पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या ‘रमणबाग संगीत सभे’ची पंचवीसाव्या मैफलीत पंडित विनय कोपरकर यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सालग वराळी रागात झपताल, त्रितालातल्या बंदिशी सादर केल्या, मियॉंकीतोडी, शुध्द सारंग रागात मध्य आणि दृत लयीतले तराणे सादर करुन भैरवीने गायनाची सांगता केली. पंडित रामदास पळसुलेंनी तबल्यावर आणि राहुल गोळे यांनी हार्मोनियमवर साथ-संगत केली.
रमणबागेच्या कलाग‘ाममध्ये दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत संगीत सभेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी आणि नवोदितांना गायन, वादनाच्या विनामूल्य शिक्षणाबरोबर स्वतंत्रपणे कला सादर करता येते. तानसेन आणि कानसेन निर्माण होण्याच्या प्रकि‘येतील हा शाळेचा छोटासा प्रयत्न असल्याचे मु‘याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी म्हटले आहे.
शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक अजय पराड, उपशिक्षक सुहास देशपांडे यांनी उपक‘माचे संयोजन केले.
रमणबाग संगीत सभेची पंचवीसावी मैफल
९ ऑक्टोबर चे मराठीतले खास आकर्षण … पहा प्रोमो
बायकर्स अड्डा या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत लक्ष्य वेधून घेतले आहे येत्या ९ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे पहा याचा ट्रेलर
वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांचे निधन .. भावपूर्ण आदरांजली
पुणे- ज्येष्ठ पत्रकार व पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे शहरसंघटक नंदकुमार सातुर्डेकर यांच्या पत्नी वर्षा नंदकुमार सातुर्डेकर (वय- 47, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) यांचे आज सकाळी हॄदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या आणि पती असा परिवार आहे.
पिंपरीगाव येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे सातुर्डेकर यांच्या पत्रकार मित्र परिवारात व शिवसैनिकांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
उद्या सकाळी नऊ वाजता पिंपरीगावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जपानकडून राज्याच्या नेतृत्त्वाचा अनोखा गौरव; ओसाका सिटी विद्यापीठातर्फे मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. राज्यात आर्थिक-सामाजिक विकासास पोषक ठरणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येत आहे.
या विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळविणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत. 120 वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून गेल्या वीस वर्षांत आतापर्यंत ती फक्त दहा लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे.
या मानद डॉक्टरेटसाठी मानकऱ्यांची निवड करताना नियमित डॉक्टरेटपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण निकष लावले जातात. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीला पूरक ठरणारी विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कर्तबगारी दाखविणाऱ्या विद्वतजनांसोबतच समाजात सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी अनुकूल असे परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींनाही या पदवीने सन्मानित करता येते. 1996 नंतर या विद्यापीठातर्फे डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आलेल्या दहा मान्यवरांमधील केवळ दोन मान्यवरांना या निकषांवर सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची याच निकषावर डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आली आहे.
श्री. फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे स्विकारल्यानंतर वर्षभराच्या आतच राज्यात विविध आघाड्यांवर सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू पहात आहे. या मोहिमेत येत असलेल्या असंख्य अडथळ्यावर मात करून श्री. फडणवीस करीत असलेल्या प्रयत्नांचाही विद्यापीठाने प्रशंसापूर्वक उल्लेख केला आहे. या पदवीसाठी संबंधित मानकऱ्यांचा ओसाका सिटी विद्यापीठ अथवा ओसाका शहराशी वैशिष्ट्यपूर्ण संबंध अपेक्षित असतो. पश्चिम जपानमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा कन्साई प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या ओसाकाची मुंबई शहराशी औद्योगिक क्षेत्रात भागीदारी (Business Partnership City)आहे. श्री. फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात पार पडलेल्या आपल्या जपान दौऱ्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक चर्चासत्राचे उद्घाटन करण्यासाठी ओसाका शहराला भेट दिली होती आणि या शहराशी विविध पातळ्यांवर असलेला महाराष्ट्राचा ऋणानुबंध अधिक दृढ केला होता.
श्री. फडणवीस यांनी भविष्यात विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थी आणि ओसाकाच्या नागरिकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षाही विद्यापीठाने व्यक्त केली आहे.
इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजन समारंभाचे थेट प्रक्षेपण करणार- मुख्यमंत्री
समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष रवी गरुड, महेंद्र साळवे, कोषाध्यक्ष शिरीष चिखलीकर, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते लंकानंद थेरो, सदानंद मोहिते, सिताराम पवार या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास समन्वय समितीच्या प्रतिनिधींना बोलावण्यात येईल.
इंदू मिलमधील स्मारकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. इंदू मिल येथे होणाऱ्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात समन्वय समितीच्या सदस्यांना स्थान द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात समन्वय समितीने आराखडा तयार केला असून त्याचाही विचार व्हावा, तसेच कार्यक्रमापूर्वी चैत्यभूमीची रंगरंगोटी व सजावट व्हावी आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.
लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत- मुख्यमंत्री
मुंबई : लोकशाही दिनात तक्रार केल्यानंतरच सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावायचे का ? असा सवाल करीत लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात सकाळी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.
लोकशाही दिनात जमिनीबाबतचे देयक न मिळाल्याबाबत रायगड येथील उदयकुमार चंदने यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर चर्चा सुरू असतानाच तक्रारदारांना लोकशाही दिनातच त्वरित पेमेंट दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा स्वरूपाचा अनुभव अन्य ठिकाणच्या तक्रारदारांनी सांगितल्यावर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाही दिनात तक्रार दाखल केल्यावरच प्रशासनाने त्याची दखल घ्यायची का ? लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. मुळातच नागरिकांना लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्याची गरजच भासता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कायद्यातील काही सेवा आता आपले सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवा विहीत कालावधीत देण्याचे बंधनकारक असल्याने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार कारवाई करावी आणि सामान्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बऱ्याच जिल्ह्यात पैसे भरूनही वीज जोडणीची प्रकरणे (पेड पेंडींग) प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. जे कंत्राटदार विहीत मुदतीत कामे पूर्ण करीत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाका. मार्च 2016 पर्यंत एकही पेड पेंडींगचे प्रकरण शिल्लक राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोमवारी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये कोल्हापूर, भंडारा, अकोला, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, परभणी येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. प्रश्न निकाली निघाल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
दुचाकीवरील चोरट्यांनी नीलायम ब्रिज खाली रिक्षातील महिलेची पर्स पळविली .२ लाखाची चोरी ….
पुणे- भर संध्याकाळच्या गजबजलेल्या वेळेत म्हणजे सायकली सव्वापाच वाजता … रिक्षातून पतीसह प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेली . या पर्स मध्ये २ ल्खाचा ऐवज होता .
काळ सायकली हि घटना घडली . चालत्या रिक्षातून अशाप्रकारे पर्स पळविल्याने यापुढे किती काळजी घेतली पाहिजे हे लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे . दत्तवाडी पोलीस्थाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक एस.एन देशमाने अधिक तपास करीत आहेत
बेसबॉलमध्ये अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अजिंक्य
पुणे :
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल ने महानगरपालिका शिक्षण मंडळ व जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षांखालील बेसबॅाल स्पर्धेत गणेशखिंड मॉडर्न हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात उर्दू हायस्कूलने गणेशखिंड संघाचा १२-१ अशा होमरनने पराभव केला. विजयी संघाकडून यासिर शेख, आकिब उस्मानी, आफताब इनामदार व फझिल अन्सारी यांनी प्रत्येकी २ होमरन केल्या. पराभूत संघाकडून पार्थ शेलार याने एकमेव होमरन केली.
उपांत्य फेरीत मॉडर्न गणेशखिंड संघाने मॉडर्न शिवाजीनगर संघाचा ११-१, तर अँग्लो उर्दू बॅाईज संघाने एम. सी. एस. इंग्लिश प्रायमरी स्कूलचा ७-३ होमरनने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार , महाविद्यालयाच्या प्राचार्य परवीन शेख , एस ए इनामदार , आझम स्पोर्टस् अकादमीचे संचालक गुलजार शेख, खालिद बागवान , मजीद शेख , दानिश सय्यद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
अडथळयांचा जिद्दीने सामना करा : मंगेश तेंडूलकर -डीएसके विश्वरंग चित्रकला आणि फोटोग्राफीस्पर्धेचा पारितोषिक वितरण उत्साहात
पुणे : निसर्ग कोणत्याही अडथळयांमुळे थांबत नाही; तो आपल्या प्रयत्नांची उंची वाढवतो
आणि त्यातून मार्ग काढतो त्याच्या या वृत्तीतून माणसांनी आपल्या समस्यांचा जिद्दीने
सामना करायला हवा असा संदेश ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी यावेळी दिला.
डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि. तर्फे घेण्यात आलेल्या डीएसके विश्वरंग चित्रकला आणि
फोटोग्राफी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा काल डीएसके विश्व येथे पार पडला. डीएसके
उद्योगसमुहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी,जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे,
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,हेमंती कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. धायरी परिसरात
सन २००० मध्ये डीएसके विश्व प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. कुठलाही गृहप्रकल्प
उभारल्यानंतर आमची जबाबदारी संपली, असे आम्ही मानत नाही. येथील ग्राहकांशी आमचे
नाते दृढ करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवीत असतो.विश्वरंग चित्रकला आणि
फोटोग्राफी त्याचाच भाग आहे, असे डी. एस. कुलकर्णी यावेळी म्हणाले.
“निसर्गाची स्वतःची एक भाषा आहे, तिला कसलेही बंधन नाही. ती भाषा कलाकार आपल्या
कलेतून व्यक्त करत असतो. त्यातून माणसाचे आयुष्य अधिकाधिक सुंदर, समृद्ध होत
असते,‘‘ अशा भावना व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी मांडल्या.
किलबिल (बाल गट), जल्लोष (किशोर), रिमझिम (युवा व प्रौढ), सावली (ज्येष्ठ नागरिक) या
चार गटात ही स्पर्धा झाली. सर्व स्पर्धकांच्या चित्र व फोटोग्राफीचे प्रदर्शन डीएसके विश्व स्कूल
येथे दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यातील चित्रे व फोटोचे
परिक्षण प्रविण ढमे, मोहन देशमुख, मकरंद जाधव, जे. टी. कुंभार, टी. व्ही. भंडारे, सत्यजित
शिंदे, दिलीप पवार या कला शिक्षकांनी केले. उतेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी १ हजार तर
पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके
प्रदान करण्यात आली. या स्पर्धेमध्ये चित्र काढण्याचा व छायाचित्रटिपण्याचा आनंद
चिमुकल्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनी घेतला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
यावेळी पालकांना उद्देशून म्हणाले की मुलांना लौकिक शिक्षणात रस नसेल तर त्यांच्यातील
गुण ओळखून त्यात त्यांना प्रोत्साहन द्या. कारण एका छोट्यारोपट्याला जोपासल्यावरच
त्याचा मोठा वटवृक्ष निर्माण होतो. याचबरोबर त्यांनी मुलांना कला जिद्दीने जोपसून त्यातून
त्यांच्यातील सर्जनशीलता कशी बहरेल याबद्दल मार्गदर्शन केले.
परीक्षकांपैकी प्रवीण ढमे आणि दिलीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर राजेश
दामले यांनी सूत्रसंचालन केले.
” मेलडीज ऑन माऊथ ऑर्गन ” या ऑर्गनच्या १०० व्या शतकी महोत्सव उत्साहात संपन्न
छोट्याश्या माउथ ऑर्गनने रसिकांच्या मनावर राज्य केले . निमित होते शामकांत सुतार यांच्या ” मेलडीज ऑन माऊथ ऑर्गन ” या ऑर्गनच्या १०० व्या शतकी महोत्सवाच्या महफिलचे कोथरूडमधील मयुर कॉलनीमधील बाल शिक्षण सभागृहात ही महफिल सादर केली . सुप्रसिध्द वादकांच्या जबरदस्त ऑर्केस्ट्रा आनेवाला या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात होऊन दिल चीज क्या , तुझे देखा तो ये जाना सनम , तू गंगा कि मौज मै , भोली सुरत , ये दुनिया उसीकी , आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे , लेकर हम दिवाना दिल , बाबू समझो इशारे , इना मीना डिका , रूप तेरा मस्ताना , इतना हो गयी , बार बार देखो अशी एका पाठोपाठ एक अशा २४ गाण्यांची समधुर बरसात झाली . रसिकांनी ६ गाण्यांना वन्समोअरची दाद देऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला .
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी नातू फाऊडेशनचे अध्यक्ष सारंग नातू , गार्डियन डेव्हलपर्सचे संचालक मनीष साबडे , मसुप्रसिध्द गायक जितेंद्र भुरुक , सुप्रसिध्द निवेदक आणि निर्माता संदीप पंचवाटकर , सुप्रसिध्द गायक शेखर गरुड , सुप्रसिध्द निवेदक अभय गोखले , शामकांत सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते .
रशीद शेख (सिंथेसायझर )सचिन वाघमारे (बासरी )अनिल करमरकर (सेक्सोफोन ) अभिजित भदे (रिदम मशीन ऑक्टोपेड )पांडे (साईड रिदम ) अनिल देशपांडे (कोन्गोज ), किरण एकबोटे (तबला ढोलक ), विजू मूर्ती (बेस गिटार ), महेश गायकवाड (निवेदन ), समीर मोहिते (साउंड लाईट ) या सुप्रसिध्द वादकांच्या साथीने कार्य्क्रमची रंगत वाढली .
या कार्यक्रमामध्ये अनिता कुदळे , अक्षय देशपांडे यांनी लेकर हम दिवाना दिल , संदीप कुमठेकर यांनी तू गंगा की मौज मै यमुना की धारा , प्रताप भसाळे यांनी किसीकी मुस्कुराहटो पे उज्वला पिंगळे , मुकुंद परांजपे यांनी पहला नशा इतर कलाकरांनी ओमशांती ओम व इनामीना हि गाणी माउथ ऑर्गनवर समूहाने गायली .
‘ ईश्वरी देशपांडे’च्या रूपाने नवा चेहरा मराठीत…..!
‘ प्रेमाचे साईड इफेक्ट्स’ या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून ‘ईश्वरी देशपांडे’च्या रूपाने एक नविन ग्लॅमर चेहरा मराठीत पदार्पण करत असून ईश्वरीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत आपणाला दिसेल. ईश्वरी सध्या पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून व कायद्याचे शिक्षण घेत आहे. वकिलीचे शिक्षण पूर्ण करुन तिला मराठीतील आघाडीची अभिनेत्री बनायचे आहे. हिंदीतील माधुरी, दिपिका, प्रियंका आणि मराठीतील स्मिता पाटील या अभिनेत्रींना ती आदर्श मानते. मला त्यांच्यासारखं व्हायचंय असे ती आवर्जून सांगते.
‘ प्रेमाचे साईड इफेक्ट्स’ या आगामी चित्रपटासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने स्विमिंग, हॉर्स राइडिंग, बाईक राइडिंग, नृत्य अशा कलेत ती पारंगत झ्ाली आहे. या चित्रपटाकडून तिला खुप अपेक्षा आहेत. कारण तिने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सध्याचे मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव, संजय जाधव, उमेश कुलकर्णी, सुजय डहाके यांच्या सोबत तिला काम करायचे आहे अशी तिने इच्छा व्यक्त केली.
या चित्रपटात तिच्या बरोबर दिपक शिर्के, रवी काळे, किशोरी अंबिये, सुप्रिया पाठक असे दिग्ग्ज कलाकार असून ईश्वरी देशपांडे बरोबर प्रितमिक ड्रामाहोलीक हे दोन नवे चेहरे रूपेरी पडद्यावर आपणास दिसतील.
‘ईश्वरी’ फिल्म एन्टरटेंमेंन्ट प्रस्तुत व जयश्री देशपांडे निर्मित ‘ प्रेमाचे साईड इफेक्ट्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल चौथमल यांचे असून लेखक अभिजीत हरिचंद्र हे आहेत.छायाचित्रण रवी चंद्रन यांचे आहे. संगीतकार देव आशिष हे असून या चित्रपटात पाच गीते आहेत. गीत लेखन अभिजीत कुलकर्णी व हरिचंद्र यांची आहे. गायक बेला शेंडे, जावेद अली, पामिल जैन, विकी इंडियन अशा आणखी काही गायकांचा आवाज गीतांना लाभला आहे.
हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल असे निर्मात्या जयश्री देशपांडे यांनी सांगितले
दर्शकों के दिलो को छू रही है ‘तलवार’
फिल्म ने शुरुवात से ही ऐसी पकड़ बनायीं रखी है जो दर्शकों को ज़रा भी भटकने नहीं देती।
द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद कासम बियाबानी मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित
पुणे-पदमश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्यावतीने पुणे कॅम्प भागातील द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद कासम बियाबानी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ” मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार ” देयून करण्यात आले . या पुरस्कारमध्ये गौरवचिन्ह , गौरवपत्र स्वरूप होते . हा पुरस्कार एम. आय. टी. ग्रुपचे सचिव डॉ. मंगेश कराड यांच्याहस्ते देण्यात आला .
वाहिद कासम बियाबानी हे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजन , मोफत संगणक प्रक्शिक्षण , गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , शाळांना संगणक प्रदान करण्यात आले . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला , त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार वाटप केले आहे . आझम कॅम्पसमधील अवामी महाज पुणे सचिव तसेच गोल्डन ज्युबली एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत . ते खाजगी शिक्षक पतसंस्थावर संचालक पदावर आहेत . अनेक संस्थाशी जवळचा संबध आहे .
पदमश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला .
स्वच्छता अभियानात नागरिकांचा सहभाग आवश्यक – महापौर दत्तात्रय धनकवडे
पुणे-शहरातील स्वच्छता अभियानामध्ये शालेय महाविद्यालयातून विद्यार्थी स्वयंसेवी संस्था स्तरावर
सहभागासह नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. मनपा अधिकारी तसेच कर्मचारी यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत
अभियानाचे योग्य नियोजन करुन अभियान यशस्वी करणेसाठी कार्यरत असणे आवश्यक आहे. स्वच्छतेकामी मनपा
अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. परंतु सुट्टीच्या दिवशी अभियान काळात व अन्य वेळी नागरिकांचा सहभाग
असणे आवश्यक आहे. नागरिक सहभागामुळे योजना व कार्यास गती मिळते. स्वच्छता अभियानाकरिता आवश्यक
जनजागृती होणे सुध्दा आवश्यक आहे. विद्याथ्र्यांच्या सहभागामुळे मोठी मदत होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वतीने स्वच्छ भारत अभियान राष्ट्रीय स्वच्छता मोहिमे अंतर्गत
शनिवारवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी राष्ट्रपिता महात्मा
गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अपर्ण करुन
अभिवादन केले.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले की स्वच्छता कामाकरिता
सर्व स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक असून परिसर स्वच्छतेबरोबर सार्वजनिक शौचालये स्वच्छतेकरिता कार्यरत
रहाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुणे शहर स्वच्छ व हिरवेगार रहाणेकरिता सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक
असून नागरिक सहभाग ही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘स्वच्छ व सुंदर पुणेङ्कङ्क या विषयास अनुसरुन जनवाणी संस्थेच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात
आले. या प्रसंगी विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभाग समिती अध्यक्ष मा. दिलीप काळोखे, मा. मुक्ता टिळक,
मा. महापालिका सहाय्यक आयुक्त माधव देशपांडे, सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, मा. महापालिका सहाय्यक
आयुक्त युनुस पठाण, डॉ. अमित शहा, कार्यकारी अभियंता राजेंद्र मेदनकर, मा. संदीप खांडवे, मा. शाम ढवळे, अन्य
अधिकारी, कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मनपा शाळेतील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकमाचे सुत्र संचालन दिपक ढेलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. उप आयुक्त मधुकांत गरड यांनी
केले.
कार्यकमानंतर मनपा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत व
परिसरातील नागरिकांसह स्वच्छता प्रबोधन रॅली आयोजन केले. तसेच ऐतिहासिक वास्तु, इमारती, स्वच्छता अभियाना
अंतर्गत शनिवारवाडा येथील झाडणकाम मा. महापौर दत्तात्रय धनकवडे व घनकचरा व्यवस्थापन अधिकारी यांनी केले
असून किशोरी गद्रे व विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय तसेच हेरिटेज सेलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विश्रामबागवाडा व
परिसर स्वच्छता केली. अभियाना अंतर्गत शहरातील सर्व १५ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत प्रभागातील मा. पदाधिकारी,
अधिकारी, कर्मचारी, सभासद, क्षेत्रिय कार्यालय परिसरा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन झाडणकाम
करण्यात आल्याचे उपायुक्त श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.
ऑक्टोबर २०१७ पर्यंत शहरातील शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण होईल-उपायुक्त श्रीमती किशोरी गद्रे
पुणे- शहरातील सार्वजनिक शौचालयाचे निर्धारीत उद्दिष्ट व वैयक्तिक शौचालयाच्या कामाच्या पूर्तता अशा
दोन्ही स्तरावरुन पुणे शहरातील शौचालय मान्य निधीतील उद्दिष्टांचे काम पूर्ण करुन पुणे शहर हागणदारी मुक्त
केले जाईल असे घनकचरा विभागाचे उप आयुक्त श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. पंतप्रधान मा. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छ
भारत अभियाना कार्यक्रमा प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता
अभियान रॅली प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की स्वच्छता अभियाना अंतर्गत ४/७/२०१५ रोजी
वस्त्या व शाळांमधील शौचालये सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणामध्ये उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शहर
स्वच्छताकृती आराखडा तयार करण्यात आला असून २/१०/२०१७ पर्यंत पुणे शहर हागणदारी मुक्त करणेकरिता
२८५७२ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २/१०/२०१४ ते २/१०/२०१५ अखेर १३८५
वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झालेली आहेत. या योजने अंतर्गत लाभाथ्र्यांना बाधंकाम साहित्य उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी सस्ंथा व कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून वस्ती पातळयांवरील शौचालये दुरुस्ती
व नुतनीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेतील सभासद, अधिकारी, कर्मचारी वर्ग, नागरिक, स्वयंसेवी संस्था,
विद्यार्थी अशा विविध स्तरावरुन स्वच्छते विषयी कार्यक्रम घेत आहेत.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विक्रेते व्यावसायिक यांच्यावर सातत्याने कारवाई
करण्यात येत असून प्रशासकीय शुल्क वसूल केले जात आहे. तसेच अभियान कालावधीत ४ कला पथकांच्या
सहाय्याने शहरातील सर्व परिसरात पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शहरातील ९५ ठिकाणच्या
दिशादर्शक कमानींवर स्वच्छता संदेश देणारे जाहिरात फलकांद्वारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे. शहराच्या
विविध ठिकाणी संगीत, सांस्कृतिक, प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमाद्वारे कचरा
विलगीकरण व स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने जनजागृती केली जाणार असल्याचे घनकचरा विभागाच्या उप आयुक्त
श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.








