सातारा, (जिमाका) : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार चंद्रशेखर सानप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी तहसीलदार सविता लष्करे यांनीही पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प वाहिले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
पाणी रे पाणी … मानाच्या गणपतींचे यंदा प्रथमच हौदात विसर्जन । मिरवणूक बंदोबस्तासाठी पोलिस सज्ज …
महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विवेक खटावकर, कोशाध्यक्ष नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मंडळांच्या “श्रीं‘चे विसर्जन हौदातील पाण्यात करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. निर्णय जाहीर केल्यानंतर महापौर धनकवडे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतींची आरती करण्यात आली. मानाचा पाचवा केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त रोहित टिळक, श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष बाबा डफळ यांनीही या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे.
शेटे म्हणाले, “”हिंदू शास्त्रानुसार मूर्तीचे विसर्जन जलतत्त्वात व्हावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आमचा हा निर्णय धर्मशास्त्राच्या विरोधात नाही. प्रथा, परंपरा आणि समाज यांनी या निर्णयाकडे कसे पाहावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांनी या निर्णयास पाठिंबा द्यावा. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही मंडळांच्या या स्तुत्य निर्णयाचे कौतुक केले आहे.‘‘
शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, कर्वे रस्ता, लष्कर विभाग, पिंपरी विभाग, खडकी आणि दत्तवाडी विभागातून मुख्य विसर्जन मिरवणूक जाणार आहे. या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्त, सहआयुक्त यांच्यासह तीन अतिरिक्त आयुक्त, 14 उपायुक्त, 40 सहायक आयुक्त, 55 पोलिस निरीक्षक, 262 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, अडीच हजार पोलिस कर्मचारी आणि अडीचशे होमगार्ड बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. तसेच, निमलष्करी दलाची (बीएएसएफ) तीन पथके, फोर्स वन, रॅपिड ऍक्शन फोर्स, राज्य राखीव पोलिसांची (एसआरपीएफ) प्रत्येकी एक तुकडी, बॉंब शोधक व नाशकची (बीडीडीएस) सहा पथके, दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) जवान तैनात राहतील. शहरातील 90 संवेदनशील ठिकाणी, विसर्जन घाट आणि परतीच्या मिरवणुकीचा बंदोबस्त नेमला आहे. तसेच, नागरिकांसाठी मदत केंद्रे, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रमुख मिरवणूक मार्गांवरील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर विसर्जन मिरवणुकीवर राहणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालय आणि फरासखाना पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष राहणार आहे. संशयितांच्या हालचाली टिपण्यासाठी 11 ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.
राज्याचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून; ‘एफआरपी’नुसार दर न दिल्यास कारखान्यांवर कारवाई- मुख्यमंत्री
मुंबई : साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार दर न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार 75 टक्क्यांपर्यंत रकमेचे वाटप केलेल्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम एक महिन्याच्या आत द्यावी. तसेच यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मंत्रालयात आज ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. कृषिमंत्री एकनाथराव खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींसह साखर संघाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गाळप हंगाम हा 15 ऑक्टोबर पासून सुरू करणे योग्य राहील. मात्र या तारखेपूर्वी जे कारखाने गाळप हंगाम सुरू करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्थानिक पाणी परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. 15 जुलैपर्यंत पुरू शकेल इतके पिण्याचे पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्याचे नियोजन करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासता कामा नये.
केंद्र शासनाने या वर्षीच्या गाळप हंगामासाठी प्रती मेट्रीक टनासाठी 2300 रुपये इतकी एफआरपी जाहीर केली आहे. हा दर साडे नऊ टक्के उताऱ्यासाठी असून राज्यातील सरासरी उतारा 11.30 टक्के आहे. त्यानुसार राज्यातील सरासरी एफआरपी प्रती टन 2736 रुपये एवढी आहे. त्यातून 550 रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा केल्यास राज्यातील शेतकऱ्यांना 2186 रुपये एफआरपी मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एफआरपीनुसार उसाला भाव दिला आहे व ज्यांनी 75 टक्क्यांपर्यंतची देणी शेतकऱ्यांना दिली आहेत, अशा कारखान्यांनी येत्या महिनाभरात उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा यंदाच्या गाळप हंगामास परवानगी दिली जाणार नाही. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपेक्षा कमी देणी दिली आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नक्तमूल्य उणे असणाऱ्या साखर कारखान्यांना ते सुरू झाल्यानंतरच थकहमी दिली जाईल. याबाबत सहकार मंत्री, विभागाचे सचिव व वित्त विभागाचे सचिव यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
इथेनॉलवरील जकात अथवा एलबीटी रद्द करण्याबाबत तसेच सॉफ्टलोन योजना सर्वप्रकारच्या साखरेवर देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, साखर आयुक्त श्री. शर्मा आदींसह साखर संघांचे सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन संस्कृतींच्या संगमाने यंदाचा कुंभमेळा संस्मरणीय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्या वतीने कैलास मानसरोवर येथून आणलेले पवित्र जल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले., त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सुधींद्र कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, दोन पवित्र जलांचा संगम हा दोन संस्कृतींचा संगम आहे. यामुळे एक नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. संस्कृतीचा हा संगम मानव कल्याणाच्या कार्याला प्रेरक ठरेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेला अनुसरुन प्रशासन आणि नागरिकांनी मिळून हा कुंभमेळा हरित कुंभ म्हणून साजरा केला. नाशिक-त्र्यंबकेश्वरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने येथील स्वच्छतेचा विशेष उल्लेख केला आहे. स्वच्छतेच्या कार्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग क्वचितच पहायला मिळतो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेने असे चांगले कार्य करुन दाखविले आहे, असे सांगून त्यांनी नागरिकांना या कार्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी कलशाचे विधीवत पूजन करुन त्यातील पवित्र जल कुशावर्त तीर्थात अर्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचेसह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आ. बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रविण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक जे.जे. सिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सुधींद्र कुलकर्णी, नेमबाज पटू अंजली भागवत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, निमाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, तर्फे सलग 6व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन
हास्य, वेदना, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय विडंबनाने गाजले मराठी कवी संमेलन
पुणे—राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला
लावणारे राजकारणातील वास्तव, पाणी, जमिनीच्या प्रश्नावरून काव्याद्वारे मांडलेली वेदना, तंत्रयुगात संपत
चाललेले मानवी संबंध यांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त
प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे पुणे
फेस्टिव्हल अंतर्गत मराठी कविसंमेलन गाजले.
विद्रोही कवी संभाजी भगत यांच्या
बया पहाटेच्या ग बारी
कुणी नव्याने गाणी गातो…
नव्याने गाणे गातो अन,
धक्का चावडीला देतो ग माझे माई… या खेड्यातील आणि शहरातील काम करणाऱ्या
महिलांवरील रचनेला आणि
सालो साल पेरलं आणि मातीतच जिरल
पाटीवर पेरलं तर त्याची फुलं होतात
पुस्तकं पैशांची झाडे होतात.
ही प्राचार्य सुरेश शिंदे यांनी शिक्षणामध्ये झालेले बदल व संगणीकरण यावर आधारित दोन पिढ्यांची कविता
डॉ. महेश कोळूस्कर यांच्या राजकीय, सामाजिक स्थितीवर विडंबन करणाऱ्या
अकलेचे कांदे इथे तिथे स्वस्त
कांदा भाजी मस्त पुढे चालू ..
मौनी बाबा म्हणे भाईयो बहिणो
फापडा आपडो पुढे चालू…
या रचनेला श्रोत्यांनी शिट्या व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
नितीन देशमुख यांच्या
ओकतो अंगार मी भोगतो शृंगार मी
विस्तवा छेडू नको पावसाचा यार मी..
या गझलरूपी रचनेला आणि भारत दौंडकर यांच्या
गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आला गळ्यात
पण, एक प्लेट मातीचा वास हुंगण्यासाठी रक्त येईल डोळ्यात
या अंतर्मुख करायला लावलेल्या ‘गोफ’ या रचनेने प्रेक्षकांनी दाद दिली.
कौस्तुभ आठल्ये या युवा कवीने सादर केलेल्या
जरी अजिबात कोणाची फिकीर स्वप्नात नसते
तरी तसे वागण्याची परवानगी जगण्यात नसते
प्रत्येकजण बघतात वसंताचीच स्वप्ने
किती झडतात पाने त्या अगोदर ज्ञात नसते.
या प्रेमात पडलेल्या प्रियकराच्या भावना व्यक्त करणाऱ्या रचनेला उपस्थित युवक श्रोत्यांनी दाद देत नाट्यगृह
डोक्यावर घेतले.
किशोर मोगल यांनी ज्ञानाचा त्रास कसा व कुणाला होतो यावर प्रकाश टाकणारी
तीन तीन लेकरं पण एक नाही कामचं
म्हातारपण चालले हाय नाव घेत रामाचं ..
अस्मिता जोगदंड यांच्या
सरळ सरळ जगता याव म्हणून
किती वाकड्या वाटेने जातो आपण
खरं बोलता यावं म्हणून किती पचवतो आपण
तर अरुण पवार यांच्या
पांढरं सोन पिकवलं ते मातीमोल विकू
आणि विकतं ते पिकवलं तर म्हणता तुम्ही अफू
मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू..
या मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर बदललेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचना सादर करून
प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
अरुण म्हात्रे यांच्या
विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांधणारे नवे मिळतेच काही
या रचनेला व तुकाराम धांडे यांच्या भूगोल या जमिनीचे महत्व सांगणाऱ्या कवितेलाही प्रेक्षकांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते जेष्ठ कवी संभाजी भगत यांचा
विशेष सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, काका धर्मावत, संतोष उणेचा,
श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते अन्य कवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक
कार्यक्रमाचे समन्वयक मोहन टिल्लू हे उपस्थित होते.
कलर्स मराठी वाहिनी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत.
सध्या पिण्यासाठी ठेवलेले पाणी विसर्जनासाठी सोडणार …
‘ बायकर्स अड्डा ‘ च्या संतोष जुवेकर ने गाजविली पुण्याच्या गणेशोत्सवातील रात्र ..पहा धमाल फोटो ..
पुणे- भूक लागली, संत्याने (अभिनेता संतोष जुवेकर) जोगेश्वरी बोळात वडापाव खाल्ला ,
मंडई मध्ये बंदुकीने फुगे फोडले …
मध्येच मिनरल वॉटर च्या बाटल्या घेत पाण्याने तहान भागविली आणि चेहरा स्वछ केला …
एक रात्र हजारो भाविकांनी संत्या च्या या अदाकारीबरोबर गणेश उत्सवात गणेश दर्शनासह एन्जॉय केला .महिला पोलिसांसह , तरुणाई , कित्येक ठिकाणी वाहिनी काकू , लहान बालकांनी ‘ बायकर्स अड्डा ‘ च्या कलावंतासमवेत धमाल केली .
हि धमाल करीत असताना संतोष जुवेकर ने , तुळशीबाग गणपती , कसबा गणपती , गुरुजी तालीम , अशा अनेक ठिकाणी गणेश मंडळे , कार्यकर्ते , भाविक यांना दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा , मिरवणुकीत अचकट विचकट गाण्याना फाटा देत , गणेश भक्तीची धूम माजविणारी गाणी लावा , गैरप्रकारांना आळा घाला अशी आवाहने केली आणि
४१ व्या स्कॉच परिषदेमध्ये पुणे महापालिकेस पाच पुरस्कार
पुणे महानगरपालिकेच्या विविध पाच विभागांनी केलेल्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कामा संदर्भात संबंधित विभागांना नवी
दिल्ली येथील स्कॉच परिषदेमध्ये ५ ‘‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीटङ्कङ्क पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या स्कॉच परिषदेमध्ये पुणे
महानगरपालिकेस ‘‘ट्रॉन्फॉरमेटिव्ह गव्हर्नन्सङ्कङ्क अंतर्गत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण केलेल्या कामगिरीबद्दल सदरच्या
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने १) पुणे शहरात महिलांकरिता करण्यात आलेल्या
सार्वजनिक शौचालये (पुणे पॅटर्न) २) सर्वांकरिता स्वच्छतागृहे ३) अॅटो डीसीआर प्रणाली ४) फास्ट ट्रॅक सिस्टिम-
बांधकाम परवाना ५) इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व शिक्षण केंद्र या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या परिषदेमध्ये सत्कार समारंभ प्रसंगी पुणे शहरात महिलांकरिता करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या
कामगिरीकरिता व स्वच्छतागृहे सर्वांकरिता या क्षेत्राकरिता मनपा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.
केतकी घाटगे, अॅटो डीसीआर प्रणालीबाबतचा पुरस्कार अनिरुध्द पावसकर, फास्ट ट्रॅक प्रणालीकरिता विनोद
क्षिरसागर, इंद्रधनुष्य व नागरिकत्व शिक्षण केंद्र याकरिता पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी पुरस्कार स्विकारले
असून प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप होते. नगर विकास विभाग नवी दिल्ली येथील माजी सचिव डॉ.
रामचंद्रन यांचे हस्ते पारितोषिके स्विकारण्यात आली. ४१ व्या स्कॉच परिषदेचे उद्घाटन मा. केंद्रीय नगर विकास
मंत्री श्री. वैंकेय्या नायडू यांचे शुभ हस्ते झाले. याप्रसंगी हहिरयानाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर खद्वर तसेच भारतातील
विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख, अभियंते मोठ्या प्रमाणावर
‘‘स्कॉच स्पर्धेकरिता भारतातून सुमारे १२०० प्रवेशिका प्राप्त झालेल्या होत्या. या प्रवेशिकांची छाननी करण्यात येऊन
३०० प्रवेशिकांना सादरीकरणाकरिता संधी देण्यात हाली होती. या सादरीकरणा अंतर्गत पुणे महानगरपालिकेतील
वरीलप्रमाणे पाच विभागाच्या सादरीकरणाच्या अंतिम परिक्षणा अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे
सदर विभागांना पारितोषिक जाहिर करण्यात आली.
मागील वर्षी याच परिषदेचे पुणे मनपातील नदीसुधार प्रकल्प व पाषाण तलाव या प्रकल्पांना स्कॉच पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले होते.
स्मार्ट सिटी पुणे मनपा सीआयआय मध्ये सामंजस्य करार
स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत पुणे महापालिके समवेत करावयात येणाèया कामकाजा संदर्भात पुणे
महानगरपालिका व कॉन्फिडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या ‘‘सामंजस्य करारङ्कङ्क (सीआयआय) करण्यात आला.
याप्रसंगी मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सीआयआयचे डेप्युटी डायरेक्टर सेवानिवृत्त मेजर नेल कास्टेलिनो
तसेच ज्युरोसेलचे अनिल गोयल, पुणे मनपातील उपायुक्त (विशेष) अनिल पवार, गणेश सोनुने व श्री. आशिष
आगरवाल उपस्थित होते.
नवीन व नवीकरणीय उर्जा स्त्रोतांपासून (अपारंपारिक)उर्जा पारेषणविरहितधोरणाचा मसुदा जाहिर
मुंबई, : राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणातंर्गत नविन व नविकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून
(अपारंपरिक) पारेषणविरहित ऊर्जा निर्मित धोरणाच्या मसूद्यावर आढावा बैठकीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या उपस्थीतीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या वेळी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपिन श्रीमाळी, महापारेषणचे
व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव मित्तल, महावितरणचे संचालक (संचलन) श्री. अभिजित देशपांडे,
सहसचिव उर्जा श्रीमती माधुरी कोकणे, प्रभारी वरिष्ठ महाव्यवस्थापक (महाऊर्जा) श्री. उमाकांत देशपांडे,
प्रभारी वरिष्ठ महाव्यवस्थापक (महाऊर्जा) श्री. हेमंत पाटील, महाव्यवस्थापक (उर्जा निर्मिती 1)श्री. मनोज
पीसे आदी अधिकारी उपस्थित होते.
नविन व नविकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून (पारेषण संलग्न) ऊर्जा निर्मिती धोरणनंतर राज्याने स्वच्छ
ऊर्जा निर्मिती क्षेत्रात टाकलेले हे दुसरे मोठे पाऊल म्हणता येईल. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नविन व
नवीकरणीय अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या साधनांचा वापर करुन ऊर्जा निर्मिती करणे आणि त्याद्वारे इंधनाची
बचत करणे, हरित गृह वायूचे उत्सर्जन कमी करुन निसर्गाचे संतुलन राखणे, ग्रामीण व शहरी भागातील सेंद्रीय
टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस तयार करुन विकेंद्रीत पारेषण विरहित वीज व जैविक खत निर्मिती करणे हा
म्हणून त्यांनी काही सूचनाही दिल्या हे धोरण राबवितांना सुलभ प्रक्रियेसह वस्तुनिष्ठ व सुटसुटीत अशी
कार्य पध्दती असावी, प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाऊर्जेच्या मार्गदर्शक तत्वे यांचा तांत्रिक मोजमाप
करण्यासाठी अवलंब करावा तसेच प्रकल्प उभारणीसाठी उत्पादक सिस्टिम इंटिग्रेटर यांना महाउर्जेकडे नोंदणी
करणे बंधनकारक आवश्यक आहे असेही ते या वेळी बोलत होते.
या योजनेत राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था,अनुदानित शैक्षणिक
संस्था, सहकारी संस्था, गृहनिर्माण व निबंधक सहकार यांच्याकडील नोंदणीकृत इमारती ,टाऊनशिपमधील
इमारती, धर्मदायसंस्था, दवाखाने व खाजगी संस्थामध्ये इमारतींचे छत व जमिनीवरील पारेषण विरहित
एकूण 200 मे.वॅ. सौर विद्युत संच तसेच स्वयंपाक करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित 1.5 लाख चौ.मी.
सौरऊर्जेवर आधारित संयंत्र आस्थापित करण्यात येणार आहे. यानंतर खंडित वीजपुरवठा असलेल्या वाडया,
वस्त्या, ग्रामपंचायती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा उपसा व पुरवठा करण्याकरीता, लघुजल व नळ
पाणीपुरवठा करण्यासाठी 10 हजार सौरपंपाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच (5.1 लाख चौ.मी.), सौर
उष्णजल संयंत्राची आस्थापना करणे बंधनकारक असणार आहे.
बायोगॅस तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रीत पारेषण विरहित वीजनिर्मिती करण्यासाठी 3 ते 250 कि.वॅ.
क्षमते पर्यंतचे विकेंद्रीत पारेषण विरहित वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच राज्यातील
अतिदुर्गमभागातील विद्युतीकरणन झालेल्या दोन गांवात पथदर्शी स्वरुपात सौरऊर्जा किंवा अपारंपारिक
ऊर्जेद्वारे विकेंद्रीत सुक्ष्मपारेषण प्रकल्प, शेणावर आधारित बायोगॅस पासून विद्युत निर्मित प्रकल्प,
घनकचऱ्यावर आधरित बायोगॅसपासून विद्युत निर्मिती प्रकल्पराबविण्यात येणार आहे असे ऊर्जा मंत्री
बावनकुळे यांनी सांगितले.
भारताची पहिली सुपर कार डीसी अवंतीचे अनावरण
पुणे : बहुप्रतिक्षित अशा देशातील पहिल्या सुपर कारचे, डीसी अवंतीचे
पुण्यात एका शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध कार डिझाईनर
दिलीप छाब्रिया यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कारमुळे कारच्या
बाजारपेठेत खळबळ उडण्याची शक्यता असून या कारद्वारे भारतात कारची एक
वर्गवारी निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाला खुद्द छाब्रिया यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र
प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, आदिवेणु मोटार्सचे वेणुगोपाल तापडिया आणि
आदित्य तापडिया हे उपस्थित होते. ही कार पुण्याच्या आदिवेणु मोटर्सच्या शो-
रूममध्ये सादर करण्यात आली कारचे औपचारिक अनावरण झाल्यानंतर सिद्धार्थ
भन्साली यांना डीसी अवंतीचे पहिले ग्राहक म्हणून कारच्या चाव्या हस्तांतरित
करण्यात आल्या.
यावेळी बोलताना डीसी डिझाईनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.
दिलीप छाब्रिया म्हणाले, की त्यांच्या स्वप्नातील ही कार बनविण्यासाठी 33 महिने
आणि 150 कोटी रुपयांची गुंतुवणूक लागली. “डीसी अवंती ही माझ्या स्वप्नातील
कार आहे कार आणि आम्ही अगोदरच 300 कार विकल्या आहेत. या क्षेत्रातील
आमच्या ज्ञानाच्या बळावर आम्ही हे साध्य करू शकलो. कोणत्याही विकसनशील
देशामध्ये बनविलेली ही पहिली सुपर कार असून भारतात त्यामुळे कारची एक
नवी वर्गवारी तयार झाली आहे. आम्ही दाखवून दिले आहे, की पहिल्या जगातील
कोणत्याही देशाइतकेच आम्हीही सक्षम आहोत.”
तरुणांना स्पोर्ट्स कार विकत घ्यायची आहे परंतु बाजारात त्यांच्यासाठी त्या
उपलब्ध नाहीत, ही या कारच्या मागची संकल्पना आहे असे त्यांनी सांगितले.
“भारताच्या कार बाजारातील हा क्रांतीकारी बदल आहे,” ते म्हणाले.
डीसी या नावाने परिचित असलेल्या छाब्रिया यांनी सांगितले, की डीसी अवंती
ही फेरारी आणि लँबोर्गिनी यांसारख्या कारशी स्पर्धा करेल परंतु किंमत ही तिच्या
दृष्टीने प्रचंड अनुकूल बाब ठरेल. परदेशी कारच्या तुलनेत या कारची किंमत केवळ
एक दशांश आहे आणि त्यामुळे भारतीय लोकांना स्पोर्ट्स कार चालविण्याचे आपले
स्वप्न साकार करता येईल. “माझा अनुभव सांगतो, की युवकांना स्पोर्ट्स कार
घ्यायची आहे परंतु परदेशी कार विकत घेणे त्यांना परवडत नाही. डीसी अवंती ही
त्यांना आपली हौस पूर्ण करणे शक्य करेल,” असे ते म्हणाले.
छाब्रिया यांच्या कष्टांचे कौतुक करून श्री. चैनसुख संचेती म्हणाले, “आज मी
डीसींच्या वर्कशॉपला भेट दिली आणि प्रचंड प्रभावित झालो. छाब्रिया यांनी जे
अनुभवले आणि जी कल्पना केली, त्याचे प्रतिबिंब या कारमध्ये पडले आहे. ही
एकमेवाद्वितीय अशी कार आहे आणि या प्रसंगी मी त्यांचे खास अभिनंदन करतो.
ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे आणि त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे”.
या कारच्या चाव्या घेतल्यानंतर आपला आनंद प्रदर्शित करताना सिद्धार्थ
भन्साली यांनी सांगितले, “मी यासाठी डीसीं व आदिवेणु मोटर्सला धन्यवाद
देईन. ही कार पैशाचा पूरेपूर मोबदला देते आणि माझ्यासारखे युवक कारचे क्रेझी
असतात. डीसी अवंती ही अशा युवकांसाठी योग्य अशी भेट आहे”.
डीसी अवंती पहिल्यांदा कॉन्सेप्ट कारच्या स्वरूपात 2012 साली ऑटो
एक्सपोमध्ये नवी दिल्ली येथे सादर करण्यात आली होती. 2014 साली ऑटो
एक्सपोमध्ये या कारचे प्रॉडक्शन मॉडल सादर करण्यात आले होते.
डीसी अवंतीमध्ये रेनॉल्टचे 2.0 लिटर टर्बो युरो 5 पेट्रोल इंजिन असून 250
एचपीची कमाल शक्ती आहे. तीत सर्वाधिक 340 एनएमचा टॉर्क लाभतो. या
कारचा वेग ताशी 200 किमी वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित केलेला असून 6
सेकंदांत ताशी 100 किमीचे अक्सीलरेशन ती गाठते. आदिवेणु मोटर्सतर्फे हि गाडी
महाराष्ट्रासाठी उपलबद्ध असणार आहेत.

डीसी अवंती तांत्रिक माहिती
एकूण लांबी 4565 मिमी
एकूण रुंदी 2120 मिमी
एकूण उंची 1200 मिमी
व्हीलबेस 2700 मिमी
टर्निंग रेडियस 6 मी.
क्षमता 2000 सीसी
सर्वोच्च शक्ती 250 बीएचपी @5500 आरपीएम
सर्वोच्च टॉर्क 340 एनएम @2750 ते 5000 आरपीएम
कमाल वेग ताशी 200 किमी वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित
त्वरण 6 सेकंदांत ताशी 100 किमी
बॉडी कार्बन कम्पोझिट टू डोअर फास्टबॅक
आसने दोन
प्रेमाची हळूवार फुलणारी कथा म्हणजे ‘उर्फी ’
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट प्रेमावरती भाष्य करणारे आलेले आहेत. किशोरवयीन अल्लड प्रेमकथा, तारुण्यातील हळूवार प्रेम असणारे शाळा, फँन्डी, टाईमपास अशा चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अशा चित्रपटांना रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांवर चांगलाच गल्ला जमवला. टाईमपास या चित्रपटातून घराघरात आणि तरुणाईच्या मनात ठाण मांडून बसलेला दगडू शांताराम परब या नावाने प्रत्येकाच्या ओठावर रुळलेले हे नाव म्हणजेच प्रथमेश परब पुन्हा एकदा त्याच उत्साहात त्याच्या आगामी ‘ उर्फी ’ चित्रपटातून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री मिताली मयेकर व प्रथमेश परब हि जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिताली या अगोदर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन यांच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटात आपणास ती बालकलाकार म्हणून आपण तिला पाहिले आहे. ‘उर्फी’ या चित्रपटात उपेंद्र लिमये, कविता लाड, मिलिंद पाठक हे कलाकार आहेत. मनोरंजनाचा फूल ऑन तडका ‘उर्फी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाबरोबरच श्रवणीय गीतांची मेजवानी ही ‘उर्फी’ चित्रपटात आहे. मंगेश कांगणे आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गीतांना चिनार-महेश यांनी संगीतसाज चढवला आहे.उमेश जाधव यांनी या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.
एनबीएस एण्टरटेन्मेंट प्रा. लि. या बॅनरखाली निर्माते युवराज वर्मा, सरताज मिर्झा आणि महेलका शेख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना प्रधान यांची सहनिर्मिती असून दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. चित्रपटाची कथा विक्रम प्रधान यांची असून संवाद आशिष पाथरे यांचे आहेत. प्रथमेश परब याच्यासह ही प्रेमकथा असली तरी तिला विनोद आणि थराराचा तडका आहे. २३ ऑक्टोबरला ‘उर्फी’चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. असे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत नुकतेच जाहीर करण्यात आले.
वैभव तत्ववादी ने फॅन्स सोबत सेलिब्रेट केला वाढदिवस
पुणे :- वाढदिवस म्हंटल की काही तरी खास असाव असं नेहमीच वाटतं . मग तो एखाद्या सेलिब्रेटीचा असेल तर मग त्याची गमंतच वेगळी. अभिनेता वैभव तत्ववादी ने खास आपल्या फॅन्स सोबत स्वत:चा वाढदिवस साजरा केला. तो पहिल्यांदाच स्वत:च्या फॅन्स ना भेटत होता. या वेळी खास केप कापून सेलिब्रेशन करण्यात आलं.

त्याच्या वाढदिवसासाठी खास त्याच्या जवळच्या व्यक्तीने शुभेच्छा दिलेला व्हिडीयो यावेळी दाखवण्यात आला. हा विडीयो पाहून तो खूपच भावूक झाला. यावर तो म्हणाला की यामध्ये माझ्या आई बांबानी दिलेल्या शुभेच्छा खूपच आवडल्या. कारण आमच्या इथे पुणे किंवा मुंबई मधली लोक जसे आपल्या आई वडलांन बद्दलच प्रेम व्यक्त करतात तस आमच्या इथे सहसा केलं जात नाही. त्यामुळे विडीयो व्दारे दिलेल्या शुभेच्छा मला खूपच आवडल्या. आणि यामध्ये माझे अनेक मित्र जे अमेरिकेत असतात आम्ही वर्षानुवर्ष भेटत नाही पण त्यांनी मला आवुर्जून विश केलंय मला मनापासून हा विडीयो आवडला.
मी कॉलेज मधे असताना मी सहज जरी म्हणालो की मला हिरो व्हायच तरी लोकांच्या नजरा बदलून जात होत्या. पण ते म्हणतात ना किसी को अगर दिल से चाहो तो उसे दिलाने के लिये पुरी कायनात जुट जाती है. असंच काहीस माझं झालं. माझ्या या स्वप्नमुळे माझ्या बांबानाही खूप ऎकून घ्याव लागल होत. पण माझ यश पाहता त्यांनाही माझा अभिमान वाटतो. मला आजच्या यंगस्टर ना एकच सांगायच आहे तुमच्या स्वप्नांना फॉलो कर आणि मगच पैशाला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा येथील स्टील उद्योजकांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले
मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा येथील स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन वाडा, जि. पालघर येथील स्टील उद्योगांना स्वस्त दराने वीज देण्याची मागणी केली.
विदर्भ व मराठवाड्यात उद्योगांना चालना देण्यासाठी तेथील उद्योगांना लागणाऱ्या विजेच्या दरात कपात सुचविण्यासाठी एक समिती गठित करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगत या समितीची कार्यकक्षा वाढवून उर्वरित महाराष्ट्रातील मागासभागातील उद्योगांना देखील स्वस्त दराने वीज देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती सुभाष देसाई यांनी राज्यपालांकडे केली.
पालघर जिल्ह्यातील वाडा या आदिवासी भागात स्टीलचे अनेक उद्योग असून त्यातून एक लाख लोकांना रोजगार मिळत आहे. या उद्योगातून सरकारला 350 कोटी रूपयांचा विक्रीकर मिळत आहे. हा उद्योग बहुतांश विजेवर चालतो. मात्र तेथे प्रति यूनिट विजेचा भाव विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत अधिक आहे. त्याउलट दमण, सिल्व्हासा व गुजरात येथे विजेचा प्रति यूनिट भाव अतिशय कमी आहेत. या पार्श्वभूमीवर वाडा येथील उद्योगांना विजेच्या भावात सूट न मिळाल्यास सर्व उद्योग बंद पडतील, अशी भीती वाडा इंडक्शन फर्नेस असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मेहता यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिले.
पुढील वर्षी शहरातील तलावांवर विसर्जनासाठी बंदी ;महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेतच विसर्जन करावे -मंत्री बावनकुळे
नागपूर : शहरातील गांधीसागर, फुटाळा, अंबाझरी, नाईक तलाव, सोनेगाव, सक्करदरा या तलावांतील प्रदूषित होऊ नये यादृष्टीने पुढील वर्षी तलावांमध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असून यंदा महापालिकेने विसर्जनासाठी जी व्यवस्था केली आहेत, त्याच व्यवस्थेत विसर्जन करावे. तसेच पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
गणेश विसर्जनासंदर्भात बिजलीनगर या वीज मंडळाच्या विश्रामगृहावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकरराव देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, ना.गो. गाणार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी बिजलीनगर येथील विश्रामगृहात गणेशउत्सव विसर्जन व्यवस्था, एलईडी बल्ब वाटप नियोजन, जिजामातानगर येथील शारदा हाऊसिंग सोसायटी येथील लेआऊट धारकाने एनआयटीची जागा आपली जागा म्हणून विकल्यामुळे तेथील नागरिकांसोबत चर्चा, आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
शहरातील सर्व तलावांवर गणेश विसर्जनसाठी आता वेळेवर निर्बंध घालणे शक्य नसल्यामुळे एक वर्ष आधीच शहरातील तलावांमध्ये गणेश विसर्जन करता येणार नाही, अशी सूचना मंडळांना देण्यात येणार आहे. बैठकीत आयुक्तांनी मनपाची विसर्जनाची व्यवस्था सांगितली. ते म्हणाले, 118 कृत्रिम टाके तयार करण्यात आले आहेत. फुटाळा तलावात सर्वाधिक गणपती विसर्जित केले जातात.
आमदार श्री. खोपडे यांनी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सौजन्यांची वागणूक द्यावी, गणेश उत्सव आणि दुर्गा उत्सवादरम्यान कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याबद्दल सतर्क असावे. विसर्जनासाठी पोलिसांकडून लवकर परवानगी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार सुधाकर देशमुख यांनीही उपयुक्त सूचना केल्या. यावर पालकमंत्री म्हणाले, पोलिसांनी नागरिकांशी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सौजन्याने वागण्याच्या सूचना दिल्या. तसेच मंडळाच्या तारखानुसार त्यांना विसर्जनाची परवानगी द्यावी. 27 ला रात्री 12 वाजेपर्यंत आणि 28 व 29 सप्टेंबर रात्री 10 वाजेपर्यंत गणेश विसर्जनास परवानगी देण्यात यावी. तसेच पोलिसांप्रमाणे विसर्जनाच्या ठिकाणी मनपाच्या सर्व सहायक आयुक्तांनीही रात्री 12 वाजेपर्यंत थांबावे.
विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवा
गणेश विसर्जनाच्या मार्गावर असलेल्या खड्ड्यांकडे आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, ना.गो.गाणार आदींनी लक्ष वेधले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणेश विसर्जनाच्या मार्गावर असलेले खड्डे मनपाने विसर्जनापूर्वी बुजवावे असे निर्देश दिले.
खड्ड्यांमुळे विसर्जनासाठी जाणाऱ्या मूर्ती भंगण्याची शक्यता लक्षात घेता हे खड्डे बुजवणे आवश्यक आहे. तसेच खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. शहरातील खड्डे मनपानेच बुजवावे, असे पालकमंत्री म्हणाले.
आठ दिवसात शहरातील सर्व लाईट सुरु करा
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे रात्री बंद असतात, याकडे लक्ष वेधत पालकमंत्री यांनी बंद पथदिव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या आठ दिवसात शहरातील सर्व दिवे सुरु करावेत, असे निर्देश दिले.
एलईडी लाईटच्या काऊंटरचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते करावे
शहरात वितरीत करण्यात येणाऱ्या एलईडी लाईटच्या वितरण केंद्राचे उद्घाटन संबंधित क्षेत्राच्या आमदारांच्या हस्ते करावे, असे निर्देश एलईडी लाईट वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विधानसभा क्षेत्रनिहाय विक्री केंद्र सुरु करावे त्याची माहिती संबंधित आमदारांना द्यावी. त्या भागाच्या आमदार व नगरसेवकाच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करावे. जे केंद्र सुरु आहेत त्याची माहितीही आमदारांना द्या, वितरण केंद्राचे कार्यक्रम घ्या, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
तरोडी जमीन विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
कामठी तालुक्यातील खरबीजवळ असलेल्या तरोडी येथील नासुप्रच्या सव्वा आठ एकर जागेचे 283 जणांना भूखंड पाडून विक्री केल्याबद्दल नासुप्रचे अधिकारी, विक्री करुन देणारा रजिस्ट्रार, ग्रामपंचायतीचा सरपंच, सचिव आणि विकणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश श्री. बावनकुळे यांनी दिले.
नासुप्रची जागा असतानाही विक्री करणाऱ्याने 283 जणांची फसवणूक केली आहे. या जागेवर सध्या 75 गरीब कुटुंब घरे बांधून राहत असून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही जागा नासुप्रची असल्याचे सिद्ध झाले आहे. या जागेचा सात बारा नासुप्रच्या नावे असून 12 एप्रिल 1965 मध्येच ही जागा नासुप्रला देण्यात आली होती. या जागेवर नासुप्रची मालकी असल्याचा अवॉर्डही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे.











