Home Blog Page 3587

कन्नड तरुणी -मराठी तरुणाची प्रेमकहाणी २४ जुलै ला ” कॅरीऑन मराठा ‘

0

mail.google.com

‘हद्द बघितलीस – आता जिद्द बघ’ अशी जबरदस्त कॅच लाईन असलेला आणि पोस्टरपासूनच स्वतः च वेगळ अस्तित्व सांगणारा ‘ कॅरीऑन मराठा ‘हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रासोबतकर्नाटकातील काही भागात प्रदर्शित होत आहे.
या सिनेमातून प्रथमच नायक म्हणून गश्मीर महाजनी हा मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. आकर्षक व पिळदार शरीरयष्टी, दमदार अभिनय, नृत्यामध्ये पारंगत असणारा हा अभिनेता, सिनेसृष्टीतील अतिशय नावाजलेला व देखणा अभिनेता रविंद्र महाजनीयांचा सुपुत्र आहे. एक जबरदस्तअक्शन ट्रीट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल. . कुशल – मोझेस यांनी चित्रपटाच्या नावाला साजेशाजबरदस्त अक्शन दिलेल्या आहेत. व गश्मीरने त्या अतिशय समर्थपणेपेलल्या आहेत. मराठी हिंदी चित्रपटातील नव्या जुन्या व दमदार कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याउंचीवर नेले आहे. या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणारी ‘कुसुम’ अर्थात कश्मीरा कुळकर्णी हिने कानडी मुलीची भूमिका साकारली आहे. यापूर्वी कश्मीराने दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहे. पण या चित्रपटातून तिच्या रूपानेही मराठीला एक नवा अभिनय संपन्न चेहरा लाभतो आहे असे म्हटले जाते . या चित्रपटाच्या प्रोमोने गाश्मीर आणि कश्मीरा या नव्या जोडी बद्दल मोठी अपेक्षा निर्माण होऊ पाहते आहे

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असतानाच त्याच पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नायक व नायिका यांच्या प्रेमकथेवरआधारित चित्रपटाची कथा आहे. दिग्दर्शक संजय लोंढे यांना सुचलेल्या कथेवर ऋषीकेश कोळी यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. याचित्रपटातील कानडी संवाद हे बेळगावातील सुप्रसिद्ध लेखक वनाटककार डॉ. डी. एस. चौघुले यांनी लिहिले आहेत.

या चित्रपटाला संगीतकार शैल- प्रीतेश या जोडीने संगीत दिले आहे. संगीतकार शैल-प्रीतेश यांनी अस्सल या मातीतले संगीत देऊन पुन्हाएकदा मराठी संगीताला चांगले दिवस येतील या आशा पल्लवीत केल्याआहेत. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी सिनेमासाठी गीते लिहिली असूनशैल आणि प्रीतेश यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजाचा स्वरसाज सिनेमाला चढला आहे. उर्मिला धनगर यांनीगायलेले एक गाणे तर संपूर्ण कानडी भाषेत आहे.
या चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे या चित्रपटाकरिताहिंदीतील प्रथितयश नृत्य दिग्दर्शक राजू खान, सुजीत कुमार,आदिलशेख, यांनी केलेलं नृत्यदिग्दर्शन. या चित्रपटातअरुण नलावडे, देविका दफ्तरदार, शंतनू मोघे, उषा नाईक, ओंकारकुळकर्णी, समीर खांडेकर, अमिन व करीम हाजी, अमेय कुंभार व कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांच्या भूमिकाआहेत. चित्रपटाच्याविषयाला अनुसरून या चित्रपटात बऱ्याच अंशी कानडी भाषेचा वापर केलेला आहे.
नंदा आर्ट्सच्या चंद्रभान ठाकूर व वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या शशिकला क्षीरसागर यानिर्मिती संस्थांनी एकत्रितरीत्या निर्मिती केलेला व संजय लोंढे यांनीदिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असून एखाद्या नवख्या क्रिकेटरनेपहिल्याच चेंडूवर सिक्सर मारावा असे काहीसे या चित्रपटाचे झालेआहे. पहिल्याच प्रयत्नात एक अतिशय देखणा दर्जेदार व मनोरंजकअसा हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे.

मराठी सिनेसृष्टीत गश्मीर महाजनी चे आगमन

0

 कुणी माझ्या मनात लपलंय ग … हे गाणे अजूनही मराठी रसिकांच्या मनात लपलेले आहेच , रंजना -रवींद्र महाजनी यांची मराठीत गाजलेली जोडी अनेकांना ठावूक आहेच.  1280x720-DAp 1280x720-JE5

दादा कोंडके , लक्ष्मीकांत बेर्डे या वेगळ्या मराठमोळ्या नायकांच्या अगदी अपोझिट अशा व्यक्तिरेखा -भूमिका साकारून चंद्रकांत , सुर्यकांत ,अरुण सरनाईक आणि … रवींद्र महाजनी यांनी मराठी सिनेसृष्टीतआपले वेगळे स्थान निर्माण केले . मराठीला देखणा – HI MAN रवींद्र महाजानिंच्या रूपाने मिळाला असे हि म्हटले जात .

5
‘कॅरी ऑन मराठा’ मध्ये गश्मीर महाजनी

आता थोडीफार तशीच अवस्था आहे . मराठीत अनेक तरुण चेहरे आहेत पण अजून हव्या तशा HI MAN ची एन्ट्री झाल्याचे प्रेक्षकांना भावत नाही असा काहीसा सूर आहेच अशा स्थिती आलेला गश्मीर , आपल्या वडिलांशी तुलना नको म्हन्तोय खरा . पण त्यांने नसिरुद्दीन शहा कडून घेतलेले प्रशिक्षण , घरात घेतलेले नृत्याचे धडे , आणि स्वतःच्या फिल्मी करियर बाबत तो दाखवीत असलेला बेफिकीरपणा … आणि एकंदरीत त्याची फिल्मी दुनियेत झालेली एन्ट्री पाहता नवा नायक आता स्पर्धेत उतरला आहे असे म्हणायला हरकत नाही कॅरी ऑन मराठा हा त्याचा पहिला सिनेमा २४ जुलै ला प्रदर्शित होतो आहे तर दुसरा देऊळबंद त्यानंतर येतो आहे .  गश्मीर चे कौशल्य आणि मेहनत आणि नशीब मराठी सिनेसृष्टीत कसे आणि किती झळकणार आहे हे समजायला आता फारसा उशीर लागणार नाही .

‘नच बलिये ‘ अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा विजेते

0
1506675_10206389219763345_2549092088264035337_n10982792_10155849664570271_2114004302916021670_n
मुंबई – नच बलिये या रिएलिटी शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा या जोडीने विजेतेपद पटकावले आहे. सचिन पिळगावकर – सुप्रिया यांच्यानंतर नच बलियेत बाजी मारणारी अमृता दुसरी मराठी कलाकार ठरली आहे.
वाजले की बारा या लावणीने चाहत्यांची मनात स्थान पटकावणारी अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा ही जोडी नच बलिये या शोमध्ये सहभागी झाले होते. शोच्या पहिल्या टप्प्यापासूनच अमृता – हिमांशूच्या जोडीने दमदार नृत्यामुळे प्रेक्षक व परिक्षकांची वाहवा मिळवली होती.  या शोची महाअंतिम फेरी रविवारी पार पडली असून या फेऱीत नृत्य व त्याला प्रेक्षकांनी दिलेला भरभरुन प्रतिसाद या आधारे अमृता – हिमांशू या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांना ३५ लाख रुपये रोख व एक गाडी पारितोषिक म्हणून देण्यात आले. रश्मी – नंदीश ही जोडी दुस-या तर करिष्मा तन्ना व उपेन पटेल या जोडीला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. नच बलियेत ले.

आता पोलिस मित्र समित्या स्थापन करणार ..

0

औरंगाबाद-

राज्यातील जिल्हा, आयुक्तालय, तालुका, परिमंडळ व पोलिस ठाणे स्तरावरील शांतता समित्या बरखास्त करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. आता या समित्यांची जागा पोलिस मित्र समिती घेणार आहे. पोलिस मित्र समितीतमध्ये सक्रिय राजकीय कार्यकर्त्यांना स्थान नसेल. त्याचबरोबर जातीवादी, धर्मवादी पक्ष, संघटना, संस्था यांच्याशी संबंधितांनाही पोलिस मित्र समितीत स्थान देण्यात येणार नाही.
सदस्य असे असतील…

सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात येईल

सदस्य निष्कलंक चारित्र्याचा व्यक्ती असावा

सदस्यावर दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे नसावेत

जातीयवादी म्हणून ओळख असलेल्यांची नेमणूक नको

शिक्षक, वकील, पत्रकार व निवृत्त पोलिस अधिकारी यांना प्राधान्य

कट्टरपंथी; तसेच राजकीय कार्यकर्त्यांना स्थान नाही

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगलीत हल्ला …

0

सांगली -मिरज दंगलीचा सूत्रधार शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे असल्याचा आरोप करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिवप्रतिष्ठाच्या कार्यकर्त्यांनी आज हल्ल्याचा प्रयत्न केला. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवसन्मान जागर परिषदेत आव्हाड यांचे भाषण सुरू असताना शिवप्रतिष्ठानचे चार-पाच कार्यकर्ते घोषणा देत व्यासपीठावर गेले आणि त्यांनी आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खालून कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर खुर्च्या फेकल्या. यावेळी झालेल्या झटापटीत एकाला जमावाने लाथाबुक्‍क्‍यांनी चोपले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ रद्द करावा, या मागणीसाठी रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत हा प्रकार घडला या कार्यक्रमात भाषण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली.
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित या परिषदेत आमदार आव्हाड यांचे भाषण सुरू असताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत ‘भाषण बंद करा,’ असे धमकावत ‘शिवप्रतिष्ठान’चे १०-१२ कार्यकर्ते व्यासपीठावर धावले. हे लक्षात येताच परिषदेला उपस्थित असलेल्या काहींनी नाट्यगृहातील खुर्च्या त्या कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावल्या. काहींनी व्यासपीठावर धाव घेऊन ‘शिवप्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांना बदडले. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे समजल्याने शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव एकत्रित येऊन मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत सोमवारी सांगली बंदची हाक देण्यात आली. ‘लोकसभेत आणि राज्यात सत्ताबदल झाला की काय होतेय, याचा हा प्रत्यय आहे. याचा वणवा मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहचवू,’ असे आव्हाड म्हणाले.

सोने 25,000 रुपयांच्या खाली…

0
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींनी गेल्या पाच वर्षांची नीचांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी 25,000 रुपयांच्या खाली घसरल्या आहेत. त्यासोबतच चांदीची किंमतीही 34,350 रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला आहे. गुंतवणूकदारांनी बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. न्युयॉर्क बाजारात सोन्याच्या किंमती 1,129.60 डॉलर प्रति पौंडवर पोहोचल्या आहेत. एप्रिल 2010 पासूनची ही सर्वांत मोठी घसरण आहे. या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून देशात सोने गेल्या पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या किंमती एक टक्क्याच्या घसरणीसह 14.83 डॉलर प्रति पौंडवर पोहोचल्या आहेत.
 
प्लॅटिनमच्या किंमतीतदेखील 5% घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनमच्या किंमती 942.49 डॉलर प्रति पौंड झाल्या असून फेब्रुवारी महिन्यापासूनची मोठी घसरण आहे. 

पुण्यात सुमारे १ लाख घरे खरेदीदारांच्या प्रतीक्षेत …

0

पुणे,  पुण्यात न विकल्या गेलेल्या घरांची संख्या तब्बल ९०७९९ इतकी झाली आहे.न विकल्या गेलेल्या घरां चे मूल्य तब्बल ४८५२६ कोटी रुपये इतके आहे गेल्या वर्षी जून महिन्यात न विकल्या गेलेल्या घराची विकसकाकडील संख्या ६६३५० इतकी होती. त्यात आता ३६ टक्क्यांची भर पडली आहे सरकारने ही घरे विकली जावीत यासाठी करकपातीची काही योजना जाहीर केली तर या घराच्या विक्रीतून सरकारलाहि सुमारे ३००० कोटी रुपयाचा महसूल मिळू शकतो, असे येथील बांधकाम व्यावसायिक रोहित गेरा यांनी म्हटले आहे
गेराज् पुणे प्रॉपर्टी अहवालात सध्या पुण्यातील घराच्या किमती तुलनने कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून सध्या घरे घेण्यासाठी योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.जून २०१४ ते जून २०१५ या काळात पुण्यातील घराचे दर केवळ ३.३३ टक्क्यांनी (चलनवाढीच्या दरापेक्षा कमी) वाढले आहेत. त्या अगोदरच्या वर्षी ते १०.०३ टक्क्यांनी वाढले होते. जानेवारी २०१५ ते जून २०१५ याकाळात तर घराचे दर केवळ ०.२७ टक्क्यांनी (म्हणजे चलनवाढीच्या दरापेक्षा फारच कमी ) वाढले आहेत. गेल्या वर्षी या काळात घराचे दर ३.०४ टक्क्यांनी वाढले होते. ही सगळी आकडेवारी पाहिली तर सध्या घर घेणे तुलनेने स्वस्तात पडेल असे गेरा डेव्हलपमेंटस्चे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी म्हटले. गेल्या वर्षी जून महिन्यात न विकल्या गेलेल्या घराची विकसकाकडील संख्या ६६३५० इतकी होती. त्यात आता ३६ टक्क्यांची भर पडून आता विकसकाकडे न विकल्या गेलेल्या घरांची संख्या तब्बल ९०७९९ इतकी झाली आहे.
त्यामुळे खरेदी करणार्‍याना जास्त पर्याय उपलब्ध आहेत. तयार परंतु न विकल्या गेलेल्या घराचे मूल्य तब्बल ४८५२६ कोटी रुपये इतके भरते. जर सरकारने ही घरे विकली जावीत यासाठी करकपातीची काही योजना जाहीर केली तर या घराच्या विक्रीतून सरकारला विविध कराच्या स्वरूपात ३००० कोटी रुपयाचा महसूल मिळू शकतो, असे गेरा म्हणाले.
सरकारने रिअल्टी क्षेत्राबाबत काही नियंत्रणे आणायची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या नियंत्रणामुळे घराचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.
अहवालातील माहितीनुसार विकसकांचा कल शहराबाहेर किफायतशीर घरे तयार करण्याचा आहे. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी विकसक आणि इतर बाबीची तपासणी करून घरे घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहराबाहेर विकसक जास्त प्राणात का घरे तयार करीत आहेत याबद्दल मनपाने विचार करण्याची गरज असल्याचे गेरा म्हणाले. महागडी घरापेक्षा किफायतशीर दरातील घरांच्या निर्मितीचे प्रमाण जास्त आहे.
या अहवालावर क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, जरी पुण्यात विकल्या न गेलेल्या घरांची संख्या जास्त असली तरी काळजीचे कारण नाही. कारण दीर्घ पल्ल्यात पुण्याचे रिअ‍ॅल्टी क्षेत्र निश्चित नफादायक राहणार आहे. कारण पुणे वाढीव घरे सहज पचवू शकते. नव्या नियंत्रण व्यवस्थेेतील तरतुदीमुळे घरांचे दर वाढतील व त्याचा ग्राहकांनाच त्रास होईल.
एचडीएफसीच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक सोनल मोदी म्हणाल्या की, इतर शहराच्या तुलनेत पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र परिपक्व आहे. येथे घराच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत नाहीत. कारण हे शहर शिक्षण, मॅन्युफॅचरिंग, सेवा क्षेत्राबरोबरच निवृत्त होणार्‍यासाठी आकर्षक आहे. शिवाय येथे गुंतवणूक म्हणून घेण्यापेक्षा राहण्यासाठी घर घेण्यावर लोकांचा भर असल्यामुळे पडून राहिलेली घरे विकली जातील अशी स्थिती आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील कन्सल्टंट कंपनी जेएलएल(पुणे)चे व्यवस्थापकीय संचालक संजय बजाज म्हणाले की, पुण्यातील रोजगारनिर्मिती केवळ एका क्षेत्रावर अवलंबून नाही. कार्यालय, कारखान्यासाठी जागेची मागणी वाढत आहे. यावर्षी तर विविध क्षेत्रात १ लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे घराच्या मागणीत वाढ होत राहणार आहे. त्यांनी गेरा रिअ‍ॅल्टी रिपोर्टचे कौतुक केले.

राजेश खन्ना कि याद मे…

0
ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा
मेरा गम कब तलक, मेरा दिल तोड़ेगा

किसी का भी लिया नाम तो
आयी याद तू ही तू
ये तो प्याला शराब का
बन गया ये लहू

पीने की कसम डाल दी
पिऊंगा किस तरह
ये ना सोचा तू ने यार मैं
जिऊंगा किस तरह

चला जाऊ कही छोड़ कर
मैं तेरा ये शहर
ना तो यहाँ अमृत मिले
पीने को ना जहर

राजेश खन्ना कि यादमे …

0
मैं शायर बदनाम मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम  मैं चला, मैं चला

मेरे घर से तुम को, कुछ सामान मिलेगा
दीवाने शायर का, एक दीवान मिलेगा
और एक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम

शोलों पे चलना था, काँटों पे सोना था
और अभी जी भर के, किस्मत पे रोना था
जाने ऐसे कितने, बाकी छोड़ के काम

रास्ता रोक रही हैं, थोड़ी जान हैं बाकी
जाने टूटे दिल में, क्या अरमान हैं बाकी
जाने भी दे ऐ दिल, सब को मेरा सलाम

राजेश खन्ना कि याद मे….

0
जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते ...

आँख धोखा है, क्या भरोसा है, सुनो
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने ना दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी 
रोक लो, रुठकर उनको जाने ना दो
बाद में प्यार के, चाहे भेजो हजारो सलाम
वो फिर नहीं आते ...

सुबह आती है, रात जाती है, यूँही
वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंजर बदल जाता है
एक बार चले जाते हैं, जो दिन रात सुबह शाम
वो फिर नहीं आते ...

शटर’ च्या यशाबद्दल कृतज्ञता सोहळा साजरा ; रोमांचकारी ‘शटर’वर मराठी प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर

0

 
” एकीकडे ‘बॉलीवूड’ तर दुसरीकडे ‘टौलीवूड’ आणि ‘कॉलीवूड’ चे आव्हान असताना मराठी चित्रपट निर्माण करून त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळविणे हे तसे खूप कठीण काम होते. मात्र ‘शटर’ या मराठी चित्रपटाने हे साहस करून दाखविले. ‘शटर’  चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे ‘शटर’ च्या सर्व टीमचे प्रयत्न सार्थकी लागले. त्यामुळे आम्हाला साहजिकच आनंद झाला आहे” असे या चित्रपटाचे निर्माते आणि ‘शटर’ चित्रपटात महत्वाची भूमिका केलेले अभिनेते प्रकाश बरे यांनी गुरुवारी येथे सांगितले. ‘शटर’ चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देवून त्याच्या ‘बॉक्स ऑफिस’च्या यशावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कौमुदी वालोकर, मनसे नेते अॅड. गणेश सातपुते तसेच वितरण व्यवस्थापक दीपक शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही एक चांगला चित्रपट पाहण्याचे समाधान दिल्याबद्दल ‘शटर’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

निर्माते आणि अभिनेते प्रकाश बरे पुढे म्हणाले, मूळ  मल्याळी चित्रपटाचा मराठीत ‘रिमेक’ करणे आमच्या दृष्टीने तसे साहसच होते. कारण मराठी प्रेक्षक खूप चिकित्सक असतो हे आम्हाला माहित होते तरीही आम्ही मराठी प्रेक्षकांवर संपूर्ण विश्वास टाकून चित्रपट चांगला होण्यासाठी प्रयत्न केले आणि आमच्या या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यामुळे शटर’ ला चांगले यश मिळू शकले. त्यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचाही महत्वाचा वाटा होता असेही त्यांनीं सांगितले.

अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, ‘आम्ही केलेले काम प्रेक्षकांपर्यंत कशा प्रकारे पोहोंचले आहे ? त्यामुळे प्रेक्षकांचे समाधान झाले आहे की नाही याचीच कलाकारांना नेहमी उत्सुकता असते आणि त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली की साहजिकच आपल्या कामाचे चीज झाल्याचे त्याला समाधान लाभते. ‘शटर’ चित्रपट स्पर्धेत टिकला आणि गुणात्मकदृष्ट्या तो प्रेक्षकांना आवडल्यामुळे आम्हा कलाकारांना खूपच आनंद झाला आहे.  ‘अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही आपल्या छोटेखानी भाषणात  ‘शटर’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल पुण्यात प्रथमच अशा प्रकारचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगून ‘शटर’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. श्री दीपक शर्मा यांनी आभार मानले.   ‘शटर’ हा चित्रपट अजूनही पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड दु.१.१० व अभिरुची सिटी प्राईड सायं. ६.००. वा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून त्यास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत  आहे. ‘शटर’  चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही.के.प्रकाश हे स्वतः राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आजपर्यंत २० चित्रपट केले आहेत.  सजीव एम.पी आणि प्रकाश बरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा आणि  संवाद मनिषा कोरडे यांनी लिहिले आहेत. के. के. मनोज यांनी छायांकन  केले असून भक्ती मायाळू यांनी संकलन केले आहे. तर प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे हे आहेत. मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी ‘शटर’ची  गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

टोल भरूनही मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जीव धोक्यात – दरड कोसळल्याने २ ठार

0

मुंबई – मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या एका कारवर एक मोठ्ठा दगड कोसळल्याने त्यात दोन जण ठार झाल्याचे वृत्त आहे.यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 9 तासांनंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेत डोंबिवलीचे शशिकांत धामणकर आणि भाईंदरचे दिलीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे तसंच या घटनेत तीन महिलाही जखमी झाल्या आहे.  पोकलेन पोहचण्यास विलंब होत असल्याने आणि घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यास अडचणी येत आहेत.दरड कोसळल्याने मार्गावर मोठ्याप्रमाणावर दगडे आणि मातीचा ढिगारा तयार झाला  .
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडोशी येथील बोगद्या जवळ ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप मृतांची आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. कार रस्त्यावरून जात असताना मोठे दगड थेट कारवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही शहरांतील प्रवाशांची सोय करण्यासाठी आज (रविवार) पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली
यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २२ जूनला दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामुळे एक्स्प्रेस वे २४ तास बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा दरड कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय

पंतप्रधानांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिस आणि’ आप ‘मध्ये संघर्ष

0

arvind-kejriwal-s_650_071915110216 aap-protest-759-2

नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या अखत्यारीत असलेले दिल्ली पोलिस आणि आप पार्टी यांच्यात आता संघर्ष रंगतो आहे . पोलिस कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी राजकारण जास्त करीत आहेत असा आरोप करीत दिल्ली पोलिस आमच्या अखत्यारीत द्या अशी मागणी आप्चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या अक्त्यारीत असलेल्या पोलिस आयुक्तांना एकीकडे समन्स पाठवले आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्ली पोलिसांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलकांवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी पाण्याचे फवारे चा वापर केला. या प्रकरणामुळे दिल्ली पोलिस आणि केजरीवाल सरकार यांच्यात नव्याने संघर्ष निर्माण झाला आहे. त्यापूर्वी शुक्रवारी केजरीवाल यांनी पोलिसांसाठी अपशब्दांचा वापर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
दिल्लीच्या आनंदपर्वत परिसरात 19 वर्षांच्या मिनाक्षी नावाच्या तरुणीची हत्या आणि दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना समन्स पाठवण्यात आले आहेत. यात पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान आपच्या यूथ विंगच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसानी वॉटर कॅनन चा वापर केला.
दिल्लीचे गृहमंत्री सत्येन्द्र जैन यांनीही पोलिस आयुक्त बीएस बस्सी यांना पत्र लिहून 48 तासांत याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. पीडितेने अनेकवेळा तक्रार करूनही आनंद पर्वत मर्डर केसमध्ये आरोपींच्या विरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? अशी विचारणा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच आधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतही उत्तर मागवण्यात आले आहे. शनिवारी हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेल्या केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दिल्ली पोलिस पंतप्रधानांच्या अख्त्यारित येतात. त्यामुळे त्यांनी याबाबत काहीतरी करावे अन्यथा दिल्ली पोलिस आमच्या ताब्यात द्यावे, असे केजरीवाल म्हणाले.गुरुवारी दोन आरोपी जयप्रकाश आणि त्याच्या भावाने 11 वीची विद्यार्थीनी असलेल्या मिनाक्षीच्या चेहरा, छाती आणि पोटावर चाकूने 35 वेळा वार केले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आईही चांगलीच जखमी झाली होती. त्या दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मिनाक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मिनाक्षीने 2013 मध्ये या दोघांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.

‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0

mail.google.com

पुणे :
  पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्ष कार्यालयात आनंद रिठे (सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 यावेळी शंकर शिंदे, राजूशेठ गिरे, सुरेश पवार, अ‍ॅड.औदुंबर खुने-पाटील, संदीप थोरात, अविनाश वेल्हाळ, संग्राम होनराव, योगेश वराडे आदी उपस्थित होते.

जनतेसाठी ‘स्मार्ट सिटी संवाद’ खा. शिरोळेयांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन

0
पुणे :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० स्मार्ट सिटीच्या ध्येयामध्ये पुण्याचाही सहभाग व्हावा या उद्देशाने  चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए), कॉनफेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ पुणे (क्रेडाई) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी संवाद ही वेबपोर्टल तयार करण्यात आले. जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी  स्मार्ट सिटी संवाद या वेबसाईटचे आज  खा.अनिल शिरोळे यांच्या हस्ते  उद्घघाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार,पुणे विद्यापीठाचे डॉ. करमरकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया उपस्थित होते.  www.smartcitysamvad.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.
 
महाराष्ट्र सरकारला यासाठी १० शहरांची नामांकन द्यावयाची आहेत. त्यातूनच मग पुढे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतील मग यातील विजेत्यांचा सहभाग पुढे देश पातळीवरील स्पर्धेसाठी होणार आहे. आपल्या शहराच्या प्रगतीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेने या उद्देशात सहभागी होण्यासाठी या साईटची निर्मिती केली असून त्याद्वारे लोकांच्या सूचनांना आणि विचारांना लक्ष्यात घेऊन त्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकांना नियमित स्वरुपात दिल्या जाणार आहेत. 
 
खा. अनिल शिरोळे यांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले व म्हणाले सरकारचा असा मनोदय आहे कि स्मार्ट सिटी हि कागदी योजना न राहता चळवळ बनावी. या पुढाकारामुळे हि चळवळ प्रभावशाली होईल. पुण्याची ओळख स्मार्ट सिटी म्हणून व्हावी यासाठी लोकांनी जास्तीत जास्त सक्रियतेने सहभाग घ्यावा. 
स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पासाठी पुण्याचे काम कौतुकास्पद असल्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असल्याचे मत पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. तसेच पुण्याची स्मार्ट सिटी म्हणून प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न  राष्ट्रीय स्तरावर इतरांसाठी आदर्श ठेवण्यासारखे आहेत असेही ते म्हणाले.
 
कटारिया पुढे म्हणाले, स्मार्ट सिटीबद्दलच्या आमच्या कल्पना काय आहे  त्यावर नागरिकांनी आपले विचार, सूचना तसेच मते आमच्या पर्यंत पोहोचवावे. त्यातील विशेष सूचना सरकार पर्यंत पोहोचवण्यात येतील व त्याची दखल  घेतल्याचे कळवण्यात येईल
या वेबसाईटवर स्मार्ट सिटीबद्दलच्या संकल्पना काय आहे,त्यावर आधारित ताज्या घडामोडींविषयीची माहिती,त्याविषयी तज्ञानांचे मत आणि विचार यासर्व गोष्टी वेबसाईटवर असणार  आहेत अशी माहिती सीएमडी पोझीव्ह्यूव चे नॉलेज पार्टनर सी. ए. विनीत देव यांनी दिली.