Home Blog Page 3544

आयपीडीएसअंतर्गत 16 शहरांतील वीजयंत्रणेचे सक्षमीकरण होणार 233.66 कोटींचा आराखडा मंजूर

0

पुणे :  शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 16 शहरांतील वीजयंत्रणेचे

सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील 233 कोटी 66 लाख रुपयांचा विविध

कामांचा आराखडा मंजूर झाला आहे.

केंद्ग शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत (Integrated Power

Development Scheme) पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी,

जुन्नर, दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, शिरुर, इंदापूर तसेच खडकी, देहू रोड व पुणे कन्टोंनमेंट बोर्ड या 16 शहरांची

निवड करण्यात आली आहे. या शहरांत वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण व क्षमता विस्तार करणे,

वीजहानी कमी करणे, योग्य दाबाने व 24×7 वीजपुरवठा करण्यासाठी 233 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचा

आराखडा मंजूर  झाला आहे.

एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील या 16 शहरांत 9 नवीन 22/11 केव्ही क्षमतेचे उपकेंद्ग,

22/11 केव्ही क्षमतेच्या 27 उपकेंद्गाचे आधुनिकीकरण, 156 किलोमीटर नवीन 22 केव्ही वाहिन्या व वाहिन्यांचे विभाजन,

35 किलोमीटर 22 केव्ही वाहिनीची क्षमतावाढ, 32 किलोमीटर एरियल बंच केबल, 68 किलोमीटर लघुदाब वाहिन्या, 85

किलोमीटर 11 केव्ही नवीन वाहिनी व वाहिनीचे विभाजन व क्षमतावाढ, 310 नवीन वितरण रोहित्रे, 259 किलोमीटरच्या

भूमिगत वाहिन्या, 7 किलोमीटर 22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्ग वाहिनी बे वाढविणे, 1208 नवीन लघु व उच्चदाबाचे फिडर पिलर तसेच फिडर पिलरमधून वीजजोडण्या, नवीन वीजमीटर, रोहित्रांचे व वाहिन्यांचे वीजखांब बदलणे आदी कामे

करण्यात येणार आहेत

rsz_1logo-for-portal

पाश्‍चात्य संगीत प्रकारांचा वेध घेणारे पुस्तक ‘लयपश्‍चिमा’चे रविवारी प्रकाशन

0

पुणे, ’राजहंस’ प्रकाशनच्या वतीने डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्‍चिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिरात हा कार्यक‘म होणार आहे.

पाश्‍चात्य जनसंगीताचा पॉप, रॉक, कंट्री, हिप हॉप आदी संगीतप्रकारांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानंावर पडणार्‍या सुरावटी नसून, त्या पाश्‍चात्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा आहेत. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे आणि बेदरकार जगणार्‍या आणि गाणार्‍या माणसांच्या प्रतिभेतून हे संगीतप्रकार साकारले आहेत. मायकेल जॅक्सन-रिकी मार्टिनपासून मडोना-शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून ‘लयपश्‍चिमा’मध्ये रेखाटण्यात आले आहे. या संगीतप्रकारांचा वेध घेणारा दृक-श्राव्य कार्यक‘म डॉ. जावडेकर यावेळी सादर करणार आहेत.

unnamed

‘के पग घुंगरू बांध, मीरा नाचीथी..’ पालकमंत्री बापटांच्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद

0

पुणे— रसिकांनी भरलेले श्री गणेश कला क्रीडा रंगमंच… ६० ते ८० च्या दशकातील हिंदी गाण्यांच्या आविष्कारात

तल्लीन झालेले रसिक… त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांची सपत्नीक झालेली एन्ट्री…पुणे नवरात्रौ

महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी पालकमंत्र्यांच्या सुप्तगुणांची करून दिलेली ओळख, यामुळे

रसिकांनी गाणे म्हणण्याचा त्यांना आग्रह केला आणि आबा बागुल व रसिकांच्या आग्रहाखातर पालकमंत्र्यांनी ‘के पग

घुंगरू बांध, मीरा नाचीथी..’, या गाण्याला सुरुवात करताच रसिकांनी रंगमंच शिट्या व टाळ्यांनी डोक्यावर घेतले.

पुणे नवरात्रौ महोत्सावंतर्गत सौरभ दफ्तरदार दिग्दर्शित ‘रंगीलारे’ हा ६० ते ८० दशकातील हिंदी चित्रपट  गीतांच्या

कार्यक्रमाचे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सोमवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. जुन्या काळात घेवून

जाणाऱ्या या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांनी शिट्या, टाळ्या वाजवत व वन्समोअर करत दाद दिली.

‘कौन है जो सपनो मे आया….’, ‘जवानी जाणे मन, हसीन दिलरुबा..’, ‘बच के रहेना रे बाबा… बच के रहेना रे…’,

‘रंगीला रे….’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर…’, ‘ओ हसीना झुल्फोवाली जाने जहा…’, ‘आजा, आजा, मै

हु प्यार तेरा…’, ‘निले निले अंबर पर, चांद जब आये…’, ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी…’, ‘छोटीसी उमर मे लग

गया रोग…’, ‘सारा जमाना…हसिनोका दिवाना..’, ‘प्यार हमे इस मोड पे ले आया..’, अशी एकापेक्षा एक सरस गीते

त्याच बरोबर ‘डान्सिकल परफॉर्मन्स’ने रसिकांना घायाळ केले. सौरभ दफ्तरदार, पालवी बापट, सई टेंभेकर, संदीप

उबाळे या कलाकारांनी गीते गायली.

unnamed1 unnamed2

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्यासह या कार्यक्रमाच्या वेळी भेट दिली. पुणे

नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष, उपमहापौर आबा बागुल, पोलीस उपायुक्त संजय पाटील,माजी नगरसेवक सुहास

कुलकर्णी, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल हे यावेळी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, पक्ष, जात, पंथ या पलीकडे जाऊन प्रेम करणारा व सामाजिक बांधिलकी जपणारे  आबा बागुल हे

व्यक्तिमत्व आहे. आरंभशूर अनेकजण असतात मात्र,आबा बागुल हे ज्याच्यातून दुसऱ्याला फायदा होईल व दुसऱ्याला

आनंद होईल असे उपक्रम सातत्याने राबवत असतात.

यावेळी बोलताना आबा बागुल यांनी ते राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गिरीश बापट यांच्यातील सुप्त

गुणांची माहिती देताना ते गाणे चांगले म्हणतात असे सांगत त्यांनी बापट यांना गाण्याचा आग्रह केला. रसिकांनीही

त्यांची री ओढत गाणे म्हणण्याचा आग्रह बापट यांना केला.

सौ. गिरीजा बापट यांनी ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके..’, हा देवीचा मंत्र म्हटला आणि गिरीश बापट यांनी संत

मीराबाई यांच्यावर अनेक गाणे, भजन आहेत, नवरात्रौ महोत्सव असल्याने त्यांच्यावरचे गीत सादर करतो असे सांगत

‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘‘के पग घुंगरू बांध, मीरा नाचीथी..’ हे गीत सादर केले. त्यांनी माईक हातात घेवून ‘

बुजुर्गोने…बुजुर्गोने फर्माया की अपने पैरो के उपर खडे होके दिखलाओ…’, असे म्हणताच संपूर्ण रंगमंच शिट्या आणि

टाळ्यांनी दणाणून गेला.

यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,

रमेश भंडारी, राजू बडगे, अमित बागुल, सागर आरोळे, श्रीकांत बागुल, राजेंद्र बागुल हे उपस्थित होते.

मनीषा मिश्रा यांच्या नृत्याविष्काराने जिंकली रसिकांची मने ‘आवर्तन’ कथक संध्येस उदंड प्रतिसाद; मुग्धा पाटणकरचीही नृत्यप्रस्तुती

0

पुणे : हरिणीच्या शिकारीला निघालेला वाघ एकीकडे भय तर दुसरीकडे शिकारीची ओढ, बेधुंद होऊन

धावणारया घोडयाची चपळ चाल, रूसलेल्या राधेची समजूत काढणारा कृष्ण, सर्व वाद्य शांत असताना केवळ

प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरणारी पावले असे नृत्यातील नानाविध आविष्कारांचे सादरीकरण करून

पुण्यात प्रथमच आपली कला सादर करणारया प्रसिद्ध नृत्यांगना मनीषा मिश्रा यांनी उपस्थितांची मने जिंकली.

1 2

निमित्त होते आसावरी पाटणकर यांच्या उद्गार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आवर्तन’ या कथक

मैफलीचे. बाल शिक्षण मंदिर, कोथरुड येथील सभागृहात काल हा कार्यक्रम पार पडला.

नृत्य व हावभाव याची सुरेख गोफ विणून एक परिपूर्ण कलेचे दर्शन मिश्रा यांनी आपल्या नृत्यातून घडविले.

कला ही शिकून अथवा उपजत असली तरी दैवीदेणगी लाभलेल्या कलाकारांचे सादरीकरण त्या कलेस वेगळ्या

उंचीवर नेऊन ठेवते, असाच काहीसा प्रत्यय मिश्रा यांचे नृत्य पाहताना रसिकांना आला. ताल त्रिताल, थाट,

तिहाई, बंदिश अशा कथकमधील विविध प्रकारांचे त्यांनी सादरीकरण केले. प्रकार पारंपारिक असले तरी प्रत्येक

प्रस्तुतीस ख़ास ‘मनीषा मिश्रा टच’ होता. सादरीकरणाच्या शेवटच्या पर्वात वाद्याविना केवळ प्रेक्षकांच्या

टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरून त्यांनी अनोखी नृत्यप्रस्तुती सादर केली. त्यांच्या नृत्यास पं. रवीनाथ मिश्रा

(तबला), प्रवीण कश्यप (गायन), रोहित वनकर(बासरी), फारुक खान (सारंगी), अजय पराड(संवादिनी) यांनी

सुरेल साथ दिली.

या मैफलीत आसावरी पाटणकर यांची कन्या व शिष्या मुग्धानेही आपली कला सादर केली. दुर्गास्तुतीने तीने

आपल्या नृत्याची सुरुवात केली. ताल झप ताल, सिंहावलोकन, संगीत तुकडे, कालिया दमन यासारख्या प्रसिद्ध

नृत्य प्रकारांचे मुग्धाने सादरीकरण केले. पं. रोहिणीताई भाटे यांची नृत्यरचना असणारया ‘काहे रोकत डगर

प्यारे..’ ही ठुमरीही प्रस्तुत केली. यास रसिकांनी भरभरून दाद दिली. तिहाई या प्रकाराने तीने आपल्या

नृत्यप्रस्तुतीची सांगता केली. वयाने व अनुभवाने लहान असली तरी आपले नवखेपण नृत्यातून दर्शवू न देता

अत्यंत सुरेख नृत्यप्रस्तुती सादर करून मुग्धाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तीच्या नृत्यास पं. अरविंदकुमार

आजाद (तबला), आसावरी पाटणकर, सुरश्री जोशी (गायन), रोहित वनकर(बासरी), फारुक खान (सारंगी), अजय

पराड(संवादिनी) यांनी सुरेल साथ दिली. नृत्य, वादन आणि गायन यांच्या अनोख्या मिलाफातून रंगलेली

‘आवर्तन’ मैफल रसिक पुणेकरांसाठी अविस्मरणीय संध्या ठरली. गुरु पं. रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ या

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युुकेशन सोसायटीच्या वतीने ‘वस्त्रदान महाअभियाना’चे आयोजन

0
पुणे :
 पुण्याचे नाव सामाजिक औदर्याच्या बाबतीत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये जाण्याचा उद्देश मनात ठेवून ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी ‘वस्त्रदान महाअभियाना’चे आयोजन केले आहे.
पी. ए. इनामदार (महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) आणि ऋषी आचार्य (‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(VEDA) महाविद्यालयाचे प्राचार्य ) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परिधान करण्यायोग्य कपड्यांचे दान या अभियानांर्गत पुणेकरांकडून स्वीकारले जाणार आहे. ही मोहीम 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2015 या काळात होणार असून, जमा कपड्यांचे लाभार्थींना वितरण दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत होणार आहे.
‘देण्याचा आनंद अनुभवा’ अशी या उपक्रमाची टॅगलाईन आहे. त्यासाठी 020-64013441 / 64013444 या हेल्पलाईनवर किंवा www.giveforpune.com या संकेतस्थळावर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘गुडविल इंडिया’ आणि शहरातील अनेक सामाजिक संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत.
3 लाख कपडे जमा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याआधीचे गिनीज रेकॉर्ड हे संयुक्त अरब अमिरातीच्या नावावर असून त्यात 1,53,240 कपडे जमा करण्यात आले होते.
हे कपडे समाजातून गोळा करण्यासाठी सोसायट्या आणि कॉलनीज्मधून आवाहन करण्यात येत आहे. पुणे परीसरात 13 ठिकाणी वितरणाची देखिल व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात सासवड, आळंदी, चाकण, वारजे, शिवणे, धायरी, आणि पिंपरी चिंचवड मधील चार ठिकाणांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक परिवारामध्ये 29 शैक्षणिक संस्था असून, 27,000 विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. त्यांचेही सहकार्य या अभियानात मिळणार आहे.
‘गुडविल इंडिया’ ही गेल्या साडेतीन वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. यापूर्वीही त्यांनी गरजूंना कपडे मिळवून देण्याचे काम केेले आहे.
rsz_1logo-for-portal

‘अॅक्वा लाईफ अँड मरीन स्पेशल शो’मध्ये ३०० हूनही अधिक दुर्मिळ जातींचे मासे प्रदर्शन २१ ऑक्टोबर पासून

0

देशाच्या विविध भागांमध्ये गेली पांच वर्षे यशस्वीपणे आयोजन केल्यावर आता ‘अॅक्वा लाइफ अँड मरीन स्पेशल शो’चे पुन्हा एकदा पुणे येथे आयोजन केले जात आहे. लौकिक क्रीएशन्सने आयोजित केलेले हे २५वे अॅक्वा लाइफ एक्झीबिशन पुणे येथील नळस्टॉप येथील कर्वे रोडवर सेंट क्रीस्पीन्स होम्स येथे २१ ते २५ ऑक्टोबर २०१५ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत होत आहे. या अनोख्या अशा प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क मात्र ७० रुपये एवढे ठेवण्यात आले आहे.

1 2 3 5 6 7 8 9

या प्रदर्शनात १५० हूनही अधिक फिश टँक आणि माशांच्या ३०० हूनही अधिक प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी अॅक्वा लाईफमध्ये मरीन स्पेशल शो आयोजित केला गेला आहे. यावेळी ज्या दुर्मिळ जाती प्रदर्शनात असतील त्यांत ट्रिगर फिश, जेली फिश, लायन फिश, पिवळ्या शेपटीचे डॅमसेल्स, निळे डॅमसेल्स, स्टिंग रे, माता टँक, ग्रीन विंग सार्जंट, मून रेक, चेकर बोर्ड रेस, सोनेरी डोक्याचा गोबी, मूरीश आयडॉल, विम्पल, ब्लूरिंग एंजल, कुराण एंजल, ब्राऊन इल, क्लाऊन फिश, स्टोन फिश, बॅट फिश, फायर क्लाऊन आणि यलो बटरफ्लाय यांचा त्यांत समावेश आहे.

मत्स्यप्रेमींना या प्रदर्शनात माश्यांच्या दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळणार आहेत. त्यांत अॅलीगेटर गार, आरोप्रियाना, ग्रे जायंट गुरामी, शोवेल नोज कॅटफीश, २ रेड आरोवाना, ब्लॅक घोस्ट आणि इतरही दुर्मिळ आकाराच्या माशांचा समावेश आहे.

अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन करून त्या माध्यमातून दुर्मिळ अशा जातींबद्दल तसेच इतरही प्राण्यांबद्दल रसिकांमध्ये असलेली जिज्ञासा शमविणे हे उद्दिष्ट असते. त्याशिवाय युवकांमध्ये समुद्रजीवनाबद्दल प्रेम निर्माण करणे, हा हेतूही त्यातून साध्य होतो, असे उद्गार ‘अॅक्वा लाइफ अँड मरीन स्पेशल शो’ या प्रदर्शनाचे आयोजक असलेल्या लौकिक क्रीएशन्सचे लौकिक सोमण यांनी काढले.

गेली पाच वर्षे या प्रदर्शनाचे आयोजन देशाच्या विविध भागांमध्ये केले जात आहे. देशाच्या कोणत्याही भागातही हे आयोजन केले गेले तरी त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतो. यावेळी पुणेकर आणि आसपासच्या उपनगरांमधील मत्स्यप्रेमींसाठी हे आयोजन केले गेले आहे.

या अनोख्या अशा प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क मात्र ७० रुपये एवढे ठेवण्यात आले आहे.

स्थळ- सेंट क्रीस्पिन्स होम्स, कर्वे रोड, नळस्टोप, पुणे

तारीख – २१ ते २५ ऑक्टोबर २०१५  ,

वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत.  

प्रवेशशुल्क – ७० रुपये

 

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क -9096003300 / 9404683407

पत्नी आणि मुलांची साथ मिळाल्यानेच आबा बागुल सारखा खंबीर कार्यकर्ता घडला – भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांचे उद्गार

0

पुणे-पत्नी सौ.जयश्री बागुल यांची आणि मुलांची साथ   मिळाल्याने आबा बागुल सारखा कार्यकर्ता भक्कम पणे कार्यरत राहिला आणि उल्लेखनीय कार्य करू शकला हे उद्गार भाजपचे राज्यातील  समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी काढले आहे निमित्त होते … पुणे नवरात्रो  महोत्सवातील लावणी महोत्सवाचे …

unnamed1

लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपारिक तसेच ठसकेबाज लावण्या…रसिकांनी  टाळया

आणि शिट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव श्री गणेश कलाक्रीडा

रंगमंच  येथे संपन्न झाला.

पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत या ‘महालावणी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांप्रमाणेच महिलांची

उपस्थिती आणि त्यांनी टाळ्या, शिट्या व वन्समोअरने कलावंतांना दिलेली दाद याने रंगमंच दणाणून सोडले.

या रावजी…बसा भावजी, कारभारी दमानं…, आबा जरा सरकून बसा…, शिटी वाजली.., लाडाची ग लाडाची, मी कैरी

पाडाची…, सोडा राया सोडा हा नाद्खुळा…., थेंबा थेंबानं…, तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला…. यावं यावं

दिलाच्या दिलवरा… यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण, शांताबाई या गाजलेल्या

लोकगीताचे लेखक संजय लोंढे यांनी स्वत: हे गीत गाऊन त्यावर नाच करणाऱ्या लावणी सम्राज्ञी तसेच

कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. टाळ्या, शिट्या आणि

वन्समोअरने प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले.विविध लावणी ग्रुपच्या एकाच ठिकाणी सादर झालेल्या या

दिलखेचक अदाकारीच्या आविष्काराने रसिकांना घायाळ केले.

या लावणी महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार,राधिका पाटील व साधना पुणेकर यांचा

यांच्या मदमस्त अप्सरा, पूनम कुडाळकर व पूजा पाटील यांच्या तुमच्यासाठी कायपण,सिनेअभिनेत्री शिवानी यांचा

लावणी महासंग्राम, टीना शर्मा व प्रिया मुंबईकर यांचा लावणी ऑन फायर तर सीमा पोटे व वसुंधरा पुणेकर

यांच्या ज्वानीचं पाखरू, या ग्रुपने सहभाग घेतला. हा लावणी महोत्सव दुपारी १२ पासून सलग १२ तास चालू

राहिला. प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी मंचावर नारळ वाढवून

पूजा केली. त्यावेळी नगरसेविका लक्ष्मीताई घोडके, लताताई राजगुरू, नगरसेवक राहुल तुपेरे तसेच मनपा

अधिकारी सतीश मानकामे आदी उपस्थित होते.

सायंकाळी लावणी महोत्सवाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,  राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप

कांबळे, विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, महिला

कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल

नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदीच्या उपस्थितीत हा लावणी महोत्सव रंगला. या सर्व मान्यवरांनी लावणी

महोत्सवाचा आनंद घेतला.

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे नाव देशात झाले आहे. या महोत्सवाला

लोकप्रियता व लोकमान्यता मिळाली आहे. केवळ सांस्कृतिक क्षेत्रात काम न करता आबा बागुल यांचे सामाजिक

ऐक्याचे काम, शिक्षण क्षेत्रातील विशेषत: मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरु केलेल्या ई-लर्निंग शाळेचे

कौतुक करावे तितके थोडे आहे. या शाळेतील २७ विद्यार्थी आयआयटी मध्ये गेले यापेक्षा त्यांच्या कामाची आणखी

कोणती पावती पाहिजे. त्यांच्या प्रभागात त्यांनी राबविलेले उपक्रम हे सुद्धा अद्वितीय आहेत. त्यांचे काम

बघता त्यांना आमदार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांना घ्यावी लागेल असे आश्वासन विखे पाटील यांनी यावेळी

दिलीप कांबळे म्हणाले, आबा बागुल यांचा वॉर्ड बदलला मात्र ते सातत्याने काम करीत राहिले. पर्वती

मतदारसंघात त्यांनी त्यांच्या कामातून वेगळा ठसा उमटविला आहे. आबा व माझी मैत्री राजकारणापलीकडची

मैत्री आहे असेही त्यांनी नमूद केले. पार्वती मतदार संघात आबा बागुल यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक

क्षेत्रात केलेल कार्य हे उल्लेखनीय आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या पत्नी सौ.जयश्री बागुल यांची त्यांना

साथ मिळाल्याने ते हे कार्य करू शकले असेही ते म्हणाले.

विधान परिषदेचे कॉंग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून आमदार शरद रणपिसे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

यावेळी करण्यात आला.

शरद रणपिसे म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून आबा बागुल यांनी जनतेच्या मनात एक वेगळे

स्थान निर्माण केले आहे. दिलीप कांबळे यांच्या भाषणात त्यांनी आबा व मी दोघेही गजरे विकत होतो असा

उल्लेख केला त्याचा संदर्भ देत रणपिसे म्हाणाले, गजरेवाले मंत्री होतात. आबांना जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे

तेही निश्चित मंत्री होतील.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. लावणी सारखी

लोककला ही महाराष्ट्राचे भूषण असून ही लोककला विविध माध्यमातून जगभर पोहचत आहे, ही प्रत्येक मराठी

माणसासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगत त्यांनी ते राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.देशात अच्छे

दिन येणार की नाही माहिती नाही परंतु १९८५ साली विना दप्तराच्या शाळेची कल्पना स्व. राजीव गांधी यांनी

आणलेल्या संगणक युगामुळे मांडली गेली. देशात पहिली ई-लर्निंग शाळा सुरु करून आपण ते सिद्ध करून

दाखविले असे त्यांनी सांगितले.

यावेळी शांताबाई या गाजलेल्या लोकगीताचा  गायक संजय लोंढे यांचा सत्कार राधाकृष्ण विखे पाटील यांनी

केला. शांताबाई हे गाणे व्हाटस् अपवर फिओरात असताना हे नेमके काय आहे हे माहिती नव्हते. मात्र, संजय लोंढे

यांचे कौतुक करायला पाहिजे. सामान्य माणसाने असामान्य कर्तुत्वाला आपण दाद दिली पाहिजे असे विखे पाटील

यावेळी सर्व लावणी कलाकारांचा सत्कार राध्कृष्ण विख विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, राजेंद्र बागुल, घन:शाम सावंत, नंदकुमार

कोंढाळकर, रमेश भंडारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महावितरणचा वीज पुरवठ्याचा नवीन विक्रम

0

मुंबई –
महावितरणने रविवारी 18 ऑक्टोबर 2015 रोजी कमाल मागणीच्या काळात सुमारे 17,311 मेगावॅट विजेचा

पुरवठा करुन नवा विक्रम नोंदविला आहे.  यापूर्वी दि. 15 ऑक्टोबर 2015 रोजी 17,259 मेगावॅट एवढी वीज

पुरविण्यात आली होती.  या महिन्याच्या सुरुवातीपासूनच महावितरणकडून सातत्याने 16,000 ते 16,500

मेगावॅटपेक्षा जास्त विजेचा पूरवठा केला जात आहे.

power-project-maha

सिनेमा मानवी जिवनातला अविभाज्य घटक

0
पुणे-कोणत्याही भाषेचा असो पण सिनेमा हा मानवी जीवनात ला अविभाज्य घटक बनला आहे आणि तणावपूर्ण जीवनात तर विनोदी सिनेमा हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो असे मत इथे प्यार का पंचनामा -२ या सिनेमातील अभिनेता सनी सिंघ अभिनेत्री सोनाली सैगल आणि  ओमकार कपूर  , इशिता राज आणि यांनी व्यक्त केले . अभिनेता कार्तिक आर्यन अभिनेत्री नुश्रात भरुच यावेळी उपस्थित होते

‘प्यार का पंचनामा -२’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यांनी पुण्यातील सिनेमागृहांना भेट दिली आणि पत्रकारांशी ही संवाद साधला .

पुणेकर रसिकांची आमच्या सिनेमाला मिळालेली दाद पाहून खूप आनंद झाला आहे . माणसाच्या जीवनात वेळोवेळी येणारा सिनेमा हा स्वप्नरंजन घेवून येतो आणि आयुष्यातला बरचसं काळ माणूस स्वप्नरंजनात घालवितो ज्याने काहीसे का होईनात आयुष्य सुकर होते त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या सिनेमाला मानवी आयुष्यात  स्थान आहे आमचा सिनेमा हा मेसेज वगैरे देण्याच्या फंदात नसावा त्याने निखळ करमणूक करावी आणि तणाव नाहीसा करणारच असावा अशी आमची नेहमीच अपेक्षा राहील असे यावेळी ओमकार कपूर याने सांगितले . त्याने जुदाई या सिनेमात अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केली होती तर सिंघम , चेन्नई एक्स्प्रेस  च्या अक्शन दिग्दर्शक जय सिंघ यांचा सनी हा मुलगा आहे . ‘कसोटी जिंदगी’कि सह अनेक मालिकांमधून त्याने भूमिका केल्या आहेत .

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेचे मनोहारी रुप

0

उस्मानाबाद: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र, विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवून भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.
दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा यांनी समन्वयाने या गर्दीचे नियंत्रण केले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे-घाटे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी सातत्याने ठिकठिकाणी भेटी देऊन प्रत्येक ठिकाणी भाविकांना त्रास होणार नाही, यापद्धतीने यंत्रणांना सूचना देत होते.
महाद्वार, मंदिरातील पोलीस चौकी येथून वारंवार भाविकांना सूचना दिल्या जात होत्या. ज्या भाविकांची चुकामूक झाली, त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ ध्वनीक्षेपकावरुन कळवून पोलीस चौकी अथवा मदत केंद्रांत येण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे अनेक भाविकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्याच्या अनेक भागातून भाविक खासगी गाड्यांनीही तुळजापूर येथे येत आहेत. त्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहनांना प्रवेश नसल्याने भाविकांना ये-जा करणे सुलभ होत आहे.
दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि. 19) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.

जागतिक शालेय क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी महाराष्ट्रात होणार

0
पुणे : आंतरराष्ट्रीय शालेय महासंघ व भारतीय शालेय महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2016 मध्ये होणाऱ्या जागतिक शालेय 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाचे अध्यक्ष लॉरेंट प्रिंट्रेंका यांनी दिली.
unnamed2 unnamed3

महाराष्ट्रातच सन 2018 मध्ये जागतिक करंडक शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर श्री. प्रिंट्रेंका बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाचे सरचिटणीस यानु कुलान, विपणन संचालक हेक्टर कॅब्रेरा, भारतीय शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष सतपाल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.

राज्य शासनाने व क्रिकेट संघटनांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत देऊ केलेल्या सहकार्याचे स्वागत करुन शालेय स्तरापासून खेळाडूंची प्रतिभा वृद्धिंगत होऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हावेत, असा या स्पर्धेमागचा हेतू असल्याचेही श्री. प्रिंट्रेंका यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन लवकरच या क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री. सतपाल यांनी दिली. ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय कुस्तीगीर चांगली कामगिरी करुन सुवर्णपदक पटकावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

तानी , भाकरवाडी ७, गोविंदा , तप्तपदी ,जरब,आणि म्हादू ला मिळाले सरकारी अनुदान ..

0

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चित्रपट निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येते. शनिवारी सहा चित्रपट निर्मिती संस्थांना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींना पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

अनुदान वाटप करण्यात आलेल्यांमध्ये मे.व्ही. पतके फिल्म्स (चित्रपट-तानी), मे.चिन्मय प्रॉडक्शन (चित्रपट-भाकरखाडी 7 किमी), मे.वृंदावन फिल्म एंटरटेन्मेंट (चित्रपट-गोविंदा), मे.व्हाईट पेपर कम्युनिकेशन (चित्रपट-तप्तपदी), मे. सह्याद्री मोशनपिक्चर्स (चित्रपट-जरब) आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून पुण्यात कारकीर्द घालविलेले  संदेश भंडारे यांच्या प्रॉडक्शन चा चित्रपट-म्हादू यांचा समावेश आहे.

श्री.तावडे यांनी आपल्या विभागाच्या कार्यक्रमात मान्यवर, पाहुणे व अधिकारी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन न करता पुस्तक भेट देऊन करावे, असा निर्णय वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे या कार्यक्रमात पहायला मिळाले.

नवरात्रीत रंगला लावणी महोत्सव … पहा फोटो .

0

1 2 4 5

पुणे नवरात्रो महोत्सवामध्ये .. लावणी महोत्सवाचे उद्घाटन रंगभूमीची पूजा करून उपमहापौर आबा बागुल यांनी केले .

या लावणी महोत्सवाची झलक दाखविणारे हे काही फोटो …

‘पुणे लोकमान्य फेस्टिवल’ तर्फे दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन

0

 

 

पुण्यातील मानाचा मानला जाणारा ‘पुणे लोकमान्य फेस्टिवल’ तर्फे दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन येत्या 20 ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. महालक्ष्मी लाँन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून पुणे व परिसरातील तरुणायीने यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ‘पुणे लोकमान्य फेस्टीवल’चे संस्थापक – अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.

‘पुणे लोकमान्य फेस्टिवलचे हे गौरवशाली १८ वे वर्ष आहे. दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून यात बेस्ट ग्रुप, बेस्ट कपल, बेस्ट किड, बेस्ट ड्रेपरी, बेस्ट मेल, बेस्ट फिमेल अशा विविध स्पर्धांचे योजन करण्यात आले आहे. मोफत  प्रवेशिकेसाठी कृपया ८८८८७२६८८६, ९६३०३८०९०२, ९९७०७५६६०६, ९९२१५६४५९१  या क्रमांकावर संपर्क करावा.

मनमोहक पुष्परचनेतून फुलली रसिकांची मने- ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे महिलांसाठी स्पर्धा व प्रदर्शन

0

unnamed1

पुणे :-विविधरंगी आकारांमध्ये करण्यात आलेली आकर्षक पुष्परचना… फुलांचा

मनमोहक दरवळ… मनाला प्रसन्नता प्रदान करणाऱ्या गुलाबापासून ते

अॅस्टरपर्यंत मांडण्यात आलेल्या फुलांनी रसिकांची मने अक्षरश: फुलून गेली

होती. निमित्त होते ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे भरवण्यात आलेल्या

पुष्परचना प्रदर्शनाचे.   .गुलाब, ऑर्किड, जरबेरा, लास्पर, शेवंती, आदी फुलांचा तसेच

लिलीची पाने, सायकस, केवडा यांची अचूक सांगड घालून केलील्या

मनमोहक कलाकृती पाहण्यास सर्वांनी एकच गर्दी केली.

या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पुष्परचना सादर केल्या.  सरोज

जोशी आणि शीला वाघोलीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.  स्पर्धेतील पुष्परचना

पाहण्याची सर्वांनी संधी मिळावी यासाठी स्पर्धेनंतर लगेचच प्रदर्शनही भरवण्यात

आले. ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. अश्विनी देशपांडे, सौ.

भाग्यश्री कुलकर्णी व सौ. तन्वी कुलकर्णीयादेखील उपस्थित होत्या.डॉ. चारुलता

बापये यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी त्यांनी प्रत्येक स्पर्धकाकडून

आपल्या आपल्या पुष्परचनेमागची संकल्पना समजून घेण्यावर भर दिला.

डॉ. चारुलता बापये यावेळी म्हणाल्या, महिलांनी आपल्या कल्पकतेतून या

दर्जेदार कलाकृती केल्या आहेत ,याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पुष्परचना

दिसायला सोपी वाटते परंतु यात अनेक बारकावे असतात ते समजून घेवून

त्याकडे छंद म्हणून पाहण्यापलीकडे जाऊन या क्षेत्राचे व्यावसायिक दुष्टीकोनातून

वाढलेले महत्व लक्षात घेऊन त्यासाठी स्वत:ला अधिकाधिक तयार करणे गरजेचे

आहे.

कला सादर करताना मिळणारा आनंद महत्वाचा त्यातून आपण काय शिकलो

आणि कुठे कमी पडलो हे जाणून घेणे म्हणजेच खर्या अर्थाने प्रगती करणे

आहे.  पुष्परचना करताना मिळाला आनंद हा पुरस्कारापेक्षा कितीतरीपट प्रेरणा

देणारा असतो. अशी भावना परिक्षक सरोज यांनी व्यक्त केली.

ज्योती कुलकर्णी यांनी समाजातील इतर महिलांसाठी विविध संधी देण्यासाठी

त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांचा कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ह्या फौंडेशनची

स्थापना केली आहे.दैनंदिन आयुष्यातून आपल्या छंदासाठी  एक व्यासपीठ

मिळावे या उद्देशाने खास महिलांसाठी हा खास उपक्रम राबविला होता.   अशी

भावना सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यापुढे

म्हणाल्या ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कृषी, उद्योग, पर्यावरण या

क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणा-या महिलांनाही २७ ऑक्टोबरला पुरस्कार देऊन

सन्मानित करण्यात येणार आहे.  स्त्रियांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी घेण्यात

आलेल्या ज्योती फुलराणी या स्पर्धेतील विजेत्या महिलांनाही त्याच

दिवशी  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .

कल्पना कृतीत उतरवल्याशिवाय त्याला परिपूर्णता मिळत नाही त्यामुळेच प्रत्येक

स्त्रीने आपल्यातील कलागुणांना ओळखून त्या जोपासून स्वत:चे अस्तित्व

निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे असा मोलाचा सल्ला यावेळी  सौ. तन्वी

कुलकर्णी यांनी दिला.  सूत्र संचालन सौ. दीपाली जोशी यांनी केले.