Home Blog Page 3564

जगण्याची नवी उर्मी देणारा झी मराठीचा उंच माझा झोका पुरस्कार – ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड

0

2 3

“कुष्ठरोगी, आदिवासी, शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि माझे सहकारी काम करत आहोत. एका अर्थाने समाजासाठी कायम दुर्लक्षित असणा-या घटकाची आणि आमच्या कामाची एवढ्या मोठ्या पातळीवर दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातोय याचा विशेष आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे आता माझ्यासह सर्वांनाच हे काम अजून जोमाने करण्याची आणि जगण्याची एक नवी उर्मी मिळाली आहे. हा पुरस्कार माझा एकटीचा नसून माझ्यासोबतीने राबणा-या असंख्य हातांचा आहे” असे मनोगत ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड यांनी व्यक्त केले. निमित्त होते, त्यांना प्रदान करण्यात आलेल्या झी मराठीच्या ‘उंच माझा झोका जीवनगौरव’ पुरस्काराचे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात बुधवारी एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समितीचा शांतिवन प्रकल्प, आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळा आणि राजीव-रंजन आधार केंद्र संस्थेद्वारे अपंग, वृद्धांना हक्काचं घर आणि माया देण्याचं काम गेली अनेक वर्षे मीराताई लाड अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवर हा पुरस्कार सोहळा प्रसारित होईल.

विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. परंतु त्यांच्या कामाची दखल प्रत्येक वेळी घेतली जातेच असे नाही. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने उंच माझा झोका पुरस्कार या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं तिसरं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण, शिक्षण, कला , क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, साहित्य अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या दहा कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला.

अमरावतीमध्ये तृतीयपंथी, समलैंगिक, देहविक्रय करणा-या महिला, महिला कैदी यांना सन्मानाने जगता यावे म्हणून ‘मानव संवाद केंद्राच्या’ माध्यमातून काम करणा-या रझिया सुलताना यांना सामाजिक कार्यासाठी तर धूर विरहीत चूल बनवणा-या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांना पर्यावरण जागृतीसाठी या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. सावरपाड्यासारख्या छोट्याश्या खेड्यातून मोठी झेप घेत खेळाचे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणा-या धावपटू कविता राऊत यांना क्रीडा विभागासाठी तर ज्येष्ठ लेखिका, कवयित्री कविता महाजन यांना साहित्य विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी असणा-या वैशाली बारये हा पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या की, “हे काम जरी स्वच्छतेचं असलं तरी या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र अजूनही दुषितच आहे. स्वच्छता करतो ते वाईट की जे ही घाण करतात ते वाईट ? आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाहीये का?” असे प्रश्न विचारून त्यांनी सर्वांनाच निरूत्तर केले. गेल्या वर्षी मुंबईतील लोकल अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतात “ कितीही संकटे आली तरी हार मानू नये. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि मी ते तेवढ्याच आनंदाने जगणार आहे” असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिच्या जिद्दीचं कौतुक केलं. तर स्मशानभूमीत राहून जीवन जगणा-या मसणजोगी समाजातील पूजा घनसरवाडने घरात दिव्यांसोबतच अज्ञानाचा अंधार असताना चितेच्या प्रकाशात अभ्यास करून दहावीत ९१ % गुण मिळवले. तिच्या संघर्षाची कहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

याशिवाय एअरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी मिळवून ‘नासा’मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी युवा शास्त्रज्ञ स्वीटी पाटेला विज्ञान विभागासाठी सन्मानित करण्यात आले तर अत्याचारग्रस्त महिलांसाठी नेटाने लढणा-या आणि कुमारी मातांना आधार देणा-या नागपूरच्या डॉ. सीमाताई साखरे यांच्या ‘स्त्री अत्याचार विरोधी परिषद’ या संस्थेचाही गौरव यावेळी करण्यात आला.

प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री यांनी पुरस्कारांचे निवेदन केले. येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. हा उंच माझा झोका पुरस्कार सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर शिक्षकदिनी चार जणांचा पुण्यात होणार सन्मान

0
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) च्या वतीने ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार 2015-16’ जाहिर झाले आहेत. पद्मश्री राम मोहन, अ‍ॅनिमेशन क्षेत्र (मुंबई), सुभाष पवार, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), जयप्रकाश जगताप, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), धीमंत व्यास, क्ले मेशन क्षेत्र (मुंबई) या चार जणांना पी.ए. इनामदार (महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) यांच्या हस्ते अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षकदिनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत हायटेक हॉल, आझम कॅम्पस येथे हा पुरस्कार गौरव कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य रिषी आचार्य यांनी दिली.
दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना देण्यात येणार आहे.
अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना विलक्षण योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो.

कोंढव्यात भंगारच्या दुकानात स्फोट -1 ठार ; नारायणगावात ही वैमनस्यातून स्फोट…

0

पुणे -आज पुणे जिल्ह्यात स्फोटाच्या 2 घटना घडल्या यात एकाचा मृत्यू झाला .एक घटना कोंढव्यातील भंगारच्या दुकानात तर दुसरी नारायण गाव येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीवर घडली
कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशिन चौकाजवळ मरळनगरमध्ये भंगारच्या दुकानात जुन्या तोफगोळ्याच्या स्फोटात अस्लम निजामुद्दीन चौधरी (वय 20, रा. कोंढवा, मूळ उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या दुकानात आणखी एक जिवंत तोफगोळा सापडला.  तर नारायणगाव जवळील नंबरवाडी येथील एका शेतकर्‍याच्या दारात दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला आहे.कोंढव्यातील घटनेसंदर्भात असे सांगण्यात येते कि , अस्लमचे आजोबा असीम मोहंमद चौधरी (वय 60) व चुलतभाऊ इस्माईल मुस्तफा चौधरी (वय 18) हे जखमी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून असीम यांचा भंगाराचा एकत्रित व्यवसाय आहे. अस्लम हा दहा किलोच्या वजनाच्या मापाने तोफगोळ्याचे मागील कवच काढत होता. त्या वेळी अचानक स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर छर्रे लागल्यामुळे दोघांच्या डोळ्यांस इजा झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्फोटानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रकाश मुत्त्याळ, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक सुनील तांबे, बॉंबशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नारायणगाव येथील घटना सकाळीनऊच्या सुमारास घडली. शेतकऱ्याच्या दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. दुचाकी सुरु करत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर सापडले असल्यामुळे नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवीदास बबन काळे (रा. नंबरवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. काळे यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी घरासमोर लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. आज सकाळी काळे नऊच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते. त्यावेळी दुचाकी सुरु करण्यास गेले असता गाडी सुरु करताना जिलेटीन कांड्या व डिटोनेटरचा स्फोट झाला. या घटनेत काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायणगावचे पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करीत असताना त्यांना जिलेंटीन कांड्या व डिटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे हा स्फोट वैयक्तिक कारणातून वैमनस्यातून  घातपात करण्यासाठी केला असल्याचे समजते .

नारायण गावातील घटनास्थळी पाहणी करताना पोलीस
नारायण गावातील घटनास्थळी पाहणी करताना पोलीस

आय.एच.एस.डी.पी. अंतर्गत घरकुलांच्या दर्जाबाबत तडजोड नको – रवींद्र वायकर

0

सांगली : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजना म्हणजेच आय.एच.एस.डी.पी. अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका. कामाच्या दर्जाबाबत चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 253/1 येथील नियोजित गीता सहकारी हौसिंग सोसायटी जिजामाता कॉलनी स्थळ पाहणी तसेच बालहनुमान कॉलनी येथे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या दर्जा व सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिलीप कांबळे, महानगरपालिका आयुक्त अजीज कारचे, म्हाडाचे उपअभियंता विजयदत्त गायकवाड, शाखा अभियंता आबासाहेब भोसले, सहायक अभियंता शितल पाटील, मंगेश नायकवडी आदी उपस्थित होते.

घरकुलांच्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून श्री. वायकर यांनी या कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, कामाच्या दर्जाबाबत दहा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

महानगरपालिका क्षेत्रात दोन टप्प्यात ही योजना राबवण्यात येणार होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बालहनुमान कॉलनी येथील 175 घरांचा समावेश आहे. त्यातील 80 घरे बांधून पूर्ण असून 95 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 2009 साली सुधारित योजनेंतर्गत अन्य चार ठिकाणांचा समावेश करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात एकूण 3798 घरांची योजना मंजूर झाली. त्यापैकी 1395 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे आयुक्त अजीज कारचे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ निर्णय : वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी अध्यादेश

0
मुंबई : मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीत दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्याचे आदेश देण्यात आले असून बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातील दोन मागासवर्गीय सहकारी सूत गिरण्यांची निवड करण्याच्या‍ निर्णयाचा समावेश आहे.

वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (एमपीडीए) नुसार कारवाईसाठी या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय 23 जून 2015 रोजी घेण्यात आला आहे. त्‍यानुसार या अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यात अधिक वेगाने नागरिकीकरण होत असल्याने गृहनिर्माण, पायाभूत सुविधा तसेच इतर विकासकामांसाठी वाळूची गरज सतत वाढती आहे. त्यातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. या प्रकारांमुळे बऱ्याचदा वैध मार्गाने होणारा वाळूचा लिलाव रोखणे, लिलाव झाल्यास त्याला विविध मार्गाने आव्हान देऊन संघटितपणे अवैध उत्खनन करुन वाळूची तस्करी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर संबंधित वाळू तस्करांकडून संघटितरित्या हल्ला करण्यासह त्यांच्या अंगावर वाहने घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. त्यामुळे अधिनियमातील नावाच्या सुधारणेसह “वाळू तस्कर” आणि “वाळूची तस्करी” या दोन संज्ञांची व्याख्या करुन त्यांना कलम 2 मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. अधिनियमातील या सुधारणेमुळे संघटितपणे वाळूचे अवैध उत्खनन आणि तिची बेकायदेशीररित्या वाहतूक करणे या प्रकारांना आळा घातला जाणार आहे. वाळू तस्करांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशा तस्करांना मदत करणाऱ्यांवरही या अधिनियमानुसार आता कारवाई केली जाणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांसाठी पूर्वी असणारी 6 महिने स्थानबद्धतेची तरतूद आता या सुधारणेमुळे वाढवून एक वर्ष कालावधीसाठी करता येऊ शकेल. राज्यात एमपीडीएमध्ये सहा महिने स्थानबद्धतेची तरतूद आहे, ती आणखी सहा महिने जास्तीच्या कालावधीसाठी वाढविता येते. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आली आहेत. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात जीवनाश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीस हा कायदा लागू करण्यात आला आहे.

मागासवर्गीय सूत गिरण्यांची अर्थसहाय्यासाठी निवड

बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातील दोन मागासवर्गीय सहकारी सूत गिरण्यांची निवड करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या गिरण्यांमध्ये श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी मर्यादित, सागरवाडी (ता. बदनापूर, जि. जालना) आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूत गिरणी मर्यादित, केज (ता. केज, जि. बीड) यांचा समावेश आहे.

या सहकारी सूत गिरण्यांची प्रकल्प अहवालानुसारची किंमत 61 कोटी 74 लाख आहे. या सूत गिरण्यांना मंजूर आकृतीबंधाप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याबाबत यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, नांदेड, अमरावती, आणि बीड या कापूस उत्पादक जिल्ह्यातील 80 टक्के तर उर्वरीत क्षेत्रातील 20 टक्के सहकारी सूत गिरण्यांना शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकारी सूत गिरण्यांच्या स्थापनेसाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे शासकीय भागभांडवल मंजूर करण्याची योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीसाठी सभासद भांडवल पाच टक्के, शासकीय भागभांडवल 45 टक्के आणि शासकीय कर्ज 50 टक्के याप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येते. आकृतीबंधानुसार मागासवर्गीय सूत गिरण्यांसाठी शासकीय भागभांडवलाची रक्कम विशेष घटक योजनेंतर्गत वितरित करण्यात येते. 50 टक्के कर्जासाठी समाजकल्याण विभाग निधी उपलब्ध करून देतो. तसेच पाच टक्के सभासद भागभांडवलासाठी शेअर खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येते. या दोन्ही सुतगिरण्यांच्या उभारणीनंतर संबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळून या क्षेत्रातील विकासास चालना मिळणार आहे.

राज्यात एकूण 35 मागासवर्गीय सहकारी सूत गिरण्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 16 सहकारी सूत गिरण्यांचा वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आला आहे. यातील 2 सहकारी सूत गिरण्यांची बहुराज्यीय कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यात सरासरीच्या 57 टक्के पाऊस, 49 टक्के पाणीसाठा
राज्याच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. राज्यात आजपर्यंत 530 मि.मी. पाऊस झाला असून तो 936 या सरासरीच्या 56.6 टक्के आहे. जलाशयातील सर्व प्रकल्पांत 49 टक्के एवढा पाणी साठा आहे.

राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे- नागपूर जिल्ह्यात 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस झाला असून अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा या चार जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 20 जिल्ह्यांमध्ये 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली असून यवतमाळ, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या नऊ जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस पडला आहे.

राज्यातील 355 तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के, 107 तालुक्यात 26 ते 50 टक्के, 152 तालुक्यात 51 ते 75 टक्के, 70 तालुक्यात 76 ते 100 टक्के आणि 21 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

राज्यात 95 टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 134.70 लाख हेक्टर असून 28 ऑगस्ट अखेर 127.89 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 95 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

राज्यात भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून लागवड झालेले भात पीक वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. खरीप ज्वारी व बाजरी पिके पोटरी ते फुलोरा अवस्थेत, मका पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत, तर तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उडिद, मुग व सोयाबीन पिके फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.

धरणात 49 टक्के पाणी साठा

राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत 49 टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 66 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे-

मराठवाडा – 8 टक्के (25), कोकण – 85 टक्के (92), नागपूर – 73 टक्के (65), अमरावती – 62 टक्के (53), नाशिक – 41 टक्के (62) आणि पुणे – 50 टक्के (84), इतर धरणे – 71 टक्के (91) असा पाणीसाठा आहे.

दोन हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील 1576 गावे आणि 2896 वाड्यांना आजमितीस 1989 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास 350 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

रोहयोच्या कामावर 89 हजार मजूर

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 22 ऑगस्टपर्यंत 12 हजार 264 कामे सुरू असून या कामांवर 88 हजार 845 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 26 हजार 635 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1303.38 लाख एवढी आहे.

 

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी वीजदर – अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

0

पुणे : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात

व 3 रुपये 71 पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे

आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 71 पैसे अधिक इंधन

अधिभार असे वीजदर आहेत. हा दर घरगुती वीजदरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्य

वीजजोडणीतून गणेश उत्सवासाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक

उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या

वीजजोडणीचा दर घरगुती वीजदरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत

वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास

शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर

होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह

अपघाताची मोठी शक्यता असते.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी 24 तास सुरु असणारे

टोल फ्री 18002003435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधीत क्षेत्रातील

महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा

गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर

सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात

घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये

तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आय.एम.ई.डी.गेम्स महोत्सवातील विजेत्यांना डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान

0
 
विद्यार्थ्यांनी कलागुणांना हिर्‍यासारखे चमकवावे : डॉ.सचिन वेर्णेकर
पुणे :
‘चॉईस, चान्स, चेंज हे तीन ‘सी’ आयुष्यात अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना हिर्‍यासारखे चमकवावे. हे कला गुण पुढे आणण्यासाठी आयएमईडी गेम्स महोत्सवासारख्या स्पर्धा महोत्सवाचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होतो.’ असे प्रतिपादन डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) यांनी केले.
 ते ‘भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘आयएमईडी गेम्स्’ या स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. आयएमईडीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळणे या प्रमुख हेतूने आयएमईडी गेम्स महोत्सवाचे आयोजन दरवर्षी आयएमईडीमध्ये करण्यात येते. डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी डॉ. अजीत मोरे, डॉ. प्रविण माने, डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. रणप्रीत कौर, डॉ. भारतभूषण सांक्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवाला ‘ग्लोबल टेक्नॉलॉजी’चे उपाध्यक्ष अभय जहीराबादकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. प्रविण माने, बलजित कौर, प्रभात कुमार यांनी या महोत्सवाचे संयोजन केले होते.
 या महोत्सवातील स्पर्धांमधील वक्तृत्व स्पर्धेत गार्गी घोष (प्रथम), अ‍ॅड मॅड शो स्पर्धेत ईशा चावला आणि अक्षता हेलन (विभागून प्रथम), डेव्हलपिंग वेबसाईट स्पर्धेमध्ये विक्रम आणि सौरव (विभागून प्रथम), टेक्नो इव्हेंट (ASPHALT 8) स्पर्धेमध्ये राहूल धानुका (प्रथम), टेक्नो इव्हेंट प्रोगॅ्रमिंग स्पर्धेत प्रदीप कुमार आणि नीरज कुमार (विभागून प्रथम), मुक्त निर्मिती क्षमता स्पर्धेत अंजली आणि वैशाली, माझे चित्र माझी गोष्ट स्पर्धेत कौशिक ओसवाल (प्रथम), सर्वोत्तम उद्योजक स्पर्धेत स्मृती शंकर, उत्तम व्यवस्थापक बिहजाद, फ्लेमलेस कुकींग स्पर्धेमध्ये स्वीटसी आणि अनन्या (विभागून प्रथम) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

माउथ ऑर्गनवादकांचा गायन सोहळा संपन्न

0

पुणे-

सुप्रसिध्द माउथ ऑर्गनवादक शामकांत सुतार यांच्या शिष्यासमवेत माउथ ऑर्गनवादन संपन्न झाले . एरंडवणामधील मेहंदळे गेरेजजवळील मनोहर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला . यावेळी दि ट्रेन , कर्ज , कटी पतंग ,आराधना गाईड , शर्मिली , , खेल खेलमे , वक्त , बॉबी आदी चित्रपटातील सुमधुर अवीट गाण्यांची अनोखी मैफिल  माउथ ऑर्गनवादकाने  रंगली . यावेळी रशीद शेख , किरण एकबोटे , अनिल देशपांडे , सचिन खाडे , आदी वाद्यवृदानी साथ दिली . कार्यक्रमाचे निवेदन महेश गायकवाड यांनी केले . यावेळी सुप्रसिध्द माउथ ऑर्गनवादक शामकांत सुतार , अनिता कुदळे , प्रताप बसाळे , डॉ नरेद्र लोहोकरे , अश्विनी परांजपे , कौस्तुभ देशपांडे , प्रकाश वर्मा , मुकुंद परांजपे , पूर्वा बावडेकर , पार्थ देसाई , प्रकाश कुलकर्णी , ओमकार येरवडेकर , संग्राम येरवडेकर , समृद्धी पुजारी , उन्मेष कुलकर्णी , प्रतिक बोरा , श्रीकांत वैद्य , अथर्व वाळिंबे , वसंतराव कुलकर्णी , चिन्मय कुलकर्णी , विजय बागुल , संजय कुलकर्णी , अक्षय देशपांडे , संदीप कुमठेकर , अमित मालसे , प्रसन्न पुजारी , प्रताप पानडे आदीं माउथ ऑर्गनवादकानी  माउथ ऑर्गनवादकावर गाणी गायली .

unnamed

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुणे कॅम्प विभागाच्यावतीने सत्यनारायण महापूजा संपन्न

0

पुणे-

श्रावणमासानिमित पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुणे कॅम्प विभागाच्यावतीने सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न झाली . पुणे कॅम्प मधील महात्मा गांधी रस्त्यावरील स्टर्लिंग सेंटरमध्ये हि सत्यनारायण महापूजा झाली . यावेळी पांडुरंग बंदिष्ट गुरुजी यांनी महापुजा केली . यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पुणे कॅम्प विभागाचे अध्यक्ष प्रमोद परुळेकर , उपाध्यक्ष अरविंद निंबाळकर , वैजनाथ कानडे , राजेद्र कवडे , गजानन कवडे , अतुल भुजबळ , कुमार जांभुळकर , शशिकांत तोटे , राजू सावंत , हर्षवर्धन संकपाळ , राजू भागवत , अर्पित परुळेकर , दत्तात्रय परुळेकर , बापू शिंदे आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते . यावेळी  पुणे कॅंटोन्मेंट बँकेचे संचालक पोपट गायकवाड , पत्रकार महेश जांभुळकर , शंकर जोग उपस्थित होते .  या वेळी विविध वर्तमानपत्राचे वितरण प्रतिनिधी , कर्मचारी , ग्राहकवर्ग उपस्थित होते . यावेळी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले . सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला .

unnamed

परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे उदघाटन संपन्न

0

2

पुणे-

रास्ता पेठमध्ये युनिटी कॉम्प्लेक्समध्ये परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे उदघाटन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . पुणे शहरात गेली १४ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारी परफेक्ट उत्कृष्टपणे कार्य करीत आहे . यावेळी परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे संस्थापक  इरफान सय्यद हीना सय्यद , नगरसेवक अविनाश बागवे , मयुर झेंडे , रईस सुंडके ,आदनान शेख , फरहान सय्यद , बांधकाम व्यावसायिक आरिफ सय्यद , परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे कोंढवा शाखा प्रमुख मोबीन सय्यद , मुश्ताक खान , जाफर सय्यद तारिक शेख , शफिक सय्यद , रफिक सय्यद , मंगेश परतानी, जलाउद्दिन खान  आदी मान्यवर व शिक्षक ,पालक  विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत हीना सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन मारिया देठे यांनी केले तर आभार परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे प्रमुख इरफान सय्यद यांनी केले . या कार्यक्रमाचे संयोजन शहानवाज शेख , अशरफ  दिल्लीवाला , नवाज इनामदार , समीर सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले . परफेक्ट शैक्षणिक संकुल दीड हजार चौरस क्षेत्राफळात पाच वर्गखोल्या असून , मॉर्डन अम्युनिटीज , वातानुकुलीत वातावरनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत . तसेच सुरक्षेसाठी  सी सी टी व्ही यंत्रणा , ई – लर्निंगद्वारे आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे .

राजाराम पूल ते म्हात्रे पूल रस्ता अपघात प्रवण करण्याचे काम महापालिकेचे … खर्डेकर

0
2
पुणे- राजाराम पूल ते म्हात्रे पूल रस्ता अपघात प्रवण करण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे असा आरोप भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी केला आहे
या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे या पत्रात असे म्हटले आहे कि ,
राजाराम पूल ते म्हात्रे पूल या डी.पी रस्त्यावर सुरु असलेले कॉन्क्रीटीकरण काम अचानकपणे थांबविण्यात आले व शहरातील उत्तम रस्त्यांपैकी एक असलेला हा रस्ता अपघात प्रवण करण्याचे पातक मात्र मनपा प्रशासनाच्या उत्तम नियोजनास दिले पाहिजे.
राजाराम पूल ते हॉटेल आमची पर्यंत अर्धा रस्ता कॉन्क्रीटीकरण झाले आहे तर त्याच्या पुढे असलेल्या ज्ञानदा शाळेसमोर रस्ता अर्धा खोडून ठेवला असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्याच्या पुढे म्हणजे शुभारंभ मंगल कार्यालयासमोर तर हा रस्ता खरवडून ठेवला आहे.
मनपा प्रशासन या रस्त्यावर अर्धवट काम करून एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का ?
या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात,कृपया त्याचे योग्य निराकरण करावे अन्यथा आंदोलनास बाध्य व्हावे लागेल यांची नोंद घ्यावी.
 याच बरोबर या पत्रातून त्यांनी काही प्रश्न हि आयुक्तांना केले आहेत …ते पुढीलप्रमाणे
१) सदर काम का थांबविले ?
२) सदर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण पूर्ण ३० मीटर चे करणार का ते ही अर्धवट ? त्यासाठी रुंदीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ?
3) नदीपात्रातील रस्ता म्हात्रे पुलाखालून या डी.पी रस्त्यास कधी जोडणार ? तेव्हा या कॉन्क्रीटीकरण झालेल्या रस्त्यास खोदावे लागणार नाही ना ?
४) हा रस्ता राजाराम पुलाच्या पुढे पूर्ण करण्यात काय अडथळे आहेत ? तेथे हा शिवणे खराडी नियोजित मार्गास जोडला जाईल का ?
5) पोलीस खाते व मनापा अधिकार्यांनी पूर्वी केलेल्या निर्णयानुसार या रस्त्यावर फुटपाथ बांधणे व रोड डिव्हायडर टाकण्याचे काम केले जाणार आहे किवा कसे याचा ही खुलासा आवश्यक आहे.
वरील मुद्द्यांचा खुलासा करावा व या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांचा त्रास दूर करावा तसेच संभाव्य अपघात टाळावेतअशी मागणी हि खर्डेकर यांनी या पत्राच्या शेवटी केली आहे

गणेशोत्सवाचे सामाजिक व राष्ट्रीय रूप अधिक बळकट करूया ! कै. अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी निमित्त ज्ञानप्रबोधिनीचा निर्धार

0
पुणे :
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांचा स्नेहमेळावा दि. 30 ऑगस्ट 2015 रविवार रोजी संपन्न झाला. प्रमुख मंडळांच्या सदस्यांनी कै. आप्पा व ज्ञान प्रबोधिनी यांच्या गणेशोत्सवातील विविध कामांबद्दलच्या स्वत:च्या आठवणी जागवल्या. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला आणि माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई यांनी कै. आप्पांबरोबर समाज ऐक्य समिती स्थापन करतानाचे अनुभव सांगताना सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सवाचे महत्त्व विषद केले. राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय विचारसरणी युवकांमध्ये रुजवण्याचे काम कै. आप्पांनी केले असे मत श्री. मोहन गुजराथी यांनी मांडले. तसेच, गणेशमंडळांचे प्रतिनिधी सूर्यकांत पाठक, बबन पांडे, नंदू घाटे, रवींद्र रणधीर, पराग ठाकूर, आनंद सराफ, नवनाथ जाधव यांनी गणेशोत्सवातील विधायक सहभागाबद्दल मंडळांना आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट म्हणाले ‘ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी बर्ची नृत्य, भगवा ध्वज लावणे, सर्व जाती धर्मांच्या स्त्री पुरुषांच्या हस्ते गणपतीची पूजा व आरती करणे, देवादासीनाही पूजेचा मान देणे, प्रतिष्ठापनेची वेगळी पोथी अशा काही सुधारणा गणेशोत्सवात रूढ केल्या. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सुरू केलेले काम पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करूया.’
ते पुढे म्हणाले, ‘ॠषीपंचमीला तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी विद्यारंभ संस्कार, गौरी विसर्जनानंतर मातृभूमीपूजन, गणेश प्रतिष्ठापनेच्या व आरतीच्या वेळी समूह भावनेला पोषक व समजघडणीचे सामुहिक संकल्प करूया. याची पहिली पायरी म्हणून किमान हिंदुस्थानची स्वयंभू चित्रमूर्ती आपल्या मंडपात ठेवूया. आरतीनंतर तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना म्हणूयात. या सारखे गणेशोत्सवाला विधायक वळण देणारे कार्यक्रम सुरु करू शकलो तर गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाच्या दिशेने आपण काही पावले टाकू शकू.’
गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याच्या प्रयत्नात ज्ञानप्रबोधिनीच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे’, असे मत गणेशोत्सव चळवळीत कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै. अप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित गणेशोत्सव कार्यकर्ते, मंडळाच्या स्नेहमेळाव्यात हे मत व्यक्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक जोग यांनी केले. याप्रसंगी आशुतोष बारमुख, तुषार माडीवाले, आकाश चौकसे, ओंकार प्रधान, सोहम केळकर उपस्थित होते.

संथारा व्रतावर घातलेली बंदी उठविली …

0
नवी दिल्ली – राजस्थान उच्च न्यायालयाने जैन समाजातील संथारा व्रतावर घातलेली बंदी उठवित सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) राजस्थान उच्च न्यायालय व केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे.
राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा व्रतावर घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होताना न्यायालयाने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला व राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. 
जैन समाजामध्ये “संथारा व्रत‘ केले जाते. या व्रतामध्ये स्वयंप्रेरणेने मृत्यूपर्यंत उपवास करण्यात येतो. या व्रताला विश्‍व हिंदू परिषदेने समर्थन दर्शविले आहे. “संथारा म्हणजे जैन-मुनींकडून आत्महत्या करण्याचा प्रकार नव्हता आणि नाही. सध्याच्या जीवनातून मोक्ष मिळवून पुनर्जन्म मिळावा असा त्याचा अर्थ असून हे व्रत 2500 वर्षांपासून सुरु आहे‘ असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नरपत सिंह शेखावत यांनी व्यक्त केले होते.
जैन समाजात अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. यात जेव्हा व्यक्तीला वाटते की त्याचा मृत्यू जवळ आला आहे, तेव्हा तो स्वतःला एका खोलीत बंद करुन घेतोआणि अन्न-पाण्याचा त्याग करतो. मौनव्रत धारण करतो. त्यानतंर तो कोणत्याही दिवशी त्याचा मृत्यू होतो.संथाराचे प्रमाण केवढे आहे हे सांगणे अवघड आहे. त्याचा काही रेकॉर्ड उपलब्ध नाही. मात्र जैन संघटनांच्या माहितीनूसार दरवर्षी 200-300 लोक संथारा प्रथेनूसार देहत्याग करतात. एकट्या राजस्थानमध्ये हे प्रमाण 100 पेक्षा जास्त आहे.
संथारा परंपरेचा वाद नऊ वर्षांपासून कोर्टात सुरु होता. निखिल सोनी नावाच्या व्यक्तीने 2004 मध्ये याचिका दाखल करुन ही प्रथा म्हणजे इच्छा मृत्यू असल्याचा त्यांनी युक्तीवाद केला होता. राजस्थान हायकोर्टाने यावरुन संथारा करणाऱ्यांवर कलम 309 अर्थात आत्महत्येचा प्रयत्न यानूसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. संथारासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कलम 306 नूसार कारवाई करण्यास कोर्टाने सांगितले होते. याला जैन संतांनी विरोध करत कोर्टाने संथाराची योग्य व्याख्या केली नसल्याचे म्हटले होते. संथाराचा अर्थ आत्महत्या नाही तर आत्म स्वातंत्र्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

अगोदर शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा मगच शेतमालाच्या किमती कमी करता येतील- शरद पवार

0
पुणे – “”महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालाच्या किमती कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,अगोदर शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा मगच शेतमालाच्या किमती कमी करता येतील ‘‘ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. सामान्य माणूस आणि उत्पादक या दोघांच्याही हिताचे धोरण राबविण्याची गरज आहे; परंतु आज तसे होत नसल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सोपान कांचन या वेळी उपस्थित होते. 

श्री पवार पुढे म्हणाले , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामान अंदाज यंत्रणेकडून माहिती घेतली असता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पारंपरिक अवर्षणग्रस्त भागात पाऊस यंदा जुलै व ऑगस्ट महिन्यात खूप कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. त्यामुळे आता सर्व भिस्त सप्टेंबर महिन्यातील पावसावर आहे.
सध्या उद्योग क्षेत्रात सर्वत्र मंदी दिसत आहे. पण बहुसंख्येने असणाऱ्या शेतकऱ्यांची क्रयशक्ती अथवा खरेदी शक्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही मंदी दूर होणार नाही, असे मला वाटते.
बाजारभाव कमी आणावयाचे असल्यास खते आणि शेतीसाठी असणाऱ्या निविष्ठा यांचे भाव कमी करावे लागतील. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी करावा लागेल. जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी भूमिका अधिवेशना दरम्यान मांडली.
हवामान आणि विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. दुष्काळा, गारपीट आणि अवकाळी पाऊस गेल्या काही वर्षांपासून नित्याचे झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीवर प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान सरकारने द्यावयास हवे. पीक कर्जे उपलब्ध करणे, तसेच शेती संदर्भातील दीर्घ मुदतीच्या कर्जाकरीता व्याज दर देखील कमी केले पाहिजेत. ज्या प्रमाणे स्टील उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारने कर कमी करण्याचे पाऊल टाकले, त्याप्रमाणेच शेती वाचवण्यासाठी हाच न्याय लावावा, अशी आमची मागणी आहे.
इंडोनेशिया देशात अतिशय कमी पाण्यावर अगदी कोरडवाहू प्रमाणे तग धरणारी (Drought Resistant) ऊसाच्या वाणाची लागवड केली जाते. ते वाण भारतात आणता येईल का, यासाठी वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काही सदस्य मी त्या देशांत पाठवणार आहे. कमी पाण्यावर ऊसाची शेती यशस्वी झाल्यास, शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल.

नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने प्रभाग क्र .६४ मध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान

0

पुणे- नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने प्रभाग क्र .६४ मध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पितळे नगर येथील रस्ता सुशोभीकरण करण्यात आले त्याचे उद्घाटन राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले या प्रसंगी नगरसेवक श्रीनाथ भिमाले,.नगरसेविका सौ.वंदना भिमाले,स्विकृत सदस्य संदिप पारखे, ऊद्यान अधिक्षक.यशवंत खैरे,अशोक घोरपडे,प़ो.निरीक्षक सर्जेराव बाबर,सहाआयुक्त अविनाश सकपाळ,पुणे सिटीझन्स फोरमचे दिलीप मेहता व कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित  होते