Home Blog Page 3282

मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना उपयुक्त – सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख

0

शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत बाजार समित्यांना पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 14: शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखायचा असेल तर शेतमाल तारण कर्ज योजना अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यशाळा व शेतमाल तारण कर्ज योजना 2016-17 पुरस्कार वितरण कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, आ. माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे, पणन संचालक डॉ. ए.बी. जोगदंड, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक जे.जे जाधव उपस्थित होते.

श्री. सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाल काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये  तारणात ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाच्या स्वरुपात कमी व्याजदराने त्वरित सुलभ निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. यामुळे कमी भावात शेतमाल विकून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होणार आहे. शेतकऱ्यांचे तारण करता बाजार समिती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना  वेळोवेळी माहिती देवून मदत करा व योग्य मार्गदर्शन करुन प्रामाणिकपणे काम करा, अशाही सूचना श्री देशमुख यांनी बाजार समितीच्या सदस्यांना दिल्या.यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना काजूसाठी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच या योजनेची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देवून पुरस्कार प्राप्त बाजार समित्यांना शुभेच्छा दिल्या.

चार्टर्ड अकाऊंटन्ट डॉ. संजय बुरड यांनी जी.एस.टी कायदा व बाजार समित्या या विषयावर मार्गदर्शन केले, सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी शेतमाल तारण कर्ज योजेची सविस्तर माहिती दिली, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे यांनी बाजार समित्यांमधील ई-ट्रेर्डींग व ई-ऑक्शन बाबत माहिती दिली तसेच डॉ. ए. बी. जोगदंड यांनी बाजार समिती कायद्यातील प्रस्तावीत बदलांबाबत माहिती दिली.

दरम्यान सन 2016-17 मध्ये शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत जिल्हा स्तरांवर अकोला, लातूर, अमरावती, वाशिम वर्धा, परभणी, सोलापूर, अहमदनगर येथील बाजार समित्यांना पुरस्कार देण्यात आले.तसेच विभागीय स्तरावर अमरावती, नागपूर, लातूर, पुणे, नाशिक व औरंगाबाद या कार्यालयांना देखील पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य, राज्यातील सर्व बाजार समिती सहकारी संघटनेचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000000

धान्य वितरणात पारदर्शकता आणणार : गिरीश बापट

0

पुणे : धान्य वितरणात पारदर्शकता यावी,या उद्देशाने राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ही संगणकीकृत यंत्रणा विकसित केली आहे.या प्रणाली मुळे अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेमध्ये पारदर्शकता  येणार असून संपूर्ण माहिती आता मोबाईलवरसुद्धा  उपलब्ध होणार आहे.अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

ऑनलाइन प्रणाली बद्दल माहिती देताना श्री बापट म्हणाले, यामुळे प्रत्येक गोडाऊन मधील अन्नधान्याचे व्यवस्थापन करता येवू शकते. तसेच कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अन्न व पुरवठा विभागाकडून रास्त भाव दुकानदारांना किती अन्नधान्य वाटप केले हे पाहता येईल. धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचे चलन ही ऑनलाइन काढले जाईल ज्यामुळे धान्य वाहतूक करणारा ट्रक भारतीय अन्न महामंडळ  ते राज्य शासनाचे गोदाम तसेच गोदाम  ते रास्त भाव दुकान किती वेळात पोहचतो याच्या नोंदी ठेवणे सोपे जाईल तसेच ट्रक चालकाचे नाव, मोबाईल नंबर याची ही नोंद विभागातील अधिकाऱ्यांना ठेवता येईल. यामुळे धान्य घेवून जाणारा ट्रक कोठे थांबल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना समजेल. धान्य गोदामामध्ये येण्याआधी त्याचे वजन केले जाईल त्यानंतर मागणीनुसार ज्या त्या रास्त भाव दुकानांना त्याचे वाटप केले जाईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने या मध्ये काही तफावत असल्यास लगेच लक्षात येईल. या प्रणालीमुळे अधिकारी अन्य ठिकाणाहून मिळवलेल्या नोंदीही ठेवू शकतात. सध्या ही प्रणाली आपण साखरेच्या बाबतीत वापरत आहोत.‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’  मुळे रास्त भाव दुकानांसाठी परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

या प्रणाली द्वारे वेगवेगळ्या कार्यालयासाठी म्हणजेच जिल्हा अधिकारी कार्यालय,गोदाम  कार्यालय, विभागीय कार्यालय यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने सर्व लाभार्थींना धान्य घेतल्या नंतर एसएमएस येईल. ट्रक चलन निर्मितीमध्ये  देखील कोणतीही अवघड कार्यपद्धती अवलंबली गेली नसून पटकन चलन काढता येईल.  येत्या महिन्यामध्ये Government Receipt Accounting System(GRAS) प्रणाली बसवली जाणार असून अन्न धान्य विभागासाठी एक खिडकी योजना कार्यान्वयित करण्यात येणार आहे. यामुळे धान्याची चोरी आणि काळाबाजार बंद होऊन योग्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत धान्य पोहचेल. असे ही मंत्री बापट म्हणाले.

माणसातील ‘माणूस’ निर्माण करण्यासाठी वाचन महत्वाचे डॉ. अनिल अवचट

0

पुणे-माणसातील ‘माणूस’ निर्माण करण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. वाचनामुळे समस्यांकडे पाहाण्याची दृष्टी मिळते, उत्साह वाढतो, चांगले काम करण्याची उर्मी मिळते, अवांतर वाचनामुळे बुध्दीची वाढ होते. चांगले साहित्य वाचल्यावर आधीचा माणूस राहात नाही. वाचनामुळे जीवन संपन्न होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
डेकन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग‘ंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर डॉ. अवचट बोलत होते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अवचट म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तिमध्ये काही तरी चांगले दडलेले असते. परंतु पैसा आणि उपभोगाच्या दडपणाखाली तो गेलेला असतो. त्याला बाहेर काढण्यासाठी वाचन महत्वाचे आहे.’
मोबाईलच्या वापराने स्वतःचा स्वतः शी आणि इतरांशी संवाद कमी झाला आहे. तो वाढविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. रावळ यांनी दिली. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. निशा घोरपडे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्र दर्शन केले.
या प्रदर्शनात वि. स. खांडेकर, डॉ. आनंद यादव, शिवाजी सावंत, विश्‍वास पाटील, सुधा मूर्ती, ओशो, शांता शेळके, एम. एस. भैरप्पा आदी साहित्यिकांची स्वतंत्र दालने आहेत. याशिवाय अभ्यासासाठी अवांतर व पूरक साहित्य मांडण्यात आले आहे. शनिवार ता. १६ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सर्वपित्री अमावस्येच्या गूढ रात्री … कोणीतरी ‘दिसणार’ आहे तिथे ….

0

जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. तसं पाहाल तर हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. झी युवावरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘गर्ल्स हॉस्टेल’ अश्याच प्रकारची भयाची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यास यशस्वी ठरली आहे. लहान मोठ्या शहरांतील आबाल वृद्धांमध्ये ही मालिका लोकप्रिय आहे. ह्या मालिकेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या ९ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच हादरून जाते. भयाची चाहूल सोबत घेऊन आलेली “गर्ल्स हॉस्टेल …  कोणीतरी आहे तिथे” ही मालिका, सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा. झी युवावर पाहायला मिळते. 

 ‘गर्ल्स हॉस्टेल’ मध्ये आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांनी मालिकेची उत्कंठा वाढवलेली आहे. या मालिकेत सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत होत्या. पहिल्याच भागात सर्वांच्या लाडक्या साराचा अनपेक्षितरित्या मृत्यू झाला आणि हॉस्टेलमध्ये अनेक भीतीदायक घटना घडू लागल्या. आतापर्यंत हॉस्टेलमधील मुलींसोबत घडणाऱ्या गूढ घटनांची तीव्रता आता अधिक गडद होत जाणार आहे, आणि अंगावर शहरे आणणाऱ्या , काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अकल्पित घटनाची शृंखला अनुभवायला मिळणार आहे. २० सप्टेंबरच्या सर्वपित्री आमावस्या निमित्त दाखवण्यात येणाऱ्या महा एपिसोड पासून मालिका वेगळेच वळण घेणार आहे. भास आभासाच्या पलीकडे असणारी  अकल्पित शक्ती जी आपलं अस्तिव ठळक  पणे  दाखवणार आहे.  यामुळे भयाची एक वेगळीच अनुभूती आता प्रेक्षकांना महाएपिसोड पासून बघायला मिळणार आहे. “गर्ल्स हॉस्टेल …  कोणीतरी आहे तिथे” या मालिकेत नावा प्रमाणेच आता ‘कोणीतरी आहे तिथे’ या वाक्याला प्रमाण देणारी घटना घडून, सर्व पित्री अमावस्येच्या गूढ रात्री …कोणीतरी ‘दिसणार’ आहे तिथे …. आणि हे पाहण्यासाठी आपल्याला गर्ल्स हॉस्टेल रात्री १० वाजता पाहावी लागणार आहे.

‘बापजन्म’ ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला २९ सप्टेंबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन, अकर्श खुराणा आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे असून निर्मिती सुमतिलाल शाह यांची आहे. चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  यावेळी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”

‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.”

निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेबशोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५ मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.

या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. इतर तंत्रज्ञांचा चमू पुढीलप्रमाणे – छायाचित्रण दिग्दर्शक – अभिजित डी आबदे; संकलक – सुचित्रा साठे; संगीत आणि पार्श्वसंगीत – गंधार; गीते – क्षितीज पटवर्धन; ध्वनीरचना – अक्षय वैद्य; निर्मिती रचना – सत्यजित पटवर्धन; वेशभूषा – सायली सोमण; मेक-अप – दिनेश नाईक; विपणन – अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज); रंग – कलर-रेडचिलीज डॉट कॉम; व्हिज्युअल प्रमोशन्स – नवप्रभात स्तुडीओ; डिजिटल विपणन – बी बिरबल; प्रसिद्धी मोहीम – सचिन सुरेश गुरव. 

‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सेट परीक्षेतील त्रुटींबाबत समितीच्या अहवालाची माहिती द्या : खासदार वंदना चव्हाण यांचे कुलगुरूंना पत्र

0
पुणे :
मे महिन्यात सेट परीक्षेत उत्तरपत्रिका बाबत झालेल्या गोंधळासंदर्भात कुलगुरूंनी नेमलेल्या समितीच्या अहवालाचे काय झाले ? असा प्रश्न आज खासदार वंदना चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूंना विचारला आहे .  कुलसचिव  शाळीग्राम यांना  याबाबतचे  पत्र आज देण्यात आले .
या परीक्षेतील त्रुटींमुळे अन्याय झालेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळणार, कँटीन मधील जेवण व्यवस्थेतील सुविधांमधील त्रुटी, विदयार्थ्यांच्या हॉस्टेल सुविधांमधील त्रुटी असे आणि इतर अनेक प्रश्न  राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष, खासदार  वंदना चव्हाण यांनी आज दिलेल्या पत्रात विचारले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऋषी परदेशी आणि अशोक राठी यावेळी उपस्थित  होते.
विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे २५०० विद्यार्थ्यांना अनेक समस्याना सामोरे जावे लागले आहे. तरी आपण याकडे वैयक्तिक लक्ष देऊन पाठपुरावा करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.
आपण या प्रकरणात योग्य न्याय देऊ शकण्याचे  आश्वासन दिल्यास विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने हितकारक होईल, असेही पत्रात म्हटले आहे

बांधकाम व्यावसायिकांनी घेतला अद्यावत तंत्रज्ञानाचा आढावा

0

क्रेडाई पदाधिकारी आणि सभासद यांचा  दिल्ली अभ्यास दौरा संपन्न

पुणे ता. १४:- बांधकाम क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान व वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण व परवडणारी घरे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने, क्रेडाई महाराष्ट्राच्या सभासदांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा संपन्न झाला. राज्यातील १९ शहरामधील एकूण १६१ सभासदांनी यात सहभाग घेतला होता.

याविषयी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, या भेटीदरम्यान आशियाना ग्रुपचा खास ज्येष्ठ नागरिकांकरिता तयार करण्यात आलेल्या कन्फर्ट होम्स या प्रकल्पास क्रेडाईच्या सभासदांनी भेट दिली. याबरोबरच वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी भारत सिटी होम व प्री हॅब फॅक्टरी या प्रकल्पासोबतच परवडणारी घरांच्या माहितीसाठी सिग्नेचर ग्लोबल यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट देऊन तेथील तंत्रज्ञानाची व कामाची माहिती घेतली.

ते पुढे म्हणाले की, एखादी संकल्पना साकारताना प्राथमिक पातळीपासून कसे काम करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने क्रेडाई सदस्यांना मिळाली. प्रकल्पाचे नियोजन करताना सुपरवायझरचा सहभाग,संपूर्ण कर्मचाऱ्यांची एकत्रित काम करण्याची पद्धत, याचा प्रकल्पावर व पर्यायाने बांधकाम क्षेत्रावर होणारा सकारात्मक  परिणाम यांसारख्या बारकाव्यांचाही सदस्यांना अभ्यास करता आला. एटीएस यांच्या बांधकाम प्रकल्पाला दिलेल्या भेटी दरम्यान बांधकाम क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेता आली.

सिग्नेचर ग्लोबल यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट दिल्यावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीविषयी सदस्यांना मायवन या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल.  या तंत्रज्ञानाचा द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरातील प्रकल्पांना याचा फायदा होईल. दिल्लीमध्ये बांधकाम क्षेत्राला पुरविल्या जाणाऱ्या  सरकारी पायाभूत सुविधांचा सकारात्मक परिणाम येथील बांधकाम विश्वावर झालेला दिसून आला. तसेच येथील विकसक निवासी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून तसेच विकासकांकडून प्रकल्पांची देखभाल व्यावसायिकरित्या वर्षानुवर्षे केली जाते. त्यामुळेच २५ ते ३० वर्षे जुन्या झालेल्या इमारतीसुद्धा अगदी नव्यासारख्या दिसतात, असेही कटारिया यांनी सांगितले.

यावेळी आशियाना समूहाचे अध्यक्ष विशाल गुप्ता, एटीएसचे अध्यक्ष गीतांबर आनंद, भारत प्री हॅबचे अध्यक्ष एस पी सिंग, सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप अगरवाल यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी क्रेडाईच्या सदस्यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीचा सभासदांना त्यांचे पुढील प्रकल्प राबविताना भविष्यात फायदा होईल, असा विश्वासही कटारिया यांनी व्यक्त केला.

मराठी कलाकारांच्या अदाकारीने रंगला झी युवाचा ‘पुणे महोत्सव’

0

संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला ‘पुणे महोत्सव’ रविवार  १७ सप्टेंबर २०१७ ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे . मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांच्या परफॉर्मन्स या कार्यक्रमात आहेत . सुबोध भावे , सोनाली कुलकर्णी , मानसी नाईक , संस्कृती बालगुडे , सागर कारंडे , विशाखा सुभेदार , समीर चौगुले , मिलिंद शिंतरे , विजय पटवर्धन , मयुरेश पेम , प्राजक्ता माळी , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , रेशम प्रशांत आणि संगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत . प्रेक्षकांची रविवार संध्याकाळ मनोरंजित करण्यासाठीच  झी युवा  ही वाहिनी ‘पुणे महोत्सव ‘हा एक अतिशय उत्तम दर्जाचा कार्यक्रम घेऊन आलेली आहे.

झी युवा च्या ‘पुणे महोत्सव’ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे , या महोत्सवाच्या निमित्ताने झी युवा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहे . ५ गुणवान  युवतींचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात स्व कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावले अश्या प्रणिती शिंदे  ( महिला राजकारणी ) , पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर ) , गौरी गाडगीळ ( कलाकार ) , ऋतुजा केकावळे ( विद्यार्थी ) , कृष्णा पाटील ( एव्हरेस्टवीर महिला गिर्यारोहक ) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे . रविवार १७ सप्टेंबर २०१७ ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर मराठी कलाकाराच्या अदाकारीने रंगलेला आणि महाराष्ट्रातील गुणवान युवतींचा सन्मान सोहळा प्रदर्शित होणार आहे  .

स्वहितासाठी विकसक आणि अधिकारी यांच्या संगनमताने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प – पालिकेच्या संमतीशिवाय कार्यवाही नको ,आयुक्तांचे आदेश

0

पुणे-नागरिकांचा विरोध असताना , पक्की घरी जिथे आहेत अशा पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७  येथे दडपशाहीने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येतो आहे अशी तक्रार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केल्यानंतर या ठिकाणी पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी आज झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.विकसक आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकल्प नागरिकांचा विरोध डावलून स्वहितासाठी  रेटला  जातो आहे असा आरोप बागुल यांनी केला होता .

पर्वती तावरे कॉलनी येथील जागेवर एसआरए करण्यासाठी नागरिकांचा विरोध आहे. भूसंपदनाची कार्यवाही चालू असताना सदर जागेवर एसआरए प्रकल्प उभारण्याचा घाट विकसक आणि एसआरए अधिकारींच्या संगनमताने घातला जात आहे.मुळात या जागेवर जुनी पक्की घरे आहेत, असे असताना दडपशाहीचा जोरावर एस आर ए प्रक्लप राबविण्याच्या प्रकारा विरोधात माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांनी वेळोवेळी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी  झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.

गैरकारभाराविरोधात हॅचिंग शाळेसमोर “ निदर्शने “

0

पुणे -कॅम्प भागातील गोळीबार मैदानाजवळील हॅचिंग शाळेच्या गैरकारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहराच्यावतीने  शाळेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करण्यात आली . या शाळेमध्ये मध्यमवर्गीय , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावलले जाते , प्रामुख्याने येथे पैसे भरल्यानंतर त्या मुलांचे प्रवेश दिले जातात . या शाळेच्या गैर कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले . दोन लाख रुपये भरा व प्रवेश घ्या अशा रितीचा फलक लावण्यात आला आहे . ज्या विद्यार्थ्यास प्रवेश दिल्यानंतर इमारत निधी विविध प्रकारचे निधी गेली अनेक वर्ष घेतात . परंतु शाळेमध्ये कुठल्याच प्रकारची नवीन इमारत किंवा डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही यामध्ये सर्वच कारभार हा गैरकारभार पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे . या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी  माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे .

या निदर्शनांतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांची भेट  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली , त्यावेळी आपल्या मागण्याविषयी चर्चा केली .

या  आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर नेते अशोक शिरोळे, संजय सोनवणे , शशिकांत मोरे , नरेश बनसोडे , शैलेश चव्हाण , मोहन जगताप , मधुकर काशीद , बाबुराव गायकवाड , बाळासाहेब जगताप , चिंतामण जगताप ,  अन्य पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या .

राजेंद्र सरग यांना ‘दिवा प्रतिष्‍ठान’चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार जाहीर

0

पुणे – ‘दिवा प्रतिष्‍ठान’ च्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या दिवाळी अंक वाचक स्‍पर्धेचे निकाल जाहीर झाले असून सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना जाहीर झाला आहे. ‘दिवा प्रतिष्‍ठान’ ही  दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना आहे. या संघटनेच्‍यावतीने दरवर्षी वाचक स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.

सर्वोत्‍कृष्‍ट वाचकाचा प्रथम पुरस्‍कार रागिनी पुंडलिक (पुणे), द्वितीय पुरस्‍कार कल्‍पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्‍कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना जाहीर झाला आहे.  सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्‍कार नाशिकच्‍या महेंद्र देशपांडे संपादित  ‘हास्‍यधमाल’ या दिवाळी अंकाला प्राप्‍त झाला आहे.  सर्वोत्‍कृष्‍ट लेखक पुरस्‍कार अमोल सांडे, सर्वोत्‍कृष्‍ट लेखिका मोनिका गजेंद्रगडकर,  सर्वोत्‍कृष्‍ट  विनोदी लेखिका रेखा खानपुरे,  सर्वोत्‍कृष्‍ट कवी पुररस्‍कार विलास क-हाडे,  सर्वोत्‍कृष्‍ट  ज्‍योतिषविषयक दिवाळी अंक ज्‍योतिष ओनामा, वाचकांनी निवडलेला सर्वोत्‍कृष्‍ट वैशिष्‍ट्यपूर्ण दिवाळी अंक पुरस्‍कार डॉ. सतीश देसाई संपादित ‘पुण्‍यभूषण’ या दिवाळी अंकास प्राप्‍त झाला आहे.

शनिवार, दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेत दिवाळी अंक संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन होणार असून यावेळी पुरस्‍कारांचे वितरण होईल. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता सुप्रसिध्‍द उद्योजक भारत देसडला यांच्‍या हस्‍ते होणार असून अध्‍यक्षस्‍थानी सुप्रसिध्‍द वात्रटिकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म. कडू उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन ‘आपला डॉक्टर’ चे संपादक सन्ना मोरे करणार आहेत. दुपारी 1-30 ते 2-30 या वेळेत  ‘दिवाळी अंक आणि विनोदी साहित्य’ या विषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी मिलींद जोशी राहतील. यामध्‍ये भारतभूषण पाटकर, विवेक मेहेत्रे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, विनोदी कथा लेखक सुभाष खुटवड यांचा सहभाग असेल. दुपारी 2-30 ते 3-30 वाजता ‘दिवाळी अंक आणि कविता’ या विषयावरील चर्चासत्र डॉ.मनोहर जाधव यांच्‍याअध्‍यक्षतेखाली होईल. यामध्‍ये डॉ.सौ स्नेहसुधा कुलकर्णी,  संतोष शेणई, मंगेश काळे, उध्दव कानडे सहभागी होतील.

दुपारी 3-30 ते 4-30 ‘वाचकांच्या नजरेतून दिवाळी अंक’ या विषयावरील चर्चासत्रात  कल्पना बांदल,  रागीणी पुंडलिक, भूषण लोहार, प्रसाद सोवनी हे सहभागी होणार असून डॉ. अंजली पोतदार सूत्रसंचालन करणार आहेत. अध्यक्षस्थानी सचीन ईटकर असतील. सायंकाळी 4-30 ते 5-50 वाजता प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप तसेच संपादकांचे चर्चासत्र  होईल. ‘संस्कृती’ च्या संपादिका सुनीता पवार, सोनल खानोलकर, ‘भूमिका’ च्या संपादिका रुपाली अवचरे, ‘साहित्य आभा’ च्‍या संपादिका शारदा धुळप, ‘धमाल धमाका’ चे संपादक नसीर शेख, ‘कलाकुंज’ व ‘हास्यधमाल’चे संपादक महेंद्र देशपांडे, ‘आक्रोश’चे संपादक  ज्ञानेश्‍वरतात्‍या जराड, ‘विशाखा’चे  ह.ल. निपुणगे यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक सत्कार होणार असून सूत्रसंचालन सुनील गायकवाड करणार आहेत.

अधिवेशनाचे संयुक्‍त आयो‍जक चंद्रकांत शेवाळे आणि अरुण जाखडे हे असून अधिवेशनास उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजकांसह प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये, कार्यवाह शिवाजी धुरी यांनी केले आहे.

मधुरंजनीतर्फे कविता खरवंडीकर यांची मैफल

0

पुणे ता. १३. मधुरंजनी संस्थेतर्फे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व संगीत रसिक कै. मधुकर नीलकंठ ऊर्फ अप्पासाहेब भिसे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त गायिका कविता खरवंडीकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या शनिवारी (दि.१६) सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात ही मैफल रंगेल. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय व अभंग या माध्यमातून कविता खरवंडीकर आपली कला सादर करतील. यावेळी धनंजय खरवंडीकर (तबला) तर प्रसिद्ध संगीतकार संजय गोगटे (हार्मोनियम) साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य स्वरूपात खुला असेल.

कविता खरवंडीकर यांच्याविषयी :-

कविता खरवंडीकर या  डॉ. अलका देव मारुलकर आणि पं. श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर यांच्या शिष्या आहेत. पं.हळदणकर यांच्याकडून जवळजवळ २० वर्षे आग्रा व जयपूर घराण्याच्या गायकीचे विधिवत धडे त्यांनी घेतले आहेत.

‘ए. के. ई. सी.’च्या विद्यार्थ्यांनी भारताचे रशियातील उत्तम राजदूत बनावे : डॉ. अमित कामले

0

      प्रस्थानपूर्व विद्यार्थी पालक मेळावा पुण्यात संपन्न

 पुणे : ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’च्या (एकेईसी) विद्यार्थ्यांची रशियात एमबीबीएस शिक्षणासाठी जाणारी बॅच येथील अरोरा टॉवर्समध्ये नुकत्याच झालेल्या प्रस्थानपूर्व विद्यार्थी पालक मेळाव्यासाठी एकत्र आली होती. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस ‘निझ्नी नोव्हगोरोड स्टेट मेडिकल ॲकॅडमी’ व ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’ येथे वैद्यकीय शिक्षणासाठी रवाना होत आहेत. कार्यक्रमात डॉ. अमित कामले व पोर्णिमा कामले यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. मेळाव्याची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली व पाठोपाठ विद्यापीठांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘हिप्पोक्रॅटिक ऑथ’ ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम व महान डॉक्टर्स बनण्याची प्रतिज्ञा केली. ‘एकेईसी’चे संचालक डॉ. अमित कामले यांनी पालक व विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि प्रवासाचे कानमंत्र, शहरातील सुरक्षा व विद्यापीठाचा परिसर, नोंदणी व व्हिसाचे नियम, अभ्यासक्रम, परीक्षा, सुट्या, पालक व विद्यार्थ्यांची वर्तणूक व जबाबदारी आदी पैलूंवर मार्गदर्शन केले. “एकेईसीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भारताचे रशियातील उत्तम राजदूत बनावे,” असे आवाहन डॉ. कामले यांनी केले. भाषणानंतर त्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरे देण्यासाठी संवाद साधला.

 मुंबईची आकांक्षा कोकरे म्हणाली, “मी माझी बारावीची परीक्षा रामनिवास रुईया कनिष्ठ महाविद्यालयातून ६०.६२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले. ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’ आणि त्यांच्या चांगल्या कामाविषयी मी जाणून होते. त्यामुळे मी संस्थेशी व डॉ. कामले सरांशी संपर्क साधला. त्यांच्या संघाने मला व माझ्या कुटूंबियांना योग्य मार्गदर्शन केले. मी आता ‘निझ्नी नोव्हगोरॉड स्टेट मेडिकल ॲकॅडमी’मध्ये शिक्षण घेणार आहे. भवितव्याबाबत मी खूप उत्सुक असून या प्रस्थानपूर्व मेळाव्याला उपस्थित राहताना मला खूप आनंद झाला. हा मेळावा विद्यार्थी व पालकांचे शंकासमाधान करण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परस्परांशी संवाद साधण्यासाठी मदत करणारा आहे.”

 साताऱ्याचा आशुतोष कातवटे म्हणाला, “ मी माझी एनईईटी परीक्षा यंदा उत्तीर्ण झालो, पण तरीही मी ‘निझ्नी नोव्हगोरॉड स्टेट मेडिकल ॲकॅडमी’मध्ये शिकण्याचा निर्णय घेतला. तेथे मी अधिक प्रगत अनुभव घेईन, जो मला माझी उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी साह्यभूत ठरेल.”

 पुण्याचा विश्वास अरुडे म्हणाला, “मी बारावीला ८१.५४ टक्के गुण मिळवले असून माझी ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. मी माझे शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण करेन आणि ‘एमसीआय’ची चाचणी पहिल्या प्रयत्नात पूर्ण करेन, याची खात्री आहे.” 

 पुण्याचा रोहन वाळुंज म्हणाला, “मी वर्ष २०१४ मध्ये बारावीत ७०.४६ टक्के गुण मिळवले. मी भारतात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला डोनेशन परवडत नव्हते. डॉ. कामले यांनी प्रेरणा देऊन माझे नीतिधैर्य उंचावले. मी आता ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षण घेणार असून त्याचा खूप आनंद झाला आहे.”

 भुसावळच्या पूजा चौधरी या विद्यार्थिनीची आई सौ. मीनाक्षी चौधरी म्हणाल्या, “मी ग्रामीण पार्श्वभूमीतून आले आहे. आपल्या मुलीला रशियामध्ये शिक्षण द्यावे, अशी आमची कधीही योजना नव्हती, पण डॉ. कामले यांची भेट घेऊन मला खूप आनंद झाला. केवळ मीच नव्हे, तर भारतभरातील लाखो पालकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. माझी मुलगी सुरक्षित हातांत आहे, इतकेच मी म्हणून शकते.”

 वसईच्या निनाद धुरी या विद्यार्थ्याची आई सौ. प्रियांका धुरी म्हणाल्या, “माझा मुलगा ‘निझ्नी नोव्हगोरॉड स्टेट मेडिकल ॲकॅडमी’मधून यंदा पदवीधर होईल. ही अत्यंत नामवंत व शिस्तशीर ॲकॅडमी असून तेथे भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. चालू वर्षी प्रस्थान करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.”

प्रथम राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलनात पर्यावरणप्रेमींचा सत्कार

0
पुणे :
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्था यांच्या वतीने पर्यावरण साहित्य संमेलन
​ २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात ​पर्यावरण संवर्धनाच्या विविध कामात कार्यरत असलेल्या
​रवींद्र धारिया (वनराई), नीलेश इनामदार (एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया)
​या ​पर्यावरण रक्षकांचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पर्यावरण मित्र पुरस्कार​’ देऊन सत्कार करण्यात आला.
​विनोद बोधनकर (जलबिरादरी), ललीत राठी (जन आधार) यांच्या हस्ते
​हा सत्कार समारंभ ​बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी
​झाला. संमेलनाचे हे प्रथम वर्ष होते. ​
कार्यक्रमाचे संयोजन संजय काळभोर (तेजस्विनी संस्था) यांनी केले. शामला देसाई समन्वयक होत्या.

व्होडाफोनतर्फे यूके आणि युरोपमध्ये 180 रुपये प्रतिदिन अशी पहिलीच अमर्याद आंतरराष्ट्रीय रोमिंग योजना सुरू

0

 

आंतरराष्ट्रीय रोमिंग आता आणखी व्यापक आणि भव्य झाले आहे! भारतातील एक आघाडीची दूरसंचार सेवा असलेल्या
व्होडाफोन इंडियाने आज युरोपात प्रवास करणा-या प्रवाशांसाठी प्रथमच, चिंतामुक्त, अमर्याद आंतरराष्ट्रीय रोमिंग
सुविधा देणारी व्होडाफोन आय-रोमफ्री ही आंतरराष्ट्रीय रोमिंग योजना सुरू केली.
प्रवास व्यावसायिक कारणांसाठी असो, वा केवळ सहलीचा आनंद लुटण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आपला पॅक
एक्टिव्हेट करून आपला क्रमांक यूके, जर्मनी, स्पेन, इटली, नेदरलँड्स, तुर्की, ग्रीस, पोर्तुगाल, झेक रिपब्लिक, रुमानिया,
हंगेरी, माल्टा आणि अल्बानिया येथे वापरता येईल.
युरोपव्यतिरिक्त प्रवाशांना अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि मलेशिया या देशांतही या योजनेद्वारे
अमर्याद कॉलिंग आणि डेटा वापरता येईल. एकूण 18 देशांत या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. ही योजना 28
दिवसांसाठी 5000 रुपये (म्हणजे 180 रुपये प्रतिदिन) ते प्रत्येक 24 तासांच्या वापरासाठी 500 रुपये अशा विविध
किंमत स्तरांमध्ये उपलब्ध आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना माय व्होडाफोन एपवरून किंवा वेबसाइटवरून
(www.vodafone.in/ir) ही योजना एक्टिव्हेट करता येऊ शकेल.
व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘आम्ही अमेरिका,
सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी एप्रिलमध्ये आमची ही अमर्याद आंतरराष्ट्रीय रोमिंग योजना सुरू केली आणि
आता ती आणखी काही देशांसाठी लागू करण्यास आम्हांस आनंद होत आहे. युरोप, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात आणि
मलेशिया या ठिकाणी जाण्याचे आमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी ग्राहकांचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. आता कॉल
आणि डेटा विनामूल्य झाल्याने, प्रवाशांना तेथे जाताना तेथील स्थानिक सिमकार्ड नेण्याची किंवा सार्वजनिक वाय-फाय
सुविधा शोधत हिंडण्याची गरज नाही. ग्राहकांना आपल्या नेहमीच्या व्होडाफोन क्रमांकावरून आंतरराष्ट्रीय रोमिंगच्या
बिलाची चिंता न करता छायाचित्रे आणि व्हिडिओ सहजपणे अपलोड करणे, नकाशा पाहणे, ई-मेल तपासणे आणि
घरच्यांशी संपर्कात राहणे शक्य होणार आहे. प्रवास करताना ते निश्चिंतपणे संपर्कात राहू शकतील आणि त्यांना सर्वोत्तम
व्हॉइस आणि डेटा सेवा मिळेल.’
जगभरातील 18 देशांत अमर्याद वापराची सुविधा देण्याबरोबरच याच पॅकमध्ये ग्राहकांना त्यांना त्यांचा फोन 42 इतर
देशांतही मुक्तपणे वापरता येईल. या पॅकमध्ये व्होडाफोनने नुकताच जपान, कतार, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, इजिप्त या
देशांचाही समावेश केला आहे. या सर्व देशांत ग्राहकांना इनकमिंग कॉल विनामूल्य मिळतील आणि एक रुपया प्रतिमिनिट
या दराने कॉल करता येतील, तर एक रुपया प्रतिएमबी या दराने डेटा वापरता येईल.