Home Blog Page 3236

संविधान सन्मान रॅली’ची तयारी अंतिम टप्प्यात हजारो नागरीक घेणार सहभाग, संविधान रथापासून खास गीताची निर्मिती

0

 

पुणे ः संविधान सन्मान समितीच्यावतीने संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.26) काढण्यात येणाऱ्या भव्यदिव्य स्वरुपाच्या “संविधान सन्मान रॅली’ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मार्गांची रचना, स्वच्छता, रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी सोई-सुविधा, संविधान रथ, पार्कींगपासून ते रॅलीच्या कार्यक्रमाचे स्वरुप अशा सर्व कामांची माहिती घेऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली.अशी माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिली .

संविधान दिनानिमित्त भव्यदिव्य स्वरुपाची संविधान रॅली व्हावी, यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांनी एकत्रीत येऊन “संविधान सन्मान समिती’ या अराजकीय व्यासपीठाची निर्मिती केली. या समितीमार्फत मागील एक महिन्यापासून संविधान सन्मान समितीच्यावतीने “संविधान सन्मान रॅली’ची तयारी सुरू होती. शुक्रवारी या तयारीची पाहणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रमेश बागवे, महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड आदी सदस्यांनी शुक्रवारी महात्मा फुले वाडा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह संविधान सन्मान रॅलीच्या मार्गाची पाहणी केली. स्वच्छता, व्यासपीठाची रचना अशा विविध कामांची पाहणी करण्यात आली.

संविधान सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, यासाठी समितीच्या सदस्य अनेक दिवसांपासून रचनात्मक पद्धतीने काम करत आहेत. बैठक, कोपरा सभा, घरोघरी भेटी देऊन या रॅलीमधील सहभाग वाढविण्यासाठी सदस्य प्रयत्नशील आहेत.

…अशी असेल संविधान सन्मान रॅली !

* रॅलीचे कार्यक्रमाचे स्वरुप ः रविवारी सकाळी दहा वाजता महापौर मुक्ता टिळक व लहान मुलांच्या हस्ते महात्मा फुले वाड्यातील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाल्यानंतर रॅलीस प्रारंभ होईल. त्याप्रारंभी युवती-महिला, विद्यार्थी, पुरूष व अखेरीस कार्यकर्ते या पद्धतीने रॅलीमध्ये सहभागी होतील. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप होईल.

* रॅलीचा मार्ग ः महात्मा फुले वाडा येथुन सकाळी दहा वाजता प्रारंभ. नेहरू रस्ता, रामोशी गेट पोलिस चौकी, ए.डी.कॅम्प चौक-संत कबीर चौक, जिल्हा परिषद इमारतीसमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समारोप.

* पार्कींगची सुविधा ः
दुचाकी वाहने – गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, रामोशी गेट येथील सावित्रीबाई फुले शाळा, मोहम्मद किडवई शाळा.
चारचाकी वाहने – डॉ.बाबासाहब आंबेडकर हायस्कुल (अहिल्याश्रम), क्वार्टर गेट, नाना पेठ.
——————-
संविधान सन्मान रॅलीची वैशिष्ट्ये

* प्रमुख आकर्षण “संविधान रथ’ ः देशातील सर्वसामान्य नागरीकाला संविधानामुळे बळ मिळाले. म्हणुनच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांसारखी संविधानाची मुलतत्वांची माहिती या रथाद्वारे देण्यात येणार आहे. रथावर राष्ट्रचिन्ह असलेले सिंहाचे चित्र असेल. याबरोबरच संविधानाची उद्देशिकाही असेल. संविधान दिनाची वैशिष्ट्ये सांगणारी चित्रे या रथावर असतील. याबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सुपुर्द करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रांनी हा रथ सजविलेला असणार आहे. तर रथाच्या मध्यभागी तिरंगी ध्वज असेल.

* संविधान रॅलीसाठी नवकोरं गाणं ः “वुई द पिपल ऑफ डेमोक्रेटिक इंडिया’ या शब्दांनी सुरू होणारे नितांत सुंदर गीत खास संविधान सन्मान रॅलीसाठी तयार करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत, गायन व शब्दरचना, अशा वैशिषाट्यांमुळे हे गाणे नागरीकांच्या मोबाईलमध्ये काही दिवसांपासुन वाजु लागले आहे. विशेषतः तरूणांना या गीताने अक्षरशः वेड लावले आहे.

* सर्वधर्मीय धर्मगुरुंचाही सहभाग ः संविधान सन्मान रॅलीमध्ये सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनीही सहभागी व्हावे, यासाठी समितीने प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने शहरातील सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना समितीने विशेष आमंत्रण दिले आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंचा महत्वपुर्ण सहभाग असणार आहे.

* शंभरहुन अधिक बैठका ः संविधान सन्मान रॅलीमध्ये शहरातील सर्व स्तरातील नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये शहरातील विविध वस्त्या, सोसायट्यांसह सर्व ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकांना उपस्थिती लावुन नागरीकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. याबरोबरच प्रसिद्धीसाठी चाळीस हजार पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले आहे. शंभरहून अधिक होर्डींग्जसवर जागृती करण्यात आली आहे.

* तीन हजार “मिस्ड कॉल’ ः रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरीकांनी आपला सहभाग कळवावा, यासाठी समितीतर्फे 18001206235 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत तीन हजार जणांनी मिस्ड कॉल दिला होता. त्यामुळे हजारो नागरीक या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता आहे.

झी मराठीच्या प्राईम टाइममध्ये’जाडूबाई..’ची भर!!

0

 

27 नोव्हेंबरपासून सोम-शनि. संध्या. 6 वाजता ‘जाडूबाई जोरात’ प्रसारित करण्यात येईल.
गेली 18 वर्ष सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी
दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली दैनंदिन मालिका ‘आभाळमाया’ असो वा मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला
जाणारा ‘झी गौरव पुरस्कार’ असो, किंवा जग पादाक्रांत करणारा ‘चला हवा येऊ द्या’ सारखा धमाल कार्यक्रम असो! झी
मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक नेहमीच भागवली आहे. धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय
तेवढीच ही मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी
मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता प्रक्षेपित होणारी ‘जाडूबाई
जोरात’ही मालिका संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होम
मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘जाडूबाई’; अगदी
जोरात करतील.
वेगवेगळ्या विषयांचं कल्पक सादरीकरण हे झी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य!’जाडूबाई जोरात’ ही मालिका याचं उत्तम
उदाहरण! निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच
रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड
आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे.
जाडबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची
प्राइम टाईम वाढवून झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 27 नोव्हेंबरपासून संध्या. 6 ते रात्री 11 हा संध्याकाळपासून
सुरु होणारा प्राइम टाईमचा प्रवास प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.

आधी पाणी सुरळीत द्या मग मोटारी जप्त करा – हडपसरवासीयांपुढे नमले प्रशासन

0

पुणे: महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीस विदयुत पंप जो़डून पिण्याचे पाणीझटपट मिळवू पाहणाऱ्या नागरिकांना झटका द्यायला गेलेल्या   लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने ३५ विजेच्या मोटारी जप्त तर केल्या ,मात्र आम्हाला पुरेसे व नियमित पाणी दया, नंतरच कारवाई करा, असा महिलांनी आक्रोश केला. संतप्त महिलांनी आक्रोश करीत लष्कर पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला व अधिका-यांना घेराव घातला. अखेर अधिका-यांनी माघार घेत विदयुत पंप नागरिकांना परत केले.

यावेळी काय म्हणाले नागरिक

– आम्हला नियमित व पुरेशे पाणी दया, नंतरच कारवाई करा.
– विदयुत पंप विकत घेणे व महिन्याला अधिकचे वीज बील आम्ही का भरू ?
– उंच भागात नळाला पाणीच येत नाही.
– विदयुत पंपाने उपसा केला तरच थोडेफार पाणी मिळते.
– 48 टक्के केलेली पाणी कपात करून आमच्यावर अन्याय करू नका.
– पंपाद्वार पाणी उपसा करण्यास नागरिकांची इच्छा नाही, याला महापालिकाचा जबाबदार आहे.
– आम्ही नियमित कर भरतो, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही.

लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 23) रात्री धडक मोहिम राबवीत जलवाहिनीला विदयुत पंप लावून पाणी उपसा करणा-या 35 मोटारी जप्त केल्या. त्यानंतर लष्कर पाणी पुरवठा कार्यालयावर महिलांनी थेट मोर्चा काढला. मोर्चा नेल्यानंतर महिलांनी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला. कारवाईबाबत त्यांना माहिती दिली. ससाणे थेट लष्कर पाणी पुरवठा कार्यालयात पोहचले. त्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ते म्हणाले, हडपसर परिसराला 48 टक्के पाणी पुरवठा कमी होत आहे. उंच भागात नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाण्याची वेळ नियमित नाही. पाण्याला प्रेशर कमी आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. अनेक सोसायटयांना वर्षभर टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सोसायटयांची अर्थव्यवस्था कोलम़डली आहे. नागरिक महापालिकेला प्रामाणिकपणे कर भरतात. मग त्यांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आधी पाणी पुरवठा सुरळीत करा, नंतरच कारवाई करा. अन्यथा कारवाई करायला आलात तर तुमचे काही खर नाही असा दम त्यांनी अधिका-यांना भरला. तसेच कारवाई करायची असेल तर शहरातील अनअधिकृत नळजोड अगोदर तोडा. शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होतो. हडपसरवासीयांवर अन्याय करू नका, असे कार्यकारी अभियंता संतोष पवार यांना सुनावले.

व्होडाफोन रंगसंगीत 2017 च्या आठव्या भागाला जोमदार सुरुवात

0

नवोदित नाटक कलाकारांसाठी, लोकप्रिय वार्षिक राज्यस्तरीय सांगीतिक आणि एकपात्री नाटक स्पर्धेच्या आठव्या भागाला सुरुवात

प्राथमिक फेरीला पुणे, नाशिक, अहमदनगर, गोवा, रत्नागिरी आणि कणकवली अशा सहा शहरांत 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरुवात

– 16 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात महाअंतिम फेरी होणार    

पुणे : व्होडाफोन रंगसंगीत, ही आयकॉनिक वार्षिक राज्य स्तरीय सांगीतिक आणि नवोदित नाटक कलाकारांसाठीची एकपात्री नाट्य स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यात आठव्या भागात पुन्हा अवतरली आहे. व्होडाफोन इंडिया, या भारतातील अग्रणीच्या टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीने, थिएटर अकादमीबरोबर संलग्नितपणे व्होडाफोन रंगसंगीत 2017च्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाल्याचे जाहीर केले आहे.

व्होडाफोन रंगसंगीतची संकल्पना ही प्रामुख्याने रंगभूमीवरील सर्वात बदलत्या आणि आव्हानात्मक पद्धतीच्या मराठी सांगीतिक नाटकांना प्रोत्साहन मिळावे, त्यात पुन्हा चैतन्य निर्माण व्हावे आणि प्रेरणा मिळावी यासाठी तयार करण्यात आली होती. 2010 सालापासून सुरु असलेली ही परंपरा या वर्षीही अखंडित राहिली आहे. यासाठीची प्राथमिक फेरी नाशिक, अहमदनगर, गोवा, कणकवली, रत्नागिरी आणि पुणे अशा सहा शहरांत 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2017 रोजी सुरू होणार आहे. प्रत्येक शहरातील विजेती टीम 16 डिसेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरेल आणि यावेळी नाट्य व सिने क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींसमोर कला सादर करण्याची संधीही त्यांना प्राप्त होणार आहे. सांगीतिक नाट्य प्रकारातील विजेत्या टीमला 1 लाख रुपयांचे बक्षीस तर गद्य सादरीकरणासाठी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय 5 लाख रुपयांची इतर बक्षीसेही यावेळी वितरीत करण्यात येतील.

व्होडाफोन रंगसंगीतविषयी व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोव्याचे व्यावसायिक प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले की, “व्होडाफोन रंगसंगीतचे यंदाचे आठवे वर्ष आहे, सर्वोत्तम, प्रतिभावान मराठी नाट्यक्षेत्रातील होतकरू व्यक्तींसाठी हे एक सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ आहे. व्होडाफोन रंगसंगीतमध्ये केवळ छंद नाही, तर त्याहीपलिकडे जाऊन कलेचे सादरीकरण केले जाते, यामुळे प्रतिभावान कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी आवश्यक ते व्यासपीठ मिळते, यामुळे तरुणांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि रंगभूमीवरील करीअर उभारण्याची संधी मिळते. दरवर्षीप्रमाणे, महाराष्ट्र आणि गोवा यंदाही अभूतपूर्वच असणार आहे. येथे प्राथमिक फेरी रंगणार असल्याचे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि नाट्यभूमीवरील या क्षणांकडे आम्ही अगदी उत्सुकतेने पाहात आहोत.

थिएटर अकादमीचे प्रसाद पुरंदरे म्हणाले की, “व्होडाफोन रंगसंगीतचे 2010 साली उद्घाटन झाले आणि तेव्हापासून आमचे नातेसंबंध जोडले गेले आहेत. आता इतक्या वर्षांनंतर व्होडाफोन रंगसंगीतला महाराष्ट्र आणि गोव्यात रंगभूमीवर त्याला भरघोस प्रशंसाही प्राप्त झाली आहे. गेल्या काही भागांतील स्पर्धकांनी आता मराठी फिल्म आणि टीव्ही उद्योगक्षेत्रातील यश प्राप्त केलेले आहे. व्होडाफोनकडून सातत्याने मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे, व्होडाफोन रंगसंगीत यापुढेही नाट्यभूमीवरील होतकरु व्यक्तींना उत्तम व्यासपीठ देत राहील, अशी मला खात्री वाटते.”

गेल्या अनेक वर्षांपासून महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, विजय थिएटर, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, राकेश सारंग, अमोल पालकर, श्रीरंग गोडबोले आणि इतर अनेक ख्यातनाम कलाकार व्होडाफोन रंगसंगीताच्या परीक्षक मंडळात तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत.

समीर आणि मीराच्या नात्याला मिळणार नवं वळण!

0

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका अल्पावधीतच
लोकप्रिय झाली. प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता आली आहे एका नवीन वळणावर! लग्नाआधी
एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे हे दोघे आता एकमेकांनाच सहन करतायत असं चित्र निर्माण
झालंय. दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. समीर आणि मीराच्या नात्यातील कटुता
दूर करण्यासाठी आता मालिकेत एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. झी मराठी वर रविवार, २६ नोव्हेंबरला रात्री ९
वाजता ‘तुझं माझं ब्रेकअप’;च्या एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, नवीन
पात्राच्या आगमनाने समीर आणि मीराच्या नात्यात येणारं नवं वळण!
मीराला समीरच्या आयुष्यातून दूर लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव
उधळून लावण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नांची शर्थ करतेय. एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला
मिळेल, लताने मिरासमोर ठेवलेल्या १० जाचक अटींचं आव्हान आणि हे आव्हान परतून लावण्याचा मीरानं
केलेला निश्चय! दुसरीकडे समीर आणि मीराच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि लताला शह
देण्यासाठी येत आहे समीरची आजी (रोहिणी हट्टंगडी). मीराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि
लताचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता समीरच्या आजीनं सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली’आईआजी’; आजही
रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता पुन्हा एका नव्या भूमिकेत आणि नव्या लुकमध्ये रोहिणी हट्टंगडी छोट्या
पडद्यावर आपल्याला दिसणार आहेत. समीरच्या आजीच्या भूमिकेत रोहिणीताई प्रेक्षकांच्या भेटीस येणार
आहेत.
आता समीरच्या आजीच्या येण्याने मीरा आणि समीरच्या नात्यात पुन्हा सुखाचे क्षण येतील का? लताने दिलेलं
आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरं मिळतील, २६ नोव्हेंबरला रात्री ९
वाजता’तुझं माझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या विशेष भागात!

होममिनिस्टरमध्ये रंगणार सारेगमप वादकांच्या’सौं’ सोबत गप्पा

0

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी
कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा
फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं
करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये लवकरच अशा  सौं ; ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्यांचे ‘अहो’ झी मराठीवरील
सारेगमप या कार्यक्रमाचा ‘ताल’ सांभाळतात. सारेगमपच्या मंचावरून रसिकप्रेक्षकांना ताल धरायला लावणारे, संगीताचा
ठेका धरून श्रोत्यांना आनंदाची पर्वणी देणारे बासरी वादक अमर ओक, कॅसिओवादक-संगीत संयोजक कमलेश भडकमकर
आणि तबलावादक आर्चिस लेले होम मिनिस्टरच्या मंचावर सपत्नीक खुलवणार आहेत मनोरंजनाच्या स्वरांनी सजलेला
;तालबद्ध; असा एका तासाचा विशेष भाग! ही वादक मंडळी आपापल्या संसाराचा;ताल;मेल कसा साधतात? सौंच्या
तालावर आनंदाने कसे नाचतात? सुखी सहजीवनची लय यांना कशी सापडली? त्यांचं एकमेकांशी कधी ;वाजतं; का?
एकमेकांच्या कोणत्या सवयींविषयी ते ;हरकत; घेतात? एकमेकांना हवी असलेली स्पेस अर्थात ;जागा घेऊ देतात का? अशा
एक ना अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं उलगडणार आहेत संगीतमय; होम मिनिस्टरच्या एका तासाच्या विशेष भागात, २६
नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता झी मराठीवर!
गेल्या दीड दशकापासून होम मिनिस्टर हा कार्यक्रम, राज्यातील तमाम वहिनींचे भाऊजी आदेश बांदेकर आणि झी
मराठीवरची सायंकाळी साडेसहाची वेळ हे एक वेगळच समीकरण झालं आहे. गप्पा मारत खेळले जाणारे खेळ आणि
सोन्याची नथ आणि भरजरी पैठणी अशी धमाल येते. आता हीच धमाल घेणार आहे 'संगीतमय वळण'. सारेगमपमधून
गायक, परीक्षक, निवेदक नेहमीच रसिकांच्या स्मरणात राहतात, पण ही वादक मंडळी पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर
उलगडणार आहेत आपल्या सहजीवनाचा;सांगीतिक प्रवास! अमर ओक, कमलेश भडकमकर आणि आर्चिस लेले
;वाजवण्या;पलीकडे कशाकशात पारंगत आहेत ही जाणून घेण्याची संधी झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.
अमर, आर्चिस, कमलेश हे तिघेही सारेगमपच्या अगदी पहिल्या पर्वापासून झी मराठीवर आपल्या निष्णात वादनाने
घराघरात पोहचले आहेत. सारेगपमच्या मंचावर आजवर अनेक नव्या गायकांच्या सुरांना समर्थ ताल देण्यात या तिघांनीही
आपल्या वादनकलेचा कस लावला आहे. गायक गातात, परीक्षक समीक्षा करतात आणि नवे गायक उजेडात येतात.
यामधील दुवा म्हणून या वादक सेलिब्रेटींची भूमिका मोठी आहे. खूप कमीवेळा या वादकांवर कॅमेऱ्याची नजर जाते. पण
आता होम मिनिस्टरमुळे या वादकांना कॅमेऱ्यासमोर आणताना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील गंमतीजमती, नाजूक क्षण,
अविस्मरणीय आठवणी असे एकेक कप्पे उलगडण्याचा अनोखा प्रयोग झी मराठीने केला आहे, तेव्हा येत्या रविवारी, २६
नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता पाहायला विसरू नका, हा होम मिनिस्टरचा धमाल सांगीतिक एका तासाचा विशेष भाग
झी मराठीवर!

अय्यारी सिज़्ज़ल ने फ़िल्म के प्रति बढ़ाई प्रत्याशा!

नीरज पांडे ने हाल ही में फ़िल्म की एक झलक दिखाते हुए दर्शको के सामने “अय्यारी सिज़्ज़ल” पेश किया था।

33 सेकंड के इस टीज़र में फिल्म निर्माता नीरज पांडे की अंतर्दृष्टि दृष्टि की कुशलता को बखूबी दर्शाया गया है।

फ़िल्म के इस 33 सेकंड के वीडियो में फ़िल्म के मोंटाज और पर्दे के पीछे के एक्शन दृश्यों को दिखाया गया है।

सच्ची कहानी पर आधारित और एक्शन से भरपूर अय्यारी अपनी दमदार स्टार कास्ट और पेचीदा कहानी से हर किसी का ध्यान अपनी तरफ आकर्षित कर रही है।

अय्यारी सिज़्ज़ल ने दर्शको के जिज्ञासा का स्तर बढ़ाते हुए फ़िल्म की रिलीज के प्रति उनकी प्रत्याशा को डबल कर दिया है।

ए वेडनेसडे, बेबी, स्पेशल 26, हॉलिडे, एम, एस, धोनी: एन अनटोल्ड स्टोरी जैसी बेहतरीन और बेमिसाल फिल्में देने के बाद नीरज पांडे की आगामी फिल्म अय्यारी, सेना पृष्ठभूमि पर आधारित वास्तविक जीवन की कहानी है।

यह फ़िल्म सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, रकुल प्रीत, पूजा चोपड़ा, नसीरुद्दीन शाह और अनुपम खेर जैसे उम्दा कलाकरों से लैस है।

फ़िल्म की कहानी दिल्ली, लंदन, और कश्मीर से वाकिफ़ रखती है। नीरज पांडे जिन्हें वास्तविक स्थानों पर शूट करना पसंद है वो घाटी के कुछ हिस्सों में इस फ़िल्म को फिल्माएंगे।

नीरज पांडे की फ़िल्म “अय्यारी” प्लान सी स्टूडियोज और जयंतलाल गड़ा (पेन) द्वारा प्रस्तुत है। शीतल भाटिया, धवल जयंतीलाल गड़ा द्वारा निर्मित मोशन पिक्चर कैपिटल 26 जनवरी 2018 को देशभर में रिलीज होगी।

आयटी क्रिकेट स्पर्धेत कॅपजेमिनी, अॅमडॉक्स, टेक महिंद्रा संघांची आगेकुच

0

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत  कॅपजेमिनी, अॅमडॉक्स व टेक महिंद्रा  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मौदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत फनेंद्र पाईलाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कॅपजेमिनी संघाने व्हेरीटास संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना दिपक कुमार, फनेंद्र पाईला व अंकुश महासाहेब यांच्या आचूक गोलंदाजीपुढे  व्हेरीटास संघ तीन चेंडू बाकी असताना सर्वबाद 90 धावांत गारद झाला. 90 धावांचे लक्ष गिरीष बोराच्या नाबाद 46 तर फनेंद्र पाईलाच्या नाबाद 23 धावांच्या बळावर कॅपजेमिनी संघाने केवळ 15 षटकात 4 बाद 91 धावांसह सहज पुर्ण केले. फनेंद्र पाईला सामनावीर ठरला.

दुस-या सामन्यात रोहित लालवानीच्या नाबाद 70 धावांच्या बळावर अॅमडॉक्स संघाने सनगार्ड एएस/एफआयएस संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रशांत पोळच्या 42 व रोहित भाटीयाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनगार्ड एएस/एफआयएस संघाने 20 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. 154 धावांचे लक्ष अॅमडॉक्स संघाने चार चेंडू बाकी असताना 3 बाद 155 धावांसह पुर्ण केले. यात निखिल पेंढारकरने 43 धावा करून रोहितला सुरेख साथ दिली. रोहित लालवानी सामनावीर ठरला.

पुढच्या लढतीत सचिन पिंपरीकरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने केपीआयटी संघाचा 15 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टेक महिंद्रा संघाने 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केपीआयटी संघाचा डाव 20 षटकात 6 बाद 137 धावांत थांबला. महिंद्रा संघाकडून गुरप्रीत सिंगने 16 धावात 3 गडी बाद करत  संघाला विजय मिळवून दिला. सचिन पिंपरीकर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

व्हेरीटास- 18.3 षटकात सर्वबाद 90 धावा(रणवीर मानकु 27, दिपक कुमार 3-11, फनेंद्र पाईला 2-22, अंकुश महासाहेब 2-8) पराभूत वि कॅपजेमिनी- 15 षटकात 4 बाद 91 धावा(गिरीष बोरा नाबाद 46, फनेंद्र पाईला नाबाद 23, सुमित दिघे 3-24) सामनावीर- फनेंद्र पाईला

कॅपजेमिनी संघाने 6 गडी राखून सामना जिंकला. 

सनगार्ड एएस/एफआयएस- 20 षटकात 8 बाद 154 धावा(प्रशांत पोळ 42, रोहित भाटीया 50, भावनीश कोहली 2-23, प्रविण खालको 2-40, आदित्य वर्मा 2-8) पराभूत वि अॅमडॉक्स- 18.2 षटकात 3 बाद 155 धावा(रोहित लालवानी नाबाद 70, निखिल पेंढारकर 43, अविराज जैन 21) सामनावीर- रोहित लालवानी

अॅमडॉक्स संघाने 7 गडी राखून सामना जिंकला. 

टेक महिंद्रा- 20 षटकात 7 बाद 152 धावा(सचिन पिंपरीकर 57, विजय मुरली 21, मयुरेश लिक्कीते 2-15, निरंजन फडणवीस 3-27) वि.वि केपीआयटी- 20 षटकात 6 बाद 137 धावा(नागराज अलोके 28, तुषार वैगणकर 26, प्रफुल्ल घाडी 23, कमलेश सुर्वे 24, गुरप्रीत सिंग 3-16) सामनावीर- सचिन पिंपरीकर

टेक महिंद्रा संघाने 15 धावांनी सामना जिंकला. 

अहिल्यादेवी प्रशालेत संविधान पूजन

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी प्रशालेत संविधानदिनानिमित्त मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या हस्ते संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. घटनेने दिलेल्या अधिकारांबाबत आपण जागरुक असतो, त्याप्रमाणेच कर्तव्याचे पालन करण्यासाठी कटिबध्द होण्याची गरज असल्याचे मत श्रीमती शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्षिका सुवर्णा शिंदे यांनी संविधानाचा उद्देश, वैशिष्ट्ये, घटना समितीचे सदस्य, निर्मितीसाठी लागलेला कालावधी याची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशालाप्रमुख दर्शना कोरके, पर्यवेक्षिका अनघा डांगे, स्मिता करंदीकर, सुवर्णा परदेशी, दीपाली पवार, मेघना वनासरे, सिमा हेंद्रे, रोहिणी पानसे, अपर्णा गरुड यांनी संयोजन केले.

‘ओन्ली एचआर’ संस्थेच्या संमेलनात गिर्यारोहक उमेश झिरपे यांचा ‘सक्सेस मंत्र’

0
पुणे : 
 
‘कंपन्या चालविताना कॉर्पोरेट व्यवस्थापकांना, मनुष्य बळ विकास खात्यातील अधिकार्‍यांना लागणारे साहस, ‘टीम बिल्डींग’, ‘टीम स्पिरीट’ चे मंत्र आणि नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता गिर्यारोहणातून मिळू शकते, त्यामुळे सतत पर्वतराजीत राहून गिर्यारोहणाची सवय लावून घ्यावी’, अशा शब्दात प्रसिद्ध गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या अनुभवकथनातून ‘टीप्स’ दिल्या. 
 
निमित्त होते, ‘ओन्ली एचआर’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या संमेलनाचे ! गुरुवारी सायंकाळी हे संमेलन घोले रस्त्यावरील ‘पंडित नेहरू सभागृह’ येथे झाले. कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्य बळ विकास खात्यात कार्यरत अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी मोठया संख्येने या संमेलनाला उपस्थित होते. 
 
‘मुबीआ ऑटोमोटिव्ह काँपोनंटस् प्रा. लि.’ या कंपनीच्या एडमंड डिसिल्वा यांना ‘आउटस्टँडिंग एच. आर. प्रोफेशनल अवॉर्ड २०१७’ देऊन गौरविण्यात आले. ‘एमपीटीए एज्युकेशन लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.
 
यावेळी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, ‘आयुष्यात थोडे तरी साहस केले पाहिजे. भारतात लहानपणापासून जपून राहण्याची, सतत सांभाळून राहण्याची शिकवण दिली जाते. मोठे झाल्यावर मात्र, प्रत्येक गोष्टीत धाडसाची अपेक्षा ठेवली जाते. आव्हाने पेलण्याची अपेक्षा ठेवली जाते. सतत स्वतःला जपत राहिल्यावर अंगात धाडस कुठून येणार ? मग तरुणपणीच नैराश्य, अपयशाने खचून जाणारी पिढी पाहायला मिळते. म्हणून परदेशात साहसी खेळ दर आठवड्याला खेळले जातात. लष्करी प्रशिक्षणाचाही आग्रह धरला जातो. भारतात आपण किमान गिर्यारोहण आणि साहसी खेळाचा आग्रह धरला पाहिजे.’ 
 
‘रोज नवीन आव्हाने कॉर्पोरेट क्षेत्रात येतात, अशावेळी साहसी खेळ आणि गिर्यारोहण तुम्हाला आव्हाने पेलण्याची क्षमता, साहस, धैर्य देते. गटबांधणी (टीम बिल्डिंग), ‘टीम स्पिरीट’ शिकवते. व्यवस्थापनाचे धडे गिर्यारोहणातून मिळतात. पर्वतात गेल्याने उत्साह मिळतो, कार्यक्षमता वाढते.’ 
 
एव्हरेस्ट विजयाची गाथा सांगताना ते म्हणाले,‘सामान्य माणसांपर्यंत गिर्यारोहण नेण्याच्या उद्देशाने ‘गिरीप्रेमी’ संस्थेने एव्हरेस्ट मोहीम आखली. पुण्यात ११ एव्हरेस्टवीर राहतात, ही अभिमानाची बाब आहे. २५ हजार नागरिकांना साडेतीन कोटी उभारून २०१२ ची आमची मोहीम यशस्वी केली. आता, जगातील ८ हजारापेक्षा उंच अशी १४ शिखरे पादाक्रांत करण्याचे ध्येय ‘गिरीप्रेमी’ संस्थेने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातील ६ शिखरे पादाक्रांत करण्यात यश आले असून, उर्वरित मोहिमांचे नियोजन चालू आहे.’
 
विश्वस्त प्रशांत इथापे, प्रदीप तुपे, शैलेंद्र देशपांडे, सचिन लांडगे, विपीन घाटे यावेळी उपस्थित होते. विश्वस्त सुधीर फाटक यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त जितेंद्र पेंडसे यांनी स्वागत केले तर निखिल शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. 

इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच ग्रामीण क्षेत्राच्या विकासात मदत – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

‘इथेनॉल ॲज ट्रान्सपोर्ट फ्युएल’ परिषदेचे उद्घाटन

पुणे: इथेनॉलचा इंधन म्हणून योग्य प्रमाणात वापर केल्याने ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल  तसेच  देशाची आर्थिक स्थिती सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सी.आय.आर.टी ) भोसरी येथे ‘इथेनॉल ॲज अ ट्रान्सपोर्ट फ्युएल’ या विषयावर घेण्यात येणाऱ्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, राजेश टोपे, मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील,  सी.आय.आर.टी चे संचालक डॉ. राजेंद्र सनेर पाटील, केंद्रिय परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभय दामले, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या अध्यक्षा डॉ. विद्या मुरकुंबी, डॉ. सरिता रेड्डी, प्रमोद चौधरी आदी मान्यवर  उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, देशात कच्च्या तेलाची अधिक प्रमाणात आयात होत असल्यामुळे देशाचे अर्थिक नुकसान होत आहे. तसेच पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढत आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध  होत नाहीत व इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत आपण इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून विचार करु शकतो. इथेनॉल हे अल्प दराचे प्रदूषण विरहीत इंधन आहे. सध्या मागणी प्रमाणे बाजारात इथेनॉल उपलब्ध नाही, त्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. शेतीच्या कचऱ्यापासून आपण इथेनॉलची निर्मिती करु शकतो. यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढेल. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी वाहन निर्मिती कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या देखील बनवल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच या परिषदेतून जे काही विचार मंथन होईल, त्याचा विचार करुन हा प्रयोग यशस्वी करण्यास जलद गतीने काम करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. प्रधान म्हणाले, देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी इथेनॉलच्या वापराबरोबरच त्याची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. इथेनॉलवर गाड्या चालल्यास सर्वसाधारण नागरिकांसह देशालाही आर्थिक फायदा होईल. इथेनॉलचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पुण्यात उच्च केंद्र निर्माण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी  दिली.

यावेळी डॉ. राजेंद्र सनेर पाटील, अभय दामले व  अण्णासाहेब पाटील यांची स्वागतपर भाषणे झाली तर सुत्रसंचालन मंजुषा तेहावकर यांनी केले.

कार्यक्रम स्थळी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याची पाहणी मान्यवरांनी केली.

विष्णु राजाराम बनकर हे “ संत सावता भूषण पुरस्कार-२०१७ “ ने सन्मानित

0

पुणे-श्री. संत सावता माळी युवक संघाच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विष्णु  राजाराम बनकर  हे ‘संत सावता भूषण पुरस्कार-२०१७ ने सन्मानित करण्यात आले .

या पुरस्कार सोहळ्यास   संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज हभप रमेश महाराज वसेकर, अडव्होकेट धनंजय जाधव , श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे  अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड आदि मान्यवर उपस्थित होते .

 विष्णु  राजाराम बनकर हे  बजाज ऑटो लि. चाकण, पुणे या जागतिक दर्जाच्या दुचाकी निर्माण करणार्‍या कारखान्यात काम करीत आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना  ‘संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य’ आयोजित ‘संत सावता भूषण पुरस्कार- २०१७’ ने सन्मानित करण्यात आले .

शिक्षण घेत असताना वर्गप्रतिनिधी, कवायत, प्रभातफेरी, स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, गणेशोत्सव, शिक्षकदिन, अभियंता दिन, कामगार दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, सर्व शिक्षा मोहीम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अंताक्षरी, इत्यादी उपक्रमांमध्ये वैयक्तिक व सांघिक कार्ये केलेली आहेत. तसेच  ‘कलागंध’, क्रीडासप्ताह, आनंदमेळावा, हौजी, विज्ञान प्रदर्शन, नियतकालिका प्रकाशन, वसतिगृह स्वच्छता मोहीम, इत्यादी उपक्रम राबविले.नियतकालिकांमध्ये लेख, चारोळ्या, विनोद आदि साहित्य प्रकाशित झाले.

 विष्णु बनकर  याना केटीएम् नॉर्थ अमेरिका या कंपनांचे अध्यक्ष आदरणीय जॉन इरिक बुर्लिसन सर यांचेकडून अमेरिका अभ्यास दौर्‍यासाठी दोन वेळा आमंत्रण असून अपंग तसेच पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतकार्य, महिला मेळावा, वृक्षारोपण, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमामध्ये फळेवाटप, रक्तदान, नैसर्गिक आपत्ती मदतनिधी, स्वच्छ भारत अभियान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या निषेध, न्यायहक्कांसाठी संघटन, आंदोलने, मोर्चे, इत्यादि कार्ये केलेली आहेत . विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून सातत्याने ज्ञान घ्यावे यासाठी प्रयत्नशील असतात. शारीरिक व मानसिक ताण-तणावातून मुक्ती व्हावी यासाठी ‘योगा’ तसेच ‘ए.एम्.आय्.ई’ या अभियांत्रिकीच्या पदवीचे ‘विनामूल्य’ मार्गदर्शनकरतात . पर्यावरण रक्षण, व्यायाम व आर्थिक बचत डोळ्यासमोर ठेवून, आजही घाम पुसत सायकलीवर वैयक्तिक व शैक्षणिक कामे करून समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देतात.

लूसी कुरियन यांना “श्री सत्य साई मानव श्रेष्ठता पुरस्कार “ प्रदान

0

पुणे: श्री सत्य साई लोक सेव ट्रस्ट द्वारे “श्री सत्य साई मानव श्रेष्ठता पुरस्कारा” चा कार्यक्रम सत्य साई ग्राम, मुड्डेनहल्ली , कर्नाटक येथे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित केला गेला. सिस्टर लूसी कुरियन, पुणे यांना “श्री सत्य साई मानव श्रेष्ठता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांना हा पुरस्कार “धर्मांच्या एकजुटी” या श्रेणीकरता देण्यात आला आहे. हा पुरस्कार यांच्या हस्ते देण्यात आला असून यापुर्वी विविध क्षेत्रातील ८ महिलांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे.

सिस्टर लूसी कुरियन यांनी ९१९७ साली “माहेर” ची निर्मीती केली, ज्याचा अर्थ आहे माझ्या आईचे घर असा होतो. ही संस्था पुणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असून कोणत्याही जाती, धर्म किंवा सांप्रदायाच्या निराश्रित, महिलांकरता कार्य करते. या केंद्रा द्वारे काही सेवा देखील प्रदान केल्या जातात ज्या जागरूकता अभियानापासून कुबड्यांचे वाटप, बालवाडी (शिशु मंदिर), शिकवण्या, कार्यशाळा, आणि स्वयं-चलित समूह राबविले जातात ज्यामुळे येथील महिलांना एक स्वतंत्र आणि मानाचे आयुष्य जगता येऊ शकेल. गेल्या पंधरावर्षात, माहेर द्वारे १५,००० पेक्षा अधिक महिला आणि मुलांना एक सामान्य आयुष्य जगण्याकरता मदत केली गेलेली असून सध्य स्थितीमध्ये ८६० पेक्षा अधिक रस्त्यावरील मुले आणि ३२० निराश्रित महिलांना छप्पर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

टॅफ़ेच्या अध्यक्षा आणि सीईओ, असलेल्या कु. मल्लिका श्रीनिवासन, या परितोषिकाच्या आयोजन समितीच्या बाजूने बोलताना म्हणाल्या,” या आदर्श महिला जगाकरता आणि येथील महिलांकरता एक शक्तीशाली असा आशेचा किरण आहेत. प्रेरणास्थान, अनुकरणास पात्र, हिमतीचे उदाहरण, निशष्ठा आणि त्यागाचे प्रतिक असून त्यांनी आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठता तर सिद्ध केलीच आहे पण त्याही पलिकडे जाऊन; लाखो लोकांना आपल्या अथक आणि ध्येय निष्ठ प्रयत्नांनी समाजाचे रूपांतरण, जगाला समृद्ध करून आशेचा, आनंदाचा एक किरण दर्शविलेला आहे. यांच्यातील प्रत्येकाचा मार्ग हा एक आगळा वेगळा आणि कल्पक असा आहे, ज्यामधून आपल्या सगळ्यांना कालात्मकता, दया, प्रेम आणि कष्टाने सगळ्यांकरता एका चांगल्या जगाची निर्मीती होऊ शकते हेच शिकायला मिळते.”

पारितोषिके मिळणाऱ्या व्यक्ती यांनी सामाजिक संदर्भ असलेल्या क्षेत्राकरता आपले आयुष्य वेचले असून आपले संपूर्ण कार्य हे जीवन बदलून टाकण्याच्या आपल्या ध्येयाकरता समर्पित केले आहे. श्री सत्य साई जीवन श्रेष्ठता पुरस्कार हा सात क्षेत्रातील विविध प्रसिद्ध व्यक्तींना देण्यात येतो: शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, संगीत आणि कला, धर्मांची एकजुट, महिला व बाल कल्याण आणि खेळ. हे पारितोषिक प्रदान करण्याकरता नावाजलेल्या पंच समितीची नेमणूक केली जाते ज्यात उपस्थित असलेले सदस्य काळजीपुर्व पारितोषिकाच्या वर्गीकरणाचे मूल्यांकन करतात आणि नामांकित व्यक्तींची पारख करतात.

अशा प्रकारचे अलौकिक काम केल्याबद्दल सन्मानित केलेल्या इतर व्यक्तींची नावे:

§  डॉ. सकीना यकुबी, अफ़गाणिस्तान, शिक्षण क्षेत्र

§  कु. लोर्ना रुट्टो , केनिया, पर्यावरण

§  डॉ. एम. शारदा मेनन, भारत, आरोग्य

§  प्रा. प्रेमा पांडुरंग, भारत, संगीत आणि कला

§  कु. लेयम्हा रॉबर्टा ग्बोवी, लिबेरिया, धर्मांची एकजुट

§  कु. कौसल्या पेरियासामी, भारत, महिला आणि बाल कल्याण

§  कु. अनुराधा कोईराला, नेपाळ, महिला व बाल कल्याण

§  कु. मीनाक्षी राघवन, भारत, खेळ

 

 

तुकाराम मुंडेंचे वर्तन चुकीचेच – सत्ताधाऱ्यांचे म्हणणे (व्हिडीओ)

0

पुणे-भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी तुकाराम मुंडे यांचा दरारा नाही तर ‘गब्बरसिंग ची ती दहशत आहे अशी टीका केली तर खास सभेच्या शेवटी सभागृहनेते असलेले भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी मुंडे यांचे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हटले आहे .तर सभेच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी स्वतः देखील मुंडे न सांगता निघून गेल्याचे स्पष्ट करीत त्यांचा निषेध करीतच सभा तहकूब केली

महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल  ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर सभेच्या शेवटी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि सभापती सिद्धार्थ धेंडे यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे …

आक्षेपांना उत्तरे देणे मुंडेंचे कर्तव्य -चेतन तुपे आणि प्रकाश कदम (व्हिडीओ)

0

पुणे-लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या  आक्षेपांना आणि केलेल्या सूचनांना उत्तरे न देता पळून जाणे या कृतीने  तुकाराम मुंडे यांनी आपल्या  कर्तव्यात  कसूर केला आहे ,आता त्यांना बडतर्फ कोण करणार ? असा सवाल विपक्ष नेते चेतन तुपे पाटील तसेच नगरसेवक प्रकाश कदम  यांनी महापालिकेच्या खास सभेत बोलताना केला .
महापालिकेच्या खास सभेत पीएमपीएमएल  ला येणाऱ्या तुटीपैकी १४४ कोटी ची रक्कम पुणे महापालिकेने द्यावी या विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे पालिकेच्या सभागृहात दाखल तर झाले ,पण केवळ आपले म्हणणे मांडून नगरसेवकांच्या तक्रारी,आक्षेप यांचा सामना न करता सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झाला . या विषयावर यावेळी चेतन तुपे पाटील आणि प्रकाश कदम पहा आणि ऐका काय म्हणाले…