बोअरवेलमध्ये अडकलेल्या अडीच वर्षाच्या सोहमला महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ सेवेच्या तातडीच्या प्रथमोपचारामुळे मिळाले जीवनदान
ई-गव्हर्नन्स प्रणाली विविध खात्यांतून प्रभावीपणे राबविणार – महापालिका आयुक्त
पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांतून ई -गव्हर्नन्स प्रणाली मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
ई-गव्हर्नन्स अंतर्गत विविध खात्यांमधून सध्या होत असलेले कामकाज व त्यात संगणकीय, ई गव्हर्नन्स अंतर्गत विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे कामकाजाचे नियोजन व प्रभावी कार्यपध्दती तसेच नागरी सेवांचे नागरिकांना लाभ, नागरिकांचा सहभाग याबाबत विचार करुन त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
या नियोजना संदर्भात पीडब्लूसी या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या वतीने मनपाच्या विविध खात्यांमधील सध्याची कामकाज पध्दती, त्यात गतीशील व प्रभावी कसे बदल करता येतील, विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे त्याचे प्रभावी नियोजन कसे करता येईल, याबाबत पीडब्लूसी माहिती तंत्रज्ञान कंपनीने १५ मोड्युल्सद्वारे तयार केलेल्या विविध खातेनिहाय माहितीचे सादरीकरण व आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच राजेद्र जगताप व सर्व खातेप्रमुख, नोडल ऑफिसर उपस्थित होते.
विविध विभागांच्या माहिती सादरीकरणावेळी मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच राजेद्र जगताप यांनी संबंधित खातेप्रमुख व पीडब्लूसी माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
या संदर्भात मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की, सदरची प्रणाली प्रभावी व परिणामकारकपणे राबविणेकरिता संबंधित खातेप्रमुख, नोडल ऑफिसर व कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर किती प्रमाणात बदल, सुधारणा झालेल्या आहेत याबाबत आढावा घेतला जाईल. प्रशिक्षणार्थी, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रगतीबाबत गुणपध्दतीचा अवलंब करुन प्रगती साधली जाणार आहे. या प्रणालीचा वापर व अंमलबजावणी केल्यामुळे खात्यामधील विविध कामे जलदगतीने होणे, वेळेचा अपव्यय टाळणे, माहिती व संवादाची जलद रितीने उपयुक्तता साधणे या परिणामकारकतेमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा जलदगतीने देणे, माहिती प्रसार, विविध योजनांची व निर्णयांची माहिती, खात्यांचा नागरिकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क, नागरी सहभाग व कामांचा जलदगतीने निपटारा करणेसाठी ई-गव्हर्नन्स प्रणाली उपयुक्त व प्रभावी ठरणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
‘बीडीपी’ हा नागरिक चळवळीचा विजय- खा.अॅड.वंदना चव्हाण – नागरिक, संस्था, पर्यावरणप्रेमींनी केला आनंद व्यक्त
के. टी. आय तर्फे कौशल्य शिबिराचे आयोजन
पुणे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कौशल शिबिराचे आयोजन कोहिनूर टेक्निकल इन्सटीटूटने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे केले होते. याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून आमदार मेधा कुलकर्णी,के. टी. आयच्या बिजनेस हेड सोनल साटेलकर,व्होकेशनल एजुकेशनल एण्ड ट्रेनिंग पुण्याचे चंद्रकांत नीताळं,दे आसरा फौंडेशनच्या प्रज्ञा गोडबोले,सल्लागार अल्का पांडे,संदीप कवडे ई. उपस्थित होते.
सकाळी 10 नंतर पर्यटकांनी कास पठारावर यावे – अश्विन मुद्गल
सातारा हिल मॅरेथॉनसाठी प्रशासनाने सज्ज रहावे
सातारा (जिमाका) : 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 10 या कालावधीत सातारा हिल मॅरेथॉन 2015 होणार आहे. या स्पर्धेसाठी देश विदेशातील सुमारे 5 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धकांना अडथळा विरहित मार्ग मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी देतानाच कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी या दिवशी 10 नंतर पर्यटनासाठी यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
सातारा हिल मॅरेथॉन 2015 बाबत आज जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, प्रांताधिकारी मल्लीकार्जुन माने, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, कमलेश पिसाळ आदींसह सदस्य उपस्थित होते.
असोसिएशनचे डॉ. काटे आणि श्री. पिसाळ यांनी मॅरेथॉन विषयी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी संबंधित विभागांचा आढावा घेतला. ते म्हणाले, स्पर्धा मार्गावरील सर्व खड्डे भरुन घ्यावेत. त्याचबरोबर स्वच्छता ठेवावी. जंतुनाशक औषधांची फवारणी करावी. मार्गावरील सर्व पथ दिव्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नगर परिषदेने क्रेन उपलब्ध करुन द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पर्धा मार्गावरील रस्ता दुरुस्त करावा. पोलीसांनी स्पर्धा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा. त्याचबरोबर सकाळी 5 वाजल्यापासून स्पर्धा मार्गावरील येणारी वाहतूक बंद ठेवावी. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणावेळी आवश्यक ती कार्यवाही चोखपणे करावी.
6 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने या दिवशी विकेंड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कास पठारावर पर्यटनासाठी येत असतात. यासाठी वन विभागाने कास पठरावर येणाऱ्या पर्यटकांचे ज्यांचे आदीच बुकींग झाले आहे. त्यांना रविवारी सकाळी 10 नंतर येण्याबाबत सूचना द्यावी. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी वन विभागाच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती प्रदर्शित करावी, अशी सूचनाही श्री. मुद्गल यांनी देऊन, पर्यटकांनी सदर दिवशी सकाळी 10 नंतरच पर्यटनासाठी कास पठाराकडे यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाने बामणोली, केळवली, परळी आदी ठिकाणी मुक्कामी असलेल्या गाड्या वेळापत्रकानुसार न सोडता सदर दिवशी स्पर्धा संपल्यानंतर सोडाव्यात. जिल्हा परिषदेने चल स्वच्छता गृहे शुल्क भरुन स्पर्धा कालावधीत उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून मॅरेथॉन असोसिएशन तर्फे रुग्णवाहिकेची सुविधा करावी. प्रशासनाच्यावतीने रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक जागोजागी ठेवून तशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.
या मॅरेथॉनसाठी परदेशातूनही स्पर्धक येणार आहेत. ही मेरेथॉन यशस्वी करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असेही श्री. मुद्गल शेवटी म्हणाले.
शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण लाभ घ्या -जितेंद्र शिंदे

सातारा, दि.5 (जिमाका): किसान तात्काळ कर्ज योजनेमधून शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण केले जात असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे व बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रंबधक यांनी सयुंक्तरित्या केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असून शेतकऱ्यांना कृषी पुरक, कृषी उच्च तंत्रज्ञान इत्यादी कारणासाठी पतपुरवठा करण्यासाठी अग्रेसर आहे. किसान तात्काळ कर्ज योजना ही बँकेच्या नियमीत पीक कर्ज व किसान क्रेडीट कार्डधारकांसाठी असून योजनेव्दारे शेतक-यांना विनातारण-विनाकारण 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज वितरण केले जाते.
पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड ‘खाकी वर्दीतील सहृदयी माणूस …
पुणे-जहांगीर हास्पिटल मधील रूग्णाचे ह्रदय मुंबईतील रूग्णाला प्रत्यारोपण करण्यासाठी ह्रदय घेऊन जाणार्या रूग्णवाहीकेला जहांगीर हास्पिटल ते पुणे विमानतळ हे अंतर अवघ्या 7 मिनिटात पार करून देऊन तत्परता दाखविल्या बद्दल पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांचा मनजित विरदी फाऊंडेशन तर्फे पुष्पगुच्छ, शाल व आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी, मेजरसिंग कलेर , विकास भांबुरे, विजय भोसले, महेश जांभूळकर, सुरज अगरवाल आदी उपस्थित होते.
“आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने दाखविलेली खाकी वर्दीतील माणूसकी कौतुकास्पद आहे” असे मनोगत मनजितसिंग विरदी यांनी यावेळी व्यक्त केले.
पाच तासांच्या थरारक चकमकीनंतर पाकिस्तानी अतिरेकी जिवंत पकडला
जम्मू-उधमपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सिमरौली येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.
श्रीनगर महामार्गावरील उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. पाच तासांच्या थरारक चकमकीनंतर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अटक केली. २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबनंतर जिवंत पकडलेला हा पहिलाच अतिरेकी आहे. कासिम खान असं या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
उधमपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सिमरौली येथे दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य केलं. विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकमध्ये हे दहशतवादी होते. त्यांनी आधी ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर बेछुट गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यातून सावरत, बीएसएफनं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर, दुसऱ्या दहशतवाद्यानं दोन ग्रामस्थांना ओलीस धरून गोळीबार सुरूच ठेवला होता.
पाकचा माजी किक्रेटपटू वसीम अक्रमवर हल्ला
कराची – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम याच्यावर आज (बुधवार) कराचीतील नॅशनल स्टेडिअम येथे अज्ञातांनी हल्ला केला आहे. हल्ल्याचे स्वरुप आणि त्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही.
हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अक्रमने माहिती दिली आहे. आपल्या मोटारीने प्रवास करत असताना नॅशनल स्टेडिअमजवळ अज्ञातांनी हल्ल्या केल्याचे त्याने सांगितले. तसेच आपण हल्लेखोरांच्या मोटारीचा क्रमांक लिहिला असून तो पोलिसांना दिल्याची माहितीही वसीमने दिली आहे.
‘वसीम स्वत: मोटार चालवत होता. दरम्यान वसीमच्या मोटारीच्या एका बाजूने काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याला काहीही दुखापत झाली नाही. सध्या तो नॅशनल स्टेडिअममध्ये असून पोलिसांची औपचारिकता पूर्ण करत आहे‘ अशी माहिती वसीमचे व्यवस्थापक अर्सलन हैदर यांनी दिली आहे.वासिम अक्रमच्या कारला बाईकस्वार हल्लेखोरांनी धडक दिली. धडकेनंतर अक्रम गाडीबाहेर येताच त्याच्या दिशेने एका हल्लेखोराने गोळी झाडली. मात्र सुदैवाने कारच्या टायरला गोळी लागल्याने अक्रम बचावला. त्यानंतर हल्लेखोरांनी कार पेटवण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर पोलिसांना सांगितल्याचंही अक्रमने म्हटलं आहे. अक्रम नॅशनल स्टेडियमवर युवा क्रिकेटपटूंसाठी ट्रेनिंग कॅम्प घेण्यासाठी चालला होता.काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या गाडीच्या ताफ्यात घुसून एका तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने पंतप्रधान त्यातून बचावले.
रहस्यपटाचा थरारक अनुभव!- ‘दृश्यम’
’मुंबई मेरी जान’ आणि ’डोंबिवली ’फास्ट’सारख्या वेगळ्या चित्रपटांमधून आपली छाप रसिकांच्या मनात कायम करणार्या निशिकांत कामत याचा आणखी एक थक्क करणारा चित्रपट म्हणजे ’दृश्यम’! एक थरार, रहस्यपट रसिकांसमोर यशस्वीपणे मांडण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सगळ्यांचा वापर यामध्ये निशिकांतने योग्य रितीने केलेला दिसतो. अजय देवगण आणि तब्बू यांचा उत्कृष्ट अभिनय आणि त्याला सहकलाकारांनी दिलेली संयमी साथ हे या चित्रपटाचे खरे यश आहे. पाऊणे तीन तासाच्या कालावधीत चित्रपट रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवतो.
गोव्यातील एका छोट्याश्या गावात सहजसुंदर आयुष्य जगणार्या मध्यमवर्गीय साळगावकर कुटुंबाची हि कथा आहे. अचानक एकेदिवशी त्यांच्या आयुष्यात एक अनाकलनीय प्रसंग घडतो, त्यात अघटीत घडते आणि मग सुरु होतो कुटुंबाला वाचवण्याचा संघर्षमय परंतु तितकाच चालाख अन् शातीर प्रवास. या प्रवासाचा मुख्य सूत्रधार असतो चौथी पास विजय साळगावकर (अजय देवगण). चित्रपटातील नायकाला प्रतिस्पर्ध्याला नमवण्याची खुमखुमी नाही किंव्हा त्यांना हरवल्याचा गर्वही नाही… त्याला काळजी आहे ती केवळ आपल्या कुटुंबाची, त्यांच्या रक्षणाची… एकूणच हा थरारक प्रवास ‘दृश्य’स्वरूपात पाहिल्यास अधिक चांगला अनुभव येऊ शकतो. कारण ऐकू किंवा वाचनात येणार्या गोष्टींपेक्षा ‘दृश्य’स्वरूपातल्या गोष्टी कैकपटीने आपल्या जास्त काळ लक्षात राहतात.
अॅक्शन किंवा कॅमेडी हिरो म्हणून गेल्या काही वर्षात अजय देवगण आपल्या समोर येत असला तरी ‘दृश्यम’मधील त्याची व्यक्तिरेखा अतिशय वेगळी आहे. त्याच्या आजपर्यंतच्या सर्व प्रतिमा पुसून एक वेगळाच अजय आपल्यासमोर उभा करण्यात निशिकांत यशस्वी ठरला आहे, अर्थातच याचे श्रेय अजयलाही तितकेच द्यावे लागेल. असं म्हटलं जात की, अभिनेत्रींना काही ठराविक वर्षच चित्रपटसृष्टीत स्थान असतं. परंतु हे विधानही तब्बूने खोडून काढल आहे. वयाची चाळीसी ओलांडूनही ही अभिनेत्री आजही त्याच ताकदीने काम करते आणि रसिकांनाही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहावत नाही, हे विषेश!
हिंदी ‘दृश्यम’ व्यंकटेशच्या व कमाल हसनच्या तामीळ आणि मोहनलालच्या मल्याळम ‘दृश्यम’ चित्रपटावर आधारीत असला तरी नव्याने हा चित्रपट साकारणे, मांडणे आणि तेवढ्याच ताकदीने तो अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करणे ही सोपी गोष्ट नाही. खंत एकाच वाटते कि, तामीळ चित्रपटातील प्रत्येक सीन जशाच्या तसा हिंदीमध्ये घेण्यात आला आहे. निशिकांत कामतने इथे मात्र थोडीशी निराशा केली आहे. पण तरीही मांडणी, पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय या चारही पातळ्यांवर ‘दृश्यम’ सुपरहिट ठरणार. ऑगस्ट महिन्यापर्यंतचा या वर्षातील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच तुम्ही अजय देवगण किंवा निशिकांत कामत यांचे चाहते असाल तर १०० टक्के हा चित्रपट पाहा आणि चाहते नसाल तर मग १०१ टक्के हा चित्रपट पाहाच. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही या दोघांचेही चाहते व्हाल!
– प्रथमेश नारविलकर
संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर रेनबो बीआरटी ची टेस्ट राईड /चाचणी फेरी सुरु
संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर पीएमपीएमएलच्या नियोजना नुसार रेनबोबीआरटी च्या चाचणी फेरी सुरु झाल्या आहेत.
संगमवाडी–विश्रांतवाडी आणि सांगवी-किवळे मार्गावर १४० ट्राफिक वार्डनची टीम तैनात करण्यात आली आहे. हि टीम ट्राफिक/ रहदारीच्या नियोजना साठी, इतर वाहनांनी रेनबो बिआटी लेन मध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यासाठी आणि प्रवाश्यांना काही कळीच्या ठिकाणावरून रस्ता ओलांडण्यास मदत करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या काही दिवसांचा अनुभव चांगल असून, खाजगी वाहनचालकांची रेनबो बीआरटी लेन मध्ये वाहन नेण्याच्या संख्येत घट झाली आहे. वाहन चालक ट्राफिक वार्डनच्या सुचना पाळत आहेत. फक्त ज्या ठिकाणी वाहतूकीचा ताण ज्यास्त आहे तेथे काही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) श्री.विनोद, वार्डन अधिकारी, पीएमपीएमएल यांनी दिली.
विश्रांतवाडी टर्मिनल येथे बस वळविताना संभाव्य वाहतूक कोंडीचा विचार करून तेथील ट्राफिक वार्डनची संख्या वाढवण्यात आली आहे. ट्राफिक वार्डन येथे ८ तासांची पाळी पूर्ण करतील, येथे बदली ट्राफिक वार्डनची व्यवस्था करण्यात आल्याने, ट्राफिक वार्डनच्या अवकाश काळात बदली ट्राफिक वार्डन बस वळविताना वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतील. सांगवी-किवळे मार्गासाठीच्या ट्राफिक वार्डनची भारती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन ट्राफिक वार्डनचे प्रशिक्षण ७ आणि ८ तारखेस केली जाईल, १० ऑगस्ट पासून हे आपल्या निर्धारीन मार्गावर रुजू होतील. निर्धारित रेनबो बीआरटी मार्गावर ट्राफिक वार्डनच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी भारतीय सैन्य पोलीस दलतील (निवृत्त) कार्यक्षम पर्यावेक्षक नेमन्यात आले आहेत.रेनबो बीआरटीच्या चालकांचा कार्यप्रणालीवारही नियमित लक्ष ठेवले जात आहे. रेनबो बीआरटी चालकांना निर्देशित राखीव लेन मधून रेनबो बिआटी बस चालविणे, इतर ट्राफिकशी बसचा संबंध नसल्याने चालकांना अधिक सोयीचे आणि तणावमुक्त असल्याचे श्री सुनील बुरसे, उप कार्यकारी अधिकारी, रेनबो बीआरटी यांनी संगितले. या राखीव लेन मुळे बसला जलद गती मिळण्यात आणि इंधन बचत होण्यास मदत होत आहे. मिक्स ट्राफिक मध्ये बस चालकास वारंवार ब्रेक लावावा लागत असेल्यामूळे बस टायरची होणारी झीज कमी होण्यासही मदत होणार आहे.
रेनबो बीआरटी चालकांना बस बरोबर बस स्थानकाच्या स्वयंचालीत दरवाज्याच्याजवळ उभी करण्यासाठी (डॉकिंगी) मदत व्हावी म्हणून चालकांसाठी बस स्थानकावर निर्देशन पट्टी बसविण्यात आल्या आहेत. सध्या रेनबो बीआरटी चालक हे एक-मेकांच्या कामगिरीचे निरीक्षण करून आपले अभिप्राय एकमेकांना देत आहेत. आयटीएमएस मध्ये बसची जी. पी. एस. स्थिती प्रवाश्यांना माहिती फलकावर वेळेवर दिसण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. संगमवाडी–विश्रांतवाडी मार्गावर रोज किमान १० बस ह्या चाचणी फेऱ्या पूर्ण करत आहेत. एकूण ५८ बस आळीपाळीने चाचणी फेऱ्यामध्ये सहभागी होत आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क
सौ मयुरा शिंदेकर, सी ई ओ, पी एम पी एम एल. मोबाईल – 7774003336 ई मेल ceopmpml@gmail.com
श्री मंगेश दिघे, प्रवक्ता, पुणे म न पा, बी आर टी सेल. मो: 9689931771 ई मेल brtcell@punecorporation.org
मनपा घनकचरा प्रकल्पांची ठाणे मनपा अधिकाऱ्यांनी केली पाहणी
पुणे- महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, विविध प्रकल्प, यांची माहिती तसेच प्रकल्पांची पाहणी करणेकरिता ठाणे महापालिकेचे मा. महापालिका आयुक्त संजय जयस्वाल तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय हिरवाडे यांनी पाहणी केली.
महापालिका आयुक्त कार्यलयात झालेल्या बैठकीप्रसंगी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुणे महानगरपालिका घनकचरा विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या घनकचरा प्रकल्पांविषयी, तसेच शहरातील विविध प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, खतनिर्मिती, गांडूळखत प्रकल्प अशा विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली.
शनिपार बसस्थानकाशेजारी विश्रामबागवाडा जुन्या कार्यलयाच्या मागील बाजूस विकसित करण्यात आलेल्या ५ टन ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे इकोमॅन एनव्हायरो सोलुशन प्रा.लि. या प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्क्षय मा. दिलीप काळोखे तसेच महापालिका सहय्यक आयुक्त संजय गावडे यांनी सविस्तर माहिती दिली.
पेशवे पार्कमधील ५ टन क्षमतेच्या ग्रीन इलेफन्त इंजिनिअरिंग प्रा.लि. बायोमेंघेशन ऑगेनिक फूड वेस्ट प्रक्रिया प्रकल्पाची, रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील १०० टन क्षमतेच्या दिशा – गांडूळखत प्रकल्पाची, तसेच नजीकच्या २ टन क्षमता असलेल्या मेकॅनिकल कॉम्पॉक्टिंग प्रकल्प – ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील रोकेम प्रकल्पास भेट दिली असता येथील प्रकल्प व्यवस्थापक श्री.कळसकर यांनी प्रकल्पाविषयक सविस्तर माहिती दिली.
कोंढवा खुर्द येथील कुमार सबलाईम या निवासी गृहप्रकल्पातील गांडूळखत प्रकल्पाची पाहणी करणेत आली. याप्रसंगी येथील निवासी भागातील दैनदिन सुमारे ८० किलो ओला कचरा या प्रकल्पात जिरविला जातो. सुमारे ३ वर्षापासून सदरचा प्रकल्प अत्यंत यशस्वीरीत्या कार्यान्वित असल्याचे व निवासी भागातील नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे विवम एस.डब्लू.पप्रा.लि. च्या श्रीमती नेहा कांदळगांवकर यांनी सांगितले.
एस.ए.ई. च्या स्टुडंट्स इंडस्ट्री एज्युकेशन प्रोग्रामच्या माहिती पुस्तकाचे अनावरण
मनसेच्या मावळ तालुका अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळूंज यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या वादातून हा आज (मंगळवार) हल्ला करण्यात आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कामशेतजवळ ही घटना घडली. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात वाळूंज यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील पायोनीअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना नेण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने निवडणुकीच्या वादातूनच हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून या हल्ल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात आरोप करण्यात येत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळुंज याच्यावर कामशेत येथील महाराष्ट्र बँकेसमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यात वाळुंज यांच्या पोटाच्या उजव्या भागात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वाळुंज यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.. मावळमध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनसेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. वाळुंज यांच्या मारेक-यांना पकडेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.कामशेत व वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पदाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाळुंज यांच्यावरील गोळीबारामागे ग्रामपंचायत निवडणुकीचा काही संदर्भ आहे का या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.






