोष असू शकतो परंतु, ही बालके अंधुक दिसते किंवा दिसत नाही असे सांगू शकत नाहीत. त्यामुळे बालकाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.’

जागतिक डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

0

unnamed

पुणे :

“जागतिक डॉक्टर्स डे’ निमित्त  “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’, “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ आणि “रोटरी क्लब पुणे स्पोटर्स सिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टर्स आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ मधील कर्मचारी मिळून एकूण 143 जणांनी रक्तदान केले.

“बीव्हीजी हाऊस’ च्या मुख्य कार्यालयातील 61 कर्मचारी, “सागर कॉम्प्लेक्स’ येथील बीव्हीजी कार्यालयातील 45 कर्मचारी तसेच “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ (औंध) येथील 37 डॉक्टर्स मिळून या रक्तदान शिबीरात सहभागी झाले होते.

जिल्हा रूग्णालय रक्तपेढी (औंध),  ससून रूग्णालय रक्तपेढी (पुणे) आणि आचार्य आनंद ऋषीजी रक्तपेढी (पुणे) या रक्तपेढ्यांचा समावेश होता.

मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाच्यावतीने ‘ रोझा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न

 

1

पुणे

रमजानच्या उपवासानिमित रविवार पेठमधील तांबोळी मस्जिदच्या येथे मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाच्यावतीने रोझा इफ्तार कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष रशीद हसन खान यांनी केले होते . या कार्यक्रमात पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे , पुणे जिल्हा पालकमंत्री गिरिश बापट , खासदार वंदना चव्हाण , माजी आमदार उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , पुणे पोलिस आयुक्त के. के. पाठक , पोलिस उपायुक्त रामानंद , मकरंद रानडे , अरविंद चावेरीया , फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीषक रेखा साळुंखे , निवृत्त पोलिस अधिकारी विनोद सातव अंकुश काकडे , पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक रवींद्र माळवदकर , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड , डॉ. सतीश देसाई , मस्जिदचे प्रमुख व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

  या कार्यक्रमाचे संयोजनासाठी अफझल खान , बाबर शेख , मेहमूद हनीफ , शाहीद खान , अझहर खान , एजाज तांबोळी , शरद नरतेकर , हबीब बागवान , मज्जु पानवाले यांनी विशेष परिश्रम घेतले .

आळंदीत ज्ञानेश्‍वरी भावकथेला प्रारंभ

unnamed2

पुणे-अधिकमासात तब्बल १८ वर्षांनंतर आलेल्या ‘कोकिळव्रत’ या दुर्मिळ योगाचे महत्त्व विचारात घेऊन पुणे येथील श्रीराम गंगाधरजी परतानी व गणेश विठ्ठलदास सारडा परिवाराने आळंदी येथे अखंड श्री हरिनामसंकीर्तन महोत्सवांतर्गत श्री चांगदेव पासष्टी चिंतन व श्री ज्ञानेश्‍वरी भावकथेचे भव्य आयोजन केले. रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
माउलींच्या समाधी मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. ग्रंथदिंडीनंतर वीणापूजन, ग्रंथपूजन, देवतापूजन, भजनारंभ व संतपूजन असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर दररोज सकाळी ९ ते ११.३0 या वेळेत होणार्‍या सकाळच्या सत्रातील वारकरी संप्रदायाचे विख्यात अध्वयरूसंत वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू व सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या आळंदीतील प्रथमच होणार्‍या चांगदेव पासष्टी चिंतन मराठी भाषेतून श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळाली. तर, दुपारच्या सत्रात होणार्‍या दुपारी ३ ते सायं. ६.३0 या वेळेतील जगविख्यात भावकथा प्रवक्ते महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी गोविंदगिरीजीमहाराज यांचे ज्ञानेश्‍वरी भावकथेचे हिंदी भाषेतील निरुपण श्रवण करण्याची संधी भाविकांनी मिळाली. त्यानंतर दररोज रात्री ८ ते १0 या वेळेत वारकरी संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वश्री ह.भ.प. यशोधनमहाराज साखरे, डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर, संदीपानमहाराज शिंदे, प्रमोदमहाराज जगताप, जयवंतमहाराज बोधले, ज्ञानेश्‍वरमहाराज साधु, चैतन्यमहाराज देगलुरकर, माधवदासमहाराज राठी या महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांचे कीर्तन होणार आहे. ३ जुलैपर्यंत हा महोत्सव होणार आहे.
सनातन हिंदू धर्माच्या परंपरेच्या कालगणनेप्रमाणे साधारणत: ३0 महिन्यांनंतर येणारा हा अधिकमास म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र हा आषाढ महिना १८ वर्षांनंतर अधिक आषाढ म्हणून आला असून, या पर्वकाळात ‘कोकिळव्रता’चे विशेष महत्त्व असते. या अधिकमासात अधिकस्थ अधिकम् फलम् असल्याने आम्ही या सेवाभावी व्रतातून या महोत्सवाचे आयोजन के ल्याचे श्रीराम परतानी व गणेश सारडा यांनी सांगितले.
दिंडी प्रदक्षिणाने शुभारंभ झालेल्या या महोत्सव शुभारंभप्रसंगी मारुतीमहाराज कुर्‍हेकर, दिनकरमहाराज आंचवल, चक्रांकितमहाराज, भानुदासमहाराज देगलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

■ धर्मशाळेच्या भव्य सभागृहात हा महोत्सव सुरू असून महोत्सवात आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी जयेश कासट, अरुण भालेराव, नवनाथ काशिद, रामभाऊ पारिख, जयप्रकाश सोनी, नारायण मोहन महाराज, आदी मान्यवर अथक परिश्रम घेत आहेत.
■ हिंदू धर्म परंपरेच्या कालगणनेनुसार ३0 महिन्यांनंतर येणारा हा अधिकमास ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र हा आषाढ महिना तब्बल १८ वर्षांनंतर अधिक आषाढ म्हणून आला असून, या पर्वकाळातच ‘कोकिळ व्रता’चे विशेष महत्त्व असते.

योगा म्हणजे धर्मकांड- रशियामध्ये बंदी …

0

मॉस्को- भारताचा सच्चा मित्र अशी ओळख असलेल्या रशिया मध्ये योगा हा धर्म कांड असल्याचा ठपका ठेवीत येथे योगा  ला बंदी घातल्याचे वृत्त ‘मॉस्को टाइम्स’ने दिले आहे
या वृत्तानुसार,मध्य रशियात महापालिकेच्या दोन स्टुडिओंमध्ये हठ योगाचे प्रशिक्षण दिले जात होते. हे समजताच दोन्ही स्टुडिओच्या व्यवस्थापकांना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पत्र धाडण्यात आले. ‘योग हे एक धार्मिक कर्मकांड आहे. तो जादूटोण्याचा एक प्रकार आहे. अशा गोष्टींचा प्रचार करणं बंद करा,’ असे आदेशच त्या पत्रात देण्यात आले . या वृत्तानुसार, शारीरिक व सांस्कृतिक शिक्षण विभागाच्या प्रमुखांनाही योग शिक्षणापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रशियातील योगप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
रशियासह पाश्चात्य देशांमध्ये हठ योग विशेष लोकप्रिय आहे. जुन्या जमान्यातील रशियन अभिनेत्री इंद्रा देवी हिने भारतीय योगगुरूंकडून हठ योग शिकून घेतला होता. तेव्हापासून रशियात त्या ‘फर्स्ट लेडी ऑफ योगा’ म्हणून ओळखल्या जात होत्या. स्वत: योग शिकल्यानंतर त्यांनी अनेकांना योगाचे प्रशिक्षणही दिले होते. आंतरराष्ट्रीय योगदिनानंतर जगभरात योगाबद्दल आकर्षण वाढत असतानाच भारताचा एकेकाळचा सच्चा मित्र असलेल्या रशियात योगाला विरोध होऊ लागला आहे. ‘योग हा जादूटोण्याचा प्रकार असून तो धर्माशी संबंधित आहे,’ असे म्हणत मध्य रशियात सरकारी मालकीच्या जागा वा स्टुडिओंमध्ये योग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वाट्टेल त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार… पंकजा मुंडे

मुंबई – खरेदीच २०६ कोटीची  -२०६ कोटीचा घोटाळा कसा म्हणता ? मी एक पैशाचाही अपहार केलेला नाही तरीही वाट्टेल त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे आज महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले
राज्यातील आदिवासी भागातील मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून वाटण्यात येणा-या चिक्की व इतर काही साहित्य खरेदीच्या 206 कोटींच्या कंत्राटात पंकजा मुंडेंनी नियम धाब्यावर बसविले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. विरोधकांनी यावरून रान पेटवले. पंकजा मुंडे युरोपात फिरायला गेल्या असताना हा आरोप करण्यात आला. मागील आठ दिवस हे प्रकरण राज्यात, देशात चर्चेले जात आहे.
 मंगळवारी पहाटे पंकजा लंडनहून मुंबईत परतल्या. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार  परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्यासमवेत महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, बहिण खासदार प्रीतम मुंडे व रासपचे आमदार महादेव जानकर एवढेच  उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या , मुख्यमंत्र्यांनी दर करासासाठी ही ई टेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिलेत, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाली आहे, शिवाय, काँग्रेस सरकारच्या काळात निश्चित झालेल्या दरानुसारच ही खरेदी झाली,  माझ्यावर झालेला २०६ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे… हा केवळ शब्दांचा घोटाळा आहे ,घोटाळा शब्द वापरुन खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला… हे सारे राजकीय आरोप माझ्या प्रतिमेला मलिन करण्यासाठी केले गेलेत एकाही पैशाचा अपहार झालेला नाही… माझ्यावर केल्या गेलेल्या सगळ्या आरोपांचा मी खंडन करतेय.करासासाठीही ईटेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिलेत, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी, मार्चमध्ये झाली: ज्या विभागात दरकरार निश्चित आहेत त्यासाठी ई टेंडरिंगची गरज नसते, नवीन करारासाठी ई टेंडरिंग करावे लागते  काँग्रेस काळातल्या दरानुसार खरेदी केली… हे करार दर अगोदरपासूनच निश्चित होते मंत्री होण्यापूर्वी महिला व बालकल्याण खात्यात ४०८ कोटींची खरेदी झाली, मी २०६ कोटींची खरेदी हा घोटाळा म्हणणे अयोग्य आहे . काही लोकांना झुकतं माप दिल्याचा आरोपही खोटा आहे… राज्यात एकच दर करार असल्याने त्याच व्यक्तीला कंत्राट, काँग्रेसच्या काळातही याच व्यक्तीला कंत्राट दिलं गेलं होतं… मग, मी केलेल्या खरेदीला स्कॅम कसं म्हणायचं? रेट कॉन्ट्रॅक्टबाबत कुणालाही मागे घातलेलं नाही.मी खरेदीप्रक्रियेत कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही… मुख्यमंत्र्यांचे आदेश डावललेले नाहीत.माझ्या खात्याला मिळालेला पैसा वाया जाऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला . मी भारतात नाही हे पाहून मगच आरोप करण्यात आले.परदेशातूनही मीडियाशी संपर्क कायम ठेवला.. मुख्य सचिवांद्वारे मुख्यमंत्र्यांकडेही स्पष्टीकरण दिलंय.चिक्कीची तपासणी लॅबमध्ये करण्यात आलीय… अहमदाबाद आणि नाशिकमधील प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे… चटईंची खरेदीही आधीच्याच दराने झालीय… तरीही कुठल्याही चौकशीसाठी मी तयार खरेदीची माहिती दडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. आरोप सिद्ध असल्यास मी पदाचा राजीनामा देईन असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले

दारूच्या नशेत आणखी एका महिलेने पहाटे अडीच वाजता उडविला चहाचा स्टॉल

0
मुंबई- मुंबईत दारूच्या नशेत आणखी एका महिलेने मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजता अपघात केला. या अपघातात चहा विक्री करणारा एक स्टॉलधारक जखमी झाला आहे. निधी पारेख असे या महिलेचे नाव असून, ती फॅशन क्षेत्राशी संबंधित आहेत. रिलायन्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट (लीगल) पदावर काम करणा-या जान्हवी गडकर हिने मागील महिन्यात अशाच प्रकारे दारू पिऊन आपली ऑडी कार टॅक्सीला धडकवली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सांगितले की, निधी पारेख दारू पिऊन आपली शेवरलेट कार गाडी चालवत होती. त्यावेळी वांद्रे परिसरातील कार्टर रोडवर तिचे कारवरील नियंत्रण सुटले व गाडी फुटपाथवर गेली. तेथे कडेला एका चहा स्टॉलला धडक दिली व त्यात स्टॉलधारक चहा विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.
25 वर्षाची निधी विले पार्ले (ईस्ट) मधील एका गुजराती कॉलनीत राहते. आपल्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ती घराकडे चालली होती. वांद्रेतील कार्टर रोडवर येताच तिचे गाडीवर नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. या घटनेनंतर लोकांची तिथे गर्दी झाली. त्यामुळे घाबरून निधी पारेखने कॉरमध्ये स्वत:ला लॉक करून घेतले. काही वेळातच तेथे पोलिस पोहचले व तिला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, निधी दरवाजा उघडत नव्हती. अखेर पोलिसांनी एका स्थानिक की-मेकरच्या मदतीने तिला गाडीतून बाहेर काढले.
पोलिसांनी निधी पारेखला रात्री साडेतीनच्या सुमारास कारमधून बाहेर काढल्य़ानंतर तिला रूग्णालयात नेले. तसेच तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेथे तिच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. सोबत महिला पोलिस नसल्याने त्या रात्री निधीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात आणले व अटक केली.

दहशत पसरविण्यासाठी वाहनांची जाळपोळ – पोलीस आयुक्तांचा कयास

K-K-Pathak-IPS-MH

पुणे – सिंहगड रस्त्यावरील डॉमिनोज पिझ्झासह सनसिटी आणि नऱ्हे परिसरातील पाच सोसायट्यांमधील वाहने पेटवून देण्याचा प्रकार हा कुणा माथेफिरूचे काम नसून, हा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलीस आयुकत के. के. पाठक यांनी सांगितले.सोसायट्यांमध्ये वाहने पेटवून देणाऱ्या व्यक्‍तीची माहिती कुणाकडे असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्‍तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपर्कासाठी (पोलीस निरीक्षक बळवंत काशिद 9823066605, सहाय्यक पोलीस आयुक्‍त, 9764500100)हे क्रमांक हि त्यांनी दिले आहेत हा प्रकार नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांनी केलेला असण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, तपास युद्धपातळीवर सुरू आहे, असे पाठक यांनी सांगितले.

रविवारी (दि. 28) पहाटे सिंहगड रस्त्यावरील डॉमिनोज पिझ्झासमोरील 29 दुचाक्‍यांसह सनसिटी आणि नऱ्हे परिसरातील पाच सोसायटीतील तब्बल 92 वाहने पेटवून देण्यात आली. यामध्ये सर्वसामान्यांचे अंदाजे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेला तीन दिवस झाले तरी पुणे पोलिसांना मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास अद्याप यश आले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सर्व शक्‍यता तपासून वेगवेगळी पथके युद्धपातळीवा तपास करीत आहेत. रविवारी घटना घडल्यानंतर संशयित म्हणून परिसरातील गुन्हेगार बंटी पवारला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या खुनातील आरोपी विनोद जमदारे याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. वाहने पेटवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये असलेल्या एका सोसायटीच्या सीसीटीव्हीत असणाऱ्या संशयिताशी जमदारेचे साधर्म्य जुळत असल्याचे पाहून त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली.
जमदारे हाच या प्रकरणाचा सूत्रधार असू शकतो, अशी दाट शक्‍यता सहपोलीस आयुक्‍त सुनील रामानंद यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली. जमदारे हा कायम नशेत असतो. त्याला ड्रग्ज आणि दारूचे व्यसन असल्याने तो कायम नशेत राहतो, असे रामानंद यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र बंटी पवार आणि जमदारे यांच्यावर सोमवारी सिंहगड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यावरून जमदारे हा बंटी पवारचा साथीदार आहे, हे यावरून सिद्ध होते. दरम्यान, सिंहगड रोड परिसरात गाड्या पेटवून दिल्याप्रकरणी कुणीही आरोपी अद्याप स्पष्ट झाला नसून, अनेकांकडे चौकशी सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले. हे कृत्य कोणी माथेफिरूने केले नसून, पूर्वनियोजित कट असल्याचे सांगितले. यामुळे परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांकडे पोलिसांच्या तपासाची सूत्रे फिरली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशींचा हलगर्जीपणा- विमान दीड तास खोळंबले

0

मुंबई – मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचा व्हिसा घरीच विसरल्याने एअर इंडियाचे विमान तब्बल दीड तास रोखून धरल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जाण्याची घटना मंगळवारी  घडली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी परदेशी यांचा  हलगर्जीपणा आणि विमानाचा खोळंबा याचा ट्विट वरून साफ इन्कार केला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या शिष्टमंडळासह अमेरिकाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी त्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी हे ही आज एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेकडे जाण्यास निघाले; मात्र त्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ते अमेरिकेचा व्हिसा घरीच विसरले. परदेशी हे व्हीव्हीआयपी असल्याने एअर इंडियाचे विमान तब्बल दीड तास रोखून धरण्यात आले होते. मात्र त्यामुळे इतर सर्वसामान्य प्रवाशांचा खोळंबा केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विमानात बसण्याआधीच्या नियमाप्रमाणे परदेशी यांनी चेक-इन आणि इमिग्रेशन पूर्ण केले होते. अमेरिकेचा योग्य व्हिसा नव्या पासपोर्टवर नसल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. ही बाब बोर्डिंग पॉईंटवर कागदपत्रांची तपासणी करताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर धावपळ करत व्हॅलिड व्हिसा स्टॅम्प असलेला जुना पासपोर्ट प्रवीणसिंह परदेशी यांच्या घरून मागवण्यात आला. मात्र तोवर जवळपास एक तास उशीर झाला. त्यामुळे परदेशी विमानात चढेपर्यंत एअर इंडियाचे विमान रोखून धरण्यात आले होते.विमान उड्डाणास उशीर झाल्याच्या कारणांचे उलटसुलट दावे विविध यंत्रणांकडून करण्यात आले आहेत. पासपोर्टच्या गोंधळामुळे दहा मिनिटेच विलंब झाला; परंतु, त्यानंतर विमानास पुन्हा टेकऑफचा स्लॉट मिळण्यास वेळ गेल्याने ते उशिरा झेपावल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाईवाहतूक मंत्रालयाने दिले; तर, काही तांत्रिक कारणांमुळे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या क्लीअरन्सअभावी विमान ५७ मिनिटे उशिराने झेपावल्याचा दावा ‘एअर इंडिया’ने केला. विमानतळाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘मियाल’ने मात्र एटीसी किंवा विमानतळ यंत्रणेमुळे विमानास उशीर झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

विद्यापीठ -औंध रस्त्यावरील झाडे वाचविण्यासाठी पाहणी

पुणे :
पुणे विद्यापीठ -औंध रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापण्याच्या संदर्भात अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाबरोबर आज महापौर दत्ता धनकवडे ,खासदार अनिल शिरोळे ,पालिका  उप आयुक्त राजेंद्र जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी केली .
यावेळी पाहणी करून ,आराखडा पाहिल्यावर आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर महापौरांनी जास्तीत जास्त झाडे वाचवून बाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन दिवसात बैठक घेण्याचे जाहीर केले . तर आजही पर्यायी आराखडा तयार नसल्याबद्दल  खासदार अनिल शिरोळे यांनी उपायुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे नाराजी व्यक्त केली . शहर अभियंता विवेक खरवडकर ,श्रीनिवास बोनाला हे अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दल संस्था प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली
मंगळवारी सायंकाळी सर्वांनी पाहणी केली आणि चर्चा केली
स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका पुन्हा मांडली . झाडे कापून वाहतूक कोंडी सुटत नाही ,त्यापेक्षा सर्वकष वाहतूक आराखडा तयार करून ,औंध रस्त्यावर सिग्नल वाढविण्यासारख्या उपायांची   मागणी केली .  चुकलेल्या फ्लाय ओव्हर कडे लक्ष वेधले
सुजित पटवर्धन ,प्रशांत इनामदार ,माधवी राहिरकर ,माधवी पाटकर ,दीपक बिडकर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते

पुणे जिल्हा तेलगु मन्नॆरवारलू ज्ञातगंगा समाजाचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न

unnamed421
पुणे जिल्हा तेलगु मन्नॆरवारलू ज्ञातगंगा समाजाचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला . सोमवार पेठमधील संत घाडगे महाराज आकुल धर्मशाळेत झालेल्या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ ,उद्योगपती विलास सोमा , उद्योगपती श्रीकांत सामल , पिंपरी चिंचवड महापालिका उपमंडल अभियंता जयंत बरशेट्टी , अरुंधती बोधले , विजया मुखेडकर , वरिष्ठ पोलिस निरीषक सुधीर आस्पत ,माजी नगरसेवक मधुकर जक्कल , डॉ . सारंग सत्तूर ,उपजिल्हाअधिकारी सुहास सोमा , डॉ. राजेंद्र बोधले, डॉ.शिवाजीराव तंबाखू [ चतुर्वेदी ] आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते .
या आनंद मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम , पारंपारिक नृत्य , जादूचे प्रयोग , गुणवंत मुलांचा सत्कार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली .
 समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबियांना दत्तक घेण्याची योजना राबविणार असल्याचे समाजबांधवानी घोषित केले .

कशामुळे झाड कोसळले…?

0

पुणे सोलापूर महामार्गावरील महात्मा गांधी बसस्थानकाजवळील मोह्म्मादेवी चौकात सायकल ट्रेकमार्गावर झाड कोसळले आहे , हे कोसळलेले झाड हलविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे .