नागरिकांनी विकास कामांवर लक्ष ठेवावे – मंजुश्री खर्डेकर.
जयपूर च्या धर्तीवर पुण्यातील कर्वे रस्त्यावर डबल डेक ओव्हरब्रीज (व्हिडीओ)
पुणे- कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी जयपूरच्या धर्तीवर कलमाडी हाऊस ते एस एन डीटी दरम्यान डबल डेक ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे . आज या ब्रिज चे सादरीकरण करण्यात आले आहे अशी माहिती महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी येथे दिली .
ते म्हणाले , वनाज ते रामवाडी मेट्रो येथे होते आहेच . त्या खाली हा ओव्हर ब्रिज असून तो जाण्या येण्या करिता दोन्ही बाजूने खुला असेल .या कामाचे पूर्व गणनपत्रक आता तयार करण्यात येईल आणि लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल . या मुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे …. डेक्कन हून कर्वे रस्त्याला लागलेले वाहन गरवारे कॉलेज च्या पुढे कलमाडी हाऊस नजीक या नियोजित पुलावर येईल .आणि एसएन डी टी जवळ उतरून पुन्हा पौड रस्त्यावर जाण्यासाठी आता अस्तित्वात असलेल्या पुलावरून जाईल . याच वेळी खालचा रस्ता देखील सुरु असेल . आणि या पुलाच्या वरून मेट्रो जाईल . यामुळे नळ स्टाॅप चौक टाळून हा आणि ऐका नेमके याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी नेमके काय सांगितले …
मराठी भाषा संवर्धनासाठी विविध कार्यक्रम -महापौर टिळक
पुणे – मराठी भाषा संवर्धनासाठी एक ते 15 जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी भाषा संवर्धन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या पंधरवड्यात प्रकाशकांना साहित्य पुरस्कार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच नवीन साहित्याकट्टे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टिळक म्हणाल्या. याशिवाय येत्या 22 डिसेंबरपासून दुपारी 12 ते 12.10 या कालावधीत आकाशवाणीवर ‘आपली मराठी’ या अंतर्गत कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा घेतला जाईल. आकाशवाणी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या प्रायोजकत्त्वातून हा कार्यक्रम होणार असल्याचे टिळक यांनी नमूद केले.
मराठी भाषा संवर्धन समितीला पूर्णवेळ कार्यालय सद्यस्थितीत नाही. त्यामुळे समितीला पूर्णवेळ कार्यालय निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याचे टिळक यांनी नमूद केले. याशिवाय महापालिका शाळातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा आणि साहित्याविषयीची गोडी निर्माण व्हावी यासाठी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना एक जानेवारीपासून “लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही टिळक यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत बालनाट्येही दाखवली जाणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.
‘साँचा नाम तेरा’ रंगलेली बहारदार मैफिल …
पुणे-‘साँचा नाम तेरा’ या संगीतमय मैफलीचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्या निवडक गाण्यांची मेजवानी रसिकांनी अनुभवली. लता-आशा-उषा असा त्रिवेणी संगम या मैफिलीत रसिकांना अनुभवता आला.
प्रसिद्ध गायिका मनीषा लताड, राधा मंगेशकर, मंजुश्री ओक यांनी विविध गीते यावेळी सादर केली. मनीषा लताड यांनी मै तो आरती उतारू रे, मेरे मेहबूब मे क्या नही, मेरी सांसो को जो, ये आज कल के लडके अशी एक से बढकर एक गाणी सादर केली तर राधा मंगेशकर यांनी इक प्यार का नगमा है, रंगीला रे, बंगले के पीछे, अपलम चपलम, लग जा लगे तर मंजुश्री ओंक यांनी आगे भी जाने न तू, रात अकेली है, दिल चीज क्या है, ओ पल हारे अशी गीते सादर केली. या मैफलीला रसिकांनी उंदड प्रतिसाद दिला. तर अनेक गीतांना रसिकांची वन्स ओर ची दाद मिळाली.
मनीषा लताड निर्मित व गंगाधर एंटरटेन्मेंट – महक प्रतुत या मैफलीचे बहारदार निवेदन संदीप कोकीळ यांनी केले. तर संगीत संयोजन विवेक परांजपे यांनी केले.
इंदिरा गांधींशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण – मोहन प्रकाश
भारताचा इतिहास इंदिरा गांधींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळाता त्यांनी सिक्कीम देशाचे भारतात विलीनीकरण केले. 1971 सालच्या युध्दात त्यांच्याच कार्यकाळात भारताने अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानवर विजय मिळवत 90 हजार सैन्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. असे माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी दिली.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने औंध येथील पंडीत भीमसेन जोशी कलादालन येथे इंदिराजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
मोहन प्रकाश पुढे म्हणाले, ” इंदिरांजींनी वडील पंडीत नेहरुंसोबत स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांनी देशाची धुरा सांभाळली. समाजातील गरीब घटकांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. गरिबी हटावचा नारा दिला. या छायाचित्र प्रदर्शनात इंदिराजींच्या जीवनातील अनेक दुर्मिळ चित्र पाहण्यास मिळाली. आजच्या पिढीने त्यांनी देशासाठी केलेला त्याग लक्षात घेत देश मजबूत करण्याचे काम करावे”
कांची प्रोपर्टीज्, डीटीडीसी स्ट्रायकर्स, सिध्दी क्रिकेट क्लब संघाची आगेकुच
पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत कांची प्रोपर्टीज्, डीटीडीसी स्ट्रायकर्स व सिध्दी क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रतिक शेलारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कांची प्रोपर्टीज् संघाने सिम एन् विलो संघाच 11 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्वप्निल कुलकर्णीच्या 30 व तुणाल पायगुडेच्या 25 धावांच्या बळावर कांची प्रोपर्टीज् संघाने 19.1 षटकात सर्वबाद 125 धावा केल्या. 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिक शेलार व निहार राज्यगुरू यांच्या अचूक गोलंदाजीने सिम एन् विलो संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 114 धावात रोखला. प्रतिक शेलार सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत समिर मोमीनच्या अफलातीन गोलंदाजीच्या जोरावर डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने इलेव्हन अॅक्सेस संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना इलेव्हन अॅक्सेस संघाने 20 षटकात 9 बाद 102 धावा केल्या. यात हिकांत कंदारने 24 तर निखिल पांड्याने 25 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाकडून समिर मोमीनने केवळ 14 धावा देत 5 गडी बाद केले. 102 धावांचे लक्ष डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने केवळ 16.3 षटकात 6 बाद 103 धावा करून पुर्ण केले. यात अतिफ सय्यदने 23 तर महेश शिंदेने 19 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. समिर मोमीन सामनावीर ठरला.
शेवटच्या लढतीत सुजय इनामदारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिध्दी क्रिकेट क्लब संघाने शिवतेज क्रिकेट क्लब संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना शिवतेज क्रिकेट क्लब संघाचा डाव 19.2 षटकात सर्वबाद 137 धावांत रोखला. यात गणेश पायगुडेने 34 धावा केल्या. सिध्दी क्रिकेट क्लब संघाकडून निखिल कोंढारे, स्वप्निल कुलकर्णी व सुजय इनामदार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 137 धावांचे लक्ष सिध्दी क्रिकेट क्लब संघाने केवळ 16.2 षटकात 5 बाद 138 धावांत सहज पुर्ण केले. यात शिवप्रताप सिंगने 24 चेंडूत 48 तर सुजय इनामदारने 33 चेंडूत 46 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सुजय इनामदार सामनावीर ठरला
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
कांची प्रोपर्टीज्- 19.1 षटकात सर्वबाद 125 धावा(स्वप्निल कुलकर्णी 30, तुणाल पायगुडे 25, निरज यादव 18, हेमंत सुर्यवंशी 3-34, अखिलेश उबाळे 2-9) वि.वि सिम एन् विलो- 20 षटकात सर्वबाद 114 धावा(ललित सोमनाथ 35, इशान शर्मा 18, अमृत धांडेकर 17, प्रतिक शेलार 4-25, निहार राज्यगुरू 2-30) सामनावीर- प्रतिक शेलार
कांची प्रोपर्टीज् संघाने 11 धावांनी सामना जिंकला.
इलेव्हन अॅक्सेस- 20 षटकात 9 बाद 102 धावा(हिकांत कंदार 24, निखिल पांड्या 25, साजन मोदी 21, समिर मोमीन 5-14, दिपक बोरा 2-17, संकेत चव्हाण 1-10) पराभूत वि डीटीडीसी स्ट्रायकर्स- 16.3 षटकात 6 बाद 103 धावा(अतिफ सय्यद 23, महेश शिंदे 19, हिकांत कंदार 3-21, सनी मारवाडी 2-18, नितेश पटेल 1-18) सामनावीर- समिर मोमीन
डीटीडीसी स्ट्रायकर्स संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.
शिवतेज क्रिकेट क्लब- 19.2 षटकात सर्वबाद 137 धावा(गणेश पायगुडे 34, रवी पवार 22, अजय नव्हले 22, निखिल कोंढारे 2-14, स्वप्निल कुलकर्णी 2-27, सुजय इनामदार 2-28) पराभूत वि सिध्दी क्रिकेट क्लब- 16.2 षटकात 5 बाद 138 धावा(शिवप्रताप सिंग 48(24), सुजय इनामदार 46(33), विनित मडकाइकर 22, रवी पवार 3-21, राजेश सुतार 1-15) सामनावीर- सुजय इनामदार
सिध्दी क्रिकेट क्लब संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे पहिल्यांदा एकत्र
कर्करोगावर मोफत उपचार करणाऱ्या कॅन्सर केअर सेंटर ला वैद्यकीय उपकरणे भेट
केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या ‘विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि ‘मातृसेवा डायग्नोस्टिक सेंटर’ मधील गरजू कॅन्सर रुग्णांसाठी मोफत सेवा देते. यामध्ये रुग्णास प्रवेश देणे, मोफत तपासणी, २४ तास नर्सिंग आणि सहायक काळजी घेणे, आहार, रुग्णाचा मुक्काम, मार्गदर्शन आणि सल्ला या सुविधा मोफत पुरविल्या जातात
वनखात्याने पाडल्या ऐन थंडीगारठ्यात झोपड्या, पालकमंत्र्यांनी दिले पुनर्वसनाचे आश्वासन
पुणे-पर्वती येथील झोपड्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पुनर्सवन न करता अतिक्रमण सांगून उध्वस्त केलेल्या कारवाईचा निषेध झोपडपट्टी सुरक्षा दलाने केला आहे .उध्वस्त झालेल्या झोपडी धारकांनी पुणे शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी सौरव राव आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना घेराओ घालून निवेदन केले .
या निवेदनात १ जानेवारी २००० पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीधारकांना शासनाचे संरक्षण असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा न करता थंडीच्या वातावरणात या दलित उपेक्षितांच्या झोपड्या निर्दयपणे उध्वस्त केल्या हे निदर्शनास आणून दिल्याने पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी तात्काळ पुरावे तपासून , बी. एस. यू. पी. अंतर्गत घरकुल देण्याचे आदेश दिले . व घरकुल मिळेपर्यंत आहे . त्याच जागी तात्पुरता निवारा देण्याचे आश्वासन दिले .
या शिष्टमंडळाने नेतृत्व संघटनेचे नेते भगवानराव वैराट , प्रा. सुरेश धिवार , काशिनाथ गायकवाड , मोहम्मद शेख , वामन कदम ,सुरेखा भालेराव , प्रतिभा गायकवाड , मंगल लोंढे , विष्णू खोबरे , लक्ष्मण मुजमले , यशवंत खोबरे यांचा समावेश होता .
भारताच्या युकी भांब्री याला विजेतेपद
पुणे- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या युकी भांब्री याने आपली विजयी मालिका कायम ठेवत रामकुमार रामनाथनचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 137व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने आपला धडाका कायम जागतिक क्र.150 असलेल्या भारताच्या रामकुमार रामनाथन याचा 4-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. 2तास 2मिनिटे झालेल्या या अतितटीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये युकीने रामकुमारची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 2-0अशी आघाडी घेतली. 4थ्या गेममध्ये रामकुमार याने कमबॅक करत युकीची सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. 10व्या गेममध्ये रामकुमारने आपला खेळ उंचावत युकीची सर्व्हिस ब्रेक व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या युकीने दुसऱ्या सेटमध्ये रामकुमारची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतः ची राखत 3-1 अशी आघाडी मिळवली.सामन्यात 5-3 अशी स्थिती असताना 9व्या गेममध्ये रामकुमारने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत युकीने आक्रमक खेळ करत रामकुमारची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. 10व्या गेममध्ये रामकुमारने डबल फॉल्ट केला व युकीने मिळालेल्या संधीचे सोने करत मॅचपॉइंट मिळवत त्याची सर्व्हिस ब्रेक करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजेतेपदामुळे युकी भांब्री जागतिक क्रमवारीत 120व्या स्थानी पोहोचला असून रामकुमार रामनाथन 137व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यावेळी युकी भांब्री म्हणाला कि, पुणे माझ्यासाठी नेहमीच लकी ठरले आहे. आतापर्यंत पुण्यात मी अनेक स्पर्धा खेळलो आहे आणि येथे होणाऱ्या स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन केले जाते. हि स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात स्पर्धा संयोजकांचा मोलाचा वाटा आहे. केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे हे सलग 4वर्षे आहे आणि पुढच्याही वर्षी या स्पर्धेत मला सहभागी व्हायला आवडेल.
दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याने क्रोशियाच्या अॅन्ट पावीकच्या साथीत स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 1तास 13मिनिटे चाललेल्या या सामन्यात टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली. त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी सयंमपूर्ण खेळी करत पाचव्या गेममध्ये पुन्हा पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. 7व्या गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांनी 40-40असे गुण असताना डबल फॉल्ट केला व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व सामन्यात आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 8व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात 5-3अशी आघाडी मिळवली. त्यांनंतर 12व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची पुन्हा सर्व्हिस भेदली व सेट 7-6(7-5) असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हि स्पर्धा जिंकल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. आम्ही गेली 7वर्ष दोघे सोबत खेळत आहोत. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. दुसऱ्या सेटमध्ये मार्टिनेझ व ऍड्रियन यांनी कडवी झुंज दिली. पण या आव्हानाला सामोरे जात आम्ही हा सेट टायब्रेकमध्ये जिंकला.
स्पर्धेतील विजेत्या युकी भांब्री याला 7200डॉलर व 80एटीपी गुण, तर उपविजेत्या रामकुमार रामनाथन याला 4240डॉलर व 48 एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा आणि एटीपी सुपरवायझर रॉजिरिओ सांतोस, अश्विन गिरमे, मिहीर दिवेकर, प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट- अंतिम फेरी
युकी भांब्री(भारत,3) वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत,4)4-6, 6-3, 6-4.
देशाच्या समृद्धीसाठी शेती समृद्ध करणे गरजेचे – ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक यांचा सरपंचांना सल्ला
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक या जोडीला विजेतेपद
पुणे- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याने क्रोशियाच्या अॅन्ट पावीकच्या साथीत स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 1तास 13मिनिटे चाललेल्या या सामन्यात टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली. त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी सयंमपूर्ण खेळी करत पाचव्या गेममध्ये पुन्हा पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. 7व्या गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांनी 40-40असे गुण असताना डबल फॉल्ट केला व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व सामन्यात आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 8व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात 5-3अशी आघाडी मिळवली. त्यांनंतर 12व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची पुन्हा सर्व्हिस भेदली व सेट 7-6(7-5) असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हि स्पर्धा जिंकल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. आम्ही गेली 7वर्ष दोघे सोबत खेळत आहोत. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. दुसऱ्या सेटमध्ये मार्टिनेझ व ऍड्रियन यांनी कडवी झुंज दिली. पण या आव्हानाला सामोरे जात आम्ही हा सेट टायब्रेकमध्ये जिंकला.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला 3100डॉलर व 80 एटीपी गुण, तर उपविजेत्या जोडीला 1800डॉलर व 48एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा आणि
एटीपी सुपरवायझर रॉजिरिओ सांतोस
आदी मान्यवर उपस्थित होते.
दुहेरी गट- अंतिम फेरी
टोमीस्लाव्ह ब्रेकीक (बोस्निया)/ अॅन्ट पावीक(क्रोशिया) वि.वि.पेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन)6-1, 7-6(7-5).
दलीतवस्ती सुधार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे : दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत नगरपालिकांना निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात येतात. या निधीतून करण्यात येणारी विकास कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.दलीतवस्ती सुधार योजनेच्या निधीतून समाज मंदिर बांधकाम, अभ्यासिका, दिवाबत्ती कामे, बचत गटासाठी कार्यालय बांधणे, रस्ता डांबरीकरण, रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, व्यायामशाळा बांधणे, शौचालयाचे बांधकाम, गटार बांधकाम, सफाई कामगारांसाठी निवास बांधकामाची कामे करण्यात येतात. या निधीतून झालेला खर्च, कामांची सद्यस्थिती तसेच कामे पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी यासंदर्भात व्हिव्हीआयपी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. नगरपालिका प्रशासनाने या योजनेचा निधी विहीत मुदतीत खर्च करावा अशी सूचनाही, त्यांनी यावेळी केली.या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हयातील नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
कमी झालेल्या जीएसटी कराचा फायदा हॉटेल ग्राहकांना व्हावा-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे : केंद्र शासनाने जीएसटी परिषदेच्या शिफारसीनुसार उपहारगृहावरील जीएसटी कर अठरा टक्क्यांवरुन पाच टक्के केला असून त्याची अंमलबजावणी सर्वत्र झाली आहे. या कमी करण्यात आलेल्या जीएसटी कराचा फायदा, ग्राहकांना व्हावा अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
उपहारागृहासाठी जीएसटी करामध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायीक संघटना, व्यवसाय कर अधिकारी यांची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली व्हिव्हीआयपी विश्रामगृहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, कमी करण्यात आलेल्या जीएसटी कराचा फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी हॉटेल व्यावसायीक संघटनेने पुढाकार घ्यावा. उपहारगृहाचा जीएसटी नोंदणी क्रमांक देयकावर स्पष्टपणे नमूद करावा, उपहारगृहाच्या दर्शनी भागात तो प्रदर्शित करण्यात यावा. दरातील फेररचनेमुळे उपहारगृहातील पदार्थांचे दर कमी होणे अपेक्षीत आहे. याबद्दल ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्प लाईन सुरु करावी अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
बैठकीला हॉटेल व्यावसायीक संघटनेचे पदाधिकारी, व्यवसाय कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देवा शप्पथ …झी युवावर नवी मालिका …
‘तो येतोय…आजच्या युगात…आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि देवा शप्पथ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली. देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली देवा शप्पथ ही मालिका वेगळी ठरणार आहे. देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे त्याच प्रमाणे मी देव मानत नाही , माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत. आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवा या वाहिनीवर सोमवार २० नोव्हेंबर पासून रात्री ९:३० वाजता अश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोक च्या भूमिकेत संकर्षण खराडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे , शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते , आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय . देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवतील . त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळेल.
साताऱ्याजवळच्या हरीपूरच्या कृष्णमंदिराचे पुजारी विश्वासराव दशपुत्रे अत्यंत श्रध्दाळू आणि जगातल्या सगळ्यांनाच केवळ त्याच देवभक्तिच्या तराजूत मोजणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यापेक्षा पार अगदी वेगळ्या टोकाला असलेलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्लोक दशपुत्रे , विश्वासरावांचा धाकटा मुलगा आहे स्वकर्तृत्वावर विश्वास असलेला आणि कमालीचा नास्तिक. या दोन टोकाच्या विचारधारांमधील एक सुवर्णमध्य गाठायला देवालाच पृथ्वीवर यावं लागतं. कृष्णकांत उर्फ क्रिश या श्लोक दशपुत्रे याला क्रिश भेटायला आलाय.
देव आहे नाही या विचारापुढे जाऊन, माणसाचं पृथ्वीवरील आयुष्य किंवा जगाचा राखला गेलेला समतोल कोणी एक निर्माणकर्ता असल्याशिवाय शक्य झालं असतं का? जर कोणी निर्माणकर्ता असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसेल, तर जगातलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य आपल्याला माहीत नाही असा याचा अर्थ होईल. त्यामुळेच जगाचा कोणी एक निर्माणकर्ता आहे या संकल्पनेसोबत पुढे जात, एक फ्रेश विचाराची , मनाला विचार करायला लावणारी आणि त्याच बरोबर निखळ आनंद देणारी एक मालिका झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात देव स्वतः माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा कसा समन्वय घालतो हे पाहण्याची मजा प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देईल. देवाकडे पाहण्याचा एक वेगळा पण पारदर्शक दृष्टिकोन घडवणारी ही मालिका आहे.


