Home Blog Page 324

पुणे येथील किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पदवीदान सोहळ्याचे आयोजन

पुणे – ६ मे २०२५ – पुणे येथील बाणेर येथे किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदाच्या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांना गुरुवर्य आणि कुटुंबीयांच्यासमक्ष पदवी बहाल करण्यात आली. या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावल्याने हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. पदवीदान सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने संस्थेने सर्वांचे आभार मानले.

पदवीदान सोहळ्याला पिनकॉल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्यासोबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अतुल सी. किर्लोस्कर, गर्वर्निंग काऊन्सिलच्या उपाध्यक्षा सौ. अदिती किर्लोस्कर आणि किर्लोस्कर व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथील संचालिका डॉ. टी.जी. विजया आदी मान्यवरही उपस्थित होते. 

श्री. अतुल सी. किर्लोस्कर यांनी देशातील व्यवसाय उद्योग क्षेत्राविषयी आपले विचार मांडले. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक स्टार्टअपबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक संस्थेत आता शाश्वत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्ल बोलताना त्यांनी किर्लोस्कर संस्थेतील बदलत्या धोरणांचीही प्रशंसा केली. किर्लोस्कर इन्स्टिट्यूटमधून पदवी बहाल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या शिक्षणात पालकांचेही अमूल्य योगदान असते या शब्दांत त्यांनी पदवीदान सोहळ्याला उपस्थित सर्व पालकांचे मुलांना करिअरमध्ये योग्य दिशेने घडवण्यासाठी आभार मानले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. सुधीर मेहता यांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला. मेहता यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून करिअरला सुरुवात केली. या क्षेत्रात जम बसल्यानंतर हळूहळू त्यांनी ऑटोमोबाईल, कृषी, सेवा आणि क्रीडा क्षेत्रात सात कंपन्या सुरु केल्या. या काळात मी वेगवेगळ्या अनुभवांतून घडलो, शिकलो. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेतानाही येणा-या अनुभवात मिळालेले शिक्षण फार महत्त्वाचे असते, असे ते यावेळी म्हणाले. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायत करताना येणा-या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचा अनुभव सांगितला. यश हे सरळ रस्त्याच्यावाटेतून मिळत नाही. त्यासाठी चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा प्रवास नेहमीच खाचखळग्यांनी भरलेला असतो, असे सांगत सर्वांना कठोर मेहनतीला पर्याय नसल्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी डॉ.टी.जी. विजया यांनी संस्थेचा शैक्षणिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचा तसेच यावर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या सोशल इमर्शन प्रोग्राम, कॅम्पस सुधारणा उपक्रम तसेच संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांविषयीही त्यांनी माहिती दिली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना सुवर्ण तसेच रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. वित्त, विपणन, मानव संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन्स आणि व्यवसाय विश्लेषण या शाखांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता क्रमांकात अव्वल क्रमांक मिळवल्याने कोमल मुलचंदानी यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

पुणे शहर भाजप निवडणुकीसाठी सज्ज-भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

पुणे-पुढील चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वागत केले असून, आम्ही पक्ष म्हणून निवडणुकीसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

घाटे म्हणाले, “पुणे शहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. आम्ही नुकतीच शहरात साडेपाच लाख प्राथमिक पक्ष सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्य नोंदणीचे लक्ष्य अंतिम टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. विविध पक्षातून पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

घाटे पुढे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले. पुणे लोकसभेसह आम्ही लढवलेल्या विधानसभेच्या सहाही जागा आम्ही जिंकल्या. एका ठिकाणी मित्र पक्षाला विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहेत. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामे केली आहेत. त्यामुळेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेतही पुणेकर भाजपला विजयी करतील असा विश्वास वाटतो.”

एकदा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आता पुन्हा नको ..सांगत, आयोगाला सादर करणार निवडणुकीसाठी आराखडा

माजी विरोधी पक्षनेते केसकर आणि कुलकर्णी म्हणाले , उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका वेळेत होऊ शकतात कसे तो आराखडा आम्ही आयोग आणि महापालिकेला देतो

पुणे- २०१७ च्या प्रभाग रचने प्रमाणे आणि २३ गावांच्या वेगळ्या रचनेने त्वरित निवडणुका घेणे शक्य असून याबाबतचा आराखडा आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या सादर करणार आहोत, आणि यापूर्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आयोगाकडून झालाय आता पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे अशी हि सूचना करणार असल्याचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बढे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,’ आज सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत.
4 मे 2022 रोजी खानविलकर साहेबांच्या खंडपीठाने ज्यामध्ये आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती त्यामध्ये स्पष्ट आदेश दिले होते की 11/3/2022 रोजी अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेवर पंधरा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करावी सोबत मेहरबान सर्वोच्च न्यायालय यांच्या निकाल पत्राची प्रत जोडली आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे ईमेल देऊन निवडणुका न घेणे हा मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे असे सांगितले होते.
नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्य निवडणूक आयोगाची आयुक्त म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना देखील ई-मेल करून याची जाणीव करून दिली होती.
आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 74 व्या घटना दुरुस्ती नंतर स्थापन झालेल्या स्वायत्त राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.पुण्याचा विचार केला तर 2018 साली अकरा गावे पुढे महानगरपालिकेच्या हार्दिक समाविष्ट केली होती त्यांची एक स्वतंत्र निवडणूक झाली होती त्यानंतर 30 जून 2019 रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणखीन 23 गावे समाविष्ट केली.
2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेताना यानंतर समाविष्ट झालेल्या अकरा त्यातून दोन गावे वगळले म्हणजे 9 आणि 23 अशा गावांची वेगळी प्रभाग रचना लगेच करणे शक्य आहे.
2002 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पुण्यातील जुन्या हद्दीची प्रभाग रचना करून त्याची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर एक महिन्याने समाविष्ट 23 गावांची निवडणूक वेगळे प्रभाग करून झाली आणि दोन्ही निवडणुकींचा निकाल एकत्र जाहीर केला या वेळेला देखील एक करणे शक्य आहे याबाबत एक आराखडा दोन दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाला आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही सादर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधींची महानगरपालिका असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि राज्य निवडणूक आयोगाने त्वरित प्रभाग रचना उर्वरित गावांची सुरू करावी आणि त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी वजा सूचना आहे.

आता तरी निवडणुका घ्या – अंकुश काकडे

महापालिका निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत: गेली ४;५ वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुवातीला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या अडकल्या होत्या. आज सर्वोच्च न्यायालयाने येत्या ४ महिन्यात या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय दीला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरद पवार ) या निर्णयाचे स्वागत करीत आहे. आता राज्य सरकारने तातडीने या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाल करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोक प्रतिनिधींच्या हातात द्यावा.
अंकुश काकडे राज्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)

एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्यूटी संपल्यावर:एसटी कर्मचाऱ्यांना मंत्री भरत गोगावलेंचा अजब सल्ला

एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार

रायगडराज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचे 57 वे राज्यव्यापी अधिवेशन सोमवारी रायगड येथे पार पडले. या अधिवेशनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना भरत गोगावले यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सल्ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्यूटी संपल्यावर, असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे.

भरत गोगावले उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना एसटी चालकांकडून मद्यपान केल्याने अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा गोगावले म्हणाले, एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्यूटी संपल्यावर, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, तुमच्याकडून अपघात होतात. कुणी जाणून बुजून करत नाही. मोबाईल आणि नशापन करून अपघात होतात. ड्युटी संपल्यावर एक चपटीऐवजी दोन प्या.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार, रात्री 8 वाजेपर्यंत त्यांची ड्यूटी कशी संपेल हे पहावे, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महिला कर्मचाऱ्यांनी या बाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन दिलं होतं. त्याचा उल्लेख करत सरनाईक यांनी एसटीचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांना या बाबत जाहिररित्या सूचना केल्या.

दरम्यान, यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले, परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्या लालपरी घेण्याचा निर्णय घेतला. एसटी नफ्यात नाही. जर आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन दिले तर आमचा कर्मचारी सांगेल हे सरकार चांगले आहे, त्यालाच निवडून द्या. काही दिवसापूर्वी 2 दिवसांचा संप झाला. आम्हाला राजकारण करायचे नाही. उदय सामंत हे आपले वकील आहेत. ते आपले उज्वल निकम आहेत. या मंडपातून परत जाताना आमच्या चेहऱ्यावर हसू येईल अशी घोषणा करा. तसेच आरटीओ दंड करतात, ते थांबवा. काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी नीट बोलत नाहीत. कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणावरून निलंबनाची कारवाई होते, अशी तक्रारही शिंदे यांनी यावेळी केली आहे.

सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या: हर्षवर्धन सपकाळ.

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, जुमला ठरू नये.

पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकार घेईल त्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ६ मे २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था लागू केली गेली व सत्तेचे विकेंद्रीकरण केले. यातून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, सभापती अशी सत्तेची विभागणी झाली पण मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकाच घेतल्या नाहीत. केंद्रात मोदीशाह व राज्यात फडणवीस यांना सत्ता आपल्याच हाती हवी होती या आग्रही भूमिकेमुळे या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आतातरी निवडणुका घेऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करावे असे सपकाळ म्हणाले.

चौंडी मंत्रिमंडळ बैठक..
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून चौंडी गावी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली. पण राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ह्या योजनांसाठी सरकार पैसा कोठून आणणार हा प्रश्न आहे. सरकारकडे लाडकी बहिण योजनेला निधी नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग केला. मागील महिन्यात एसटी कामगारांना पगार देण्यास पैसे नव्हते. शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत तर या घोषणांची अंमलबजावणी कशी करणार. निवडणुकी आधी अशाच मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या पण आता त्याची अंमलबजावणी केली जात नाही. २०१४ च्या निवडणुकी आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन बारामतीतील एका कार्यक्रमात दिले होते, त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. आता चौंडी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणा सुद्धा आधीच्या घोषणांप्रमाणे जुमले ठरू नयेत असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पहलगाम हल्ला..
पहलागाम अतिरेकी हल्ल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचे गुप्तचर विभागाला संकेत मिळाले होते तरिही सरकारकडून काही हालचाली झाल्या नाहीत असे मल्लिकार्जून खर्गे म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकते, खर्गे यांना ५० वर्षांचा राजकीय अनुभव आहे ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी. पहलगाव प्रश्नी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. अशा प्रसंगी देश एकजूट आहे हाच संदेश गेला पाहिजे पण हल्ल्याच्या १० दिवसानंतरही सरकारकडून ठोस भूमिका घेतलेली नाही असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीतील निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिपरिषद बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार
🔸 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार
🔸 व्यावसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार

✅ राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार
🔸 राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार
🔸 कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास
🔸 हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार
🔸 हे अभियान राबविण्यासाठी ₹10.50 कोटी खर्च करणार

✅ धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार
🔸 दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण
🔸 आतापर्यंत यासाठी ₹288.92 कोटी वितरित
🔸 राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना

✅ धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव
🔸 राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
🔸 प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे.
🔸 नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह
🔸 नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार
🔸 या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव

✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार
🔸 राज्यात असे 3 ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी)
🔸 राज्यात अशा 19 विहिरी
🔸 राज्यात असे एकूण 6 घाट
🔸 राज्यात असे एकूण 6 कुंड
🔸 अशा एकूण 34 जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करणार
🔸 यासाठी ₹75 कोटी खर्च करणार

✅ अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
🔸 या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.
🔸 यासाठी ₹485.08 कोटी खर्च करणार
🔸 जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार

✅ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून ₹5503.69 कोटींचे मंदिर विकास आराखडे
🔸 चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ₹681.32 कोटी
🔸 अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार: ₹147.81 कोटी
🔸 श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : ₹1865 कोटी
🔸 श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा : ₹259.59 कोटी
🔸 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: ₹275 कोटी
🔸 श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा : ₹1445.97 कोटी
🔸 श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : ₹829 कोटी

✅ अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार

✅ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय

✅ ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय

✅ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-2025 जारी करण्याचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल:एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

0

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत.या निर्णयाचे आपण मनापासून स्वागत करतो आणि निवडणूक आयोगाने तयारीला लागावे असे आमचे म्हणणे आम्ही त्यांच्यापर्यंत कळवू असे ते म्हणाले.

तुर्कियेची पाकिस्तानला साथ, धोकादायक युद्धनौका कराचीत पोहोचली

४ मे २०२५ रोजी, तुर्किये नौदलाची युद्धनौका TCG Buyukada (F-512) तिच्या संपूर्ण ताफ्यासह पाकिस्तानच्या कराची बंदरात पोहोचली. पाकिस्तान नौदलाने म्हटले आहे की या बंदर दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य मजबूत करणे आहे. तुर्कियेने समन्वय वाढवण्यासाठी एक पाऊल म्हणूनही याचे वर्णन केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कोणत्याही कारवाईसाठी सतर्क असताना तुर्किये युद्धनौका कराचीत पोहोचली. तुर्कियेचे राजदूत डॉ. इरफान नेझिरोग्लू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी एकता दाखवण्याचे आश्वासन दिलेल्या बैठकीनंतर TCG बुयुकडा कराचीला पोहोचले.युद्ध सुरू करण्याच्या पेचप्रसंगात, पाकिस्तानने भारताला संदेश देण्यासाठी तुर्कियेची युद्धनौका मागवली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे तुर्किये जहाज ७ मे पर्यंत कराचीतच राहण्याची शक्यता आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ म्हणतात, ‘भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्किये पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवू इच्छित आहे. म्हणूनच त्यांनी टर्किए टीसीजी बुयुकडा पाकिस्तानला पाठवले आहे.२७ एप्रिल रोजी तुर्कियेचे ७ सी-१३० हरक्यूलिस विमान पाकिस्तानात उतरले. यापैकी ६ विमाने इस्लामाबाद येथे आणि एक विमान कराची येथील हवाई दल तळ ‘फैसल’ येथे उतरले. यामध्ये बेरेक्टर टीबी२ ड्रोन, छोटी शस्त्रे, स्मार्ट बॉम्ब आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, तुर्कियेने हे नाकारले.०१८ मध्ये, दोन्ही देशांमध्ये MİLGEM प्रकल्पावर एक करार झाला. याअंतर्गत, तुर्कियेने पाकिस्तानसोबत चार अडा-क्लास कॉर्व्हेट युद्धनौका पुरवण्यासाठी करार केला. यापैकी दोन जहाजे तुर्कियेमध्ये आणि दोन पाकिस्तानमध्ये बांधली जात आहेत. पहिले जहाज पीएनएस बाबर २०२३ मध्ये कार्यान्वित झाले. टीसीजी हा या प्रकल्पाचा एक भाग आहे.

२०१८ मध्ये, तुर्किये आणि पाकिस्तानमध्ये ३० T१२९ हेलिकॉप्टरचा करार झाला. याशिवाय, २०२५ मध्ये वितरित होणाऱ्या ४ मिलजुम-क्लास कॉर्वेट्ससाठी देखील करार करण्यात आला.याशिवाय, पाकिस्तान आणि तुर्कियेमध्ये दोन्ही देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव देखील होतात.तुर्किये आणि पाकिस्तानमध्ये खूप मजबूत ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लष्करी संबंध आहेत. दोन्ही देश इस्लामिक सहकार्य संघटनेचे म्हणजेच ओआयसीचे सदस्य आहेत आणि अनेक मुद्द्यांवर एकमेकांना पाठिंबा देतात.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तुर्कियेने पाकिस्तानला राजनैतिक पाठिंबा दिला होता. तथापि, लष्करी मदत मर्यादित होती.

निवृत्त जेएनयू प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ञ राजन कुमार म्हणतात,तुर्कियेने यापूर्वीही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. २०१९ आणि २०२० मध्ये, तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत काश्मीरला ‘वादग्रस्त प्रदेश’ म्हणून वर्णन केले. याशिवाय, २०१९ मध्ये त्यांनी काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला विरोध केला.

 दरम्यान आज सकाळी  आरएसएफने पोर्ट सुदानवर एक मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये विमानतळ, तेल डेपो आणि टर्मिनलसारख्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले, तसेच एसएएफ बॅरेक्ससह. या हल्ल्यात जनरल बुरहान राहत असलेल्या हॉटेल आणि अतिथी राजवाड्यावरही हल्ला झाला.

पुण्यातील या ८५ ठिकाणांहून वाजणार भोंगा ….War horn

पुणे- उपनियंत्रक, नागरी संरक्षण कार्यालय, पुणे यांनी पुण्यातून कुठून कुठून भोंगा वाजविला जाईल याची यादी आज येथे सादर केली आहे.
भोंग्याचे ठिकाण व पत्ता

आगाखान पॅलेस नगर रोड, पुणे-६
पुणे मुलींची अंधशाळा, कोथरुंड, पुणे ५२९
इंडियन केबल हडपसर, पुणे-१३
एस.आर.पी.एफ. ग्रुप रामटेकडी, पुणे-२२
हिंगण स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे-५२
छत्रपती संभाजी मनपा शाळा क्रं. ७०, कोथरुड, पुणे-२९
एस.एन.डी.टी. कॉलेज कर्वे रोड, पुणे
किलोस्कर किसान कोथरुड, पुणे-२९
एरंडवणे फायर स्टेशन कर्वे रोड, पुणे
बैंक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड,
फर्ग्युसन कॉलेज, पुणे
गव्ह. टेक्निकल स्कूल, घोले रोड शिवाजीनगर, पुणे
अॅग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
गव्ह. पॉलिटेकनिक, चतुः श्रृंगी, पुणे
पाषाण तलाव, पाषाण, पुणे-८
एन. सी. एल. पाषाण, पुणे-८
पोलीस मोटारवर्कशॉप, औंध, पुणे-२७
श्री. शिवाजी विद्यामंदिर औंध, पुणे-२७
पर्वती वॉटर वर्क्स, सिहंगड रोड, पुणे-९
धर्मवीर संभाजी म.न.पा. शाळा नवी पेठ, पुणे
रेल्वे स्टेशन शिवाजीनगर, पुणे-५
एल.आय.सी. बिल्डींग, नारायण पेठ, पुणे-३०
पी. एम. टी. वर्कशॉप, स्वारगेट
सेंट जोसेफ टेक. स्कूल, शंकरशेठ रोड, पुणे
सेंट्रल फायर बिग्रेड भधानी पेठ, पुणे-२
म.न.पा. शाळा भवानी पेठ, (सावित्रीबाई हायस्कूल) पुणे-२
म.न.पा.शाळा नानावाडा बुधवारपेठ, किंकर राम प्रशाला, पुणे-२
म.न.पा. दवाखाना सोन्या मारुती चौक, हुतात्मा बाबु गेणु रविवारपेठ, पुणे-२
पुणे जिल्हा परिषद सोमवार पेठ, पुणे-११
शांताबाई लडकत मनपा शाळा, नाना पेठ, पुणे-२ महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ, पुणे-२
म.न.पा. आयात कर भवन, शिवाजीनगर, पुणे-५
सुदर्शन केमिकल इन्स्डस्ट्रीज आर टी ओ शेजारी, संगमवाडी, पुणे
बाबुराव सणस म न पा कन्या शाळा, मंगळवार पेठ, पुणे-११पर्णकुटी येरवडा, पुणे-६
ना.सं. येरवडा सब कंट्रोल येरवडा.
एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे
पुनम रेस्टॉरंट, डेक्कन जिमखाना, पुणे-४
श्री. शिवाजीमराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ, पुणे
केशवराज जेथे मनपा शाळा, (गंज पेठ) महात्मा फुले पेठ,
वैदिक संशोधन मंडळ मुकुंद नगर, पुणे
ना.सं. पर्वती उपनियंत्रण केंद्र, पर्वती पुणे-९
शंकरराव मोरे विदयालय, पौड रोड, पुणे
मेढी फॉर्म गोखलेनगर, पुणे
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळा, बोपोडी, पुणे-१२
पी डब्ल्यू डी वर्कशॉप, दापोडी, पुणे-१२
जयहिद सिनेमा खडकी, पुणे-३
रेल्वे पोलीस मुख्यालय, खडकी, पुणे
जे एन पेटीट टेक्नि, हायस्कुल, बंडगार्डनरोड, पुणे
बैंक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोड, पुणे-२
वेस्टर्न इंडिया हाऊस लक्ष्मी रोड, पुणे
न्यु इंग्लिश स्कुल, रमण बाग पुणे
वनाज फॅक्टरी, पौड रोड
इंजिनिअरिं कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
सरस्वती विदयामंदिर विदयालय, (घारपुरे हायस्कूल, शुक्रवार पेठ,) पुणे
अभिनव कला महाविदयालय, टिळक रोड, पुणे-३०
कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पुणे-३७
महाराष्ट्र वृत्री उदयोग विकास महामंडळ, मार्केट यार्ड, पुणे
यशवंतराव चव्हाण, प्रशाला बिबवेवाडी,
विश्वकर्मा टेक्नि. इन्स्टि, अपपर इंदिरा नगर, पुणे
कौन्सिल हॉल, कम्पाऊंड, पुणे-१
अपंग संस्था वानवडी, पुणे-४०
रेल्वे लायब्ररी बिल्डींग, रेल्वे घोरपडी, संस्था, पुणे-४९
भारत फोर्ज कंपनी मुंढवा, पुणे
सेंट्रल जेल येरवडा, पुणे-६
रेल्वे स्टेशन पुणे,
चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, (राजभवन) पुणे
लॉ कॉलेज, प्रभात रोड, पुणे-४
इंडस्ट्रियल ऑक्सिजन नगर रोड, पुणे
सिम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रोड, पुणे
वैभव टॉकीज हडपसर, पुणे-२८
राजर्षि शाहू म.न.पा. शाळा मुंढया
वि.स. खांडेकर म.न.पा. शाळा सहकारनगर, पुणे
एम.एस.ई.बी. रास्ता पेठ, पुणे
साठे बिस्कीट विश्रांतवाडी, येरवडा, पुणे
येकफिल्ड कंपनी, वडगांव शेरी, पुणे
पुणे कॅन्टोन्मेंट ऑफिस
वानवडी कॅन्टोन्मेंट शाळा
डॉ. आंबेडकर हायस्कुल, पुणे कॅन्टोन्मेंट
घोरपडी डिस्पेन्सरी पुणे कॅन्टोन्मेंट
अॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी
ओ.सी.एस. दिघी (V.S.N.L.) दिघी
कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी कॅन्टों.
कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी बाजार, शाळा
प्रायमरी स्कूल, संगमवाडी खडकी,

टॉर्च आणि कॅश ठेवण्याचा सल्ला,देशातील 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल:युद्धात बचावाचे मार्ग शिकवले जातील

नवी दिल्ली-


पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (७ मे) देशातील २४४ भागांत युद्धात बचावाच्या तंत्रांवर मॉक ड्रिल आयोजित केले जातील. गृह मंत्रालयाने या भागांना नागरी संरक्षण जिल्हे म्हणून सूचीबद्ध केले आहे. हे सामान्य प्रशासकीय जिल्ह्यांपेक्षा वेगळे आहेत.गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल दरम्यान हवाई हल्ला आणि ब्लॅकआउट झाल्यास नागरिकांनी काय करावे हे सांगितले जाईल. नागरिकांना त्यांच्या घरात वैद्यकीय किट, रेशन, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी होऊ शकतात म्हणून रोख रक्कम सोबत ठेवा.

नागरी संरक्षण जिल्हे त्यांच्या संवेदनशीलतेनुसार 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. श्रेणी-१ सर्वात संवेदनशील आहे आणि श्रेणी-३ कमी संवेदनशील आहे. ५ मे रोजी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश जारी केले होते.

आज दिल्लीतील गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यात उपस्थित होते.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने अस्थिर बाजारपेठांमध्ये संभाव्य स्थिरता आणि कर बचत क्षमता डोळ्यासमोर ठेवून टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केला

मुंबई, :  टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण फंड ऑफ फंड योजनेचे उद्दिष्ट आर्बिट्रेज फंडचे कमी अस्थिरतेचे धोरण आणि उच्च गुणवत्तेच्या कॉर्पोरेट बॉन्ड्सची स्थिर संचय क्षमता यांचा समन्वय घडवून आणणे हे आहे. नवीन फंड ऑफर ५ मे २०२५ रोजी खुली होईल आणि १९ मे २०२५ रोजी बंद होईल.

देशांतर्गत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणारा हा ओपन एंडेड फंड ऑफ फंड कॉर्पोरेट बॉन्ड आणि इक्विटी आर्बिट्रेज रिटर्नवर मिळवलेले व्याज यांच्या संतुलित मिश्रणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक बहुउपयोगी सोल्युशन प्रदान करतो.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह एफओएफ दोन वर्षांच्या होरायझॉन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे स्थिर, संचय-उन्मुख आणि कर बचत सक्षम रिटर्न मिळवू इच्छितात. हा फंड जास्तीत जास्त ६५% टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाला आणि कमीत कमी ३५% टाटा आर्बिट्रेज फंडाला वाटप करतो, जो २ वर्षांचे होरायझॉन डोळ्यासमोर ठेवून ऋण स्थिरता आणि कर बचत सक्षम रिटर्न यांना एकत्र जोडतो.

टाटा आर्बिट्रेज फंड आपल्या १००% हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओसह, अल्पकालीन स्थिर लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तर टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड निवडक कालावधी प्रबंधनासह, मिळवलेल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. फंड ऑफ फंड संरचनेंतर्गत हे मिश्रण, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवण्यात आल्यावर स्टॅन्डअलोन आर्बिट्रेज किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाच्या तुलनेत अधिक चांगल्या कर बचत क्षमतेसह एक संतुलित दृष्टिकोन प्रदान करतो.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन यांनी सांगितले, “वर्तमान वातावरणामध्ये जिथे ऋण कमाई आकर्षक आहे आणि इक्विटी बाजारपेठेमध्ये अस्थिरता आहे, अशाप्रकारचे हायब्रिड धोरण पारंपरिक ऋण फंडांच्या तुलनेत अधिक जास्त कर-पश्चात रिटर्न देऊ शकते. फंडाचे सक्रिय वाटप आणि स्मार्ट लिक्विडिटी व्यवस्थापन रिटर्न अनुकूलित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.”

हल्लीच्या वर्षांमध्ये आर्बिट्रेज आणि हायब्रिड धोरणांकडे आकर्षण वाढत आहे कारण गुंतवणूकदार असे पर्याय शोधत आहेत ज्यामध्ये ऋण सुरक्षा आणि इक्विटी लिंक्ड उत्पादनांची कर बचत क्षमता व लवचिकता यांना एकत्र जोडले जाते.

टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड – रेग्युलर प्लॅनने एका वर्षात ८.३४% चे वार्षिक रिटर्न दिले आहे, तर याच कालावधीत क्रिसिल कॉर्पोरेट बॉन्ड ए-II इंडेक्सने ७.९७% रिटर्न दिले आहे. २०२१ मध्ये स्थापनेपासून फंडने ५.९६% चे रिटर्न दिले आहे (स्रोत: प्रेझेंटेशन). व्हॅल्यू रिसर्चनुसार, टाटा आर्बिट्रेज फंड – डायरेक्ट प्लॅन १ वर्ष आणि ५ वर्षांच्या एसआयपी रिटर्न दोन्हींसाठी आर्बिट्रेज फंडांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. १ वर्षाच्या एसआयपीवर ८.०५% आणि ५ वर्षांच्या एसआयपीवर ७.०६% रिटर्न दिले आहे.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंडच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५००० रुपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीवर २ वर्षांनी इक्विटी टॅक्सेशन लाभ आणि ३० दिवसांनी रिडीम केल्यावर ०.२५% चा खूपच कमी एक्झिट लोड यांचा समावेश आहे.

टाटा ऍसेट मॅनेजमेंट गुंतवणूकदारांना खूप चांगल्या प्रकारे संशोधन करून तयार केलेली, नाविन्यपूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता मजबूत करत आहे, ही सोल्युशन्स बदलत्या बाजारपेठेचा वेग आणि दीर्घकालीन धन निर्मिती या उद्दिष्टांना अनुरूप आहे.

स्टार हेल्थ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती

चेन्नई,  – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल.राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘स्टार हेल्थ’ने ग्राहक-केंद्रिततेसह नवकल्पनांचा अवलंब करत एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळ आणि व्यवस्थापनासोबत जवळून काम करताना मी चांगल्या प्रशासकीय पद्धती बळकट करण्यावर, दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर आणि आरोग्य तसेच विमा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कंपनीला योग्य दिशेने नेण्यावर भर देईन. समावेशक विकास, नैतिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावर आमचा ठाम विश्वास राहील.”

या संदर्भात ‘स्टार हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या महत्त्वपूर्ण टप्प्यावर राजीव खेर यांचे नेतृत्व लाभणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, धोरण क्षेत्रातील सखोल जाण आणि सार्वजनिक हिताविषयीची समज स्टार हेल्थच्या पुढील विकासप्रवासात मोलाची ठरेल. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे स्टार हेल्थ अधिक सक्षम, ध्येयधोरणांनी प्रेरित आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणारी संस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह आरोग्यविमा सेवा देण्याच्या आमच्या संकल्पात त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच अधिक बळ येईल.”

सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू

प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

पुणे : ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची ‘पुणे आयडॉल २०२५’ स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी दिली.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी सन २००३ साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे यंदा २३ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उ‌दघाटन गायन क्षेत्रात राष्ट्रपती पदक विजेत्या, प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते सोमवार दि.१९ मे, सकाळी ९.३० वा. पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार आहे. अंतीम फेरी २४ मे २०२५ रोजी, १२ ते ३ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म www.sunnynimhan.com या संकेस्थळावर उपलब्ध असणार आहेत. प्रवेशाची अंतीम तारीख १५ मे २०२५ राहिल. अधिक माहितीसाठी संपर्क : सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, पुणे.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून रामेश्वरी वैशंपायन, कल्याणी देशपांडे, जितेंद्र भुरूक, कोमल लाळगे हे काम पहाणार आहेत. वय वर्षे १५ पर्यंत ‘लिटिल चॅम्प्स’, वय ‘१५ ते ३० वर्ष ‘युवा आयडॉल ‘,३० ते ५० वर्ष ‘जनरल आयडॉल ‘वर्ष ५० नंतर ‘ओल्ड इज गोल्ड’ अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पाच हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्याची संधी देऊन त्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम १५ हजार, १० हजार व मानाचे ‘पुणे आयडॉल’ सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने काही निवडक व प्रतिभावंत कलाकारांना शैक्षणिक व वैद्यकीय गरजेपोटी मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते.

प्रसिद्ध गायक अरूण दाते, प्रभा अत्रे, रविंद्र साठे, महेश काळे, त्यागराज खाडिलकर, डॉ. सलील कुलकर्णी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी अशा गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. सौरभ साळुंके, कोमल कृष्ण, तुषार रिठे, प्रमोद डाडर, विनोद सुर्वे, महंमद रफी अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी गायन क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशी माहिती जितेंद्र भुरूक आणि बिपीन मोदी यांनी दिली.स्पर्धेसाठी अमित मुरकूटे, अनिकेत कपोते, गणेश शेलार, संजय तारडे, प्रमोद कांबळे आदी नियोजन करत आहेत.

मुंबई, पुणे, संभाजीनगरसह नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गअशा एकूण १६ ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

पुणे-केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांत युद्धाचे मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांत महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश असून, तिथे बुधवारी एकाचवेळी ही मॉकड्रील होणार आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 शहरांत युद्धाची मॉकड्रील घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोन्ही देशांमधील तणाव वाढला किंवा युद्धाची स्थिती उद्धवली तर आपत्कालीन स्थितीत काय करावे? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. त्यानुसार, देशभरात 7 मे रोजी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही मॉक ड्रील घेतली जाणार आहे.

देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मॉकड्रीलमध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.

तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या तिन्ही गटांतील 16 ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मॉकड्रील केली जाईल. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआऊट केले जाणार

या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.

मॉकड्रीलमध्ये नेमके काय होणार?

हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार.
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे प्रशिक्षण जिले जाणार.
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणे समजू नये यासाठी ब्लॅकआऊट केले जाणार.
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाणार.
सामान्य नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार.
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचे महत्त्वे सांगितले जाणार.

मॉकड्रीलवेळी कुठे वाजणार सायरन?

प्रशासकीय भवन
सरकारी भवन
पोलीस मुख्यालय
अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय
लष्करी तळ
शहरातील मोठे बाजार
गर्दीची ठिकाणे
सायरन वाजताच काय करावे अन् काय करु नये?

सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा.
मोकळ्या जागेपासून दूर राहा.
रेडिओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.
घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा.