Home Blog Page 3520

पोलीस बिनतारी संदेश विभागात ७२८ जागांवर भरती…

0

पुणे-अभियांत्रिकी पदवीधारक , आय टी आय उतीर्ण, उमेदवारांसाठी राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागात नौकरीच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे पुणे पोलिसांनी कळविले आहे . एकुण ७२८ जागांवर हि भरती होणार आहे .

सहायक पोलीस उपनिरीक्षक -रेडीओ यांत्रिकी  १९१ पदे, पोलीस हवालदार , बिनतारी यंत्र चालक ४३२ पदे, पोलीस शिपाई कर्मशाळा मदतनीस ५३ पदे … यावर भारती होणार असून ६ जानेवारी २०१६ हि अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे . www.maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईट वरून   अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज दाखल करावेत असे पोलिसांनी कळविले आहे

सोबत  पोलिसांचे पत्रक जोडले हे ते पहावे .

index

युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार : डॉ.रघूनाथ माशेलकर

0
पुणे :
‘भारत हा युवकांचा देश आहे. युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार आहे. फक्त आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांत सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे’, असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. कै.डॉ. वि. वि. (अप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने आयोजित‘भारत 2050 विश्‍वसत्ता’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनचे संचालक प्रा. विवेक सावंत, गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत परांजपे, संयोजन समितीचे ज्येष्ठ उद्योजक रामकुमार राठी, रवि पंडित, मराठा चेबरचे अनंत सरदेशमुख, माजी खासदार प्रदीप रावत, डॉ. अशोक कुकडे, राम कोल्हटकर, डॉ.सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, ग्राहक पंचायतिचे सुर्यकांत पाठक, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रा.राम डिंबळे, राजीव बसर्गेकर आणि मोहनराव गुजराथी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहनराव गुजराथी यांनी केले, डॉ.गिरीष बापट यांनी आभार मानले.
डॉ. माशेलकर म्हणाले, भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे. अजूनही भारत प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. काळानुसार बदलणे ही आजची गरज आहे. आपण महासत्तेकडे वाटचाल करतानास सर्व क्षेत्रांत उच्च तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक आहे. आधुनिकीकरणात कोणीही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. प्रगती जशी होईल तसे नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल केले पाहिजेत.’
डॉ. देशमुख बदलती शिक्षण पद्धतीविषयी बोलताना म्हणाले, ‘आपल्या देशात विश्‍वविद्यालयांचे जाळे असूनही म्हणावी तशी आपली प्रगती नाही. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया  आहे. त्यामुळे महासत्तेकडे वाटचाल करताना शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 2050 साली शिक्षण हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित राहणार असून, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. 2050 साली भारतात ऑनलाईनच शिक्षण पद्धती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.’
प्रा. सावंत म्हणाले, ‘महासत्ता होताना धर्म आणि राज्याची गल्लत होता कामा नये. सर्व समान बुद्धीमत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुस्थानची मूल्ये युवकांना दिल्यास महासत्तेकडे जाण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. संस्कृतीचे सभ्यतेमध्ये प्रतिबिंब पाडावे लागेल, त्यासाठी सुशासनाची गरज आहे.
डॉ.राजस परचुरे म्हणाले, आपल्याकडे लष्कर आणि आर्थिक सत्ता आल्यास आपण महासत्ता होण्यास कोण रोखू शकत नाही. मात्र, त्यांचा उपयोग चांगल्या कामांसाठी होणे अपेक्षित आहे. आज अर्थसत्ता  होताना देशातील जनता कमी प्रमाणात समाधानी आहे.’
‘भारत सध्या संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. मात्र भारताने पंडित नेहरू यांच्याप्रमाणे स्वतंत्र विचार दिला, तर भारत 2050 साली विश्‍वसत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. लष्करी सत्ता जोपर्यंत आपल्याकडे नाही, तोपर्यंत आपण विश्‍वसत्ता होऊ शकणार नाही ’असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले.

कर्वेनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

0

PMC-building

पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे वतीने कर्वेनगर

परिसरातील पाणंद रस्ता, कर्वेनगर स्मशानभूमी रस्ता येथील सुमारे ४६ मिळकतदारांनी अनधिकृत विनापरवाना

केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात येऊन २५३२५ चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

तसेच कारवाई अंतर्गत १ हातगाडी, ८ अन्य शेड्स, २० बोर्डस, ७ फ्लेक्स, ६२ बॅनर्स यावरही कारवाई करण्यात आली

सदरच्या मिळकतदारांनी मिळकतीच्या पुढील व मागील व लगतच्या मोकळ्या जागेत शेड, पार्टीशन, रेqलग,

ओqनग शेड या स्वरुपात अनधिकृत बांधकाम केलेले होते.

कारवाईत सहाय्यक अभियंता श्री. वायसे, श्री. देसले, अतिक्रमण निरीक्षक श्री. qशदे, श्री. मुरगुंड, श्री.

qपगळे तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची पुण्यात स्थापना इंद्रेश कुमार, शहानवाज हुसेन यांची उपस्थिती

0
पुणे :
रामप्रसाद बिस्मिल यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात जीवाची कुर्बाची देणार्‍या शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या नावे ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ने आज पुण्यात ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली. ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’चे संस्थापक इंद्रेश कुमार, माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांच्या उपस्थितीत ही स्थापना झाली.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक कार्यासाठी हा ट्रस्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. आज महात्मा फुले सभागृह (फातिमानगर) येथे डॉ. एस. एन पठाण, डॉ. शं. ना. नवलगुंदकर, राष्ट्रीय सहसंयोजक लतिफ मगदूम हे व्यासपीठावर उपस्थित होते. अश्फाकउल्ला खान यांचे त्याच नावाचे नातू अश्फाकउल्ला खान यांचा तसेच दादर-नगर-हवेली मुक्ती स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याआधी अश्फाकउल्ला खान यांच्या स्मरणार्थ अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले, ‘मुस्लिम समाजात काम करताना शैक्षणिक काम या ट्रस्टमधून सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीबांना ‘धान्य बँक’, तलाक मुक्ती, दहशत दंग्यांपासून मुक्ती असे कार्य करीत ‘इन्सान से फरिश्ता’ हा प्रवास सर्वांनी करायचा आहे.’
शहानवाज हुसेन म्हणाले, ‘इंद्रेश कुमार यांच्या मागदर्शनाखाली समाजात सेवेचे काम चालू आहे. शैक्षणिक कामाला चळवळीचे स्वरूप आता येईल. धर्म-जातीवरून भेदभाव भारतात नाही.’
डॉ. एस. एन. पठाण यांनीही असहिष्णुतेचा अनुभव आपल्याला आला नसल्याचे सांगितले. यावेळी क्रांती कारकांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.डॉ. मुकुंद हिरवे, मोहमद सलीम अशरफी, डॉ. ताहीर हुसेन, अब्बास अली बोहरा, डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

ब्राम्हण महासंघाचे कार्य योग्य दिशेने – मोहन जी भागवत

0

पुणे-

अखिल भारतीय ब्राम्हण  महासंघाचे शिष्टमंडळ दि. १६/१२/१५ रोजी नागपूर येथील संघ

मुख्यालय, महाल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी  भागवत यांना भेटले व त्यांना

अ.भा.ब्रा.म. च्या कार्याची तपशीलवार माहिती देण्यात आली. अशी माहिती प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी येथे दिली

ते म्हणाले , महासंघाच्या कार्याचा आढावा घेतल्या नंतर मोहनजींनी ब्राह्मण महासंघाचे कार्य योग्य दिशेने

चालले आहे व ह्याच दिशेने काम चालत राहावे अशी आशा व्यक्त केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री

गोविंद कुलकर्णी व सरसंघचालक यांच्या मधे राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली.

ब्राह्मण महासंघाने ब्राह्मणांच्या हिताबरोबरच राष्ट्रातील प्रत्त्येक घटकाच्या हिताचे कार्य करावे,

देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन समोर जाण्याचे कार्य करावे असे आवाहन यावेळी मोहनजींनी केले.

सरसंघचालकांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेले वक्तव्य योग्यच होते, त्या वक्तव्याचा राजकीय

लाभाकरिता दुरुपयोग करण्यात आला असे मत ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भागवतांकडे व्यक्त केले .

या वेळी शाल व श्रीफळ देऊन महासंघाच्या वतीने सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला. या

शिष्टमंडळामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशवजी भास्करे महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत

धडफळे, उपाध्यक्ष श्री मिथिलेश पाध्ये, चिटणीस भूषण पांढरे, जिल्हा सरचिटणीस श्री आनंद घारे,

कोषाध्यक्ष श्री भूषण बाभरेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. संपदा गोडबोले उपस्थित होते.

‘दिलवाले’ने कमविले ४१ कोटी तर ‘बाजीराव’ २८ कोटीवर …२ दिवसांची कमाई

0

मुंबई – बाजीराव मस्तानी पेक्षा कमी प्रसिद्धी आणि कमी मार्केटिंग करूनही दिलवाले या चित्रपटाने ‘बाजीराव ‘ ला मागे टाकले आहे गेल्या दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी दिलवालेने बॉक्स ऑफिस वर ४१ कोटी ९लाख रुपये मिळविले तर बाजीराव ने २८ कोटी ३२ लाख रुपये मिळविले . बाजीराव ला झालेला विरोध हा बाजीरावची पीछेहाट होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते . संजय लीला भन्साळी यांना हा मोठा धक्का असणार आहे . शाहरुख आणि काजोल हि जोडी आताच्या तरुणाईला मानवेल काय ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते , रणवीर सिंह आणि दीपिका- प्रियांका या बॉलीवूड मधील  तरुणाईला देखील काजोल आणि शाहरुख ची आज हि एवढी लोकप्रियता असल्याचे दिसून आले आहे .

महेश मोतेवारच्या ‘समृद्ध जीवन’ची सर्व खाती सील करण्याचे आदेश आणि टी.व्ही चॅनल्सवर प्रशासक नेमणार …

0

मुंबई-पुण्यातील धनकवडीतून गुरुकृपा मार्केटिंग , त्यांनतर  देशभर समृध्द जीवन आणि टी.व्ही चॅनल्स … असा अब्जावधीचा प्रवास अवघ्या १५ वर्षात करणाऱ्या महेश मोतेवार  याच्या पासपोर्ट जप्तीनंतर आता सहकार मंत्रालयाने ‘समृध्द जीवन ‘ची सर्व खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत . या शिवाय मोतेवार यांच्या  टी.व्ही चॅनल्सवर प्रशासक नेमण्याचे आदेश सरकारने दिले आहेत .महेश मोतेवारच्या पापाचा घडा आता फुटत आहे असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे .

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी असेही म्हटले आहे कि , केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांना मोतेवारच्या चौकशीचे आदेश दिले होते . या दोन्ही राज्यांनी यासंदर्भात आपला अहवाल सादर केला असून मोतेवारने लोकांकडून घेतलेले पैसे  सोसायटी बनवून  ५६३ कोटी रुपये चॅनल्स आणि अन्य कंपन्यात वळवून लंपास केले .त्याचे १२ ब्यांकांमधीलखाती गोठविण्याचे आदेश देण्यात आले असून यापूर्वी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याच्यावर २ गुन्हे दाखल हि झाले आहेत .थोडक्यात सांगायचे झाले तर मोतेवारच्या पापाचा घडा आता फुटत आहे असे सोमय्या यांनी म्हटले आहे . मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं  ‘साई प्रसाद’या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले याचवेळी‘साई प्रसादच्या  बाळासाहेब भापकर याला   अटक करण्यात आली तेव्हा  आर्थीक  गुन्हे शाखेचे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी असे म्हटले होते  कि पुण्यात ‘समृद्ध्जीवन ‘ या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.मोतेवार याचा पासपोर्ट जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरु झाली आहे.  बोगस चिट फंड कपंन्यांविरोधात सेबी ने सुरु केलेल्या मोहिमेला यामुळे यश मिळतंय.महेश मोतेवार यांनी लोकांच्या पैशाच्या जोरावर टीव्ही चॅनल्स सुरु केले. याबद्दल देखील केंद्र सरकारनं सीबीआय  ला कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचं किरीट सोमय्यांनी यावेळी  म्हटले होते

कात्रज -कोंढवा परिसरातील भूखंडांची लूटमार …तिघांना अटक ; राजकीय म्होरके -अधिकारी मस्त ?

0

demo-pic-560b58b0acf01_l

पुणे-शहराच्या आसपास आणि उपनगरांमध्ये आणि त्या नजीक दिसेल ती मोकळी जागा बळकावणे आणि ताबा मारणे अशा असंख्य घटना घडत असून यामागे राजकारणी नेते आणि अधिकाऱ्यांची मोठ्ठी साखळी कार्यरत असून अशा भूखंडांचे लोणी खाण्यासाठी नेते -अधिकारी यांच्या संगनमताने प्रत्येक ठिकाणी तरुणांना खेचून गुंडांच्या टोळ्या उभ्या करीत असल्याचे चित्र आहे   . दरम्यान   कात्रज -कोंढवा परिसरातील भूखंड जबरदस्तीने बळकावून आठ लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना  कोंढवा पोलिसांनी अटक केली .तर अन्य दोघे फरार आहेत .  मात्र यांच्या मागे कोणी नेते -अधिकारी यांची साखळी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .

संदीप बाळासाहेब नरोडे (वय ३४ -रा.स्मृती हाइट कात्रज ), मिलिंद मारुती जगताप (वय ४७ रा. पर्वती दर्शन )झिया अहमद बागवान (वय२५, गोकुळनगर, कात्रज ) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून बापू नायर आणि अभिजित नायर आणि अन्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही . सर्वे नंबर ४६ , हिस्सा नंबर ४३/४४  कोंढवा बुद्रुक येथे असलेली बोपोद्तील एका २७ वर्षीय तरुणाची जागा या आरोपींनी बळकावली . तिथे बेकायदेशीर ताबा ठोकून पत्र्याचे शेड मारून जागा मालकालाच येथे येण्यास मज्जाव केला . आणि जागा परत हवी असेल तर जीवे मारण्याची धमकी देवून  ८ लाखाची खंडणी मागितली . १० नोव्हेंबर पासून हा पराक्र सुरु होता . या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन एन अतकरे हे करीत आहेत

भाजपच्या सुडाच्या राजनीती विरोधात पुण्यात कॉंग्रेसची शहरभर निदर्शने

0

index index1 index2 index3 index4

पुणे – सुडबुद्धीनेच  कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेरल्ड प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप करत, पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत भाजप सरकारच्या सूडनीतीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

नॅशनल हेरल्डप्रकरणी सोनिया आणि राहुल शनिवारी न्यायालयात हजर झाले होते. त्याचे पडसाद शहरातही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, पक्षाचे निरीक्षक प्रकाश सातपुते, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, उपमहापौर आबा बागूल, रोहित टिळक, नीता रजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्वती मतदारसंघातर्फे पुणे-सातारा रस्त्यावर दुपारी केलेल्या आंदोलनात सचिन आडेकर, प्रकाश आरणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघातर्फे ज्ञानेश्‍वर पादुका चौकात झालेल्या आंदोलनात माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, नगरसेवक दत्ता बहिरट, मुकारी अलगुडे सहभागी झाले होते. कसबा मतदारसंघात स्वाती कथलकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने केंद्र सरकारचा निषेध केला. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातर्फे संत कबीर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यात माजी आमदार रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, नुरुद्दीन सोमजी, रशीद शेख, लता राजगुरू सहभागी झाल्या होत्या. वडगाव शेरीत पर्णकुटी चौकात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. संगीता देवकर, नगरसेविका सुनीता गलांडे, शीतल सावंत, सुनील मलके, हुलगेश चलवादी सहभागी झाले होते.

हडपसर मतदारसंघातर्फे गाडीतळ परिसरात झालेल्या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रशांत तुपे, नगरसेवक सतीश लोंढे, विजया वाडकर, कविता शिवरकर, चंद्रकांत मगर सहभागी झाले होते. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. त्यात हरिदास चरवड, आबा जगताप, किशोर कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. कोथरूड, कसबा, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांतही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

देशातील सर्वोच्च पद भूषविण्याची शरद पवारांकडे क्षमता — कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया

0

बेंगळुरू-

ज्ञानज्योति ऑडिटोरिअममध्ये आदरणीय शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा नयनरम्य सोहळा बेंगळुरू शहरात दि. १८ डिसेंबरच्या सायंकाळी दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया, माजी पंतप्रधान एच. डी. देवे गौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. के. जाफर शरीफ उपस्थित होते.
श्री. पवार यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभानंतर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया म्हणाले, “मी कृषी विषयाशी निगडित कोणताही अडचण आली की नेहमीच पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी धाव घेत असे. त्यांनी कधीच अपेक्षाभंग केला नाही. त्यांनी केंद्रातून नेहमीच मदतीची भूमिका घेतली.”
माननीय पवारसाहेबांकडे देशाचे पंतप्रधानपद किंवा सर्वोच्च असे पद  भूषवण्याची क्षमता आहे असे गौरवोद्गारही या प्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दराम्मया यांनी काढले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचे सूत्र घेऊन माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, “येत्या २०१६-१७ मध्ये देश राजकीय ध्रुवीकरणाचा साक्षीदार राहील आणि हे ध्रुवीकरण कुणीच हे थांबवू शकणार नाही. माजी पंतप्रधान या नात्याने मी निरीक्षण नोंदवत आहे आणि म्हणूनच श्री. पवार हे पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत असं मी म्हणू शकतो.”
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांनीही आदरणीय पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नेहमीच आघाडीवर असल्याचं नमूद केलं, मात्र केवळ काही घटनांमुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वोच्च नेत्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली असे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते सी. के. जाफर शरीफ यांनीही त्यावेळी १९९१ साली ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांनाच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून शिक्कामोर्तब केले होते, असे आवर्जून सांगितले. मात्र काही अचानक उद्भवलेल्या घटनाक्रमामुळे पी. व्ही. नरसिंह राव यांची निवड झाल्याचे नमूद केले.
माननीय शरद पवार यांनी या सत्काराला उत्तर देताना विनम्रपूर्वक सांगितले की देशातील जनता राजकीय नेत्यांपेक्षाही चतुर आहे आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. आपल्या कृषि मंत्रालयातील कारकीर्दीचा आढावा घेताना त्यांनी कर्नाटकातील जनतेला आवर्जून सांगितले की आपण एकेकाळी अन्नाची आयात करणारा देश होतो. आज फळं, भाज्या आणि गव्हाची निर्यात करणारा मोठा देश म्हणून जगात आपले स्थान आहे.
मात्र सद्यस्थितीतील संसदीय कामकाजाविषयीही त्यांनी विशेष टिप्पणी केली. एक दिवस सोडला तर यावेळी अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. याची खंत व्यक्त करून पवार साहेब म्हणाले की दरदिवशी हंगामा असायचा. आपण कोणता संदेश देशाच्या जनतेला देत आहोत. लोकांना संसद सदस्यानी योग्यरीतीने काम करण्याची अपेक्षा आहे. संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी सर्व सुज्ञांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री पी.जी.आर. सिंधिया यांनी या सोहळ्याचे आयोजन केले

ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै.डॉ.वि.वि.(आप्पासाहेब) पेंडसे जन्मशताब्दी वर्ष ‘अभिवादन यात्रे’चे सर्व धर्मियांकडून ,संस्था ,मंडळांकडून स्वागत

0
index1
पुणे :
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै.डॉ.वि.वि.(आप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने रविवार, दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेमध्ये ‘डॉ.आप्पा पेंडसे-अभिवादन यात्रा’चे आयोजन करण्यात आले  होते
 पुणे शहरासाठी ,शैक्षणिक -सामाजिक -औद्योगिक -एकात्मता -संशोधन  क्षेत्रात कै.आप्पा पेंडसे यांनी केलेल्या भरीव योगदानाची पुन्हा आठवण करावी व नव्या पिढीला त्यांची ओळख करून द्यावी या प्रमुख हेतूने समितीच्यावतीने या अभिवादन यात्रेचे आयोजन केले होते
ज्ञान प्रबोधिनी परिसराभोवतीची ही एक प्रतीकात्मक प्रदक्षिणा वाटेल अशी ही अभिवादन यात्रा काढण्यात आली होती  अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने राजीव बसर्गेकर आणि मोहनराव गुजराथी यांनी पत्रकाद्वारे दिली.
 . प्रबोधिनीचे आजी-माजी विद्यार्थी, कार्यकर्ते, हितचिंतक, पुणेकर नागरिक मोठ्या  संख्येने या अभिवादन यात्रेमध्ये सहभागी झाले . अप्पा पेंडसे यांच्या छाया चित्राचे फलक हाती धरण्यात आले होते .
एक किलोमीटर लांब असलेल्या या यात्रेत भारतीय गणवेश परिधान करून विविध पथकांसह ५ हजार नागरिक ,माजी विद्यार्थी ,कार्यकर्ते सहभागी झाले
ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ गिरीश बापट ,यशवंतराव लेले ,कार्यवाह सुभाष देशपांडे ,विनय हर्डीकर ,डॉ सचिन गांधी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले .
डॉ धनंजय केळकर , ग्राहक  पेठे चे    सुर्यकांत पाठक ,अशोक येनपुरे ,प्रमोद कोंढरे ,आनंद सराफ ,विजय रणधीर ,अशोक गोडसे ,महेश सूर्यवंशी ,राष्ट्रीय मुस्लिम मंच चे लतीफ मगदूम ,राजेश येनपुरे ,एड  शिरीष  मोहिते अनेक संस्था -मंडळांनी  स्वागत केले .
 
अभिवादन यात्रेचा मार्ग न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड-ग्राहक पेठ -अभिनव कला चौक-शनिपार चौक-मंडई-बेलबाग चौक-बुधवार चौक-अप्पा बळवंत चौक- वैभव चौक (बाजीराव रस्ता-लक्ष्मी रस्ता क्रॉस)-उंबर्‍या गणपती चौक-रमणबाग चौक-केसरी वाडा-केळकर रस्ता-जोंधळे चौक-ज्ञान प्रबोधिनी- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड असा होता 
 
सर्व धर्मीय मान्यवरांनी यात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत केले . 
या अभिवादन उपक्रमांच्या आयोजनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रामकुमार राठी, रवि पंडित, मराठा चेबरचे अनंत सरदेशमुख, माजी खासदार प्रदीप रावत, डॉ. अशोक कुकडे, राम कोल्हटकर, डॉ.सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, ग्राहक पंचायतिचे सुर्यकांत पाठक, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रा.राम डिंबळे, विनय हर्डिकर, मोहन गुजराथी व ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांचा समावेश होता

एवढे प्रेमच होते तर … तुम्ही का नाही काढला बाजीराव पेशव्यांवर चित्रपट … भन्साळी समर्थकांचा सवाल …

0

पुणे- गेली १३ वर्षे संजय लीला भन्साळी यांनी ‘ बाजीराव मस्तानी ‘ या चित्रपटावर काम केले . अनेक अडचणी आणि असंख्यवेळा अडचणींचा मोठ्ठ्या हिकमतीने सामना करीत संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटाची निर्मिती केली . आता बाजीराव पेशवे हिंदुस्थान ची अस्मिता आहेत , ते थोर आहेत, महान योद्धे होते  म्हणूनच त्यांच्यावर हा चित्रपट त्यांनी काढला … इतके वर्षे मेहनत घेतली , इतका पैसा खर्च केला … आता चित्रपट आल्यावर –किंवा प्रदर्शित होण्यापूर्वी पुण्यातील किंवा जे कोणी त्यांचे समर्थक आहेत आणि जे आता या चित्रपटाविरुध्द बोलत आहेत लिहित आहेत आंदोलने करीत आहेत , त्यांना जर खचितच बाजीराव पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते तर त्यांनी यापूर्वीच का नाही बाजीराव पेशवे यांच्यावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून चित्रपट काढला … ? असा सणसणीत सवाल आज संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात आज दुपारी संपर्क साधला असता त्यांच्या समर्थकांकडून  करण्यात आला . पुण्याचे होते ना बाजीराव … बस एक पुतळा बसविला …या शिवाय त्यांची महती जगाला समजावी म्हणून  त्यांच्या पराक्रमाची … प्रेमकथेची …कशी आणि कुठे दखल घेतली ? असाही सवाल यावेळी करण्यात आला . जो काम करतो त्याच्याच चुका दाखविल्या जातात … जो करीतच नाही त्याच्या चुका कशा आणि कुठून लक्षात येणार यासाठी हा सवाल करण्यात आला आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले .

सलमान खान च्या जीवनावर पुस्तक … .

0

वरिष्ठ पत्रकार जासिम खान यांनी सलमान खान याच्या जीवनावर पुस्तक लिहिले असून या पुस्तकातून सलमान याच्या जीवनावर मोठा प्रकाश झोत पडेल असे अनेकांना वाटते आहे . सलमानच्या ५० व्या वाढदिवशी म्हणजे येत्या २७ डिसेंबरला हे पुस्तक प्रकाशित होईल असे वृत्त आहे . सलमान ने का नाही केले लग्न ? सलमान का नेहमी सापडतो वादाच्या भोवऱ्यात… का वागतो असा , सलमान चे कोण कोण पूर्वज आहेत .. त्याबाबतची त्याच्या जीवनात  काही महत्वपूर्ण अशी पार्श्वभूमी आहे काय ? अशा अनेक प्रश्नांवर हे पुस्तक उजेड टाकील काय ? सलमानच्या जीवनातील लोकांना ठावूक नसलेले नव नवीन पैलू या पुस्तकातून समोर येतील काय ? असे अनेक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण होत आहेत .

‘घायल वन्स अगेन ‘ चा ट्रेलर पहा …

0

धर्मेंद्र निर्माता असलेल्या , आणि सनी देओल ची कथा -दिग्दर्शन असलेल्या ‘ ‘घायल वन्स अगेन ‘ ची हि बॉलीवुड मध्ये चर्चा आहे . सनी यात हिरो आहेच . असे म्हणतात कि या चित्रपटाची कथा ही मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या जीवनातील एक सत्य कहाणी आहे . ‘ अगर हम सच के साथ है, तो हमे जितने तक हार नही माननी चाहीये… असे सांगणाऱ्या या चित्रपटात सनी बरोबर आणखी ४ साथीदार आहेत . देशातील सर्वात ताकदवान व्यक्ती आणि चार निष्पाप तरुण आणि यात मध्ये असणारा एक जण… अशी काहीसी या चित्रपटाची कथा आहे . ओम पुरी, सोहा अली खान, शिवम पाटिल यांच्या यात भूमिका आहेत … पाहू यात या चित्रपटाचा ट्रेलर ….

साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना शासन मदत करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर – साहित्य, संस्कृती आणि कला हे क्षेत्र माणसाला वैचारिकदृष्ट्या समृध्द करीत असतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पद्मगंधा प्रतिष्ठान, साहित्य विहार, नागपूर यांच्या संयुक्त वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग, खासदार अजय संचेती, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, पद्मगंधा प्रतिष्ष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे, स्वागताध्यक्ष प्रा. भाऊराव बिरेवार, पंकज चांदे, डॉ. प्रज्ञा आपटे, माजी कुलगुरु एस.टी.देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, इंटरनेटच्या वापरामुळे वाचनाचा प्रवास ज्ञानाकडे जाण्याऐवजी माहितीकडे जात आहे. ज्ञानाधारित समाज रचना जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत मूल्यांची जोपासना होणार नाही. यासाठी साहित्याची महती जपली पाहिजे. देशासमोर विविध विचार आणि अनेक आव्हाने आहेत. म्हणून साहित्य क्षेत्राची आवश्यकता पूर्वीपेक्षाही अधिक आहे. पद्मगंधा प्रतिष्ठानचे साहित्य क्षेत्रातील कार्य चांगले आहे. अशा संस्थांच्या पाठिशी उभे राहण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.