Home Blog Page 3540

वैकुंठात … दीपोत्सव…..

0

पुणे ः राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाने दीपावलीनिमित्त कैलास स्मशानभूमीत केलेल्या दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला. ढोले-पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्मशानभूमीत व स्वच्छता विभागात काम करणार्‍या ३० कर्मचार्‍यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नगरसेविका लता राजगुरु, महापालिकेचे सह-आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, सहायक आयुक्त संजय गावडे, आरोग्य निरीक्षिका नीलिमा काकडे, विभागीय आरोग्य निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदार रांजेकर, सागर राऊत, गणेश माने, मंगेश तडके, मिलिंद येद्रे, विजय बढे, अक्षय माने यांनी संयोजन केले.

unnamed1 unnamed2 unnamed3

फार्मा क्रिकेट चेम्पियन राज्य स्तरीय स्पर्धेत अल्लाना कॉलेज विजयी

0
पुणे :
फार्मा क्रिकेट चेम्पियन स्पर्धेत  यजमान अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ने विजय मिळवला . आझम कॅम्पस मैदानात ५ नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ झाला . या ३ दिवसीय राज्य स्तरीय स्पर्धेत १७ महाविद्यालयांनी भाग घेतला .
अंतिम सामना सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी आणि अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात झाला . संस्थेचे सहसचिव इरफान शेख आणि प्राचार्य किरण भिसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . गुलझार शेख ,डॉ एजाज शेख ,रजत सय्यद उपस्थित होते

आयुष काटे ‘कला की खोज ‘ नृत्य गायन स्पर्धेत वरिष्ठ गटात विजयी

0
पुणे :
‘कला की खोज ‘ २०१५ या नृत्य -गायन स्पर्धेत बिशप स्कूल कल्याणीनगर चा विद्यार्थी आयुष काटे हा वरिष्ठ गटात अंतिम फेरीत  विजयी ठरला .एन्त्रू नस ‘ आयोजित ही स्पर्धा   फिनिक्स मार्केट सिटी येथे झाली . अभिनेता टॉम आल्टर ,फलेन नेटो (झलक दिखला जा ),युवान माकर (कलाकार ) रितिका इराणी (कोरियो ग्राफर) ,शीतल कुलकर्णी   यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
या परीक्षकांच्या हस्ते आयुष काटे याला पारितोषिक देण्यात आले . आयुष हा बिशप स्कूल चा विद्यार्थी आहे . बिशप स्कूल आणि  पालक डॉ दिपाली राजेश  काटे यांनी आयुष चे अभिनंदन केले . या स्पर्धेत २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते

माझ्यातील संगीतकारावर गीतरामायणाचे संस्कार – प्रभाकर जोग -गदिमांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्नशील रहाणार – उपमहापौर आबा बागूल

0

पुणे – गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आणि बाबुजींनी स्वरसाज चढवलेले गीतरामायण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या गीतरामायणात पहिल्यापासून माझा सहभाग होता. सुरूवातीला गीतरामायणात बाबुजींचा सहाय्यक आणि नंतर कार्यक्रमातील साथीदार म्हणून गीतरामायणाला मी त्याला चिकटूनच बसलो होतो. त्यामुळेच माझ्यातील संगीतकारावर गदिमा आणि बाबुजींच्या गीतरामायणाचे संस्कार आहेत अशी दिलखुलास प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी येथे केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

गीतरामायणाच्या हिरक महोत्सवीवर्षानिमित्त यंदाचा मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचा स्वरप्रतिभाचा दिवाळी अंक गीतरामायणावर काढण्यात आलेला आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ट गायक श्रीधऱ फडके, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते झाले. लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून जोग बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आबा बागूल उपस्थित होते. यावेळी प्रभाकर जोग, श्रीधर फडके आणि श्रीधर माडगूळकर यांचा स्वरप्रतिभा दिवाळी अंकातर्फे पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे, सहसंपादक राजा महाजन आणि अमृता संभूस उपस्थित होते.

प्रभाकर जोग म्हणाले, गीतरामायणाच्या प्रतिभेला तोड नाही. गदिमांनी साध्या सरळ शब्दात मांडलेले भावविश्व आणि तितक्याच सुरेल पद्धतीने बाबुजींनी त्याला दिलेली चाल यामुळे गीतरामायणाची गोडी अधिकच वाढली अन रसिकांच्या जिभेवरून मनात उतरली. आकाशवाणीवर गीतरामायणाच्या सुरूवातीपासून मी बाबूजींचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर सुमारे गीतरामायणाच्या ५०० कार्यक्रमांमध्ये बाबूजींना मी व्हायोलिनची साथ केलेली आहे. यावेळी त्यांनी चला राघवा बघाया जनकाची मिथिला….या गाण्याच्या वेळी घडलेल्या प्रसंगाला उजाळा दिला. ज्येष्ट तुझा पुत्र मला देई दशरथा…या गाण्याच्या निमित्ताने आपल्यातील संगीतकाराला कशी संधी बाबुजींनी दिली हे उलगडून सांगितले. या सगळ्याचा आपल्या संगीतजीवनावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

संगीतकार श्रीधर फडके म्हणाले, ३१ मार्च १९५५ या दिवशी गीतरामायणाचा प्रारंभ झाला. याच निमित्ताने गदिमा आणि बाबुजी एकत्र आले. त्यावेळी गाण्याची हस्तलिखिते आणण्यावरून थोडा वाद झाला होता. आणि असे वाद पुढेही होत राहिले पण त्यात गीतरामायणाबद्दलचे प्रेमच होते. पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होते त्या दिवशी मला ताप आल्याने नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबूजी गाण रेकॉर्ड करून रात्री अडीचवाजता मला बघायला रूग्णालयात आले होते. गदिमा आणि बाबुजींकडे मोठी प्रतिभा होते. त्यामुळे जेवढे सोपे शब्द गदिमांनी लिहिले त्याला पूर्णत: महत्व देत बाबुजींनी चाली बांधल्या. गीतरामायणातील सर्वच्यासर्व म्हणजे ५६ गाणी ही वेगवेगळ्या रागांवर आधारित आहे. एकही राग पुन्हा वापरलेला नाही.

स्व. यशवंतराव चव्हाण हे नेहमी भेटले की सांगायचे त्यांच्यावर जेव्हा दडपण येत असे किंवा एकटेपणा जाणवत असे किंवा मानसिक ताण येई तेव्हा ते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं कायम ऐकायचे आणि गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होत असे, अशी आठवणही फडके यांनी सांगितली. दुसरी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण सांगताना ते म्हणाले, सावरकरांच्या समोर शिवाजी मंदीरात गीतरामायणाचा कार्यक्रम नलावडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने झाला. त्यावेळी पराधीन आहे जगती या गाण्याचे सातवे कडवे झाल्यावर समोर बसलेल्या सारवकरांच्या डोळ्यात पाणी आलेले बाबूजींनी बघितले आणि काय झाले अशी विचारणा केली. त्यावर सावरकरांनी सांगितले की कुणाचे मी कौतुक करू तुझे की गदिमांचे ! याच गाण्याला बाबूजींनी चाल लावली त्यावेळी ते भारत गायन समाजात रहात होते. चाल लावून ते रिक्षाने निघाले आणि त्यांनी रिक्षेत नविन चाल सुचली. नवी चाल शोधण्याचे कारण त्यांनी असे दिले की गदिमांनी जीवनाचे जे वर्णन केले आहे त्याल सुयोग्य अशीच स्वररचना झाली पाहीजे आणि अवघ्या पंधरा मिनिटात त्यांनी गाण्याला नवी चाल बांधली असे श्रीधर फडके यांनी सांगितले.

श्रीधर माडगूळकर यांनी गदिमा हे घरच्या परिस्थितीमुळे धारवाडहून पुण्याला आले आणि उपाशी पोटीच हिंडत होते. मोरोपंतांचे वंशज असलेले पंत पराडकर यांनी त्यांना मंडई परिसरात बघितले आणि त्यांच्या रहाण्याची जेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आकाशवाणी केंद्राचे संचालक सीताराम लाड यांनी रसिकांना काही तरी वेगळे वर्षभर चालेल असा कार्यक्रम देण्याचे ठरविले आणि त्यासाठी गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणाची निवड केली. या गीतांना चाली बाबूजीच बांधणार असेही त्यांनी त्याचवेळी जाहीर केले आणि गदिमा – बाबूजी एकत्र आले. पुढे टिळकवाड्यात दत्तो वामन पोतदार यांनी गदिमांचा अधुनिक वाल्मिकी असा गौरव केला. गदिमांचे पुण्यात स्मारक व्हावे आणि त्यात गीतरामायणाचे खास दालन असावे अशी मागणी स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी केली त्याचा संदर्भ देऊन या मागणीचा पाठपुरावा व्हावा असे त्यांनी सांगितले.

उपमहापौर आबा बागूल यांनी गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन आपल्याच उपमहापौर पदाच्या कारकिर्दीत होईल आणि स्मारक नक्की उभे राहील अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की इतक्या वर्षात पुण्यात हे स्मारक का नाही झाले याची मला खंत आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून माझ्या उपमहापौरपदाच्या कारकिर्दीतच या प्रकल्पाचे भूमीपूजन व्हावे यासाठी मी कटिबद्ध राहीन. सध्या वाचणारे बघणारे झाले आहेत त्यामुळे वाचणारे कमी झाले आहेत. मात्र असे दिवळी अंक विकत घेऊनच वाचा असे आवाहन त्यांनी केले.

गीतरामायणाचे ऍप तयार करणा-या सुमित्र माडगूळकर या गदिमांच्या नातवाचा खास सत्कार करण्यात आला.

अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या अंकाच्या निर्मितीवेळी सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्रींमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी सुमारे शंभऱ वर्षांपूर्वी सन १९११ मध्ये चितारलेल्या चित्र रामायणातील निवडक पेंटिग्ज स्वरप्रतिभाच्या या दिवाळी अंकांत वापरण्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहायल विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. तसेच पुण्यात गदिमांचे स्मारक व्हायलाच पाहिजे त्यासाठी पुढाकार किमान या ६० व्या वर्षी तरी घेतला जावा असे आवाहन केले. अंकाच्या सहसंपादिका अमृता संभूस यांनी अंकाविषयी महिती दिली. या अंकातील पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला लेख म्हणजे गीतरामायणाची उत्तम समीक्षा आहे. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमातील भाषणाचाही समावेश अंकात आहे. गदिमांची गीतरामायणाची हस्तलिखितेही आहेत. कार्यक्रमाची सुरूवात प्रख्यात गायिका पदमजा लामरूड यांनी म्हटलेल्या ईशस्ववनाने आणि सादर केलेल्या राम जन्मला ग सखी राम जन्मला या गाण्याने झाली. आभार मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे सरचिटणीस व स्वरप्रतिभा अंकाचे संदीप वाळींबे यांनी मानले. या प्रसंगी पुणे फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, माजी आमदार मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, प्रकाश पायगुडे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे आदींसह संस्कृतिक साहित्य व समाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्वोत्कर्ष ट्रस्ट आणि संस्कार ग्रुप आयोजीत स्वरमयी दिवाळी पहाट

0

q q1

सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या १२ नोव्हेंबर गुरुवारी पहाटे ५ वाजता शनिवार वाडा पटांगण येथे दीपावली पाडवा पहाट निमित्ताने स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वोत्कर्ष ट्रस्टचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा उपक्रम गेली चार वर्षे नियमितपणे राबवत असून रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या वर्षी हि स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दीपोत्सव २०१५’ या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात रामेश्वरी वैशमपायन, मीनल पोंक्षे, राधा मंगेशकर आणि राजेश दातार यांचे गायन, सिद्धी कोळवणकर यांच्या तर्फे समूह नृत्याचे सादरीकरण तसेच दिपाली कदम यांच्या समूह नृत्याचे सादरीकरण, दगडू शेठ हलवाई ट्रस्टच्या अनाथ मुलांच्या धनगरी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

त्याच बरोबर सुशीलकुमार यांच्या हास्य विनोदाचे सादरीकरण आणि विजय जोशी यांचा लोकमान्य टिळक यांच्या वेशातील अभिनय असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून  नाट्य व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम विनामुल्य असून काही जागा निमंत्रीत मान्यवरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्वोत्कर्ष  ट्रस्ट हा गेली ५ वर्षे सांस्कृतिक, सामाजीक आणि अध्यात्मिक क उपक्रम राबवत आहे. सांस्कृतिक उपक्रमा अंतर्गत सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या हि पुढे असे अनेक उपक्रम राबवण्याचा ट्रस्टचा मानस असून रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सर्वोत्कर्ष ट्रस्ट  तर्फे करण्यात आले आहे. ट्रस्टच्या आध्यत्मिक उपक्रमा अंतर्गत  संस्कार ग्रुपच्या वतीने कार्यक्रम स्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेश दातार व संस्कार ग्रुपचे वैकुंठ कुंभार यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कचरा हटविण्यासाठी आंदोलन

0
पुणे :
कचरा प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी अनेकदा पालिका अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज पालिका आयुक्त कुणाल कुमार साठीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिले आणि पालिका अधिकार्‍यांना ‘व्हॉटस् अप’ द्वारा पुण्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी कचर्‍याच्या ढिगाचे फोटो पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी या अभिनव ‘व्हॉटस् अप आंदोलना’चे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये अंकुश काकडे, अशोक राठी, बंडू केमसे, दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, अ‍ॅड.म.वि.अकोलकर, विनायक हणमघर, ज्ञानेश्‍वर शिंदे, बबलू जाधव, नाना नलावडे, मंगेश तुपे, गणेश माथवड, शैलेश बडदे, गणेश नलावडे, मनाली भिलारे, काजल मिसाळ, रूपाली चाकणकर, डॉ. सुनीता मोरे, डॉ. काळे, संजय गाडे, योगेश वराडे आदी सहभागी झाले होते.
प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या परिसरातील कचरा पसरलेले 10 फोटो काढून आणण्यास सांगण्यात आले होते. ते अधिकार्‍यांना व्हॉटस् अपद्वारे देण्यात आले.
‘कचरा समस्या अक्राळ विक्राळ झाली असून, पुणे शहराचे रूपांतर ‘गार्बेज सिटी’मध्ये होऊ लागले आहे.’ असे या निवेदनात म्हटले आहे.
‘कचर्‍याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचत असून, राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीत सतत आवाज उठवत आहे. बैठका घेऊन अधिकार्‍यांचे लक्ष वेधले गेले होते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी पुणेकरांचा कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहर स्वच्छ व सुंदर राहील याबाबत कायम कार्यरत व आग्रही राहीले आहे, त्यामुळे पुणेकर नागरिकांना  शहरातील वाढत्या कचर्‍याच्या प्रश्‍नासंदर्भात प्रशासनाने दखल घेऊन त्वरीत कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हे आंदोलन करावे लागले, ’ असे आंदोलना दरम्यान खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण बोलताना म्हणाल्या.
रोज अत्यंत व्यवस्थित रस्ते झाडले जातात, अशा कचर्‍याचे एकत्रिकरण व्यवस्थित होत नाही. ‘कंटेनरमुक्त प्रभाग’ करताना वर्गीकृत कचरा घराघरातुन उचलला जावा त्यावर देखरेख व्हावी. प्रक्रिया व्हावी, कॉम्पॅक्टर्स उपयोग करावा नदीपात्रात कचरा टाकले जाऊ नये. असे या निवेदनात म्हटले आहे. ‘स्वच्छ’, ‘जनवाणी’सारख्या संस्था कचरा समस्येवर पालिकेबरोर काम करत आहेत. पण त्यात योग्य समन्वय होतो का? योग्य परिणाम साधला जातो का हे पाहिले पाहिजे.
रविवारची स्वच्छता होते का पाहिली पाहिजे. घन कचरा विभागाला पुरेशी वाहने, कर्मचारी आहेत का हे पाहिले पाहिजे. कचरा उचलण्याचे नियोजन केले पाहिजे. पालिकेतील अधिकार्‍यांनी कचरा समस्येसाठी जबाबदारीने काम केले पाहिजे.
बांधकामाचा राडारोडा नदीपात्रात आणि इतरत्र टाकण्यास मज्जाव करावा. पोस्टर्स लावून शहराचे विद्रुपीकरण होत आहे, त्यावर निर्बंध आणावेत. ‘स्मार्ट सिटी’ करताना या सर्व बाबतीत पालिका अधिकार्‍यांकडे प्रेरणा आणि उपाययोजनांची परिणामकारकता यात उणीव भासत आहे. सणासुदीचे दिवस असताना आणि एरवीही शहर स्वच्छ राहीले पाहिजे ही भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
‘आरोग्य खात्याचा धिक्कार असो !, आरोग्य खाते आणि प्रशासनाचा धिक्कार आणि निषेध असो !’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दील्या.

महिलांना अधिकाधिक सक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक : खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण

0
पुणे:
   स्फूर्ती महिला मंडळ व स्माईल (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीर येथे पार पडला. स्पर्धेमध्ये सागरिका इंद्रायणी ग्रुपने (भोसरी) प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या गटांना स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी निलीमा दाणी, संगीता बेलवणकर आणि स्पर्धेच्या परिक्षक नेहा दांडेकर उपस्थित होत्या.
स्पर्धेचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वराली ग्रुप (येरवडा), तृतीय क्रमांकाचे पारितोषिक क्षितीजा ग्रुप (पिंपरी-चिंचवड) तर उत्तेजनार्थ पारितोषिक महालक्ष्मी ग्रुपने मिळविले.  प्रदीप्ता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते.
यावेळी महिला शाहीर विनीता जोशी यांनी झाशीची राणी यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.
स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘मंगळागौर सारख्या पारंपारिक खेळांमुळे महिलांचे आरोग्य तंदुरूस्त राहण्यास मदत होऊ शकते. अशा पारंपारिक खेळांतून मिळणारा आनंद वेगळा आहे. महिलांना अधिकाधिक सक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. या मंगळागौर स्पर्धेमध्ये समाज प्रबोधन होण्यासाठी सामाजिकतेचे संदेश देणारे विषय महिलांना देण्यात आले होते. सर्वच गटांनी उत्कृष्ठ सादरीकरण केल्याने मला आनंद झाला आहे.’
याप्रसंगी बोलताना अश्‍विनी कदम म्हणाल्या, ‘महिला सक्षम असेल तर ती संपूर्ण कुटूंबाला सक्षम बनवू शकते. स्पर्धेचे विषय सामाजिक बांधिलकी जपणारे होते. त्यातून समाजापर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम या महिलांद्वारे करण्यात आले हे स्तुत्य आहे.’
स्पर्धेमध्ये पुणे शहरातील विविध भागातून एकूण वीस गट सहभागी झाले होते. प्रत्येक गटांत 10 ते 16 महिला होत्या. एकत्र कुटुंब पद्धती आणि पर्यावरण संरक्षण हे स्पर्धेचे विषय होते. स्पर्धेमध्ये सहभागी गटांतील महिलांनी पर्यावरण संरक्षण, मुलींच्या जन्माचे स्वागत, स्वच्छ पुणे, कचरा जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, कचरा निर्मुलन, एकत्र कुटुंब पद्धती अशा विषयांतून  सामाजिकतेचे संदेश दिले. आणि या विषयांवर गाणी व खेळांचे सारदरीकरण केले होते. ही स्पर्धा इंद्रधनुष्य हॉल, सचिन तेंडुलकर उद्यानाजवळ, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल, पुणे येथे झाली होती.

‘सर्व प्रकारच्या मुलांना मिसळू दिले तर ते भेदभाव करणार नाहीत’ – विलास वाघ

0
पुणे, ता : “सर्व पद्धतीचे विद्यार्थी, मुले एकत्र येउन खेळणे, बागडणे हे आजच्या समाजासाठी खूप महत्वाचे झाले आहे. लहानपणापासूनच त्यांना सगळ्यांमध्ये मिसळू दिले तर ते आयुष्यात कधीही भेदभाव करणार नाहीत.  त्यासाठी ‘दिवाळी आनंदोत्सवा’सारखे उपक्रम घेत राहणे जरुरीचे झाले आहे. ” असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांनी सुर्यदत्ता नैशनल स्कूल आयोजित ‘दिवाळी आनंदोत्सव’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले.
सूर्यदत्ता नैशनल स्कूलतर्फे लहान मुलांसाठी ‘दिवाळी आनंदोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्येष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडूलकर, अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख एम. एस. बिट्टा, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर व बाल कलाकार अथर्व कर्वे आदी मान्यवर या महोत्सवामध्ये सामील झाले होते.
“देशाच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी उत्कृष्ठ पद्धतीचे शिक्षण मुलांना दिले गेले पाहिजे. मुलांमध्ये भेदभावाची भावना नष्ट करण्यासाठी वेगवेळ्या स्थरातील मुलांना एकत्र आणून त्यांना बागडू दिले पाहिजे. यामध्ये वैयक्तिक प्रगती तसेच देशाची प्रगती राहिल्यावाचून राहणार नाही. तसेच भेदभाव करण्याची भावनाच नष्ट होईल.” अशी भावना विलास वाघ यांनी मुलांशी संवाद साधताना व्यक्त केली. अनाथ व मानसिक रित्या असक्षम असलेली मुले येथे एकत्रितपणे बागडताना बघून मनाला खूप बरे वाटले असेही त यावेळी म्हणाले.
 ३ ते १६ वयोगटातील  ‘माहेर’  स्वयंसेवी संस्थेतील ५० मुले, ‘साई सेवा’ संस्थेमधील मानसिक रित्या असक्षम असलेली, काही रस्त्यावर काम करणारी व गरीब कुटुंबातली अशी १०० मुले तसेच इतर शाळांमधली अनेक मुलेही या महोत्सवात सामील झाली होती आणि या उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटत होती. या महोत्सवामध्ये मुलांसाठी काही मैदानी खेळ, साप सीडी, वॉटर बॉल, बंजी जम्पिंग, बुल राईड, बलून शुटींग, असे अनेक खेळ ठेवण्यात आले होते.  काही जोकर आणि कार्टून केरेक्टर्स मुलांचे मनोरंजन करीत होते.
यावेळी एम. एस. बिट्टा म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे हि शिक्षण संस्था संस्कारक्षम पिढी घडवीत आहे जे राष्ट्र घडविण्यासाठी फार मोठे योगदान राहील. ” तसेच ज्येष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकरांनी, “मी देखील लहान अशावेळी मुलांसोबत लहान होतो व सतत नवीन काहीतरी शिकून जातो.” अशी भावना व्यक्त केली.
“आम्हाला आमच्या मुलांनी सकारात्मक दृष्टीने समाजाकडे बघणे महत्वाचे वाटते. जसे आपण आहोत तसेच इतर मुलेही आहेत, त्यांच्यामध्ये आपण मिळून मिसळून राहिले पाहिजे. एकत्र येउन कार्य केले पाहिजे. आपले त्यांच्याशी मने जुळली पाहिजे हा एकच हेतू या महोत्सावामागील आहे. समाजातील भेदभाव, उच्चनीच हि भावना समूळ नष्ट करण्यासाठी हा एक उपक्रम ठेवला आहे. यातुन आमच्या संस्थेतील मुले भावनिकरित्या सक्षम होतीलच तसेच त्यांना सर्व पद्धतीच्या लोकांमध्ये एकत्रित येउन आनंदी राहण्याची सवयदेखील लागेल. ” अशी भावना सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक डॉं. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले. 
 
‘साई सेवा’ संस्थेतील मानसिकरित्या असक्षम मुलांनी यावेळी ‘थेंक यु’ असे गाणेही गाऊन सर्वांचे आभार मानले, तसेच सुर्यदत्ता हॉटेल मेनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सर्व चिमुकल्यांसाठी ४०० चिवडा लाडूचे पाकीटेदेखील यावेळी तयार केले होते. 
 

सलाम पुणे च्या व्यासपीठावर गाजला ‘पारू ‘ चा वाढदिवस

0

पप्पी दे पारू ला या गाण्यात नाचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकरने  सलाम पुणे च्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थिती लावली आणि तिला आश्चर्याचा धक्का च  बसला ती चा वाढदिवस सलाम पुणे च्या व्यासपीठावर केक कापून साजरा झाला -५ नोव्हे.२०१५ यावेळी … यलो सिनेमाची नायिका गौरी गाडगीळ अभिनेते मनोज जोशी , निलेश साबळे , देवेंद्र भगत,मयूर लोणकर संगीतकार हर्षित अभिराज , मोहनकुमार भंडारी , ऐश्वर्या भंडारी , सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर . उपाध्यक्ष अभिनेत्री राधा कुलकर्णी , पूजा पुरंदरे , दिग्दर्शक शिव कदम दीपक सवाखंडे तसेच  सलाम पुणेचे कार्याध्यक्ष -सूत्रसंचालक संतोष चोरडिया, मनसे  चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर , प्रीती व्हिक्टर निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलखा आदींनी तिला यावेळी शुभेछ्या दिल्या ….

IMG_0493 IMG_0496

जात,पात ,धर्म, गाव पाहून कलावंताची किंमत करू नका -प्रा. वसंतराव पुरके ;बहारदार कार्यक्रमाने रंगभूमीदिनी रंगला ‘सलाम पुणे’ चा पुरस्कार सोहळा

0

q2 q3 q4 q5 q6 q7 q8 q9 q10IMG_0624
पुणे- साधू कि जात मत पुछीये , पुछो उसका ग्यान ; तलवार कि किमत किजीये , पद रहने दो म्यान … अशा शेरोशायरीत माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी
जात,पात धर्म . गाव पाहून कलावंताची किंमत करू नका ,त्याने कलेची केलेली साधना, तपश्चर्या पहा ,घेतलेली मेहनत पहा… असे आवाहन केले आणि सर्व सलाम पुणे पुरस्कारार्थी कलावंतांचे कौतूक केले
-पं . नंदकिशोर कपोते यांचे कथ्थक  सादरीकरण ,नवीन प्रभाकर यांची दिलखुलास मिमिक्री , ज्येष्ठ ऑर्केस्ट्रा संयोजक मोहनकुमार भंडारी यांनी फरमाईश वर सादर केलेली गाणी , संगीतकार हर्षित अभिराज यांचे सादरीकरण , अभिनेत्री स्मिता  गोंदकर हिची अदाकारी ,सतार वादन आणि तबला यांची जुगलबंदी , चांगलाच रंगतदार ठरला
मराठी आणि हिंदी सिनेनाट्य सृष्टीतील नामवंत कलाकार , निर्माते , दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमात राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके आणि पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले . अभिनेता मनोज जोशी दिग्दर्शित चाणक्य आणि अभिजित साटम निर्मित प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित  सुसाट या २ नाटकांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कपोते , भंडारी , नवीन प्रभाकर आणि ‘चल हवा येवू द्या ‘ चा दिग्दर्शक अभिनेता निलेश साबळे यांना हि ‘सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
त्याचबरोबर पुण्यातील उत्कृष्ट महिला शिल्पकार म्हणून सुप्रिया शिंदे यांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  .
पुणे युथ आयडॉल पुरस्काराने यावेळी अजित बाबर यांना तर शासकीय स्तरावरील विशेष सेवा पुरस्कार मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे आणि सामाजिक कार्याबद्दल सागर भागवत यांना सन्मानित करण्यात आले . सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर ,उपाध्यक्षा  अभिनेत्री राधा कुलकर्णी ,म न से चित्रपट सेनेचे अध्यक्ष कुणाल निंबाळकर, उपाध्यक्ष प्रीती व्हीक्टर ,निर्माते एम के धुमाळ , निलेश नवलाखा , योगेश वणवे , , दिग्दर्शक शिव कदम , अभिनेता मयुर लोणकर , देवेंद्र भगत , योगेश तनपुरे , वैभव पगारे , दिनेश नेरुने ,दक्षिणेकडील ख्यातनाम अभिनेत्री डिम्पल चोपडे . यलो ची नायिका गौरी गाडगीळ , पूजा पुरंदरे,भाग्यश्री पेंध्ये ,सोनिया बर्वे आदी कलावंत उपस्थित होते . अभिनेत्री स्मिता  गोंदकर हिचा वाढदिवस यावेळी केक कापून साजरा करण्यात आला

यावेळी बोलताना श्री पुरके म्हणाले ,जिवन आनंददायी बनविण्यात कलाक्षेत्राचे मोठे योगदान आहे . १० वर्षे मी नाटकात काम केले आहे मधुसूदन कानेटकरांच्या नाटकात स्त्रीची भूमिका केली  , गाणी म्हणण्याचा हि शौक आहे , ताणतणावाच्या जीवनात आनंदाचे क्षण भरण्याचे काम कलावंत करतात रंगभूमी , सिनेमा आणि टी व्ही आणि संगीत क्षेत्रातील मंडळी त्यासाठी आपले कसब पणाला लावतात ,आयुष्य वेचतात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे अशा कलाकारांच्या पाठीवर थाप देवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे काम करणाऱ्या ‘सलाम पुणे’ ला माझा सलाम …. हि वैभवशाली परंपरा अशीच पुढे न्यावीअसे आवाहन माजी शिक्षणमंत्री प्रा . वसंतराव पुरके यांनी येथे केले. वादक भाग्यश्री पेंध्ये ,अभिनेता नवीन प्रभाकर , अभिनेत्री राधा सागर नर्तक विद्यासागर , साहिल मरगजे,संगीतकार हर्षित अभिराज आदींनी यावेळी आपली कला सदर केली . सलाम पुणे चे कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी  सूत्रसंचालन केले

11223685_773888989400576_4134396699456968613_n 12036538_773890592733749_4276273546397455490_n 12115641_773867836069358_6643739416766175074_n 12189597_773861556069986_4116027919184022562_n 12189988_773861886069953_7833524803508837528_n 12191937_773888012734007_1887787858085619992_n 12208256_773856979403777_7804944840321622326_n IMG_0377 IMG_0394 IMG_0396 IMG_0467 IMG_0481 IMG_0523 IMG_0553 IMG_0554

प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत शिशु कर्ज योजनेचे वाटप

0

पुणे कॅम्प भागातील नेपियर रोडवरील प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिलानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत शिशु कर्ज योजनेचे वाटप करण्यात आले . विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे मुख्य व्यवस्थापक सतीश पाटकर यांच्याहस्ते हे कर्ज वाटप करण्यात आले . यावेळी विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे सहायक व्यवस्थापक देवेश्वरी बिस्ट व नेहा वानखेडे यांनी विशेष सहकार्य केले . यावेळी प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षां रंजना सोनावणे यांच्याहस्ते बँकेच्या अधिकारीचा शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी आशा राठोड , शीतल सोनावणे , प्रमिला जकेरिया , मंगल कांबळे , वैशाली भिसे , अंबिका पोनय्या , लक्ष्मी चौघुले आदि महिला बचतगटाच्या महिला व मनोहर चव्हाण , विकास हिवाळे , संतोष सोनावणे , राहुल जगताप , महेंद्र गायकवाड , दीपक काळे  उपस्थित होते .

यावेळी विजया बँक पुणे कॅम्प शाखेचे मुख्य व्यवस्थापक सतीश पाटकर  यांनी सांगितले कि , प्रधानमंत्री मुद्रा योजनेंअंतर्गत सर्व कर्ज योजनेला प्रतिसाद चांगला मिळत आहे , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून बँकेच्यामार्फत कर्ज वाटप करण्यात येत आहे , यामध्ये शिशु , किशोर , तरुण अशा तीन प्रकारची कर्ज योजना आहे

संमेलनाच्या संकेतस्थळासह मोबईल ऍपद्वारे तरुणांशी संवाद वाढवावा सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा

0

पुणे, ५ नोव्हेंबर: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानेही मराठी भाषेच्या प्रसारासाठी तांत्रिक दृष्ट्या दोन पावले पुढे गेले पाहिजे. त्यातून मराठी साहित्याचा प्रसार संमेलनाच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाईल ऍपच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत जास्तीत जास्त पोचवला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे संस्कृतिक कार्य तसेच शालेय व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
तावडे यांच्या हस्ते संमेलनाच्या संकेतस्थळाचे तसेच रेडिओ ध्वनीफितीचेही उद्घाटन माऊसच्या क्लीकने त्यांनी केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या घटनेचे स्वागत केले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, सचिव प्रकाश पायगुड, खजिनदार सुनील महाजन तसेच राजेश पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ुुु.ीरहळींूरीरााशश्ररप.र्विी.शर्वी.ळप असे या संमेलनाच्या संकेतस्थळाचे नाव असून त्यात साहित्यिक संदर्भ आणि रसिकांशी थेट संवाद साधता येईल, मराठीतील ऑनलाईन सहित्याचे संकलन, त्याच्या लिंक्स, ब्लॉग्ज, मराठी ऑडिओ बुक्स आणि दुर्मिळ ध्वनीफिती, मराठीतील दर्जेदार ऑनलाईन साहित्याला स्थान, पिंपरी-चिंचवड शहरांची वैशिष्ट्ये आणि सोशल मीडियाचा वापर त्यात करण्यात येत आहे. हे संकेतस्थळ विद्यापीठाचे संतोष देशपांडे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आले आहे.
सांस्कृतिक मंत्री हा मंचावर दिसण्यापेक्षा त्याने राबवलेल्या धोरणातून दिसला पाहिज, असे सांगून तावडे म्हणाले की, मराठी साहित्य व साहित्यिकाची स्वायत्तता ही जपली गेली पाहिजे. म्हणूनच मंत्रालयात खेटे घालण्याआधीच ८९व्या संमेलनाचा सरकारी निधी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच आम्ही बँकेत जमाही केला. हा जनतेचा पैसा असून त्यातून साहित्यासाठी चांगली कामेच होऊ शकतात.
मराठी साहित्य व साहित्यिकांचे स्थान टिकवणे हे राजव्यवस्थेचे काम असून मराठीतले चांगले साहित्य हे भारतीय तसेच इंग‘जीत नेण्याचा मोठा कॅनव्हास (अवकाश) मिळणे आवश्यक आहे. यासंबंधी बोलताना तावडे पुढे म्हणाले की, रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली डब्ल्यू. बी. येट्‌स याने इंग‘जीत आणल्यानेच त्यास नोबेल पुरस्कार मिळाला, तसे मराठीतले चांगले साहित्यही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुवादित व्हायला हवे. मराठी साहित्याचा खर्‍या अर्थाने प्रसार व्हावा यासाठी वाईजवळील बिलार येथे पुस्तकांचे गाव तयार करण्यात येणार असून तिथे सुमारे पाच लाख पुस्तके आणि सुटीच्या दिवसांमध्ये आवडत्या साहित्यिकांबरोबर साहित्यावर चर्चा व संवाद साधण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळावी याचीही व्यवस्था केली जाणार आहे. मराठी वाचनाची आवड वाढावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने केवळ मराठी पुस्तक विक‘ीसाठी एक हजार चौरस फुटची जागा कमी दरात उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही तावडे यांनी केले.
स्वागताध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले की, यापूर्वी संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मुंबईत राज्यपालांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते घडण्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यापाठोपाठ संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात व्हावे, ही इच्छाही आता पूर्ण झाली आहे. आमच्या विद्यापीठाला ८९वे संमेलन आयोजित करण्याची संधी मिळत असून आमचा खारीचा वाटा आम्ही उचलू आणि या संधीचे सोने करू. भविष्यातही मराठी साहित्यप्रसाराचे आमचे काम चालूच राहील.
मराठी भाषा समृद्ध असली तरी तिच्यातला संवाद मात्र कमी होत असल्याचे सांगून डॉ. मोरे म्हणाले की, संमेलनाच्या संवाद साधणार्‍या संकेतस्थळामुळे संवादसंस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तर माहिती व प्रेरणा या दोन्ही दृष्टीने ते संमेलनाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. वैद्य म्हणाल्या की, शिक्षणमंत्री तावडे यांनी कलाशाखेकडे जास्त लक्ष पुरवणे गरजेचे आहे, कारण साहित्य माणसाला घडवते, मनाची मशागत करत असल्यामुळे या शाखेचा विस्तार कसा होईल, याचा विचार व्हायला हवा. तसेच अभ्यासक‘मातून हद्दपार झालेले मराठी वैचारिक साहित्य पुन्हा कसे समाविष्ट होईल, याकडेही लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले, तर सोमनाथ पाटील यांनी आभार मानले.

पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साचला कचरा , परिसरात दुर्गंधी, डासांचे प्रमाणदेखील वाढले

0

पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे , यंदा पाऊससुद्धा कमी झाल्याने गेले अनेक दिवसापासून नव्या कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह नसल्याने हा कचरा साचत आहे , त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे . हा कालवा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधून वाहत असून कालव्याचे व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याकडे आहे , येथील नागरिक रणजित परदेशी , महेंद्र गायकवाड , मनिष सोनिग्रा यांनी  नवा कालवा स्वछ करण्याची मागणी केली आहे . या कालव्यास जाळी बसविण्याची मागणी हेमंत मुळे यांनी केली आहे

q1

‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक : विजय पांढरे

0
पुणे :
‘राजकीय पक्ष हे समाजाचे बाप नाहीत. तर समाजाच त्यांचा बाप आहे. एक पोर बिघडले, तर समाज दुसर्‍या पोराला सत्तेवर आणते. तोही बिघडत असेल तर समाज तिसर्‍या पोराला सत्तेवर आणेल, हे लक्षात घेतले पाहिजे.’ असे मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम इतिहास संशोधक मंडळ सभागृह, सदाशिव पेठ येथे बुधवारी झाला. याप्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजा दीक्षित, ‘सत्याग्रही विचारधारा’चे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी, उर्मिला सप्तर्षी, युक्रांदचे संदीप बर्वे, अंजली सोमण, सत्यशील देशपांडे उपस्थितीत होते.
‘धार्मिक आणि आर्थिक भ्रष्टाचाराने देश पोखरून निघत आहे. आर्थिक भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठीचे उपाय शोधता येतील, परंतु देशात सध्या फोफावणार्‍या धार्मिक भ्रष्टाचाराचे काय? हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे’, असे मत सिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी व्यक्त केले.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, ‘देशातील सद्य:स्थिती पाहता पुढील काळ पुरोगामी चळवळीसाठी खडतर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच नागरी समाजाचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. जनतेचा दबाव गट निर्माण व्हायला हवा. त्यासाठी लोकशिक्षण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनाला नैतिकतेची बैठक हवी.’

‘त्रिदल’ पुणे च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांची प्रातःकालीन संगीत मैफल

0

 

पुणे :
‘त्रिदल’ पुणे, ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी, यांची प्रातःकालीन संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. दि. 10 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. रोणू मुझुमदार आणि तौफिक कुरेशी यांना रामदास पळसुले, रोहित कुलकर्णी हे अनुक्रमे तबला, की-बोर्ड वर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमात 5 पक्क्या पुणेकरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात राजकुमार आगरवाल, दत्तोबा पाचंगे (चौघडा वादक), बाळासाहेब गांजवे (कोहिनूर आर्ट्स), भारत गायन समाज, शरद मोरे (शौकिन पान) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष  सुशील मुहनोत, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, जगदीश देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.