Home Blog Page 3591

मागच्या सरकारचाच पाढा मोदींनी वाचू नये -पाक बाबत उद्धव ठाकरेंचा इशारा

0

मुंबई- मागच्याच सरकारचा पाढा पुढे वाचला जाणार असेल तर काही उपयोग नाही. आपला शत्रू पाक रोज काहींना काही कुरापती काढून आपल्याला बेजार करीत आहे आणि आपण त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसने हेच केले. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे लोकांना बदल होईल अशी अपेक्षा आहे. पण तसे काही होताना दिसत नाही. मोदींकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. जशास तसे उत्तर देण्याची त्यांच्यात धमक आहे. ते त्यांनी केले पाहिजे नाहीतर लोकांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजप व मोदींनाआज  लक्ष्य केले.आज रशियात झालेल्या मोदी -शरीफ भेटीमुळे चर्चेमुळे शिवसेना नाराज असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे

मोदी -शरीफ भेट

modi-1sharif759

पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौ-यावर आहेत. तेथे आज सकाळी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. . मोदी-शरीफ यांची नियोजित 45 मिनिटांची बैठक तब्बल दीड तास चालली. यावेळी शरीफ यांनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले. मोदींनी ते निमंत्रण स्वीकारले. 2016 साली पाकिस्तानात सार्क परिषद होत आहे. या परिषदेचे व पाक भेटीचे मोदींनी शरीफ यांच्याकडून निमंत्रण स्वीकारले. दोन्ही देशांनी याचे स्वागत केले. रशियातील उफामध्ये दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळासह बैठक घेतली. किमान दिड तास ही बैठक चालली. या बैठकीत तीन प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले. भारताच्या शिष्टमंडळात अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश होता. तर पाकिस्तानच्या शिष्टमंडळात शरीफ यांचे परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ हे सहभागी झाले होते.

अपेक्षाभंग करू नका -शिवसेना

253157-uddhav
खासदार संजय राऊत यांनी मोदी-शरीफ भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तासाभरातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर निशाणा साधला.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मोदी-शरीफ भेटीवर नाराजी व्यक्त करीत मैत्रीचा हात पुढे करण्याची काँग्रेसप्रमाणेच चूक करू नका असा सल्ला दिला.ते म्हणाले  पाकिस्तान देश आपल्या सीमेवरील जवानांना रोज मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. पहिल्यासरकार प्रमाणेचआताही तेच घडत आहे. मात्र, मोदींत जशास तसे उत्तर देण्याची धमक आहे, ते त्यांनी दिले पाहिजे असे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले .

पॅराडाईमची आंतरराष्ट्रीय पुरस्कारात पॅरिस मध्ये बाजी

0

पुणे :- पॅराडाईम कन्स्ट्रकशन कंपनी प्रा. लि.ला ‘इंटरनॅशनल स्टार फॉर लीडरशिप इन क्वालिटी

२०१५’ या पुरस्काराने पॅरिस येथे झालेल्या अधिवेशनात नुकतेच सन्मानित करण्यात आले.

बिझनेस इनिशीएटिव डायरेक्शन्स (बी.आय.डी)यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय

संचालक अजय कंग्राळकर यांना देण्यात आला.

इंटरनॅशनल स्टार फॉर लीडरशिप इन क्वालिटी कन्व्हेन्शन पॅरिस २०१५ हा बी.आय.डीच्या

पुरस्कार सोहळ्यातील वार्षिक कार्यक्रमाचा भाग होता. ह्या पुरस्काराची रचना जगासमोर

उल्लेखनीय काम करणार्‍या कंपन्या, संस्था तसेच उद्योजक यांच्या कर्तुत्वाला दाद देण्यासाठी

केली आहे. कौशल्यप्रधान व्यवसायिकांची निवड,काम करण्याच्या प्रक्रियेतील समन्वय, बांधकाम

करताना पाळली जाणारी प्रमाणबध्दता, कडक नियमांचे पालन,कामाच्या सर्व स्तरांवरील गुणवत्ता

तपासणी यासर्व अवघड निकषांच्या आधारावर पॅराडाईमला सन्मानित करण्यात आले.

कंग्राळकर म्हणाले, ह्या पुरस्कारासाठीची निवड अतिशय पारदर्शक पद्धतीने विविध क्षेत्रातील

जागतिक अग्रगण्य व्यावसायिकांच्या निवड समितीने केली आहे. यासाठी अत्यंत कठीण मतदान

प्रक्रियेतून विजेत्यास हा सन्मान प्राप्त झाला असल्यामुळे हा पुरस्कार घेताना अतिशय आनंद

होत आहे.

बी.आय.डीविषयी …

बिझनेस इनिशीएटिव डायरेक्शन्स (बी.आय.डी)च्या माध्यमातून विविध क्षेत्रात यशस्वीरीत्या

काम करणार्‍या कंपनींना कौतुकाची थाप दिली जाते.

पालखी मार्गावर ‘डायल 108’ च्या एकूण 30 रूग्णवाहिका वारकर्‍यांच्या सेवेत तैनात

0

 

पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’च्या  एकूण 30 रुग्णवाहिका  वारकर्‍यांच्या सेवेत तैनात करण्यात आल्या आहेत. यातील 2 रूग्णवाहिका ज्ञानेश्‍वर महाराज पालखी बरोबर तसेच 2 रूग्णवाहिका तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर जाणार आहेत, उर्वरीत 26 रूग्णवाहिका पालखी मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
‘गोल्डन अवर्स’ मध्ये तातडीचे उपचार देणार्‍या ‘डायल 108’ च्या रुग्णवाहिका सुरूवातीपासून शेवटपर्यंत सतत पालखीबरोबर राहणार आहेत. पालखीबरोबर वारकर्‍यांना आरोग्य सुविधा तसेच पालखी मार्गावर तातडीचे वैद्यकिय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
मागील वर्षी ‘डायल 108’ या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या 56 रुग्णवाहिकांनी तब्बल 29,972 वारकर्‍यांची सेवा केली. वारी मार्ग आणि पंढरपूर येथे 56 अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेल्या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. दरवर्षी साधारण 25 ते 30 वारकर्‍यांचा मृत्यू विविध कारणांनी वारीदरम्यान होतो. मागील वर्षी हे प्रमाण डायल 108 रूग्णवाहिका सेवेमुळे  सहापर्यंत खाली आणण्यात यश आले होते.
पालखी मार्गावर कोणतीही आपत्कालिन वैद्यकीय मदत लागली तर सुसज्ज रुग्णवाहिका 108 क्रमांक डायल केल्यावर उपलब्ध असतील. त्यात व्हेंटीलेटर (कृत्रिम श्‍वसन) अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही या रुग्णवाहिकेत असणार आहेत. पुणे ते पंढरपूर मार्गावर ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल त्याठिकाणी काही अ‍ॅम्ब्युलन्स सेवेत राहणार आहेत.  ही सेवा विनामूल्य असणार आहे, मात्र रुग्णालयातून घरी सोडणे, अथवा खासगी रुग्णालयात दाखल होणे यासाठी ही रुग्णवाहिका सेवा देता येत नाही. रूग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्यास नजीकच्या सरकारी रूग्णालयात या डायल 108 रूग्णवाहिकांच्या मार्फत दाखल करण्यात येते.
26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. ‘अपघात’, ‘जळीत’, ‘विषबाधा’, ‘हदयविकार’, ‘अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.

संत तुकोबांची पालखी पिंपरी चिंचवड मध्ये दाखल …

11707724_879606155463481_7427503358815833567_n

पुणे-जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजल्यानंतर पिंपवड उद्योगनगरीत दाखल झाला. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष अन्‌ उत्साहात भागवत धर्माची पताका उंचवत एक दिवसाच्या मुक्कामासाठी आलेल्या वैष्णवांमुळे सारा परिसर भक्तीरसात न्हावून निघाले आहे. 

 पालखी सोहळ्याने काल आजोळघरी, इनामदार वाड्यात मुक्काम केला. आज सकाळी सव्वा आकाराच्या सुमारास तेथून तो पिंपवड कडे ऊन-पावसाच्या पाठशिवणीचा खेळ आणि अधुन-मधून वरुण राजाचा शिडकावा  झेलत हा पालखी सोहळा सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाला. देहूरोडकडून निगडीच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना मावळतीच्या सूर्य किरणांनी चकाकणारा चंदेरी पालखी रथ नजरेस पडताच सर्वाच्या नजरा त्याच दिशेने वळाल्या. गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळावर केशरीगंध लावलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या  नाक्‍याजवळ येताच आबालवृद्ध भाविकांचा उत्साह दुणावला. “ग्यानबा-तुकाराम”चा एकच जयघोष झाला.  पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. पालखी रथ जवळ येताच नागरिक दर्शनासाठी पुढे सरसावले.
भक्ती-शक्ती चौकापासून दुपारी अडीच वाजल्यापासून वारकरी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. पालखीच्या मागे आणि पुढे मिळून 326 दिंड्या होत्या. सर्वात पुढे सनईचौघडा, नंतर तुकोबांच्या पालखीचे अश्व, मागे फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथातील महाराजांच्या पादुकांची पालखी, त्यानंतर जगनाडे महाराज, गवरशेठ लिंगायत वाणी पालखी असा लवाजमा होता.हा भक्तीचा अनोखा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी निगडी चौकात पिंपरी-चिंचवडवासीयांची अलोट गर्दी लोटली होती. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना सतरंजी देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी  आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे आदी उपस्थित होते

अखेर मंडई गणपतीचे दागिने परत मिळाले… वडिलांचा प्रामाणिकपणा…अखेर आरोपीही गजाआड

पुणे -अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन मंदिरातून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज आज सकाळी एका दुर्दैवी वडिलांनी   कोथरूड पोलीस ठाण्यात आणून जमा केला . देवाच्या मूर्तीच्या अंगावरील दागिने चोरून नेणारा  आरोपी विजय  कुंडले मात्र  यावेळी फरार झाला . त्याच्या वडिलांनी पोलिसात हे दागिने आणून दिल्यानंतर  पोलिसांनी दुपारी त्याला पुणे न्यायालय परिसरात नळाच्या तोट्या चोरताना पकडले . दारू-गांजा यांच्या नशेत त्याने दागिन्यांची चोरी केल्याचे सांगण्यात येते
मंडई परिसरात असलेल्या शारदा गजानन मंदिरात बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास चोरी झाली होती. मूर्तीवरील सुमारे ४३ लाख ४८ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असतानाही, हा प्रकार घडल्यानं अधिकच खळबळ उडाली होती. सुदैवानं, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी बंदिस्त झाली होती. त्या आधारे पोलिसांनी चोरट्याचं रेखाचित्रही जारी केलं होतं. या प्रकरणी मंदिराचे पुरोहित श्रीपाद कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता.
कोथरूडला राहणारे कुंडले यांनी गणपतीची सर्व आभूषणे कोथरूड पोलीस ठाण्यात जाऊन जमा केली. त्यांच्या मुलानं, विजय कुंडलेनं ही चोरी केल्याचं त्यातून उघड झालं.

आरोपी कुंडले
आरोपी कुंडले

धर्म निरपेक्ष पक्षांना पुन्हा एकत्र आणणार ?

नवी दिल्ली – लोकसभेत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि त्यानंतर भाजप सरकारची मोदी यांच्या  नेतृत्वाखाली सुरु असलेली वाटचाल एकीकडे पाहत ,दुसरीकडे काँग्रेसच्या दारूण पराभवाबाबत  सोनिया आणि राहुल गांधी यांचे आत्मपरीक्षण करणे जवळ जवळ पूर्ण झाले असले तरी आतापर्यंतच्या सरकारच्या कार्कीर्दीवरून आडाखे बांधीत सोनिया आणि राहुल पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष पक्षांची जोरदार माळ बांधण्याची तयारी सुरु करतील असा राजकीय समीक्षकांचा व्होरा आहे . तत्पूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांच्या कारकिर्दीतील त्यांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेणे गरजेचे आहे असाही त्यांना सल्ला देण्याची गरज समीक्षकांना वाटते आहे
समीक्षकांच्या चर्चेला कारणही तसेच घडले आहे   काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी रमझाननिमित्त ‘इफ्तार’ची दावत देणार असल्याचे वृत्त आहे  भाजपविरोधकांना विशेषत: देशातील सर्व प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांना या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. १३ जुलै रोजी हि  दावत आहे
सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी पत्रं पाठवली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी जनता परिवारातील पक्षांसह बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, अण्णा द्रमुकसह डाव्या पक्षांनाही निमंत्रण दिले आहे. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधीही या इफ्तारमध्ये सहभागी होणार आहेत.
अनेक नेत्यांनी सोनियांच्या ‘इफ्तार’चे निमंत्रण मिळाल्याचे मान्य केलं आहे. असे समजते  मोदी सरकार ने जनतेला ज्या आश्वासनांना बळी पाडले ती पूर्ण न करता  अन्य बाबीत जनतेला झुलवत ठेवले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ची धर्मनिरपेक्ष देश अशी प्रतिमा पुसली जावू लागली तर आपण एकत्र येवून खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे असे आवाहन सोनिया यावेळी करतील काय? असा प्रश्न हि विचारला जातो आहे

अफवा पसरवू नका – सलमान चे आवाहन

बजरंगी भाईजान बद्दल कोणीही अफवा पसरवू नये असे सलमान खान ला वाटते आहे . यासाठी म्हणून त्याने आज पोलिसात तक्रार हि दिली आहे . खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मित्र असा हि परिचय असलेल्या सलमान ला उगाचच कोणी अडचणीत हि आणू नये असेही सांगितले जाते अर्थात आता मोदींनाही सलमान बद्दल कळवळा असण्याचे कारण नाही म्हणा-मोदींच्या भेट प्रकरणातून त्याला मुस्लीमांपासून तोडण्याचा प्रयत्न झालेले विसरता येणार नाही.आता मुद्दा हा आहे कि ,आपल्‍या आगामी चित्रपटाविषयी काही जण उगाचच अफवा पसरवून आपल्या चाहत्‍यांमध्‍ये फुट पडण्याचा प्रयत्न करीतअसल्‍याचा आरोप सलमान खान ने  केल्याचे वृत्त आहे. शिवाय या प्रकरणी थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली.आपले चाहते हे सर्वच धर्मातील नागरिक  आहेत .‘‘ एमआयएमचे नेते ओवैसी आणि त्यांच्या कट्टर  समर्थकांच्या  समर्थनाशिवाय ‘बजरंगी भाईजान‘ हा आगामी चित्रपट हिट होईल असे तो सांगतो आहे , आणि या चित्रपटाचे ‘खान भाईजान‘ हे नाव बदलून ‘बजरंगी भाईजान‘ ठेवण्यात आले, असे वक्‍तव्‍य आपण केल्‍याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे’’, असा आरोप त्‍याने तक्रारीत  केला.  या तक्रारीची चौकशी सुरू असल्‍याची माहिती पोलिस प्रवक्ते तथा उपायुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी यांनीदिल्याचे वृत्त आहे .

उच्चपदावर जाण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज : महादेव बाबर

पुणे-विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत पास झालो म्हणून हुरळून न जाता देशाची, समाजाची सेवा करण्यासाठी उच्चपदावर जावे . मात्र त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज लागते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करा, असे आवाहन हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी हडपसरमधील प्रभाग ४५ काळेपडळ, महंमदवाडी येथे काढले. गुणवंतांचा सत्कार व मोफत गरजू यांना शालेय साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकमाचे आयोजन लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग भानगिरे यांनी केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी महादेव बाबर म्हणाले की, जयसिंग भानगिरे यांचे कार्य अनेक बाबतीत सरस आहे आणि समाजहिताचे आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. प्रतिष्ठानच्या वतीने २५००  गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. १०वी, १२ वी च्या १५० गुणवंतांचा सत्कार यावेळी झाला. या कार्यक्रमाला प्रा. भोंग, प्रभाकर कदम, सुरेश हडदरे, वैशाली काळे, कविता पाटील, योगेश गवळी, अमित गायकवाड, नितीन गावडे, विकास आखाडे, रोहन काळे, विशाल पाचपुते उपस्थित होते.

पालखी सोहळ्यानिमित्त PMPL च्या जादा बसेस-आळंदीसाठी 65 तर देहूसाठी 20 बसेस

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगत्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तीर्थक्षेत्र आळंदीसाठी 65 तर देहूसाठी वीस बसेस मार्गावर धावण्यात येणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी या मार्गासाठी बारा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
पालखी सोहळ्यानिमित्त शहर, उपनगराबरोबरच गावोगावाहून आळंदी आणि देहू येथे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडून दरवर्षी जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. यंदाही आळंदीसाठी स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड येथून बसेस सोडण्यात येणार आहेत. नऊ जुलैपर्यंत नियमित आणि जादा अशा एकूण 65 बसेस मार्गावर धावतील. तर देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा बवन, निगडी या ठिकाणावरून जादा आणि नियमित मिळून वीस बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय दहा जुलै रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार असल्यामुळे पहाटे तीनपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा भवन येथून जादा 32 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियमित संचलनात असणाऱ्या बसेस या सकाळी साडे पाचपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थकावरून मार्गस्थ होणार आहे.
पालखीदरम्यान बोपदेव घाटमार्गे वाहतूक
पालखीच्या हडपसर मुक्कामावेळी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बस व्यवस्था करण्यात आली आहे. कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर तसेच वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पालखी दरम्यान दिवे घाट बंद राहणार असल्यामुळे दिवेघाटाऐवजी बोपदेव घाटमार्गे वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर येथून साठ जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

भोजन निधीची १५६ कोटींची फाईल फेटाळली -बालगृहातील अनाथ बालकांची उपासमार अटळ !

0

‘महिला-बालविकास’कडे १८५ कोटीचा अखर्चित निधी पडून  

                   पुणे  : पावसाळी अधिवेशनात सादर करावयाची अनाथ बालकांच्या थकीत भोजन अनुदानाची १५६ कोटी रुपयांची फाईल महिला व बालविकास विभागाच्या बौद्धिक दिवाळखोरीमुळे नियोजन विभागाने नामंजूर करून माघारी पाठवल्याने राज्यातील ७० हजार बालकांची उपासमार अटळ असून बालगृहांच्या अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उरल्या-सुरल्या आशा मावळल्या आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष,रवींद्रकुमार जाधव यांनी दिली
यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि  ,सन २०१२-१३ पासून राज्यातील अनाथ,निराश्रित बालकांचे संगोपन करणारया बालगृहांचे सुमारे १५६ कोटी रुपयांचे भोजन अनुदान थकीत आहे,ते मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य  बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेतर्फे मे महिन्यात आयुक्तालयावर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले.थकीत अनुदानापैकी आयुक्तालयस्तरावर आलेला १० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आणि पावसाळी अधिवेशनात १५६ कोटीची पुरवणी मागणी सादर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याने संघटनेने आंदोलन मागे घेतले. दरम्यान,मंजूर १० कोटीतून ३५ जिल्ह्यातील ७०३ बालगृहाना प्रत्येकी ७० ते ८० हजार इतके अत्यल्प अनुदान आले,मात्र तेही वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ नसल्याने कोषागारात अडकले.

               या पत्रकात असेही पुढे म्हटले आहे कि  .’   एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे दि. १८ जूनला महिला व बालविकास विभागाने घाईघाईत संघटनेचे समाधान करण्यासाठी समर्पक अभिप्राय न लिहिता थातुरमातुर संधिग्ध शेरेबाजी करून बालगृहाच्या भोजन अनुदानाची १५६ कोटीची फाईल नियोजन विभागाला सादर केली.सकृत दर्शनी या फाईल मधील निधी मागणीची मांडणीच मुळी चुकीची व अस्पष्ट असल्याने ‘नियोजन’ने महिला व बालविकास विभागाच्या बौद्धिक दिवाळखोरीचे वाभाडे काढत प्रकरण क्रमांक १५६/१५/कार्यासन ८/१५ ही अनाथ बालकांच्या भोजन अनुदानाच्या पुरवणी मागणीची १५६ कोटी रुपयांची फाईल दि.२९ जूनला विभागाला परत पाठवली.
                  दरम्यान,आजमितीला महिला व बालविकास विभागाच्या अन्य विविध शीर्षावरील सुमारे १८५ कोटीचा अखर्चित निधी पडून आहे. या अखर्चित निधीतून किमान ५० ते ६० कोटी रुपये भोजन निधीसाठी वळते करून पुरवणी मागणी मंजुर करा, असा स्वयंस्पष्ट अभिप्राय विभागाने लिहिला असता,तर निश्चितपणे नियोजन विभागाने सकारात्मक निर्णय घेतला असता,मात्र बालग्रहांच्या मुळावर उठलेली महिला व बालविकास विभागातील प्रशासकीय यंत्रणा अनाथ बालकांसाठी दोन चांगले शब्द लिहिण्यात कचरते म्हटल्यावर ते या प्रश्नावर किती गंभिर आहेत,हे स्पष्ट होते.
  नियोजन विभागाने १५६ कोटीची  फाईल माघारी पाठवल्यावर महाराष्ट्र राज्य  बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सुरेश वाघमारे आणि श्रीमंत धुमाळ यांनी याप्रकरणी महिला व बालविकास विभागाचे उप सचिव ब. भा. चव्हाण यांची याप्रकरणी भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवीचीउत्तरे दिली

“स्फूर्ती महिला मंडळ’ आणि “समाज विकास विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने समूह संघटीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

120 महिलांनी घेतला शिबिराचा लाभ

पुणे :

“स्फूर्ती महिला मंडळ’ आणि “समाज विकास विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने समूहसंघटीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी  शिबिराचे आज बुधवार दिनांक 8 जुलै रोजी स्माईल कार्यालय, लोकमान्यनगर येथे आयोजित करण्यात आले होते. स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार, ऍड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात 80 समूहसंघटिका आणि वस्तीतील 40 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर , आस्था ब्रेस्ट कॅन्सर सेंटर आणि माधवबाग यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका मध्ये समूहसंघटिका म्हणून वस्ती पातळीवर तळागाळातील महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या मध्ये “हार्टरेट’ तपासणी, रक्तदाब तपासणी, ई.सी.जी. व आहारविषयक सल्ला. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर व आस्था ब्रेस्ट कॅन्सर सेंटर यांच्यावतीने बेस्ट कन्सरची पूर्व तपासणी केली गेली. या शिबिराचे संयोजन प्रदीप्ता कुलकर्णी यांनी केले.

हनुमंत नाझीरकर (मुख्य समाज विकास अधिकारी, पुणे मनपा), उपप्रकल्प अधिकारी मंजुषा कणकुरीकर आणि सुनिल साळवी, संगीता बेलवलकर आदी यावेळी होते. माधवबागचे डॉ. माधवी सागडे, डॉ. प्रिया जगताप, डॉ. संगित गावकरे, सुजीत रासकर (पुणे विभागीय आरोग्य अधिकारी), नितीन सोनुणे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील अडचणी सोडविण्याची मागणी

a2a3

पुणे :

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’च्या “साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने प्रभाग क्रमांक 35 (कर्वेनगर) येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील विविध अडचणी सोडविण्याच्या मागणीचे पत्रक उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, वृक्ष अधिकारी मोहन ढेरे यांना देण्यात आले. हे पत्रक नागरिकांच्यावतीने “राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’च्या “साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीनेविभागाचे पुणे शहराध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर यांनी सादर केले.

या पत्रकात केलेल्या मागणीनूसार डॉ. शामाप्रसाद उद्यानात दररोज येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना येणाऱ्या अडचणी खालीलप्रमाणे.

1) डासांचे प्रमाण वाढले तरीही उद्यानात धूरफवारणी करण्यात येत नाही,
2) उद्यानात सकाळी संगीत चालू असायचे ते गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे ते सुरू करण्यात यावे,
3) उद्यानात पॅगोडाछत्री, बसण्याची बाक, व व्यायामाची सायकल याची सुविधा करणे,
4) उद्यानातील म्युझिक सिस्टीमचे साऊंड तुटलेल्या अवस्थेत आहे,
5) कारंज्यातील दिवे उद्यानाच्या उद्‌घाटनानंतर लगेचच 2 दिवसात बंद पडले.

“ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि “जाणीव सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने”तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’

पुणे:
“ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि “जाणीव सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आगमन होणाऱ्या तुकाराम आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात जनजागृती करण्यासाठी “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ शुक्रवार 10 जुलै 2015 रोजी दुपारी 2.30 वाजता वाकडेवाडी येथून आयोजित केला आहे. ही दिंडी माउलींच्या पालख्यांच्या आगमनापूर्वी काढण्यात येणार आहे, अशी माहिती  “ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’च्या वतीने डॉ. सायली कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आणि जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने मधूकर बिबवे, राजेंद्र शेलार, प्रमोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात आगमन होणाऱ्या तुकाराम आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांसमवेत  “ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि “जाणीव सामाजिक संस्था’ या दोन्ही संस्थंातर्फे जनजागृतीसाठी “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ काढण्यात येणार आहे.पालखी वाकडेवाडी ते अलका चौक या मार्गे जाणार आहे. या दिंडी मध्ये 300 ते 350 विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ याविषयी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात येणार आहेत.

या पालखी सोहळ्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रातिनिधीक स्वरुपाची होळी करण्यात येणार आहे. तंबाखूमक्तीची ही पताका आपल्या महाराष्ट्रात उंचविणतयासाठी आणि तंबाखू मुक्त महाराष्ट्रासाठी या उपक्रमात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे.

यावर्षी ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अभियानाच्या पुढील टप्यात “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियानाचे “ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका “जय मल्हार’ मधील खंडोबा ची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे आणि स्टार प्रवाह वरील “पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ची भूमिका करणारी कलाकार जुई गडकरी हे या अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देहूतून तुकोबांना निरोप देत पावसाच्या सरीवर सरी….

0

Dehu02

पुणे – देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी सभागृहाबाहेर बाहेर पडताच आज (बुधवारी) दुपारी 4 वाजताच्‍या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे वारकरी सुखावले.

विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागलेले असंख्य वारकरी देहूमध्ये कालपासूनच दाखल झाले होते. संत तुकारामांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा झाली.यावेळी हर्षवर्धन पाटील, महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, बबन पाचपुते, माजी नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक नारायण भेलवाडे, चंद्रशेखर अहिरराव आदी उपस्थित होते.पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन दिलीप देहूकर यांनी सकाळी केले. यंदा पाद्यपूजेतचा मान ज्येष्ठ वारकरी सूर्यभान पांडुरंग बोंबले यांना मिळाला होता. संपूर्ण देहूनगरी भक्तीरसात बुडाली असून विठ्ठलाच्या गजराने आसमंत दुमदुमला .मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिकाबेराबच शेतक-यांचे चेहरीही सुकून गेले होते. दरम्‍यान,  आज (बुधवार) देहू येथून संत तुकोबांची पालखी आळंदीकडे रवाना झाली. पालखीच्‍या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखी गावाबाहेर पडताच जणू वरुण राजानेच तुकोबांना निरोप देत सरीवर सरी बरसवल्‍या. त्‍यामुळे आनंदाला पारावार उरला नाही. ही पालखी इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावणार आहे. पालखीच्या प्रस्थानाचे विधी पहाटे साडेचारपासून सुरू झाले. वारीच्या ओढीने लक्षावधी वारक-यांचा मेळा देहू-आळंदीत भरला होता

सासूच्या खोटेपणावर सुनेच्या खरेपणाची मात ‘नांदा सौख्य भरे’ झी मराठीची नवी मालिका २० जुलैपासून सायं. ७.३० वा.

1a1b

आपल्याकडे प्रत्येक नात्यासोबत त्याचा स्वभावगुण सांगणारं एखादं विशेषण जोडलेलंच असतं.. जसं की आई मुलाचं नातं मायेचं, नवरा बायकोचं नातं प्रेमाचं, भाऊ बहिणीचं नातं जिव्हाळ्याचं आणि सासू सुनेचं नातं ? या नात्याला कोणतं विशेषण लावता येईल ? प्रेमाचं नातं की दुस्वासाचं ? सोबतीचं की कुरघोडीचं ? सासू सुनेच्या नात्याला मुळातच एक वादाची किनार असते ती कधी पुसटशी असते तर कधी अधिक गडद किंबहुना ती किनारच या नात्यामध्ये खरी गंमत आणते. अशीच एक सासू सुनेची जोडी आहे ललिता आणि स्वानंदीची. दोघीही परस्परभिन्न स्वभावाच्या. ललिताची प्रत्येक गोष्ट दांभिकतेवर आधारलेली तर खरेपणा हा स्वानंदीचा पाया. बडेजाव हा ललिताचा स्वभाव तर साधेपणा हे स्वानंदीचं वैशिष्ट्य. अशा या दोन विरूद्ध टोकाच्या बायका एकाच घरात एकत्र येतात तेव्हा त्या घरात घडणा-या घटना या तेवढ्याच रंजक असतील.  या सासू सुनेची आणि घराची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘नांदा सौख्य भरे’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतून. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेली ही मालिका येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी  ७.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत असून यात सुहास परांजपे (ललिता), ऋतुजा बागवे (स्वानंदी) आणि चिन्मय उदगिरकर (नील) मुख्य भूमिकेत दिसतील.

‘नांदा सौख्य भरे’ ही कथा आहे देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबियांची. कधी काळी आपल्या पूर्वजांकडे असलेलं ऐश्वर्य आणि जमिन जुमला पुढच्या पिढीच्या नाकर्तेपणामुळे गमावून बसलेलं जहागिरदार कुटुंब. पण अजूनही डोक्यात आणि स्वभावात तीच मिजास कायम असलेलं. विशेषतः ललिता अजूनही त्याच खोट्या रुबाबात वावरत स्वतःचं खोटं वैभव मिरवतेय. हा खोटेपणा जणू तिच्या जगण्याचाच भाग बनलाय. तिचा मुलगा नील परदेशात शिकून भारतात आलाय. त्याच्या वधू संशोधनाची जबाबदारी ललिताने वच्छी आत्याकडे दिलीये. दुसरीकडे देशपांडे कुटुंब अतिशय इमानदार आणि साधं सरळ. आयकर विभागात मोठ्या पदावर असलेले देशपांडे अतिशय प्रामाणिक अधिकारी. एकत्र कुटुंबात आपल्या प्राध्यापक भावासोबत राहतात. देशपांडेंना संपदा आणि स्वानंदी अशा दोन मुली. संपदाची स्वप्नं या कुटुंबापेक्षा खूप वेगळी. तिला हे मध्यमवर्गीय जगणं आवडत नाही तर स्वानंदी अगदी आपल्या वडिलांसारखी. तत्वनिष्ठ आणि कायम खरं बोलणारी. जिला स्वतःला खोटं बोलायला आवडत नाही आणि इतरांचा खोटेपणाही जी खपवून घेत नाही. या स्वानंदीसाठी विवाहाचा प्रस्ताव येतो तो जहागिरदार कुटुंबातून आणि यासाठी कारणीभूत ठरते वच्छी आत्या. ललिताकडे नीलच्या लग्नासाठी अनेक प्रस्ताव घेऊन गेलेल्या वच्छी आत्याचा ललिताबाई प्रचंड अपमान करतात. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि ललिताबाईच्या खोट्या वैभवाची मिजास उतरविण्यासाठी वच्छी आत्या नियोजित पद्धतीने स्वानंदीचं स्थळ ललिताबाईकडे नेते. ललिताही स्वानंदीसाठी पसंती देते आणि इथूनच सुरुवात होते ते खोटेपणाच्या चालीवर खरेपणाने केलेल्या विजयी खेळीची.

अतिशय रंगतदार विषय आणि तेवढ्याच रंगतदार पात्राने  ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेची गोष्ट सजलेली आहे. मालिकेत ललिताच्या भूमिकेत सुहास परांजपे, वच्छी आत्याच्या भूमिकेत वर्षा दांदळे, नीलच्या भूमिकेत चिन्मय उदगिरकर तर स्वानंदीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे ही नवोदित अभिनेत्री आहे. मालिकेची कथा संपदा जोगळेकर यांची असून पटकथा अर्चना जोशी यांची आणि संवाद मिथिला सुभाष यांचे आहेत. मालिकेचं दिग्दर्शन वैभव चिंचाळकरने केलंय. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. आजवर मानवी नातेसंबंधावर आणि कौटुंबिक जिव्हाळ्यावर सकारात्मक भाष्य करणा-या झी मराठीच्या मालिकांच्या ताफ्यात ‘नांदा सौख्य भरे’ दाखल होत आहे. येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी  ७.३० वा. ही मालिका प्रसारित होणार आहे.