Home Blog Page 3307

लोकसंख्या अभियानातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्रध्दा हकानी प्रथम

0

पुणे- “लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यांवर बोलले जाते. शिवाय जैविक पातळीवर मात्र चर्चा केली जातच नाही. अशी चर्चा झाल्यास लोकसंख्या वाढीचा भस्मासूर रोखण्यास मदत होईल.” असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. लोकसंख्या अभियानद्वारा लोकसंख्या वाढ : शाप की वरदान या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, मेजर जनरल शशिकांत पित्रे, माईर्स एमआयटीचे संस्थापक सहविश्‍वस्त प्रा.प्रकाश जोशी, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के. क्षीरसागर, प्रा.सुधीर राणे, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.एम.चिटणीस, प्रा. आबाळे आणि प्रा. देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एमआयटी फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी श्रद्धा हकानी हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिला 15 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. मिटकॉम कॉलेजची विद्यार्थिनी निशा भंडारीस द्वितीय पारितोषिक मिळाले. तिला 10 हजार रोख व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तृतीय पारितोषिक एमएसीएस कॉलेजची मान्या सिंगला मिळाले. 5 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विश्‍वंभर चौधरी म्हणाले, “जो वक्ता आपल्या भाषणाची सुरूवात खर्जात करून त्याचा शेवट तार सप्तकात करतो तोच वक्ता उत्तम ठरतो. भाषणासाठी आशय आणि अभिव्यक्ती हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असले, तरी भाषण श्रवणीय असणे अत्यंत आवश्यक आहे. भाषणाच्या वेळी काही तंत्रे पाळावी लागतात. सभागृहाची व्याप्ती बघुन आपला आवाजाची उंची ठरवावी लागते. समोर असणार्‍या माईकशी 20 सेकंदामध्ये जो जुळवून घेऊ शकतो तोच प्रेक्षकांशी उत्तम संवाद साधू शकतो. कित्येकदा आशय भरपूर असतो पण अभिव्यक्तीमध्ये काही जण कमी पडतात. तर काही ठिकाणी ही परिस्थती उलटी पाहायला मिळते.”
शशिकांत पित्रे म्हणाले, “आजच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच सकारात्मक विचार, स्वयंप्रेरणा आणि वेळेचे नियोजन करणे देखील तितकेच आवश्यक आहे.”
प्रा. प्रकाश जोशी म्हणाले, “जोपर्यंत महिलांमध्ये शिक्षणाबाबतीत जागरुकता निर्माण होत नाही, तोपर्यंत लोकसंख्येसारख्या विषयावर जनजागृती होणार नाही. शासनाद्वारा कुटुंब नियोजनासाठी दिला जाणारा निधी जर 4 हजारावरून 20 हजार रुपये केला तर नक्कीच काही सकारात्मक बदल दिसून येतील.”
कुमार यश यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर राणे यांनी आभार मानले.

बालगंधर्वमध्ये रंगला पैठणी फॅशन शो आणि रॅम्प वॉक

0

पुणे :

पैठणीच्या इतिहासाच्या  किश्श्याना गाण्यांची सुरेल साथ ,महिला कलाकारांचा पैठणी रॅम्प वॉक ,सणावारांच्या गीतांवरील नृत्ये ,बेटी बचाओ -बेटी बढाओ ‘ चा संदेश आणि ऑटिझम बालकांच्या साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञ सन्मान अशा वातावरणात ‘पदरावरील शब्द गुंफण ‘ हा कार्यक्रम गाजला !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायन क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘गंधार ‘ एंटरटेनमेंट , भाजपच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘अभियानाच्या संयोजिका उषा वाजपेयी, महक, सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने ‘पदरावरील शब्द गुंफण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

बुधवारी सायंकाळी  बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ५० कलाकारांच्या साथीने नृत्य, नाट्य, संगीत, पैठणी फॅशन शो, रॅम्प वॉक असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

उदघाटन प्रसंगी उषा बाजपेयी (बेटी बचाओ, बेटी पढाओ,प्रदेश समन्वयक ), निश्चल लताड , राजेश दातार ,मनीषा लताड ,शीतल रुद्रवार , राजीव गुप्ते ,मुकुंद वर्मा    ,   आदी उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान ‘आरंभ ऑटिझम’ संस्थेच्या अंबिका टाकळकर ,तसेच ऑटिझम बालकांच्या समुपदेशनासाठी कार्यरत दया इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन शीतल देशपांडे यांचे होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रेषित रुद्रवार ,शोभा कुलकर्णी यांनी केले. मनीषा लताड,शीतल सरताज ,शीतल रुद्रवार,संदीप पाटील,गफार मोमीन  आणि ५० कलाकारांनी सहभाग घेतला . संगीत संयोजन प्रसन्न बाम यांचे होते तर  नृत्य दिग्दर्शन रोहित महाजन यांचे होते .

इंटरनॅशनल टायगर्स डेच्या निमित्ताने वेस्टएंड टायगर ट्रेल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन

0
 पुणे,- इंटरनॅशनल टायगर्स डेच्या निमित्ताने शुक्रवार २८ जुलै ते ३० जुलै दरम्यान वेस्टएंड मॉल आणि जर्नीज यांच्या संयुक्त विद्यमाने वेस्टएंड टायगर ट्रेल ह्या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  औंधच्या वेस्टएंड मॉल मध्ये दुपारी १२ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत  हा कार्यक्रम चालणार आहे.
 सेव्ह टायगर्स मोहिमेला समर्थन देत देशात वाघांनविषयी जागरूकता निर्माण करणे, टायगर टूरिझमला चालना देणे, वाघांचे रक्षण आणि ह्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कार्यरत  संस्थानांना आर्थिक साहाय्य करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्येश्य आहे.
ह्या कार्यक्रमात तीन दिवसीय टायगर फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे, ज्यामध्ये वाघांचे खास फोटो काढणार्या देशभरातील व्यवसायिक आणि हौशी फोटोग्राफर्सना निमंत्रित केले आहे.
विजेत्यांना पुसस्कार व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात येईल. फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो प्रदर्शनातं विक्रीसाठी ठेवले जातील व यातून मिळणारे उत्पन्न पन्ना टायगर रिझर्व्हला डोनेट करण्यात येईल.
 लहान मुलांसाठी  ही एक सुवर्ण संधी आहे. त्यांना २९ जुलै, २०१७ रोजी वाघ चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ह्यात मुलांना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये शाहरूख आणि अनुष्काची धम्माल

0

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची, त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळींची हवा आता बॉलिवुडमध्येही जोरदार वाढत आहे. या मंचावरुन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी हिंदीतील स्टारही हजेरी लावत आहेत. आजवर हिंदीतील अनेक बड्या मंडळींनी या कार्यक्रमात सहभागी होत यातील कलाकारांसोबत धम्माल उडवून दिली होती. गेल्यावर्षी  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या ‘फॅन’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी बॉलिवुडचा किंग शाहरुख खानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. थुकरटवाडीकरांची एनर्जी आणि उत्साह बघून तो त्यावेळी भारावून गेला होता आणि पुन्हा या कार्यक्रमात येण्याची इच्छाच व्यक्त नव्हती केली तर तसं वचनही त्याने दिलं होतं. आता पुन्हा एकदा आपल्या जब  हॅरी मेट सेजल या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखने थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी शाहरुख एकटाच आला नाही तर त्याच्यासोबत या चित्रपटाची मुख्य नायिका अनुष्का शर्माही होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. चला हवा येऊ द्याचे हे दोन भाग प्रसारित होणार आहेत.

 

किंग खान आणि अनुष्काचं मराठमोळं रुप

मुळचा दिल्लीचा असलेला शाहरुख आता पक्का मुंबईकर झालेला आहे. मराठी पदार्थ, मराठी भाषा, मराठी  चित्रपट नाटक याबद्दल त्याला कायम आकर्षण आहे आणि तो हे नेहमी बोलून दाखवतो. त्याचं हेच मराठी प्रेम या कार्यक्रमातही बघायला मिळणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ मराठी माणसानेच रोवली त्यानंतर आलेला प्रभातचा काळ म्हणजे मराठी चित्रपटांचं सुवर्णयुगच.. मराठीच्या याच सुवर्णयुगाला मानाचा मुजरा करण्यासाठी शाहरुखने कुंजवनाची सुंदर राणी, माळ्याच्या मळ्यामंदी, तुझ्या रुपाचं पाखरु वेल्हाळ आणि गोविंदा रे गोपाळा या गाण्यांवर अनुष्काच्या सोबतीने नृत्य सादर केलं. याशिवाय निलेश साबळेसह नटसम्राटमधील स्वगतही सादर केले. शाहरुखच्या या मराठमोळ्या रुपात अनुष्काही सामिल झाली आणि तिनेही ‘ती फुलराणीचा’ ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी तिने  साडी, गजरा असा खास मराठमोळा साज परिधान केला होता.

 

शाहरुखने केलं चला हवा ये द्याच्या कलाकारांचं कौतुक 

थुकरटवाडीकरांचा सिनेमा हा या कार्यक्रमाचं आकर्षणबिंदू असतो. याही भागात ‘बाजीगर’ या चित्रपटाची आपली खास आवृत्ती या मंडळींनी सादर केली आणि शाहरुखने त्याला खळखळून दाद दिली. लिखाणापासून अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत हे कलाकार  धम्माल असून त्यांची एनर्जी दाद देण्यासारखी आहे. या  स्किटमध्ये भाऊ कदमने साकारलेला शाहरूख बघून आपण आपली स्टाईल विसरुन गेलो अशी दादही किंग खानने यावेळी दिली.

एकंदरीत धम्माल मजा मस्तीने सजलेले चला हवा येऊ द्याचे हे दोन्ही भाग प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणार आहेत. येत्या सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन हे प्रसारित होतील.

बीएमसीसीत ‘कारगिल विजय दिन’ साजरा

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘कारगिल विजय दिना’निमित्त सुमेधा चिथडे यांचे ‘कारगिल विजयाची रोमहर्षक कथा’ या विषयावरील सदीप व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या होत्या. प्रत्येक भारतीयाने देशभक्तीला महत्व दिल्यास सैनिकांच्या शौर्याला मोठी मदत होईल असे मत श्रीमती टिळक यांनी यावेळी व्यक्त केले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशिष पुराणीक यांनी संयोजन केेले. ‘सिर्फ’ संस्थेचे सहकार्य लाभले.

तिस-या सुहाना लक्ष कॉर्पोरेट महिला बॅडमिंटन अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत व्हेरीटास ड संघाचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0

पुणे- सुहाना प्रविण मसालेवाले व लक्ष स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या संलग्नतेने आयोजित तिस-या सुहाना लक्ष कॉर्पोरेट महिला बॅडमिंटन अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत व्हेरीटास ड संघाने टॉमटॉम संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

मॉडर्न स्पर्टस कॉम्पेक्स्, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत संघिक गटात व्हेरीटीस ड संघाने टॉमटॉम संघाचा २-० असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. एकेरीत व्हेरीटीस ड संघाच्या श्रीपुर्णा मित्राने टॉमटॉम संघाच्या साई श्रुजना ए.व्ही हीचा २१-८, २१-८ असा सहज पराभव केला. तर दुहेरीत गरिमा शर्मा व श्रीपुर्णा मित्रा यांनी स्नेहा देशपांडे व सायली चौधरी यांचा २१-९, २१-८ असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

एकेरी गटात दुस-या फेरीत केपीआयटीच्या गंधाली सोपलने सिटी कॉर्पोरेशनच्या रुची वाहलचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत आगेकुच केली. ऑलस्टेटच्या बिंदू सिंगने गॅलाघरच्या शाश्वती दत्ताचा २१-१९,२१-१२ असा पराभव केला. अॅमडॉक्स्‌च्या गायत्री प्रियदर्शनीने व्हेरीटासच्या श्रीपुर्णा मित्राचा २१-१९, ८-२१,२१-१३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. तर शिखा जोशीने परसिस्टंटच्या रेश्मा लुथ्राचा २१-११, २१-१४ असा पराभव करत आगेकुच केली. टीसीएसच्या राधिनि भांम्रेने गॅलाघरच्या हिमांद्री चावडाचा २१-३, २१-६ असा तर दिती महादेवकरने बीएनवाय मेलनच्या शिल्पा निलेशचा २१-३,२१-३ असा पराभव केला. छेलारामच्या रुचा कुलकर्णीने डीएसटीच्या देवश्री अगरवालच्या २१,१४,२१-१४ असा तर ओरॅकलच्या वर्षा गुप्ताने व्हेरीटासच्या चेतना अगरवालचा २१-८, २१-५ असा पराभव केला. केपीआयटीच्या प्रियांका जोशीने छेलारामच्या निकिता राजपुतचा २१-११, २१-६ असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धचा सविस्तर निकालसंघिक गटपहिली फेरी

व्हेरीटीस ड वि.वि टॉमटॉम २-०(एकेरी- श्रीपुर्णा मित्रा वि.वि साई श्रुजना ए.व्ही २१-८, २१-८; दुहेरी- गरिमा शर्मा/श्रीपुर्णा मित्रा वि.वि स्नेहा देशपांडे/सायली चौधरी २१-९, २१-८)

सिटी कॉर्पोरेशन वि.वि व्हेरीटास क २-०(एकेरी- रुची वाहल वि.वि आस्मिका देशमुख २१-७, २१-३; दुहेरी- रुची वाहल/मेघना अस्लेकर वि.वि चेतना अगरवाल/नलिनी डी.ई २१-४, २१-०)

टीसाएस अ वि.वि व्हेरीटास ब २-०(एकेरी- राधिनि भांम्रे वि.वि प्रांजली इंगोले २१-०, २१-१; दुहेरी- राधिनि भांम्रे/धनश्री दाबीर वि.वि पुजा जाधव/प्रांजली इंगोले २१-०, २१-३)

 

एकेरी गटदुसरी फेरी

गंधाली सोपल(केपीआयटी) वि.वि रुची वाहल(सिटी कॉर्पोरेशन) २१-१६, २१-१५

बिंदू सिंग(ऑलस्टेट) वि.वि शाश्वती दत्ता(गॅलाघर) २१-१९,२१-१२

गायत्री प्रियदर्शनी(अॅमडॉक्स्‌) वि.वि श्रीपुर्णा मित्रा(व्हेरीटास) २१-१९, ८-२१,२१-१३

शिखा जोशी(अॅमडॉक्स्‌) वि.वि रेश्मा लुथ्रा(परसिस्टंट) २१-११, २१-१४

रुचा कुलकर्णी(छेलाराम) वि.वि देवश्री अगरवाल(डीएसटी) २१,१४,२१-१४

राधिनि भांम्रे(टीसीएस) वि.वि हिमांद्री चावडा(गॅलाघर) २१-३, २१-६

वर्षा गुप्ता(ओरॅकल) वि.वि चेतना अगरवाल(व्हेरीटास) २१-८, २१-५

दिती महादेवकर(टीसीएस) वि.वि शिल्पा निलेश(बीएनवाय मेलन) २१-३,२१-३

प्रियांका जोशी(केपीआयटी) वि.वि निकिता राजपुत(छेलाराम) २१-११, २१-६

हर्षनाभुती चौहान(टीसीएस) वि.वि रिचा अहूजा(अॅमडॉक्स्‌) २१-१६,२१-११

शेफाली शेट्टी(सिटी) वि.वि अंजली अरोरा(परसिस्टंट) २१-१०, २१-१२

मनाली कुलकर्णी(विप्रो) वि.वि दिती महाडीकर(सिमेंस) २१-१, २१-०

प्रस्थापितांचे विरुद्ध जाऊन महात्मा फुले यांनी शिक्षण सुरु केले -उपमहापौर डॉ.धेंडे

0

पुणे: राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे  उद्यान प्रसाद कार्यालय,पुणे येथे
इ.१० वी चे १६४ विद्यार्थी,१२ वी चे ४७ विदयार्थी आणि MPSC/UPSC ५ विदयार्थी असे एकुण २१६ गुणवंत ओबीसी
विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी उपकुलगुरू डॉ.एस.एन.नवलगुदकर,
उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे,उपमहापौर,हस्ते संम्पन्न झाला याप्रसंगी कृष्णकांत कुदळे व कुमार आहेर
यांना महाराष्ट्र शासनाचा  पुरस्कार मिळाला म्हणून विशेस सन्मान करण्यात आला तर मान्यवरांना,महात्मा फुले
व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ,महात्मा फुले उपरणे पुस्तक संच आणि रघुनाथ ढोक यांचे महात्मा फुले व
सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यानाही सन्मानचिन्न प्रमाणपत्र ,ग्रंथ भेट दिले.
यावेळी पुण्यनगरीचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे म्हणाले कि महात्मा फुले यांनी त्यावेळी प्रस्थापिंतांचे
विरुद्ध जाऊन मागास ,अस्पृश्य आणि महिलांसाठी प्रथम शिक्षण सुरु करून शेवट पर्यंत प्रयत्न केला .
डॉ.आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानले आणि बाबासाहेब यांनी देखील त्याच प्रमाणे विविध घटकांचा विचार करूनच
भारतीय राज्यघटना लिहिली. तरी देखील आज पण तळागाळातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळत नाही , पुरेसे
शिकविणारे शिक्षक नसतात हे मी उपमहापौर म्हणून मनपा ,महात्मा फुले शाळेत नुकतेच भेट दिली असता पहिले आहे.ते
पुढे असे पण म्हणाले किखऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन घडविण्यासाठी विविध संघटनेने एकत्र येऊन जातीव्यवस्था मोडीत
काढण्याचा प्रयत्न करावा.
सत्कार प्रसंगी एका मुलीने आम्ही गुणवंत असताना जातीचा अडसर निर्माण होऊ नये असे उद्गार काढले.तर mpsc चे
विद्यार्थी प्रमोद कुदळे (DYSP),ज्ञानेश्वर दुरगुडे(कृषी मंडळ अधिकारी) यांनी आतापासूनच सपर्धा परीक्षा विचार मनात
ठेऊन पुढील वाटचाल करा म्हंटले
अध्यक्षीय भाषणात डॉ.नवलगुंदकर म्हणाले कि अभ्यासाबरोबर विद्यार्त्यानी महापुराषांचे तसेच इतर चांगली पुस्तके
वाचून मोठी ध्येय उराशी बाळगावी म्हणजे यश आपल्या मागे येईंल ,आई वडिलांची सेवा करा ,गुरुजानाचा मान राखा
आणि महत्त्वकांशी बना असा मौलीक सल्ला दिला.

डॉ.प्रल्हाद वडगांवकर  म्हणाले कि १९८० पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी साठी काम
करीत आहे ,लवकरच दिल्ली येते ओबीसी अधिवेशन घेणार आहोत, तसेच सरकारने बोगस जातीचे दाखले
मिळविण्यारांवर योग्य कारवाई करावी असे म्हंटले.या कार्यक्रमास विश्व नागरी पतसंस्था,श्री सुधाम धाडगे, सुशील
घोडके ,ठाणे चे रमेश जाधव ,संदीप कुदळे यांनी मोलाचे सहकार्य केले सुत्रसचालन प्रो.गायत्री लडकत तर सुरवातीला
सूड कादंबरी आधारित जानकी या नाटकातील तरुणांनी श्रीमुक्तीवादी नाटक सदर केले तर फुले शाहू आंबेडकर यांचे
जीवनावर प्रो.राखी रासकर यांनी गीत गायिले आणि आभार प्रदर्शन सरचिटणीसरघुनाथ ढोक यांनी मानले.यावेळी
मोठ्या संख्येने ओबीसी समाज आणि विविध समाजाचे प्रतिनिधी हजर होते.

दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्यामुळे अनुदान आणि मराठी सिनेसृष्टीला बहर … (व्हिडीओ)

0

पुणे- महेश मांजरेकर आणि काही मातब्बर मराठी चित्रपटांना अनुदान देण्यास विरोध दर्शवित असताना अनेकवेळा दिसून आले आहे . …. काल येथे प्रसिद्ध कवी आणि माजी आमदार यांनी मात्र मराठी चित्रपटांना हिंदीशी स्पर्धा करायची असेल तर शासनाने त्यांना किमान ४० लाखाचे अनुदान द्यायला हवे अशी मूळ कल्पना हिंदी मधील ख्यातनाम आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनीच मांडली होती . आणि त्यांच्यामुळेच आज मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपटांची  बहार आली आहे हे नमूद केले .
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते . अभिनेते मनोज जोशी ,पुष्कर श्रोत्री.,लीला गांधी,जयमाला इनामदार,सुहासिनी देशपांडे ,मृणाल कुलकर्णी ,चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले , संजय ठुबे ,मिलिंद लेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला .सुमित कॅसेट चे सुभाष परदेशी, दिग्दर्शक कांचन नायक,लेखक श्रीनिवास भणगे,संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासह 17 कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री वर्षा  उसगावकर, पूजा पवार , अभिनेता मयूर लोणकर ,अभिनेत्री
सुरेखा कुडची ,वैशाली जाधव,तेजस्विनी लोणारी आदी कलाकारांच्या नृत्यविष्काराने सोहळ्यात रंगत आणली .अथर्व कर्वे,योगेश सुपेकर ,शर्वरी जेमनीस,सुशांत शेलार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

पहा या सोहळ्याची एक व्हिडीओ झलक …..

पुण्यात होतोय … जिवाशी खेळ ….(व्हिडीओ)

0

पुणे- खडकवासला धरणातून  मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर शिवणे गावातुन नांदेड गावाकडे जाण्यासाठीचा जोड पुल पुन्हा एकदा मुठेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पाण्याखाली गेला असून, त्यामुळे नांदेड गाव आणि परीसरातुन शिवणेमध्ये येणाऱ्या नागरिकांना  लांब फिरून जाण्याची वेळ येत असते
पुलाचे संरक्षक  दगड जरी पाण्याखाली गेले नसले तरी पाण्याला वेग मात्र आहे असे असताना देखील काही नागरिक, वाहनचालक लांबचा फेरा आणि वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून पूल ओलांडत आहे . धोका पत्करून होणारी हि वाहतूक जागेवर गमतीने घेतली जात असली तरी हे धाडस मात्र अनेकांना महागात पडणारे ठरू शकते .

कुणालकुमार यांची एल अँड टी या कंपनीसाठी का अट्टाहास आणि घाईगडबड – आबा बागुल

0
जीएसटीच्या पार्श्वभूमीवर समान पाणीपुरवठा
 योजनेसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया अपरिहार्य
 
  १ हजार कोटी  रुपयांपर्यंत बचत शक्य  
 
पुणे- एकीकडे तुकाराम मुंडेंशी वाजलेले असताना माजी उपमहापौर अबा बागुल यांचे आता महापालिका आयुक्त कुणालकुमार यांच्याशी ही खटके उडत आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत आबा बागुल यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देण्यास औक्त उपस्थित राहिले नाहीत आणि प्रशासनाची पाचावर धारण बसली . अशा स्थितीत आता २४ तास पाणीपुरवठा योजनेत कुणालकुमार आणि एल अँड टी या कंपनीत काही तरी गौडबंगाल असल्याचे आबा बागुल आणि कॉंग्रेस जणांना संशय आहे . आज या संदर्भात आबा बागुल यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रक खाली वाचा जसेच्या तसे …….
शहरासाठी समान पाणी पुरवठा योजनेसाठी एल अँड टी या कंपनीची जादा दराची आलेली निविदा ही  पालिकेच्यादृष्टीने हितावह नाही. वास्तविक २६ टक्क्यांपेक्षा अधिक दर  असलेल्या या निविदेमुळे पालिकेचे व्याजासह सुमारे १ हजार कोटी  रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान होणार आहे,हे आपण प्रथम लक्षात घ्यावे. दुसरी महत्वाची बाब अशी कि  एकीकडे पारदर्शक कारभाराचा दाखला द्यायचा आणि जीएसटी लागू होऊन सुद्धाही एल अँड टी या कंपनीच्या निविदेला प्राधान्य देण्याचा घाट घातला जात आहे, त्यासाठी जी घाईगडबड सुरु आहे त्याबाबत संशय निर्माण झाला आहे. मुळात जीएसटी लागू झाल्यामुळे विभागीय दरपत्रकात (डीएसआर)  मोठे बदल होणार आहेत साहजिकच  या योजनेवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे आता फेरनिविदा काढणे अपरिहार्य आहे. साहजिकच २८०० कोटी रुपयांच्या या योजनेसाठी आता नव्याने इस्टिमेट तयार करून ते इस्टिमेट कमिटीसमोर नंतर मुख्यसभेसमोर सादर करून  नव्याने मंजुरी घ्यावी लागणार आहे.विशेष म्हणजे जीएसटीमुळे या योजनेचा खर्चही  कमी होणार आहे. असे असताना जिथे कोणत्याही विकासकामांसाठी जादा दराची निविदा आल्यास फेरनिविदा काढण्यात येतात ,एकप्रकारे स्पर्धात्मक वातावरणाला प्राधान्य दिले जाते तिथे वाढीव दराची निविदा सादर करणाऱ्या   एल अँड टी या कंपनीसाठी का अट्टाहास आणि घाईगडबड चालली आहे ? दुसरे असे की  या वाढीव दराच्या निविदेमुळे आणि कर्जरोखे व त्याचे व्याज पाहता पालिकेची आर्थिक क्षमता याचाही विचार करावा लागणार आहे.त्यामुळे जीएसटीच्या पार्श्वभूमीवर  विभागीय दरपत्रकात (डीएसआर)  मोठे बदल होणार असल्याने चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.   जेणेकरून पालिकेला आर्थिक तोटा होणार नाही आणि पुणेकरांवरही त्याचा आर्थिक बोजा पडणार नाही.तसेच पालिकेकडे निधी आणि अंदाजपत्रकात तरतूद असतानाही कर्जरोख्याद्वारे उचललेले २०० कोटींचे कर्ज तात्काळ बँकेकडे परत करावेत आणि दरमहा व्याजापोटी पडणारा दीड कोटी रुपयांची  होणारी नाहक उधळपट्टी थांबवावी.पारदर्शकतेचा गवगवा करायचा ;पण विशिष्ट कंपन्यांसाठी नियमबाह्य कृती करायची मात्र त्यामुळे पालिकेचे आर्थिक  होणारे नुकसान  याचा विचार  करीत नसाल तर आपल्याला महापालिका बरखास्त करायची आहे का ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे . 

‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये साजरा होणार ‘कारगिल विजय दिवस’

0

२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्यामध्ये सामिल होऊन देशसेवा करण्याची ओढ असलेल्या तीन तरुणांची गोष्ट झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दाखवण्यात येत आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने याही मालिकेत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या विजयासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या शहिद सैनिकांना मानवंदनाही देण्यात येणार आहे.

या मालिकेत हणमंत फौजी यांनी कारगिल युद्धामध्ये लढताना हात गमावल्याने इंफन्ट्रीकडून कारगिल विजय दिवशी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. हणमंत त्यांच्यासोबत अजिंक्यलाही घेऊन जातात. ट्रेनिंग सेंटरचं वातावरण पाहून अजिंक्य भारावून जातो. कारगिलमध्ये शहिद झालेल्या जवानांना यावेळी आदरांजली वाहिली जाते. ‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये येत्या २६ आणि २७ जुलैला म्हणजेच येत्या बुधवार आणि गुरुवारच्या भागात हा कारगिल विजय दिवस बघता येईल.

“देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार 2017”चे शानदार वितरण

0

पुणे : सदृढ लोकशाहीसाठी संवाद अत्यंत आवश्यक आहे, पत्रकार हा समाजासाठी संवादकाचे काम करत असतो. माध्यमांचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून या बदलत्या माध्यमातील तंत्रज्ञान आत्मसात करुन पत्रकारांनी कायमच सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जागरुक राहण्याचे आवाहन खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज केले.

विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या “देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार 2017”चे वितरण खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फ‍ि थिएटरमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्रा. आनंद भिडे उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ संपादक भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा व्यंगचित्रकार राजेंद्र सरग, ब्लॉग लेखक देवीदास देशपांडे यांना “देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात आले.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी समाज आणि राज्यकर्ते यांच्यात संवाद आवश्यक असतो. पत्रकार हा समाजाच्यावतीने संवादकाचे काम करत असतो. त्यामुळे संवादासाठी पत्रकार हा आवश्यक घटक आहे. पत्रकारिता हे करिअरसाठी चांगले क्षेत्र आहे. ते अधिक व्यापक आणि प्रगल्भ करण्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी पत्रकारितेतील पदवीचे किमान शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

सक्षम लोकशाहीसाठी पत्रकारांना संविधानाचा अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करताना पत्रकारांनी निर्भय होवून सत्य जगासमोर आणावे. आता माध्यमांचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. माध्यमातील हे तांत्रिक बदल पत्रकारांनी आत्मसात करुन अधिक प्रभावीपणे आपले काम पार पाडवे, अशी अपेक्षा डॉ. स्वामी यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना भाऊ तोरसेकर म्हणाले, सामान्य लोकांना अनेक गोष्टींची माहिती असते मात्र नेमकी गोष्ट लोकांना समजण्यास मदत करण्याचे काम पत्रकाराचे असते. तो आपल्या माध्यमाव्दारे लोकांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवत असतो. कोणत्याही घटनेची केवळ माहिती न देता त्या घटनेशी संबंधित जुने संदर्भ पत्रकारांनी लोकांसमोर मांडावेत. पत्रकारांनी कायम लोकांच्या हिताला प्राधान्य देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. आनंद भिडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया अत्रे यांनी केले. प्राची काळे यांनी गायलेल्‍या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते.

नगररोड परिसरात 11 वीजवाहिन्या जळाल्या

0

पुणे: नगररोडवरील एअर फोर्सच्या नाईन-बीआरडीजवळ डक्टमधील महावितरणच्या 11 वीजवाहिन्या जळाल्याने सोमवारी (दि. 24) पहाटे साडेचार वाजता सुमारे 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी 11 वाजेपर्यंत 16 हजार तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत 10 मोठे ग्राहक वगळता उर्वरित सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला आहे.

नगररोडवरील एअर फोर्स स्टेशनच्या नाईन-बीआरडीलगतच पुणे महानगरपालिकेच्या डक्टमधील महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तब्बल 11 वीजवाहिन्या आज पहाटे साडेचारच्या सुमारास जळाल्या. एका वाहिनीमधील जाईंटमध्ये स्पार्किंग झाल्यानंतर डक्टमधील कॉन्क्रिटीकरणासाठी वापरलेल्या लाकडी फळ्यांनी पेट घेतला. त्यामुळे डक्टमध्ये आग पसरली व 11 वाहिन्या जळाल्या. परिसरातील 5 उपकेंद्गांचा वीजपुरवठा बंद पडल्याने विमाननगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, येरवडा, संजय पार्क, वडगाव शेरी, आयटी पार्क आदी परिसरातील सुमारे 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून सकाळी 11 वाजता सुमारे 16 हजार तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत उर्वरित सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केला. तथापि, विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने मोठे हॉटेल्स, मॉल, आयटी पार्क अशा 10 उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम या आज पहाटेपासूनच सुरु करण्यात आले. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. किशोर पाटील यांनी उपस्थित राहून दुरुस्ती कामाला वेग दिला. सायंकाळी उशिरापर्यंत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरु होते. या कामात महावितरणचे 10 अभियंता व सुमारे 85 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

चौकट (फोटोसह)- डक्टमधील लाकडी फळ्यांनी केले मोठे नुकसान – पुणे महानगरपालिकेने नाईन-बीआरडीजवळ तयार केलेल्या डक्टवर कॉक्रीटचा स्लॅब टाकण्यासाठी त्याला डक्टच्या आतून लाकडाच्या फळ्यांचा आधार देण्यात आला. काम झाल्यानंतर या फळ्या डक्टमध्येच राहिल्या. एका 22 केव्ही वाहिनीच्या जाईंटमध्ये स्पार्कींग झाल्यानंतर लाकडाच्या फळ्यांनी पेट घेतला व तब्बल 11 वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे महावितरणचे सुमारे 12 लाखांचे नुकसान झाले व वीजग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याची झळ बसली.

विशेष विद्यार्थी आणि अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

पुणे :

अखिल भारतीय सेना पुणेच्या वतीने पक्ष प्रमुख आमदार अरुण गवळी व गीता गवळी यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. विशेष विद्यार्थी आणि अनाथ मुलांच्या शाळांमध्ये तसेच आश्रमात वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, बेडशिट, खाऊ, फळे यांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी दिली.

यामध्ये ‘जनसेवा आश्रम’ (भिलारेवाडी, कात्रज), ‘श्री साईसेवा विशेष विद्यार्थी विद्यालय’ (शिवणे), ‘श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी विशेष विद्यार्थी विद्यालय’ (हिंगणेखुर्द, सिंहगड रोड), ‘हिरे हायस्कूल’ (पर्वती) यांचा समावेश होता.

यावेळी शनी शिंगारे (पुणे जिल्हाअध्यक्ष), सत्यभामा आवळे (महिला पुणे जिल्हाअध्यक्ष), यशस्विनी नवघणे (महिला शहर अध्यक्ष), महेश देवकुळे (कार्याध्यक्ष पुणे शहर), सागर पारिटे (संपर्क प्रमुख पुणे शहर), सागर मोहीते (उपाध्यक्ष पुणे शहर), ईरफान मुल्ला (सचिव पुणे शहर), समिर पवार (सचिव), भाग्यश्री जेऊर (महिला संघटक पुणे), नाशिर नलगर, सागर माणे, ऊमा गायकवाड, अंकुश कसबे, किरण लोंढे, जितेंद्र पोतदार, ज्योती शेलार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर अध्यक्ष देवेंद्र धायगुडे यांनी केले होते.

वाढदिवसानिमित्त लावण्यात येणारे शुभेच्छांचे बॅनर, फुलांचे गुच्छ, आतिषबाजी यावर होणारा खर्च टाळून विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तुंचे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता, असे देवेंद्र धायगुडे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शुभारंभ

0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची माहिती व अर्ज संकलित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ राव व जिल्ह्याचे ग्रमीण उपनिबंधक आनंद कटके  यांच्या हस्ते आज संत तुकाराम महाराज मंदीर, लोहगाव, ता. हवेली येथे करण्यात आला.

“ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना” योजनेच्या अनुषंगाने आज  दि. 24 जुलै 2017 पासून राज्यातील थकबाकीदार शेतकरी  सभासद  व  कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज विहीत नमुन्यात संकलित करण्याची सुरुवात केलेली आहे. त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यात या योजनेची माहिती  व अर्ज संकलित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राव व जिल्ह्याचे ग्रमीण उपनिबंधक श्री. कटके  यांच्या हस्ते करण्यात आला.

या योजनेबाबत  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. राव म्हणाले, सदरची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असून राज्यातील जवळपास 44 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना  नियमित कर्ज परतफेड केल्याबद्दल प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे. या योजनेच्या अर्जाचा नमूना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार, जिल्हा उपनिबंधक,  सहाय्यक निबंधक, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा बँक, राष्ट्रियकृत बँका व  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे. या योजनेचा राज्यातील 25 हजार सेवा केंद्रापैकी  नजीकच्या कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर लाभ घेता येईल, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार (https://aaplesarkar.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. राव यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास लोहगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.