Home Blog Page 340

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौकांमधून अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आपल्या युद्धनौकांमधून अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली. नौदलाने सांगितले की ते रात्रंदिवस देशाचे रक्षण करण्यास सज्ज आहेत. समुद्रात कुठेही धोका असला तरी आपण त्याचा सामना सहजपणे करू शकतो.


पाकिस्तान सरकारने पीओकेमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला
नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये गोळीबार सुरू आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील सर्व डॉक्टर आणि परिचारिकांना तयार राहण्यास सांगितले आहे. विशेषतः सीमेजवळ असलेल्या झेलम आणि लिपा खोऱ्यांमध्ये. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की सर्व रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी २४ तास सज्ज असले पाहिजेत.

दरम्यान शनिवारी आणि रविवारी रात्री पाकिस्तानने सलग तिसऱ्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. हा गोळीबार तूतमारी गली आणि रामपूर सेक्टरमध्ये करण्यात आला. भारतीय सैन्यानेही हलक्या शस्त्रांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. तथापि, या काळात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. शनिवारी रात्री, लष्कराने बांदीपोरा येथील टीआरएफचा सक्रिय दहशतवादी अदनान शफी डार आणि त्रालमधील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चा सक्रिय दहशतवादी अमीर नजीर वाणी यांची घरे पाडली. अशाप्रकारे, गेल्या ३ दिवसांत १० दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

शनिवारी केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कडे सोपवला. दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि हल्ल्याचा निषेध केला. अध्यक्ष मसूद म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध इराण भारतासोबत आहे.

एक दिवस आधी, इराणने भारत-पाकिस्तान तणावात मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्येक निष्पक्ष चौकशीत सहभागी होतील असे सांगितले. ते म्हणाले- पाकिस्तानची बदनामी होत आहे. पाकिस्तानवर प्रत्येक वेळी आरोप केले जातात आणि हे सहन करण्यासारखे नाही.

२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. या घटनेत ५ दहशतवादी सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. ३ दहशतवाद्यांचे रेखाचित्रही जारी करण्यात आले आहेत.

पुणे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्ह्यात कलश पूजन रथयात्रेचे भव्य स्वागत होणार

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे “ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापूर येथून झाला असून २९ तारखेला सायंकाळी पुणे शहरात येणाऱ्या या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते, शहर व विधानसभा तसेच महिला,युवक,युवती, विद्यार्थी सेलसह सर्वच सेलच्या पदाधिकारी यांची नियोजन बैठक पक्ष कार्यालय गुप्ते मंगल कार्यालय येथे पार पडली.
सासवडवरून येणाऱ्या रथाचा हडपसर येथे साने गुरुजी भवन येथून शुभारंभ करण्यात येणार असून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री माई फुले यांच्या वाड्यात त्यांना अभिवादन करून नंतर राजमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन लालमहाल येथे आगमन होईल तसेच शनिवारवाडा येथून ही केसरीवाड्या पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा प्रदेशांतील माती विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे.

सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर सौ. राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, सौ. रुपाली पाटील-ठोंबरे, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रमोद निम्हण, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे,विधानसभा अध्यक्ष हडपसर शंतनू जगदाळे, कसबा अजय दराडे, शिवाजीनगर अभिषेक बोके, खडकवासला ग्रामीण राजेंद्र पवार, महिला अध्यक्ष कसबा सुप्रिया कांबळे,पुणे कॅन्टोन्मेंट नीता गायकवाड,कोथरूड तेजल दुधाणे,शहर सेल अध्यक्ष युवक समीर चांदेरे, युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, अल्पसंख्याक समीर शेख, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, महिला बचत गट अश्विनी वाघ, सांस्कृतिक विजय राम कदम, फार्मसी विनोद काळोखे, ग्राहक सेल राजेंद्र घोलप. सेवादल अध्यक्ष श्रीमती शशिकला कुंभार, रोजगार अजित मुत्तीन, आयटी सेल मोहन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती अवरगंड, युवक अंगद माने, विजय आंधळे, अल्पसंख्याक अब्दुल शेख, शहर सरचिटणीस शितल जौंजाळ, शलाका पाटील,सुनील खाटपे,रामदास कसबे, उपाध्यक्ष माणिक दुधाने, आनंद तांबे, महेश पाटील, मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे, संघटक सचिव भारत पंजाबी, चिटणीस शाम शेळके, पंडित जगताप, दिनेश परदेशी, दिनेश अर्दाळकर, विधानसभा कार्याध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट गोरखनाथ भिकुले, कसबा राहुल पायगुडे, पर्वती रामदास गाडे, शिवाजीनगर बाळासाहेब आहेर, पदाधिकारी योगेश वराडे, शहर महिला कार्याध्यक्ष संगीता बराटे, गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष सुशांत ढमढेरे, अच्युत लांडगे,युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, आदित्य घुले, सागर चंदनशिवे, सुरज गायकवाड,युवती कार्याध्यक्ष नम्रता बोंदर, लावण्या शिंदे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विक्रम मोरे,वैद्यकीय मदत कक्ष वंदना साळवी, महिला उपाध्यक्ष मनिषा किराड, पूनम पाटोळे,रोशन कुरेशी, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर, राधिका वाईकर,युवती उपाध्यक्ष स्नेहल कांबळे, रिना अडागळे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, आयटी सेल संजय खंडारे,युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, पुणे कॅन्टोन्मेंट प्रसाद चौगुले,विद्यार्थी अध्यक्ष कोथरूड अनिकेत मोकर, पुणे कॅन्टोन्मेंट सामाजिक न्याय अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते, प्रतिक कोंडे,गणेश झांबरे, विजय चव्हाण, दिनकर रोडे, आशा दीक्षित, प्रदीप चोपडे, धनंजय जावळेकर, अभिषेक म्हस्के, ऋषिकेश राजगुरू, सनी किरवे,संजय चव्हाण,विनय बनसोडे,विकास हगवणे, स्वाती आवळे, गायत्री मानवतकर, गणेश पाटील,सुप्रिया साठे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रेल्वे आरोग्य विभाग  घोरपडी, पुणे  येथे अद्ययावत  वैद्यकीय सुविधांचे  उद्घाटन

पुणे:रेल्वे हेल्थ युनिट, घोरपडी, पुणे येथे सुधारित वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग आणि स्वाती वर्मा, अध्यक्षा, महिला सामाजिक सेवा संघटना पुणे विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्ण सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे.या उन्नत सुविधांमध्ये कार्डियक डिफायब्रिलेटर, मल्टीपॅरा पेशन्ट मॉनिटर, मल्टीचॅनल ईसीजी मशीन, फाऊलर बेड्स, क्रॅश कार्ट, नेब्युलायझर आणि इतर आपत्कालीन उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय रुग्णांसाठी आरओ वॉटर कूलर, जनरेटर सेट, लस आणि औषधांसाठी रेफ्रिजरेटरचीही सोय करण्यात आली आहे.

या सुविधा टाटा ब्लूस्कोप स्टील प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत दिल्या आहेत. या नवीन सुविधांमुळे रुग्णांना  इथे अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

फुटीरतावादी गट कोरेगांवच्या लढाईला जाणीवपूर्वक जातीयवादी रंग देतात – ॲड. रोहन माळवदकर

नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे ‘कोरेगांव लढाईचे वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२५-

“१ जानेवारी १८१८ – भीमा कोरेगांव लढाईची वास्तविकता” या पुस्तकाच्या प्रकाशन नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे झाले. या कार्यक्रमाला लेखक गुरुप्रकाश पासवान, जेएनयूचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम आणि पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट रोहन जमादार माळवदकर उपस्थित होते.

पुस्तकाचे लेखक ॲड. रोहन जमादार माळवदकर म्हणाले की, त्यांचे पूर्वज १८१८ च्या भीमा-कोरेगांव लढाईत सहभागी झाले होते. ही लढाई ना जातीयवादी होती, ना जाती निर्मूलनासाठी लढली गेली; ही लढाई म्हणजे ब्रिटिश आणि मराठ्यांमधील राजकीय संघर्ष होता. दोन्ही सैन्यांमध्ये विविध जाती आणि धर्मांचे सैनिक सामील होते.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात फक्त एकदाच, १९२७ मध्ये जयस्तंभाला भेट दिली होती. ही भेट ब्रिटिशांच्या अन्यायकारक आणि जातीयवादी धोरणांच्या विरोधात होती. त्या वेळी ब्रिटिशांनी “मार्शल रेस” सिद्धांताखाली अनुसूचित जातीच्या लोकांची सैन्यात भरती बंद केली होती. डॉ. आंबेडकरांनी या अन्यायाच्या विरोधात जयस्तंभावर जाऊन ब्रिटिशांना ही बंदी हटवण्याचे आवाहन केले होते.

माळवदकर म्हणाले की, या लढाईचे संचालन ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच केल होते आणि या लढाईशी आणि जयस्तंभाशी संबंधित खरे प्राथमिक अहवाल आणि दस्तऐवज उपलब्ध आहेत. परंतु, काही फुटीरतावादी गट या लढाईला जाणीवपूर्वक जातीयवादी रंग देऊन समाजात फूट पाडत आहेत. त्यांनी नमूद केले की, २०१८ मध्ये महाराष्ट्रात एल्गार परिषदेद्वारे देशविरोधी तत्त्वांना एकत्र आणून दंगल भडकवण्यात आली होती.

जेएनयूचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम म्हणाले की, ब्रिटिशांनी भारताचा इतिहास वसाहतवादी दृष्टिकोनातून लिहिण्याचे पाप केले. मुद्दामून ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया’ आणि ‘हिस्ट्री ऑफ मुघल इंडिया’ असे इतिहास लिहिले गेले, परंतु ‘हिस्ट्री ऑफ मराठा इंडिया’ लिहिला गेला नाही. यामागे भारताला अस्थिर करण्याचा वसाहतवादी कट आहे.

त्यांनी नमूद केले की, १९६५ नंतर भारतात फुटीरतावादी चळवळींना बळ मिळाले आणि १९६५ नंतर शिकवला गेलेला इतिहास हे त्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे आता प्रत्येक स्तरावर ब्रिटिशांची वसाहतवादी विचारसरणी नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.

या प्रसंगी गुरुप्रकाश पासवान म्हणाले की, लेखक रोहन माळवदकर हे ‘जयस्तंभाचे वंशज आहेत, त्यामुळे या विषयावरील त्यांचे लेखन आणखी महत्त्वाचे ठरते. सध्या दलित कल्याणाच्या नावाखाली समाजात वैमनस्य पसरवण्यासाठी एक ‘उद्योग’ सक्रिय आहे. परंतु, त्यांना हे काम कोणी दिले, हा प्रश्नही उपस्थित केला पाहिजे.

पासवान यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनेकदा विपर्यास केला जातो आणि दुरुपयोग केला जातो. काही विशिष्ट गट त्यांच्या लिखित विचारांचा आपल्या अजेंड्याला अनुरूप वापर करतात. काही वेळा ‘ब्रेकिंग इंडिया’ अजेंडा असलेले तत्त्व दलितांना हिंदूंपासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ‘जय भीम, जय मीम’ सारख्या घोषणा निर्माण होतात. त्यामुळे अशा ठेकेदारांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

‘यशदा’ येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, उत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा. आज उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे. कार्यशाळेत शिकायला मिळणाऱ्या बाबी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या ठरतील. अनुभवी अधिकाऱ्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक आहेत, ते संकलित झाले आणि समजून घेतले तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनाच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल असा विश्वासाही त्यांनी व्यक्त केला.

शंभर दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करणार
राज्य शासनाने १०० दिवसाचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या कार्यक्रमाच्या अवलोकनानंतर राज्यासाठी उत्तम कार्यपद्धतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन होणार आहे. क्वालिटी कौन्सील ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील, त्यांच्या कामांची नोंद घेण्यात येईल. यातून चांगले काम करण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल. साडेबारा हजार कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे.

जलजीवन योजनेतील त्रुटी बाजूला करून ती योजना प्रभावीपणे राबवावी. योजना पूर्ण झाल्यानंतर ती चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार करावा. कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कामासाठी काय करता येईल याचा विचार करावा, त्यासाठी क्षमतावाढ आणि प्रशिक्षणावर भर द्यावा. बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे प्रशिक्षण घ्यावे.

येत्या पाच वर्षात आरोग्य सुविधांच्या सुधारणेवर भर
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली असून तिला आकार देणे गरजेचे आहे. येत्या पाच वर्षात नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक पाच किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सुधारणा घडवून आणल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील.

सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे
शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. अंगणवाडीपासून या सुधारणांना सुरुवात करावी. सेवाभावी संस्थांच्या सहभागातून चांगल्या सुविधा करता येतील. जलसंधारण, उद्योगाला प्रोत्साहन, विविध योजनांचे अभिसरण आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. नदी-नाल्यात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ‘लखपती दीदी’ सारख्या योजनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरे
मंत्री गोरे म्हणाले, पहिल्या बैठकीत साडे तेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली आणि १० लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला, त्यातील ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ३० लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या गावांमध्ये शासनाच्या योजनाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट राहील. या योजनेच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. योजनेअंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेवरील जनतेचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव डवले यांनी प्रस्ताविकात कार्यशाळेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. १०० दिवसाच्या कार्यक्रमातील २१ पैकी २० मुद्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. उमेद अभियान, आरोग्य, आरोग्य विमा योजना, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदी विविध विषयांवर पहिल्या दिवशी चर्चा करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

ग्रामविकास विभागाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते कारण्यात आले.

राज्यातील २० जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर आधारित पुस्तिकेचे तसेच महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयातील उत्तम कल्पना आणि कामकाजातील सुधारणांशी संबंधित दस्तावेज तयार करण्यासाठी सहा गटात चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
0000

दहशतवादाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचा’कॅंडल मार्च’

पुणे – पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात कॅंप भागात प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने ‘कॅंडल मार्च’ काढण्यात आला.

कॅंडल मार्च कॅंप भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सायंकाळी काढण्यात आला. कॅंडल मार्चचे नेतृत्व प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस स्वाती शिंदे,अनिता मकवाना यांनी केले.या कॅंडल मार्च मध्ये संगीता अशोक पवार,प्रियांका,रणपिसे,
ॲड.राजश्री अडसुळ,ज्योती चंदेलवाल,अंजली सोलापुरे,शिवानी माने,ॲड.रेश्मा शिकिलगार,रेखा जैन,व अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांना महिला काँग्रेसच्यावतीने आम्ही श्रद्धांजली वहात आहोत आणि या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व देश एकजुटीने उभा राहील,असे स्वाती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगामला जावून जखमींची भेट घेतली. तसेच दिल्लीतील सर्व पक्षीय बैठकीत राहुल गांधींनी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच्या ऐक्याला महत्त्व दिले. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे,

अमरावती विमानतळास भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे नाव द्यावे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्याभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटीलयांचे नाव अमरावती विमानतळास द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, अमरावतीकरांची विमानतळाची स्वप्नपूर्ती झाली आणि पहिल्या विमानाने मुंबईहून अमरावतीकडे प्रवास केला, त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून खूप खूप आभार. अमरावतीची ओळख ही थोर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी देशभक्त दादासाहेब खापर्डे, स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणारे क्रांतिकारी वीर वामनराव जोशी, देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या नावाने कायम आहे. मात्र यामध्ये आणखी एक नाव आवर्जून जोडले जाते ते म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांचे. आपला देश कायमच नेतृत्वाच्या बाबतीत भाग्यवान ठरला. स्वातंत्र्यानंतर भारताचा संपूर्ण कारभार नेहमीच योग्य नेतृत्वानी सांभाळल्याने आज जगात भारताचे नाव हे विकसनशील देशांमध्ये सर्वात पुढे आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या देशाला अनेक हुशार कर्तृत्वान महिलांचे देखील नेतृत्व लाभले. या महिलांच्या नेतृत्वानेदेखील त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला पुढे नेण्याचे मोठे काम केले. प्रत्येक महत्वाच्या पदावर महिलांनी काम करत देशाची सेवा केली. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती या पदावर काम करत देशाची शान वाढवली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या होत्या. कायदेतज्ज्ञ असलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जळगाव विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यावेळी एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सलग वीस वर्षे त्यांनी विविध खात्याची मंत्रीपदे सांभाळून महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, सांस्कृतिक, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री असे मंत्रीपदे भुषवीत महाराष्ट्र विधान सभेवर तसेच महाराष्ट्र विधान मंडळ नेतेपदी त्यांची निवड झाली. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला बँकांची स्थापना केली, आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. पुढे अंध व्यक्तींसाठी सामाजिक संस्था काढून मोठे कार्य त्यांनी उभे केले. सन १९९१ साली अमरावतीतून श्रीमती प्रतिभाताई पाटील लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल झाल्या. देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पद त्यांनी भुषविले आणि जागतिक नकाशावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने अमरावतीची नवी ओळख निर्माण झाली आहे. श्रीमती प्रतिभाताईंनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा महिलांसाठी कोणत्याच प्रकारचे आरक्षण अस्तित्वात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी राजकारणात दिलेले योगदान हे महिलांकरीता आजही आदर्श ठरत आहे. चुल आणि मुल एवढ्यापुरते मर्यादित न राहता समाजकारणात-राजकारणात महिलांचे योगदान हे किती महत्वाचे आहे याची प्रचिती त्यांच्या राजकारणातील योगदानावरून येते. त्यामुळेच राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू’ राष्ट्रपती ठरल्या.राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे. जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताईच्या यशस्वी राजकीय जीवनातील कार्यकाळाचा अभ्यास करावा, असे मोठे नेतृत्व अमरावतीकरांना लाभले आहे. राजकीय जीवनात महिलांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला तर “ती” देशाला आणि पर्यायाने मूळ गावाला विकासाच्यादृष्टीने उंच शिखरावर नेऊन ठेवते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती प्रतिभाताई पाटील. त्यांचे नाव अमरावती विमानतळास देण्यात यावे अशी संपूर्ण अमरावतीकरांची इच्छा असून तशी त्यांनी मागणीसुद्धा केलेली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे ‘बदला घ्या आंदोलन’-

पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगरचे आंदोलन

पुणे : ‘उठ हिंदू जागा हो,  हिंदुत्वाचा धागा हो’… पश्चिम बंगाल की दंगाईओ से हम लढेंगे हम लढेंगे..पुरा भारत क्या चाहता है, बदला..बदला.. बदला अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगर यांच्यावतीने ‘बदला घ्या आंदोलन’ करण्यात आले. डेक्कन गुडलक चौक येथे  काश्मीरध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री दादा वेदक, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत संयोजक नितीन महाजन, प्रांत संयोजिका प्रिया रसाळ, सोनाली नाथ, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, जिल्हा मंत्री शुभम मुळूक, विजय कांबळे, साईनाथ कदम, नाना क्षीरसागर, शार्दुल ठाकूर, दीपक पटेलिया, महेंद्रसिंह चौहान, जिल्हा संयोजक विक्रम घुंगरूवाले, दत्ता तोंडे, राजू कुडले, विनायक देसाई, आकाश दुबे, आशिष दुसाणे, आशा टेकवडे, ईशानी खिरे, सुरेखा कवडे, शोभा श्रीगोंदेकर, आरती भारती, मुस्कान वर्मा, समृद्धी सराफ यावेळी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले,  आपल्या देशाला पाकिस्तान बरोबरच देशाच्या आतील गद्दारांकडून सुद्धा धोका आहे. सीमेवरील शत्रूंशी भारतीय जवान लढतील आणि देशाच्या आतील शत्रूंशी बजरंग दलाचे कार्यकर्ते सामना करतील. त्याचबरोबर कोंढवा भागात वास्तव्य असणारे बांगलादेशी नागरिक अनधिकृत व्यवसाय याविषयी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संदर्भात मोठे आंदोलन करेल. तसेच फर्ग्युसन कॉलेज रस्ता या परिसरात रात्री नऊ नंतर चालणारे अनधिकृत व्यवसाय पोलीस प्रशासनाने त्वरित बंद करावेत, अशी मागणी यावेळी  करण्यात आली.

महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी बेपत्ता: 48 शहरांत 5023 पाकिस्तानी:नागपुरात सर्वाधिक 2458

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.

अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.

योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामु्ळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम यांनी याविषयी बोलताना सांगितले.

खाली वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?

अकोला 22
अहिल्यानगर 14
अमरावती 118
छत्रपती संभाजीनगर 59
भंडारा 0
बीड 0
बुलढाणा 7
चंद्रपूर 0
धुळे 6
धाराशिव 0
गडचिरोली 0
गोंदिया 5
हिंगोली 0
जळगाव 393
जालना 5
कोल्हापूर 58
लातूर 8
मुंबई 28
नाशिक 10
नागपूर 2458
नांदेड 4
नंदुरबार 10
नवी मुंबई 239
परभणी 3
पालघर 1
पिंपरी चिंचवड 290
पुणे 114
रायगड 17
रत्नागिरी 4
सातारा 1
सांगली 6
कोल्हापूर ग्रामीण 17
सोलापूर 0
सिंधुदुर्ग 0
ठाणे 1106
वर्धा 0
वाशिम 6
यवतमाळ 14
एकूण 5023

आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन मंगळवारपासून

आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजन : विनामूल्य प्रवेश

पुणे : ‘आर्ट मॅजिक’ १८  वे चित्रकला प्रदर्शन दिनांक २९ आणि ३० एप्रिल रोजी बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता होणार असून उद्घाटनाला ज्येष्ठ  चित्रकार अल्हाद नाईक, सायली दामले उपस्थित राहणार आहेत.

आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार, अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  यावर्षी या कला प्रदर्शनात अ‍ॅक्रिलिक पेंटिंग, पोर्ट्रेट, वॉटर कलर पेंटिंग, पेंन्सिल स्केचिंग अशा विविध माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेला मुक्तपणे मांडले आहे. वय ५ वर्षे ते ६५ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तब्बल ७५ कलाकार सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनाचे संयोजन संयोजन अनुजा जोशी, ऋचा पोतदार, सार्थक चव्हाण, सिया पांडे, श्लोका धुमाळ, निल पायगुडे यांनी केले आहे. महालक्ष्मी पवार या मुलांना कला शिकवण्यासोबतच त्यांना नॅशनल व इंटरनॅशनल पातळीवर काम करायला शिकवतात व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करतात. 

द मॅस्ट्रो पेंटर व्हि.एस. गायतोंडे इंटरनॅशनल अॅवाॅर्ड ने महालक्ष्मी पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. दिनांक २९ आणि  ३० एप्रिल रोजी सकाळी ११  ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. तरी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 92 युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान


केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

पुणे, 26 एप्रिल 2025

आज 15व्या रोजगार मेळाव्यामध्ये देशातील 51 हजाराहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून नियुक्ती पत्र देण्यात आली. पुण्यात ‘यशदा’ येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 यांच्यातर्फे या रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायने व खते मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 चे प्रमुख आयुक्त मयंक कुमार व प्रधान आयुक्त मिहीर कुमार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी सर्वांना संबोधित केले. “जेव्हा युवा राष्ट्र उभारणीत सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा विकास वेगाने होतो, जगातही तो आपला ठसा उमटवतो. आज, भारतातील तरुण आपल्या कठोर परिश्रम, नवोपक्रमाद्वारे जगाला आपली क्षमता दाखवत आहेत.”, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काढले.

“सरकारने विविध मंत्रालय, विभागांना कालबद्ध रीतीने कार्यालयातील रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे सातत्याने पदे भरली जात आहेत.”, असे केंद्रीय मंत्री नड्डा यांनी नमूद केले. पुढे बोलताना नवनियुक्त कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारी नोकरीकडे नागरिकांची सेवा करण्याची जबाबदारी या दृष्टीकोनातून पहा.”

“युवकांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या ज्यातून तरुणांना सक्षम केले जात आहे. 10 वर्षात देशामध्ये विविध क्षेत्रात सुमारे 17 कोटी 19 लाख नोकरीच्या संधी तयार झाल्या.”, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्ताने दिली.

आज वस्तू व सेवा कर आयुक्तालय, भारतीय रेल्वे, बँका, आरोग्य मंत्रालय, आयकर विभाग, विविध बँका, CRPF, EPFO, BRO, Defense Estate, FCI, CGHS अशा विविध विभागातील सुमारे दोनशे नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 92 नव नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

ज्यामध्ये दृष्टी बाधित महिला कर्मचारी व्हॅलेंटिना विनायक कांडलकर व दिव्यांग श्रेयांश शर्मा यांचा देखील समावेश होता.

याप्रसंगी पहलगाम येथील दुःखद घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा,उत्तराखंड व सिक्किम मार्गे 750 भारतीय जातील

चीनने परवानगी दिली
कैलास मानसरोवर यात्रा 30 जून ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने अर्ज प्रक्रियेसाठी वेबसाइट उघडली. यात्रेकरू http://kmy.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ आहे.यावर्षी, यात्रेकरूंचे १५ गट उत्तराखंड आणि सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवरला जातील. उत्तराखंडहून लिपुलेख खिंड ओलांडून ५ गटात ५०-५० प्रवासी मानसरोवरला जातील. त्याच वेळी, १० बॅचमध्ये प्रत्येकी ५० प्रवाशांचे गट सिक्कीमहून नाथुला मार्गे प्रवास करतील.

कैलास मानसरोवर चीनव्याप्त तिबेटमध्ये आहे. परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी या सहलीचे आयोजन करते. तथापि, गेल्या पाच वर्षांपासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाऊ देत नव्हता. दोन्ही देशांमधील सीमा वाद आणि कोविड लाट हे याचे कारण होते.आता ५ वर्षांनंतर प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याचा हा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांनी डेमचोक आणि डेपसांग येथून आपले सैन्य मागे घेतले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात पाच वर्षांनी भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंधांच्या स्थितीवर चर्चा केली आणि संबंध सुधारण्यासाठी काही पावले उचलण्याचे मान्य केले.तेव्हापासून, गेल्या ३ महिन्यांत, चीन-भारत सीमेवरील डेमचोक आणि देपसांग या वादग्रस्त भागातून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर, ५ वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा आणि विमान सेवा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

२०२० पासून भारत आणि चीनमधील विमान सेवा देखील बंद होती

परराष्ट्र मंत्रालयाने २७ जानेवारी रोजी माहिती दिली होती की भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा देखील सुरू होईल. २०२० पासून दोन्ही देशांमधील विमान सेवा बंद होती. जून २०२० मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलाम वाद झाला आणि मार्च २०१९ मध्ये कोविडची पहिली लाट आली.कोरोना साथीपूर्वी दोन्ही देशांमध्ये दरमहा ५३९ थेट उड्डाणे होत असत. त्याची क्षमता १.२५ लाखांपेक्षा जास्त जागांची होती. या विमानांमध्ये एअर इंडिया, चायना सदर्न एअरलाइन्स, चायना ईस्टर्न एअरलाइन्स सारख्या कंपन्यांचा समावेश होता.विमान उड्डाण बंद झाल्यानंतर, दोन्ही देशांतील प्रवासी बांगलादेश, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर सारख्या कनेक्टिंग हबमधून प्रवास करत असत. तथापि, हा प्रवास महागडा होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान, १.७३ लाख लोकांनी हाँगकाँग मार्गे, ९८ हजारांनी सिंगापूर मार्गे, ९३ हजारांनी थायलंड मार्गे आणि ३० हजार लोकांनी बांगलादेश मार्गे दोन्ही देशांमध्ये प्रवास केला.

कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांमध्ये एक पर्वत आहे. या पर्वताला येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.

या शिखराचा आकार एका विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून फक्त ६५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलाश मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.

श्रद्धा – भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात-हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान शिव त्यांच्या पत्नी पार्वतीसह कैलास पर्वतावर राहतात. म्हणूनच हे हिंदूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. जैन धर्मात असे मानले जाते की पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना येथून मोक्ष मिळाला होता. २०२० पूर्वी, दरवर्षी सुमारे ५० हजार हिंदू भारत आणि नेपाळ मार्गे धार्मिक तीर्थयात्रेसाठी येथे येत असत.

कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीनमध्ये दोन करार झाले

कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीनमध्ये दोन मोठे करार झाले आहेत-

पहिला करार: लिपुलेख खिंडीतून कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भारत आणि चीनमध्ये २० मे २०१३ रोजी हा करार झाला होता. हा करार तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झाला होता. यामुळे लिपुलेख खिंडीचा मार्ग प्रवासासाठी खुला झाला.

दुसरा करार : नाथुला मार्गे कैलास मानसरोवरला जाण्याच्या मार्गाबाबत भारत आणि चीनमध्ये १८ सप्टेंबर २०१४ रोजी हा करार झाला होता. परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी केली होती.

दोन्ही करारांची भाषा जवळजवळ सारखीच आहे. हे करार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून लागू होतील. करारात असे लिहिले आहे की त्याची कालमर्यादा दर ५ वर्षांनी आपोआप वाढवली जाईल.

उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून भाविक कैलासाला भेट देत होते

कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून, उत्तराखंडमधील व्यास खोऱ्यातून भाविक कैलास पर्वतावर येत होते. गेल्या वर्षी, उत्तराखंड पर्यटन विभाग, सीमा रस्ते संघटना (BRO) आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिस (ITBP) च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कैलास पर्वताचे स्पष्टपणे दृश्यमान स्थान शोधून काढले होते. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहिल्यांदाच, जुन्या लिपुलेख खिंडीतून भारतीय हद्दीतून पवित्र कैलास पर्वत दिसला. हे उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात वसलेले आहे.

कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी आहे पण आतापर्यंत कोणीही त्यावर चढाई करू शकलेले नाही

आतापर्यंत ७००० लोकांनी जगातील सर्वात उंच पर्वत, एव्हरेस्ट चढले आहे. त्याची उंची ८८४८ मीटर आहे, तर कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा सुमारे २००० मीटर कमी आहे. तरीही, आजपर्यंत कोणीही त्यावर चढू शकलेले नाही. काही लोकांना ५२ किमी पर्यंत प्रदक्षिणा घालण्यात निश्चितच यश आले आहे.खरंतर, कैलास पर्वताची चढाई खूप तीव्र आहे. डोंगराचा कोन ६५ अंशांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, माउंट एव्हरेस्टचा कोन ४०-५० अंश आहे, म्हणून कैलास चढणे कठीण आहे. त्यावर चढाई करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. शेवटचा प्रयत्न २००१ मध्ये करण्यात आला होता. तथापि, आता कैलास चढाई पूर्णपणे प्रतिबंधित आहे.

कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक

कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफसोबत संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

कायमोह येथील मतलहामा चौक ठोकरपोरा येथे स्थापन केलेल्या चौकीवर तपासणी दरम्यान, कायमोह येथील ठोकरपोरा येथील रहिवासी अब्दुल सलाम भटचा मुलगा बिलाल अहमद भट आणि गुलाम मोहम्मद भटचा मुलगा मोहम्मद इस्माईल भट अशी ओळख पटवण्यात आलेल्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून ०२ पिस्तूल, २५ पिस्तूल राउंड, ⁠०२ पिस्तूल मॅगझिनसह शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.

घटनेबाबत, पीएस कैमोह येथे कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२६: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.

यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंढवा येथील घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते. जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

पानशेत व वरसगाव धरणाची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पाहणी

धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने गाळाचे सर्वेक्षण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

पुणे, दि.२६: गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.

पानशेत व वरसगाव धरणांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे, पानशेत प्रकल्पाचे शाखाधिकारी अनुराग मारके आदी उपस्थित होते.

पानशेत व वरसगाव धरणासाठी संपादित जमिनीचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त संपादित जमिनीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देऊन मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, पानशेत व वरसगाव येथील महानिर्मिती कंपनीमार्फत कार्यान्वित असलेले जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबाबत नव्याने अभ्यास करून अतिरिक्त क्षमता वाढविण्यात येईल किंवा कसे याबाबत पाहणी करावी. वरसगाव धरणाची गळती कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत सविस्तर अंदाजपत्रक करून कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. विखे- पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे, परिसराचा सुशोभीकरणाचा आराखडा करून त्याचे उत्कृष्ट काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

श्री. कपोले, श्री. गुणाले यांनी या धरण प्रकल्पांच्या बाबत त्यांचे बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, साठवण क्षमता, जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता आदींच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच पानशेत मधील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले. दोन लाख घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0000