Home Blog Page 3238

‘सेव्हन लव्हज चौक-मार्केटयार्ड’ उड्डाणपूल होणार – भिमाले (व्हिडीओ)

0

पुणे –  सेव्हन लव्हज चौक (अप्सरा सिनेमा )ते मार्केटयार्ड (वखार महामंडळपर्यंत) सुमारे 1 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याच्या प्रकल्पाला महापालिकेने तांत्रिकदृष्ट्या मान्यता दिली असून याच बरोबर एच सी एम टी आर च्या नियोजित उड्डाणपूला साठी ही याच प्रकल्पात सोय असावी या दृष्टीने रचना करण्यात येत असून लवकरच या पुलाचे पूर्वगणन पत्रक करून पुढील कामास प्रारंभ होईल अशी माहिती महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी येथे दिली .

  आपल्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण असा असून तो उत्कृष्ट रित्या राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगून भिमाले म्हणाले ,या पुलाच्या संकल्पित रचनेला  महापालिकेच्या एस्टिमेट कमिटी बैठकीत मान्यता देण्यात आली. या पूलामुळे या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. याशिवाय पुलामुळे हडपसरकडून मार्केटयार्ड, कोंढवा, बिबवेवाडी, गंगाधाम तसेच पुढे कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे.स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच हडपसरकडून आलेली वाहने मार्केटयार्ड तसेच पुढे गंगाधाम आणि कोंढव्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सेव्हन लव्हज चौकापासून पुढे सॅलिसबरी पार्क तसेच पुढे मार्केटकडे जाताना तसेच येताना या रस्त्याचे रुंदीकरण झालेले असले, तरी हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडतो. परिणामी, सकाळी-सायंकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.या रस्त्यावरून मार्केटयार्डसमोरून सातारा रस्ता, धनकवडी तसेच पुढे गंगाधाम चौकातून बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगरकडे जात-येत असल्याने वाहनांची संख्या लक्षणीय असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून या नेहरू रस्त्यावर अप्सरा सिनेमा  ते मार्केटयार्ड जवळील  वखार महामंड़ळ गोडाऊनपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे 1 किलोमीटर अंतराचा हा पूल असून त्यावरून दुहेरी वाहतूक असणार आहे.

दरम्यान महापालिकेकडून  उभारला जाणारा हा पूल आणि महापालिकेकडून नेहरू रस्त्याच्या काही मार्गावर एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला असून या रस्त्याचा विचारही या पुलाच्या रचनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार, पुलाचे बांधकाम करतानाच त्याचे खांब हे एचसीएमटीआर रस्त्याच्या रचनेशी सुसंगत असणार असल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी हा नवीन पूल दुमजली असणार होईल असे स्पष्ट चित्र आहे .

यासंदर्भात पहा आणि ऐका नेमके सभागृह नेते भिमाले यांनी काय सांगितले ….

अखिल भारतीय सेनेचा ” पुणे जिल्हास्तरीय मेळावा ” संपन्न

0

पुणे-अखिल भारतीय सेनेचा  ” पुणे जिल्हास्तरीय महामेळावा  ” तळेगाव दाभाडे येथील पुणे मुंबई महामार्गाजवळील सुशीला मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय सेना पक्षाची ध्येय धोरणे ठरविणे , आगामी निवडणुकीची तयारी व अन्य कार्याबाबत कार्यकर्त्यांशी सवांद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता , तसेच या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय सेना पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले .  या मेळाव्यास राज्यभरातून मुंबई , ठाणे , डोंबिवली सोलापूर , औरंगाबाद , बीड , नगर , सातारा आदी भागातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

  या महामेळाव्यात अखिल भारतीय सेना पक्षाची सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी मार्गदर्शन केले .या मेळाव्यास अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शनीश्वर शिनगारे , पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सत्यभामा आवळे , पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे पाटील , पुणे शहर महिला अध्यक्षा यशस्विनी नवघणे , अखिल भारतीय सेना पक्षाचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या मेळाव्याचे संयोजन अखिल भारतीय सेना पक्षाचे  पुणे  जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भांडवलकर व मावळ तालुका अध्यक्ष संतोषभाऊ जाचक यांनी केले होते . या महामेळाव्यात  अखिल भारतीय सेना पक्षाचे  पुणे शहर जिल्ह्यामधील सर्व सेलचे अध्यक्ष , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 या मेळाव्यास पुणे शहर युवक अध्यक्ष  बाळासाहेब पठारे , पुणे शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रीतम कोयलॆ , शिरूर तालुका अध्यक्ष गणेशदादा सासवडे , हवेली तालुका अध्यक्ष हरिभाऊ कामठे , हवेली तालुका कार्याध्यक्ष सचिन शिंदे , युवक अध्यक्ष  हिराशेठ वाघमारे ,पुणे शहर कार्याध्यक्ष  महेश देवकुळे , पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन पवार  ,पुणे शहर उपाध्यक्ष  एजाज सय्यद , पुणे शहर उपाध्यक्ष सागर  मोहिते ,  सचिव गफूर शेख ,  पुणे शहर युवक संघटक अझहर पठाण ,गणेश सोनवणे , युवक उपाध्यक्ष युवराज तांबे ,  वडगाव शेरी युवक अध्यक्ष दीपक भंडलकर , मावळ तालुका युवक अध्यक्ष हनुमंत म्हस्के , शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष नासीर  निलगर ,पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष  फिरोझ शेख , पर्वती मतदार संघ अध्यक्ष हरिष पाटील ,खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष  मोहन साळुंके ,  विद्यार्थी आघाडी पर्वती मतदार संघ  अध्यक्ष   जितेंद्र पोतदार ,अमोल चाळेकर, साईल नवले , अक्षय धुमाळ , संदीप जयस्वाल ,  हडपसर विधानसभा संघाच्या महिला अध्यक्षा मयुरी बामणे , खडकवासला विधानसभा महिला अध्यक्षा उमा गायकवाड , पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ कार्याध्यक्ष  हनीफ सय्यद , उपाध्यक्ष अली  शेख , हडपसर मतदार संघाचे युवक अध्यक्ष अभिषेक भालके , खडकवासला मतदार संघाचे कार्याध्यक्ष संदीप पांचाळ पर्वती विभाग युवक कार्याध्यक्ष  अंकुश कसबे  आदी मान्यवर उपस्थित होते  .

. या मेळाव्यास उपस्थितांचे  स्वागत  अखिल भारतीय सेना पक्षाचे  पुणे  जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भांडवलकर यांनी केले तर सूत्रसंचालन मावळ तालुका अध्यक्ष संतोषभाऊ जाचक यांनी केले तर आभार अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शनीश्वर शिनगारे यांनीं मानले .

या मेळाव्यात अखिल भारतीय सेना पक्षाची सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , अखिल भारतीय सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची प्रेरणा घेउन काम करा तसेच महिला कार्यकर्त्यांनी झाशीचे राणीची प्रेरणा घेऊन काम करा . अखिल भारतीय सेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत व सामान्य लोकापर्यंत पोहोचवा.  पैसा आणि सत्ता असणाऱ्यांची गुलामी करू नका तर गोरगरिबांना मदत करा . शेतकरी बांधवाना मदत करा . आपण सर्व एकजुटीने राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.

“जश्न-ए-बचपन” मुलांसाठी प्रतिभा प्रदर्शन व मनोरंजन कार्यक्रम संपन्न

0

पुणे: बालपण नेहमी सर्वांसाठी विशेष आहे. मुले हे जगाचे खरे प्रकाशमान आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा निष्पाप हसू हा मानवजातीच्या हृदयावर विजय प्राप्त करतो. प्रतिभावान पिढी तयार करण्यासाठी, या वर्षी सुंदरजींच्या संस्थेने ‘माइंड वेंचर इंटरनॅशनलच्या’ सहकार्याने शंकरशेठ रस्त्यावर “जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमाचे आयोजन केले.

“जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमाने मुलांना आणि त्यांच्या पालकांना कायम लक्षात राहतील असे एक अविस्मरणीय आनंदाने भरलेले अनुभव दिले. कार्यक्रमाचा भाग म्हणून, लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना वेळेचा सदुपयोग करण्यासाठी असंख्य कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. जश्न-ए-बचपन मध्ये कला,  साहसी  खेळ, फिटनेस आणि विविध कौशल्याचा  समावेश होता.

सदर कार्यक्रम सर्व मुलांसाठी खुला होता आणि कार्याक्रामध्ये मुलांसाठी विशेष करून  जवाहरलाल नेहरु कला व चित्रकला क्षेत्र, सैन्यातील साहसी खेळ, विटी – दांडू,  ड्रम सर्कल, लाइव्ह म्युझिक आणि जेवण्यासाठी स्टाल ची व्यवस्था करण्यात आली होती.

“जश्न-ए-बचपन” या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्रीनाथ भिमाले आणि कविता वैरागी हे उपस्थित होते. तसेच डान्स प्लस 3 शो मधील  टीव्ही सेलिब्रिटीज ‘तरुण निहलानी’ आणि ‘शिवानी’ उपस्थित होते.”जश्न-ए-बचपन” च्या मागे मुख्य कल्पना म्हणजे पालक, मुले आणि सर्व वयोगटातील लोकांना गाणे, नृत्य, सायकल, स्केटिंग किंवा वेगळ्या खेळ खेळण्यासाठी रस्त्यावर आणून आणि आनंद साजरा करणे हि होती.

 

दुस-या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेचे 14 डिसेंबरपासून आयोजन

0

पुणे: पूना फुटबॉल लीगच्या पहिल्या सत्राच्या अभूतपूर्व यशामुळे अत्यंत आनंद झालेल्या पूना क्लबच्या सभासदांनी अशा प्रकारच्या अनेक क्रीडा स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच, सभासदांच्या याच उत्सचहाचा परिणाम म्हणून पूना क्लब तर्फे दुसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग(पीसीएफएल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथील मैदानावर 14 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबचे स्पोर्टस चेअरमन व फुटबॉल विभागाचे सचिव मनीष मेहता व स्पर्धा संचालक तारिक परवानी यांनी सांगितले कि,  हि फुटबॉल लीग स्पर्धा केवळ क्लबच्या सभासदांसाठीच मर्यादित आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी मानद सचिव मनीष मेहता, प्रायोजकत्व व केटरिंगचे मुख्य सुनील हांडा, स्पर्धा संचालक तारिक परवानी, तांत्रिक संचालक उमेश पिल्ले, तांत्रिक व क्रिएटिव्ह सपोर्टचे तुषार आस्वानी, स्पॉन्सरशीप टीमचे अँड्री पिंटो, स्पर्धा व्यवस्थापक पवित पठेजा यांचा समावेश आहे. तसेच, सभासंदाच्या समितीमध्ये  पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष राजीव संगतानी, क्लबचे उपाध्यक्ष राहुल ढोले पाटील, सिस्टीम व आयटीचे चेअरमन गौरव गढोके, क्लबच्या केटरिंग व स्पॉन्सरशीपचे चेअरमन सुनील हांडा, लॉ कमिटीचे चेअरमन रोहन पुसाळकर यांचा समावेश आहे.

स्पर्धेत झाल्टन ऑफ स्विंग(गौरव गढोके व मनप्रीत उप्पल), गेट मेस्सी(हरसिह सोळंकी), आऊट ऑन बेल(पवित पठेजा व अमित पोकर्णा), रोनाल्डो नट्स(अमित गढोके), रॉनी ट्यून्स(राकेश नवनी), सुअरेज बाईट्स(नितीन लुंकड व अमित कोठारी), मार्क ओ पिर्लो(अमजद अक्कलकोटकर व अँड्री पिंटो), ऍबसुलेटली फॅब्रिगेस(मनीष मेहता व प्रणय धारणीधारका), ड्युक्स ऑफ हजार्ड(अली हाजी), शुगर केन(चिराग लुल्ला व अर्णव लुल्ला), कोक इन कॅन(नीरज अरोरा व विशाल कस्तीया), विझार्ड ऑफ ओझील(अमर सेंभे) हे 12 संघ झुंजणार आहेत.

या सपर्धेला नील हुंडाईचे अक्षय शाह यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश आहे. तसेच, हि 5-अ-साईड स्पर्धा असून 3 खेळाडू राखीव असणार आहेत. सामन्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध प्रत्येक 12.30मिनिटांचा असून तीन मिनिटांचे मध्यंतर असणार आहे. प्रत्त्येक संघात 1 मालक व 1 सहमालक असे दोन खेळाडूंची परवानगी आहे. इतर खेळाडू 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लिलाव  प्रक्रियेतून निवडले जाणार आहेत. हि संपूंर्ण स्पर्धा व्यावसायिक पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांकडून संचालित केली जाणार आहे. या स्पर्धेबरोबरच मुले व प्रौढांसाठी अन्य करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. तसेच, महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचेही अखेरच्या दिवशी आयोजन केले जाणार आहे.

कार्यकारिणी सदस्यांसाठीही एका सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. अल्पोपहार, खाद्यपेय, डीजे म्युजिक व लाईव्ह कॉमेंटरी, यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी फुटबॉल महोत्सवाचे च वातावरण निर्माण करण्याचा आयोजकांचा हेतू आहे.

२२व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

0
पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर ते गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत २२वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला माईर्स एमआयटीच्या संतश्री ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व  तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन थोर समाजसेवक मा.श्री. अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते शुक्रवार,                दि. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारच्या आयकर विभागाचे मुख्य सचिव मा.डॉ. ए.सी.शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. कपिल कपूर हे असतील. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर ते गुरूवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सायंकाळी ४.३० वाजता होणार्‍या व्याख्यानमालेत सुप्रसिध्द व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम (संगीतातून ईश्‍वराचा साक्षात्कार), महाराष्ट्र सरकारचे सहसचिव व कायदेशीर सल्लागार श्री. मदन गोसावी (ज्ञानदेवाचा भागवत संप्रदाय आणि वर्तमान स्थिती आणि प्राप्त परिस्थिती), सुप्रसिध्द पत्रकार, राजकीय विश्‍लेषक व स्तंभ लेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक (आशियाई महासंघ – भारताची भूमिका), भारताचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ महंमद खान (धर्म ग्रंथ हे जीवनग्रंथ आहेत) व गुजरात येथील बाप्सचे श्री. पी.पी.साधू विवेक जीवनदास  (स्वतंत्रपणे विचार करा),  अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच शनिवार, दि. २५ नोव्हेंबर ते बुधवार, दि. २९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत रोज सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत सकाळचे सत्र पार पडणार आहे. यामध्ये दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे विश्‍वस्त व वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, सुप्रसिध्द गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री. सुनिल काळे, सुप्रसिध्द तत्त्वज्ञ आणि विचारवंत श्री. दत्तात्रय तापकीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह हेल्थचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन, थोर विद्वान, तत्त्वज्ञ व वक्ते श्री. धनंजय गोखले, सुप्रसिध्द विद्वान व तत्त्वज्ञ श्री. हरी नरके, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे  माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.(ग्रुप कॅप्टन) डी.पी.आपटे या मान्यवरांची विश्‍वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये दि. २५ नोव्हेंबर ते दि. २९  नोव्हेंबर २०१७ पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन योगाचार्य श्री. मारूती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी माईर्स एमआयटी, पुणे ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
सदरील सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रातील व्याख्यानमाला विनामूल्य असून ती सर्वांसाठी खुली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे.
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.

गायन नृत्यविष्काराची ‘संवेदन’ मैफल

0
प्रकृति नृत्यालयातर्फे येत्या शनिवारी आयोजन 
पुणे: गुरू रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व प्रकृति नृत्यालयाच्या संस्थापिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘संवेदन’ मैफलीचे  येत्या शनिवारी (दि.२५) आयोजन करण्यात आले आहे. गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी होणारी संवेदन मैफल यंदा शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल, कर्वेनगर येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत पार पडणार आहे.
आपल्या मनमोहक नृत्यशैलीतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लखनौ घराण्याचे सुप्रसिद्ध कथक नर्तक पं राम मोहन महाराज यांचे नृत्य सादरीकरण  संवेदन मैफलीच्या पूर्वार्धात होणार आहे. ते  नृत्याप्रमाणेच गायन, वादन कलेतही निष्णात असल्याने एक हरहुन्नरी कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. तर किराणा घराण्याच्या गायकीला आपल्या ख्याल शैलीतून सादर करणारे प्रतिभावंत गायक पद्मभूषण छन्नूलाल मिश्र यांची सुरेल गायकी अनुभविण्याची संधी देखील याच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना लाभणार आहे. ठुमरीसम्राट अशी देखील छन्नूलाल मिश्र यांची वेगळी ओळख असून त्यांच्या स्वरांनी संवेदन मैफलीची स्वरमय सांगता होणार आहे. ‘लखनौ का अंग और ठुमरी के रंग’ एकत्रित उलगडणारी संवेदन मैफल रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अभिजात कथक कलेचे विलक्षण वरदान लाभलेल्या गुरू  रोहिणीताई भाटे यांच्या नृत्यसाधनेला संगीत कलेचीही अनोखी जोड होती. त्यांनी संगीतबध्द केलेल्या असंख्य अजरामर रचना आजही अनेक रंगमंच गाजवीत आहेत. गुरू रोहिणीताईंच्या या दुहेरी कलेला सांगीतिक आदरांजली वाहणे हाच ‘संवेदन’ मैफलीचा मुख्य उद्देश आहे. त्यांची नृत्यसंपदा व कलेचा विचार सर्वदूर पोहोचविणे हे प्रकृति कथक नृत्यालयाचे ध्येय आहे. यासाठी गेली २२ वर्षे कथक क्षेत्रात निष्ठेने कार्य करत असल्याचे संस्थेच्या संस्थापिका नीलिमा अध्ये यांनी नमूद केले आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले दिसणार मराठी सिनेमात ….

0

गणेश शिंदे निर्मित आणि दिग्दर्शित एक मराठा लाख लाख मराठा या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचे वातावरण तयार झाल्याचे देखील बोलले जाते आहे. विशेष बाब म्हणजे सोशल मिडीयावर या सिनेमाची चर्चा अधिक होतांना दिसते आहे. खासकरून मराठी तरुण वर्गाची अधिक पसंती मिळत असल्याचे देखील समजते आहे. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूच्या आई बाबांची यात भूमिका आहे.
आता या सिनेमाची अजून एक नवीन बातमी पुढे आली आहे ती म्हणजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले देखील एक मराठा लाख मराठा या सिनेमातून पहिल्यांदा सिनेमात दिसणार आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या राज घराण्यातील १३वे वंशज आहेत. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या सिनेमात अभिनय केल्याने या चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळाली आहे. त्यांचा शाही थाट देखील या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

निर्माते, दिग्दर्शक गणेश शिंदे याबाबत सांगतात की, छत्रपतींनी या सिनेमात काम करावे अशी माझी आधीपासूनची इच्छा होती. परंतु ते हो म्हणतील कि नाही म्हणतील याबाबत मी साशंक होतो.त्यांना भेटून जेव्हा मी सिनेमाचे कथानक ऐकवले तेव्हा त्यांनी तात्काळ होकार दिला. यामुळेा त्यांना
रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे हे विशेष.

इंग्रजीची प्रयोगशाळा नवा उपक्रम

0

पुणे -न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडमध्ये इंग्रजी भाषेची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. ‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. ही प्रयोगशाळा तीस संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी, प्रोजेक्टरने सुसज्ज आहे. इंग‘जी शिकविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध होणार आहे. आठवड्याला एका विद्यार्थ्याला किमान एक घड्याळी तास सराव करता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षकांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची भिती वाटते. इंग‘जी विषयी त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो. तो कमी करण्यासाठी या प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभाषण, लेखन, संवाद आणि कि‘यांच्या माध्यमातून सोप्या पध्दतीने इंग्रजीचे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मु‘याध्यापक नागेश मोने यांनी यावेळी दिली. तीन स्तरावर हा अभ्यासक‘म शिकविण्यात येणार आहे. इंग‘जीचे शिक्षक शैलेश बर्गे यांनी या उपक‘माचे संयोजन केले. निकिता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. क्षितिज गवाणकर, स्वाती मिश्रा यांनी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

शिक्षक-शिक्षकेतरांसाठी कार्यशाळा संपन्न

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहाशे शिक्षक आणि ३५० शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.
शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा तीन गटांत कार्यशाळांची विभागणी करण्यात आली होती. शिक्षकांच्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण परिषदचे डॉ. गणपत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यापन करताना प्रश्‍नोत्तर स्वरूपाऐवजी संकल्पनांना प्राधान्य द्यावे, शिक्षकांचा गुणात्तम दर्जा वाढल्यास संस्थेची गुणवत्ता वाढेल असे विचार श्री. माने यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन ग‘ाहक पेठेचे सुर्यकांत पाठक यांच्या हस्ते आणि शिक्षकेतरांच्या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते महादेव पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संस्थांतील कर्मचारी कळत-नकळत विद्यार्थ्यांवर संस्कार करीत असतात. शैक्षणिक संस्कारांबरोबर परस्पर सुसंवाद आवश्यक असल्याचे मत श्री. पाठक यांनी व्यक्त केले. श्री. पाटोळे यांनी कार्यसंस्कृतीचे महत्व विषद केले.
अध्यापनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, आरोग्य समस्या, शिक्षणातील मानसशास्त्र, प्रभावी संवाद कौशल्ये या विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांसाठी आणि भाषा व सामाजिक शास्त्र विषयांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. पं. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांना कर्म हीच देवाची पूजा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य हीच संपत्ती, जबाबदारी, कार्यसंस्कृती, वैयक्तिक आर्थिक नियोजन या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. विनय पत्राळे, डॉ. कल्पना खांडेकर, डॉ. सुब्बालक्ष्मी कुमार, नरेश करपे, मंदार लवाटे, डॉ. अविनाश कांदेकर, आरती निमगावकर, अंकुर थुबाना, रुपाली ब‘म्हे, दीपाली महाते, डॉ. विदुला शेंडे, अनिल सावरकर, शितल रूईकर, डॉ. मेघा देवुस्कर, वैदेही देसाई या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती जोगळेकर यांनी सर्व कार्यशाळांचे यशस्वी संयोजन केले.
सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या कल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक व शिक्षकेतरांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक दृष्टिकोन, परस्पर सुसंवाद, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे, आर्थिक नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबी डोळ्यांसमोर ठेवून कार्यशाळेची रचना केली असल्याची माहिती डॉ. कुंटे यांनी दिली.

‘डीईएस प्रायमरी स्कूल’मध्ये बाजाराचा दिवस

0

पुणे – मुलांना लहानपणापासूनच प्रत्यक्ष जीवनातील व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने ,डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्रायमरी स्कूल’मध्ये बाजाराचा दिवस या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, मसाले, भाज्या, ङ्गळे खरेदीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मुळशी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जगन्नाथ मगर, उल्हास बलकवडे यांची नेत्रा वेदपाठक यांनी मुलाखत घेतली. नांगरणी, कुळवणी, पाबर, पेरणी, पाणी देणे, ठिबक सिंचन, पाण्याचा वापर, खतांचा वापर, काढणी, ग्राहकापर्यंत शेती माल पोहोचवणे याविषयीची माहिती मुलाखतीतून मिळाली. कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शेतीची प्रकि‘या माहिती व्हावी, अन्न निर्मितीसाठी लागणारी मेहनत आणि कालावधी माहिती व्हावा, अन्न वाया घालवू नये हा संस्कार रुजावा, खरेदीचा अनुभव मिळावा, व्यवहार ज्ञान वाढावे, आर्थिक व्यवहार व काटकसरीचे महत्व कळावे यासाठी या उपक‘माचे आयोजन केल्याची माहिती मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी दिली. शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा श्‍वेता मोघे, अभिजीत शिराळकर यांचे संयोजनात सहकार्य लाभले.
——

रिलायंस फाऊंडशेन युथ स्पोर्ट्स फुटबॉल- सेंट पॅट्रिक हायस्कूल उपांत्यपूर्वफेरीत

0

पुणे-सेंट पॅट्रिक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संघाने रिलायंस फाऊंडशेन युथ स्पोर्ट्स फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलांच्या सिनियर गटातील सामन्यात सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज संघ अनुपस्थित राहिल्याने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.या निकालामुळे क गटात सात गुण (दोन विजय आणि एक ड्रॉ) मिळवत शेवटच्या आठ जणांमध्ये स्थान मिळवले.

मुलांच्या कॉलेज गटात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस)कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमइडी) संघाला 5-0 असा पराभव केला.

दुर्गेश शुक्ला (तिसऱ्या मिनिटाला) आणि प्रणव भंडारी (10 व्या मिनिटाला) यांनी एआयएसएसएमएस संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या फेरीत दुर्गेश आणि प्रणव यांनी अनुक्रमे 48 व्या व 53 व्या मिनिटाला गोल मारले.यानंतर एआयएसएसएमएस कॉलेजकडून अनिकेत भिकुलेने 55 व्या मिनिटाला गोल मारत संघाचा विजय निश्चित केला.

मुलांच्या कॉलेज गटातील श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी डे स्कुल अँड ज्युनियर कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात निवृत्ती बाबाजी नेवाले (एनबीएन) सिंहगड स्कुल ऑफ इंजिनिअरिंग संघाने झिल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाला 5-0 असा पराभव केला.शुभम किरवेने (चौथ्या, 28 व्या व 30 व्या मिनिटाला) तीन गोल मारले तर, निशांत नदार (14 व्या व 37 व्या मिनिटाला) याने दोन गोल मारले.

नंतर सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स संघाने नवरोसजी वाडिया कॉलेजला मुलांच्या सिनियर गटात 1-0 असा विजय नोंदवला.सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गौरव रेवणकर याने एकमात्र गोल मारला.

द बिशप्स को एड स्कूल संघाने आरनॉल्ड सेंट्रल स्कुल संघाला 4-1 असा ज्युनियर लीग गटातील सामन्यात विजय नोंदवला.देव राव (17 व्या मिनिटाला), अर्जुन जाकथ (32 व्या मिनिटाला), रोहन चीरौथ (47 व्या मिनिटाला) आणि सौरभ रत्नपारखी (48 व्या मिनिटाला) गोल मारत विजयात योगदान दिले. पराभूत संघाकडून एकमात्र गोल हा सिद्धांत चव्हाणने (27 व्या मिनिटाला) मारला.

लीग निकाल :
ज्युनियर मुले : एफ गट – द बिशप्स को एड स्कूल वि. वि. आरनॉल्ड सेंट्रल स्कुल 4-1

– सिनियर मुले : सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स वि. वि.नवरोसजी वाडिया कॉलेज 1-0, क गट : सेंट पॅट्रिक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वोकोव्हर सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज

– कॉलेज मुले : ग्रुप ई : एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वि. वि.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट( आयएमइडी) 5-0, ड गट : एनबीएन सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग वि. वि. झिल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 5-0

इंदिरा गांधी चौकाचे सुशोभिकरण करणार

0

पुणे -कॅम्प भागातील ईस्ट स्ट्रीटवरील इंदिरा गांधी चौकात इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस  पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे ,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम वयांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नदीम मुजावर , उपाध्यक्ष सरताज खान , प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया ,शहर उपाध्यक्षा  जॅकलिन फॉरेस्टार , प्रदेश सचिव मॅनवेल डिसोझा , शब्बीर शेख , शरीफ खान , मनोज पाटील , नाहिद मुजावर , सलीम शेख , बबलू वर्मा , हसन कुरेशी , कैलाशकुमार , जोसेफ पॉल , शाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील आठवणींना उजाळा दिला . 

महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी छाया बाळासाहेब जाधव

0

पुणे- शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी छाया बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिले . छाया बाळासाहेब जाधव  या रेणुका महिला बचत गटाच्या संस्थापिका  असून महिला पोलिस दक्षता कमिटीमध्ये सदस्य , राष्ट्रीय मजदूर सेवा संघ घरेलू कामगार लोकप्रतिनिधी , पुणे महापालिका नागरवस्ती विकास योजनेच्या निमंत्रक , मानव अधिकार संघटनाचे कार्याध्यक्षपदावर कार्यरत आहेत .

या पदाच्या माध्यमातून आपण काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहचवून काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे छाया बाळासाहेब जाधव यांनी सांगितले . 

पुण्यात मराठा संघटना शाहू स्मारक आणि क्रांतिसिंह नाना पाटील स्मारकासाठी आग्रही

0

पुणे-सकल मराठा समाज पूर्व विभाग पुणे शहरच्यावतीने  स्नेहमेळावा   आयोजित करण्यात आला होता . मंगळवार पेठमधील सिध्देश्वर मंदिरमध्ये झालेल्या या स्नेहमेळाव्यामध्ये पुणे शहरामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारणी , क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक उभारणी , पुणे महानगरपालिकेच्या बारा व पंधरा नंबर शाळामध्ये नामफलक बसविणे तसेच , १९ फेब्रुवारी शिवजयंती लाल महल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्याचे ठराव समाजाच्यावतीने करण्यात आले .

या स्नेहमेळाव्यास प्रमुख पाहुणे मराठा समाजाचे नेते शांताराम कुंजीर , सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर , माजी नगरसेवक बाळा शेडगे , माजी उपमहापौर अरविंद पारगे , माधवराव बारणे , विठ्ठलराव खोपडे , शंकर शिवले , सुनील बारणे , अनिल ताडगे , नाना निवंगुणे , राजश्री सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते .

या स्नेहमेळाव्याचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस  मराठा समाजाचे नेते शांताराम कुंजीर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्ज माफीवर शेतकरी आक्रोश कृती समितीने सुरु केलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला . समाजातील तरुण पिढी एकत्र करून त्यांच्यामधून उद्योजक निर्माण करणे , उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे , स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त मुलांना प्रोत्साहन देणे , समाजातील महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरिता प्रयत्न करणे , तसेच बाजारपेठ उपलब्ध करणे

या स्नेह मेळाव्याचे आयोजन  सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर यांनी केले होते . या स्नेह मेळाव्याचे संयोजन करण्यासाठी मुकेश यादव , राजन तौर ,अमोल मांढरे , किशोर मोरे , संतोष जाधव , दादा वाडकर , आरती मोरे  व उमा शेडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

रसिकशेठ म्हणजे ‘अपूर्व राजयोगी’! रसिकलाल धारिवाल यांना मान्यवरांची श्रद्धांजली

0

पुणे : रसिकलाल धारिवाल यांनी आपल्या कार्याने अपूर्व व्यावसायिक यश मिळवले. तसेच, सामाजिक बांधिलकी जपून समाज आणि देशासाठी योगदानही दिले. अशा या दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीला त्यांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘आरएमडी अपूर्व राजयोगी’ या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जीतोच्या वतीने रसिकलाल धारिवाल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील कार्याचे चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध कला, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य चित्र स्वरूपात मांडण्यात आले होते. याप्रसंगी अँटी टेर्रोरिस्ट वर्ल्डचे मिठासिंग, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आचार्य चंद्रजी म.सा., श्रीमती शोभा धारिवाल, प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, जान्हवी धारिवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शर्मिला ओसवाल, राजेश सांकला, अचल जैन, अजित सेठिया, अमित लुंकड, सचिन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणारे सगळेच असतात पण समाजासाठी जगणारा माणूस लाखात एक असतो. तसेच समाजासाठी जगणारे रसिकलाल धारिवाल होते. त्यांनी धर्म, समाज, राष्ट्रासाठी अमूल्य योगदान दिले. धारिवाल सारखे व्यक्ती असतील तर राष्ट्र कधीही मागे राहू शकत नाही, असे मिठासिंग म्हणाले.

रसिकलाल धारिवाल हे नाव फक्त पुणे किंवा भारत देशपुरते मर्यादित नाही. जगात त्यांची किर्ती आहे. ते तत्वनिष्ठ व्यक्ती होते. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले की, त्यांची मनाची श्रीमंती देखील अगणित होती. त्यांचा स्वभाव व त्यांची बुद्धी उचस्तरावर होती. नावाप्रमाणेच त्यांचे जीवन रसिकमय होते.

रसिकलाल धारिवाल यांच्या निधनाचे जैन समाजातील प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे. रसिकशेठ प्रत्येक काम खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन यशस्वी केले. जितोची खरी सुरुवात पुण्यामध्ये झाली ज्यामध्ये रसिकशेठ यांचा मोलाचा वाटा होता. जितो नेहमीच रसिकशेठ यांनी दाखविलेल्या मार्गावर चालेल, असे विजय भंडारी म्हणाले.

रसिकशेठ जैन समाजाची मोठी संपत्ती होते. त्यांच्या जाण्याने जैन समाजाची झालेली हानी भरुन काढणे शक्य नाही, अशा शब्दांत विजयकांत कोठारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोपटलाल ओस्तवाल म्हणाले की, कोणत्याही संकटांना तोंड देणाची इच्छाशक्ती रसिकलाल धारिवाल यांच्यामध्ये होती. त्यांनी शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि आपले आयुष्य यशस्वी केले. त्यांच्या जाण्याने जैन समाज पोरका झाला.

यावेळी रसिकलाल धारिवाल यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अचल जैन यांनी केले. आभार अजित सेठिया यांनी मानले.