Home Blog Page 3543

धर्मेन्द्र के गांव में पहलवान आमिर खान

0

 

आमिर खान अपनी आने वाली फिल्म  दंगल की शूटिंग लुधियाना के एक गाँव में कर रहे थे ।
फिल्म का एक शेड्यूल पूरा हो चुका है और अब अगला शेड्यूल लुधियाना के ही एक गाँव दंगो में में शूट किया जाएगा।
जब आमिर को पता चला की दंगो धर्मेन्द्रजी का पैतृक गांव है, तो वो काफी उत्सुक हो गए और तुरंत ही धर्मेंद्रजी को फोन किया और उन्हें बताया की वो दंगो में शूट करने को लेकर कितने उत्साहित हैं।
धरमजी को भी यह बात सुनकर बहुत ख़ुशी हुई और उन्होंने फिल्म के लिए दुआएं दी। दोनों ने फिल्म को लेकर काफी बातचीत भी की । आमिर ने धरमजी से वादा किया है कि वो फिल्म पूरी होते ही उनके लिए एक स्पेशल स्क्रीनिंग रखेंगे ।
पी.के जैसी रिकॉर्ड ब्रेकर फिल्म के बाद आमिर अब दंगल पर काम कर रहे हैं। दंगल में वे एक पहलवान का किरदार निभा रहे हैं और उसके लिए उन्होंने अपने लुक में काफी परिवर्तन भी किया है।

सुदुंबरे गावात संगणक केंद्राचे उद्घाटन ; सुदुंबरे गाव भविष्यात संगणक साक्षर गाव म्हणून ओळखले जावे : खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण

0
पुणे :
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील दत्तक घेतलेल्या सुदुंबरे  गावामध्ये संगणक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संगणक केंद्राचे उद्घाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी झेन्सार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश नटराजन व त्यांचे सहकारी, तहसीलदार शरद पाटील,  सरपंच सविता भंगे, लायन्स क्लबचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
‘झेन्सार कंपनी’ च्या वतीने या संगणक केंद्रात ग्रामस्थांना मोफत संगणक प्रशिक्षण घेता यावे आणि भविष्यात संगणक साक्षर गाव म्हणून गावाची ओळख व्हावी यासाठी अद्यावत सोयी व सुविधा आहेत. नॅशनल डिजिटल लिट्रसी मिशन यांच्या सहकार्याने हे संगणक कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी याचा लाभ घेता येईल.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘भविष्यात सुदुंबरे गाव संगणक साक्षर गाव म्हणून ओळखले जावे यासाठी हे अद्यावत सोयी, सुविधांनी सुसज्ज असलेले संगणक केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये  शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवा वर्ग यांना मोफत संगणक प्रशिक्षण घेता येणार आहे. .’

डीएसके टोयोटाच्या ‘कारसोबत चार कूपन्स’ योजनेला महाराष्ट्रातून उदंडप्रतिसाद !

0

 

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने डीएसके टोयोटाने ग्राहकांसाठी एक आकर्षकयोजना जाहीर केलेली आहे. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसादमिळत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे काल दसर्‍याच्या मुहूर्तावरडीएसके टोयोटाच्या महाराष्ट्रातील 11 शोरूम्समधून 500हून अधिक टोयोटाकारचे ग्राहकांना वितरण करण्यात आले.

या योजने अंतर्गत डीएसके टोयोटाच्या कोणत्याही शोरूममधून टोयोटाचीकोणतीही कार घेणार्‍या ग्राहकांना चार कूपन्स देण्यात येत आहेत. यातीलपहिल्या कूपनद्वारे कार घेणार्‍या ग्राहकांना रू. 30 ते 75 हजारांची सवलतमिळते. दुसरे कूपन घर घेणार्‍यांसाठी अक्षरशः लाखमोलाचे ठरणारे आहे.अमेरिकेपासून बेंगलोर, चेन्नई पर्यंत तसेच नाशिक, मुंबई, पुणे येथेसाकारणार्‍या डीएसके गृहप्रकल्पातील कोणतेही घर घेणार्‍याला या दुसर्‍याकूपनद्वारे घराच्या किंमतीमध्ये रू. 2 ते 25 लाखांपर्यंत सूट देण्यात येणारआहे. तिसर्‍या कूपनद्वारे ग्राहकांना डीएसके ट्रॅव्हल कॉर्पोरेशन्सद्वारे सहलखर्चात हजारोंची बचत करून दिली जाणार आहे. या काळात सहलीलाजाणार्‍यांचे प्रमाणही मोठे असल्याने ग्राहकांना या बचतीचा मोठा फायदाहोणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरात असणार्‍याडीएसके उद्योगसमूहाच्या सिरॅको रेस्टॉरंट व लाउंजमध्ये ‘पेज थ्री’वातावरणात मेजवानी घेण्याचा लाभ चौथ्या कूपनद्वारे  दिला जाणारआहे. या कूपनचा वापर करून ग्राहक या रेस्टॉरंटमधील बिलावर 20% सवलत मिळवू शकतात.

डीएसके टोयोटाने ही योजना जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा व्हावा याउद्देशातूनच जाहीर केलेली आहे. त्यानुसारच ही योजना आखलेली असूनटोयोटा कारचे पहिले कूपन्स वगळता उर्वरित तीन कूपन्स हस्तांतरणीयठेवलेली आहे. त्यामुळे कार घेऊनही इतर तीन योजनांचा लाभ घेण्याच्याविचारात नसलेले ग्राहक ते कूपन आपले नातेवाईक, मित्रमैत्रिण यांनाहस्तांतरित करू शकतात. त्यामुळे ग्राहकांसोबतच त्यांच्या मित्र व नातेवाईकपरिवारालाही या योजनेचे फायदे मिळू शकतील. या संपूर्ण योजनेतूनडीएसकेंकडून कार घेणार्‍या ग्राहकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लाखोंचाफायदाच होणार आहे.

डीएसके टोयोटाने जाहीर केलेली ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू असूनदि. 14 नोव्हेंबर 2015 पर्यंत डीएसकेंकडून टोयोटा कार घेणार्‍या ग्राहकांनात्यामध्ये सहभागी होता येणार आहे.

 

पुणे स्मार्ट सिटी योजनेला राष्ट्रवादीचा पाठींबा … सुप्रिया सुळे स्मार्ट सिटीसाठी रॅलीत….

0

पुणे- भाजपच्या केंद्रातील सरकारने आणलेल्या स्मार्ट सिटी योजनेला आता राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले असून स्मार्ट सिटीसाठी सुप्रिया सुळे यांनी आपल्या खडकवासला लोकसभा मतदार संघातून रॅलीकाढली आणि जनजागृती केली यावेळी त्यांनी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पुणे येणाऱ्या पिढीसाठी असावे यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहेअसेप्रतिपादनहि केले

या शिवाय त्यांनी आपलेया फेसबुक खात्यावरही याबाबत उल्लेख केला आहे त्यात असे म्हटले आहे कि ,  पुणे शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. खडकवासला येथील वारजे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटीच्या संकल्पनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नगरसेवक श्री.दिलीप बराटे यांनी रॅलीचे आयोजन केले होते. तब्बल ३ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. पुणे स्मार्ट सिटी होण्यासाठी काय केले जावे, मुलांच्या संकल्पना काय आहेत याचे चित्रफलक घेऊन शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पुणे येणाऱ्या पिढीसाठी असावे यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

10603196_1039934852705178_6544018407067437823_n

 

नदी पात्रात सुरक्षा रक्षक नेमावेत या खा. वंदना चव्हाण यांच्या मागणीला यश -नेमण्यात आलेल्या 15 सुरक्षा रक्षकांना खा.वंदना चव्हाण यांनी केले मार्गदर्शन

0

 

 
पुणे :
 पुण्यातील नद्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावी, याचाच एक भाग म्हणून नदी पात्रात सुरक्षा रक्षक (डशर्लीीळीूं र्ॠीरीव) नेमावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी केली होती. या मागणीनुसार पुण्यातील नदी पात्र व तेथील परिसर स्वच्छ राहवा यासाठी 15 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षकांना नदी पात्रातील स्वच्छता यासाठी सुरक्षा रक्षकांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुणे महानगरपालिका येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महापालिका सहाय्यक आयुक्त माधव देशपांडे, माधव जगताप, संध्या घागरे, वसंत पाटील, जयंत भोसेकर, उपआयुक्त सतीश कुलकर्णी, दिलीप शेडगे (पूर्णवेळ नियंत्रक) आणि नदी पात्रात कार्यरत 15 सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
पुण्यातील नदी पात्र व तेथील परिसर स्वच्छ राहवा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. नदी पात्रात व परिसरात राजरोसपणे टाकण्यात येणारा राडारोडा, कचरा, निर्माल्य तसेच बेकायदेशीरपणे होत असलेली वाहनतळे, स्थलांतरीत लोकांची अतिक्रमणे इ. पासून नदीपात्र धोक्यात येत आहे. याविषयी खा.वंदना चव्हाण यांनी सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन केले.
आपली भूमिका मांडताना खा.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘पुणे महानगरपालिकेमार्फत नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक आपली जबाबदारी पार पाडतील पण आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे तसेच पुणेकर म्हणून आपणच आपली नदी स्वच्छ ठेवायला हवी. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी एकात्मिक प्रयत्न केले पाहिजेत.’
या आधी खासदार वंदना चव्हाण यांनी नदीपात्रात फेरीवाल्यांना जागा देण्यास विरोध करण्यात आला होता. यापुर्वीच ‘नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल’च्या वतीने नदीपात्रात बांधकामास बंदी केली आहे.

स्टोन क्रशरमधील 71 हजारांची वीजचोरी उघडकीस; गुन्हा दाखल

0

पुणे : वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील मे. ओम साई स्टोन क्रशरमध्ये 5244 युनिट्‌सच्या 71 हजार 250

रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की मंचर विभाग अंतर्गत वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील अजित दशरथ मोरडे

यांचा ओम साई स्टोन क्रशर नावाचे खडी केंद्ग आहे. या खडी केंद्गातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने

वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये वीज वापराची नोंद कमी व्हावी यासाठी हेतूपुरस्सर

वीजयंत्रणेत फेरफार करण्यात आल्याचे दिसून आले. वीजयंत्रणेतील फेरफारनंतर सदर खडी केंद्गात 5244 युनिट्‌सच्या 71

हजार 250 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

या वीजचोरीप्रकरणी मे. ओम साई स्टोन क्रशरच्या संचालकाविरुद्ध मंगळवारी (दि. 20 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे)

येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सदर खडी केंद्गातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात

अधीक्षक अभियंता श्री. शिवाजी चाफेकरांडे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, श्री. सुरेश

वानखेडे, उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल चौगुले, सहाय्यक अभियंता श्री. विवेक शिंदे, तंत्रज्ञ श्री. गोपाळ बिरकड यांनी

योगदान दिले.

qqq

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

0
unnamed1
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली.  पुणे महानगरपालिका येथील पक्ष कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी केले होते. या बैठकीत देश आणि राज्यातील वाढलेली असहिष्णूता, अस्वस्थता यावर चर्चा करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे कोंढवा पोट निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आसिफ पटेल यांनी निवडणूकीतुन माघार घेऊन उमेदवार रईस सुंडके यांना पाठिंबा दिल्याबद्दल खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते आसिफ पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
  बैठकीला कार्यध्यक्ष सुनिल बनकर, नगरसेवक आप्पा रेणुसे, प्रदेश सरचिटणीस नितीन ऊर्फ बबलू जाधव, राष्ट्रीय अल्पसंख्याक उपाध्यक्ष इक्राम खान तसेच महिला, युवा, जैन, शीख, खिशचन व सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अनिस सुंडके हे सुद्धा उपस्थित होते.

ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान ; वीणा देव यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

0

पुणे  :- कृषी, उद्योग, पर्यावरण व कल्पकता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या

महिलांना ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. या

सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून वीणा देव, सिंधुताई सपकाळ यांची सन्मानीय उपस्थिती

आणि डॉ. जयश्री तोडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून येत्या २७ तारखेला  सांयकाळी

६ वाजता  म्हात्रे पुलाजवळील,घरकुल लॉन्स येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अशी माहिती फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. अश्विनी देशपांडे यांनी आज झालेल्या पत्रकार

परिषदेत दिली. यावेळी सौ. भाग्यश्री कुलकर्णी, सौ. तन्वी कुलकर्णी, श्रमिका धोमकर व गीता

भुर्के उपस्थित होत्या.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले कि, डी. एस कुलकर्णी यांच्या

ज्येष्ठ पत्नी स्व. ज्योती कुलकर्णी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आम्ही या कार्यक्रमाचे

आयोजन केले आहे. खडतर वाटचालीतून परिस्थितीशी लढत शेतामध्ये नाविन्याचे मळे

फुलवणाऱ्या महिलांना ज्योती कृषीकन्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे.नंदा काळभोर यांना

यंदाच्या वर्षी या या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.५१ हजार रोख व मानपत्र हे

या पुरस्काराचे स्वरूप असेल. उद्योग क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या सुहासिनी वैद्य,

सायली मुतालिक, स्वाती ओतारी आणि आदर्श महिला बचत गट यांना ज्योती उद्योगिनी हा

पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून २५ हजार व मानपत्र हे या पुरस्कारचे स्वरूप असेल.

निसर्गाची कस धरून पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या अपर्णा वाटवे यांना ज्योती

निसर्गप्रिया पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून ११ हजार रुपये हे पुरस्काराचे स्वरूप

असेल.स्त्रियांच्या कल्पकतेला वाव मिळण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या पुष्परचना

स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी ज्योती फुलराणी या पुरस्कारानेसन्मानित करण्यात येणार

असल्याचे त्यांनी सांगितले

स्व. ज्योती कुलकर्णी यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने स्त्री अबला नाही हे दाखवून

दिले.  डीएसके समूहाच्या पायाभरणीत तसेच यशस्वी वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाट आहे.

पारंपारिक व आधुनिकतेची योग्य सांगड घालून यश कसे संपादन कसे करता येईल याची

त्यांना उत्तम जाण होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांना विशेष रस होता. त्यांच्या

या व्यक्तीमत्वाचा खर्या अर्थाने सन्मान व्हावा, या हेतूने आम्ही या पुरस्कार सोहळ्याचे

आयोजन केल्याची भावना सौ. तन्वी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनची थोडक्यात माहिती भाग्यश्री कुलकर्णी यांनी दिली. त्या

म्हणाल्या की, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली संघटना म्हणजे ज्योती कुलकर्णी रिसर्च

फाउंडेशन . आज आपल्यात अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्या आपल्या कार्याने इतरांना आधार

देत आहेत. अशा स्त्रियांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या हातांना बळ मिळावे, त्यांच्यामध्ये लढावू

वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने ह्या फौंडेशनची स्थापना केली आहे.कष्ट करणाऱ्या स्त्रियांच्या

पाठीशी उभी राहणारी संघटना अशी ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनची ओळख निर्माण

व्हावी, असा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

rsz_1logo-for-portal

दिवाळीचा संगीतमय नजराणा ‘कट्यार काळजात घुसली’.. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आता झी स्टुडिओज्

0

 

महाराष्ट्राला संगीत नाटकांची परंपरा लाभली आहे आणि त्यातील एक अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुमधुर संगीताने सजलेल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ह्या नाटकाने इतिहास घडवला. संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक सर्वार्थाने अजरामर आहे आणि हेच नाटक आता भव्य रूपात चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडीओज् आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि हिंदीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपल्या संगीताने चार चॉंद लावणारं शंकर एहसान लॉय हे त्रिकूट या निमित्ताने मराठीत पदार्पण करीत आहे हे विशेष.

या दिवाळीची संगीतमय भेट असणा-या ‘कट्यार काळजात घुसली’च्या संगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी शंकर-एहसान-लॉय यांच्यासोबत झी स्टुडिओजचे संस्थापक नितिन केणी, बिझनेस हेड निखिल साने, चित्रपटाचे गीतकार, गायक, तंत्रज्ञ आणि कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना शंकर महादेवन म्हणाले की, ” मराठीशी आणि महाराष्ट्राशी माझं एक भावनिक नातं आहे. माझी नाळ या मातीशी आणि येथील कलेशी जोडलेली आहे. मराठी संगीत, नाट्यसंगीत यावर मी जीवापाड प्रेम करतो. यामुळेच जेव्हा सुबोधने कट्यारच्या संगीत दिग्दर्शनाबद्दल माझ्याकडे विचारणा केली तेव्हा मला मनोमन आनंद झाला. मला गुरूस्थानी असलेले पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या बहारदार संगीताने अजरामर झालेल्या नाटकावर आधारित या चित्रपटाला संगीत देणं हे मोठं आव्हान होतं. पावित्र्य हा कट्यारच्या संगीताचा आत्मा आहे. अभिषेकी बुवांच्या मूळ रचनांना धक्का न लागू देता हे पावित्र्य जपण्य़ाचा प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाचं संगीत ही आमच्यातर्फे अभिषेकीबुवांना वाहिलेली सांगीतिक आदरांजली आहे असं मी मानतो.” तर त्यांचे सहसंगीतकार एहसान नुरानी म्हणाले की, “शास्त्रीय संगीताला आज परदेशात मानाच्या पायघड्या घातल्या जात असताना आपल्याकडे मात्र याबद्दल काहीशी अनास्था बघायला मिळते. परंतु मला आजच्या तरूणाईवर विश्वास आहे. ही युवा पिढी संगीताबद्दल अतिशय सजग आहे. त्यांना चांगलं आणि वाईट संगीत यातील फरक कळतो. त्यामुळे कट्यारच्या माध्यमातून ही पिढीही या संगीताचा आनंद घेईल याची मला पुरेपूर खात्री आहे. तर लॉय मेंडोसा म्हणाले की, “आपल्याला कायम पाश्चात्य आणि रॉक संगीताचं आकर्षण असतं. त्या संगीताच्या तुलनेत आपलं शास्त्रीय संगीत अतिशय सकस आणि दर्जेदार आहे. आम्ही आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिलं परंतू पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित असा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे आम्ही तिघेही जण याबद्दल खूप जास्त उत्सुक होतो. ही उत्सुकता आणि शास्त्रीय संगीताच्या प्रेमापोटीच आम्ही हा चित्रपट स्वीकारला.”

अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, कट्यार.. हा चित्रपट नाटकावर आधारित असला तरी तो नाटकाचं चित्रपटात केलेलं रूपांतर नसून ती एक स्वतंत्र आणि वेगळी कलाकृती आहे त्यामुळे त्याची तुलना नाटकाशी करू नये. चित्रपटात नाटकातील मुळ गाण्यांसोबतच काही नवीन गाण्यांचाही समावेश करण्यात आलाय. जुन्या गाण्यांप्रमाणेच ही नवीन गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील याची मला खात्री आहे.

कट्यार काळजात घुसली’ही कथा जेवढी दोन घराण्यातील संघर्षाची आहे तेवढीच गुरू – शिष्याच्या नात्याची सुद्धा आहे. कट्यार.. चा आकर्षणबिंदू आहे ते या सिनेमाचे संगीत. पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’, ‘भोला भंडारी’ ह्या नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीताचा वारसा लाभलेले महेश काळे,  सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवुडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंग, दिव्य कुमार, सावनी शेंडे आणि पं. वसंतराव देशपांडे यांचे नातु  राहुल देशपांडे अशा मातब्बर गायकांनी ही गाणी गायली आहेत. चित्रपटात शंकर महादेवन यांच्यावर चित्रीत झालेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘सूर निरागस हो’ हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालेलं आहे. चित्रपटात एकूण २० गाणी असून ती लिहिली आहेत, गीतकार प्रकाश कपाडिया, समीर सामंत, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे दिग्दर्शनात तर शंकर महादेवन अभिनयात पदार्पण करीत आहेत. त्याचबरोबर चतुरस्र अभिनेते सचिन पिळगावकर खॉंसाहेबांची अजरामर अशी भूमिका रंगवणार आहेत.

चित्रपटात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय या चित्रपटाद्वारे हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर मराठीमध्ये पदार्पण करत आहेत हे विशेष. यावर्षी ‘लोकमान्य – एक युगपुरूष, ‘टाईमपास २, ‘डबलसीट’सारखे सुपरहिट चित्रपट आणि ‘किल्ला’सारखी आशयघन कलाकृती देणा-या एस्सेल व्हिजनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् ने चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला  झी स्टुडीओज्  ह्या बॅंनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आता झी स्टुडिओज्

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांची व्याप्ती राज्यात, देशात आणि परदेशातही पोहचविणा-या एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सने ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशाचे अनेक मापदंड निर्माण करणारी ही संस्था आता ‘झी स्टुडिओज्’ या नावाने ओळखली जाणार आहे. याविषयी बोलताना संस्थापक नितीन केणी म्हणाले की, “बदल ही प्रत्येक माध्यमाची गरज आहे. २००४ या वर्षात ‘अल्फा मराठीचं’ ‘झी मराठी’ असं नामकरण झालं. त्यांनंतर सुरू झालेल्या ‘झी टॉकीजच्या’ बॅनरखाली आम्ही अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. ही यशस्वी घोडदौड चालू असताना एका नव्या बॅनरअंतर्गत चित्रपटांची निर्मिती करण्याचा आम्ही विचार केला आणि त्यातूनच ‘एस्सेल व्हिजन’ची स्थापना झाली. गेल्या दोन वर्षांत ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘लय भारी’, ‘डबलसीट’ सारख्या चित्रपटांमधून आम्ही बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या नवे विक्रम प्रस्थापित केलेच शिवाय ‘फॅंड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘किल्ला’ सारख्या आशयघन कलाकृतीही दिल्या. मराठी चित्रपटांना वेगळी ओळख प्राप्त करून देण्यात एस्सेल व्हिजनने महत्त्वाची भूमिका पार पाडल्यानंतर आता हा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर करण्याचा आमचा मानस आहे. ही एक नवी सुरूवात झी स्टुडिओज् या नावाने करण्यात येणार आहे. या बॅनरअंतर्गत हिंदीमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवलेल्या ‘जज्बा’ नंतर इंग्रजीतील ‘विन डिझल’ आणि ‘दि लास्ट विच हंटर’ या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एक निर्मितीसंस्था ‘स्टुडिओ’ या संकल्पनेतून केवळ देशातच नाही तर परदेशातही कार्यरत व्हावी हाच या पाठीमागचा उद्देश आहे. मराठीमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ही झी स्टुडिओज् ची पहिली निर्मिती ठरणार आहे याचा विशेष आनंद आहे.

महापालिका वृत्त – बिबवेवाडी धनकवडीत अतिक्रमण कारवाई तर कोरेगाव पार्कमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई ;स्मार्ट सिटी अंतर्गत महत्वाचे क्षेत्राकरिता माहिती अर्जाद्वारे मतं नोंदविण्याचे आवाहन

0

वाहतुकीस अडथळा ठरणाèया व्यावसायिकांवर कारवाई

            पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने बिबवेवाडी, धनकवडी परिसरातील सार्वजनिक रस्ते, चौक परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाèया पथारी, हातगाडीवाले व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यात आली.

            कारवाई अंतर्गत बालाजीनगर, त्रिमुर्ती चौक, दत्तनगर या परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणाèया १५ पथारी व ३० अन्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

            सदर कारवाईत महापालिका सहाय्यक आयुक्त सुकुमार पाटील यांचे नियंत्रणा अंतर्गत पूर्ण करण्यात आली. कारवाईत विभागीय निरीक्षक श्री. कुंभार, निरीक्षक qशदे, खुडे, गायकवाड, भोसले, मुरगुंड, होनराव तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील अन्य कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे पोलिस यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

            पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ च्या वतीने कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन १५०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करणेत आले.

            संगमवाडी टीपीएस कोरेगाव पार्क लेन नं. ६ लगत बीट रुट हॉटेल टेरेसवरील ओqनग कच्चे व पक्के बांधकाम किचन १५०० फुट यावर कारवाई करणेत आली.

            सदरची कारवाई १० पोलिस, १० बिगारी व १ गॅस कटर च्या सहाय्याने पूर्ण करणेत आली.

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्वाचे क्षेत्राकरिता माहिती अर्जाद्वारे मतं नोंदविण्याचे आवाहन

स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरातील क्षेत्रनिहाय विकास सर्वेक्षणाचे कामकाज पुणे मनपाचे वतीने व

क्षेत्रिय कार्यालय स्तरावरुन नागरिकांकडून माहिती अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन भरुन घ्यावयाचे

कामकाज सुरु झाले असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक २६/१०/२०१५ पर्यंत

आपल्या आवडीच्या क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रमास माहिती अर्जात पसंतीक्रम देऊन सहभाग नोंदवावा असे पुणे

महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मनपाचे वतीने घरोघरी प्रतिनिधी येतील त्यावेळी

त्यांना सहकार्य करावे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे त्यांर्नी  www.punesmartcity.in

वर संपर्क साधून माहिती अर्ज भरावा. www.punesmartcity.in  सांकेतस्थळावर गेल्यानंतर क्षेत्र सर्वे बटन

दाबल्यानंतर माहिती प्राप्त होऊ शकेल.

नागरिकांकडून ज्या मुद्द्यांबाबत पसंतीक्रम माहिती अर्जात नमूद करावयाचा आहे या संदर्भात

सविस्तर माहितीकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) मा. ओमप्रकाश बकोरिया यांचे अध्यक्षतेखाली

मनपा मुख्य भवनातील महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात बैठक संपन्न झाली. नागरिकांकडून

माहिती अर्ज कशा पध्दतीने ऑनलाईन व ऑफलाईन भरावयाचे आहेत याबाबत खातेप्रमुख, महापालिका

सहाय्यक आयुक्त यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व अधिकाèयांनी आपले माहिती अर्ज

बैठकीप्रसंगी भरुन दिले.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) मा. ओमप्रकाश बकोरिया व उपायुक्त अनिल पवार

यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच आशिष आगरवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे

माहिती दिली.

स्मर्ट सिटी अभियान अंतर्गत क्षेत्रनिहाय विकास सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांनी सोमवार

दि. २६/१०/२०१५ पर्यंत माहिती अर्ज भरुन द्यावयाचे आहेत.

माहिती अर्जात नमूद केलेल्या १ ते ११ या परिसराचा अनुक्रमांक १ ते ६ या बाबींसमोरील चौकोनी

बॉक्समध्ये फक्त आवडीच्या क्षेत्राचा क्रमांक लिहावयाचा आहे. पसंतीक्रमानुसार क्रमांक लिहीणे

अपेक्षित आहे. तसेच वयोगट व नाव व मोबाईल क्रमांक माहिती अर्जात नमूद करावयाचा आहे.

याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मयुरा

qशदेकर, मुख्यलेखापाल श्रीमती उल्का कळसकर, अग्निशमन प्रमुख प्रशांत रणपिसे, उपायुक्त डॉ. उदय

टेकाळे, सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त सुहास मापारी, उद्यान

अधिक्षक अशोक घोरपडे, अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, नागवस्ती विकास प्रमुख हनुमंत नाझिरकर,

मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, उपायुक्त मधुकांत गरड, कार्यकारी अभियंता नरेंद्र साळुंके,

महापालिका सहाय्यक आयुक्त जयंत भोसेकर, अशोक सकपाळ, युनुस पठाण, वसंत पाटील, विजय लांडगे,

संदीप कदम, रवी पवार, मंगेश दिघे, श्रीमती मनीषा शेकटकर, अनिरुध्द पावसकर, गणेश सोनुने व अन्य

अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना ‘सातारा रत्न ‘ पुरस्कार जाहीर

0
मुंबई –
 ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान‘च्या वतीने  देण्यात येणारा ‘सातारा रत्न ‘ हा पुरस्कार  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना जाहीर झाला आहे . मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथील सातारावासीयांचा मेळावा २१ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी  ५  वाजता परळ येथील दामोदर हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे . पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी ही माहिती पत्रका द्वारे दिली
unnamed
श्री महादेव जानकर यांनी राजकीय ,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा सातारा वासियांकडून यानिमित्ताने सन्मान केला जात आहे . श्री जानकर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्या मातोश्री अजून तेथे राहतात . अभियंता असलेल्या जानकरांनी समाजाच्या उत्थानाची शपथ घेवून अविवाहित राहून ,संसारापासून लांब राहून ,घरदार न करता राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला . या पक्षाचे हे तप पूर्ती वर्ष आहे  . राज्यातील सत्ता परिवर्तनात त्यांच्या पक्षाचा महत्वाचा वाटा आहे .

मागील वर्षी हा पुरस्कार पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आला होता

६००० चौ. फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई..

0

पुणे -महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ च्या वतीने लोहगाव परिसरातील

अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन सुमारे ६००० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

संबंधित मिळकतदारांना महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम ४७८(१) नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या.

लोहगाव परिसरातील स.नं. २५३ खेसे पार्क लोहगाव येथील ४ मिळकतदारांनी केलेल्या आरसीसी

पक्क्या स्वरुपाची विनापरवानगी बांधकामे केलेली होती.

सदरची कारवाई झोन क्र. ४ मधील कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणा अंतर्गत पूर्ण करण्यात

आली. सदर कारवाईत १० पोलिस कर्मचारी, १५ बिगारी, १ जेसीबी, १ कटर यांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात

आली.

पुणे कॅम्प भागात दस्तूर मेहेर रोडवरील मेहेर मोहल्लामधील रहिवाश्यांना रॉकेल व पेट्रोलचा वास असलेला पाणीपुरवठा

0

पुणे कॅम्प भागात दस्तूर मेहेर रोडवरील मेहेर मोहल्लामधील सर्वे नंबर ७७७व ७७४ रहिवाश्यांना रॉकेल व पेट्रोलचा वास असलेला पाणीपुरवठा होत आहे . गेले अनेक दिवसापासून पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक आठमध्ये हा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा नळकोंडाळ्यामधून होत असल्याने येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत .

   या पाणीपुरवठ्याची तक्रार येथील महिला रहिवाश्यांनी लष्कर पाणी पुरवठा केंद्राचे उप अभियंता पांडुरंग तावडे यांना भेटून केली आहे . पुणे कॅम्प भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे त्यामध्येच असा दुर्गधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने येथील रहिवाश्यांना अन्य ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे . अशी माहिती येथील महिला शकिला शेख , अंजली बहुले , तरन्नुम शेख , जबीन  शेख , खलिपा शेख , प्रज्ञा वाघमारे , दिलशाद शेख , हुस्ना शेख मुल्ला यांनी केली आहे .

डाळी आणि खाद्यतेलांच्या साठ्यांवर राज्यात निर्बंध;मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

0
मुंबई : मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील डाळी आणि खाद्यतेलांच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर 30 सप्टेंबर 2016 पर्यंत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय, समाजकार्य महाविद्यालयातील ग्रंथपालांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार या वस्तुंसाठी साठा निर्बंध लागू केले आहेत. त्याला अनुसरुन राज्य सरकारनेही राज्यात डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबिया यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात हे निर्बंध 30 सप्टेंबर 2016 पर्यंत लागू असणार आहेत. यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये डाळी आणि खाद्यतेलांच्या साठवणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार डाळी, खाद्य तेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर सरकारने फेब्रुवारी 2010 मध्ये निश्चित केलेल्या प्रमाणानुसार निर्बंध लागू राहतील. यातून शेतकऱ्यांकडे असलेला अशा प्रकारचा शेतमाल वगळण्यात आला आहे.

घाऊक डाळ विक्रेत्यांसाठी महानगरपालिका क्षेत्रात 3500 क्विंटल, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात 2500 क्विंटल आणि इतर ठिकाणी 1500 क्विंटल साठा मर्यादा राहील. किरकोळ डाळ विक्रेत्यांसाठी महानगरपालिका क्षेत्रात 200 क्विंटल, उर्वरित ठिकाणी 150 क्विंटल साठा मर्यादा राहील.

घाऊक खाद्य तेलबिया (टरफले असलेल्या शेंगदाण्यासह) विक्रेत्यांसाठी महानगरपालिका क्षेत्रात 2000 क्विंटल, उर्वरित ठिकाणी 800 क्विंटल साठा मर्यादा राहील. किरकोळ खाद्य तेलबिया (टरफले असलेल्या शेंगदाण्यासह) विक्रेत्यांसाठी महानगरपालिका क्षेत्रात 200 क्विंटल, उर्वरित ठिकाणी 100 क्विंटल साठा मर्यादा राहील. (घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी शेंगदाणे अथवा बियांसाठी या प्रमाणाच्या 75 टक्के साठा मर्यादा लागू राहील.)

घाऊक सर्व प्रकारचे खाद्यतेल विक्रेत्यांसाठी महानगरपालिका क्षेत्रात 3500 क्विंटल, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात 2500 क्विंटल आणि इतर ठिकाणी 1500 क्विंटल साठा मर्यादा राहील.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या बाबतीत महापालिका क्षेत्रातील घाऊक विक्रेते 1000 क्विंटल तर किरकोळ विक्रेते 40 क्विंटल खाद्यतेल साठवू शकतील. इतर ठिकाणी मात्र या मर्यादा घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी अनुक्रमे 300 व 20 क्विंटल याप्रमाणे असतील.

महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियमात दुरूस्ती करून अधिवक्ता कल्याण निधीच्या सदस्यत्वासाठीचे शुल्क आणि त्यापोटी मिळणाऱ्या लाभात वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेमध्ये नोंदणीकृत असलेल्या व निधीचे सदस्य असलेल्या वकिलांना या निधीचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम 1981 मधील कलम 2, 3, 8, 12, 14, 15, 16, 17 आणि 18 तसेच कलम 11 आणि 17 मधील अनुसूचीमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम 1981 पासून अंमलात आला असून या निधीच्या विनियोगासाठी महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी विश्वस्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या अधिनियमानुसार निधीचा लाभ मिळण्याकरिता पात्र होण्यासाठी अधिवक्ता आणि वकिलांना या निधीचे सदस्य होणे आवश्यक करण्यात आले आहे. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार सदस्य असलेले वकिल कल्याण निधीसाठी अर्ज करू शकतात. सध्याच्या नियमानुसार 30 वर्षे वकिली करणाऱ्या वकिलांना यातून केवळ 30 हजार रूपयांपर्यंतच लाभ मिळू शकतो. बदलत्या परिस्थितीनुसार मुल्यांकनात झालेली वाढ लक्षात घेता सदस्यत्व आणि त्यामुळे मिळणारे लाभ वाढविणे गरजेचे आहे.

अधिनियमात दुरूस्ती केल्यामुळे 30 वर्षे वकिली व्यवसाय केलेल्यांना तीन लाख रूपयांपर्यंतचा लाभ या निधीतून मिळू शकणार आहे. चार वर्षे कालावधीच्या आत सदस्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना देण्यात येणारा लाभ विश्वस्त समितीच्या निर्णयानुसार देण्यात येईल. अवलंबित्वामध्ये सुधारणा केल्यामुळे विवाहित मुलगी जी घटस्फोटिता आहे किंवा सदस्यांवर अवलंबून आहे, तिलाही निधीचा लाभ मिळणार आहे. अधिनियमांतर्गत 15 वर्षे निधीचा सदस्य असलेले वकिल निधीतून स्वेच्छेने निवृत्ती घेऊ शकणार आहेत. या निधीचे यश, तिचे आणि गुंतवणुकीच्या योग्य प्रशासनावर अवलंबून असल्याने शक्य तितक्या लवकर किंवा तीन महिन्यांच्या आत वकिल परिषदेच्या निर्देशाचे अनुपालन करणे आवश्यक आहे.

या निधीचे फायदे घेण्यासाठी जे वकिल संघ अधिनियमानुसार स्वत:ची नोंदणी करण्यास अपयशी ठरतील, ते अधिवक्ता कल्याण निधीमधील फायदे मागण्यास अपात्र ठरणार आहेत. या निधीचा लाभ मिळविण्यासाठी किमान वकिलीची मर्यादा 12 वर्षांवरून 10 वर्षांवर आणण्यात आली आहे. तसेच शुल्कातही पाचपट वाढ करण्यात आली आहे. निधीचा लाभ मिळविण्यासाठीचा अर्ज नाकारल्यास भरलेल्या आवेदन शुल्काची रक्कम परत दिली जाणार आहे.

निधीचे सदस्यत्व घेण्याच्या वेळी वकिली व्यवसायास 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला असल्यास त्यांना या निधीत 10 हजार रूपये एकाचवेळी भरावे लागणार आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वकिली करणाऱ्यांना 4 वार्षिक समान हप्त्यात ही रक्कम भरता येणार आहे. या निधीमध्ये सदस्याने प्रवेश केल्यापासून 15 वर्षांनंतर लाभ मिळण्यास पात्र असेल. याआधी लाभ घ्यावयाचा झाल्यास त्याने जमा केलेल्या रक्कमेवर सहा टक्के वार्षिक व्याज मिळविण्यास पात्र ठरणार आहेत.

कल्याण निधीच्या मुद्रांकांचे मूल्य दोन रूपयांवरून वीस रूपये करण्यात येणार असून वकिलांसोबतच विहित अभिकरणामार्फत मुद्रांक विकण्यात येणार आहे. यावर वकिल संघ नियंत्रण ठेवणार आहे.

समाजकार्य महाविद्यालयातील ग्रंथपालांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याचा निर्णय
सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील ग्रंथपालांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ 51 समाजकार्य महाविद्यालयांतील 22 ग्रंथपालांना होणार आहे. समाजकार्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2011 च्या शासन निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु त्यावेळी ग्रंथपाल पदांबाबतचा प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्यामुळे संबंधित शासन निर्णयान्वये ग्रंथपाल पदाला सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली नव्हती. विद्यापीठ अनुदान आयोगाने ग्रंथपाल संवर्गास शिक्षक पदांचा तत्सम दर्जा दिला आहे. आजच्या निर्णयामुळे ग्रंथपालांना 1 जानेवारी 2006 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू झाली आहे.

 

आयपीडीएसअंतर्गत 16 शहरांतील वीजयंत्रणेचे सक्षमीकरण होणार 233.66 कोटींचा आराखडा मंजूर

0

पुणे :  शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 16 शहरांतील वीजयंत्रणेचे

सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील 233 कोटी 66 लाख रुपयांचा विविध

कामांचा आराखडा मंजूर झाला आहे.

केंद्ग शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत (Integrated Power

Development Scheme) पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी,

जुन्नर, दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, शिरुर, इंदापूर तसेच खडकी, देहू रोड व पुणे कन्टोंनमेंट बोर्ड या 16 शहरांची

निवड करण्यात आली आहे. या शहरांत वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण व क्षमता विस्तार करणे,

वीजहानी कमी करणे, योग्य दाबाने व 24×7 वीजपुरवठा करण्यासाठी 233 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचा

आराखडा मंजूर  झाला आहे.

एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील या 16 शहरांत 9 नवीन 22/11 केव्ही क्षमतेचे उपकेंद्ग,

22/11 केव्ही क्षमतेच्या 27 उपकेंद्गाचे आधुनिकीकरण, 156 किलोमीटर नवीन 22 केव्ही वाहिन्या व वाहिन्यांचे विभाजन,

35 किलोमीटर 22 केव्ही वाहिनीची क्षमतावाढ, 32 किलोमीटर एरियल बंच केबल, 68 किलोमीटर लघुदाब वाहिन्या, 85

किलोमीटर 11 केव्ही नवीन वाहिनी व वाहिनीचे विभाजन व क्षमतावाढ, 310 नवीन वितरण रोहित्रे, 259 किलोमीटरच्या

भूमिगत वाहिन्या, 7 किलोमीटर 22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्ग वाहिनी बे वाढविणे, 1208 नवीन लघु व उच्चदाबाचे फिडर पिलर तसेच फिडर पिलरमधून वीजजोडण्या, नवीन वीजमीटर, रोहित्रांचे व वाहिन्यांचे वीजखांब बदलणे आदी कामे

करण्यात येणार आहेत

rsz_1logo-for-portal