Home Blog Page 3257

स्वार्थ साधूनही पक्षाची बदनामी करण्याचे प्रयत्न सहन करणार नाही -रमेश बागवे (एक्सक्लूसीव्ह व्हिडीओ)

0

पुणे- स्वतःचा बडेजाव मिरवण्यापेक्षा गोरगरिबांची आणि कार्यकर्त्यांची कामे करा, त्यांना सांभाळा , केवळ विशिष्ट प्रसिद्धीमाध्यमे हाताशी धरून गटबाजी करून,स्वार्थ साधूनही,कॉंग्रेसची बदनामी करून ,अप्रत्यक्षपणे मनुवादी भाजपला मदत करू नका असा सणसणीत इशारा आज कॉंग्रेसच्या साप्ताहिक बैठकीतून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्याच पक्षातील काही तथाकथित नेत्यांना दिला .
प्रांतिकच्या समितीवर प्रतिनिधींच्या नेमणुकांच्या संदर्भात विश्वजित कदम ,संजय बालगुडे आणि अनंतराव गाडगीळ यांनी शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षांविरोधात शड्डू ठोकून वरिष्ठांकडे जावून आपापली वर्णी लावून घेतल्याच्या बातम्या पुण्यातील विशिष्ट प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केल्या होत्या .यामुळे शहर कॉंग्रेस मध्ये गटबाजी सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले .या पार्श्वभूमीवर आज झालेल्या साप्ताहिक बैठकीत याचे पडसाद उमटले.बाळासाहेब शिवरकर ,कमल व्यवहारे, नीता परदेशी,अजित दरेकर, अविनाश बागवे राजूशेठ डांगी,राजू साठे,विठ्ठल थोरात आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यावेळी तुडुंब गर्दी केली होती . यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी नेत्यांमधील गटबाजी बाबत नाराज व्यक्त केली .अनेक जन कॉंग्रेसच्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेसपासून 2 हाथ लांब राखून होते . नांदेड च्या घवघवीत यशानंतर , ते आता गर्दी करू लागले आहेत .
यावेळी रमेश बागवे म्हणाले कि ,यांना पदेच हवी होती तर मला सूचना करायची होती , थेट वर जाण्याची आवश्यकता भासली नसती.केवळ ईगो मुळे ‘ही’मंडळी थेट वरिष्ठांकडे जावून येतात .’ दलित असलो म्हणून काय झाले … मलाही सोनिया गांधी,राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांनीच अध्यक्ष केले ,त्यांचा मान ठेवून तरी मला सूचना करायची.मोठ्ठे नेते आहात तुम्ही ,कित्येक वर्षे कॉंग्रेसमध्ये काम करीत आहात , पदाधिकारी आहात ,होतात ,मग कॉंग्रेसच्या कठीण अवस्थेत कॉंग्रेस भवनात येणे , कार्यक्रम राबविणे, जनहितासाठी रस्त्यावर उतरणे याबाबत आपण का मागे रहायचे ? आता जनतेला कळून चुकले आहे , कि फसव्या भाजपला धर्मनिरपेक्ष असलेला कॉंग्रेसच रोखू शकतो ,अशा काळात केवळ स्वार्थासाठी, गटबाजी चव्हाट्यावर मांडून, या पक्षाचे नुकसान करू नका ,अन्यथा मी तुमच्यावर कारवाई साठी वरिष्ठांकडे जावू शकतो, हे ध्यानात घ्या असा देखील इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे दिला .पहा आणि ऐका नेमके रमेश बागवे यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …

किशोरकुमार यांच्या जन्मस्थळी पुण्याच्या कलाकारांची अभूतपूर्व आदरांजली

0

पुणे-१३ ऑक्टोबर रोजी संगीत क्षेत्रातील बेताज बादशहा किशोर कुमार यांची ३० वी पुण्यतिथी होती. या ३० व्या पुण्यतिथीचा योग साधत मध्य प्रदेश सरकारच्या वतीने एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक आणि नगर येथील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांना किशोर कुमार यांच्या जन्मगावी म्हणजेच खांडवा येथे आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच स्टेजवर किशोर कुमार यांचा पुतळा बनवणे आणि त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम असे दोन्ही उपक्रम एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी किशोर कुमार यांचा पुतळा बनवून पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सलग साडेपाच तास जितेंद्र भूरूक यांनी किशोर कुमार यांची विविध गाणी सादर केली. या कार्यक्रमात जितेंद्र भूरूक यांनी वेगवेगळ्या मूड्स मधली एकूण ६३ गाणी कोमल कनाकिया, गणेश मोरे, गफार मोमीन या साथीदारांच्या मदतीने गायली. तसेच या सादरीकरणात त्यांना पुण्यातील १२ वादकांच्या वाद्यवृंदाने साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन पराग चौधरी यांनी केले.

या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांचे ‘व्हिज्युअल्स’ पडद्यावर दाखवले जात असताना जितेंद्र भूरूक यांनी त्या गाण्यांशी ‘सिंक्रोनाइझ’ करून गाणी सादर केली. सर्व खांडवाकरांसाठी हा खूपच भन्नाट अनुभव होता. किशोर कुमारांच्या चाहत्यांनी  गाण्यांवर उत्स्फूर्त नृत्य करत उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला.

नगर येथील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी किशोर कुमार यांचा पुतळा साकारला असून येत्या दोन ते तीन महिन्यात पुतळा पूर्ण होऊन त्याची स्थापना किशोर कुमार यांच्या हवेलीजवळील चौकात करण्यात येईल तसेच त्या चौकाचे नामकरण देखील करण्यात येईल.

विश्व की बड़ी मीडिया कंपनी ‘वाइस’ ने खरीदी भारत कि फिल्म ‘मामूली आदमी’

0
विश्व की बड़ी मीडिया कंपनी ‘वाइस’ ने इस फिल्म को दुनिया भर में रिलीज करने के लिए खरीद लिया है। 50 से ज्यादा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्स में छाई रही ये फिल्म 17 नवंबर को भारत के सिनेमाघरों में रिलीज की जा रही है
अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवों में धाक जमाने वाली डॉक्यूमेंट्री फीचर “एन इनसिग्निफिकेंट मैन” (अर्थ – एक आम/मामूली आदमी) के अधिकार प्राप्त करने के साथ ही ‘वाइस डॉक्यूमेंट्री फिल्म्स’ ने अपनी पहली फिल्म खरीदने की घोषणा कर दी है। खुशबू रांका और विनय शुक्ला ने “एन इनसिग्निफिकेंट मैन” को डायरेक्ट किया है जो एक नॉन-फिक्शन पोलिटिकल थ्रिलर श्रेणी की फिल्म है। इसमें एक सामाजिक कार्यकर्ता से ध्रुवीकृत कर देने वाले चर्चित राजनेता के तौर पर अरविंद केजरीवाल के चमत्कृत करने वाले उभार को दिखाया गया है। इसे एक ‘मास्टरपीस’ बताते हुए वाइस ने घोषणा की है कि वो निर्माता आनंद गांधी की मेमेसिस लैब के साथ भागीदारी करेंगे और इस फिल्म को भारत में और अंतरराष्ट्रीय स्तर पर प्रदर्शित करेंगे।
वाइस दुनिया के सबसे बड़े मीडिया कंपनियों में से एक है जो 2013 से अब तक 100 करोड़ डॉलर से ज्यादा का धन जुटा चुकी है। नेटफ्लिक्स और एमेज़ॉ़न जैसी मीडिया कंपनियां मोटे तौर पर पैसा लेकर वीडियो सेवा देती हैं। वहीं वाइस ऐसी अभूतपूर्व डिजिटल मीडिया और प्रसारण कंपनी है जो बहादुरी से और कहानी कहने के मौलिक अंदाज के साथ उन वैश्विक मसलों को लोगों के सामने लाती है जिन्हें पारंपरिक मीडिया अकसर दरकिनार कर देता है।
 “एन इनसिग्निफिकेंट मैन” हाल ही में चर्चा में थी जब सेंसर बोर्ड के पूर्व-प्रमुख ने इस फिल्म को बनाने वालों से कहा था कि वे जाकर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी और अन्य राजनेताओं से मंजूरियां लेकर आएं। इस विडंबना के उलट, इसी फिल्म को अंतरराष्ट्रीय फिल्ममेकिंग समुदाय और वाइस के वरिष्ठ अधिकारियों ने पलकों पर बैठाया। ख़ैर, अंत में अपने मिसाल स्थापित करने वाले आदेश में फिल्म प्रमाणन अपीलीय अधिकरण (FCAT) ने सेंसर बोर्ड की ‘असंवैधानिक’ मांग को रद्द कर दिया और इस फिल्म को अपनी संपूर्णता में पास कर दिया। इस बहुप्रतीक्षित फिल्म को बनाने वाला स्टूडियो मेमेसिस लैब अब 17 नवंबर को इसे भारत भर में रिलीज करेगा।
इस फिल्म को लेकर वाइस डॉक्यूमेंट्री फिल्म्स के कार्यकारी निर्माता जेसन मोज़ीका ने कहा, “मैंने एन इनसिग्निफिकेंट मैन को पहली बार 2016 में टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल (TIFF) में देखा था और जब लौटा तो सोच रहा था कि मार्शल करी की फिल्म ‘स्ट्रीट फाइट’ के बाद गली-मुहल्ले के स्तर की राजनीति को लेकर बनी ये बेस्ट डॉक्यूमेंट्री है।” उन्होंने बताया, “हम वाइस के लोगों ने इसके फिल्ममेकर्स और पिछले कुछ महीनों में सेंसर बोर्ड के खिलाफ इनके संघर्ष पर करीब से नजर रखी है। अपनी अभिव्यक्ति की आज़ादी के लिए लड़ रहे ऐसे स्वतंत्र फिल्ममेकर्स को वाइस हमेशा समर्थन देगा और अभी हम इस फिल्म को अपने पूरा वैश्विक मंच उपलब्ध कर रहे हैं। हम दुनिया भर के अपने दर्शकों तक एन इनसिग्निफिकेंट मैन लेकर आ रहे हैं क्योंकि हमारा सोचना है कि हर वो इंसान जो अपनी राजनीतिक व्यवस्था में समस्याएं देखता है और उसमें ख़ुद शामिल होकर चीजें बदलने की कोशिश करना चाहता है ऐसे सब लोगों के लिए ये बहुत ही प्रासंगिक फिल्म है।”
फिल्म के मेकर्स और वाइस के बीच हुए करार की शर्तों का खुलासा अभी नहीं हुआ है लेकिन इस अधिग्रहण का मतलब यही है कि फिल्म को 22 से ज्यादा देशों के सिनेमाघरों, टेलीविजन और डिजिटल चैनलों पर दिखाया जाएगा।
आनंद गांधी ने इस सिलसिले में कहा, “भारतीय सिनेमा के इतिहास में पहली बार एक फिल्म हूबहू दिखाएगी कि एक राजनीतिक दल में बंद दरवाज़ों के पीछे क्या होता है। जब नॉन-फिक्शन श्रेणी में गंभीर काम की बात आती है तो वाइस ने इस तरह की फिल्मों और वीडियो के बाज़ार का नेतृत्व ही किया है। वे जो भी करते हैं निर्भय होकर करते हैं। और ऐसे प्रेरणादायक अंतरराष्ट्रीय भागीदार का साथ होना हमारे लिए बहुत उत्साहित करने वाली बात है। इस नवंबर, भारत में इस फिल्म को लोगों के बीच लाकर हम चीजों की शुरुआत कर देंगे।”
दुनिया के 50 से ज्यादा जाने-माने फिल्म महोत्सवों में “एन इनसिग्निफिकेंट मैन” दर्शकों की चहेती रही है। मुंबई में जब मामी फिल्म फेस्टिवल में इसे दिखाया गया तो लोगों ने खड़े होकर तालियां बजाईं। सनडांस, स्काइवॉकर लैब, बेर्था फाउंडेशन जैसे कई प्रतिष्ठित संगठनों ने इस फिल्म को समर्थन दिया है। इस फिल्म के साथ एक खास बात ये भी है कि भारत में इसे लेकर बहुत बड़ा क्राउडफंडिंग कैंपेन चलाया गया था जिसमें अनजान लोगों ने इस फिल्म को बनाने के लिए धन दिया था।
इस 95 मिनट लंबी फिल्म को, दरवाजों के पीछे होने वाली राजनीतिक गतिविधियों की 400 घंटे लंबी सच्ची फुटेज में से बहुत ही कड़ी मेहनत से निकालकर बनाया गया है जिसे एक साल की अवधि में शूट किया गया था। ये फिल्म हमें चुपके से उन गर्मा-गर्म बहसों, अंदरूनी चुटकुलों, अभियानों की रणनीतियों, सच्ची घटनाओं और विचारधाराओं के बीच ले जाती है जहां भारत की सबसे नई पोलिटिकल पार्टी आम आदमी पार्टी (AAP) का जन्म होता है।

नगर रचना योजनेअंतर्गत सर्वांना समान न्याय मिळणार – पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे :  शहराचा विकास योग्य पध्दतीने होण्याकरीता पीएमआरडीएने चांगले नियेाजन केलेले आहे. शेतक-यांचे नगररचना योजनेसंदर्भातील असलेले गैरसमज दुर करुन तसेच कोणीही जागेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन, शेतक-यांनी संमती दिल्यानंतरच काम सुरु करण्यात येईल. सर्वांना समान न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित  टि. पी. स्कीम कार्यशाळा, हांडे लॉन्स, हांडेवाडी येथे ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी रिंगरोड क्षेत्रात येणा-या निंबाळकरवाडी, येवलेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी- औताडेवाडी, होळकरवाडी या गावातील संबधित जमिनधारकांना आमंत्रित करण्यात आले होते.

प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, शेतक-यापर्यंत या योजनेसंदर्भात योग्य माहिती पोहोचविली जाईल. प्रत्येक गोष्टीची कल्पना शेतक-यांना देऊनच या कामास सुरुवात केली जाईल. सर्वांच्या फायद्यासाठीच ही योजना असून यामुळे सर्व नागरिकांची सोय होणार आहे. लवकरच या परिसरात पीएमआरडीएचे कार्यालय सुरु करण्यात येईल. ज्यामुळे नागरिकांना नकाशाव्दारे अधिका-यांकडून थेट माहिती मिळू शकेल असेही श्री. बापट म्हणाले.

पाणी, गटारे, वीज तसेच गार्डन, शाळा, दवाखाने, बसस्टँड, पार्कींगची जागा, ओपनस्पेसच्या सर्व सुविधा पीएमआरडीएमार्फत पुरविल्या जातील. या योजनेमार्फत शेतक-यांचा आठपट फायदा होईल. रिंगरोड जवळील शेतक-यांना रिंगरोड लगतच जमिन मिळेल. शेतक-यांना चौकोनी आकाराचे भुखंड देण्यात येईल. प्रत्येक प्लॉटला रस्ता देण्यात येईल अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी दिली.

या कार्यशाळेस पीएमआरडीएचे  नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, पंचायत समिती सदस्य जीवन घुले, संबधित गावांचे सरपंच तसेच जमिनधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना दिवाळी भेट!

0

पुणे-ज्यांच्यामुळे आपण मनोरंजनाची दिवाळी बाराही महिने साजरी करू शकतो अशा बॅकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साखर, रवा, बेसन इत्यादी फराळासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते सुगंधी तेल, उटणे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सुमुहूर्तावर प्रेक्षकांच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या परंतु कायमच पडद्यामागे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भेट देण्याची मूळ संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांची असून अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, सिटीप्राईड कोथरूड,   महात्मा फुले सांस्कृतिक भवन या  ठिकाणी जाऊन १०० हून अधिक डोअर कीपर, सफाई कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट देण्यात आली.

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, म.न.से. चे किशोर शिंदे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे प्रातिनिधी सत्यजित दांडेकर, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका आणि नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे, मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे, मनसे उपाध्यक्ष रणजित शिरोळे, चित्रपट निर्माते पुनित बालन यांच्या हस्ते या दिवाळी भेटीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष सागर पाठक, मनसेचे पदाधिकारी आनंद कुंदूर, चेतन धोत्रे, प्रशांत गायकवाड, चिन्मय अभ्यंकर, प्रज्ञा राज,निनाद सूर्यवंशी, प्रशांत बोगम, कुशल शिंदे, आकाश क्षीरसागर, अजय देवपुंजे, गोकुळ दशवंत हे तसेच रोहित खडसे, गौतम एरवा, आशुतोष पवार, शुभम मेश्राम हे उपस्थित होते.

पुण्याच्या श्वेता शाहची पहिली कादंबरी‘आई वीयर द स्माइल यू गेव’ चे प्रकाशन

0

पुणे – पुण्याची आईटी प्रोफेशनल श्वेता शाह ने आपली पहिली कादंबरी ‘ “आई वीयर द स्माइल यू गेव’”शहरातील फिनिक्स सिटी च्या क्राॅसवर्ड मध्ये लांच केली. ही कादबंरी मैत्री, प्रेम आणि कर्तव्य यांच्या दुखांतावर आधारित आहे. ही कादबंरी पुरूष प्रधान पात्र्याच्या वास्तविक जीवनात घड़लेल्या घटनांपासून प्रेरणा घेवून रचलेली आहे. फिल्म निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज शाह या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्यानं उपस्थित होते. ब्ल्यू रोज पब्लिशर्स  द्वारे प्रकाशित ही कादंबरी अमेजान, फ्लिमकार्ट,,शाप क्लूज,,बुक अड्डा(सपना आनलाइन),ब्ल्यू रोज पब्लिशर्स सकट भारताच्या सर्व मोठ्या आफलाइन स्टोर्स मध्‍ये उपलब्ध आहे.

श्वेतामध्ये लेखन प्रतिभा नैसर्गिक आहे. ती म्हणते कि लिखाण हे तिच्या जीन्स मध्‍ये आहे. ह्याची प्रेरणा तिला तिच्या वडिलांकडून मिळाली आहे. श्वेता सध्या लवकरच येणार्या आपल्या दुसर्या कादंबरी वर काम करते आहे. काम्युटर शास्त्राचा अभ्यास केलेली श्वेता जर्मन भाषेची तज्ञ्न पण आहे. शिवाय ती गेली 8 वर्षे आईटी क्षेत्रात काम करते आहे. या दर्म्यान तिला तिच्या प्रोजेक्ट्स साठी‍ न केवळ भारतात पण भारताच्या बाहेर जर्मनी आणि फिलिपाइंस मध्ये देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे श्वेता चांगली  रेकी मास्टर टीचर सुद्धा आहे.

या प्रसंगी बोलताना फिल्म निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज म्हणाले ‘श्वेताची कादंबरी वाचणें हे तरूणपीढि साठी नक्कीच प्रेरणादायक असणार आहे. ही कादंबरी न केवळ आम्हाला प्रेम, कुटुंब आणि मैत्रीचं सौंदर्य पटवते त्या बरोबरच देशाबद्दल आदर आणि कर्तव्यभावनाचं महत्व ही शिकविते. मी या सफल पु‍स्तकामार्फत युवा पीढीचे मनोरंजन आणि त्यांना आपले नैतिक मूल्य शिकविण्या साठी श्वेताचे अभिनंदन करतो.

आपल्या कादंबरी बद्दल बोलतानां श्वेता म्हणाली कि माझी कादंबरी ‘आय ‘वीयर द स्माइल यू गेव “ या पुस्तकातल्या पुरूष पात्र्याच्या जीवनातील वास्तविक घटनांपासून प्रेरणाघेवून रचलेली आहे. ही तीन पात्रांमधील प्रेम आणि मैत्रीतून उद्भवलेल्या संघर्षाची कथा आहे. श्वेता पुढे म्हणाली ‘अजीत ची अ‍दितीवर आसक्ति आणि सुमी वर त्याच्या प्रेमातून ही कथा आकार घेते. अजीत वडिलांसमोर स्वत: ल्या सिद्ध करण्यासाठी सैन्यात जातो. स्वत:च्या प्रेमाला बाजूला ठेवून तो आपला परिवार, कर्तव्य आणि देशाप्रेमाला प्राधान्य देतो. या कथेचा शेवट एका दुखांतात होतो, जेव्हां ही तिन्हीं पात्रं वर्षाभरानंतर एकत्र येतात आणि ते आपल्या प्रेमाला नेहमी साठी दुसरं रूप देतात.

ह्याच प्रसंगी ‘चैम्प रीडर्स एसोसिएशन’ के संस्थापक सागर आझाद म्हणाले ‘ आमची संस्था नवोदित लेखकांना साहित्य क्षेत्रात पुढे आणण्याचं काम जोमाने करते आहे. श्वेता आणि तिच्या पहिल्या कादंबरी चा परिचय देताना  आम्हाला तेवढाच आनंद होत आहे. वाचक  तिच्या चित्त वेधक कथेस आणि कल्पक लेखन शैली ला नक्कीच प्रतिसाद देतील.

धनकवडीतील दिवाळी फराळाला ऑस्ट्रेलियातून मागणी …

0

पुणे७-धनकवडीतील करंजी, चकली,बेसन लाडू पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे १५० किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलिया तील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सौ. सुलोचना भोसले यांनी आज शनिवारी सांगितली .
बचत गटाचे काम करतच तिने दुकानातूनच दिवाळीचा फराळ विक्री करण्याचे तिचे स्वप्न होते. ते तिने प्रत्यक्षात आणले. आणि आत्ता ना नफा -ना तोटा या तत्वावर तिने नागरिकांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ विक्री करण्यास सुरुवातही केली. ही घटना आहे , धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील पुणे महापालिकेच्या कोठीजवळील संकल्प महिला गृहउद्योगाची . आणि त्यांच्या संचालिका सौ. सुलक्षणा भोसले यांची.
सौ. भोसले यांनी धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी खास दिवाळीचा मुहूर्त साधून ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहे. त्यांच्या खारी करंजीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गृहउद्योगातर्फे भाजणी चकली , बेसन लाडू, शंकरपाळी , खजूर लाडू , करंजी , अनारसे , रवा लाडू, ओल्या नारळाची करंजी , आदी पदार्थ कमी दारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
धनकवडी , कात्रज , आंबेगाव , नर्हे आंबेगाव आदी परिसरातील नागरिक हे पदार्थ खरेदी करण्यासाठी येत आहेत.
यासंदर्भात बोलताना सौ भोसले यांनी सांगितले कि , अनेक महिलांना नोकरी व अन्य कामामुळे घरी दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड असते. त्यामुळे त्यांना खास घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ दिवाळीसाठी हवे असतात . हे लक्षात घेऊन आम्ही बचतगटाच्या महिलांच्या मदतीने घरीच फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मशीनवरही हे पदार्थ तयार करून मिळतात . पण आम्ही नागरिकांची गरज व मागणी लक्षात ठेवून खास घरीच पदार्थ तयार केले. तसेच माझ्याकडे काम करण्यास येत असलेल्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळेल हे सुद्धा मी ठरवले . सध्या आम्ही ८—१० महिलांच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार विक्री करत आहोत.
या उपक्रमास सौ. मनीषा देशमुख , सौ . चेतना तांबे, सौ. उमा गणगोटे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.

‘मानवतेची परंपरा पुढे न्यावी’ : अरुण गुजराथी

0
पुणे : 
‘वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’ कोथरूड यांच्यातर्फे प. पु. डॉ. अचलऋषी म. सा. यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा (चादर प्रदान कार्यक्रम) शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला. ‘कोथरूड जैन श्रावक संघ’च्या पदाधिकार्‍यांनी हा सन्मान केला.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे झालेल्या कार्यक्रमात अरुण गुजराथी (महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष) आणि ‘जनसेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्य करणार्‍या माणिकचंद दुगड यांना ‘मानवरत्न’, भागचंद छाजेड यांना ‘आदर्श पिता’ तर नौपतलाल साकला यांना ‘दानभुषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करणार्‍या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. अभय मुथा, डॉ. आशिष रानडे, डॉ. गुणवंत ओसवाल, डॉ. सतिश जैन, डॉ. सुजय लोढा, डॉ. श्रेयांस कपाले, डॉ.जयंतीलाल तलेसरा, डॉ. संतोष सिंघवी, डॉ. आनंद खिवंसरा, डॉ. जाधव आणि धरमचंद कोठारी यांचा या सन्मानात समावेश होता. अरुण गुजराथी (महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी अरुण गुजराथी म्हणाले,‘समाज जीवनातील प्रश्न सोडविताना मानवता महत्वाची आहे. जीवनात अहिंसा बाळगली पाहिजे. अपरिग्रहात समतेची बीजे असल्याने हा विचार अंगी बाळगला पाहिजे. भगवान महावीरांचा विचार जपण्यासाठी सर्वांनी मानवतावादी भावनेने कार्यरत रहावे. ’
डॉ. विनोद शहा म्हणाले, ‘अलिकडे डॉक्टर निव्वळ फायद्यासाठी काम करतात असा नागरिकांचा रोष असल्याने मारहाणीच्या घटना घडतात, या पार्श्वभूमीवर सेवाभावी काम करणार्‍या डॉक्टरांचा सन्मान करणे उल्लेखनीय आहे. ’
आमदार मेधा कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले आणि सहस्त्रचंद्र सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
‘वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’, कोथरूडचे अध्यक्ष रामलाल सिंघवी यांनी प्रास्ताविक केले तर किशोर गांधी यांनी आभार मानले. याप्रसंगी विजयकांत कोठारी, कुंदनमल दर्डा, सचिन लोढा, सुरेश मुनोत, हेमंत गांधी, अनील कटारिया, प्रकाश भंडारी, अशोकलाल नहार, संदीप चंगेडिया, साध्वी प.पु.वैभवश्रीजी आत्मा म.सा., साध्वी प.पु.चरमश्रीजी म.सा. उपस्थित होते.
कोथरूड येथील चातुर्मासमध्ये डॉ. अचलऋषी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ, अपंग आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे छत्रपती संभाजी विद्यालय, कोथरूड येथे आयोजन करण्यात आले होते. हे विद्यार्थी आणि पालकही कार्यक्रमाला उपस्थित होते.

ट्विटरवर 100K चा टप्पा गाठणारी अमृता खानविलकर ठरली पहिली मराठी अभिनेत्री !

0
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्च्या झाल्या, अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनीस्टां असण्याची चर्चा असो. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची. 90K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्स ना उत्सुकता होती ती 100k ची आणि अवघ्या काही दिवसातच अमृताने 100k चा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K  फोल्लोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.
अमृताची आणि तिच्या फॅन्सची कनेक्टिविटी खूप आहे. ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा कमाल अँपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलीवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.
यासगळ्यावर अमृता म्हणते कि ”खूप छान वाटतंय आज, जेव्हा ट्विटर अकाउंट ओपन केलेलं तेव्हा 100k फोल्लोअर्स असणं म्हणजे काय हे माहीतही न्हवतं. पण आज ते शक्य झालंय याचं सगळं श्रेय जातं ते माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या फॅन्सना. त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय. 100k हा फक्त मी एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते.”

‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

0

वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. अॅट्रॉसिटीया आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा देत लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला म्हणाले की, आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच मला आवडत आला असून अॅट्रॉसिटीच्या निमित्ताने एक मह्त्त्वपूर्ण विषय रसिकांसमोर येत असल्याचा मला आनंद आहे. आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी अॅट्रॉसिटीचं दिग्दर्शन केलं आहे. आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला अॅट्रॉसिटी १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. अॅट्रॉसिटी हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी  अॅट्रॉसिटीया चित्रपटाची निर्मिती केली आहे.

यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.

अॅट्रॉसिटीमध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेष करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी अॅट्रॉसिटीमधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव यांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जस्मिन ओझा यांनी कोरिओग्राफी केली आहे. १२ जानेवारीला अॅट्रॉसिटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

इस दीवाली आपके घर की रोशनी बढ़ाएगी दीपिका पादुकोण!

0

हालांकि हम अभी भी दीपिका पादुकोण का शाही रानी पद्मनी से अपना ध्यान नही हटा पाए थे, और आज दीपिका पदुकोण की एक और आकर्षक तस्वीर सामने आ गयी है, जिसमे वो बेमिसाल नज़र आ रही है।

दीपिका ग्रहलक्ष्मी पत्रिका के कवर पेज पर नज़र आएंगी, भारत की प्रमुख क्षेत्रीय पत्रिका एक समकालीन दृष्टिकोण से महिलाओं को जीवन के विभिन्न पहलुओं से रूबरू करवाती है। वह एक काले रंग की चमचमाती पोशाक में संजातीय आभूषण के साथ बांधे हुए बाल और लाल रंग की लिपस्टिक में काफी खूबसूरत लग रही है।

कई अवसरों पर दीपिका पादुकोण ने बताया है कि दीवाली उनका पसंदीदा त्योहार में से एक है। अभिनेत्री हर साल रोशनी के इस त्योहार को अपने परिवार के साथ मनाना पसंद करती है।

दीपिका अपनी सारी महिमा के साथ पत्रिका के इस कवर पेज पर काफी खूबसूरत लग रही है, जो इस बात का सबूत है कि वह दुनिया की सबसे खूबसूरत औरत रानी पद्मिनी की भूमिका के लिए एकदम परफेक्ट है।

फ़िल्म का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ है और फ़िल्म से जुड़े अन्य पहलू को देखने के लिए सभी बेसब्री से इंतेज़ार कर रहे है।

 

झी मराठी दिवाळी अंकाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद

0

मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन अनुभव देणा-या झी मराठी वाहिनीने आजवर अनेकविध उपक्रमांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. यावर्षी झी मराठीने पहिल्यांदाच आपला दिवाळी अंक उत्सव नात्यांचा बाजारात आणला. एखाद्या मनोरंजन वाहिनीने दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ . झी मराठी वाहिनीने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली. या अठरा वर्षांच्या काळात झी मराठी वाहिनीसोबत अनेकांचे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. कलाकार असो की प्रेक्षक प्रत्येकजण या वाहिनीशी जोडला गेलेला आहे. याच नात्याला केंद्रस्थानी ठेवून उत्सव नात्यांचा हा दिवाळी अंक काढण्याची संकल्पना झी मराठी वाहिनीला सुचली आणि त्यांनी हा अंक बाजारात आणला आणि वाचकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आणि अक्षरधारा तथा बुकगंगाच्या साह्याने वितरीत करण्यात आलेल्या या अंकाची पहिली आवृत्ती अवघ्या तीन दिवसांत संपली आहे. अनेक ठिकाणी वाचकांना अंक उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या पदरी पडणारी निराशा टाळण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने या अंकाची दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा अंक बाजारात उपलब्ध होणार असून छोट्या छोट्या शहरांत आणि गावांत तो कसा वितरीत करता येईल यासाठी वाहिनी प्रयत्नशील असणार आहे.

झी मराठीच्या पहिल्या दिवाळी अंकाची घोषणा झाल्यापासूनच या अंकात काय वाचायला मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्यानंतर आठवड्याभरातच हा अंक बाजारात आला. ९ ऑक्टोबरपासून हा अंक उपलब्ध होणार अशी जाहिरात झाल्यानंतर बुकगंगाच्या फोनलाईनवर प्रेक्षकांनी भरभरुन मागणी केली. याशिवाय अक्षरधारा आणि ग्रंथालीकडेही अंकाच्या मागणीचे दुरध्वनी आले आणि प्रत्यक्ष वाचकांनी भेट देऊन अंकाची नोंदणी केली. अवघ्या तीन दिवसांत पन्नास हजार अंक विकल्या गेले. यामध्ये केवळ राज्यातूनच नाही तर देशाच्या विविध भागांमधून आणि परदेशातूनही ऑनलाईन पद्धतीने अंक मागविणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. अशा प्रकारे एवढ्या कमी कालावधीमध्ये दिवाळी अंक संपण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. वाचकांचा हा वाढता प्रतिसाद बघता वाहिनीने आता पुन्हा २५ हजार अंक छापण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच हे अंक बाजारात उपलब्ध होतील.

काय आहे अंकात ?

झी मराठी उत्सव नात्यांचा हा अंक २७२ रंगीत पानांचा असून यामध्ये अनेक मातब्बर मंडळींच्या लेखांचा समावेश आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असलेले अनुभवी कलाकार सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, रवी जाधव, संजय मोने, संजय जाधव, सुकन्या मोने, हृषिकेश जोशी यांनी आपले या क्षेत्रातील अनुभव, त्यांची जडण घडण , त्यांचा संघर्ष, झी सोबत असलेलं नातं याबद्दलच्या अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. याशिवाय भारतकुमार राऊत, नितीन वैद्य, माधवी मुटाटकर ज्यांनी झी मराठीचा पाया रचला अशा मंडळींनीही झी मराठीचे सुरुवातीचे दिवस कसे होते याबद्दल सविस्तर लेख लिहिले आहेत. याशिवाय सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, प्रिया बापट, उमेश कामत, डॉ. निलेश साबळे या आजच्या पिढीच्या कलाकारांचेही अनेक रंजक अनुभव यातून वाचायला मिळणार आहेत. याशिवाय हास्य धम्माल, झी मराठीची शीर्षकगीतं, बदलतं मनोरंजन क्षेत्र यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा यात समावेश आहे. मनोरंजनाचा हा सारा खजिना प्रेक्षकांसाठी अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध झाला आहे हे विशेष. ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रशांत दळवी यांनी या अंकाचं संपादन केलं आहे.

मंगेशकर हे संगीत क्षेत्रातील “स्वयंभू” कुटुंब – डॉ. शंकर अभ्यंकर

0

पुणे – सूर्याला कसं उगवावं…कसा प्रकाश द्यावा हे कोणीही त्याला सांगू शकत नाही. त्याचं तोच ठरवतो. तसंच कोणत्याही चौकटीत न बसणारं गाणं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे होते. श्रीकृष्णाच्या वेणू आणि देवर्षि नारद यांची वीणा यांच्या स्वरांचे सार लतादीदींच्यात आहे. या सांगितिक क्षेत्रात मंगेशकर जे करतील ती पूर्व दिशा असते, म्हणूनच संपूर्ण मंगेशकर कुटुंब हे संगीत, गायनाच्या क्षेत्रातील स्वयंभू कुटुंब आहे, असे गौरवोदगार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी आज येथे काढले.

मास्टर दीनानाथ यांच्या ७५ वी पुण्यातिथी आणि लता मंगेशकर यांच्या गायनाची ७५ वर्षे असे दुहेरी औचित्य साधून “स्वरप्रतिभा” चा यंदाचा दिवाळी अंक या दोघांवर काढण्यात आला आहे. या अंकाचे प्रकाशन डॉ. अभ्यंकर यांच्या हस्ते लोकमान्य सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उल्हासदादा पवार होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून अंकाला शुभआशिर्वाद दिले. व्यासपीठावर अंकाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे, सहसंपादिका शैला दातार आणि संपादक मंडळातील सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, मधू पोतदार आणि शशिकांत पंडित उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शैला दातार यांनी भारत गायन सामाजाच्यावतीने दीनानाथांवर तयार केलेली स्वरमंगेश ही चित्रफित दाखवण्यात आली.

डॉ. अभ्यंकर म्हणाले, संगीत हा एक महासागर आहे, ही एक शक्ती आहे. संगीतात अनेक घराणी निर्माण झाली. या कोणत्याही चौकटीत न मावणारे, बसणारे गाणं हे दीनानाथांचे होते. घडवायचा म्हणून गायक हा घडवता येत नसतो तर तो जन्माला यावा लागतो. मास्टर दीनानाथ यांच्या गायनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राष्ट्रभक्ती, जी त्यांनी गायनातूनही दाखवून दिली. ब्रिटिश अधिका-यांसमोर परवशता पाश दैवे……गाणं म्हणून ब्रिटीश कसे अन्याय अत्याचार करतात हे त्यांनाच ऐकवण्याचे आत्मबल लागते दीनानाथांकडे होते.

श्रीकृष्णाची वेणू आणि  नारदांची वीणा यांच्या स्वरांच सार ललादिदींच्यात आहे. त्यांचा स्वर निसर्गदत्त आहे असे सांगून डॉ. अभ्यंकर म्हणाले, तीन सप्तकांवर स्वर लावले जातात. त्यामुळे तीन प्रकारांनी गाणं म्हणता येतं. कोणी सप्तक बघू गातात तर कोणी स्वरांनी गातात. पण श्रृतीनं गाणारी एकमेव गायिका आहे ती म्हणजे लतादिदी. दीनानाथ, लतादिदी आणि सर्वच मंगेशकर भावंड हे मंगेशकर कुटुंबिय जे करतील ती पूर्व दिशा असेच समीकरण झालेले असल्याने मंगेशकर कुटुंब हे स्वयंभू कुटुंब आहे आणि आपल्याला त्यांचे गाणं ऐकालायला मिळालं म्हणून आपणही भाग्यवंत आहोत. यावेळी त्यांनी अंकातील काही लेखामधील आठवणीही सांगितल्या.

उल्हास पवार म्हणाले, आपण दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी उटणं लावतो, अभ्यंगस्नान स्नान करतो, खमंग फराळाचा आस्वाद घेताना जोडीला दिवाळी अंक वाचण्यातही तिच रूची वर्षानुवर्षे दाखवत आहोत. मास्टर दीनानाथ आणि लतादिदी, आशाताई, उषाताई, मीनाताई आणि पं. हृदयनाथ या भावंडांनी वडिलांसारखेच आपापले स्वत:चे स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. त्यांनी समर्पित भावनेने ही परंपरा जपली, जगवली आणि हाच वारसा आता राधा मंगेशकर पुढे चालवत आहेत. यावेळी त्यानी आळंदी येथील ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्य उदघाटक म्हणून लतादिदींनी केलेल्या भाषणाच्या आठवणीही सांगितल्या.

अंकाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले की, स्वरप्रतिभाचा हा १३ वा दिवाळी अंक असून मी संगीतावरील दिवाळी अंक काढावे ही माझ्या वडिलांची प्रेरणा होती. मागिल दिवाळी अंकाचा आढावा घेऊन, दिवाळी अंक ही सांस्कृतिक, साहित्यिक चळवळ असून ती लोकाश्रयामुळे शंभरवर्षाहून अधिक काळ टिकली आहे. दिवाळी अंकांचे आर्थिक गणित जमवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने दिवाळी अंकांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. एबीसीचे लेखापरिक्षण करून दिवाळी अंकाना शासनाने जाहिराती द्याव्यात. ही मागणी उल्हासदादांनी शासनाकडे न्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे हिने म्हटलेल्या शारदा स्तवनाने झाली. या दिवाळी अंकासाठी योगदान देणा-यांचा सत्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कऱण्यात आला. संगीत रसिकांनी मोठ्य़ा संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली. अनेक रसिकांनी यंदा मिठाई ऐवजी स्वरप्रतिभाचा मंगेशकर विशेषांक दिवाळीत देण्यासाठी भेट देण्यासाठी कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने खरेदी केले.

 

पुणेकरांची आवडती सपना थाळी पुन्हा सेवेत सज्ज

0
पुणे : पुण्यात 70,80 व 90 च्या दशकातील सर्वांत लाडके थाळी रेस्टॉरंट सपना थाळी रेस्टॉरंट पुन्हा सेवेत सज्ज  झाले आहे. सपना हॉटेल हे जंगली महाराज रस्त्यावर संभाजी पार्कजवळ स्थित असून सर्व पुणेकरांसाठी सोयीस्कर आहे. वैविध्यपूर्ण डिशेसचा अनुभव खवय्यांना येथे घेता येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सपना हॉटेलचे भागीदार दर्शन व राजेश रावळ म्हणाले की,70 लोकं एकाच वेळी भोजनाचा आनंद घेऊ शकतात,अशी ही प्रशस्त जागा आहे.येथे खवय्यांना थाळीमध्ये गुजराती तुअर दाल,दही वडा,उंधियो,खांडवी,पुरण पोळी,सपना की कढी,फुलका,गोबी मसाला,कचोरी,फ्रुट सॅलड,मेथी थेपला,जीरा पीस पुलाव,दुधी ना मुठ्या,छास,पापड यांसारख्या खादयपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांना सोयीस्कर वाटेल अशा थाळी उपलब्ध आहेत.यामध्ये ब्राँझ थाळी (सोमवार ते शनिवार) टेक अवे आणि डिलिव्हरीकरिता 195 रूपये,सिलव्हर थाळी (सोमवार ते शनिवार) टेक अवे व डाइन इन 275 रूपये,गोल्ड थाळी (सोमवार ते शनिवार) डाईन इन अनलिमिटेड 350 रूपये,प्लॅटिनम थाळी (रविवार व सार्वजनिक सुट्टी) डाईन इन अनलिमिटेड 415 रूपये,गोल्ड टिफिन (सोमवार ते शनिवार) टेक अवे आणि डिलिव्हरी 590 रूपये,प्लॅटिनम टिफिन (रविवार व सार्वजनिक सुट्टी) 800 रूपये उपलब्ध आहेत.
तीन दशके पुणेकरांनी सपना थाळी रेस्टॉरंटवर भरभरून प्रेम केले व आता ही तसाच प्रतिसाद आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

युवकांनी पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक व्हावे. -पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर

0

पुणे,दि. 13: दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे.अंडयांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती,व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल.  या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्यानी पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंडयाचे पोषणमूल्य नागरिकांपर्यत पोहोचविणे, कुक्कूट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निमिर्तीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते.

आरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे.यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा.अंडी उत्पादन घराघरांत व्हावे याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावा अशी अपेक्षा पालकमंत्री मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता बचत महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल  माहिती दिली. आहारतज्ञ् डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्व त्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.आभारप्रदर्शन अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी  तर सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले.

यावेळी केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,मार्केट यार्ड कमिटीचे चेअरमन दिलीप खैरे,सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे   विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.