Home Blog Page 3210

पाणीपुरवठा मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कारभारापुढे हतबल …

0

मुंबई-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत. आता मी तरी काय करू, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपली हतबलता बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. ‘पक्षाचे राज्यात दीड कोटी सदस्य असले तरी प्रामाणिक कार्यकर्ते दुर्बीण घेऊन शोधावे लागत आहेत,’ या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बाजू सावरताना भाजपची अवघड स्थिती झाली असतानाच ‘वर्षभरात सरकार बदलणार आहे’ या अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या विधानाने भाजपची पंचाईत झाली आहे. या वादग्रस्त विधानांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांजवळ नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कन्नड तालुक्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी गुरुवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर लोणीकर यांना घेराव घातला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून रखडल्या आहेत. कामे कधी सुरू करणार, अशी विचारणा केली. त्यावर कर्जमाफीमुळे कामे होण्यास उशीर होत आहे, अशी बतावणी लोणीकर यांनी केली. मात्र, चार वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय? असा प्रतिप्रश्न लोणीकर यांना करण्यात आला. त्यावेळी लोणीकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील कामंही झालेली नाहीत. मग मी तरी काय करू शकतो?, असे लोणीकर यांनी म्हटले.

वाहतुकीच्या विविध पर्यायांचा समन्वय साधण्यासाठी महामेट्रोचा सिंगापूरच्या संस्थांबरोबर करार

0

पुणे-मेट्रोने प्रवास करणा-या नागरिकांचा प्रवास सोईचा व्हावा यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांचा एकमेकांशी समन्वय साधण्याच्या कामी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. सिंगापूरच्या ‘टेमासेक फाऊंडेशन इंटरनॅशनल’ (टीएफआय) आणि ‘सिंगापूर कोऑपरेशन एंटरप्राईज’ (एससीई) या संस्थांसह महामेट्रो आणि पुणे महापालिकेने एक करार केला आहे. सिंगापूरच्या या संस्थांनी पुण्यात तीन दिवसांच्या कार्यशाळेचेही आयोजन केले असून त्याचे उद्घाटन आज यशदा येथे करण्यात आले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि ‘एससीई’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी काँग वाय मून यांनी या करारावर आज स्वाक्ष-या केल्या. या कराराअंतर्गत येत्या वेगवेगळ्या पातळ्यांवर मनुष्यबळाचे प्रशिक्षण करणे प्रस्तावित आहे.

सिंगापूरचे कौन्सल जनरल अजित सिंग, ‘सिंगापूर इंटरनॅशनल एंटरप्राईज’चे केंद्र संचालक गो केंग फांग, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, सिंगापूर येथील भू वाहतूक प्राधिकरणच्या सिस्टीम इंटरफेसचे संचालक हो कुम फाट, ‘एसएमआरटी इंटरनॅशनल’चे महाव्यवस्थापक मार्क एनजी, ‘एसएमआरटी ट्रेन्स’चे संचालक (कन्ट्रोल ऑपरेशन) येओ सिऊ वाह आदी यावेळी उपस्थित होते.

सिंगापूर येथील ‘टेमासेक फाऊंडेशन इटरनॅशनल’ ही संस्था आशिया खंडातील क्षमतावृद्धी उपक्रमांना आर्थिक साहाय्य करते, तर ‘सिंगापूर कोऑपरेशन एंटरप्राईज’ ही सिंगापूर सरकारची संस्था इतर देशांमध्ये होणा-या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांबरोबर भागीदारी करू शकते. या दोन संस्थांनी ‘पुण्यातील नागरी वाहतूक आणि वाहतुकीसाठी विविध पर्यायांचा एकत्रितपणे वापर’ या विषयावर क्षमतावृद्धी कार्यक्रमाचा प्रस्ताव सादर केला आहे.

महामेट्रो कॉर्पोरेशन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए), ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पीएमपीएमएल) आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांमधील १०० अधिका-यांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पात वाहतुकीच्या विविध साधनांचा एकत्रितपणे वापर हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे या कार्यक्रमात महामेट्रोची महत्त्वाची भूमिका आहे. मेट्रोने प्रवास करणा-या नागरिकांना सोईचे व्हावे यासाठी मेट्रोचा बस,रेल्वे आणि वाहतुकीच्या इतर साधनांशी समन्वय साधला जाईल अशी आखणी करण्यात येणार आहे.

वेदविज्ञानाच्या अभ्यासातून नवे वैश्‍विक जीवन निर्माण होईल -माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी

0

पुणे – प्राचीन काळापासून कृषिविज्ञान, आहारशास्त्र, संगीतशास्त्र, भाषाशास्त्र, ध्वनीशास्त्र, सं‘याशास्त्र, परमाणू उर्जा याबाबतीत आपण अन्य देशांच्या तुलनेत खूपच प्रगती केली होती. आपल्या देशातील प्रयोगात्मक विज्ञानाचा स्तर समृृध्द होता. वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होणार्‍या चेतनेतून विज्ञाननिष्ठ नवे वैश्‍विक जीवन निर्माण होईल, असा विश्‍वास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केला.
विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने डेक्कन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसर्‍या ‘विश्‍व वेद विज्ञान संमेलना’चे उद्घाटन करताना डॉ. जोशी बोलत होते. चिन्मय मिशनचे माजी प्रमुख स्वामी तेजोमयानंद, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, संघटनमंत्री डॉ. जयंत सहस्रबुध्दे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर, कुलगुरु डॉ. वंदन शिंदे, विज्ञान भारतीचे संस्थापक प्रा. के. आय. वासू, रा. स्व. संघाचे प्रचारक प्रा. सुरेश सोनी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वामी तेजोमयानंद म्हणाले, ‘धर्म माणसाला भौतिक प्रगती व आध्यात्मिक मुक्तीकडे घेऊन जातो. वेदांमध्ये मानवाचे भले करणारे जीवन जगण्याची पध्दती सांगितली आहे. परंतु त्याचे वाचन न करताच त्यावर टीका केली जाते. वेदांमध्ये सांगितलेले ज्ञान समजून घेतले पाहिजे.’
संस्कृतचा सगळ्यात मोठा शब्दकोष निर्माण करण्याचे काम डेक्कन कॉलेजने हाती घेतले असल्याची माहिती डॉ. भटकर यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले, ‘भाषा, व्याकरण, वाक्यांची रचना उच्च शिक्षणात शिकविण्याची गरज आहे. नवीन पीढीला प्रेरणा देणे हा या परिषदेचा मु‘य उद्देश आहे.’
प्रा. सोनी म्हणाले, ‘मानवाच्या विकासासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. त्यासाठी वैदिक विज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’
स्थापत्य विज्ञान आणि स्वास्थ्य विज्ञानावर या संमेलनात चर्चा होणार आहे. वेदविज्ञान सृष्टी हे प्रदर्शन शनिवार ता. १३ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अशी माहिती डॉ. सहस्रबुध्दे यांनी यावेळी दिली. अरुण तिवारी यांच्या ‘गीतारहस्य – आधुनिक काळात अर्थबोधन’ या विषयावरील ग‘ंथाचे प्रकाशन करण्यात आले. गिरीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. रामनाथ झा, डॉ. संपदानंद मिश्रा, डॉ. पेरी भास्कर राव (संस्कृत), डॉ. अँड्रस ङ्ग‘ॅड्यू, राजेश भूतकर, प्रा. जी. एस. मूर्ती (विज्ञान व तंत्रज्ञान) डॉ. अनिल राजवंशी, डॉ. मधुसूदन पेन्ना, डॉ. रजतकुमार प्रधान (योगा व मनाची चेतना) प्रा. एस. आर. वाळिंबे, प्रा. के. सी. मल्होत्रा, डॉ. गणेश महाबला (पुरातत्व व मानवशास्त्र) प्रा. जी. बी. देगलूरकर व कैलाश राव (आर्किटेक्चर) डॉ. सुनीता सिंग सेनगुप्ता, डॉ. कृष्णा कुमार, डॉ. एस. आर. कृष्णामूर्ती, अरुण वाखुलू (वेद व व्यवस्थापन) प्रा. पी. आर. मुकुंदा (वेद व इलेक्टॉनिक्स) डॉ. एस. एल. चौधरी, प्रा. मदन थनगवलेयू, डॉ. के. के. क्षीरसागर (कृषि व गोविज्ञान) ऍड शंकर निकम, ऍड भास्कर आव्हाड (मनुष्यस्वभाव व सामाजिक शास्त्र) आणि डॉ. आर. डी. लेले, डॉ. मुकुंद भोले व डॉ. रमा जयसुंदर (आरोग्य) यांनी आज झालेल्या विविध विषयांच्या चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला.

विद्युत सुरक्षा सप्ताहातील जागराला सुरक्षा रॅलीने सुरवात

0

पुणे : विद्युत अपघात टाळण्यासाठी विजेची घरगुती उपकरणे किंवा सार्वजनिक वीजयंत्रणांपासून सर्तक व सावध राहण्याचा संदेश देण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताहाला गुरुवारी (दि. 11) सुरवात झाली. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले व प्रभात फेरी काढून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला.

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित जिल्ह्यातील विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्‌घाटन आज शनिवारवाडा येथे झाले. या कार्यक्रमात जिल्हा विद्युत निरीक्षक श्री. एन. आय. पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोशिएशनचे (इकॅम) अध्यक्ष श्री. सुनील गायकवाड, उपाध्यक्ष श्री. मारूती माळी, सचिव श्री. अमर पाटील, इकॅम महासमितीचे उपाध्यक्ष श्री. वामन भुरे, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री. डी. टी. थोरात, श्री. शकील सुतार, श्री. श्रीकांत डेकाटे, ‘कमिन्स’चे श्री. शैलेश हत्ती, लिफ्ट कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनचे सचिव श्री. विठ्ठल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

विद्युत यंत्रणेत काम करताना वीज दिसत नसल्याने जाणते, अजाणतेने झालेली चूक ही जिवावर बेतू शकते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील अपघाताचे धोके टाळण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्कता किंवा सावधगिरी बाळगणे यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्युत अपघातातील जीवहानीमुळे कुटुंब उद्‌ध्वस्त होते व कर्मचारी गमावल्याने कंपनीचे तसेच कुटुंबियाचे भरून न येणारे नुकसान होते. विद्युत यंत्रणेपासून सावधानता न बाळगल्याने नागरिकांनाही अनेक कारणांमुळे वीज अपघात होतात. त्यामुळे वीज कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी विद्युत यंत्रणेपासून सतर्क राहण्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले.

विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्‌घाटन झाल्यानंतर महावितरण, विद्युत निरीक्षक विभाग, इकॅम व औद्योगिक कंपन्या यांच्या संयुक्तपणे सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली. शनिवारवाडा, आप्पा बळवंत चौक, मंडई व बाजीराव रोड परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. पथनाट्याद्वारेही वीजसुरक्षेचा संदेश देण्यात आला. तसेच माहिती पत्रक, माहिती पुस्तिकांचे नागिरकांना वितरण करण्यात आले. या रॅलीत महावितरणचे कार्यकारी अभियंता सर्वश्री किशोर गोर्डे, पराग बापट, दीपक लहामगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्या व संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.

स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवर असलेला भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर

0

~ कूलिंग लॉस 50% पर्यंत कमी करेल अशा डुअ फ्लोतंत्रज्ञानाचा प्रवेश

पुणे: गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस सेग्मेंटमधील एका आघाडीच्या कंपनीने, गोदरेज एज ड्युओ – स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह भारतातील पहिला सिंगल रेफ्रिजरेटर रेंज सादर करून रेफ्रिजरेटर श्रेणीतील नावीन्याचे अनावरण केले.

भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे 80% घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीतकमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात, त्यातील व्हेजिटेबल भाग 40% पेशा जास्त वेळा वापरला जातो. कंपनीने केलेल्या अंतर्गत लॅब टेस्टमध्ये आढळले की, जर एका तासामध्ये रेफ्रिजरेटर प्रत्येकी 30 सेकंदांसाठी 3 वेळा उघडला जातो, त्यामुळे कूलिंग चेंबरच्या तापमानात 100% वाढ होते. थंड हवा कमी झाल्यास आतमध्ये ठेवलेल्या अन्नाला थर्मल शॉक बसतो व त्याचा परिणाम अन्नाच्या ताजेपणावर होतो. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी कॉम्प्रेसर 2 तास काम करतो व त्यामुळे ऊर्जेचा वापर सर्वोच्च केला जातो.

या निष्कर्षांचा विचार करता, गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह गोदरेज एज ड्युओ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर करण्यात आला. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्नालॉजी आहे, ज्यामुळे ग्राहकांना भाज्यांसाठी संपूर्ण रेफ्रिजरेटरचे दार उघडावे लागत नाही व कूलिंग कमी होण्याचे प्रमाण 50% कमी होते. फ्रीझरमधील खास लोव्हर्समुळे स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये हवेचा मोठा झोत येतो. कूलिंग लॉसमध्ये झालेली घट व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे फायदे यामुळे गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटर्स ऊर्जाक्षम व किफायतशीर ठरतात. डिझाइनमध्ये विशिष्ट्य वैशिष्ट्ये समाविष्ट करून, सर्वात ऐसपैस व्हेजिटेबल ड्रॉवर, सर्वात मोठा फ्रीझर व ड्राय स्टोअरेज समाविष्ट करून, तसेच डोअर शेल्फमध्ये 2.25-लिटर बाटल्यांची जागा ठेवून व चिलरमध्ये 1 लिटरच्या पाच बाटल्यांपर्यंतची तरतूद करून जागेचा जास्तीत जास्त वापर केला आहे. रेफ्रिजरेटरमध्ये एलईडी लाइटचा वापर केल्याने त्याचे सौंदर्य खुलते. हे उत्पादन निळ्या व वाइन रंगांमध्ये उपलब्ध असून फ्लोरल फेशियाचे अनेक पर्याय आहेत.

पर्यावरण व शाश्वततेप्रती गोदरेजने केलेल्या बांधिलकीनुसार, रेफ्रिजरेटरमध्ये सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट R600a वापरले जाते, त्यामध्ये झीरो ओझोन डिप्लिशन क्षमता आहे व यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हा फ्रिज अतिशय कमी व्होल्टेजवरही चालू शकतो व यामुळे वीज नसताना घरातल्या इन्व्हर्टरवर ह्याचा वापर  करता येतो. या नव्या 4 स्टार रेटेड रेफ्रिजरेटर्समुळे ग्राहकांना 3 स्टार रेफ्रिजरेटरच्या इतक्याच क्षमतेसाठी आणखी 3850 रुपयांची बचत करता येईल व यासोबत 10 वर्षांची कॉम्प्रेसरची वॉरंटी मिळते.

याविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांनी सांगितले, “एक कंपनी म्हणून गोदरेजने नेहमीच नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सातत्याने नवे शोधतो, नावीन्य आणतो व आमच्या ग्राहकांना अद्ययावत उत्पादन व सेवा देऊन आनंद देण्याच्या एकमेव उद्दिष्टासाठी प्रयत्न करत असतो. आमच्या नव्या गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटरच्या मानव-केंद्रित डिझाइनमध्ये सोय व कार्यक्षमता केंद्रस्थानी ठेवली आहे. ‘सोच के बनाया है’ हे आमचे ब्रँडचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत होण्यासाठी आम्ही संपूर्ण कंपनीमध्ये धोरणात्मक व नावीन्यपूर्ण विचारांची संस्कृती अंगिकारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या नव्या उत्पादनामुळे, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये आघाडीचे स्थान मिळवू शकू, असा विश्वास वाटतो.”

रेफ्रिजरेटरचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “गोदरेज एज ड्युओमुळे रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये नवा काळ सुरू होणार आहे. भारतातील अंदाजे 80% ग्राहक अजूनही सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स खरेदी करतात आणि क्रांतीकारी ड्युओ फ्लो तंत्रज्ञान व जागेच्या योग्य वापरासह स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरचे खास डिझाइन, विजेचा कमी वापर व अन्य वैशिष्ट्ये यामुळे गोदरेज एज ड्युओ बाजी मारणार आहे.”

नवे गोदरेज एज ड्युओ फ्लो सिंगल डोअर डीसी रेफ्रिजरेटरची किंमत 23,000 – 25,000 रुपये आहे.

विशेष व वंचित मुलांची आणि अपंग जवानांची व्हील चेअर मॅरेथॉन शर्यत

0
  • शर्यतीत 450  विशेष व वंचित मुले व 100 अपंग (पॅराप्लेजिक) जवानांचा सहभाग

पुणे: स्पेक्ट्रम, अ लेडीज स्टडी ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे 3 किमी 3 किमी विशेष व वंचित मुलांच्या आणि अपंग (पॅराप्लेजिक) जवानांच्या व्हील चेअर मॅरेथॉन शर्यतीचे  आयोजन करण्यात आहे. हि शर्यत 13 जानेवारी 2018 रोजी सकाळी 7.30 ते 9 .30 या वेळेत पॅराप्लेज सेंटर, रेंज हिल्स येथे होणार आहे.

 
शर्यतीत एकूण 450 विशेष मुले व वंचित बालकांनी आपला सहभाग नोंदवला आहे तसेच 100 अपंग (पॅराप्लेजिक) जवानांनी सहभग नोंदवला आहे. या प्रसंगी जलतरण प्रकारातील पहिले  ऑलंपिक सुवर्ण पदक विजेते श्री. मुरली पेटकर यांचा सन्मान करण्यात येणार असून ते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहूणे  म्हणून उपस्थित असतील.

राज्यस्तरीय ‘आय.टी. एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’ चे जावेद शेख ठरले मानकरी

0
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै आय सी टी अ‍ॅकॅडमी’ च्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय आंतरशालेय ‘डॉ.पी.ए.इनामदार आय.टी. एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संगणक प्रशिक्षक जावेद शेख (शामसुद्दीन इनामदार उर्दू स्कूल, हडपसर) यांनी विजेतेपदाचा मान पटकाविला आहे.
स्पर्धेचे ११ वे वर्ष होते. ही स्पर्धा डॉ. ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली होती.
पै आय सी टी अ‍ॅकॅडमी’ च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय ‘डॉ.पी.ए.इनामदार आय.टी. एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’ स्पर्धेला इक्बाल सत्तार (जुवेदी स्कूल, कुडची), नुरूद्दीन सोमजी (शिक्षण मंडळ चे माजी उपाध्यक्ष, म.न.पा, पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.ए.इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) होते. यावेळी पै आय सी टी अ‍ॅकॅडमी’ च्या संचालक मुमताझ सय्यद, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल च्या मुख्याध्यापक आयेशा शेख, ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज’ च्या प्राचार्य परवीन शेख उपस्थित होते.
ही स्पर्धा ५ प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, हार्डवेयर स्पर्धा, कॉम्पुटर टायपिंग, मूव्ही मेकिंग स्पर्धा, संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा या स्पर्धांचा समावेश होता.
१.  पहिल्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ८६६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील २ विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
२. दुसऱ्या प्रकारच्या हार्डवेयर स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी चे ८६१५ विध्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या दोन विजेत्यांना ‘हार्डवेअर टूल किट’, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
३. कॉम्पुटर टायपिंग (उर्दू, इंग्लिश ऍण्ड मराठी) इयत्ता आठवी साठी आयोजित स्पर्धेमध्ये ३२६१ विध्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम दोन विजेत्यांना संगणक संच, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
४. मूव्ही मेकिंग स्पर्धा इयत्ता नववी आणि दहावी च्या विद्यर्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ४२८६ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम दोन विजेत्यांना कॅमेरा, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
५. संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ८१ संगणक प्रशिक्षक सहभागी झाले होते. प्रथम विजेत्यास ‘डॉ. पी. ए. इनामदार आयटी एक्स्पर्ट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ताशे रुपये १० हजार चा धनादेश आणि सन्मानचिन्ह देनाय्त आले.
१०६ उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे महानगरपालिका शाळा, तसेच पुण्या बाहेरील शाळा ‘पी. ए. इनामदार संगणक केंद्रा’शी संल्गन आहेत, आहि माहिती मुमताझ सय्यद यांनी प्रास्ताविकात दिली. अरीफ सय्यद (‘पै आय सी टी अ‍ॅकॅडमी’चे समन्वयक) यांनी आभार मानले.

टाटा स्काय मराठी सिनेमा सादर

0

या सेवेमुळे सर्वोत्तम मराठी सिनेमे, नाटके आणि गाण्यांची निवड, यामुळे टीव्हीच्या अनुभवात होणार वाढ

पुण: मराठी सिनेमाप्रेमींना आता विविध प्रकारच्या सिनेमांचा आनंदोत्सव साजरा करता येणार आहे, तोही एका बटणाच्या साहाय्याने, टाटा स्काय मराठी सिनेमा, ही नवी सेवा पहिल्यांदाच सादर करण्यात आली आहे, याद्वारे सर्वोत्तम मराठी सिनेमे, गाणी आणि नाटके पाहता येणार आहेत, भारतातील अग्रणीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशनच्या व्यासपीठावरून ते सबस्क्राइब करता येणार आहे. टाटा स्काय मराठी सिनेमाचे उद्घाटन मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या हस्ते आज करण्यात आले, यानिमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी आणि शेमरू एंटरटेन्मेंट लिमिटेडचे हिरेन गाडा आदी मान्यवरही उपस्थित होते.

फिल्मच्या उद्घाटनावेळी, लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेमांचा खजिना आता या सेवेवर उपलब्ध होईल, असे म्हटले.

शेमरूबरोबर भागीदारीत ही सेवा सादर करण्यात आली असून, याद्वारे सबस्क्राइब्रसना 120 पेक्षा जास्त सिनेमे, 500 गाणी आणि सर्वोत्तम अशी नाटके पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना दिवसभरात जाहिरातींच्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय तीन सिनेमे पाहता येतील, यात विनोदी आणि थरारक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमांचा समावेश असेल. या नव्या सेवेमुळे टाटा स्कायवर 24X7 मराठी सिनेमा सेवा सर्वोत्तम मराठी संहितेसह कुठल्याही जाहिरातींच्या अडथळ्यांविना अनुभवता येणार आहे, तसेच डीटीएच व्यासपीठावरून दर रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचाही आनंद घेता येणार आहे.

या उद्घाटनावेळी टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरूण उन्नी म्हणाले की, “टाटा स्काय मराठी सिनेमा, टाटा स्काय बांगला सिनेमा आणि टाटा स्काय पंजाब दे रंग यासारखीच सेवा आहे, प्रेक्षकांची प्रादेशिक सिनेमांची मागणी व स्वारस्य लक्षात घेऊनच आम्ही या सेवा सादर केल्या आहेत – उच्च दर्जाचे सिनेमे आणि नाटके प्रेक्षकांना कुठल्याही जाहिरातींद्वारे सुलभतेने पाहता येणार आहे. मराठी सिनेमाचे या पुनरुथ्थानाचे स्वागत मराठी भाषिकांक़डून झाले आहेच, शिवाय देशभऱातील सिनेमा प्रेमींकडूनही झाले आहे. मराठीतील सर्वोत्तम सिनेमे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हे नवे उत्पादन सादर केले आहे.

शेमरू एंटरटेन्मेंट लिमिटेडचे संचालक हिरेन गाडा पुढे म्हणाले की, “शेमरू एंटरटेन्मेंटला टाटा स्कायबरोबर भागीदारी करताना, आणि मराठीतील सर्वोत्तम सिनेमे, गाणी व नाटके टाटा स्काय मराठी सिनेमा या सेवेतून सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या सेवेसाठी शेमरूच्या विशेष आणि निवडक संग्रहातून संहिता व कार्यक्रम सादर केले जातील. आम्ही नेहमीच व्यावसायिक भागीदारांसाठी मूल्याधिष्ठित सेवा देतो आणि आमच्या संहितेतील सर्वोत्तमता देऊ करतो. सामर्थ्यशील, कणखऱ आणि विस्तारीत संहिता आणि प्रमाणित प्रोडक्शन मूल्ये यांच्यासह मराठी सिनेमाचे केवळ व्यवस्थापनच नाही तर येत्या काही काळापासून वाढही होत आहे, यामुळे प्रादेशिक मर्यादाही गळून पडल्या असून, सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. आमच्या नव्या सेवेचाही प्रेक्षक आनंद लुटतील असा आम्हाला विश्वास वाटतो.”

टाटा स्काय मराठी सिनेमामध्ये अलिकडचे, पैसा पैसा (2016), सिंड्रेला (2015), बस स्टॉप (2017), कट्टीबट्टी (2015) आणि इतर अनेक सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. या सेवेद्वारे लहानपण देगा देवा, मी नथुराम गोडसे बोलतोय, लगे रहो राजाभैय्या, उसना नवरा आणि काणेकरी अशी रंगभूमीवरील उत्तम नाटकेही सादर करण्यात येणार आहेत. ही सेवा #1205 या क्रमांकावर 24×7 उपलब्ध असेल.

टाटा स्कायवर टाटा स्काय बॉलिवुड प्रीमियम, टाटा स्काय क्लासिक सिनेमा, टाटा स्काय पंजाब दे रंग, टाटा स्काय बांगला सिनेमा, टाटा स्काय वर्ल्ड सिरीज आणि टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिवल आदी सेवा सुरू आहेत.

‘नशीबवान’चा फर्स्ट लुक रिलीज

0

विविध राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ‘नशीबवान’ असे या चित्रपटाचे नांव असून या चित्रपटाचा आज फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला, या लक्षवेधी पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट लुक वरून या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम असल्याचे दिसते. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ या चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील असून सह निर्मता प्रशांत विजय मयेकर आहेत. “”नशीबवान’ या चित्रपटाची ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) च्या स्पर्धा विभागात निवड झाली आहे.

‘नशीबवान’च्या दिग्दर्शनासह कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी अशी जबाबदारी अमोल वसंत गोळे यांनी सांभाळली आहे. गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या ‘हा भारत माझा’ ला पिफ मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

“प्रत्येक विद्यार्थ्याने तात्या लहाने यांच्या जिद्दीची , संघर्षाची व समाजसेवेची घ्यावी प्रेरणा!!!

0

सौ. अंजनाबाई लहाने यांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात १०१ ठिकाणी आज “ माँ तुझे सलाम ’’ हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. विविध स्तरांमधील लोकांनी याला हातभार लावला. प्रत्येक ठिकाणी महान कार्य करणाऱ्या

मातांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब, लायन क्लब व इतर अनेक संस्थांनी विराग मधुमालती यांच्या या कल्पनेला आकार रूप दिले.अहमदनगर येथील मुख्य कार्यक्रमात पद्मभूषण अन्ना हजारे हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांनी तात्याराव लहाने यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी व सफल करावे असे आवाहन केले. स्नेहालय व अनामप्रेम च्या दिव्यांग विद्यार्थांनी हृदयस्पर्शी गीते सदर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व समाजातील प्रत्येक वर्गाला नवचैतन्य , प्रेरणा व शून्यातून विश्व निर्माण करण्याची उमेद मिळेल. शिवाय अवयवदान व आईची हृदयस्पर्शी सत्यकथा बघावयास मिळणार आहे असा विश्वास अनेक विश्वविक्रम नोंदविणारे निर्माते दिग्दर्शक विराग मधुमालती यांनी व्यक्त केला आहे.

 आईची निस्वार्थ भावना, त्याग यातूनच कितीतरी महान समाजवंताचा जन्म झाला ज्यांनी मानवतेला व समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य केले. त्यातील एक म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. त्यांच्या आईने म्हणजे सौ. अंजनाबाई लहाने यांनी तात्यारावांना आपल्या एका किडनीचे दान देऊन त्यांना दुसऱ्यांदा जन्म दिला व मुलाने देखील हा जन्म सत्कारणी लावला व लाखो दृष्टीहीन लोकांना दृष्टी दिली

या चित्रपटाने आधीच एक विश्वविक्रम करून Guinness World Records मध्ये नांव नोंदविले असून निर्माता / दिग्दर्शक विराग मधुमालती यांच्या नावे आजवर ४ विश्वविक्रम आहे. दिव्यांगांचे दु:ख जगापर्यंत पोहोचविण्यासाठी व नेत्रदानाच्या प्रचारासाठी १०० दिवस विराग यांनी स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून जनहिताचे कार्य केले आहे.

या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. महत्वाचे म्हणजे चित्रपटाच्या उत्पन्नातून समाजसेवेचा वसा पुढे जावा या उदात्त हेतूने गोरगरीबांसाठी धर्मदाय डोळ्यांचे नेत्रालय उभारण्याचा डॉ. तात्याराव लहाने व विराग मधुमालती यांचा मानस आहे.

अहमदनगर येथील कार्यक्रमात विराग मधुमालती, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया, वंदना वानखडे, प्रस्तुकर्ती रीना अग्रवाल, रोटरी क्लब चे अध्यक्ष, अनिल सानप व बरेच मान्यवर उपस्थित होते.

काकडे -बापटांचा’फड’ नेमका कशासाठी ?

0

पुणे- मिटली ,मिटली ,सुटली सुटली अशी वाटणारी काकडे आणि बापट यांची राजकीय कुस्ती सुरूच असल्याचे दिसणार आहे .असा दावा आता राजकीय समीक्षकांकडून करण्यात येतो आहे . अर्थात हि कुस्ती भाजपच्या हितासाठी  आहे कि ,अन्य पक्षांच्या हितासाठी आहे ,कि जनतेच्या हितासाठी आहे कि नेतृत्वाचीच हि लढाई आहे ?कि निव्वळ करमणुकीसाठी आहे ? या प्रश्नांचे उत्तर आगामी  काळातच मिळणार आहे . 

पालकमंत्री गिरीश बापट हेच आमचे नेते आहेत . त्यांच्याच अधिपत्याखाली पालिकेचा कारभार चालतो अशी वक्तव्ये करीत थेट मुख्यमंत्र्यांसह ,पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष यांच्या पर्यंत भाजपचे सहयोगी खासदार , आणि पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका निभावलेले संजय काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांना वाटले होते . आता भाजपमधील हि गटबाजी (राजकीय कुस्ती ) तूर्तास थांबली …पण असे कुणाला वाटते ना वाटते तोच पुन्हा या दोघांचा राजकीय फड रंगला आहे . अर्थात यावेळी गिरीश बापटांनी आपले  विधान हा फड रंगविण्यासाठी दिले आहे.

खासदार संजय काकडे राज्यसभेवर आहेत. पुण्यात लोकसभेवर अनिल शिरोळे निवडून आले आहेत . पण शिरोळे हे सुरुवातीच्या काळात म्हणजे नोटबंदीचा विषय आणि त्यास समर्थन देईपर्यंत काकडे यांच्या समवेत राहिले .पण अगदी महापालिकेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करून उमेदवारी वाटपात काकडे यांनी दाखविलेले स्वारस्य यामुळे गिरीश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सारखा राजकीय विषयावर मानसिक  उपद्रव होत गेला . तिकिटे वाटपापासूनच काकडे बापट गट दिसू लागले .नोटबंदी च्या समयी देखील राजकीय चढाओढीतच भाजपचे 2 मोर्चे निघाले. बापटांना मानणारे त्यांचे एकेकाळचे महापालिकेतील सहकारी असलेले आणि बराच काल पक्षीय राजकारणापासून थोडेसे अलिप्त राहिलेले योगेश गोगावले यांनी शहर अध्यक्ष म्हणून नोटबंदी समर्थनासाठी मोर्चा काढला , आणि नंतर संजय काकडे यांनी जंगी मोर्चां काढला . सगळीकडे विरोधी पक्षांकडून नोटबंदी विरोधात मोर्चे निघालेले असताना हा लक्ष्यवेधी मोर्चा काढून पक्षांतर्गत मोठी अॅकटीव्हीटी दाखवून देण्यात आणि विधानसभेत मुख्यमंत्र्याकडून या मोर्चाचे कौतुक करवून घेण्यात काकडे यांना यश आले. आणि मग पुढे सुरु झाली आणखी चढाओढ … स्मार्ट सिटीचा बोजवारा उडला असताना ,मेट्रो वगळता ,महापालिकेतील २४ तास पाणीपुरवठा योजना असो,शिवसृष्टी असो , वा कोणताही मोठा प्रकल्प असो ..अर्थात अजून कोणताही प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही पण यासाठी होणाऱ्या कामकाजात अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्ष बापट आणि काकडे यांचे मतभेद चव्हाटया  वर येतच राहिले . कधी काळी आम्ही हि रात्रीच्या वेळी ‘तसल्या ‘ फिल्म बघत असतो असे विधान करून बापटांनी राज्यात गलका उडवून दिला तर  अलीकडे काकडे यांच्या दुसऱ्या भविष्यवाणीने देखील देशभर पक्षात गलका केला .काकडे आणि बापट यांच्यात प्रांताध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी अनेकदा बैठका घेवून सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला . अगदी काही दिवसांपूर्वीच काकडे यांना गुजरातच्या भाकीतामुळे पक्षात अडचणीत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्नही झाले. त्यानंतर काकडे यांनी अगदी मुख्यमंत्री ,प्रधानमंत्री आणि अध्यक्ष यांच्या पर्यंत आपला खुलासा पोहोचविला . आणि बापट यांचे नेतृत्व मान्य केले . याला हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढे दिवस होतात न होतात तेच बापट यांनी ‘ काय मागायचं ते आताच मागून घ्या  ,पुढे काय होईल ते सर्वांनाच ठाऊक आहे ‘ असे विधान द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यक्रमात केलं.  एकीकडे भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट  बूथमागे २५ कार्यकर्ते गोळा करण्याच्या आणि निवडणुकीच्या तयारीला लागले असताना कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचविणारे विधान मंत्रिपद भोगत असलेल्या व्यक्तीकडून यावे याविषयी भाजपच्या गोटात तीव्र नाराजी आहे . कोरेगाव भीमा येथील घटनेने सरकार आधीच बॅकफूट असताना गिरीश बापट यांनी विरोधकांच्या हातात कोलीत दिल्याचे दिसते  आहे . कॉंग्रेस शिवसेना यासारख्या पक्षांतील नेत्यांनी बापट यांचे विधान उचलून धरत भाजपचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली असून संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनानी शनवार वाड्यावर दाखविलेला जोश हि बापटांच्या विधानास कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे .

यासर्व पार्श्वभूमीवर बापटांचे नेतृत्व मान्य केलेले खासदार संजय काकडे यांनीही बापट यांनी चुकीचे विधान केल्याचे स्पष्ट केले आहे . एकंदरीत भाजप विरोधकांकडून हैराण होत असताना  मिटली ,मिटली ,सुटली सुटली अशी वाटणारी काकडे आणि बापट यांची कुस्ती सुरूच असल्याचे दिसणार आहे . अर्थात हि कुस्ती भाजपच्या हितासाठी  आहे कि ,अन्य पक्षांच्या हितासाठी आहे ,कि जनतेच्या हितासाठी आहे कि नेतृत्वाचीच हि लढाई आहे ? या प्रश्नांचे उत्तर आगामी  काळातच मिळणार आहे .

 

प्रत्येकाच्या कलेला संधी मिळाली पाहिजे – महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे

0

पुणे – प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो, या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे असे मत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, ओरोगामी, सिरॅमिक आणि बारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सेनापती बापट रस्त्यावर ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना श्रीमती मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक दीपक मिसाळ, झागाच्या संचालिका तीर्था मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, ‘झागा ही आगळीवेगळी कल्पना आहे. वेगवेगळ्या कलाकृतींना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करता येणार आहे, कला व कल्पकतेला वाव मिळणार आहे. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’
तीर्था मिसाळ म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीतापासून पॉप संगीतापर्यंत, भरतनाट्यापासून आधुनिक बेली डान्सपर्यंत आणि पारंपरिक वाद्यांपासून आधुनिक वाद्याचे सादरीकरण या ठिकाणी अनुभवता येणार आहे. हौशी चित्रकार, शिल्पकार, मातीकाम, ओरोगामी, वारली, मधुबनी आदी कलाकारांना आणि बारा बलुतेदारांना प्रदर्शने भरविता येणार आहेत.’
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘दिव्यांग व मतीमंद विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी विशेष संधी देण्यात येणार आहे. प्रदर्शने, सादरीकरण, प्रात्यक्षिके, कार्यशाळा, परिसंवाद, प्रशिक्षण आणि कौशल्यवर्धनाचे उपक‘मांंतून युवा व होतकरू कलाकारांना आपली कला समृध्द करता येणार आहे.’

चंगळवादामुळे पर्यावरण धोक्यात : अच्युत गोडबोले

0
पुणे : सध्याच्या युगात जाहिरातीचा इतका मारा होत आहे त्याला प्रतिसाद देत आपण ज्या गोष्टींची गरज नाही किंवा गरज पूर्ण झालेली असतानाही केवळ साठा करण्याच्या दृष्टीने वस्तू जमवल्या जातात, या चंगळवादी वृत्तीचा पर्यावरणावर परिणाम होत असून पर्यावरण धोक्यात आले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
बाराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालय आयोजित ‘पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मारुती चितमपल्ली, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.
गोडबोले म्हणाले, “चंगळवादामुळे ओरबडण्याची वृत्ती वाढते आहे. अमेरिकेत जगातील केवळ ५ टक्के लोकसंख्या राहते, पण एकूण नैसर्गिक स्रोतांपैकी २५ टक्के वापर हा त्यांच्याकडून केला जातो. जिथं ही विषमता आहे, तिथं माणसं जास्त निराश आहेत, असेही निरीक्षण आहे. चंगळवादाचा परिणाम या पद्धतीने मानसिकतेवरही होत आहे. हे थांबवायचं असेल तर तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा तुम्ही काय आहात, याकडे लक्ष दिले पाहिजे.”
जोशी म्हणाले, “निसर्ग आपल्याला द्यायला शिकवतो. पण आपण मात्र निसर्गाला ओरबडत चाललो आहोत. उदध्वस्त करणाची प्रक्रिया जोर धरत आहे, त्याचा गंभीर परिणाम निसर्गावर होत आहे. आपल्या गरजा कमी करणं आणि गरजेपुरतंच निसर्गाकडून घेणं, या निसर्गतत्त्वाचा स्वीकार करायला हवा.”
यावेळी वीरेंद्र चित्राव आणि दिलीप शेठ यांची मनोगते झाली. यावेळी स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘ग्रीन कॅम्पस, क्लीन कॅम्पस’ हा लघुपट दाखविण्यात आला व विविध स्पर्धांच्या परितोषिकांचे वितरण करण्यात आले. उद्देश पवार यांनी निवेदन केले.

प्रोस्टेट: वृद्धत्वातील एक अविरत सोबती

0

पुणे: वाढत्या वयासोबत जवळजवळ प्रत्येक व्यकयीमध्ये मूत्रमार्गाच्या कोणत्याना कोणत्या त्रासाची लक्षणे आढळून येतात. यामध्ये मुख्यता वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे ही लक्षणे आढळून येतात. प्रोस्टेटची वाढ होणे हा एक वृद्धत्वाच्या वाटचालीतील एक भाग आहे व प्रत्येकालाच तेथोड्या फार प्रमाणात होते.

जेव्हा प्रोस्टेटची वाढ होते तेव्हा मूत्र मार्ग सर्व बाजूंनी संकुचित होतोव वरील लक्षणे आढळून येतात. प्रत्येकालाच शस्त्रक्रियेची गरज असेलच असे नाही.  केवळ ज्यांनी औषधोपचाराला व जीवन शैलीच्या अपायांना योग्य प्रतिसाद दिला नाही त्यांनाच शस्त्रक्रिया करावे लागते. ५ ते ६ % पुरुषांमध्ये प्रोस्टेटची वाढ कर्करोगामुळे होऊ शकते.

कर्करोगाच्या प्रारंभिक टप्प्यातील लक्षणे देखील वरील नमूद केलेल्या लक्षणांसारखेच आहेत. (वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे). कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.

इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने 50 वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर आढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्युचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्रोस्टेट कॅन्सर बाधीत आहे. आज जगभरातील विकसीत देशांमध्ये डिजिटल एक्झामिनेशन (बोटाद्वारे गुद्वारतुन) आणि पीएसएच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे. मात्र भारतात प्रोस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही.

जवळपास 60 टक्के रुग्ण डॉक्टरला भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात. यासाठी इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागकृता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 120 पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून 40,000 पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली.

 कॅन्सरची प्राथमिक लक्षणे 

भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 50 वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. पूर्व निदान माध्यमातून प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोअप्सी समजली जाते. प्रॉस्टेट कॅन्सरच्या अचकू निदानासाठी जवळपास

12 ते 14 तुकडे टिश्यूजची अत्यंत पद्धतशीरपणे तपासणी करावी लागते. आणि एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: 50  वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. हे मोफत शिबीर ८ जानेवारी ते १७ जानेवारी २०१८, पूर्व नियोजीत वेळेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ प्रोस्टेट कॅन्सर,  पुणे येथे घेण्यात येणार आहे.

यशस्वी होण्यासाठी उद्योजकतेकडे वळा

0

पुणे : “जीवनात यशस्वितेचे शिखर गाठायचे असेल तर विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे मोठ्या प्रमाणात वळावे,”असा महत्वपूर्ण सल्ला कॅप्रिहंस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रॉबिन बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ बिजनेसमधील पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम)च्या ३३ व्या बॅचच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वालचंद नगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जी.के. पिल्लई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी २८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डी.पी. आपटे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रमुख सल्लागार डॉ. जय गोरे, एमआयटी स्कूल ऑफ बिजनेसचे डायरेक्टर डॉ. कल्याण स्वरूप व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
रॉबिन बॅनर्जी म्हणाले,“ दोन वर्षापूर्वी करण्यात आलेल्या जागतिक पाहणीचा निष्कर्ष असा होता कि, ज्यांनी उद्योजकतेच्या ध्येयाने कार्य केले त्यांची वेगाने प्रगती झाली. विद्यार्थ्यांनी सदैव भावनांक आणि बुद्धांक या दोन गोष्टींचे संतुलन ठेऊन कार्य करावे. सकारात्मक विचारधारा ठेवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल.”
जी.के.पिल्लई म्हणाले,“ व्यवस्थापनाच्या विद्यर्थ्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकावे. विद्यार्थ्यांजवळ मोठ्या प्रमाणात ज्ञान असले तरी जो पर्यंत त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग केला जात नाही, तो पर्यंत त्याला काहीही अर्थ नसतो. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन कार्य केल्यास तुमची व कंपनीचीही प्रगती होत असते. हे सूत्र लक्षात ठेवावे. कार्य करतांना तुम्ही जेथे आनंदी असाल, तेथेच तुमची प्रगती होईल.”
डॉ. जय गोरे म्हणाले,“ व्यवस्थापनेच्या विद्यार्थ्यांनी कधीही नुकसान व फायदा या गोष्टींवर लक्ष देऊ नये. नेहमी स्वतःच्या जबावदारीवर निर्णय घ्यावे. प्रत्येक क्षणा-क्षणातून शिकत असतांना कठोर परिश्रमातून आपले भविष्य घडवावे. व्यवसायात नेतृत्व करतांना निर्णय घेण्याबरोबरच दूरदृष्टीही ठेवावी. स्वतःची कारकीर्द घडविताना कधीही द्विधा अवस्थेत राहू नये.”
डी.पी. आपटे म्हणाले, तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी आई-वडील व शिक्षक यांना विसरू नका. तुम्ही बाहेरच्या जगात जे चांगले काम कराल, त्यामुळे संस्थेचे नाव मोठे होईल.”

यावेळी डॉ. कल्याण स्वरूप यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यामध्ये ते म्हणाले, ३३व्या बॅच मधील २८३ पदवीधरांपैकी बहुसंख्य स्नातकांनी उच्च श्रेणी प्राप्त केली आहे. त्याच प्रमाणे ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून काही विद्यार्थ्यांनी वडिलोपार्जित व्यवसायात प्रवेश केला आहे व काही मोजक्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
सलोनी अग्रवाल आणि तनिष प्रकाश यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. चेतन चौधरी यांनी आभार मानले.