Home Blog Page 3308

ज्युनिअर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पुण्याच्या चार खेळाडूंची निवड

0
पुणे: ज्युनिअर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पुण्याच्या ऐश्वर्या गाडेकर, ऐश्वर्या  जगताप, स्मिधी खोकले व अंजली बारके यांची निवड झाली आहे. २६ जूलै रोजी कटक ओडीसा येथे ही स्पर्धा होणार आहे. 

विविध स्तरावर सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या ऐश्वर्या गाडेकर(मध्यरक्षक), ऐश्वर्या  जगताप(स्ट्रायकर), स्मिधी खोकले(मध्यरक्षक) व अंजली बारके(गोलरक्षक) यांची राष्ट्रीय फुटबॉल संघात वर्णी लागली. पीडीएफएच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या या खेळाडूंची निवड झाल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला असल्याचे पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी सांगितले.

ऐश्वर्या गाडेकर ही फर्गुसन महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत असून पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या(पीडीएफए) मैदानावर ती प्रशिक्षक मोहन दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ऐश्वर्या जगताप ही विद्या हायस्कुल, बालेवाडी येथे दहावी इयत्तेत शिकते. स्मिधी खोकले  ही गुरूकूल स्कुल, शिवाजीनगर येथे दहावी इयत्तेत शिकत असून आहे. तर  अंजली बारके  ही सिंहगड स्प्रींगडेल,  आंबेगाव येथे नववी इयत्तेत शिकते.  ऐश्वर्या जगताप, स्मिधी खोकले, अंजली बारके  या तीनही खेळाडू पीडीएफएच्या सनी अजमेकर यांच्या मार्गदर्शमाखाली सराव करतात. मुंबई येथे १७ ते २६ जुलै २०१७ या कालावधीत सुरू असलेल्या सराव शिबिरात त्या सराव करत आहेत.  

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत अनुज करकरे, तान्या मेरी, अशोक नाथ, कविता रेड्डी यांना विजेतेपद

0
पुणे,दि.24 जुलै 2017ः नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)व रनबडिज्‌ क्लब यांच्या तर्फे आयोजित तिसर्‍या एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत अनुज करकरे, तान्या मेरी, अशोक नाथ, कविता रेड्डी, दिपक जोशी, डॉ.अभिजीत भंडारी, वैशाली कस्तुरे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. 
पुण्यातील रनबडिज्‌ क्लब यांच्या तर्फे आयोजित ही स्पर्धा 10कि.मी आणि 21 कि.मी. या प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकुण 2500 धावपटूंसह अंध विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत मिटकॉन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट येथुन शर्यतीस प्रारंभ झाला असून रक्षक चौकाच्या दिशेने पुन्हा फिरून मिटकॉन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता. तसेच, याशिवाय जागृती शाळेच्या 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 
21 किलोमीटर खुल्या गटात अनुज करकरे याने 1.37.44सेकंद वेळ नोंदवत पहिला क‘मांक पटकावला. तर, सुरज कल्याणकर व विजय गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. याच मुलींच्या गटात पुण्याच्या तान्या मेरीने 1.48.28सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर खुल्या गटात मुलांच्या गटात दिपक जोशीने 44.22सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक मिळवला. मुलींच्या वरिष्ठ गटात वैशाली कस्तुरेने 47.08 सेकंद वेळ नोंदवून विजय मिळवला. 21 किलोमीटर वरिष्ठ मुलींच्या गटात पुण्याच्या कविता रेड्डीने 1.43.12सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.  
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओचे संचालक आणि पुण्यातील प्रमुख नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, अरूणा केळकर, जाई केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  दोन वेळचे एव्हरेस्टवीर आणि कॉमरेड फिनिशर किशोर धनकवडे, रनबडिज्‌ क्लबचे निखिल शहा व अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
*स्पर्धेचा सविस्तर निकालः10कि.मीः खुला गटः  मुलेः 1.दिपक जोशी(44.22से); 2.दिग्विजय सिंग भंडारी(44.26से); 3.राहुल (44.33से);
मुलीः 1.प्रज्ञा(56.30से); 2.तृप्ती गुप्ता(56.41से); 3.चैत्राली(56.44से); 
वरिष्ठ गटः मुलेः 1.डॉ.अभिजीत भंडारी(48.28से); 2.हितेंद्र चौधरी(48.30से); 3.प्रशांत तिडके(49.07से); 
मुलीः 1.वैशाली कस्तुरे(47.08से); 2.स्मिता कुलकर्णी(55.01से); 3.आरती मराठे(57.53से); 
 
21कि.मीः खुला गटः मुलेः 1.अनुज करकरे(1.37.44से); 2.सुरज कल्याणकर(1.38.26से); 3. विजय गायकवाड(1.38.50से); 
मुलीः1. तान्या मेरी(1.48.28से); 2.तन्मया करमरकर(1.58.12से); 3.दिप्ती के.( 2.02.20से); 
वरिष्ठ गटः मुलेः1.अशोक नाथ(1.38.02से);2.आशिष पुणतांबेकर(1.39.28से); 3.मुथ्थुकृष्णन जयरामण(1.39.46से); 
मुलीः 1.कविता रेड्डी(1.43.12से), 2.जिया छनी(1.47.32से), 3. दुर्गा शिल(2.03.43से). 

सर्वच व्यापारी चोर समजून जीएसटी-“मल्टिपल टॅक्‍स रेटिंग’ आम्हाला मान्य नाही.”- पी. चिदंबरम

0

पुणे – “” केंद्राने लागू केलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आम्हाला मान्य नाही. कॉंग्रेस जर आता सत्तेत असते तर 18 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जीएसटी लागू केला नसता. परंतु 18 टक्‍क्‍यांहून अधिक जीएसटी लागू करून केंद्र सरकारने “मानवनिर्मित आपत्ती’ देशावर लादली आहे.देशातील सर्वच व्यापारी चोर नाहीत,” असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

पुणे शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात “जीएसटी एक भ्रमनिरास’ या विषयावर चिदंबरम यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार भाई जगताप, मोहन जोशी, अभय छाजेड, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते.

चिदंबरम म्हणाले,केंद्र सरकारला जीएसटी लागू करताना भारतीय बाजारपेठ आणि व्यापाराविषयीची पुरेशी कल्पना आली नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस सध्याच्या जीएसटीविरोधात आवाज उठवीत राहील. कारण आम्हाला चांगल्या दर्जाचा जीएसटी हवा आहे.

ते म्हणाले ,जीएसटीचा खरा लेखक कॉंग्रेस आहे. या करामुळे करसंकलन निश्‍चित वाढेल. तसेच अन्य करांच्या मनस्तापापासून नागरिकांना मुक्तता मिळेल. “वन रेट ऑफ टॅक्‍स’, “वन टॅक्‍स वन कंट्री’ या उद्देशाने कॉंग्रेसने सर्व प्रथम जीएसटीचा आग्रह धरला. मात्र सध्याच्या सरकारने लागू केलेल्या जीएसटीचा परिणाम वेगवेगळ्या व्यवसायांवर होण्याची शक्‍यता आहे. तमिळनाडूमध्ये चित्रपटगृह व्यावसायिकांना 28 ते 30 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. “मल्टिपल टॅक्‍स रेटिंग’ आम्हाला मान्य नाही.”

कॉंग्रेसचे सरकार असते, तर 15 ते साडेपंधरा टक्‍क्‍यांपर्यंत जीएसटी लागू केला असता. आताच्या जीएसटीमध्ये व्यवसायावर 37 प्रकारेच परतावे (रिटर्न्स) आहेत, तर व्यापाऱ्यांना एक हजार वेळा परतावे भरावे लागणार आहेत. व्यापाऱ्यांनी व्यवसायाकडे लक्ष द्यायचे की फक्त परतावे भरण्यातच वेळ घालवायचा? त्यामुळे जीएसटीची पुनर्रचना करायला हवी. कॉंग्रेसच्या काळात विकासाचा दर 7.9 टक्के होता. नोटाबंदीमुळे तो दर 1.3 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. सध्याच्या जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर आणखीन परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले.

 

काँग्रेसची बैठक लवकरच तुरुंगात – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

0

पुणे-‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ए. के. अँटोनी सोनिया गांधी यांना आणि प्रियांका गांधी राहुल गांधी यांना जामीन आहेत. वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पी. चिदंबरम आणि शशी थरूर हे लवकरच तुरुंगात जातील, असे भाकीत करून भाजपनेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसला बैठक आता तुरुंगातच घ्यावी लागेल, असा दावा केला. विविध जातींमध्ये हिंदूंचे विभाजन आणि अल्पसंख्याकांची बेरीज या जुन्या समीकरणातून सत्ता संपादन करता येणार नसल्याच्या नैराश्यातूनच काँग्रेसकडून असहिष्णुतेचे आरोप केले जात असल्याचा दावा भाजप नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केला.

विवेक समूह आणि भारत विकास परिषदेतर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते अणीबाणीविरोधात लढा देणारे स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ‘असहिष्णुता : सत्य की आभास’ या विषयावर स्वामी यांनी संवाद साधला. स्वामी यांच्या हस्ते अणीबाणीत तुरुंगवास भोगणारे नारायण अत्रे, विजया काडगी आणि वसंतराव प्रसादे यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आणि परिषदेचे दत्ता चितळे या वेळी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले ३७० कलम लवकरच हटविले जाईल, असे सांगून स्वामी म्हणाले,‘ मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राष्ट्रपतींची सही झाली तरच काश्मीरला वेगळा दर्जा देणारे हे कलम दूर करता येऊ शकते. आता रामनाथ कोिवद हे राष्ट्रपती झाले असून त्यांच्या सहीने या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल

बॉलिवूड तारकांच्या उपस्थितीत झाले ‘भिकारी’ सिनेमाचे सॉंग लॉंच

0
मराठीत या वर्षातील सर्वात बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भिकारी’ सिनेमाची सध्या मोठी हवा आहे.  मी मराठा फिल्म प्रॉडक्शन शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत ह्या सिनेमातील गाण्यांची देखील तेव्हढीच चर्चा आहे. श्रीमंती आणि गरिबी असे समाजातील दोन टोक मांडणारा हा सिनेमा बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मास्तर गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्या लाडक्या मास्तरजींच्या या ‘भिकारी’ सिनेमाचे संपूर्ण बॉलिवूडकरांनी आणि मराठी कलाकारांनी तोंड भरून कौतुकदेखील केले आहे. अंधेरी येथे नुकत्याच झालेल्या ‘भिकारी’ सिनेमाच्या सॉंग लॉंच कार्यक्रमात याची पुन्हा प्रचिती आली. रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे या स्टार्सनी उपस्थिती लावत सॉंग लॉंच कार्यक्रमात रंग भरला. शिवाय ‘भिकारी’ सिनेमातील गाण्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक देखील केले. या कार्यक्रमात ‘काशा’ आणि ‘बाळा’ ह्या गाण्यांचे सादरीकरणदेखील करण्यात आले.
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिनेमातील ‘काशा’ हे गाणे अवधूत गुप्ते, आनंद शिंदे यांनी गायले असून गणेश आचार्य यांचा आवाजदेखील आपल्याला या गाण्यात ऐकता येणार आहे. या गाण्याला मिलिंद वानखेडे यांनी ताल दिला असून, हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडत आहे. ‘भिकारी’ सिनेमातील महत्वाचे वळण या गाण्यात दिसत आहे. भिकारी लोकांचे आयुष्य आणि त्यांची दिनचर्या मांडणाऱ्या या गाण्याचे सुबोध पवार आणि गणेश आचार्य यांनी लिहिले आहेत. शिवाय ‘बाळा’ हे हे गाणेदेखील चांगले जमले असून, लंडनच्या रस्त्यावर  मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी, चक्क हिपहॉप करताना आपल्याला यात पाहायला मिळतो. हिंदीचे प्रचलित संगीत दिग्दर्शक विशाल मिश्रा यांचा आवाज आणि ताल या गाण्याला लाभला असल्याकारणामुळे,हे गाणे ‘भिकारी’ सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीचा पुरावा देते. सिनेमाच्या सुरुवातीला स्वप्नीलचा परिचय करून देणारे हे गाणेदेखील लोकांना भरपूर आवडत आहे.  भिकारी सिनेमातील या दोन गाण्यांचे वैशिष्टय म्हणजे, समाजातील दोन स्तरांमध्ये दिसणारा पराकोटीचा फरक या गाण्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे ‘देवा हो देवा’, ‘मागू कसा’ आणि ‘ये आता’ ह्या गाण्यांनादेखील सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळतो.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे. महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाची कथा ससी यांची असून पटकथा, संवाद गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात स्वप्नील जोशीसोबतच ऋचा  इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर,  सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

 

‘जीएसटी’ म्हणजे कर दहशतवाद : पी. चिदंबरम

0

पुणे-केंद्र सरकारने ‘जीएसटी’ लागू केला असला तरी त्यात सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. जीएसटीच्या नावाखाली होणारी लूट म्हणजे एक प्रकारचा कर दहशतवाद आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी टीका केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

ते म्हणाले, बिस्किट, चॉकलेटसाठी वेगवेगळा कर, हे काय आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. भाजपला शह देण्यासाठी २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या भारत-चीन सीमाप्रश्न गंभीर झाला असून त्यावर अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंड उघडावे. सरकारने चीन प्रश्नावर आपली भुमिका जाहिर केल्यावर आम्ही बोलू. मात्र, हे सरकार काहीच करताना दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली.

चिंदबरम म्हणाले, भारत-पाक सीमेवर जवानावर प्रत्येक दिवशी हल्ले होत आहेत. त्यावर या सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र, तेथील परिस्थिती सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे तरुणाई हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरली आहे. हे कशाचे लक्षण आहे, असा सवाल उपस्थित करून त्यांच्याशी सरकारने संवाद साधून परिस्थिती नियत्रंणात आणण्याची गरज व्यक्त केली. मात्र, या सरकारकडून काहीही होताना दिसत नसून आमच्या युपीए सरकारच्या काळात कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच युपीएच्या काळात झुंडशाहीतून बळी गेल्याची एकही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये जोपर्यंत भाजप आणि पीडीपी हे युतीत आहेत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही. अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर निशाना साधला.

प्रत्येकाने घरातच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ही काळाची गरज – असे उपक्रम सर्व प्रभागात राबविणे गरजेचे -महापौर मुक्ता टिळक.

0
पुणे- येथील प्रभाग १३ च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जैववैद्यकीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लॉस्टिक कचरा ही प्रभागातच जिरविण्याच्या दृष्टीने जे उपक्रम सुरु केले ते स्तुत्य असून शहरातील सर्वच प्रभागात असे उपक्रम राबविले पाहिजे.कचऱ्याचे वर्गीकरण आणि विघटन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून Segregation at Source म्हणजे जेथे कचरा निर्माण होतो तेथेच त्याचे वर्गीकरण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
प्रभाग १३ च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी श्री रिसायकलर्स च्या मदतीने प्रभागातील ई कचरा तर मे क्लीन गारबेज मॅनेजमेन्ट या संस्थेच्या सहकार्याने प्लॉस्टिक कचरा संकलन व जनजागृती मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.कोथरूड च्या आमदार मेधा कुलकर्णी,प्रभाग समिती चे अध्यक्ष सुशील मेंगडे,नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे,दीपक पोटे,जयंत भावे,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,या उपक्रमाला सहाय्य केलेले वनराई चे रवींद्र धारिया,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,हॅपी कॉलनी फेडरेशन चे अध्यक्ष राघवेंद्र पुरोहित,कार्याध्यक्ष सुरेश मालशे,सचिव विनीत गोखले इ मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मा महापौरांचे हस्ते स्वच्छ च्या कचरावेचक सेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांचा ही या सर्व उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग आणि सन्योजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.त्याचा उल्लेख करुन महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की ” या सेवकांकडे मानवीय दृष्टीकोणातून बघितले पाहिजे,त्यांची कचरा गोळा करतानाची किंवा वर्गीकरण करतानाची अवस्था आपण बघितली तर ओला व सुका कचरा वेगळा करुन देणे तसेच प्रत्येक भागातील कचरा त्याच भागात जिरविण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे”
आमदार मेधा कुलकर्णी यांनी ” कचऱ्याची समस्या गंभीर असुन जर परदेशात कचऱ्याची विल्हेवाट लागू शकते व तेथील नागरिक त्यांचा कचरा वर्गीकरण करुन देउ शकतात तर आपण का नाही असा सवाल उपस्थित करुन पुणेकर नजीकच्या काळात हे करुन दाखवतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच प्लॉस्टिक कचऱ्याची समस्या मोठी असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे नमूद करुन सूस रोड येथील कचरा विघटन प्रकल्पाचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या की हा प्रकल्प आधीच्या सत्ताधाऱ्यांनी उभारला पण तो उभारताना तेथील नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा विचार न करता उभारला ,आता तेथे घाण वास आणि रोगराई चा प्रसार होत असुन प्रकल्प उभारताना त्याचा नागरिकांच्या अनुषंगाने विचार होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की ” माझा प्रभाग हा झीरो गारबेज प्रभाग करण्याकडे मी प्रयत्नशील असुन जैववैद्य्कीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लॉस्टिक कचरा संकलन मोहिमेद्वारे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.ही मोहिम एक दिवसाची नसून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून ई कचरा देणाऱ्या सोसाय्ट्याना श्री रिसायकलर्स चे विनीत बियाणी हे त्या वजनाइतक्या वजनाचे पर्यावरणपूरक एल ई डी बल्ब आणि ट्युबलाईट देणार आहेत,तर मे क्लीन गारबेज मॅनेजमेन्ट चे ललित राठी हमी भावाने प्लॉस्टिक कचरा विकत घेणार असून यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे वर्गीकरण करुन ते देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अस्रे आमच्या सर्वे मधे दिसून आले आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक व आमदार मेधा कुलकर्णी यांना पर्यावरणपूरक बल्ब,कचरयापासून बनविलेल्या कुंड्या,आयुर्वेदीक रोप व पुस्तके देउन श्री रिसायकलर्स चे श्री विनित बियाणी व सुरेश लखोटिया यांनी सन्मानित केले.
पाहुण्यांचे सत्कार विनोद चव्हाण,रमेश चव्हाण,गणेश चव्हाण,सौरभ अथनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन तर गणेश सोनुने यांनी आभार प्रदर्शन केले.हॅपी कॉलनी परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संखयेनी उपस्थित होते.

गो हिंसा थांबवावी – डॉ सुब्रमण्यम स्वामी

0

पुणे- लवकरच गाय ही राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावी म्हणजे गायीचे रक्षण राष्ट्रीय रक्षण होईल , गो हिंसा थांबवावी असे आवाहन डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले .

विराट हिंदुस्थान संगम आणि इस्कॉन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिराच्या प्रांगणात डॉ सुब्रमण्यम स्वामींच्या उपस्थितीत गो विज्ञान परिषद आयोजित करण्यात आलेली होती.
या परिषदेसाठी पुणे आणि परिसरातील ७००हुन अधिक गो प्रेमींनी उपस्थिती लावली.
भारतीय देशी गायींचे संगोपन,जतन, अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व ,सेंद्रिय शेती तसेच विविध व्याधींवर उपयोग , उपचार तसेच गायींचे ग्रामीण उत्थानासाठीचे महत्व या विषयांवर चर्चा झाली.
परिषदेत प्रख्यात लेखक श्री सहदेव दास, गुजरातचे प्रसिद्ध गोपालक श्री गोपाळ सुतारिया, भाजपच्या प्रवक्त्या सुश्री श्वेता शालिनी, डॉ अभिषेक कुकेमनी, श्री संदीप संघवी  या प्रभूतींनी मार्गदर्शन केले.
परिषदेची सुरुवात श्रीरूप गोस्वामींच्या हस्ते गो पूजनाने झाली. डॉ स्वामी यांनी आपल्या भाषणात पाश्चात्य देश आपल्या योगांचं जसा अनुकरण करत आहेत तसेच लवकरच भारतीय वंशाच्या गो रक्षणाचा देखील कित्ता गिरवतील असे म्हणाले किंबहुना आपण आपल्या संस्कृतीचे म्हणजे आपल्याच देशी भारतीय गायींचे रक्षण करण्यात जी कमतरता दाखवत आहोत त्यावर प्रहार केला. आधीच्या सरकाराने  हेतुपुरस्सर  केलेल्या भारतीय गो वंशाचा अतोनात नुकसान याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पुढे तरी किमान गो हत्या विषयात कडक कायदे करण्यासंबंधी सूचना केल्या , तसेच याचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे सूतोवाच केले.

भारतीय गाय एक साधारण प्राणी नसून भारतीय संस्कृतीचे आणि मनुष्यजातीचे मूळ प्रतीक असून याचे संरक्षण हे जातीयवादी नसून मनुष्यवाद असल्याचे सांगितले. गौहत्याबंदी ही हिंदुत्ववादी च्या रक्षणासाठी नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे. जसे मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच गाय हा राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी त्यांनी केली ह्या मुळे मग ही राष्ट्रीय संरक्षणाची जबाबदारी होईल .
कार्यक्रमात डॉ स्वामींच्या हस्ते श्री प्रमोद जगताप – गोपालन , श्री मिलिंद एकबोटे -गो रक्षण , पुणे पंजरापोलचे श्री बोथरा आणि श्री रांका- गो संवर्धन, डॉ माने –  गो चिकित्सा यांनी या विषयांत केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय भोसले यांनी केले. इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष श्री गुरुचरण प्रभू , डॉ जनार्दन चितोडे -सेक्रेटरी गो विज्ञान परिषद , प्रसाद कारखानीस -इस्कॉन चे प्रवक्ते तसेच  विराट हिंदुस्थान संगम चे जनरल सेक्रेटरी जगदीश शेट्टी , प्रदेश अध्यक्ष् डॉ अजय संख्ये , सुश्री राजलक्ष्मी जोशी, श्री राजीव हरसोरा, पुणे विभाग प्रमुख मिलिंद भावसार, शंतनू नंदगुडे इतर उपस्थित होते.

गश्मीर महाजनीच्या जीआरएम डान्स स्टुडियोच्या वार्षिक समारंभाला उत्स्फुर्त प्रतिसाद

0

मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने २००० साली पूण्यामध्ये त्याचा डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी ह्या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. ज्याला स्टुडियोच्या विद्यार्थ्यांसह पूणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पूण्याचे यशवंतराव नाट्यगृह तर उत्साही डान्सप्रेमींनी नुसते भरून गेले होते.

गश्मीर महाजनी त्याच्या डान्स स्टुडियोच्या विद्यार्थ्यांचे मेकअप-हेअर-एक्सेसरीज-कॉस्च्युम, परफॉर्मन्सेससाठीचे प्रॉप्स ते कार्यक्रम आयोजित करताना उभारावे लागणारे सेट्स-लाइट्स असं सगळं जातीने पाहत होता. यशवंतराव नाट्यगृहात आयोजित होणारा हा वार्षिक समारंभ भव्य आणि लॅविश करण्यावर त्याचा भर दिसून येत होता.  कथ्थक पासून ते बॉलीवूड डान्स नंबर आणि हिपहॉपपर्यंत सर्व डान्स प्रकार ह्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. पूण्यातल्या डान्स एकेडमींमध्ये फक्त जीआरएम डान्स स्टुडियोमध्येच टॉलीवूड डान्सिंगचा वर्कशॉप घेतला जातो. त्यामूळे टॉलीवूड डान्स एक्ट वार्षिक समारंभातले मुख्य आकर्षण असते.

वार्षिक समारंभाच्या सुरूवातीला जीआरएम डान्स स्टुडियोने सीमेवर लढणा-या जवानांना, अमरनाथ यात्रेत बळी पडलेल्या यात्रेकरूंना आणि शहिदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला स्पृहा जोशी, समीर विव्दंस, सीमा देशमुख, सतीश आळेकर, असे मराठी फिल्मइंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री गिरीजा ओकने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि गश्मिर सोबत छोटासा परफॉर्मन्सही केला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो, गश्मिरचा डान्स परफॉर्मन्स. टाळ्या आणि शिट्यांच्या वर्षावात गश्मिरने त्याच्या मराठी सिनेमातल्या गाण्यांवर आणि त्याचा डान्सिंग आयडल सुपरस्टार गोविंदाच्या ‘टनटनाटन टनटन तारा’ ह्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला.

जीआरएम डान्स स्टुडियोच्या वाढत्या लोकप्रियतेमूळे गेल्या वर्षीपासून जपानी डान्सप्रेमीही ह्या एकेडमीचे विद्यार्थी झाले आहेत. बॉलीवूडच्या गाण्यावर ह्या जपानी विद्यार्थ्यांचा डान्स परफॉर्मन्स खूपच मनोरंजक होता. एकेडमीच्या सूमारे १६० विद्यार्थ्यांनी वार्षिक समारंभात परफॉर्मन्स दिला.

गश्मीर महाजनी ह्यावेळी म्हणाला की, “माझ्या ह्या डान्सिंग स्टार्सचा मला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी कोरीओग्राफी करतानाही मला खूप मजा येते. आपल्या देशात खूप प्रतिभावान कलाकार आहेत, हे ह्या विद्यार्थ्यांना शिकवताना मला लक्षात येते. अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळणेही गरजेचे असते. त्यामूळे मी हा वार्षिक समारंभ करतो. ३ ते ६० वर्षांच्या वयोगटातल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सनंतर त्यांच्या घरच्यांच्या चेह-यावरचा आनंद मला समाधान देतो.“

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास तीन लाख रुपयांचे संगणक संच व दोन लाख रुपयांचे बेंचेस प्रदान

0

पुणे-आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महाविद्यालयास  तीन लाख रुपयांचे संगणक संच व दोन लाख रुपयांचे बेंचेस प्रदान करण्यात आले .

नाना पेठमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ ,कार्यक्रमाचे अध्यक्ष  डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडियाचे  जनरल सेक्रेटरी एम. डी. शेवाळे , खजिनदार विशाल शेवाळे , पर्यवेक्षक वसंत साळवे , समन्वयक हेमलता सांगळे , महाविद्यालयाच्या प्राचार्य शशिकला गोरे , वाल्मिक जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी  आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , सध्याचे युग संगणकाचे आहे . संगणकामुळे देशाचा विकास झपाट्याने झाला . परंतु संगणकाच्या वापर चुकीचा होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत . त्यातून सोशल मीडियाचा गैरवापर थांबविला पाहिजे . त्यासाठी संगणकाच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत वाल्मिक जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. जे .के. म्हस्के यांनी मानले .

मल्टीस्टारच्या उपस्थित पार पडला “बसस्टॉपचा” प्रीमियर

0

गणराज असोशिएट्स प्रस्तुत श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित बसस्टॉप सिनेमाचा दिमाखदार प्रीमियर अंधेरीमध्ये पार पडला. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, सीमा चांदेकर सिनेमातील या स्टारकास्टने उपस्थिती लावून प्रीमियर सोहळ्याची शान वाढवली. तसेच सुयश टिळक, श्वेता मेहंदळे, रीना अग्रवाल ही स्टारमंडळी देखील यावेळेस उपस्थित होती. या सिनेमाच्या निर्मितीसाठी श्रेयश जाधव बरोबरच पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या तिघांनी देखील महत्वाची धुरा निभावली आहे.

अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
पुणे : 

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ऍड. औदुंबर खुने -पाटील (पुणे शहर उपाध्यक्ष) यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

यावेळी सुरेश पवार, शंकर शिंदे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, श्याम ढावरे, संजय दामोदरे , अशोक जाधव, शांतीलाल मिसाळ  उपस्थित होते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने बालवाडी व आधारकेंद्रात खाऊ वाटप 
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघ तर्फे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर उपाध्यक्ष ऍड. औदुंबर खुने- पाटील, ‘ज्येष्ठ नागरिक सेल’चे दादा सांगळे, कार्यालयीन सचिव संजय गाडे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.
इंदिरानगर लोअर, प्रेमनगर वसाहत येथील बालवाड्या तसेच आंबेडकरनगर मार्केट यार्ड येथील आधार केंद्र येथे हा कार्यक्रम झाला. मृणालिनी मदन वाणी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
यावेळी संयोजिका मृणालिनी मदन वाणी, वैशाली खोपडकर, विद्या गायकवाड, राधिका नवले, नागमनी वनमाला, शाहीन शेख, सुपेकर ताई आदी उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथे वृक्षारोपण 
 
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने वास्तूनगर , मार्केट यार्ड येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदारसंघ महिलाध्यक्ष मृणालिनी मदन वाणी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

मारूती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीमध्ये सुुरेश राणा व आश्‍विन नाईक यांना विजेतेपद

0

पुणे- दक्षिण भारतांतील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिष्ठित रॅली मारूती सुझुकी दक्षिण डेअर या रॅलीच्या 9व्या मालिकेत अल्टीमेट कार्स गटात टीम मारूती सुझुकीच्या सुरेश राणा आणि आश्‍विन नाईक यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, अल्टीमेट बाईक्स गटात टी नटराज याने विजेतेपद पटकावले.

संपूर्णपणे नव्या मार्गाचे आव्हान स्वीकारणाऱ्या नव्या रॅलीतील स्पर्धकांना चित्रदुर्ग आणि बेळगाव या दक्षिण भारतातही आव्हानात्मक निसर्गाचा अनुभव मिळाला. त्यांनंतर प्रथमच पश्चिम भारतात कोल्हापूर मार्गे प्रवेश करताना त्यांनी पुणे येथे अंतिम रेषा ओलांडली.  त्याआधी गेल्या रविवारी बंगळूर येथे सुरु झालेल्या सहा दिवसीय या रॅलीत 180 स्पर्धकांनी 2000किलोमीटरचे अंतर कापून अजिंक्यपदासाठी आपले कौशल्य पणाला लावले.

या रॅलीच्या यशाबाबद्दल बोलताना मारुती सुझुकीच्या विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष तरुण दुर्ग म्हणाले कि, गेल्या 9 वर्षापासून दक्षिण डेअर रॅलीने भरघोस यश मिळवले असून दक्षिण भारतात पाय रोवले आहेत. देशातल्या सर्वाधिक अंतराच्या रॅलीत सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग हा त्याचा पुरावा आहे. तसेच रॅलीच्या विविध ठिकाणी मिळालेला प्रतिसाद हा या स्पर्धेच्या लोकप्रियतेची पावती आहे.

स्पर्धेत अल्टीमेट कार्स गटात टीम मारूती सुझुकीच्या सुरेश राणा व आश्‍विन नाईक यांनी ग्रँड विटारा ब्रेझा कार चालवत 10तास 11 मिनिटे 26 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, सम्राट यादव व एस.एन.निझामी यांनी दुसरा व संदीप शर्मा व करण आर्या यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करतांना सुरेश राणा याने सांगितले कि, मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीचे आमचे सलग दुसरे विजेतेपद आहे. नव्या आणि आव्हानात्मक मार्गाने जाताना वाहनाबरोबर सामंजस्य राखणे अतिशय महत्वाचे असते. यावर्षी नव्याने सहभागी होणाऱ्यांसाठी हि रॅली अधिक आव्हानात्मक होती.

अल्टीमेट बाईक्स गटात टी नटराज याने 6तास 12 मिनिटे 38 सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. अब्दुल वाहिद व संजय कुमार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. एन्ड्युरन्स कार्स(टीएसडी)गटात सुबीर रॉय व निरव मेहता यांनी स्विफ्ट गाडी चालवत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. कार्तिक मारूती व शंकर एस आनंदने एस क्रॉस गाडी चालवत दुसरा क्रमांक पटकावला.   रघु नंदन व प्रकाश एम यांनी तिसरा क्रमांक पटकवला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकालः प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसारः

अल्टीमेट कार्स्ः 1. सुरेश राणा व आश्‍विन नाईक(10ः11ः26से); 2. सम्राट यादव व एस.एन.निझामी(10ः14ः52से), 3. संदीप शर्मा व करण आर्या(10ः24ः17से);

अल्टीमेट बाईक्स्ः 1. टी नटराज(06ः12ः38से), 2. अब्दुल वाहिद(06ः15ः37से), 3.संजय कुमार(06ः26ः53से);

एन्ड्युरन्स कार्स्(टीएसडी)ः 1.सुबीर रॉय व निरव मेहता(00ः12ः20से), 2.कार्तिक मारूती व शंकर एस आनंद(00ः12ः45से); 3. रघु नंदन व प्रकाश एम(00ः12ः49से);

नदीपात्रालगतच्या सोसायटींची पाहणी ..

0

पुणे-खडकवासल्यातील पाणी विसर्गामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन PI विष्णू जगताप व मनपा अधिकारी यांच्यासमवेतनदीपात्रजवळ असलेल्या सोसायटीची पाहणी केली .
विठ्ठलवाडी, आनंदनगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये, धरणातून होणाऱ्या वाढत्या विसर्गामुळे, नदीचे पाणी शिरण्याचा संभाव्य धोका आहे । यामुळेच, सौ.नागपुरे आणि अधिकाऱ्यांनी, अश्या धोका असणाऱ्या सोसायट्यांमध्ये जाऊन, लोकांना काळजी घेण्याची आव्हान केले तसेच संभाव्य धोक्यामध्ये कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले । पोलीस तसेच मनपा प्रशासनाला देखील सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या ।
यावेळी दीपक नागपुरे, निरंजन कोळी, प्रणव कुकडे, विनय मानकर, सौरभ मंडावले, मंगेश बुजवे, सौ.रासकर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते

शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीचे शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
पुणे- महानगर पालिके तर्फे शहराला “२४ तास एकसमान पाणीपुरवठा” योजने अंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन आज करण्यात आले. शिवाजीनगर मतदार संघातील फर्ग्युसन कॉलेज मधील टेकडीच्या पायथ्याशी खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अत्यंत तत्परतेने टाक्या बांधण्याचे निश्चित करून त्याचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महापौर, सर्व नगरसेवक ह्यांचे अभिनंदन करतानाच शिरोळे ह्यांनी महाड दुर्घटनेतील पुलाची नव्याने केलेली उभारणी विक्रमी वेळेत पूर्ण करतानाचे उदाहरण दिले. नागरी सुविधा देताना त्या उत्कृष्ट दर्जाच्या, वेळेत पूर्ण करून द्याव्यात अशी अपेक्षा शिरोळे ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली.
ह्या वेळी घोले रोड प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका स्वाति लोखंडे, नीलिमा खाडे, रविंद्र साळेगावकर, संदीप काळे, सुनील पांडे, भावना शेळके, सुप्रिया खैरनार व महानगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.