Home Blog Page 3289

उत्सव साजरे करताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवणे गरजेचे – सौ मंजुश्री खर्डेकर…

0
सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम – 
टबात केले श्री गणरायाचे विसर्जन
पुणे-कर्वेनगर मधील सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवून गणरायांचे विसर्जन मोठ्या टबात करून आदर्श निर्माण केला आहे,उत्सव साजरा करताना आपण पर्यावरण रक्षणाचे भान ठेवले पाहिजे व काही रूढी परंपरा बाजूला ठेवून काळानुसार बदल केलं पाहिजेत असे मत या सोसायटीच्या अध्यक्ष आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.विसर्जनापूर्वी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली,यावेळी सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या अध्यक्ष /नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,सचिव स्मिता ढवळीकर,उत्सव प्रमुख सारिका फर्नांडिस,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर व सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी येथील रहिवाश्यांनी घेतलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले कि ” टबातील पाण्यात सोडियम बायकार्बोनेट घालून त्यात विसर्जन करण्याचा सोसायटीतील २०० सदनिकाधारकांनी घेतलेला निर्णय अनुकरणीय असून निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे,डॉल्बी चा कर्णकर्कश्श आवाज टाळून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढणे अश्या छोट्या छोट्या कृतीतून या सोसायटीने पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश दिला आहे,असे हि त्या म्हणाल्या.सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सोसायटीच्या रेन वाटर हार्वेस्टिंग,सी एफ एल दिव्यांचा वापर,कचरा विघटन प्रकल्प,आणि दार शुक्रवारी फळे व भाजीपाल्याच्या थेट विक्री व्यवस्था इत्यादी उपक्रमांची माहिती दिली व सर्व उपक्रमात सभासदांच्या सहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.सचिव स्मिता ढवळीकर व उत्सव प्रमुख सारिका फर्नांडिस यांनी विविध स्पर्धांचे आयोजन,रोजची आरती व प्रसादातील सर्वांचा सहभाग याचा उल्लेख करून आदर्श गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विदयार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर द्यावा -जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग

0

पुणे, दि. 1 : पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी अवांतर वाचन तसेच लिखाणाला जास्त महत्व
द्यावे. शुध्दलेखन व शब्दांचा योग्य व प्रभावी वापर केल्यास विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो, असे
प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आज येथे केले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी
जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली, त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा.जयप्रकाश पाटील,
प्रा.रणजित पंडित उपस्थित होते.
वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा
माहिती कार्यालयाच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सरग यांनी यावेळी
जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शासनाचे मुखपत्र असलेल्या तसेच पाच
भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या लोकराज्य मासिकाबद्दल माहिती, आकाशवाणीवरुन प्रसारित होणारा दिलखुलास कार्यक्रम,
जनसंपर्काची विविध माध्यमे, सोशल मिडीयाचा जनसंपर्कासाठी वापर याबद्दल मार्गदर्शन केले. दर्शनी व वर्गिकृत
जाहिराती आणि त्याचे महत्व याबद्दल माहितीसुध्दा विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रा.जयप्रकाश पाटील यांनी, जिल्हा माहिती कार्यालयास भेट व तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी याचा
विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोग होईल असे सांगितले. यावेळी जयंत कर्पे, रोहित साबळे, नितीन सोनवणे, मिलिंद
भिंगारे, सुगतकुमार जोगदंड ,जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

टीम “फुकरे रिटर्न्स” ने मुम्बई में एक प्रचार गीत की शूटिंग शुरू की!

टीम फुकरे रिटर्न्स ने मंगलवार को हुई मुम्बई की मूसलाधार बारिश के बीच, दिसंबर में रिलीज होने वाली इस फिल्म के एक प्रचार गीत की शूटिंग शुरू कर दी है।

2013 की सुपर-डुपेर हिट फिल्म “फुकरे” फ़िल्म के दूसरे भाग “फुकरे रिटर्न्स” के साथ दर्शकों का मनोरंजन करने के लिए तयार है।

अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा, अली फजल और मनोजत सिंह ने एक साथ मिलकर मुंबई की मूसलाधार बारिश के बीच फिल्मालया स्टूडियो में फिल्म के इस प्रचार गीत के लिए शूटिंग शुरू कर दी है।

बाढ़ से बेफिक्र हो कर, फुकरे के अभिनेता इस शूटिंग शेड्यूल का हँसी खुशी के साथ लुत्फ उठाते हुए नज़र आये।

फिल्म की पूर्ववृत्त, फुक्रे ने फिल्म समीक्षकों से सराहना प्राप्त की थी और अब फ्रैंचाइज़ी की दूसरी किस्त ने अपनी पहली झलक के साथ कुछ इसी तरह की प्रतिक्रिया को आकर्षित किया है।

प्रफुल्लित करने वाले ‘फुक्रे टीज़र’ ने दर्शकों को हँसी से लॉट-पॉट कर दिया है। 24 घंटे से भी कम समय में यह टीज़र ने 10 लाख दृश्य प्राप्त करने में सक्ष्म रहा।

पुलकित सम्राट, रिचा चड्ढा, वरुण शर्मा, अली फजल और मनज्योत सिंह जैसे उम्दा कलाकारों से परिपूर्ण यह फ़िल्म काफी दिलचस्प होगी क्योंकि यह मूल कलाकारों को बरकरार रखती है और साथ ही ‘फुक्रे’ के प्लॉट को भी क़ायम रखे हुए है।

एक्सेल एंटरटेनमेंट के बैनर के तहत बनने वाली यह फ़िल्म फरहान अख्तर और रितेश सिंधवानी द्वारा सह-निर्मित है और मृदिप सिंह लांबा द्वारा निर्देशित है। फ़िल्म 8 दिसंबर 2017 को आपको हँसाने के लिए नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देगी।

कल्याणकारी योजनांचा लाभ घेवून स्व:चा सामाजिक व आर्थिक विकास करावा – समाज विकास अधिकारी संभाजी येवले

0

पुणे, दि. 1 : राज्य शासनासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घेवून स्व:चा समाजिक व आर्थिक विकास करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी  ऐवले यांनी केले.

भोसरी गावठाण येथील श्रीराम मित्र मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मंडळाचे अध्यक्ष मचींद्र लांडगे, कार्यअध्यक्ष विक्रांत लांडगे, सुनील लांडगे, भरत लांडगे, अपस्थित होते.

श्री ऐवले म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी महानगरपालिकेने नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामधील काही योजना वर्षाभर सुरु असतात तर काही कालमर्यादीत योजना असतात. यामध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीग कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, खेळाडू कल्याणकारी योनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पदव्युतर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ, निराधार मुलांना शिष्यवृत्ती एच.आय.व्हीबाधित मुलांचा संभाळ करणाऱ्या पालकांना व संस्थांना अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच अशा व्यक्तींना महानगरपालिके तर्फे पी.एम.पी.एल चा मोफत बस पास देखील देण्यात येतो, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य या पाच भाषेत प्रकाशित होणाऱ्या मासिकासंबंधी माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी महेश मरे, विनोद गावडे, महेश लांडगे, प्रशांत लांडगे, अक्षय भुजबळ, दिनेश पठारे, अनील लांडगे, तसेच विलास कसबे, मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, मोहन मोटे, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबाहुल्य शाळांनी अनुदानासाठी अर्ज करावेत

0

पुणे : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या, शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत
सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचवण्यासाठी अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी
शासनातर्फे अनुदान देण्यात येते.
सदर योजनेअंतर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य
खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांनी यासंदर्भातील परिपुर्ण प्रस्ताव
18 सप्टेंबर, 2017 पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, 3 रा मजला, पुणे येथे कार्यालयीन
वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समिती पुणे यांनी
प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.

‘बादशाहो’ च्या यशासाठी संगीता अहिर, इमरान हाश्मीचं लालबागच्या राजाला साकडं

0

आपल्या मनीच्या कामना पूर्ण व्हाव्या म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्याचरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीनेही या राजाला ‘बादशाहो’ चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे. यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिर ही त्याच्यासोबत होत्या. ​

१२ गावांत एक गाव- एक गणपती..

0

विटा – शहरांचा भरमसाठ विकास आणि खेडी भकास या धोरणांमुळे एकीकडे पावसात मुंबईचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे पावसाने मारलेली दडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशी दुष्काळी स्थिती असतानाही विटा शहर नजीकच्या खानापूर तालुक्‍यात ६५ गावांपैकी १२ गावांत एक गाव- एक गणपती संकल्पना राबविली आहे.

खानापूर तालुक्‍यातील लोकांना सतत दुष्काळी स्थितीला सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु मोठे पाणीसाठे होण्याइतपत पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या मशागती, पेरण्या यासह अन्य खर्चाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी गणपती बाप्पाचे मात्र मोठ्या उत्साहात स्वागत करून प्रतिष्ठापना केली आहे. विटा शहरात २६ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर तालुक्‍यातील  ऐनवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, देवनगर, ढोराळे, सांगोले,सुलतानगादे, करंजे, अडसरवाडी, बाणूरगड, कळंबी, रामनगर या बारा गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविली आहे. विटा पोलिसांनी तालुक्‍यातील गावामध्ये जाऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानुसार डॉल्बीमुक्त गणेशोत्सव सुरू आहे. काही गणेश मंडळांनी समाज प्रबोधन करणारे जिवंत देखावे उभारले आहेत.

शिवसृष्टीची जागा बदलण्यासाठी ..राजकारण ?

0

पुणे – कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असून , पुणे महापालिकेच्या खास  सभेत महिन्यापूर्वी नगरसेवक महेश नानासाहेब वाबळे यांनी पर्याय म्हणून शेजारील जागेचा उल्लेख करून याबाबतची हिंट दिली होती . आता या परिस्थितीत शिवसृष्टीसाठी च्या जागेच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार माजी उपमहापौर दीपक मानकर यांची भूमिका बदलेल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान शिवसृष्टी आणि मेट्रो या दोहोंच्या अशा जागावाद प्रकरणामागे  मोठे राजकारण शिजत असल्याचा संशय निर्माण झाला आहे .

पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत नुकताच  घेतला. या वेळी मुख्मंत्र्यांनी या बाबत राजकीय सहमती घडवून शिवसृष्टी उभारणार असल्याचे सांगितले. तसेच या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असे सांगितल्याचे वृत्त आहे .दरम्यान कोथरूडमध्ये शिवसृष्टी उभारावी आणि मेट्रो स्थानक भूमिगत ठेवावे, अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष आणि दीपक मानकर यांची भूमिका आता बदलेल काय ? याकडे लक्ष लागून आहे

वनाज- रामवाडी मार्गाचे काम सुरू झाले आहे. तसेच या मार्गावर स्थानके उभारण्याचीही निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा डेपोच्या पूर्वीच्या जागेवर मेट्रो स्थानक उभारले जाऊ शकते. या जागेशेजारी ‘बीडीपी’ची वनविभागाची जागा आहे. बीडीपीच्या जागेत संग्रहालयाला परवानगी असल्याचे राज्य सरकारने या पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्या जमिनीवर शिवसृष्टी उभारता येईल, असा भाजपच्या प्रमुख नेते मंडळींनी सूर धरला  आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी  बोलताना यापूर्वी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी भूमिगत मेट्रोला विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते  . तरीही शिवसृष्टी साठी येथे अन्य जागा सुचविली जाते आहे . यामागे काही राजकारण शिजत असल्याचा अनेकांना संशय आहे .

अंध कलाकारांनी सुमधुर गीते सादर करून रुग्णांचे केले मनोरंजन.. वाहव्वा ..

0

पुणे-गोल्डन स्काय हेल्थ अँड लाईफ केअर फाऊंडेशन आणि व्ही गोल्डन एज यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक येथील केअर सेंटर मधील रुग्णांसाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत . लुई बेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या संस्थेतील अंध कलाकारांनी सुमधुर गीते सादर करून रुग्णांचे मनोरंजन केले .
व्ही गोल्डन एज हि संस्था, ज्या वृद्ध रुग्णांचा घरी ,तसेच हॉस्पिटल मध्ये उपचार करणे अशक्य बनले  आहे , अशा रुग्णांचा सांभाळ आणि त्यांच्यावर उपचार करते . गेली अनेक वर्षे या संस्थेचे कार्य सुरु असून या रुग्णांना या संस्थे चा खूप मोठा आधार आहे. हि संस्था सामजिक बांधिलकी च्या भावनेतून अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम वर्षभर सतत राबवत असते .
सदर कार्यक्रमास विकास नाना दांगट पाटील , शेखर मोहिते पाटील , दीपक पोटे, गणेश भिंगारे, आदी मान्यवर उपस्थित होते . मंडळाच्या संचालकाने आभार प्रदर्शन केलं.

महाराष्ट्र टाइम्सचे राहुल देशमुख यांना पहिले पारितोषिक ( शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव -छायाचित्र प्रदर्शन )

0

पुणे- शतकोत्तर रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्ताने पुणे महानगरपालिकेने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने आयोजित छायाचित्र प्रदर्शनामधील २८  छायाचित्रकारांच्या ३६२ छायाचित्रांमधील महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार    राहुल देशमुख यांना पहिले पारितोषिक देण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. या प्रदर्शनानिमित्त छायाचित्र स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

आज (गुरुवार) दिनांक 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत सारसबागेसमोरील महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

या छायाचित्र प्रदर्शनात गणेशोत्सवातील विविध कालावधीतील, विविध प्रसंगानुरूप छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहे.  त्याचबरोबर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख व व्यंगचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे तसेच पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था यांची छायाचित्रे व माहिती, त्रिशुंड गणपती मंदिर, चतु:श्रृंगी मंदिर, पर्वती मंदिर, सारसबाग मंदिर, दगडूशेठ मंदिर, पाताळेश्वर मंदिर, वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, शनिवारवाडा, नानावाडा, विश्रामबागवाडा, आगाखान पॅलेस, महात्मा फुले वाडा, शिंदेची छत्री, डेक्कन कॉलेज, अभियांत्रिकी महाविदयालय, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एनडीए, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे विमानतळ, पुणे शहरातील रस्ते, अशा विविध विषयाशी संबंधित छायाचित्रे व माहिती प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहे.

या प्रदर्शनात 28 छायाचित्रकारांच्या 362 छायाचित्रांचा  समावेश करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे  छायाचित्रकार राहुल देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार पवन खेंगरे यांनी दुसरा क्रमांक तर पुणे मिररचे छायाचित्रकार निखिल घोरपडे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्यांना  रोख रक्कम , प्रमाणपत्र आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

अवयवदान करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा … डॉ.विकास क्षीरसागर

0

पुणे : अवयव निकामी झालेल्या रुग्णांना अवयवदानामुळे नवसंजीवनी मिळते, यासाठी सर्वांनी
सामाजिक जाणीवेतून अवयवदानाचा संकल्प करायला पाहिजे, असे आवाहन ससून रुग्णालयाच्या
जनऔषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विकास क्षीरसागर यांनी आज येथे केले.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकापयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी
गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. हवेली तालुक्यातील नऱ्हेगाव येथील भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ (ट्रस्ट) येथे आयोजित करण्यात
आलेल्या संवादपर्व कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा
परिषद सदस्या जयश्री भूमकर, पंचायत समिती सदस्या ललिता कुटे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान भूमकर,
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील, भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ
(ट्रस्ट) चे अध्यक्ष अक्षय वाल्हेकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. क्षीरसागर म्हणाले, अवयदानामुळे मृत्युनंतरही अवयव स्वरुपात जिवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या
आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे सामाजिक जाणिवेतून नागरिकांनी अवयवदान
करण्यासाठी संकल्प करायला हवा. अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा
रुग्णांना मोठया प्रमाणावर अवयवांची आवश्यकता असते. निसर्गाने मानवाला शरीराच्या रुपाने मोठी देणगी
दिली आहे. अवयवाची निर्मिती करणे मानवाला अजून शक्य झाले नाही. अवयवदानामुळे रुग्णांना
नवसंजीवनी मिळणार असल्याने, सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
अवयवदानाचे स्वरुप, अवयवदानाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया तसेच अवयवदानाबद्दल
समज- गैरसमज याबाबत डॉ.क्षीरसागर यांनी यावेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी संवाद पर्व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी हेतू स्पष्ट करुन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाची रुपरेषा सांगितली. जयंत कर्पे यांनी माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. कार्यक्रमास भैरवनाथ नवचैतन्य
तरुण मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष अक्षय वाल्हेकर, उपाध्यक्ष नागेश खेडेकर, माजी अध्यक्ष दीपक वाल्हेकर, माजी
उपाध्यक्ष अमर खेडेकर, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रितीचा छंद लागलेल्या जीवांचा नवा सिनेमा

0
आपल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं… मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा असो किंवा आपल्या आवडत्या नटाचे फोटोज् गोळा करण्याचा…. हे छंद माणसाला एक वेगळा आनंद देऊन जातात… मात्र ज्यांना प्रितीचा छंद प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय?
प्रितीचा छंद लागलेल्या अशाच दोन जीवांची कथा सांगणारा नवा सिनेमा मराठीत येत आहे. या सिनेमाचं नाव ‘छंद प्रितीचा’ असं असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. या सिनेमाचं पोस्टर पाहिलं की ‘पिंजरा’, ‘सांगत्ये ऐका’ सारख्या चित्रपटांची आठवण होते. तमाशावर आधारित गावापासून ते शहरी माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव ही कलाकार मंडळी आहेत.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चित्रपटनिर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचं असून संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे.
प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

​​ कसबा गणपती मंडळात पहिल्या मिनरल वॉटर प्लांट चे उदघाटन

0
पुणे :
गणपती पाहतांना  मिनरल वॉटर प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन  टाकून देण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने  ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड ‘ च्या वतीने  पुण्याच्या गणेश मंडळात मिनरल वॉटर प्लांट बसविले जात आहेत . या योजनेतील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे उदघाटन गुरुवारी सकाळी झाले .
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती  असलेल्या कसबा गणपती मंडळात पहिल्या मिनरल वॉटर प्लांट चे उदघाटन रोटरी क्लब चे प्रांतपाल अभय गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले . ३०० लिटर प्रति तास क्षमतेच्या या मिनरल वॉटर प्लांट (आर . ओ . प्लांट ) साठी दोन लाख खर्च आला आहे .

​या प्लांट मधील मिनरल वॉटर मोफत भाविकांना दिले जाणार आहे . ​
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे ,रोटरी क्लब ऑफ सिंहगड चे अध्यक्ष अशोक भंडारी ,श्रीकांत पाटणकर ,रोटरी वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे ,निलेश वकील ,अभिजित पवार ,भाऊसाहेब पवार उपस्थित होते
​’रिसायकल न  होऊ शकणाऱ्या ​प्लास्टिक बाटल्यांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे . नद्यांमध्ये वाहत जाणाऱ्या प्लस्टिक बाटल्या नष्ट न होता हजारो वर्षे जलचर आणि पर्यावरणाची हानी करीत राहतात . त्यामुळे प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी करण्याचे उपाय शोधण्याची गरज आहे . गणेश मंडळात मिनरल वॉटर प्लांट हा त्यातील एक उपाय होऊ शकतो . गणेश मंडळातच मिनरल वॉटर मोफत मिळाले तर प्लास्टिक बाटल्या कमी होण्यास मदत होईल . तेवढ्या बाटल्या प्लास्टिक कचऱ्यात जाणार नाहीत ,आणि गटारे – नदी-नाल्यात जाणार नाहीत ‘ असे यावेळी सांगण्यात आले

बी.बी.ए.- बी. पी. एस., बी. कॉम. -बी. पी. एस. अभ्यासक्रमांसाठी ​​ ‘टाटा कन्सलटन्सी’ आणि ‘भारती विद्यापीठ आयएमईडी’मध्ये करार

0

पुणे ः

‘बी.बी.ए. -बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस’ आणि ‘बी. कॉम. -बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस’ या अभ्यासक्रमांसाठी ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ आणि भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) मध्ये परस्पर सहकार्य करार झाला आहे.

‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’चे सरव्यवस्थापक जी. बालनारायण आणि आयएमईडीचे संचालक सचिन वेर्णेकर यांनी या करारावर सह्या केल्या.

‘उद्योगजगत आणि व्यवस्थापनशास्त्र शिक्षण जगताला अधिक जवळ आणण्याच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत,’ असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.

‘व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांना औद्योगिक तंत्र आणि मंत्र शिकण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ ने पुढाकार घेतला आहे, असे जी. बालनारायण यांनी सांगितले.

‘ट्रेन द ट्रेनर’ प्रोग्राम हे बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस (बी. पी. एस.) कोर्सेसचे वैशिष्ट्ये आहे. भावी काळातील उद्योगजगाला लागणार्‍या विषयांची जोड या अभ्यासक्रमात दिली आहे.

 

लहान मुलांचे शिक्षण आणि विकासासाठी होणार चर्चा… मदर गूज टाईम, युएसएच्या लेसली फॅल्कोनर या विषयावर करणार चर्चा.

0

पुणे: संशोधनाद्वारे दिसून आले आहे की बालपणातील सुरवातीची काही वर्ष मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. आपल्या भवतीचे जग अत्यंत जलद गतीने बदलत आहे. त्यानुसार वर्तमान आणि भविष्यास अनुरूप असे बदल शिक्षणातही होणे आवश्यक आहे. समाजाला आज अश्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. लहान मुलांची देखभाल आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांचा अनुभव व कौशल्य उपस्थितांशी शेअर कारण्यासाठी द अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन त्यांना एका व्यासपीठावर आणणार आहे. अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन, पुणे चॅप्टरने ‘पीस- पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड अजुफेस्ट’ ह्या एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत शेरेटन ग्रँड यथे ही परिषद होणार आहे.

मुलांमध्ये भावनिक विकास होऊन पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे जेणेकरून ते भविष्यात जबाबदार नागरिक बनु शकतील. अर्ली चाइल्डहुड एजुकेशन चिरस्थायी विकासासाठी अशा शिक्षाणाचा पाया रचत आहे.

या परिषदेमध्ये लहान मुलांच्या शिक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नेक्स्ट जेन टीचर एजुकेशन या विषयावर इंटरनॅशनल करिक्युलमच्या शैक्षणिक सल्लागार फर्जाना दोहाडवाला चर्चा करणार आहेत. आत्मा अकॅडमीच्या संचालिका मंजुश्री पाटील देखील उपस्थित राहून चर्चा करणार आहेत. श्रीमती लेसली फॅल्कोनर अध्यापन आणि मूल्यमापनातील ‘डिझाइन थिंकिंग’ या विषयावर चर्चा करणार आहेत.

अर्ली चाइल्डहुड एजुकेशनच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स प्री-स्कुल एजुकेशनच्या जागतिक प्रथेविषयी बोलणार आहेत. शैक्षणिक कार्यकर्त्यांना व शालेय शिक्षकांना समर्थन देत त्यांना सक्षम करतानाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयावर चार्चा करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे.

श्रीमती लेसली फॅल्कोनर म्हणाल्या की, “आजच्या काळात शाळा व पालक जनशिक्षणामध्ये इतके व्यस्त झाले आहेत की मुलांच्या वैयक्तिक गरजा व आवडींना गृहित देखील धरले जात नाही. खेळ, संगीत, कला व निसर्ग हे प्री-स्कुल एजुकेशनचे अविभाज्य भाग बनले पाहिजेत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या तयार होण्या आधीच मुलांना अक्षर आणि आकडे शिकविले जातात. येथे मला माझा अनुभव व नव्या शिक्षण पद्धतीचे माहिती देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदित आहे”.