Home Blog Page 3273

महारावल रतन सिंह लूकसाठी लागले 4 महिने आणि 22 कारागीर !

0

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यादाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि बहादूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर ह्या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय.

दिल्लीच्या डिझाइनर रिंपल आणि हरप्रीत नरूला ह्यांनी शाहिद कपूरचा हा राजेशाही लूक डिझाइन केलाय. त्यासाठी राजस्थानच्या ऑरगॅनिक फॅब्रिकवर 22 स्थानिक कारागिरांनी बुद्देदारी वर्क करून महारावल रतन सिंहचा लूक चार महिने कसून मेहनत करून बनवला आहे. ह्या शाही कपड्यांमध्ये तपशीलावार काम झालेले दिसून येते आहे. राजस्थानी पारंपरिक रंगांचा वापर तर शाहिदच्या ह्या कपड्यांमध्ये झालेलाच आहे. त्याचप्रमाणेच महारावल रतन सिंहचा शाही आणि मर्दानी अंदाजही दाखवण्यासाठी बारकाईने काम करण्यात आलंय.

वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि  संजय लीला भन्साली प्रॉडक्शनचा पद्मावती चित्रपट 1 डिसंबर 2017 ला झळकणार आहे.

‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ तर्फे ८ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन

0
दिनांक २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी ‘शांतीमार्च’चे आयोजन 
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सलग ८ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. दिनांक १ ते ८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये होणाऱ्या या सप्ताहाचे उदघाटन प्रा. डॉ. गणेश देवी (प्रवर्तक : दक्षिणायन सांस्कृतिक चळवळ), यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) असतील, अशी माहिती गांधी सप्ताहाच्या संयोजकांनी दिली.
 या वर्षीचा गांधी सप्ताह ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’,

​गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले , ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात येते. हा ‘शांती मार्च’ सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘शांती मार्च’ चा मार्ग सेनापती बापट पुतळा, अलका चौक, कुमठेकर रोड, बाजीराव रोड,  सी​टि पोस्ट मार्गे शनिवार वाडा असा असून, शनिवार वाडा येथे समारोप सभा होईल.’
सप्ताह कालावधीत खा​दी​, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा बाबत संस्थेचे सचिव अन्वर राजन आणि संयोजक संंदीप बर्वे यांनी माहिती दिली.
रविवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी

दुपारी ३​वाजता प्रा. डॉ. गणेश देवी (भाषातज्ञ् आणि दक्षिणायन चळवळीचे प्रवर्तक) यांच्याशी चर्चा, सायंकाळी ५ वाजता
​सर्वधर्म प्रार्थना आणि ​सप्ताहाचे उदघाटन  डॉ. देवी यांच्या हस्ते होणार आहे. ​
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८. ३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचे प्रार्थना व भजन, सकाळी ९ वाजता (सेनापती बापट पुतळा, अलका टॉकीज ते शनिवारवाडा) मार्गे शांती मार्च चे आयोजन, सायंकाळी ४ वाजता ‘महात्मा’ (जीवनपट )​ दाखविला जाणार आहे. ​
मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शिक्षणतज्ञ अनिल सद्गोपाल यांच्याशी खुला संवाद, दुपारी २ ते ५  ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ चित्रपट , सायंकाळी ५ वाजता​ सद्गोपाल यांचे ‘शिक्षणक्षेत्रातील समस्या व उपाय’ या विषयावर सद्गोपाल यांचे

​व्याख्यान​ होईल. ​

दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘शेती आणि मेक इन इंडिया’ विषयावर कार्यशाळा : वक्ते विजय जावंधिया (शेतकरी आंदोलनातील कार्यकर्ते , वक्ते आणि लेखक) आणि मिलिंद मुरुगकर (अर्थतज्ञ आणि विश्लेशक ), सायंकाळी ६ वाजता अमरेंद्र धनेश्वर यांचे भक्ती आणि सुफी संगी​टाचे आयोजन. ​गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी  ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व दशहतवादाचे स्वरूप’ विषयावर कार्यशाळा -वक्ते लक्ष्मीकांत देशमुख (लेखक आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी), सायंकाळी ६ वाजता काव्यांजली कार्यक्रमात कोजागिरीनिमित्त ‘त्रिभाषिक मुशायरा’ -कवी प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी नझीर फतेहपुरी,

​ सहकारी यांचा सहभाग​ आहे. ​शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज कुलकर्णी (पंडीत नेहरूंचे अभ्यासक) यांच्याबरोबर चर्चा, सायंकाळी ६ वाजता ‘आधुनिक भारताचे निर्माते’ विषयावर ​कुलकर्णी यांचे ​व्याख्यान होईल. ​ शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिग्नेश मेवाणी (दलितांतवर होणार्‍या हल्ल्यांविरुद्ध लढणारे तरुण नेते, गुजरात), विश्‍लेषक तुषार गांधी (गांधीजींचे पणतू) आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. मिलिंद आव्हाड (जेएनयू, दिल्ली) यांच्याशी चर्चा,  सायंकाळी ६ वाजता   ‘जाती का सवाल और वर्तमान दलित राजनीती’ विषयावर

​या वक्त्यांच्या ​समारोपानिमित्त परिसंवा​दाचे आयोजन ​
​रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ ‘लघुपट निर्मिती’ कार्यशाळा :  मार्गदर्शक अशोक राणे (समीक्षक लेखक आणि दिग्दर्शक), दुपारी ३. ३० वा. ‘रोड टू संगम’  चित्रपट, दुपारी ४ वा जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग. असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात होतील.

INIFD DECCAN (पुणे) सेमिनार : सर्व डिझायनर साठी विनामूल्य

0

पुणे: पुण्यातील डेक्कन येथे INIFD ची विनामूल्य, सेमिनार आयोजित केला होता .इच्छुक डिझायनर्ससाठी हा सेमिनार अनुभव समृद्ध करणारा ,आणि माहितीपूर्ण होता . या कार्यशाळे विद्यार्थयांनी आनंददायी वातावरणात महत्वपूर्ण माहिती शिकली .

मॅनेजमेंटचे एक सन्माननीय सदस्य म्हणून मिसेस प्रियंका ढोले यांनी विद्यार्थ्यशी सवांद साधला . त्यांनी पालकांशी , INIFD च्या दैनंदिन क्षेत्रातील करिअर संधी आणि INIFD डेक्कनच्या यशाची माहिती दिली .त्या नंतर मिस आयेशा मुन्शी (लक्झरी ब्रॅण्ड आणि मॅनेजमेंटमधील मास्टर्स तील फॅशन ग्रॅज्युएट, INIFD डेक्कन येथे फॅशन आणि मॅनेजमेंट टीमचा एक भाग) यांनी डिझाइन तयार करण्यावर चर्चा झाली. फॅशन, आणि डिझाइनच्या क्षेत्रातील ग्राहकांचे विचार आणि त्यांची पसंती व नापसंतता तपासणी साठी आणि सतत डिझाईन्स निर्माण करणे शक्य व्हावे यासाठी उपभोगताची गरजांची पूर्तता करणे हे सर्वात महत्वाचे आहे. तार्किकदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गोष्टीची आणि स्मार्ट डिझाइनरची जाणीव असणाऱ्या बाबीबद्दल आयेशा यांनी तपशीलवार माहिती दिली .
टेक्स्चर कॅनव्हास पेंटिंग हे आर्ट पेंटिंगचा आधुनिक अर्थ आहे. कलात्मक काम निर्माण करणे इच्छिणा-या कलावंतांसाठी,तसेच वापरात आणणारी सामुग्री महत्त्वाची आहेत.कॅनव्हासवरील टेक्सचर पेंटिंगचा मुख्यतः भिंतींवर, चित्रकारांच्या स्वरूपात डेकोरेटरच्या हेतूसाठी, वायर्सवर वापर केला जातो . नुकताच टेक्सचर पेंटिंग ,फर्निचरिंग, कॉस्ट्यूम डिझाईन्स, आणि स्पेस-इन स्पेसेससह स्टाइलिश पार्टीशन्स तयार करण्यासाठी वापरले जाते.

विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा आनंद घेतला . त्यांना समकालीन फॅशन आर्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता समजली, केवळ एक सहभागी म्हणूनच नव्हे तर वैयक्तिक म्हणूनही, या सेमिनारचा उपयोग झाला . डिझाइनचे प्रयोग संकल्पनात्मक समजून घेण्याच्या दृष्टीने स्पष्ट आणि ग्रॅन्युलॅरिटी प्राप्त झाली आहे, प्रत्येक सहभागींसाठी हायलाइट्स आणि महत्वपूर्ण गोष्टी घेण्यासाठी होता. त्यांनी पॅकेजच्या उत्तम प्रयोग आणि डिझाइनची प्रशंसा केली.

इंटेक्स 2जी हँडसेट्सवरील व्होडाफोन रिचार्जवर मिळवा 50 टक्के कॅशबॅक

0

इंटेक्स 2जी फीचर फोनवर व्होडाफोनचे 100 रुपयांपर्यंतचे रिचार्ज करा आणि मिळवा 50 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम, 18 महिन्यांसाठी करा 900 रुपयांपर्यंतची बचत

–          इंटेक्सतर्फे 2जी हँडसेट्सवर 180 दिवसांची खास रिप्लेसमेंट वॉरंटी योजना  

 

मुंबई – भारतातील आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षक योजना पुरविण्याची खासियत कायम ठेवत भारतातील आघाडीची मोबाइल हँडसेट कंपनी इंटेक्स टेक्नॉलॉजीजशी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे इंटेक्सच्या 2जी फीचर फोनवर  100 रुपयांपर्यंतचे रिचार्ज केल्यास 50 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

इंटेक्सचा 2जी हँडसेट वापरणा-या व्होडाफोन ग्राहकांना 100 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्हॉइस प्लॅन रिचार्जसाठी 50 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम किंवा 50 टक्के कॅशबॅक मिळेल. यामुळे 18 महिन्यांच्या कालावधीत 900 रुपयांपर्यंत बचत करणे शक्य होणार आहे. ग्राहकांना या कॅशबॅकचा वापर व्हॉइस कॉल्स, एसएमएस आणि मूल्यवर्धित सेवांचा आनंद घेण्यासाठी करता येईल. ही कॅशबॅक योजना 31 ऑक्टोबरपर्यंत असून, इंटेक्सच्या नुकत्याच सुरू झालेल्या नवरत्न मालिकेतील फोन्ससह आधीच्या आणि आगामी 2जी फीचर फोन मॉडेल्ससाठी ती लागू असेल.

व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, सध्या सणासुदीचा काळ असून, तो अधिक आनंदी व्हावा, यासाठी व्होडाफोन आकर्षक अशा कॅशबॅक योजना सादर करत आहे. व्होडाफोन आणि इंटेक्सच्या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना आपल्या प्रियजनांशी दीर्घ संवाद साधण्याचे एक निमित्त मिळणार आहे. फीचर फोन वापरणा-या आमच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ही आणखी एक मूल्यवर्धित सेवा असून, याद्वारे ते आपल्या या नव्या उपकरणाचा पुरेपूर वापर करू शकतील.

इंटेक्स टेक्नॉलॉजीजच्या संचालक आणि व्यवसाय प्रमुख निधी मार्कंडेय म्हणाल्या, व्हॉइस योजनांसाठी आम्ही व्होडाफोनबरोबर केलेल्या भागीदारीमुळे फीचर फोन वापरणा-या ग्राहकांना सध्याच्या सणासुदीच्या काळात आपले कुटुंबीय आणि स्नेह्यांबरोबर अधिक व्हॉइस कॉल्स करणे शक्य होणार आहे. व्होडाफोनचे भारतभरातील नेटवर्क आणि इंटेक्सचे वितरण जाळे याचा ग्राहकांना फायदा होईल. भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर फीचर फोन

 

 

वापरले जातात. स्मार्ट फोनच्या लाटेत या ग्राहकांच्या गरजा भागवणेही आवश्यक असल्याने आम्ही सर्व प्रकारच्या इंटेक्स फीचर फोनसाठी खास रिप्लेसमेंट वॉरंटी योजनाही आणली आहे.

याशिवाय इंटेक्सद्वारे सर्व 2जी फीचर फोन्ससाठी खास 180 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी सेवा पुरवली जात आहे. ही योजना मोबाइल फोन आल्याची तारीख कोणतीही असली, तरी लागू असेल. मात्र, तो मोबाइल फोन 1 सप्टेंबर 2017 पासून एक्टिव्हेट झालेला असला पाहिजे.

प्रत्येक स्त्री ही उपजत मॅनेजमेंट गुरू असते” महापौर-मुक्ता टिळक

0

पुणे-स्त्रियांमध्ये उपजतच मॅनेजमेंट कला असते ,दैनंदिन जीवनामध्ये, याच कलेचा वापर करून आपल्यासाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न त्या करतात, आणि त्यात यशस्वीही होतात असे प्रतिपादन येथे महापौर मुक्ता टिळक यांनी केले .
तेजस्विनी मंच आयोजित ‘शक्ती पुरस्कार’ वितरण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. समाजामध्ये ठळक असे कर्तृत्व गाजवून, ज्यांनी समाजाला एक दिशा दिली आहे, अश्या हिरकणीचा सन्मान करून, त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा गेली 2 वर्षे आयोजित करण्यात येत आहे, असे तेजस्विनी मंचाच्या संस्थापिका व नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे म्हटल्या. सत्कार मूर्तींमध्ये सुचेता फासे, प्राचार्य दिलासा केंद्र, वसुधा खरे, अध्यक्ष सुरभी महिला नागरी सहकारी पतसंस्था,डॉकटर मृणमयी अवचट,राणी थोपटे, अंगणवाडी शिक्षिका, पूनम तेलंग, जीविका फाउंडेशन, आपलं बालभवन च्या वृंदा देशपांडे, शास्त्रीय गायिका पल्लवी पोटे, व 15 वर्षांपासून वस्ती विभागात बचत गट व महिला उद्योग गट चालवणारे प्रीती सोनवणे,यांचा समावेश होता. भालाफेक मध्ये राज्यस्तरावर 9 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 2 रौप्य 1 कांस्य गीता शिंदे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामाजीक भोंडल्याने झाली, ज्यामध्ये ‘बेटी बचाव,बेटी पढाओ’ आणि कचरा वर्गीकरण चा संदेश देणारया गीताचे सादरीकरण झाले .
कार्यक्रम  शिवसागर सिटी हॉल, सनसिटी रोड, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथे संपन्न झाला.सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते

डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये सामाजिक भोंडला

0
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये सामाजिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. भोंडल्याच्या पारंपरिक गीतांऐवजी एक अक्षर लिहू…दोन अक्षर लिहू….पाचा अक्षरी परमेश्‍वर, आज कोण वार…आज आहे सोमवार…स्वच्छता अभियान राबवू या…परिसर स्वच्छ ठेवूया अशी आधुनिक काळाला सुसंगत भोंडल्याची गाणी गाऊन ङ्गेर धरण्यात आला.
वैज्ञानिक दृष्टिकोन, साक्षरता, स्वच्छता अभियान, वाहतुकीचे नियम पाळा, पर्यावरण रक्षण, बेटी बचाओ, स्त्री भ‘ूण हत्या, ग‘ाम विकास, शौचालयाचा वापर करावा, अस्वच्छतेतून होणारे आजार याबाबत जनजागृती करणारे सामाजिक संदेश देणार्‍या गीतांचा समावेश होता. याशिवाय मुलांना पौष्टिक व सकस आहाराचे सेवन करावे, जंक ङ्गूड टाळावे यासाठी विशेष गीताची रचना करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी संकलित केलेली पुस्तके निवारा वृध्दाश्रमाला भेट देण्यात आली. वनवासी कल्याण आश्रमाला तुरडाळ भेट देण्यात आली. गायत्री जवळगीकर, सिमा हणमंते, किर्ती देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सिमरन गुजर यांनी आभार मानले. ग‘ेसी डिसोझा, अंजली शेवाळे, मुग्धा श्रीखंडे, हर्षदा कारेकर, सुनेत्रा वेदपाठक यांनी संयोजन केेले. पालक संघाचे विशेष सहकार्य लाभले.
‘चला भारत घडवूया’ बीएमसीसीत पथनाट्य
– स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मेक इन इंडिया कार्यक‘माअंतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) अकरावीच्या विद्यार्थ्यांनी ‘चला भारत घडवूया’ हे पथनाट्य सादर केले. यावेळी ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते ङ्गेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. उपप्राचार्य जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक, श्री. नायकवडी, प्राध्यापिका रुपाली देशपांडे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.

पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेट्‌स संघाला विजेतेपद

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित पाचव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेट्‌स संघाने ईगल्स संघाचा 4-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात कॉमेट्‌सने 
गल्सचा 4-3(10-7 गुणांनी)असा पराभव केला. सामन्यात गोल्ड खुला दुहेरी गटात कॉमेट्सच्या सलोनी तपस्वी व सुदर्शन बिहानी यांना ईगल्सच्या आर्य देवधर व मिहीर पाळंदे यांनी 00-21, 01-21 असे पराभूत करून  आघाडी घेतली. त्यानंतर सिल्व्हर खुला दुहेरीत कॉमेट्सच्या अतुल बिनीवाले व तुषार नगरकर यांनी ईगल्सच्या नितीन कोणकर व मकरंद चितळे यांचा 15-09, 15-12 असा तर गोल्ड मिश्र दुहेरीत कॉमेट्सच्या आदिती रोडे व अंकुश जाधव या जोडीने ईगल्सच्या दीपा खरे व अमित देवधर या जोडीचा 21-16, 21-16 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्यात पुनरागमन करत सिल्व्हर मिश्र दुहेरीत ईगल्सच्या गोपिका किंजवडेकर व मंदार विंझे यांनी कॉमेट्सच्या दिया मुथा व साहिल गुप्ता 15-01, 15-10 असा तर, सिल्व्हर खुला दुहेरीत ईगल्सच्या निनाद देशमुख व अजिंक्‍य मुठे यांनी कॉमेट्सच्या पराग चोपडा व जयदीप कुंटेयांचा 15-08, 15-09 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरीत कॉमेट्सच्या राजेंद्र नाखरे व अनिल देडगे यांनी ईगल्सच्या हरीश गलानी व अविनाश भोसले या जोडीचा 21-19, 17-21, 11-09 असा तर, गोल्ड खुला दुहेरीत  कॉमेट्सच्या तेजस चितळेने मिहीर केळकरच्या साथीत ईगल्सच्या संग्राम पाटील व मधुर इंगळहळीकर यांचा 21-17, 21-17 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत फाल्कन्स संघाने स्पुटनिक्‍स 4-1(12-1गुणांनी) असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. विजयी संघाकडून सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा, विनीत रुकारी व अमर श्रॉफ, आदिती महाजन व रणजित पांडे, आनंद शहा व प्रविण गुजर यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मधुर बेझबोरा व ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे उपाध्यक्ष गिरीश नातू, क्लबचे सचिव कुमार ताम्हाणे, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे, क्लबच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य गिरीश करंबेळकर, सिद्धार्थ निवसरकर, बिपीन चोभे, अभिषेक ताम्हाणे, स्पर्धा संचालक वरूण खानवलकर, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
कॉमेट्‌स विजयी विरुद्ध ईगल्स 4-3(10-7 गुणांनी) गोल्ड खुला दुहेरी गट : सलोनी तपस्वी व सुदर्शन बिहानी पराभूत विरुद्ध आर्य देवधर व मिहीर पाळंदे 00-21, 01-21;  सिल्व्हर खुला दुहेरी ःअतुल बिनीवाले व तुषार नगरकर विजयी विरुद्ध नितीन कोणकर व मकरंद चितळे 15-09, 15-12;  गोल्ड मिश्र दुहेरी ः आदिती रोडे व अंकुश जाधव विजयी विरुद्ध दीपा खरे व अमित देवधर 21-16, 21-16; सिल्व्हर मिश्र दुहेरी ः दिया मुथा व साहिल गुप्ता पराभूत विरुद्ध गोपिका किंजवडेकर व मंदार विंझे 01-15, 10-15;सिल्व्हर खुला दुहेरी ःपराग चोपडा व जयदीप कुंटे पराभूत विरुद्ध निनाद देशमुख व अजिंक्‍य मुठे 08-15, 09-15; 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी ः  राजेंद्र नाखरे व अनिल देडगे विजयी विरुद्ध हरीश गलानी व अविनाश भोसले21-19, 17-21, 11-09;गोल्ड खुला दुहेरी ः तेजस चितळे व मिहीर केळकर विजयी विरुद्ध संग्राम पाटील व मधुर इंगळहळीकर 21-17, 21-17);
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी: फाल्कन्स विजयी विरुद्ध स्पुटनिक्‍स 4-1(12-1गुणांनी) गोल्ड खुला दुहेरी गट : सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. अंकित दामले व बिपिन देव 21-16, 21-15; सिल्व्हर खुला दुहेरी ः विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि.नीलेश केळकर व अमोल मेहेंदळे 11-15, 15-10, 11-4;गोल्ड मिश्र दुहेरी ः आदिती महाजन व रणजित पांडे वि.वि.अनिश राणे व सारा नवरे 21-07, 21-10; सिल्व्हर मिश्र दुहेरी ःमेघना रानडे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध दीप्ती सरदेसाई व श्रीधर चिपळुणकर 07-15, 05-15;सिल्व्हर खुला दुहेरी ः आनंद शहा व प्रविण गुजर वि.वि.प्रीती सप्रे व विश्वेश कटककर 15-11, 15-04).
इतर पारितोषिके:
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: आर्य देवधर(ईगल्स);
49 वर्षांवरील सर्वोत्कृष्ट खेळाडू: बिपीन देव(स्पुटनिक्स);
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू(गोल्ड): आदिती महाजन(फाल्कन्स);
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू(सिल्वर): गोपिका किंजवडेकर(ईगल्स);
सर्वोत्कृष्ट खेळाडू(गोल्ड):सुमेध शहा(फाल्कन्स);
सर्वोत्कृष्ट खेळाडू(सिल्वर):अजिंक्य मुठे(ईगल्स);
मोस्ट प्रॉमिसिंग प्लेअर: मिहीर पाळंदे;
प्लेअर ऑफ द फायनल: राजेंद्र नाखरे व अनिल देडगे

३०० मुलींचे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन

0

पुणे– पैठणीचा घोळ ग … हिरव्या साडीला पिवळी किनार, आज मंगळवार देवीचा वार गं …..या महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा मातेच्या आळवणीने पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी करत आज मंगळवारी दुपारी सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिराचा परिसर मंगलमय करून टाकला. मुलींचा उत्साह पाहून अभिनेत्रींनाही मुलींची शिकवणी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही कन्यापूजन उत्साहात साजरे केले.
महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त आज मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, संत नामदेव प्राथमिक विद्यालय , सीताराम आबाजी बिब्वे स्कूल , भामरे स्कूल आदी शाळांमधील ३०० मुलींचे कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , विश्वस्त तृप्ती अगरवाल ,ऍड . प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले , विश्वस्त रमेश पाटोडीया, माजी नगरसेवक शिव मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी ४. वाजता सरसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला. आरंभी विविध शाळांमधील मुलींनी जय मातादीचा जयघोष केला. त्यापाठोपाठ पैठणीचा घोळ गं , हिरव्या साडीला पिवळी किनार… आज मंगळवार आज देवीचा मंगळवार. आणि चोरी चोरी माखन खा गये , यशोदा के ललनवा…. हि गीते सादर केली.
त्यांनतर अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांनी मुलांना उपदेश करणारे गीत ऐलमा पैलमा गणेशदेवा शिकणे … गणपतीच्या हातात मोदक .. तुमच्या हाती पाटी … तुम्ही चांगले शिका … हे गीत त्यांच्याकडून गाऊन घेतले. त्यांनंतर मुलींशी संवाद साधताना जेमनीस म्हणाल्या कि , मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा.
अभिनेत्री ज्योत्स्ना म्हाळसे यांनी मुलींची शिकवणीच घेतली. त्यांनी या मुलींना तुमची शाळा आवडते का.. शाळेत काय शिकवलं जात. असं विचारत देवीची माहितीही समजावून दिली. यांनतर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी मुलींना सांगितले कि, मुलींनी खेळण्याबरोरबरच भरपूर वाचन करावे.
या अभिनेत्रींच्या भाषणानंतर कन्यापूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या तिन्ही अभिनेत्रींनींनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना मळून त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे या मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिले.

दिवाळी अंकाची परंपरा जपणं गरजेचं – राज ठाकरे

0

झी मराठी दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केलं मत

“दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा फक्त मराठी साहित्यात आहे. आपलं साहित्य, संस्कृती , कला क्षेत्र समृद्ध करण्याचं काम दिवाळी अंक करतात. आजच्या डिजीटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात. अशावेळी झी मराठीसारखी एक प्रतिथयश वाहिनी दिवाळी अंक घेऊन येतेय हे उल्लेखनिय आहे. यानिमित्ताने दिवाळी अंकाला एक वेगळं वलय मिळेल आणि दिवाळी अंकाची परंपरा जपली जाईल. ही परंपरा जपणं आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे” असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा श्री. राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. निमित्त होतं झी मराठी वाहिनीच्या उत्सव नात्यांचा या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचं. मुंबईतील भाईदास सभागृहात हा प्रकाशनाचा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अंकाचे संपादक प्रशांत दळवी, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, इंडिया प्रिंटीग प्रेसच्या राधिका लिमये, झी मराठीच्या क्लस्टर हेड शारदा सुंदर आणि सौमिल क्रिएशन्सचे सुनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. झी मराठी वाहिनीला अठरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजवरच्या प्रवासातील मालिकांच्या शीर्षक गीतांनी सजलेला नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात हे दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. येत्या शनिवारी, ३० सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

झी मराठी वाहिनीने नुकताच आपला अठरा वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. या प्रवासात अनेक मालिका आल्या , अनेक व्यक्तिरेखा आल्या आणि या सा-यांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ज्याप्रमाणे या मालिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या त्याच प्रमाणे लक्षात राहिली ती मालिकांची शीर्षकगीते. आजही आभाळमाया, वादळवाट या मालिकांची गीतं प्रेक्षकांच्या ओठांवर रुळलेली आहेत. या प्रत्येक गाण्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. ती गोष्ट प्रेक्षकांच्या समोर यावी, त्या आठवणींना उजाळा मिळावा या हेतूनेच नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये आभाळमायापासून ते आजच्या लागिरं झालं जी पर्यंतच्या अनेक मालिकांचे शीर्षक गीतं मान्यवर गायकांनी सादर केली. यामध्ये रविंद्र साठे, बेला शेंडे, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, माधुरी करमरकर, जान्हवी प्रभू अरोरा, आनंदी जोशी, रोहित राऊत, किर्ती किल्लेदार, सावनी रविंद्र,संदीप उबाळे, जयदीप वागबावकर, मधुरा कुंभार, मंगेश बोरगावकर, प्रविण कुंवर आदी गायकांचा समावेश होता. यावेळी गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी ‘आभाळमाया’, ‘मानसी’, ‘वादळवाट’ या मालिकांच्या शीर्षकगीतांच्या निर्मितीची गोष्ट सर्वांना सांगितली. बसमधून प्रवास करत असतांना बसच्या तिकीटावर लिहिलेलं आभाळमायाच्या गाण्याचा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. याशिवाय अशोक पत्की यांनी गाण्यांच्या निर्मितीचे किस्सेही सांगितले. या कार्यक्रमादरम्यानच झी मराठीच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

कार्यक्रमांचं सुत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी केलं तर लेखन श्रीरंग गोडबोलेंनी तर दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं.

झी मराठीच्या अठरा वर्षांच्या आठवणींना उजाळा देणारा हा नक्षत्रांचे देणे येत्या शनिवारी ३० सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे

अश्विनी भावेने साजरी केली ‘अशी हि बनवाबनवी’ ची २९ वर्षे!

0

 

२३ सप्टेंबर २०१७ रोजी अशी हि बनवाबनवी ह्या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण झाली. १९८८ साली २३ सप्टेंबर
रोजीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अर्थात प्रेक्षकांनी ‘अशी हि बनवाबनवी’; ला जो काही उदंड
प्रतिसाद तो आपण आजहि ह्याची देही ह्याची डोळा पाहत आहोत. अगदी आजच्या पिढीला देखील ह्या
चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत. विशेष म्हणजे त्यातला लिंबू कलरच्या साडीचा किस्सा तर सर्वांच्याच
आवडीचा आहे! अश्विनी भावे आणि अशोक सराफ या दोघांचा तो सीन आजहि आपण आवडीने पाहतो.
अशी हि बनवाबनावी ची २९ वर्षे ; हे निमित्त साधून अश्विनी भावे यांनी आपल्या फेसबुक पेज वर
चित्रपटातल्या काही सीन्सना एकत्र करून एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. अवघ्या एक
दिवसात ह्या व्हिडीओला १५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. लोकांचं हे प्रेम पाहून अश्विनी भावेना देखील
आश्चर्य वाटलं. आजही लोकं लिंबू कलरची साडी, माधुरी आणि धनंजय माने या पात्रांमध्ये अगदी सहज
मिसळून जातायंत हे पाहून अश्विनीजीना हि नवल वाटलं. विशेष म्हणजे आताहि पिढी देखील हा चित्रपट
आनंदाने पुन्हा पुन्हा पाहते, ह्याच अश्विनीजीना खास कौतुक वाटलं. आजही हा चित्रपट जेवढा मागच्या
पिढीचा तेवढाच आजच्या पिढीचा आहे हे इथे पाहायला मिळतंय.
या आधी काही दिवसांपूर्वी म्हणजेच १९ सप्टेंबर २०१७ रोजी अश्विनी भावे यांनी आपली ऑफिशिअल
वेबसाईट (www.ashvinibhave.com) लाँच केली होती आणि या उपक्रमालाही लोकांनी भरभरून प्रतिसाद
दिला.

 

मेट्रो ची महामाया तीही अधुरी…(व्हिडीओ)

0


पुणे- सोमाटणे फाटयापासुनच नव्हे तर देहूरोड पासून लोक पुण्यात ये जा करतात पण मेट्रो पिंपरी महापालिकेपासून  कात्रज पर्यंत नाही तर स्वारगेट पर्यंत … आता जरी हि महामाया कोथरूड डेपो पर्यंत असली तरी तिची पुढची सोय मात्र चांदणी चौकापर्यंत करून ठेवण्यात येते आहे . मग अशीच सोय सोमाटणे , खडकवासला- वारजे  , लोहगाव ,आणि हडपसर ऐवजी उरळी पर्यंत का नको असे अनेक सवाल लोकांच्या मनात येतील … नगरसेवक सचिन दोडके यांनी काल मेट्रोच्या अधिकाऱ्यापुढे ..खडकवासला -वार्जेपर्यंत मेट्रो हवी अशी आग्रही भूमिका मांडली….

पुणे मेट्रो स्थानके लाईन 1)पीसीएमसी ते स्वारगेट 1) पीसीएमसी -भूपृष्ठावर2) संत तुकाराम नगर -भूपृष्ठावर 3)कासारवाडी,भूपृष्ठावर 4)फुगेवाडी -भूपृष्ठावर 5)दापोडी,भूपृष्ठावर 6)बोपोडी,भूपृष्ठावर 7)खडकी,भूपृष्ठावर ८)रेनझील,भूपृष्ठावर ९)शिवाजी नगर,भुयारी १०)सिव्हील कोर्ट ,भुयारी 11)बुधवार पेठ,भुयारी १२) मंडई-भुयारी१३) स्वारगेट लाईन -2 वनाज ते रामवाडी (सर्व स्टेशने भूपृष्ठावर ) 1)वनाज-,2)आनंदनगर -3)आयडियल कॉलनी -4)नळस्टोप-5)गरवारे कॉलेज -6)डेक्कन जिमखाना 7)संभाजी बाग – ८)पीएम सी-९)सिव्हील कोर्ट -१०)मंगळवार पेठ -11)पुणे रेल्वे स्टेशन -१२)रुबी हॉल१३)बंडगार्डन-१४ )येरवडा १५)कल्याणीनगर १६)रामवाडी

मिस अप्सरा २०१७ सौंदर्य स्पर्धा नवोदित चेहऱ्यांसाठी आमेन एल.एल.पी चा पुढाकार

0

कौशल्याला योग्य ते व्यासपीठ मिळवून देत त्यांच्याकडून नव आविष्काराची निर्मिती व्हावी या उद्देशाने आमेन एल.एल.पी ने मिस अप्सरा २०१७ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले. केवळ सौंदर्य हा निकष न ठेवता स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देत ही स्पर्धा रंगली. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातल्या २०० जणांमधून १२० स्पर्धकांची निवड पूर्व प्राथमिक फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या विविध शहरांचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या स्पर्धकांची पूर्व प्राथमिक फेरी मंगळवार २६ सप्टेंबरला पुणे व नागपूर येथे तर बुधवार २७ सप्टेंबरला मुंबई, कल्याण तसेच गुरुवार २८ सप्टेंबरला नाशिक येथे रंगणार आहे. पूर्व प्राथमिक फेरीतून ३६ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन व ट्रेनिंग शुक्रवार २९ सप्टेंबरला नाशिक येथे  होणार आहे. शनिवार ३० सप्टेंबरला या स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सभागृहात रंगणार असून या स्पर्धेतल्या विजेत्यांना खास पारितोषिक म्हणून अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्कच्या डब्बा गुल्लस्वाभिमान या दोन आगामी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकच्या तेजस्वी ज्वेलर्सचे सहकार्य लाभले आहे.

या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करताना दिग्दर्शक रोहित आर्या सांगतात की, योग्य संधी मिळाली तर नवीन कलाकारही यशस्वी चित्रपट देऊ शकतात या हेतूनेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेच्या माध्यमातून  चित्रपटासाठी उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याची ही अनोखी संकल्पना निश्चितच आगळी असेल असा विश्वासही ते व्यक्त करतात.

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर डब्बा गुल्ल हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर स्वाभिमान चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

सुरेल रंगछटा सकाळच्या रागांची -शौनक अभिषेकी व कविता खरवंडीकर यांची मैफल

0

पुणे : स्वच्छ, सुंदर, निरव सकाळी पुणेकरांच्या आसमंतात एक अनोखी रंगछटा उमटली… कधी अवकाशात स्वच्छंदी विहार करणारी लयकारी, तर कधी भारदस्त आवाजात खर्जातून थेट तार सप्तकाचा प्रवास घडवणारी सुरेल अदाकारी… कधी गुरुजनांना सुरेल भेट तर कधी त्यांच्या आठवणींना उजाळा अशा विविध रंगछटांनी ‘सकाळच्या रागांची’ स्वरांजली पं. बबनराव हळदणकर यांना अर्पण करण्यात आली.

आर्टिस्ट्री पुणे यांच्या वतीने पं. श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या शिष्यांच्या गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पं. हळदणकर यांच्या शिष्य कविता खरवंडीकर व पं. यांचे शिष्य आणि पुत्र शौनक अभिषेकी यांचे गायन झाले. त्याचप्रमाणे या वेळी  ज्येष्ठ साहित्यिक व कलारसिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक  डॉ. विकास कशाळकर, उषा हळदणकर, पं. विनायक थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

मैफलीची सुरुवात कविता खरवंडीकर यांच्या मधुर सुरांनी झाली. खरवंडीकर यांनी पं. हळदणकर यांच्याकडे २० वर्षे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. आग्रा घराण्याच्या गायकीचे बारकावे टिपत त्यांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यांनी राग ललतने आपल्या गायनाला सुरुवात केली. आलाप, रंगाचा विस्तार आणि त्यात शुभ्र अवकाशात स्वच्छंदी विहार करणारे सूर, लयकारी याने रसिकांना भारावून  टाकले. या वेळी  त्यांनी आपल्या गुरूंना  अभिवादन करत त्यांच्याच बंदिशी पेश केल्या. ‘कासे कहू मै ये… ‘, ‘वेगेवेगे  आओ मोहें दियो दर्शन…’ या बंदिशी सादर केल्या. त्यांनतर राग खट सारखा कठीण व दुर्मिळ राग त्यांनी पेश केला. यात श्रुतीस्वर अधिक असतात. ‘विद्याधन गुणीजन सो कहानी…’, ‘करत गुणगान गुणीजन सब…’ या बंदिशीही त्यांनी पेश केल्या. त्यानंतर आपल्या गुरूंची आठवण म्हणून त्यांचा हिंडोर रागातील तराण्याचा नजराणा त्यांनी पेश करत आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना  धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

रसिकांना या स्वर जगताची भारावून टाकणारी ही सफर अजून उंचीवर नेत  शौनक अभिषेकी यांनी राग जौनपुरी सादर करत पं. हळदणकर यांच्या बंदिशी पेश केल्या. यात ‘काही करत बरजोरी…’ यात झुमारयात ख्याल व तीन तालात द्रुत सादर केला. भारदस्त घुमटाकार आवाज, खर्जातून तितक्याच सहजतेने तारसप्तकात विहरण्याची हतोटी  रसिकांना भावून गेली. त्यांनंतर शुद्ध  सारंग रागातील ‘बीन दर्शवा देवो सजनवा…’ ही गुलामअली खान साहेबांची बंदिश पेश केली. त्यानंतर शब्द, तारण, पखवाजाचे बोल आणि सूर अशा चतुरंगांची अनुभूती देणारा चतरंग पेश केला. मैफलीचा समारोप ‘सब सखीया समझाये…’ या बंदिशीने झाला. या वेळी ते म्हणाले, “प्रत्येक संगीत साधकाने पं. हळदणकरांच्या बंदिशींचा अभ्यास करावा. नक्कीच नवीन काहीतरी गवसेल, शिकायला मिळेल. त्यांना  धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम), सत्यजित बेडेकर, राज शहा (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

 

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘द सायलेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! – येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

0

इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट… चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावूक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे लाँच करण्यात आला. प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.

अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. तर छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.

हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तर आमची पुढची पावलं,तुम्हाला त्रासदायक -अरविंद शिंदेंचा अति.आयुक्तांना इशारा(व्हिडीओ)

0

पुणे- तुम्ही ऐकत नाही म्हणून आयुक्तांना सांगितले,तरीही काही होत नाही म्हणून महापौरांना सांगितले .. पण लक्षात ठेवा तुम्हाला चुकीचे सर्क्युलर आणून दिले , आमची ही पुढची पावलं तयार आहेत ,जी तुम्हाला खूप त्रासदायक ठरतील असा इशारा अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांना देत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या भूमिकेला सहमती दर्शविली . प्रत्येक वार्ड ऑफिसच्या क्षेत्रातील आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने असंख्य नगरसेवकानी याप्रकरणी तक्रारीचा सूर लावला होता . आणि मनमानी कारभाराचा आरोप लावला .अखेर  या प्रकरणी सभापती म्हणून व्यासपीठावर असलेले उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यांनी या प्रकरणी महापौरांच्या दालनात उद्या सकाळी बैठक घेवून पुण्याच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत .