‘क्या कूल है हम 3’ सिनेमाचा – 40 हून अधिक पोर्न वेबसाइट्स वर प्रचार …
ई- मार्केट वर लक्ष्य केंद्रित करा सूर्यदत्ताच्या डिझाईनच्या विद्यार्थ्यांना मनी गरबे यांचा सल्ला
फेकू मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला-रमेश बागवे
पुणे- फेकू मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला . आणि जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढविले . गोरगरीब सामान्य जनता या सरकारच्या कारभाराला हैराण झाली आहे . त्यांच्या पक्षातले साधू आणि साध्वी वादग्रस्त विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे याशिवाय अन्य पक्षातील लोकांना खोट्या आरोपात अडकविण्याची मोहीम राबवून मुस्कटदाबी करू पाहण्याचा प्रयत्न मोडी सरकार करीत असल्याचा आरोप करीत यापुढे या सरकार विरोधात जोरदार आंदोलने करावी लागतील असा इशारा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी नाना पेठ मधील संत कबीर चौकात कॉंग्रेस पक्षाच्या पुणे कॅनटोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनातून दिला .कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला तर कॉंग्रेस कार्यकर्ते त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ,असेही यावेळी त्यांनी सांगितले
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपचे नेते डॉ. सुब्रमन्यम स्वामी यांनी नेशनल हेरल्ड प्रकरणात भ्रष्ट्राचार झाला अशी तक्रार केली . यांच्या तक्रारीवर न्यायालयाने त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले . केंद्रसरकार सी. बी. आय. , ई. डी. या खात्यांच्या मार्फत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांना कुठल्या न कुठल्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे . या विरोधात आज कॉंग्रेस पक्षाच्या पुणे कॅनटोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने जाहीर आंदोलन केले .
या आंदोलनामध्ये पुणे महापालिका विरोधी पक्ष नेते अरविंद शिंदे , नगरसेवक अविनाश बागवे , शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरुदिन सोमजी , माजी उपाध्यक्ष संगीता तिवारी , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख , माजी महापौर रजनी त्रिभुवन , कॉंग्रेस सरचिटणीस रमेश अय्यर , वाल्मिक जगताप , विठ्ठल थोरात , युवक अध्यक्ष साहिल केदारी ,सुरेखा खंडागळे , ब्लोक अध्यक्ष असिफ शेख , बेबी युसुफ सय्यद , भगवान धुमाळ , राजेश शिंदे , प्रदीप परदेशी , संजय कवडे , सुजित यादव , सुनील घाडगे , रोहित अवचिते , दयानंद अडागळे , अरुण गायकवाड , क्लेमंट लाजरस , प्रगती कांबळे , मीरा शिंदे व असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .भाजपच्या दबावाला कॉंग्रेस पक्ष बळी पडणार नाही . आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या संघ परिवार आणि त्यांचे इतर संघटनेच्या विरुद्ध लढा देतील . देशाच्या स्वांतत्र्यच्या लढाईमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या मित्र परिवाराने कधीही भाग घेतला नाही . याउलट कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि देशभक्तांनी स्वांतत्र्यच्या लढाईमध्ये भाग घेतला . व अनेकांनी आपले बलिदान दिले . भाजप सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा गैरवापर करत आहे . कॉंग्रेस पक्षाने देशाची एकता आणि अखंडतेसाठी झटले . स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आपले बलिदान दिले हे देश विसरू शकणार नाही . यापुढे जर मोदी सरकारने कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर खोटे आरोप केला तर कॉंग्रेस पक्षांचे कार्यकर्ते उग्र आंदोलन करून त्यास सडेतोड उत्तर देईल .
नगररस्ता बी.आर.टी. मार्ग २६ जानेवारी रोजी खुला होणार-कुणाल कुमार
पुणे-
पर्णकुटी चौक येरवडा ते खराडी जकात नाक्यापर्यंतचा सुमारे ९ किलोमीटर अंतराचा बी.आर.टी. जलद बस
वाहतुक (मार्गिका) मार्ग येत्या २६ जानेवारी २०१६ रोजी खुला करण्यात येईल असे महापालिका आयुक्त कुणाल
पुणे महापालिका मुख्य भवनातील महापालिका आयुक्त सभागृहात मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पर्णकुटी चौक येरवडा ते खराडी जकात नाक्यापर्यंतच्या बी.आर.टी. जलद बस वाहतूकी
संदर्भात आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीस अति.महा.आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया, पीएमपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती मयुरा qशदेकर, तहसीलदार श्री. कुंभार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी,
सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अधिक्षक अभियंता नामदेव बारापात्रे, पोलिस वाहतुक विभागाचे निरीक्षक
श्री. राजकुमार शेरे, अधिक्षक अभियंता विजय qशदे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बसमार्गातील अंतिम टप्प्यातील राहिलेल्या विविध कामकाजाचा याप्रसंगी आढावा घेण्यात आला. तसेच
उर्वरीत सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे तसेच बस टर्मिनलकरिता आवश्यक नियोजन करण्याचे आदेश
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाèयांना दिले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व विश्रामबाग क्षेत्रिय
कार्यालयाचे वतीने स्वच्छता अभियान
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या
वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
अभिनव कला विद्यालय ते शनिवारवाडा तसेच शनिवारवाडा ते जेधे चौक, स्वारगेट व शनिवारवाडा
सभोवतालच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतेविषयक कामे, झाडणकाम करण्यात आले व सुमारे
२२ टन कचरा काढण्यात आला.
अभियाना अंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ३९६ स्वयंसेवक व विश्रामबागवाडा क्षेत्रिय
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आवश्यक साधनसामुग्री व वाहने उपलब्ध करुन देण्यात आले होते.
या उपक्रमा संदर्भात केलेल्या सहकार्याबद्दल व स्वच्छता अभियानाबाबत विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे
वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लेखी पत्राद्वारे आभार व्यक्त करण्यात आले.
मुलीने अभिनेत्री व्हावे अशी नव्हती अनिल कपूरची इच्छ्या … शबाना आझमी (पहा ‘नीरजा ‘ चा ट्रेलर )
(पहा ट्रेलर लाँच समयीची छायाचित्रे )
आपली मुलगी सोनम हिने अभिनेत्री व्हावे अशी अभिनेता अनिल कपूरची मुळीच इछ्या नव्हती असा गौप्य स्फोट प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांनी केला आहे .
मुंबईत आगामी ‘नीरजा’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. . फ्लाइट अटेंडंट नीरजा भनोटच्या रिअल लाइफ स्टोरीवर हा सिनेमा आधारित असून ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्री सोनमकपूर दिग्दर्शक राम माधवानी, शबाना आझमी आणि भनोटचे नातेवाईक या कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी शबाना आझमी म्हणाल्या ,’सोनम लहान असताना तिचे वडील अनिल यांनी तिला माझ्याकडे पाठवले होते. सोनमने अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू नये, हे मी तिला समजावून सांगावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यावेळी सोनमला मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोनम जेव्हा माझ्याकडे आली आणि मला सांगितले, की तिला अभिनेत्री व्हायचे आहे, तेव्हा मात्र मी तिला न रोखता , मी तिला पाठिंबा दिला. आता या सिनेमात ही मी तिच्या आईचीच भूमिका करते आहे त्यामुळे खरोखर तिला ही या गोष्टीचा विशेष आंनद होता .
सोनमने यावेळी सांगितले, ” या सिनेमाने मला सकारात्मक जीवनाची दिशा दिली , या सिनेमाचा हा प्रवास खरोखर खूपच भावनिक असाच होता आणि त्यामुळे तो माझ्यासाठी खूप अवघड ठरला. सिनेमाने मला पॉझिटिव्ह बनवले.
दिलीप वळसे पाटील रूग्णालायातून घरी …
पुणे-परवा सांगितल्याप्रमाणे रुबी हॉल रुग्णालयातून आज दिलीप वळसे-पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आला .
गेल्या 13 डिसेंबर रोजी वळसे-पाटील यांना कात्रज दुध संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, वळसे-पाटील यांच्या प्रकृतीची राज्यभरातून विचारणा करण्यात आली होती. आस्थेवाईकपणे विचारपूस करणा-या सर्वांचे वळसे-पाटील कुटुंबियांनी आभार मानले आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत आराम केल्यानंतर कामांना पूर्ववत सुरूवात करण्याचा मनोदय वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
निगडीत सेंट उर्सुला शाळेत वीजबचतीची प्रतिज्ञा
पुणे : निगडी येथील सेंट उर्सुला शाळेत आज सकाळी विद्यार्थ्यांनी उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. रमेश जाधव, उपकार्यकारी अभियंता श्री. नवीन वैद्य, सहाय्यक अभियंता श्री. कल्याण जाधव, श्री. संतोष पाटणी आदींची उपस्थिती होती. सेंट उर्सुला शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थनेनंतर उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, अभियंता श्री. संतोष पाटणी यांनी वीजबचतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रभातफेरीद्वारे वीजबचतीसाठी ‘यशोदीप’च्या विद्यार्थ्यांचा जागर
पुणे : माळवाडी, पॉप्युलरनगर परिसरात आज सकाळी यशोदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे वीजबचतीसाठी नागरिकांचे प्रबोधन केले. प्रभात फेरीमधील वीजबचतीच्या घोषणा व फलके नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
या प्रभात फेरीत यशोदीप विद्यालयातील सुमारे 800 विद्यार्थ्यांसह महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, महात्मा फुले विद्यानिकेतनचे संस्थापक व सचिव श्री. रतन माळी, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. धर्मराज पेठकर, मुख्याध्यापक सौ. नीता गुंजीकर व सौ. मंगला जावळे तसेच महावितरणचे सुमारे 75 कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.
महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या सहकार्याने ही प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली.
प्रभात फेरीनंतर आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला व वीजबचतीचे महत्व पटवून दिले. संस्थेचे सचिव श्री. माळी यांच्यासह सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते यांनी प्रात्यक्षिकांसह वीजबचतीवर मार्गदर्शन केले. या विद्यालयातील नाजमा शेख हिने वीजबचतीवर वीजबचतीचे महत्व पटवून दिले. यावेळी नाजमा शेख हिचा मुख्य अभियंता श्री. मुंडे यांच्याहस्ते कौतुकपर गौरव करण्यात आला.
प्रभातफेरीमध्ये उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी, श्री. रमेश लोकरे, सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते, सहाय्यक अभियंता दयासिंग मोहिते, धनंजय देशपांडे, अतुल देशपांडे, संजिवनी नारखेडे, सुनील जगताप, सचिन वीर आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी व महावितरणचे अधिकारीस, कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्यकंटेश देशमुख यांनी केले तर श्री. ढालपे यांनी आभार मानले. आयोजनसाठी श्री. मनोहर कोलते, महावितरण, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेने पुढाकार घेतला
सामाजिक विषयावर भाष्य करणारा “मोहर” २५ डिसेंबरपासून सिनेमागृहात!!
सामाजिक विषयावर भाष्य करणारा “मोहर” हा सिनेमा २५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
व्ही.जी. एन्टरप्राईजेसच्या चंद्रकांत पंढरीनाथ पवार, संगीता गौतम सातदिवे आणि लीप एंटरटेनमेंटच्या गुरुनाथ मिठबावकर, आशिष राजे यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या “मोहर” सिनेमाचे दिग्दर्शन विजय पाटकर यांनी आहे.
सर्वप्रथम मी निर्मात्यांचे आभार मानतो की, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला कारण ह्या सिनेमाचा विषय तसा वेगळा आहे. मुळात कॉमेडी हा माझा जॉनर आहे. पहिल्यांदाच मी अशा विषयांचा सिनेमा हाताळला आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन माझा अगदी जवळचा मित्र संजीव नाईक करणार होता परंतु अपघातामुळे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी निर्मात्यांना त्याने माझे नाव सुचविले आणि सिनेमा सुरु होण्याआधी केवळ अठरा दिवस असताना मी हा सिनेमा स्वीकारला. त्यातील केवळ सहा-सात दिवस मला बाकीची तयारी करण्यासाठी मिळाले, असे असुनही कलाकार तसेच इतर तंत्रज्ञ मंडळीचे उत्तम सहकार्य लाभल्याने हा सिनेमाही तितकाच उत्तम झाला आहे आणि तो तुम्हालाही नकीच आवडेल.
“मोहर” सिनेमाची कथा निवृत्ती आणि तायनू यांच्याभोबाती गुंफण्यात आली आहे. या दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम, त्यांना दोन मुलं असा त्यांचा छोटेखानी संसार. निवृतीच आयुष्य ऋतू चक्रासारखच त्याच्या कुटुंबात अशाच आकस्मात आलेल्या वादळाने कोमेजत.समज गैरसमजातून निर्माण झालेल्या संघर्षात ते होरपळतात. तायनूच्या आयुष्याला पुन्हा “मोहर” येतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पहावा लागणार आहे.
“मोहर” सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, प्रसाद ओक, अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या मुख्य भूमिका असून सोबत विजय कदम, हेमलता बाणे यांचाही उत्तम अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे. बालकलाकार प्राजक्ता जगताप व चैतन्य घाडगे यांनी “मोहर” सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. मानसी नाईकने आपल्या दिलखेचक अदानी एक उत्तम लावणी सादर केली आहे. सिनेमाची कथा रेखा सुरेंद्र जगताप यांची असून पटकथा, संवाद दिपक भागवत यांनी लिहिले आहेत.राहुल जाधव, सुरेंद्र आणि अनंत मोरे यांनी लिहिलेल्या गीतांना मिलिंद मोरे यांचे उत्तम संगीत लाभले असून सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसन्नजीत कोसंबी, कविता, चॅंन्ग, साक्षी यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दिपाली विचारे यांनी या सिनेमासाठी कोरिओग्राफ़र म्हणून काम पाहिले असून कॅमेरामन म्हणून राजा फडतरे यांनी काम पाहिले आहे.
येत्या २५ डिसेंबरला “मोहर” हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘क्या कुल है हम -३’ मे तुषार कपूर कि खास भूमिका … देखिये ट्रेलर
खडू आणि फळा होईल इतिहासजमा …
पुणे- शिक्षण क्षेत्रातही मोठ्ठ्या प्रमाणात स्थित्यंतरे आता अपेक्षित असून काही काळानंतर खडू आणि फळा इतिहासजमा होईल असे भाकीत शिक्षण तज्ञ पी ए इनामदार यांनी येथे केले .
महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव आणि संत नामदेव प्रशालेत संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते . शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड , यांच्या पुढाकाराने येथे एम एस सी आय टी चा कोर्स पूर्णपणे शिकविला जाणार आहे . शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरुद्दीन सोमजी , तसेच अश्विनी राऊत,नारायण शिंदे मनीषा चोरबोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांची दडपशाही झुगारून ‘ बाजीराव मस्तानी ‘ रसिकांच्या डोक्यावर …
पुणे : येथील भाजपच्या आमदारांसह कार्यकर्त्यांकडून जरी विरोध होत असला तरीही त्यांची दडपशाही झुगारत आज पुण्यातून संजय लीला भन्साळी यांच्या ‘ बाजीराव मस्तानी ‘ ला रसिकांनी तुडूंब गर्दी करीत डोक्यावर घेतले आहे . दरम्यान ‘बाजीराव-मस्तानी‘ या चित्रपटाच्या विरोधात आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा मोर्चाने पुण्यात सकाळपासून निदर्शने केली. यामुळे कोथरुड येथील ‘सिटी प्राईड‘ चित्रपटगृहाने आज सकाळचे ‘बाजीराव-मस्तानी‘चे ‘शो‘ रद्द केले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी‘ दाखविल्यास होणाऱ्या नुकसानास तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा भाजपने चित्रपटगृहांना दिला होता. यासंदर्भात भाजपच्या मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आम्ही आधीच विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे पत्रही दिले होते. तरीही हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव-मस्तानी‘ बंद पाडला. यापुढेही आमची ही भूमिका कायम राहील.‘‘
भाजपच्या या कृती बद्दल रसिकांच्या भावना मात्र तीव्र होत्या. ‘बाजीराव-मस्तानी‘च्या ‘ट्रेलर‘मधील ‘पिंगा‘ या गाण्यात काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नृत्य करताना दाखविले आहे. या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला होता.मात्र यामुळे कशीबाई ची महतीच मांडली गेली आहे;जी खुद्द बाजीरावांच्या आई हून अधिक बाजीरावांची काळजी घेते असे सिनेमात दिसले आहे . साताऱ्याच्या छत्रपतींनी ‘बाजीराव ‘ ची पेशवा पदी नियुक्ती केल्यापासून ते बाजीराव -मस्तानी यांचा अंत होईपर्यंतची कहाणी या सिनेमातून दाखविण्यात आली आहे . जसे ‘शिर्डी के साईबाबा ‘ या चित्रपटात शिर्डी तील काही लोकांनी साईबाबांचा छळ केल्याचे दाखविले आहे . त्याहून कमी प्रकारे मस्तानी चा छळ पुण्यातील तथाकथितांकडून झाल्याचे दाखविण्यात आले . या चित्रपटातून बाजीराव , काशी बाई यांची महती समजते आणि मस्तानीचे प्रेम ही अधोरेखित होते, असे सांगत रसिक भन्साळी यांनी चांगलाच सिनेमा दिल्याचे सांगत आहेत
सरकार तुमचे … चित्रपटावर बंदी आलेली नाही ; तुम्ही आणलेली ही नाही .. मग आम्हाला का पाहू देत नाहीत सिनेमा .. बंदी आल्यावर आम्ही नाही पाहणार आणि थिएटर वाले ही लावणार नाहीत . आम्ही आगावू बुकिंग केलेत . आम्हाला सिनेमा पाहण्यापासून अशापद्धतीने वंचित ठेवणे,सिनेमासाठी ठेवलेला आमचा वेळ आणि मारलेल्या चकरा केलेला प्रवास वाया घालविणे हे अती होते आहे असे रसिकांचे म्हणणे होते .
पहा नेमके काय पत्र दिले होते भाजपच्या आमदार यांनी – मुख्यमंत्री यांना … फोटो सह … तरीही हा सिनेमा प्रदर्शित झाला , यात तिकिटे काढून सिनेमाला आलेल्या रसिकांची काय चूक ?
एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतरही याच भाजप आमदारांनी शनिवारवाड्यावर भन्साळी यांचा पुतळा जाळला होता त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा ही दाखल केला होता .
सर्वांनी आवर्जून पाहावा असा .. द ग्रेट…’ बाजीराव मस्तानी ‘
क्रिटिक रेटिंग- 4.5/5
कलाकार -रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा…
दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी
निर्माता -संजय लीला भन्साळी
संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी
जॉनर- ऐतिहासिक प्रेमकथा
धानोरे येथील कारखान्यात दोन लाखांची वीजचोरी उघड
पुणे: धानोरे (ता. खेड) येथील लक्ष्मी ब्राईट स्टील या कारखान्यात 14,713 युनिटची म्हणजे 2 लाख 7 हजार 280 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत धानोरे (ता. खेड) येथील मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील या कारखान्याला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आलेली आहे. या कारखान्याची ही जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. या कारखान्यातील वीजवापरातील अनियमिततेवरून संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. यात कारखान्यातील सीटी ऑपरेटेड वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले व 14,713 युनिटची म्हणजे 2 लाख 7 हजार 280 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, सुरेश वानखेडे, उपकार्यकारी अभियंता श्री. रामचंद्ग चव्हाण, सहाय्यक अभियंता जया केवलिया, कनिष्ठ अभियंता श्रीकांत हुमनाबादकर, तंत्रज्ञ विशाल सावैतुल, अशोक तांदळे आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स लक्ष्मी ब्राईट स्टील कारखान्याच्या मालक अनुपमा संजय दरक विरुद्ध मंगळवारी (दि. 15) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
‘सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे’! ससाणेनगरातील ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा
पुणे : ‘पापा हो या मम्मा हो, या मम्मा की अम्मा हो, सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे’, या गाण्यावर ताल धरीत ससाणेनगरमधील ज्ञानप्रबोधिनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वीजबचतीची गुरुवारी (दि. 17) प्रतिज्ञा केली. सोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना वीजबचतीची आवश्यकता व फायदे याबाबत माहितीही दिली.
निमित्त होते महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. ज्ञानप्रबोधिनीच्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेसात वाजता प्रार्थनेनंतर उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक व सचिव श्री. रतन माळी, कार्यकारी अभियंता श्री. दिनेश अग्रवाल, मुख्याध्यापक मेघना पतके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वीजबचतीचे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्यांसह सेवानिवृत्त अभियंता श्री. मनोहर कोलते यांनी प्रात्यक्षिकांसह वीजबचतीवर मार्गदर्शन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिवानी कट्टीमनी, शितल किर्तने या विद्यार्थींनींनी अतिशय मुद्देसुद व सुंदर मनोगतातून वीजबचतीचा संदेश दिला. या दोघींसह शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना श्री. मनोहर कोलते यांनी कौतुक स्वरुपात एलईडी बल्ब भेट दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हाती असलेले वीजबचतीचे संदेश फलक लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. अजिनाथ चव्हाण, श्री. अरविंद कन्हेरे, नारायण दर्शिले, महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत, सहाय्यक अभियंता श्री. प्रमोद सुरवसे आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी ओव्हाळ, रेशमा सातपुते यांनी केले. वीजबचतीचा संदेश देणार्या व लोकप्रिय झालेल्या ‘सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.































