Home Blog Page 3563

चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाचे उद्घाटन

0

पुणे-चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीष बापट यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सदाशिव पेठेतील काकडे जोग सदनमध्ये या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला . या उद्घाटन सोहळ्यास चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड संचालक प्रशांत धुमाळ ,  संचालक संतोष रोकडे , मुख्य वितरक क्रांती खांडरे , सुहास कुलकर्णी , महेश धुमाळ , अंकुश साळुंके , सयाजी शेंडकर , वनश्री चंदवालिया , महेंद्र गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते .

   चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड पुणे शहर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात विविध दुग्ध खाद्य पदार्थ वाजवी व माफक दरात विक्री करीत आहे . यामध्ये गायीचे दुध व गायीचे शुध्द गावरान तूप विक्रीसाठी उपलब्ध आहे . त्यामध्ये एक लिटर गायीच्या दुधासोबत १५ ग्रमचे १० रुपयाचे   गायीचे तूप मोफत पाकीट देण्यात येते . अशी माहिती चिंतामणी मिल्क व मिल्क प्राडक्टस प्रायव्हेट लिमिटेड संचालक प्रशांत धुमाळ यांनी सांगितले .

     या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक विष्णू हरिहर ,  नगरसेवक दिलीप काळोखे , नगरसेवक धनंजय जाधव , बाळासाहेब मालसुरे , स्वीकृत नगरसेवक नामदेव माळवदे , प्रमोद कोंढरे , राजू परदेशी , विशाल पवार , स्वीकृत नगरसेविका शोभा गोखले , माजी नगरसेविका मदिना तांबोळी , माजी नगरसेविका कल्पना जाधव , सातारा तहसीलदार आशा होळकर , भोर सर्कल अधिकारी सुषमा लक्षशेट्टी , आशा शिंदे , वनमाला शिंदे , योगिता गोगावले , रागिणी खडके , मुक्ता खंडागळे , अभिनेते मिलिंद शिंत्रे ,नितीन जाधव , सयाजी शेंडकर ,आशिष काळे, नितीन खिरीड , ज्ञानेश्वर भापकर , मधुकर चिल्लाळ  आदी मान्यवर व दुग्ध व्यावसयिक उपस्थित होते .

जेलभरो आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार – फौजिया खान

0

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.१४ व १५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या जेलभरो आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण पक्षाच्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. लवकच महिला पदाधिकाऱ्यांची विभागीय, जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असेही फौजिया खान यांनी यावेळी सांगितले.
तसेच ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर रोजी पक्षसंघटना वाढीसाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलडाणा जिल्हयाचा दौरा चित्रा वाघ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेल, डाळ, धान्य यांचे भाव गगनाला भिडत आहेत. आघाडी सरकार असताना अन्न सुरक्षेच्या माध्यमातून रेशन दुकानांवर अन्न-धान्य दिले जात होते. पण आता नव्या सरकारने ते सुद्धा बंद पाडले. तेल, डाळ रेशन दुकानावर पुन्हा एकदा मिळालेच पाहिजे, यासाठी आम्ही सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती फौजिया खान आणि चित्रा वाघ यांनी दिली.

सातारा जिल्हा रुग्णालयात कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग सुरु

0

सातारा(जिमाका) : निरोगी राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असून आपले आरोग्य आपल्या हाती हा मंत्र जोपासल्यास उपचार करुन घेण्यापासून सुटका मिळेल, असे सांगतानाच जिल्हा रुग्णालयात सुरु झालेला कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला निश्चितपणे फायदेशिर ठरेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी केले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयामध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराड यांच्या सहकार्याने कॅन्सर बाह्य रुग्ण विभागाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. रामचंद्र जाधव, कर्करोग उपचार तज्ज्ञ डॉ. आनंद गुडूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, एनसीडी विभाग प्रमुख डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष नांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, आजार होवू नये, शरीर निरोगी रहावे यासाठी जीवनात आहाराला खूप महत्व आहे. त्यादृष्टीने आपली वाटचाल असावी. आपण काय खातो, काय खायला पाहिजे याचे चिंतन मननही करायला हवे. तंबाखू, सिगरेट सारख्या व्यसनांना दूर ठेवण्यासाठी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. रोगाची जेथे लागण झाली, तेथे गुणकारी उपचारही केले जात असतात. परंतु रोग होवूच नये यासाठी प्रतिबंधात्मक वाटचाल आयुष्यामध्ये ठेवायला हवी. कॅन्सरच्या रुग्णांवर अत्यंत वेदनादायक उपचार केले जातात. अशावेळी नातेवाईकांनी त्यांना जगण्याचा आधार, धिर दिला पाहिजे. जिल्हा रुग्णालयात सुरु झालेला कॅन्सर बाह्य रुग्ण विभागाचा फायदा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला निश्चितपणे होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपचार यावर सातत्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही ते शेवटी म्हणाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे म्हणाले, कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. त्यासाठी खूप महाग उपचार केले जातात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसतात. महाराष्ट्र शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग सुरु करुन सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये कराड येथील वैद्यकीय महाविद्यलायाच्या मदतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी डॉ. आनंद गुडूर हे स्वत: येऊन रुग्णांवर उपचार करणार आहेत. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही औषधोपचार मोफत करण्यात येईल. रुग्णांनी जास्तीत जास्त या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, स्वागत, प्रास्ताविक डॉ. सुधीर बक्षी यांनी केले. डॉ. गुडूर यांनी रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होत्या.

टंचाईबाबत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – अश्विन मुद्गल

0

सातारा(जिमाका) :जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी तसेच चारा याबाबत उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार ठेवावा. त्याचबरोबर उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करावी, अशा सूचना देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकरी अश्विन मुद्गल यांनी दिला.
पालकमंत्री विजय शिवतारे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईबाबत होणाऱ्या बैठकीतील विषयांचा पूर्व आढावा जिल्हाधिकारी श्री.मुद्गल यांनी आज नियोजन भवनमध्ये घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, उप वनसंरक्षक अनिल अंजनकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
सुरुवातीला श्री.सोमण यांनी तालुकानिहाय उपाय योजनांबाबत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.मुद्गल पुढे म्हणाले, तालुकनिहाय तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांनी कोणतीही कर्तव्यात कसूर न करता गावांमध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. यात प्रामुख्याने विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, नवीन विहिरींची कामे याला प्राधान्य द्यावे. 22-45 मध्ये विशेष दुरुस्ती योजना राबवावी. टंचाई कृती आराखडा तयार ठेवावा.पाण्याचा स्त्रोत दृष्टीकोनातून उपाययोजनांना सुरुवात करावी. केवळ नळ पाणीपुरवठा योजनेच्या नादुरुस्तीमुळे टँकर सुरु करणे, हे खपवून घेतले जाणार नाही. या कामात कसूर केल्यास गुन्हे दाखल केले जातील.
माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांचा सविस्तर आढावा घेऊन श्री.मुद्गल पुढे म्हणाले, उरमोडीचे पाणी माण मध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे निश्चितपणे तेथील टंचाईग्रस्त गावांमध्ये फरक पडेल. धोम बलकवडीचे पाणीही फलटण खंडाळयाकडे गेले पाहिजे. हे कालवे फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. आवश्यक त्या ठिकाणी 144 कलम जाहीर करा. पोलीस बंदोबस्त ठेवा. असे आदेश त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. धोम वगळता बाकीच्या धरणांमधील पाणी पातळी चांगली आहे. खटाव मधील पुसेसावळी प्रादेशिक पाणी योजना युध्दपातळीवर सुरु करावी. गावनिहाय नियंत्रण ठेवा. टँकर फिडींग पॉईंट सुस्थितीत ठेवून प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांचे कृती आराखडे तयार करावेत.
चारा टंचाईबाबतही आढावा घेऊन श्री.मुद्गल म्हणाले, चारा टंचाई होणार नाही याची खबरदारी आजपासूनच घ्या. ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध चारा आहे, तो संभाव्य टंचाईग्रस्त भागंामध्ये पाठविण्याबाबतही नियोजन करा. यावेळी सर्वच तालुक्यांमध्ये पुरेसा चारा उपलब्ध असल्याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकिला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

11988508_1606012672993348_2949102868481036690_n

पाणी सर्वाधिक महत्वाचा प्रथम प्राधान्याचा विषय ; शरद पवार

0

सातारा- यंदा सरकारने पाणी -चारा – रोजगार -शिक्षण शुल्क माफी याला या क्रमानेच प्रधान्य देत काम करणे गरजेचे आहे असे मत येथे शरद पवार यांनी मांडले

सातारा जिल्ह्यातील फलटण, माण आणि खटाव तालुक्यांना आजराष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांनी  भेट दिली. आणि येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

याबद्दल शरद पवार यांनी म्हटले आहे कि , वडुज येथे जिल्हा टंचाई आढावा बैठकीला उपस्थित होतो. यावेळचा दुष्काळ मला १९७२ च्या दुष्काळासारखा वाटतोय. सरकारने मोकळ्या हाताने मदत करण्याची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नाचे आम्हाला राजकारण करायचे नाही. प्रशासन आणि लोकांमध्ये काम करणारे घटक यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. लवकरच राज्य आणि केंद्र सरकारशी संपर्क साधून दुष्काळाबाबतची माहिती देणार आहे.

यावर्षी मराठवाड्यासोबतच नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या भागातही तितकीच परिस्थिती गंभीर आहे. याची नोंद सरकारने घेतली की नाही, याबाबत मला कल्पना नाही. पण मी त्यांना जाऊन सांगणार आहे.

दुष्काळाची परिस्थिती पाहता कर्जमाफीची तर मागणी आहेच. पण मला तरी सध्या प्राधान्याने चार महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात असे वाटते.
प्राधान्य क्रमांक एक – पाणी,
दोन – चारा,
तीन – रोजगार
आणि शेवटचं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफी.
त्याशिवाय शेतकऱ्यांकडून होणारी वसुली.
वसुली दोन प्रकारची आहे. मग ती केंद्र किंवा राज्य सरकारची असेल, सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकांची वसुली असेल. सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकाची वसुली थांबवण्याचा काही प्रमाणात अधिकार राज्य सरकारला आहे. केंद्र सरकारला अधिकचे अधिकार आहेत. म्हणून हा प्रश्न दोघांसमोरही मांडावा लागेल. ही भूमिका आम्ही घेणार आहोत. ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, त्या त्यांनी तातडीने कराव्यात. त्याचा जास्त बोजा राज्यावर पडणार नाही, अशीही आमची मागणी आहे.

ऊस गाळप आणि कारखाने बंदीवर काही विधानं केली जात आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, पुणे येथील पाटबंधारे खात्यातील एक अधिकारी मला सांगत होते की, सप्टेंबरनंतर पाण्याचे एकच रोटेशन दिले जाणार आहे. याचा अर्थ ऑक्टोबर ते जून महिन्यापर्यंत पाणी मिळणार नाही. मग ऊस, द्राक्षबागा टिकणारच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये फळबागा असो किंवा बारा महिन्यांचे पीक असो, त्याला आर्थिक मदत देण्याची गरज आहे. सरकारने याची पूर्तता करावी. जर पाणीच देऊ शकत नसतील तर सरकारने तो ऊस घेऊन चाऱ्यासाठी वापरावा.

गेल्या वर्षीही दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी माझ्याकडे हा विषय आला असताना चारा छावण्याबद्दल खाली जे अधिकार दिले होते, आज ते अधिकार देण्याची गरज आहे. हे आम्ही राज्य सरकारशी बोलणार आहोत. आजच्या बैठकित काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून झाले आहेत. पण उत्तर येण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस त्यांना वाट पाहावी लागते. त्यापेक्षा आम्ही ज्याप्रकारे खालच्या स्तरावरच अधिकार घेण्याची मुभा दिली होती, त्याप्रकारचे अधिकार आज खाळी द्यायला हवेत.

आमच्या भूमिकेवर काही लोक टीका करत आहेत. पण पंधरा वर्ष असा दुष्काळ पडला होता का? ज्यावेळेस संकट येतं त्यावेळी तिथे जावंच लागतं. टीका करणाऱ्या लोकांना दुष्काळाच्या संकटाचे तारतम्य असतं तर अशी वक्तव्ये त्यांनी केली नसती. गेली दहा वर्षे मी देशाचा कृषिमंत्री होतो. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालं. कारण दुष्काळ नव्हता.असे हु शरद पवार यांनी नमूद केले आहे

पुण्याला सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय- महापालिकेने जाहीर केले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक

0

पुणे, दि. 7 – पुणे शहराला येत्या सोमवारपासून ( सात सप्टेंबर) एक दिवसाने(दिवसा आड) पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत झालेल्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला.

पावसाने दिलेली ओढ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा याचा आढावा घेता पुण्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. या बैठीस महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याबरोबरच सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते.

बैठकीत पुण्यास पुरवठा करणाऱ्या धरणातील साठा आणि त्याअनुषंगाने करावयाचे नियोजन याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा केला तर सध्या उपलब्ध असणाऱ्या साठ्यात पुढील जुलैपर्यंतचे नियोजन करता येणे शक्य होईल. यामध्ये परतीचा पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचेही सांगण्यात आले. टंचाईच्या स्थितीत केवळ पुण्याचाच नाही तर खालील भागातील गावांचाही पाणीपुरवठ्याचा विचार करावा लागेल. कारण पुरंदर आणि दौंड तालुक्यातील काही गावांतील पाणीपुरवठा योजनाया पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांचाही विचार करावा लागेल, असे सांगण्यात आले. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जावा असे सांगितले. त्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी मान्यता दिली. ही कपात सुमारे तीस टक्के आहे.

एक दिवसाने पाणी पुरवठा करताना त्याबाबतचे वेळापत्रक महापालिका प्रशासनाने तयार करावे. वेळापत्रकाची माहिती पुणेकरांना नीट होईल याची काळजी घ्यावी. बांधाकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असेल तर अशा ठिकाणची कनेक्शन तोडण्याची कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री बापट यांनी दिल्या.
एकदिवसाआड पाणी आल्यामुळे पुणेकर नागरिक पाणी साठवून ठेवणार. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री बापट यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की, पाण्याचा गैरवापर टाळला जावा यासाठी महसूल प्रशासन आणि जलसंपदा विभागांची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. पुणे शहरातही पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करता येणे शक्य आहे. तसा आदेशही काढण्याची तयारी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने एक प्रस्ताव द्यावा, असे सांगितले.
बैठकीस स्थायी समितीच्या अध्यक्षा मनिषा कदम, अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, बंडू केमसे, हरणावळ, त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे अतुल कपोले, खडकवासला प्रकल्पाचे अभियंता लोहार आदी उपस्थित होते.

महापालिकेने जाहीर केले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा साजरा करणार ..

0

श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा येत्या रविवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा होत आहे . त्यानिमित पुणे शहर जिल्ह्यातील मेहेतर बाल्मिकी समाज बांधव भगवान श्री जाहरविर गोगादेव जयंती उत्सवउत्साहात  साजरा करतात .

    श्री गुरु गोरक्षनाथजींचे शिष्य श्री भगवान वीर गोगादेव , त्यामुळे श्री भगवान वीर गोगादेव यांनी वचन दिले होते कि , जो कोणी निशानाची पूजा मनापासून करेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील . श्री भगवान वीर गोगादेव  यांचे जन्मस्थान राजस्थानमधील गद्रेवा गाव तर राजस्थान मध्येच हनुमानगड येथे समाधीस्थान  ( गोगामेढी ) आहे . गोगामेढीमध्ये देखील जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो . पुणे शहर जिल्ह्यात पवित्र श्रावण मासाच्या पहिला दिवसापासूनच नागपंचमीपर्यंत सर्व निशानांची स्थापना केली जाते . मेहेतर बाल्मिकी समाज बांधव निशानांची स्थापना करतात . या निशानांची सजावटीमध्ये मोरपीस , शेरा , श्रीफळ , दुपटा वापर  करतात . काही निशानामध्ये चांदी , विद्युत रोषणाईनी सजावट करतात . जिथे निशानाची स्थापना केली जाते त्या ठिकाणाला आखाड म्हणतात . या आखाड्यात तीन प्रमुख लोक असतात . यामध्ये निशानाची पूजा करणारा भगत , गोगादेवांची पूजा करणारा , भजन , कीर्तन करणारा खलिपा , निशाण सजविणारा , देखभाल करणारा , निशानाना घेऊन जाणारा सवई घोडे , तर बाकीचे सेवक म्हणून काम करतात . हे सर्व जण व्यसनमुक्त राहून मासांहार व्रज्य करतात . चप्पल न घालणे , केस न कापणे , पांढरे वस्त्र परिधान करणे आदी व्रत नियमाने पाळावे लागतात .

2

  अनेक वर्षापासून निशानाची स्थापना केली जात आहे , पेशवे काळात बसणारे निशानाना पेशव्यांनी ताम्रपट दिल्याची पत्र आहेत . ब्रिटीशकाळातील कागदपत्रे आज देखील आपणास पाहण्यास उपलब्ध आहेत . पुण्यामध्ये मानाचे बसणारे निशाण म्हणजे भवानी पेठ हरकानगरमधील रामलाल भगत निशाण आखाडा , नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा ), भवानी पेठ हरका नगरमधील बाराभाई भगत निशाण आखाडा , खडकमाळआळी मधील भगवान भगत निशाण आखाडा , मंगळवार पेठ श्रमिक नगरमधील कैलाश भगत  निशाण आखाडा , भवानी पेठमधील हरकानगरमधील गोपाळ भगत निशाण आखाडा आदी मानाचे निशाण समजले जातात . आता पुण्यात एकूण ४० निशाण आहेत . यामध्ये पुणे कॅम्प भागातील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत  २४ निशाण सहभागी होतात , तर खडकीमधील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत  १६ निशाण सहभागी होतात .

  कोरेगाव पार्क बर्निंग घाट , औंध , पाटील इस्टेट , सदाशिव पेठ , रामटेकडी , वानवडी , हडपसर , घोरपडी गाव , नवा मोदीखाना , हरकानगर , एम जी रोड , ससून कर्मचारी वसाहत , ताडीवाला रोड , खडकमाळआळी , मंगळवार पेठेतील श्रमिक नगर आदी भागातील २४ निशाण  पुणे कॅम्प भागातील मिरवणुकीत सहभागी होतात . तर खडकी पिंपरी- चिंचवड  , साप्रस , रेंजहिल्समधील १६ निशाण खडकीमध्ये निघणारी मिरवणुकीत सहभागी होतात . या श्रावणमासात मेहेतर बाल्मिकी समाज बांधव  निशान घरोघरी बोलवितात , आपल्या घरी सुख समृद्धी येऊ दे , वीर गोगादेवजीचा आपला कृपा आशीर्वाद मिळू दे हा त्या मागचा उद्देश असतो . त्यालाच ” मिनी बागड ” असे म्हटले जाते . या निशांणाच्या मिनी बागडमध्ये मिरवणूक , भजन कीर्तन , रात्रभर गोगागायन होते यावेळी पारंपारिक डेरू वाद्य व ढोलचा समावेश असतो . यावेळी  सर्वासाठी महाप्रसाद दिला जातो .

  श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळाच्या दिवशी सायंकाळी पुणे कॅम्प भागात भव्य मिरवणूक काढली जाते . या मिरवणुकीची सुरुवात  नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा )ची पूजा करून होते . यावेळी सर्वजाती धर्मातील समाज बांधव सहभागी होतात . शहरातील राजकीय , सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक मधील मान्यवर व्यक्ती मिरवणुकीत सहभागी होतात . या मिरवणुकीत डॉल्बी , डी. जे. स्पिकर्स नसतो . तर पारंपारिक वाद्य , बंण्ड , ढोली बाजा , ढोल लेझीम , झांज पथकाचा समावेश असतो . हि मिरवणूक नवा मोदीखाना , गुडलक हॉटेल चौक , कुरेशी मस्जिद चौक , सेंटर स्ट्रीट , भोपळे चौक , खरीपेढी , सेटर स्ट्रीट पोलिस चौकी , साचापीर स्ट्रीट , महावीर चौक , महात्मा गांधी रोड , संत नामदेव चौक , मोहम्मद रफी चौक , वीर गोगादेव चौक , १५ ऑगस्ट चौक या मार्गाने सर्व निशानाची मिरवणूक काढून पुलगेट पोलिस चौकीसमोरील गोगामेढी येथे मिरवणुकीची सांगता होते . या मिरवणुकीतील सर्व निशांणाचे पुणे महानगरपालिका , विविध राजकीय पक्ष , सामाजिक संस्था , गणेश मंडळे आदी स्वागतकक्ष उभारून स्वागत करतात . त्यांनतर प्रत्येक निशाण गोरखनाथांच्या स्थानाला पाच फेरी प्रदक्षिणा घालतात . सर्व निशाण गोगामेढीवर विराजमान होतात . त्यानंतर सर्व निशाण प्रमुखांचा पुणे लष्कर बेडा पंचायतच्यावतीने शाल , श्रीफळ देऊन मानसन्मान केला जातो . रात्री बारा वाजता महाआरती होते . यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते . अशा प्रकारे श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .

 या उत्सवाच्या संयोजनासाठी पुणे लष्कर बेडा पंचायत , लक्ष्मण सुसगोहेर , कविराज संघेलिया सुरेश मकवानी , किशोर संघेलिया , विक्रम गोहेर , करण मकवानी , दादा चव्हाण , शैलेन्द्र जाधव , संजय वाघिले , मुकेश चव्हाण , प्रकाश सोलंकी , राजेश सहेरिया , योगेश चव्हाण व  मेहेतर बाल्मिकी समाज बांधव परिश्रम घेतात .

रंगूूनवाला दंत महाविद्यालयात दुर्बिणीच्या साह्याने जबड्याची शस्त्रक्रिया-भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा

0
पुणे : जबड्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने करणे आता शक्य झाले आहे. पुण्यातील एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात नुकतीच ही शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरांनी अत्यंत माफक खर्चात ही शस्त्रक्रिया केली.
रंगूनवाला वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अद्वैत कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कामगिरी बजावून दुर्बिणीच्या साह्याने जबड्याची शस्त्रक्रिया हे संशोधन भारतामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. अद्वैत कुलकर्णी यांनी या यशाविषयी माहिती दिली.
खांदा, गुडघा या अवयवांना जसे जॉइट्स असतात. तसेच ते जबड्यालाही असतात. तोंड उघल्यानंतर कानाच्या खालून येणारा टकटक आवाज हा त्या जॉइंट्सचा असतो. अपघातामुळे अथवा वाढत्या वयामुळे हे जॉइंट्स हलतात. त्यामुळे जबडाही हलतो, अशी समस्या उद्भवल्यास पूर्वी शस्त्रक्रिया करताना ती चिरफाड करून करावी लागत असे. मात्र, ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने अर्थात एंडोस्कोपीने करता येऊ लागली आहे आणि ती ही माफक खर्चात. जर्मन आणि अमेरिकन उपकरणांनी शस्त्रक्रिया होऊ शकत नाही असे लक्षात आल्यावर काही उपकरणे ऐनवेळी तयार करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. अरुणा तंबूवाला आणि सहकार्‍यांनी मदत केली.
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. अद्वैत कुलकर्णी म्हणाले, ‘अमेरिका, चीन या देशांमध्ये ही समस्या जुनी आहे. आपल्याकडेही ती आता आढळू लागली असून, तरुणांमध्येही समस्या दिसून येते. हे टाळण्यासाठी सवयी बदलायला हव्यात, जांभई देताना, उलटी काढताना किंवा हसताना काळजी घ्यायला हवी. भारतात पूर्वी शस्त्रक्रिया चिरफाड करून करावी लागे, आम्ही दुर्बिणीच्या साह्याने केलेली ही शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असावी असा आमचा अंदाज आहे. ’ डॉक्टरांच्या चमूचे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, अधिष्ठाता रमणदीप दुग्गल यांनी अभिनंदन केले.
1

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व मजुरांना वेळीच कामे उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री

0

परभणी : मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून यंदाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. टंचाई स्थितीत शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता मनोबल भक्कम ठेऊन या परिस्थितीचा धीराने मुकाबला करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे केले.

यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, मोहन फड, बाबाजानी दुर्राणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. टी. कदम, माजी आमदार मिराताई रेंगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील टंचाई स्थितीची प्रत्यक्ष शिवारात पाहणी करुन शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या दारी आले आहे. यंदा ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पावसाअभावी वाया गेली आणि ज्यांनी पावसाच्या प्रतिक्षेत तयारी केली पण पेरणी करु शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेला तरी रब्बी हंगामासाठी शासनाने बियाणे आणि खते यांच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन केले असून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी वीज बिलात सूट देण्याचेही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे जनावरावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. जनावरांना जगविण्यासाठी ऑगस्ट महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अल्पकाळात तयार होणारा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. १० टक्के रक्कम जनावरांच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच चारा उपलब्ध नसल्यास परराज्यातूनही चारा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टंचाई स्थितीमध्ये मजुरांना अत्यंत माफक दरामध्ये 15 ऑगस्टपासून धान्य पुरवठा करण्यात येत असून या योजनेचा लाभ 60 लाख गरजू कुटुंबांना होणार आहे. अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी राष्ट्रीय महामार्ग दुरूस्ती तातडीने करावी – जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

0

अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग दुरूस्ती, डागडुजी, तातडीने करावी अन्यथा संबंधिताना कारवाईस सामोरे जावे लागले, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिले. महामार्ग दुरूस्ती व त्यासंबंधी महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, सहायक जिल्हाधिकारी तथा पेण येथील उपविभागीय अधिकारी निधी चौधरी, अपर पोलीस अधीक्षक राजा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले, गणेशोत्सवापुर्वी महामार्गाच्या दुरूस्तीची कामे संबंधित यंत्रणेने पूर्ण करावीत. तसेच या कामाची पाहणी करण्याकरिता पेण, रोहा, महाड प्रांत त्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी संबंधित कंत्राटदारासह अहवाल सादर करावा. डिमार्केशनसंदर्भात झालेल्या भुसंपादनानुसारही कार्यवाही करण्यात येईल. या महामार्गावर तयार झालेले काही रस्ते (पॅचेस) प्रशासनाच्या सहमतीने गणेशोत्सवासाठी वाहतुकीस खुले करण्यात यावे. भोगावती नदीवरील पूल, वडखळ येथील खड्ड्यांची दुरूस्ती आदीही कामे तातडीने पूर्ण करावी.

पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीनुसार राष्ट्रीय महामार्ग 17 वर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या पोलिसांनी अधोरेखित केलेल्या 42 अपघात प्रणव ठिकाणांवर साईन बोर्ड, ब्लिंकर, बॅरिकेट्स लावण्याबाबतचीही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णवाहिका सुसज्ज ठेऊन डॉक्टरांचे पथकही तयार ठेवावे. याखेरीज एस.टी. महामंडळाच्या बसेस, इतर वाहतूक, परिवहन विभागाचे कामकाज यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस महाड प्रांत सुषमा सातपुते, रोहा प्रांत सुभाष भागडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजन दंदाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल अ.द.येवला, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण एस.एस.कामत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागावकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, एस.टी.विभाग नियंत्रक अजित गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, सुप्रीम कन्स्ट्रकशनचे श्री.गोरुले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुण्याचा गणेशोत्सवही स्मार्ट व्हावा; पालकमंत्री बापट

0
पुणे : पुणे शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे यंदाचा पुण्याचा गणेशोत्सवही स्मार्ट व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

शहर पोलिसांच्या वतीने पोलीस मुख्यालयात आयोजित मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. बापट बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार व राजीव जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, परिमंडळ पोलीस उपायुक्त आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला परंपरा आहे. या उत्सवाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पुण्यातील मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना परंपरा आणि लौकिक याची कायम जाणीव ठेवावी. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी घ्यावी. मंडळांनी उत्सव साजरा करताना प्रशासनास सहकार्य करावे.

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस आयुक्त श्री. पाठक यांनी मंडळांना विविध परवानग्या मिळाव्यात यासाठी पोलीस विभागातर्फे एक खिडकी योजना अंमलात आणली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन पोलीस विभागातील अधिकारी मंडळाच्या अडचणी सोडविण्यात तत्पर आहेत असे सांगितले.

सामाजिक बांधिलकी जपत काही गणेश मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत दिली. या मदतीचे धनादेश यावेळी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी प्रसंगी निकष बदलू – मुख्यमंत्री

0

उस्मानाबाद : शेततळ्यांमुळे विकेंद्रीत पाणी साठे तयार होऊ शकतात. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निमिर्ती होऊ शकते, हे लक्षात घेऊन शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्यमान ‍निकषात बदल करण्याची शासनाची तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे सांगितले.

मराठवाडा विभागातील प्रमुख दूध उत्पादक तालुका अशी ओळख असणाऱ्या भूम तालुक्यात यंदा ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी चारा छावणी उघडण्याची वेळ आली आहे. भगवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने उघडलेल्या चारा छावणीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी महाराजस्व अभियान तसेच बळीराजा चेतना अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सर्वश्री राहूल मोटे, ज्ञानराज चौगुले, विनायक मेटे, महादेव जानकर, नितीन काळे, ॲड.मिलिंद पाटील, सुरजितसिंह ठाकूर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत आदी उपस्थित होते.

मराठवाडा विभागातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कालपासून सुरु झालेल्या आपल्या दौऱ्याचा उद्देश परिस्थितीची पाहणी आणि उपाययोजनांसंदर्भात ग्रामस्थांची प्रतिक्रिया समजावून घेणे हा असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अगदी कमी पावसातही शेततळ्यात पाणी साठले आणि त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ लागला हे चित्र काल लातूर जिल्ह्यात पाहता आले. शासनाने यापूर्वीच राज्यात दीड लाख शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली आहे. शेत तेथे शेततळी हे चित्र प्रत्यक्षात आले तर शेतीच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय आजच्या परिस्थितीत अतिशय महत्त्व असलेल्या रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. मात्र त्यासाठी काही निकष बदलावे लागतील, अशी शक्यता दिसते. शेतकरीही तशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेततळ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्‍य सरकार आवश्यकतेनुसार निकषात बदल करील.

मुख्यमंत्री म्हणाले, यंदा वेळेवर सुरु झालेल्या पावसाने नंतर दडी मारली. मराठवाडा विभागात तर काही भागात अपुऱ्या पावसाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. येथे परिस्थिती बिकट असली तरी अशा प्रसंगी नियोजनपूर्वक उपाय योजनेचे काम सरकार करत आहे. या उपायांचा शेतकऱ्यांनी उपयोग करुन घ्यावा, तसेच सर्वांनी परस्परांना सहकार्य करत मार्ग काढावा. शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, याची खात्री बाळगावी. धीर सोडू नये आणि खचूनही जाऊ नये. शासनाकडे जे काही सामर्थ्य आणि साधने असतात, ती जनतेसाठी असतात. शासन सर्व सामर्थ्यानिशी विपरीत परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यात जनतेचे सहकार्यही मिळत आहे.

विद्यमान परिस्थितीत शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध करुन देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. ऐन पावसाळ्यात राज्यात चारा छावण्या काढण्याची वेळ आली असून छावण्यांसाठीचे काही निकष शिथिल करण्यात आले आहेत. छावणीत किमान 500 जनावरे असावीत, ही अट शिथिल करुन किमान संख्या 250 वर आणली आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वैरण विकास कार्यक्रम हाती घेतलेला आहे. कमी जागा, कमी पाणी आणि कमी किमतीत चारा घेण्याचे नवे तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात विपूल चारा उपलब्ध आहे, तेथून चारा आणला जाईल. शेजारच्या कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यातून चारा आणण्याची सरकारने तयारी ठेवली आहे.

पाण्यासाठी जेथे रेल्वे वाघिणींचा उपयोग करावा लागणार आहे, तेथे तो केला जाईल आणि याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन मागेल तेवढ्या वाघिणी उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनापासून अन्न सुरक्षा योजनेचा सरसकट लाभ दिला जात असून त्याचा राज्यातील 60 लाख शेतकरी कुटुंबांना उपयोग होणार आहे. ज्या शेतमजुरांकडे रेशन कार्ड नाही, त्यांना ते उपलब्ध करुन द्यावे आणि त्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागाला कृष्णा खोऱ्यातील त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल याची ग्वाही दिली. या संदर्भातील प्रकल्पाला गेली दहा वर्षे केंद्रीय पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आता प्राप्त झाले आहे, असे सांगून त्यांनी या प्रकल्पाबाबतीत पुढील नियोजन केले जाईल, असे नमूद केले.

राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात सहा महिन्यात एक लाख कामे पूर्ण झाली असून राजस्थान सारख्या राज्याने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना या कामाचे महत्त्व सांगण्यासाठी निमंत्रण दिले आहे. राजेंद्रसिंह यांच्यासारख्या जाणकार जलतज्‍ज्ञांनी या कामाचा गौरव केला. कमी खर्चात आणि कमी वेळात पाणी साठवण्याचे काम या योजनेमुळे होत आहे. त्यामुळे या योजनेत मोठा लोकसहभाग लाभला असून स्वातंत्र्यानंतरचा मोठा लोकसहभाग असलेली योजना आता जनतेची झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात यंदा पीक विम्यापोटी 1600 कोटी रुपये मिळाले असून पीक विमा योजना अधिक विस्तारित करण्याचा सरकारचा मानस आहे. आज या योजनेत नुकसान भरपाईसाठी महसूल मंडळ हा निकष गृहीत धरला जातो, तो बदलला जावा आणि गावपातळीवर ही योजना राबविली जावी, अशी सरकारची भूमिका आहे व त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज राज्यात अवघे 54 हवामान केंद्र असून ही संख्या 2059 एवढी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. उस्मानाबाद जिल्ह्याने विविध बाबतीत चांगले काम केले आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करुन त्याबद्दल जनतेचे तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेचे कौतुक केले.

राज्य शासन संवदेनशील असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांत आत्मियतेने लक्ष घातले आहे. शासन शेतकरी आणि त्यांची गुरे यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे पालकमंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.

चारा छावणी चालवणाऱ्या संस्थेच्या वतीने बाळासाहेब पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली व काही अटी शिथिल करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.

वैरण विकासासाठी 50 कोटीची तरतूद- मुख्यमंत्री

0
बीड : गुरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून वैरण विकास कार्यक्रम राबविण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गुरांना चारा मुबलक प्रमाणात मिळू शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील पात्रुड येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, गुरांना चारा मिळावा म्हणून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या तालुक्यात चारा नसेल तर जिल्ह्यातून तेथे चारा उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्ह्यात चारा नसेल तर बाहेरील जिल्ह्यातून चारा उपलब्ध करून दिला जाईल. वेळ पडल्यास बाहेरच्या राज्यातूनही चारा आणून जनावरांचे पोषण केले जाईल. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी देखील 10 टक्के अतिरिक्त तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. चारा छावण्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनाने चारा छावणी नियम केले आहेत. त्यामुळे चारा छावणीतील गैरप्रकारास आळा बसून जनावरे जगतील. बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. चारा छावणीला जोडून पशु पालकांना चारा निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. हायड्रोफोनिक तंत्राद्वारे हिरवागार चारा तसेच अझोला शेवाळ या चाऱ्याचे संगोपन कसे करावे, कडबा-कुटाराला पौष्टिक कसे बनवावे, याचे मार्गदर्शन या चारा छावण्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाते.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित शेती करावी लागेल. येत्या काळात दीड लाख शेततळी निर्माण करावयाची आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या स्वत:च्या शेतात जलसंवर्धनाचे काम केल्यास त्यांना रोजगार हमी योजनेतून पैसे दिले जातील. ऊसतोड कामगार, शेतमजूर, शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून बीड जिल्ह्यातील दोन लाख मजुरांना 100 दिवसाचा रोजगार दिला जाईल. शेतकऱ्यांच्या संबंधित वीज बील असो वा पीक कर्ज माफी असो त्यासाठी जो निधी लागेल तो देण्याचे ठरविले आहे. वेळ पडल्यास राज्य शासन कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे हित साध्य करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, माजलगाव प्रकल्पात पाणी कमी असल्याने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रश्न सुटेल. लोकांच्या हातांना काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्याची धडक योजना सुरू केली जात आहे.

प्रारंभी येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीस मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

पात्रुड येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीत पात्रुड परिसरातील ढोरगाव, आनंदगाव, लोणगाव, भगवाननगर, लाऊळ, हिंगणवाडी, आंबेगाव, छोटीवाडी, बोरगाव, मोठीवाडी, शिंदेवाडी, राजेवाडी इत्यादी गावातील जनावरे दाखल झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आदर्श शेतकरी विनायक शिंदे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

 

श्री. रामराव मुंडे पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी रुजू

0

unnamed

 

पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. रामराव

मुंडे यांनी बुधवारी (ता. 02) कार्यभार स्वीकारला. याआधी ते बारामती परिमंडलाचे

मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

मुळचे बीड जिल्ह्यातील देवगाव येथील शेतकरी कुटुंबातील श्री. मुंडे 1982 मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात

कनिष्ठ अभियंता म्हणून लोणीकंद 400 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्ग (जि. पुणे) येथे रुजू झाले. याच पदावर त्यांनी

अंबाजोगाई, बीड येथेही काम केले. त्यानंतर सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता अशा

पदोन्नतीवर ते बीड, भांडूप, ठाणे, वाशी, नेरूळ आदी ठिकाणी कार्यरत होते. कार्यकारी अभियंता म्हणून श्री. मुंडे यांनी

नवी मुंबई परिसरातील लघु व उच्चदाब वर्गवारीतील वीजचोरी रोखून वीजहानी 5.85 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची

कामगिरी केली आहे. श्री. मुंडे अधीक्षक अभियंता म्हणून 2008मध्ये मुंबई मुख्यालयात डिस्ट्रीब्यूशन स्पेशल प्रोजेक्ट

सेलमध्ये कार्यरत होते. त्यानंतर 2009 मध्ये मुख्य अभियंता म्हणून लातूर परिमंडलात रुजू झाले.

लातूर परिमंडलात मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी कृषीपंपासाठी सुलभ व तातडीने वीजजोडणी मिळावी यासाठी

‘महावितरण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाच्या यशामुळे तो राज्यभरात राबविण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील वसई, विरार, वाडा या भागातील पायाभूत वीजयंत्रणेच्या जाळे सक्षम करून दुर्गम भागातील

वीजपुरवठा सुरळीत करण्यात त्यांचे योगदान आहे. मुख्य अभियंता म्हणून श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात लातूर,

कल्याण, बारामती परिमंडलात ग्राहकसेवा, ग्राहकाभिमुख विविध उपक्रम, वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व वीजहानी कमी

करण्यासोबतच महसूल वाढीसाठी झालेली सांघिक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पुणे परिमंडलात वेगवान व

उत्कृष्ट ग्राहकसेवा तसेच इन्फ्रा दोनसह विविध योजनांमधील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य

अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी सांगितले.

थाईलैंड में स्कूटर पर घूमे रणबीर और कटरीना

0

2

थाईलैंड में रणबीर कपूर और कटरीना कैफ हर जगह स्कूटर से ही सफर कर रहे थे। ये उस दौरान था जब दोनों कलाकार थाईलैंड में अनुराग बासु की जग्गा जासूस की शूटिंग कर रहे थे।

बर्फी फिल्म की सफलता के बाद रणबीर और अनुराग बासु अब जग्गा जासूस के लिए साथ आए हैं| काफी समय बाद रणबीर और कटरीना भी एक बार फिर से स्क्रीन शेअर करते नजर आयेंगे|

 

जग्गा जासुस की शूट के लिए जब रणबीर और कटरीना थाईलैंड पहुंचे तो उन्होंने वहां पर अधिकतर लोगों को स्कूटर पर घूमते देखा। उन्हें देख ये दोनों भी काफी उत्साहित हो गए और प्रोडक्शम टीम से अनुरोध किया कि गाड़ी के बजाय उनके लिए स्कूटर मंगाया जाए।

फिल्म से जुड़े सूत्रों ने बताया कि जब रणबीर और कटरीना ने स्कूटर का इस्तेमाल करना शुरू किया तो उन्हें देख फिल्म की टीम ने भी स्कूटर पर घूमना ही पसंद किया| इस फिल्म की शूट के दौरान सब ने स्कूटर राइड के खूब मजे लिए|

फिल्म की शूटिंग विभिन्न लोकेशंस पर शूट होने वाली है। थाईलैंड और साउथ अफ्रीका के हिस्से की शूटिंग पूरी हो चुकी है।

1