शांती हे सामूहिक उद्दिष्ट बनले पाहिजे ‘ एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन ’ यांचे प्रतिपादन
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदी दिलीप वळसे पाटील
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर आज दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले.
श्री वळसे पाटील म्हणाले, की गेल्या काही दिवसापासून दुष्काळामुळे ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र आता परिस्थिती सुधारून ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. हे समाधानकारक चित्र आहे. ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेने देशात चांगले संशोधन केले आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. देशाच्या विविध भागातील भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून, उसाचे प्रती हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात साखर उत्पादन वाढवून देशाला साखरेच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर राज्य सहकारी संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या निवडीने एका तज्ञ संचालकाची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करणारी ही एकमेव संस्था आहे. साखर उद्योगाच्या सर्वंकष प्रगतीसाठी ही संस्था प्रयत्न करते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे व्हीएसआयला संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते.
डॉ मोहन आगाशे यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार : मेंटल हेल्थ फोरम, पुणेच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण
पुणे: मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार पुणे येथील प्रथितयश मानसोपचार तज्ञ व सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाला असून दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवान यांनी सांगितले.
पुणे येथील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मानसोपचार तज्ञ, मनोसामाजिक कार्यकर्ते, सायकॉलॉजीस्ट व इतर मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गतवर्षी मनोदय मेंटल हेल्थ फोरम ची स्थापना केली. मानसिक स्वास्थ्य आरोग्य वर्षभर विविध उपक्रम राबविने तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामधील कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा फोरम चा मुख्य उद्देश असून फोरम च्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा यथोचित गौरव करण्याचा देखील उपक्रम गतवर्षीपासून सुरु करण्यात आला आहे.
कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे प्रा. चेतन दिवान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच फोरम चे मुख्य सल्लागार डॉ. सुप्रकाश चौधरी, प्रा. महेश ठाकूर, डॉ योगेश पोकळे, सचिव राजेश अलोणे, सा संस्थेच्या सचिव निलीमाताई, सुमंत्रा समुपदेशन संस्थेच्या विनया भोसेकर, समुपदेशक शिल्पा तांबे, पल्लवी जोशी, अमृता बोकील, स्नेहल सस्तेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये डॉ मोहन आगाशे यांना गीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा जेष्ठ मानसोपचार तज्ञ उल्हास लुकतुके यांना देण्यात आला असून यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या दि १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उद्घाटन समारोह प्रसंगी डॉ मोहन आगाशे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
डॉ मोहन आगाशे यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असून त्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मानसिक आरोग्य क्षेत्रामधील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्रीय खादी व ग्रामीण आयोगाच्या खादी विक्री केंद्राचे उद्घाटन
पुणे– गाव आणि शहर ह्यांच्यात एक दृढ व्यवसायिक संबंध प्रस्थापित होऊन त्याद्वारे ग्रामीण भागात बनणार्या वस्तु शहरी भागात विक्रीसाठी उपलब्ध होणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी केले आहे. विमाननगर येथील व्हीक्फील्ड चेंबर मधील केंद्रीय खादी व ग्रामीण आयोगाच्या मार्फत सुरू झालेल्या “खादी इंडिया” नामक पहिल्या विक्री केंद्राचे (फ्रंचाइस स्टोअर) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ह्या वेळी आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, आमदार जगदीश मुळीक, आयोगाचे मुखी कार्य अधिकारी अनिल कुमार आदि उपस्थित होते.
“देशातील प्रत्येक जिल्हात अशा प्रकारचे विक्री केंद्र उघडून खादी ला सर्वदूर पोचविण्यासाठी आयोग कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या पुढाकारमुळे खादीचा प्रचार आणि प्रसार देशभर होत असल्याचे नमूद करून आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले ” २०१६-१७ मध्ये एकूण २००५ कोटी रुपयांची खादी विक्री झाली असून आगामी ५ वर्षामध्ये ५००० कोटींच्या विक्रीचे उदिष्ट असून त्याद्वारे एकूण २० लाख रोजगार निर्माण होणार आहेत”.
20 तारखेपासून उपोषणाला बसणार भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्याचा इशारा
लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपती उत्सवात आणला. (मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण )
पुणे-लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपतीला उत्सवाचं स्वरूप दिलं असं म्हणत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गणेशोत्सवात पुण्यात येऊन मानाच्या पाचही गणपतींचं दर्शन करणार असल्याचंही पुण्यात जाहीर केलं.
पहा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले सत्कार आणि ऐका संपूर्ण भाषण
राज्यातील न्यायालयांमध्ये आवश्यक त्या चांगल्या सुविधा पुरविणार- मुख्यमंत्री
पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
पुणे दि 12 : राज्यातील न्यायालयांच्या इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथील कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्यायमूर्ती भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे, महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशातील आदर्श कौटुंबिक न्यायालय पुणे येथे झाले आहे. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल तर कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्यासाठी न्यायालयांमध्ये चांगल्या सुविधा आवश्यक आहेत. राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्यक त्या चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु.
समाजातील एकत्र कुटुंब पध्दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती, घरांतील ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीमुळे पती-पत्नीतील वाद संपुष्टात यायचे. बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. या न्यायालयात येणा-या व्यक्ती निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्वास उडालेल्या असतात. येथील वातावरणामुळे त्यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्फोटासाठी आलेल्या व्यक्ती परत आनंदात एकत्र जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांनी जीवनात सुबत्ता असलेल्या व्यक्ती कौटुंबिक कलहामुळे त्रस्त असल्याची उदाहरणे देऊन कौटुंबिक न्यायालयांमध्ये येणा-या व्यक्तींच्या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणा-यांवर असल्याचे सांगितले. कौटुंबिक न्यायालय हे एक वेगळे आणि विशेष न्यायालय आहे. इथे येणा-या व्यक्तींबाबत सर्वांनी सहानुभूतीचा, आपुलकीचा दृष्टिकोन ठेवावयास हवा, असे आवाहन करुन त्या म्हणाल्या, आत्मविश्वास गमावलेल्या, नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनात शांतता निर्माण करण्याचे, त्यांचे जीवन घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्याला करावयाचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही कौटुंबिक न्यायालयाच्या स्थापनेचा उद्देश सांगून विभक्त झालेले आणि घटस्फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्यायालयात आलेली जोडपी आपल्या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा आशावाद व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे म्हणाल्या, पुणे येथे प्रथम कौटुंबिक न्यायालय 27 जानेवारी 1989 मध्ये स्थापन करण्यात आले होते. तेव्हापासून हे न्यायालय भारती विद्यापीठाच्या 7 व्या व नवव्या मजल्यावर कार्यरत होते. ती जागा अपुरी पडत असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारती शेजारील गोदामाच्या जागेत नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. स्वतंत्रकुमार यांच्या हस्ते 13 सप्टेंबर 2009 मध्ये झाले होते. शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ञ, बाल मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरिकक दृष्टया विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमिगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. नूतन इमारतीमुळे वकील, पक्षकार व कर्मचारी यांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यकत केले. कार्यक्रमास न्यायाधीश, कर्मचारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू अवतरणार थुकरटवाडीत
जगाच्या कानाकोपऱ्यात उत्सव पोहोचविण्यासाठी महापालिकेकडून प्रथमच प्रयत्न-मुरलीधर मोहोळ
पुणे- जगाच्या कानाकोपऱ्यात उत्सव पोहोचविण्यासाठी महापालिकेकडून प्रथमच प्रयत्न होत असल्याचे आज शनिवारवाड्यावरील आपल्या भाषणातून महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापालिकेने आयोजित केलेला गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .यावेळी मोहोळ काय म्हणाले ते ऐका आणि पहा त्यांच्याच शब्दात
पुण्यातील तबलावादक व संगीतकार उदय देशपांडे यांची आंतरराष्ट्रीय झेप
पिंपरी चिंचवडला लवकरच पोलिस आयुक्तालय होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे,दि.१२-पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता पोलिस आयुक्त कार्यालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या तीन विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि दोन प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार बाळा भेगडे, गौतम चाबूकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण बर्डिच आदी उपस्थित होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम झाला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. लवकरच त्याबाबतच्या आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहिर केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी पिंपरी चिंचवड येथे नागरिक आले आहेत. येथील उद्योगाने सर्वांना संधी दिली आहे. आता राज्य शासन या शहराला विकासाची संधी देणार आहे. या संधीचा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करतो.
पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी चिंचवडमध्ये क्षमता आहे. मात्र महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आवश्यक असणार्या सर्व विकास प्रकल्पांसाठी राज्य शासन प्राधान्याने मदत करेल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहेच गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे सांगितले.
महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. आभार स्थायी समिति सभापती सीमा सावळे यांनी केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत विकसित करण्यात आलेल्या सिटी सेफ मोबाइल अप्लिकेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरु करण्यात टिळकांचे योगदान -महापौर टिळक(व्हिडीओ)
पुणे-भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो लावण्याची मागणी नाकारत महापालिकेने आयोजित केलेला गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार वाड्यावर चक्क ढोल वाजवीत केले तर यावेळी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरु करण्यात टिळकांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही असे सांगून सामाजिक कार्य म्हणून या उत्सवाकडे पहा असा सल्ला आज महापौर मुक्ता टिळक यांनी भाषणातून दिला .. नेमके त्या काय म्हणाल्या ,ते त्यांच्याच शब्दात ऐका …पहा …
मुल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
पुणे : “ नैतिक मूल्यांशिवाय असणारे शिक्षण हे केवळ माहिती असते, पण मूल्यांना धरून शिकविले जाणारे शिक्षण हे ज्ञान बनते. त्याचमूळे केवळ मुल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते. ” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’ (एमआयटीडब्ल्यूपीयू) च्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड उपस्थित होते.
यावेळी डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, साधू वासवानी मिशनचे दादा जे. पी. वासवानी, कुलगुरू डॉ. जय गोरे, नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, तालमणी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, नानिक रुपानी, डॉ. अरूण निगवेकर, राजु मंथना, श्रीकांत भारतीय, रोशनलाल रैना, हरिभाई शहा, माईर्स एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, एमआयटी चे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, माईर्स एमआयटी चे सचिव डॉ.मंगेश तु.कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त प्रा, प्रकाश जोशी, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. सुचित्रा नांगरे – कराड, सौ. ज्योती कराड – ढाकणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ माणसाला भावना असतात तशा त्या यंत्राना असत नाहीत आणि त्याचमुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. माणूस हा नेहमीच स्वत:च्या आस्तित्वाचा शोध घेत असतो. अशा विद्यापीठांमुळे नक्कीच हा शोध सुखावह ठरेल. तसेच हे विश्वशांतीचा ध्यास असणारे विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात असल्याचा मला अभिमान आहे. ”
“ आज आपण मोबाईल, संगणक आदी तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईटही वापर करतो. मात्र ज्याला नैतिक अधिष्ठान आहे, नैतिक मूल्यांची बैठक ज्या व्यक्तीस आहे. ती व्यक्ती नक्कीच त्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि चांगलाच वापर करेल. आज आपण अशांती, हिंसा, भ्रष्टाचाररुपी अंधारात चाचपडत असताना मूल्यरूपी प्रकाशच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “ आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देण्यात हे विद्यापीठ अग्रेसर असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान अणि विश्वशांतीचा समन्वय साधणार आहोत. ”
डॉ. विजय भटकर म्हणाले, “ या विद्यापीठाच्या निमित्ताने संपूर्ण भारताला एक असे विद्यापीठ मिळाले आहे, जेथून आदर्श नागरिक बाहेर पडतील. जो विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञानासोबतच शांतीचा, विश्वशांतीचा संदेश समाजाला देण्यासाठी सज्ज असेल. विशेषकरून जेव्हा एखादे विद्यापीठच असा संदेश देत असेल, तेव्हा नक्कीच समाजातही याच स्वरूपाचा आदर्श उभा राहील.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ विज्ञान व तंत्रज्ञानावर भर देणारी अनेक विद्यापीठे आज जगात पाहावयास मिळतात. पण, विश्वशांतीचा व्यापक संदेश देणारे हे एकमेव विद्यापीठ संपूर्ण जगात असेल. आज ज्या काही समस्या समाजासमोर आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच हे विद्यापीठ महत्वपूर्ण भूमिका बजावेल.”
साधू वासवानी म्हणाले, “ राजकारणामुळे कधीच आपला देश बदलला जाणार नाही. हा समाज आपल्यालाच बदलायचा आहे. यासाठी सर्वांना एकच करावे लागेल, ते म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाची दारे उघडावी लागतील. तरच आपण समाजात शांती प्रस्थापित करू शकतो. ”
प्रास्ताविकात प्रा. राहुल कराड म्हणाले, “ एमआयटी हा एक मैलाचा दगड आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून शिक्षण देणाच्या कार्याची सुरूवात येथूनच झाली. येथे विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्यातून शारिरीक आणि मानसिक आरोग्य विकसीत होते. त्यामूळे स्टार्ट अप इंडिया आणि डिजीटल इंडियासाठी हे एक केंद्र ठरेल. ”
मायकेल नोबेल म्हणाले, “ खरे तर आज संपूर्ण जगातून शांती जणू हरवली आहे. आज त्याच शांतीच्या शोधाची गरज आहे. ती हरवलेली शांती पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. कारण जर जगात शांतीच नसेल तर आपण सगळे जगूच शकणार नाही. ”
यावेळी नानिक रुपानी व डॉ. जय गोरे यांनीही विद्यापीठासंबंधीचे आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.
शनिवार वाड्यावर वाजला सत्तेचा ढोल (व्हिडीओ)
मुख्यमंत्र्यांकडून ढोल वादनाला प्रोत्साहन
पुणे- महापालिकेने आयोजित केलेला गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शनिवार वाड्यावरील कार्यक्रमात मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ढोल वाजवला… मुख्यमंत्र्यांच्या या छोट्याश्या पण महत्वपूर्ण कृतीला अनेक कंगोरे आहेत . ५००० ढोल वादनाच्या आणि रंगारी कि टिळक अशा वादात सापडलेला कार्यक्रम , तो ही शनिवार वाड्यावर,… आणि इथे मुख्यमंत्र्यांनी आज ढोल वाजवून त्यात सहभागी होणे .. याचे अनेक जण आपापल्या परीने विश्लेषण करतील .
भाऊ रंगारी गणेशोत्सवा चे तर शिवजयंतीचे जनक म.फुले . -संभाजी ब्रिगेड ची उडी (व्हिडीओ)
पुणे- चुकीचा इतिहास शिकविला गेला .. भाऊ रंगारी हेच गणेश उत्सवाचे जनक आहेत तर शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आहेत . हा आजतागायत दडवून ठेवलेला खरा इतिहास मुख्यमंत्र्यांनी यापुढे शालेय जीवनातून मुलांसमोर आणि समाजापुढे ठेवला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे. … पहा नेमके संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे ..त्यांच्याच शब्दात ….


