Home Blog Page 3268

‘युध्द नको बुद्ध हवा ‘, ‘हम सब एक है’ : घोषणांद्वारे दिला संदेश

0

णे :

गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आणि ‘युवक क्रांती दल’ यांच्या संयुक्तपणे आज  सकाळी  ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात आले होते.

सेनापती बापट पुतळा, अलका चौक, सीटी पोस्ट अशा मार्गे ​​शनिवार वाडा येथे शांती मार्च चा समारोप झाला. शनिवार वाडा येथे ‘थाळीनाद’ करण्यात आला. जाहेदभाई, चित्रलेखा जेम्स् हे धर्मगुरू शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते. संदीप बर्वे, अप्पा अनारसे, श्रीपाद ललवाणी, मयुरी शिंदे, यल्लपा धोत्रे, सचिन पांडोळे, अजय हाप्पे, अतूल पोटफोडे, जांभुवंत मनोहर आदी कार्यकर्त्यांनी शांतीमार्चचे संयोजन केले. माहेर संस्थेचे सदस्य, ‘कोपरे गाव’ चे ग्रामस्थ, मोहोळ विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

‘युध्द नको बुद्ध हवा’, ‘हम सब एक है’  अशा घोषणा देण्यात आल्या.प्रसंगी बोलताना संदीप बर्वे म्हणाले, ‘भारतीय राज्य घटनेवर निष्ठा असणार्‍या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दंगलमुक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी हा ‘शांती मार्च’ आयोजित करण्यात आला होता. पुणे शहर दंगलमुक्त राखण्याचा आमचा संकल्प व ठाम निर्धार आहे. समाजात अमन सर्वांत महत्त्वाचे असते. ‘ चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ‘हिंसामुक्त समाज हा प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. परंतु दुर्देवाने समाजातील काही घटकांच्या अविचारी कृत्यांमधून समाजातील शांतता ढळते. अशावेळी महात्मा गांधीचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता लक्षात येते. त्या दृष्टीने महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन. हा दिवस जगभर ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. धर्म, जात, रंग, भाषा आणि अनेक कारणांसाठी भिन्न असणारे आपण भारतीय म्हणून एक आहोत. शेकडो वर्षांपासून एकोप्याने राहण्याची आपली समृद्ध परंपरा आहे.’

‘गांधी जयंती व जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने दंगलमुक्त, हिंसामुक्त समाजाच्या निर्मितीचा सामूहिक संकल्प करण्यासाठी या शांती मार्च चे आयोजन करण्यात येते’​.

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान संपन्न

0
पिंपरी-
महात्मा गांधी जयंती निमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्राबरोबरच जगभरातून संत ज्ञानेश्‍वर माउलीचे दर्शन घेण्यासाठी आणि आळंदी पाहण्यासाठी भाविक येत असतात. इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम‘ाज्य झाले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
माउलीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या तीरी आळंदीचे नगरसेवक अविनाश तापकीर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. संघातील सर्वानी पूर्ण नदीपात्र आणि घाट परिसर स्वच्छ केला. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे, माधव मनोरे, सूर्यकांत कुरुलकर, मधुकर चौधरी, श्रीधर साबळे, सुनील शिंपी, भरत वाघमारे, भरत गोरे, विष्णु केकाने, धनंजय सागर, सतीश बुळे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, संतोष मुठाळ, अनिल सुतार रणजित घुमरे, बंडू सोनवणे, किसनराव पालवे,  बळीराम माळी, दीपक जाधव , विनायक भोसले, मंजुनाथ कांबळे, संजय माळी, संजय घुमरे, अमित माळी, शहाजी शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाप्रसंगी अरुण पवार म्हणाले, आज नदीप्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आपणच वेळ काढून केले पाहिजे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण स्वच्छता अभियान चालू ठेवले, तर सर्व नद्या, परिसर स्वच्छ होईल. तन-मन-धन अर्पण करून निस्वार्थपणे सेवा केल्यास फळ हे चागलेच मिळत असते.
माधव मनोरे म्हणाले, धर्माने काम केल्याशिवाय जगात काहीच साध्य होत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छतेचे काम केल्यास पर्यावरण रक्षण होण्यास मदत होणार आहे. ह.भ.प. रामचंद्र राजभाये महाराज म्हणाले, की कर्म हे सुबक आणि तेजस्वी असावे. निष्ठेने केलेल्या कामालाच चांगले रूप येते. या स्वच्छता अभियानामुळे सर्व आळंदीकर समाधानी आहेत.
विजय सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने निलेश कणसे यांना ” उत्कृष्ट स्वछता दूत पुरस्कार ” देउन सन्मानित

0

पुणे-

स्वछता सेवा सप्ताहमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबाबदल पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश कणसे यांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते  ” उत्कृष्ट स्वछता दूत  पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले . या पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी खासदार अनिल शिरोळे ,महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव आदी मान्यवर नगरसेवक वर्ग , बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

निलेश कणसे हे पंधरा ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष असून कुंभार बावडी बाजारपेठ तसेच महात्मा गांधी मार्गावर त्यांनी स्वछता अभियान राबविले . तसेच पंधरा ऑगस्ट वृत्तपत्र वाचनालय ते संचालक आहेत . असे काम करण्याची प्रेरणा श्री. नाना धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली आहे .

नाशिक महामार्गाची पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली पाहणी

0

पुणे दि 2: पुणे –नाशिक राष्ट्रीय महामार्गा दरम्यान नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या प्रस्तावित महामार्ग   रुंदीकरणाची पाहणी  पालकमंत्री  गिरीश बापट यांनी केली.

या प्रस्तावित रुंदीकरणामध्ये 45 मीटर ते   60 मीटर महामार्गाची रुंदी करण्यात येणार आहे. हा महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे, या करीता आवश्यक भूसंपादनाची कामे पूर्णत्वास आली असून पी.सी.एम.एलच्या वाहतुकीसाठी बीआरटी करीताही नियोजन करण्यात येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रोडला जोडण्यासाठी  1 ते 1.5 किलो मीटरच्या अंतरावर भुयारी मार्ग तसेच महामार्गावरुन सर्व्हीस रोडला जोडण्यासाठी इलेवेटेड रोड बांधण्यात येणार आहे  मुळे  स्थानिक वाहतुक व वाहनकोंडी विषयक समस्या मोठया प्रमाणात सुटणार आहे. पुढील 50 वर्षांपर्यंत या महामार्गावर वाहतुक कोंडी सारख्या समस्या उदभवू नये यासाठी  नियोजन करण्यात येणार आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी राष्टीय महामार्गाचे अधिकाऱ्यांसमवेत रुंदीकरणा विषयी बैठकीत कामांचा आढावा घेवून येणाऱ्या नियोजनकरण्याबाबत सूचन दिल्या. यावेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. बैठकीनंतर  पालकमंत्री वआमदार लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व अधिकारी यांच्या समवेत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करुन या महामार्गावरील अरुंद रस्ते वाहतुक कोंडी होणारे चौक व भूसंपादन करावयास लागणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली. या प्रस्तावित रुंदीकरणाच्या कामाचा अहवाल व रस्त्यांचे अद्ययावत नकाशे तातडीने करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत करिम खान, अर्जुन गोहड, राधिका महाजन, विधि बर्मन यांची आगेकुच

0

पाचगणी, दि.2 ऑक्टोबर  2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात करिम खान, अर्जुन गोहड या बिगर मानांकीत खेळाडूंनी हितेश पी व प्रथम भुजबळ या मानांकीत खेळाडूंचा पराभव करत दुसरी फेरी गाठली. तर मुलींच्या गटात राधिका महाजन व विधि बर्मन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत बिगर मानांकीत करिम खानने आठव्या मानांकीत हितेश पी याचा 6-3,3-6,7-6(2) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला तर बिगर मानांकीत अर्जुन गोहडने सहाव्या मानांकीत प्रथम भुजबळचा 6-4,6-1 असा सहज पराभव केला. अव्वल मानांकीत आदित्य बलसेकरने रुद्र कपूरचा 6-3, 3-6,6-4 असा तर दुस-या मानांकीत निरंजन निखिल थीरू याने अथर्व अमृलेचा 6-0,6-2 असा पराभव करत आगेकुच केली

मुलींच्या गटात राधिका महाजनने तन्मयी तुडयेकर 6-0, 6-0 असा तर विधि बर्मनने हरिणी हरीकृष्णनचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत दुसरी फेरी गाठली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली मुख्य फेरी मुले-

करिम खान वि.वि हितेश पी (8) 6-3,3-6,7-6(2)

अर्जुन गोहड वि.वि प्रथम भुजबळ (6) 6-4,6-1

आर्यन भाटीया(7) वि.वि देव उपेंद्र पटेल 6-3, 6-0

आदित्य बलसेकर(1) वि.वि रुद्र कपूर 6-3, 3-6,6-4

सर्वेश बिरमाने(3) वि.वि संदेश कुरळे 6-7(4),6-1,6-1

अर्जून कुंडू(5) वि.वि सिध्दार्थ जाडली  6-3,6-4

संस्कार चोबे(4) वि.वि वर्धन कारकल 6-1,6-3

निरंजन निखिल थीरू(2) वि.वि अथर्व अमृले 6-0,6-2

मुली

राधिका महाजन वि.वि तन्मयी तुडयेकर 6-0, 6-0

विधि बर्मन वि.वि हरिणी हरीकृष्णन 6-3, 6-2

क्रेडाई महाराष्ट्र प्रथमच करणार ५० शहरातील बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण

0

शहरनिहाय आकडेवारी विकसकांना ठरेल दिशादर्शक 

पुणे ता. २: भविष्यकालीन निर्णय प्रक्रियेत बांधकाम व्यावसायिकांना दिशादर्शक ठरणारे चालू बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय क्रेडाई महाराष्ट्रने घेतला आहे. असे सर्वेक्षण प्रथमच होत असून याचा अहवाल येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना कटारिया म्हणाले की, सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून राज्यातील एकूण ५० प्रमुख शहरात हे सर्वेक्षण केले जात आहे. त्या शहरातील विक्री झालेली घरे, विक्री न झालेली घरे, दुकाने, व्यावसायिक जागा, कार्यान्वित प्रकल्प आदीची आकडेवारी या सर्वेक्षणातून पुढे येणार आहे. क्रेडाई महाराष्ट्रच्या संशोधन आणि विकास समितीमार्फत हे सर्वेक्षण प्रमाणिकृत प्रकल्पांच्या ठिकाणी केले जात असून यासाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींची टीम कार्यरत झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, या सर्वेक्षणामुळे व्यावसायिकांना आगामी काळातील निर्णय घेणे सोपे होईल. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन कोणत्या भागात, कोणत्या प्रकारातील प्रकल्पाची बांधणी करावी, यांसारखे भविष्यकालीन निर्णय व्यावसायिकांना घेता येतील. मागणी आणि पुरवठा याचा अचूक अंदाज आल्याने संभाव्य धोके व्यावसायिकांना टाळता येतील. क्रेडाईकडून केले जाणारे सर्वेक्षण अधिकृत व खात्रीशीर असल्याने शासनालाही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना ही आकडेवारी फायद्देशीर ठरेल, असेही कटारिया यांनी सांगितले. तसेच या सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याने या कामाची आढावा बैठक येत्या गुरुवारी (दि. ५) पार पडणार असल्याची माहिती देखील कटारिया यांनी यावेळी दिली.

गोयल गंगा फौंडेशनच्यावतीने मोफत रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

0

पुणे :- गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले.  गोयल गंगा इंटनैशनल स्कुलमध्ये आज सकाळी ८ पासूनच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल, जयप्रकाश गोयल उपस्थित होते.

याशिवाय गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांच्या हस्ते कोंढव्यातील डॉ. बांदोवाल्ला सरकार कुष्ठरोगाचे हॉस्पिटल, सिंहगड इन्स्टिटूट या ठिकाणी मोफत औषधवाटप करण्यात आले होते.

यावेळी त्या म्हणाल्या कि समाजासाठी  ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे. रक्‍तदान करा, हे जीवनदान देण्‍यासाठी आवश्‍यक आहे. समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करुन रक्‍तदान वाढवणे ही आजच्‍या काळाची गरज आहे. आजच्‍या धकाधकीच्‍या युगात वाढते औद्योगिकरण व त्‍यांच्‍याशी संबंधित शारीरिक व्याधी वाढत आहेत त्यामुळेच वेळीच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे.

कोणत्याही गरजू व्यक्तीला औषधांच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागू नये यासाठी जास्तीत जास्त समाजसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याची भावना देखील जयप्रकाश गोयल यांनी मांडली.

मजरूह सुलतानपुरींचे शब्द काळाबरोबर चालत राहिले – कमलाकर परचुरे

0

पुणे ः‘प्रथम डाव्या विचारसरणीचे असणारे मजरूह सुलतानपुरी नंतर काळानुसार बदलत गेल्यानेच प्रथितयश गीतकारांमध्ये सर्वाधिक लाँग इनिंग पूर्ण करणारे गीतकार म्हणून शेवटपर्यंत लिहिते राहिले’, असे मत प्राचार्य व संगीतकार कमलाकर परचुरे यांनी व्यक्त केले.

‘रसिक मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित केलेल्या एक कवी -एक भाषा कार्यक्रमात ‘वारी’ प्रसिद्ध शायर व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या विषयी परचुरे बोलत होते. नौशाद शकील बदायुनी, बेगम अख्तर तसेच मजरूह आदींशी परचुरे यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळेच परचुरे यांनी त्यांच्या विषयीच्या अनेक संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. यावेळी अध्यक्षस्थानी अनिस चिश्ती, मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला व गझलकार प्रदीप निफाडकर उपस्थित होते. हा कार्यक्रम पुणे श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे झाला.

मजरूह यांचे खरे नाव असरार अलद्रसन खान असे होते मजरूह म्हणजे घायाळ, जखमी, लहानपणी लोक त्यांना मजरूह नावाने संबोधित असत. त्यामुळेच चित्रपट गीत लेखनासाठी त्यांनी स्वतःचे नाव मजरूह असे ठेवून जन्म ठिकाण सुलतानपूर हे आडनाव घेतले, अशी माहिती परचुरे यांनी दिली.

1942 च्या शहाजहाँ या नौशाद यांच्या बरोबरच्या चित्रपटांपासून अगदी अलीकडच्या जतीन-ललित, आनंद मिलिंद पर्यंत मजरूह यांनी गीत- लेखन केले. साधी सोपी, हलकी फुलकी भाषा वापरल्याने मजरूह यांची गीते लोकप्रिय झाली. सुमारे 300 चित्रपटांमधून त्यांनी 3000 गाणी लिहिली. त्यांच्या या लोकप्रिय कारकीर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.

मजरूह हे प्रथम डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लेखन केल्याने त्यांना दोन वर्षांचा तुरूंगवास ही झाला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे खूप आर्थिक हाल झाले होते. तेव्हा राज कपूर यांनी ‘दुनिया बनानेवाले’ या गीताचे त्यांना 1000 रूपये मानधन त्यांच्या कुटुंबियांना दिले. कारण मजरूह यांनी त्या व्यतिरिक्तची मदतही नाकारली, असेही परचुरे म्हणाले. परचुरे यांनी यावेळी मजरूह यांची ‘गम दिये मुस्तकिल’, ‘जब दिल ही टूट गया’ आदी गीतांचे गायन ही केले.

अनिस चिश्ती म्हणाले, ‘चित्रपट गीतकार म्हणून त्यांच्याकडे इतके काम होते की , त्या व्यस्ततेमुळे त्यांचे बाकीचे लेखन खूपच कमी झाले. पण जे लिहिले ते दर्जेदार लिहिले. मजरूह, शकील, साहीर सारख्या आभिजात शायरांमुळे हिंदी चित्रपट पडले तरी त्यातील गाणी लोकप्रिय होत असत. त्याचे श्रेय या गीतकारांनाच जाते,’ असे मत ही अनीस चिश्ती यांनी व्यक्त केले.

‘साहित्य अकादमी’ने सन्मानित साहित्यिक व उर्दू कवी नझीर फतेपुरी व ‘आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे माजी अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेशचंद्र सुरतवाला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप निफाडकर यांनी केले.

डीईएस प्री-प्रायमरीमध्ये आजी-आजोबांचा मेळावा

0

पुणे, ता. २ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री-प्रायमरी स्कूलच्या मातृमंदिरमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आजी-आजोबांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विशेष उत्साहात आजी-आजोबांना शाळेत घेऊन आले. शाळा, शाळेचा परिसर, मैदान, ग‘ंथालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून देत होते.
अमृता भोईर, कल्याणी कदम यांनी देवीस्तुती व रामायणातील सिताहरण या प्रसंगांवर नृत्यकथा सादर केल्या. अनिता गोडबोले, कल्पना बालाजी यांनी रामायणातील काही प्रसंग गीतरामायणातील गीतांच्या तालावर नृत्याद्वारे सादर केली. नवरात्रीनिमित्त झाशीची राणी लक्ष्मीबाईचा प्रेरणादायी जीवनपट नृत्याद्वारे उलगडून दाखविला.
एकत्र कुटुंब पध्दती, लहान मुलांवर आजी-आजोबांकडून होणारे संस्कार, नात्यातील जिव्हाळा याची माहिती शिक्षिका प्रियांका बालगुडे यांनी सांगितली. आजी-आजोबांनीही नातवंडांसाठी काही कार्यक‘म सादर केले. संचालिका माधुरी बर्वे यांनी स्वागत केले. मनाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

स्वच्छ भारत अभियानातून क्रांती घडेल – पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे,:  संपूर्ण देशभरात राबविण्यात येते असलेल्या स्वच्छ भारत अभियानातून  स्वच्छतेची क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास जिल्हाचे पालकमंत्री गिरीश बापट  यांनी केला.

महात्मा गांधी जयंती निमित्त  चतु :श्रृंगी मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. भारतीय इतिहासात महात्मा गांधी यांचे मोठे स्थान आहे. गांधीजींनी अंहिसेच्या मार्गाने आंदोलन करुन जगभरात नाव मिळविले. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहतांना सुमनांने नव्हे तर श्रमदान करुन  श्रध्दांजली वाहणे हे संयुक्तीक ठरेल असे, सांगून ते पुढे म्हणाले, स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासून करुन ती सवय म्हणून रुजायला पाहिजे. सर्वांनी संकल्प करायला हवा की, आपला देश स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे. सरकार तसेच महापालिका स्वच्छतेच्याबाबतीत गंभीर आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्व जाणणे गरजेचे आहे. स्वच्छता हा एक संस्कार आहे.

यावेळी पालक मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमवेत मंदिराच्या परिसराची साफ सफाई केली. खुद्द मंत्री महोदय हातात झाडू घेवून मंत्री पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता आपल्या बरोबरीने श्रमदान करत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढला होता. पालकमंत्र्या समवेत ‘मी अस्वच्छता करणार नाही – आणि करु देणार नाही ‘अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी   चतु :श्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गंगाधर अनगळ, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा,सरला मुथा,प्रफुल्ल पारेख आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.

अच्छे दिन ची खोटी आशा दाखवणारे मोदी हे उत्कृष्ट अभिनेते -प्रकाश राज

0

 

बेंगलोर -अच्छे दिन ची खोटी आशा मला दाखवू नका ‘मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते असून, माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत,’ असे प्रख्यात अभिनेता प्रकाश राज यांनी म्हटले आहे.-पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत:ला फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश?,’ असे प्रकाश राज म्हणाले. बंगळुरू येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (DYFI) बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा देत ते पुढे म्हणाले की, ‘मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. चांगले दिवस परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’

मोदींनी गौरी लंकेश यांच्याप्रकरणी यापुढेही मौन बाळगले तर पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा प्रकाश राज यांनी दिला. गौरी लंकेश यांना प्रकाश राज ३० वर्षांपासून ओळखत होते. गेल्या महिन्यात गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता.

‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ दिवाळीसाठी गृहोपयोगी साहित्याचे प्रदर्शन व विक्री

0
पुणे, ता. २ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी अभियानाला प्रतिसाद देत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ या दिवाळीसाठी आवश्यक असणार्‍या गृहोपयोगी स्वदेशी साहित्याचे प्रदर्शन ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत म्हात्रे पूलाजवळील सिध्दी गार्डन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, उद्योजिका अरुणा ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या शासनाच्या योजनांना प्रतिसाद देत महिला बचतगटांकडून महिलांची मानसिकता महिला उद्योगगटांकडे नेण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या व्यवस्थापनातून महिलांच्यामार्ङ्गत स्वस्त व दर्जेदार स्वदेशी उत्पादने प्रदर्शनात विक‘ीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, पूजा साहित्य, अत्तरे, लाईटच्या माळा, तयार कपडे, साड्या, डे्रस मटेरियल, लहान मुले व पुरुषांचे कपडे, बॅगा, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, विविध प्रकारची पिठे, भाजण्या, लोणची, मसाले, पापड आदींचे १५० हून अधिक स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ असल्याची माहिती संयोजिका शशिकला मेंगडे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘द सायलेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! – येत्या 6 ऑक्टोबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

0

इफ्फी, बंगळूरू, मुंबई, पुणे आणि कलकत्त्याबरोबरच जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांग्लादेशसारख्या 35 हून अधिक नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून 2 महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 पुरस्कारांवर नाव कोरलेला ‘द सायलेंस’ हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ एक वास्तवदर्शी चित्रपट… चित्रपट महोत्सवांत “जबरदस्त”, “दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट”, “हा चित्रपट पाहताना उर भरून आला होता” अशा अनेक भावूक प्रतिक्रिया मिळवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका दिमाखदार सोहोळ्याद्वारे लाँच करण्यात आला. प्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी सिधवानी, निर्माते अर्पण भुखनवाला, नवनीत हुल्लड मोरादाबादी आणि अरूण त्यागी, तर सहनिर्माते गौरीश पाठारे आणि सनी ख्नन्नाबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत अंजली पाटील, नागराज मंजुळे, रघुवीर यादव यांसारखे चित्रपटातील नामवंत कलाकार आणि अॅड. पूजा कुटे उपस्थित होत्या.

अॅड. पूजा कुटे यांच्याकडे असणाऱ्या खटल्यावर चित्रपट बनवण्यासाठी कथा-पटकथा लेखन निर्मात्या अश्विनी सिधवानी यांनी केले असून दिग्दर्शन आणि संवाद लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर संगीत इंडियन ओशन बँडने दिले आहे. तर छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांनी केले असून संकलन मयुर हरदास यांचे आहे.

हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गांधी जयंती चा करिष्मा – खासदार काकडे आणि महापलिका पदाधिकारी यांचे एकत्रित योगदान

0

खासदार काकडेंतर्फे ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन!

पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौक व ससूनमध्ये केली स्वच्छता

राज्यमंत्री कांबळे, महापौर टिळक, खासदार शिरोळे, आमदार कुलकर्णी व काळे, 40 नगरसेवक व हजारो नागरिकांची उपस्थिती

पुणे, दि. 2 ऑक्टोबर :महापालिकेतील पदाधिकारी आणि खासदार काकडे यांचे काही तरी आहे वाकडे .. असे वाटण्याजोगी परिस्थिती या पूर्वी दिसून आलेली आहे . पण शेवटी दसऱ्याचा नाही तर महात्मा गांधी जयंतीचा च करिष्मा दिसला . खासदार संजय काकडे यांच्या समवेत चक्क महापौर ,सभागृहनेते आणि खासदार शिरोळे ,यांच्यासह आमदार मेधा कुलकर्णी,विजय काळे, आणि राज्यमंत्री कांबळे व सुमारे ४० नगरसेवक स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एकत्र दिसले . ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा नारा देत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी व विजय काळे यांच्यासह 40 नगरसेवक व हजारो कार्यकर्त्यांनी आज पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का हा रस्ता व ससून रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानानिमित्त आज महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला खासदार संजय काकडे व खासदार अनिल शिरोळे यांनी हार घातला व स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौकापर्यंतचा रस्ता आणि त्यानंतर ससून रुग्णालयातील परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली. खासदार काकडे, खासदार शिरोळे, महापौर टिळक, आमदार कुलकर्णी, आमदार काळे आणि इतर मान्यवरांनी प्रत्यक्षात हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा गोळा केला. राज्यमंत्री दिलीप कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, 40 नगरसेवक व सुमारे 3 हजार नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले आहे. स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर आपले आरोग्यही सुदृढ राहणार आहे. म्हणून देश स्वच्छ झाला तर, संपूर्ण देशाचे आरोग्य सुदृढ होईल. पंतप्रधान मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी सारा देश एकवटला आहे. ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पुण्याचा कचरा प्रश्नही लवकरच सुटेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

खासदार संजय काकडे यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला आणि त्याला हजारो नागरिकांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. हा अत्यंत चांगला उपक्रम असून पुणे शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रभागी राहील व पुण्याचा कचरा प्रश्नही सुटेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

स्वच्छ भारत झाला तर, सुदृढ भारत बनेल. हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न वास्तवात येईल. खासदार काकडे यांनी आयोजिलेल्या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक आले. त्यामुळे स्वच्छ भारताचे स्वप्न नक्कीच वास्तवात येईल असे वाटते, असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानात नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, प्रकाश ढोरे, शंकर पवार, बापु कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, दिनेश धाडवे, धीरज घाटे, विष्णू हरिहर, मनीषा लडकत, मंगला मंत्री, कालिंदा पुंडे, राजाभाऊ लायगुडे, अमोल बालवडकर, किरण दगडे पाटील, विजय शेवाळे, दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, जोत्स्ना एकबोटे, सरस्वती शेडगे, तुषार पाटील, हरिभाऊ चरवड, राजश्री काळे, नीता दांगट, राजश्री नवले, परशुराम वाडेकर, भरत वैरागे, हरिश परदेशी, ज्योती कळमकर, उमेश गायकवाड, अशोक लोखंडे, सुशील मेंगडे, चंद्रकांत चौधरी, रायबा भोसले, संतोष आरडे, अजय सावंत, धनराज घोगरे, सुनील कांबळे आदी सहभागी झाले होते.

गांधी जयंती निमित्त दीपोत्सव

0

पुणे -पुणे रेल्वे स्टेशनयेथील  महात्मा गांधी पुतळ्यासमोर असंख्य दिवे लावून पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे महात्माजींना आदरांजली वाहण्यात आली . यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच उल्हास पवार ,विकास लांडगे, नरेंद्र व्यवहारे, व असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.या  कार्य क्रमाचे आयोजन आशिष नरेंद्र व्यवहारे यांनी केले.