Home Blog Page 3209

तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावणे आवश्यक-अर्थतज्ञ चंद्रहास देशपांडे

0

पुणे. ‘तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावत नाही तोपर्यंत जागतिक सत्ता होता येणार नाही’, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्र्हास देशपांडे यांनी केले. ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकास या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी मनूष्यबळ तज्ञ अजय बक्षी, मनोज मेहता, प्रसनजीत फडणवीस, केजे शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका विभावरी जाधव, कार्यकारी संचालक हेमंत अभ्यंकर, आणि व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयाचे संचालक डॉ. मंगेश कश्यप, आदि उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले की, देशामध्ये आर्थिक विकास केल्याशिवाय दारिद्रय निर्मूलन शक्य होणार नाही. लोकशाही प्रक्रियेत राहून देशाने केलेला विकास नाकारता येणार नाही. पण आपल्याला अजून बरच काही करता आले असते. यापुढे आपल्याला विकास करण्यासाठी सध्याच्या स्पर्धात्मक काळात प्रभावी काम करावे लागेल. तंञज्ञान सर्व घटकांपर्यंत पोहचवून त्यांचे आयुष्यमान उंचवावे लागेल.

अजय बक्षी म्हणाले की, नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर या चांगल्या संकल्पना आहेत. माञ, अपूरी माहितीमुळे गोंधळ निर्माण झाला. असे असले तरी देश सकारात्मक दिशेने प्रगती करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनोज मेहता म्हणाले की, नोटबंदीनंतर कर दात्यांची संख्या वाढली असून, त्याद्वारे मिळालेल्या निधीतून मूलभूत सुविधांचा विकास करणे शक्य होईल.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि तज्ञांचे 25 शोधनिबंध असेलले टीआयएमआर ऑब्जर्व्हर ही पुस्तीका प्रकाशित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रिती शर्मा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंगेश कश्यप यांनी केले.

ग्राहक जनजागृती अभियानाचे उदघाटन

0
भोसरी :  जीवनविद्या मिशनच्यावतीने भोसरी येथे सुरु असलेल्या ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘ग्राहक जनजागृती’ साठी माहिती केंद्र काल सुरू करण्यांत आले. त्याचे  उदघाटन अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याणमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार महेश लांडगे,  वाजनमापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जीवनविद्या मिशनचे आजी माजी विश्वस्त  उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जीवनविद्या मिशन ही शैक्षणिक व सामाजिक संस्था मागील 61 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान,अवयवदान, ग्राहक संरक्षण आदी विविध क्षेत्रात जनजागृती करीत आहे.
समाजातली प्रत्येक व्यक्ती  ग्राहक आहे. त्याला त्याचे हक्क माहित असायला हवेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळून समाजातील अनिष्ट प्रथांना आळा बसेल. यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नाला जीवनविद्या मिशनचा ही हातभार लागत आहे. महाराष्ट्र शासनाचा वैद्यमापन विभागातर्फे  ग्राहकांच्या हक्कांबाबत  व्हिडीओज,होर्डिंग्ज, बॅनर यांच्या वापराने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

नेमणूकपत्र नसताना महापालिकेत काम करतात ७८ कामगार ( व्हिडीओ रिपोर्ट )

0

पुणे- मायमराठी ने गेल्यावर्षात एका ‘तोतया’ कामगाराला महापालिकेच्या मुख्य इमारतीतील मिळकत कर विभागात काम करताना रंगेहाथ पकडून दिल्यानंतर , अशाप्रकारचे ७८  तरुण कामगार महापालिकेच्या अधिकृत नेमणूकपत्रा शिवाय ,महापालिकेच्या तिजोरीतून पगार न घेता , प्रत्यक्षात महापलिकेच्या मुख्य इमारतीत महत्वाच्या खात्यात ,टेबल आणि संगणकाचा वापर करीत अधिकृत कर्मचारी असल्याप्रमाणे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे .विशेष म्हणजे हे कामगार ठेकेदाराकरवी सुद्धा कामावर नसल्याचे समजते . या सर्वांना त्या त्या विभागातील अभियंते, खाते प्रमुख किंवा महापालिकेची विविध कामे मिळविणारे ठेकेदार आपापल्या उत्पन्नातून पगार देत असल्याचे वृत्त आहे .
शहर नियोजनाचे महत्वाचे काम करणाऱ्या बांधकाम विभागात अशा ‘बोगस ‘ म्हणजे निराधार कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असून यामध्ये तरुणींचा मोठा भरणा असल्याचे हि समजले आहे .कामाच्या गरजेपोटी बेरोजगार तरुणींना अशा प्रकारे महापालिका वापरून घेत असताना विशेष म्हणजे पालिकेच्या कामगार संघटना देखील का गप्प आहेत हे समजू शकलेले नाही .काम हवे म्हणून तरुणाई हा बेकायदा प्रकार सहन करून घेत आहे . तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची महापालिकेलाही गरज  आहेच  पण कायदेशीररीत्या भरती करता येत नाही असा बहाणा देवून अशा प्रकारे बेकायदेशीरपणे तरुणाईचा महापालिका वापर करून घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे .
यातील बहुतेक सर्व कामगार पूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून त्यांना  महापालिकेत  कामावर घेण्यात आले होते . पण त्यांचे कंत्राट संपल्यानंतरही ते अद्यापही ‘अशा
‘पद्धतीने महापालिकेत काम करत असल्याचे दिसून आले आहे .
या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका बेरोजगार तरुण तरुणींना कायदेशीररीत्या काम देण्याएवजी ‘बोगस कामगार ‘ म्हणून घडविण्याचा उद्योग करीत आहे काय  ? असा प्रश्न या निमिताने पुढे उभा राहणार आहे .
पहा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट …

‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांची ‘रामोजी फिल्म सिटी’ला भेट

0

पुणे-‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनने (एसआयएमएमसी) आपल्या पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून माध्यमे व मनोरंजन उद्योग कसे काम करतो, याची माहिती करुन देण्यासाठी जगातील सर्वांत मोठ्या चित्रपट स्टुडिओंपैकी असलेल्या रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद’ला रंजक व अनुभव समृद्ध करणारी सहल नुकतीच आयोजित केली. या भेटीतील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गाजलेल्या ऐतिहासिक ‘बाहुबली’ चित्रपटाचे प्रचंड देखावे (सेट्स). या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असा अनुभव मिळाला.

 “आभासी ज्ञानाचा वापर वास्तव-जीवनातील प्रसंगांमध्ये होणे, ही काळाची गरज असून तो कसा करावा, हेसुद्धा या अभ्यास दौऱ्यातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले आणि त्यांची आत्मविश्वास पातळी उंचावली”, अशी प्रतिक्रिया ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष डॉ. प्रा. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली आहे.

 विद्यार्थ्यांनी ओपन एअर व्हिंटेज रेड टुर बसमधून विविध सेट्स व चित्रण स्थळांना भेट दिली, मॅजिक शो, लाईव्ह शो व रामोजी शो अशा कार्यक्रमांचा, तसेच वाईल्ड वेस्ट स्टंट शॉट्स बघण्याचा थरार लुटला. त्यांनी बर्ड पार्कला भेट देऊन विविध रंगीबेरंगी व खास सुंदर पक्षी बघितले, तर बटरफ्लाय पार्कमध्ये आकर्षक फुलपाखरांचे सौंदर्य टिपले. पुढे बोन्साय गार्डनमध्ये जाऊन तेथील दुर्मीळ फुले बघितली आणि नैसर्गिक सुगंधाची अनुभूती घेतली.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी रामोजी फिल्म सिटीमधील ‘साहस ॲडव्हेंचर आऊट बाऊंड ट्रेनिंग प्रोग्रॅम’मध्ये अत्यंत उत्साह व जोमाने भाग घेतला. त्याचबरोबर सँड व्हॉली बॉल, ह्युमन फूस बॉल, हाय रोप कोर्स, नेट कोर्स, मेल्ट डाऊन, आर्चरी अशा खेळांचाही आनंद लुटला. एकंदरीत हा दौरा म्हणजे मौजपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.

अपघात विरहीत विदयुत सुरक्षेसाठीजनतेने सहकार्य करावे-उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

0
मुबंई -विज  हाताळणी करतांना
गेल्यावर्षात 1269 लोकांची प्राणहानी झाली.   विजेच्या वाढत्या मागणीसोबत या क्षेत्रात होणारे अपघात ही चितेंची बाब आहे.ग्रामीणभागात अपघाताचे वाढते प्रमाण पाहता यंत्रणेसोबतच जनतेनी देखील विदयुतसुरक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहनउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आजराज्यस्तरीय विदयुत सुरक्षा सप्ताहाचा उदघाटन कार्यक्रम आज उर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत झाले यावेळी  उर्जा  राज्यमंत्री मदन येरावार याच्यासह प्रधानसचिव अरविंदसिंह, महापारेषचे व्यवस्थापकीय
संचालकराजीवकुमार मित्तल, सुत्रधारी कंपनीचेसंचालक विश्वास पाठक, रिलायन्सइन्फ्रास्टकच्रचे देवाशिष बॅनर्जी,टाटा पॉवरचेकार्यकारी संचालक अशोक सेठी, बेस्ट चेअधीकारी ओहळ ,मुख्य विदयुत निरीक्षक.     सुहास बागडे उपसिथत होते.
उर्जामंत्री म्हणाले की विज उपकरणाचीहाताळणी करतांना अगदी छोटया गोष्टीमुळे,दुर्लक्षामुळे,निष्काळजीपणामुळेअपघात होतो. 2015 साली 1600 लोकांचीप्राणहानी झाली.अपघात टाळण्यासाठीविदयुत निरीक्षक कार्यालयाने राज्यभर विदयुतअपघाताच्या धोकादायक ठिकाणाची तपासणीकरावी.या सप्ताहात महावितरण,मुख्य निरीक्षक विदयुत  व खाजगी विज वितरणकंपन्यानी ही मोहीम राबवावी.शुन्य अपघात हेआपले ध्येय ठेवुन यंत्रणानी व जनतेनेही यात सहभाग घ्यावा असे आग्रही प्रतिपादन त्यांनीकेले.
शासनातर्फे विदयुत निरीक्षक कार्यालय सक्षमकरण्यात येत आहे. कार्यालयाच्या संकेतस्थळाव्दारे विदयुत सुरक्षेविषयक कामकाज अधिक लोकाभिमुख होईल अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील ब-याचठिकाणी डी.पी ची झाकणं उघडे राहुन अपघात होतो.महावितरणने यासाठी विशेष मोहीम घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिली.     सुरक्षा सप्ताहाव्दारे जाणीवजागृती होईलच मात्र यंत्रणेसोबतच लोकसहभाग असला तरचअपघात विरहीत विदयुत सुरक्षा हे ध्येय ठेवलेपाहीजे.
उर्जा हा विकासाचा कणा असल्याचे सांगुनराज्यमंत्री मदन येरावार  म्हणाले की विदयुतहाताळणी करतांना ग्राहकांची व विज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची जीवीत हानी होऊ नये.सुरक्षाविषयक बाबीचा मोठया प्रमाणावर समाजमाध्यमाव्दारे प्रचार ,प्रसार व्हावाअशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रधान सचिव अरविंद सिंह यांनी विज क्षेत्राच्यावाढत्या व्यापामुळे  हाताळतांना होणाऱ्याअपघात टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षापासुनहा सप्ताह आयोजित करण्यात येत असल्याचेसांगीतले.
विदयुत निरीक्षक कार्यालयाच्या www.cei.maharashtra.gov.inसंकेतस्थळाचे उदघाटन यावेळीमंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत करण्यातआले.तसेच अपघात विरहीत विज वितरणकरणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांचाप्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला.

स्वामी विवेकानंद द्रष्टे वैज्ञानिक- प्रा. जयंत सहस्रबुध्दे

0
पुणे – आधुनिक विज्ञानाच्या क्षितिजावर ज्या गोष्टींची आज चर्चा केली जाते, त्या गोष्टी स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितल्या होत्या. त्यावरुन त्यांचा विज्ञानाचा अभ्यास आणि वैज्ञानिक द्रष्टेपण लक्षात येतेअसे मत विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनमंंत्री प्रा. जयंत सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्‍या विश्‍व वेद विज्ञान संमेलनात आज विवेकानंद जयंतीनिमित्त ‘द्रष्टे वैज्ञानिक स्वामी विवेकांनद’ या विषयावर प्रा. सहस्रबुध्दे बोलत होते. सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर अध्यक्षस्थानी होते. विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, प्रा. सुरेश सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैदिक विज्ञानाच्या आधारावर आधुनिक विज्ञानातील सर्व सिध्दांत मांडले गेले आहेत. एकीकरणाचा सिध्दांत मांडणे हे आधुनिक विज्ञानाचे उद्दीष्ट आहे. परंतु आधुनिक विज्ञानाला हा सिध्दांत आजही मांडता आलेला नाही. भारताच्या उत्कर्षासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन आवश्यक आहे. पूर्व व पश्‍चिमेच्या समन्वयातून भारताची प्रगती होऊ शकेल हे विवेकानंदांचे विचार होते असेही प्रा. सहस्रबुध्दे यांनी सांगितले.
विवेकानंदांनी ब‘म्हांडनिर्मितीची वेदातील संकल्पना स्पष्ट केली, उर्जा आणि वस्तू परिवर्तनीय असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते, उर्जा अक्षयतेचा सिध्दांत मांडणार्‍या आईनस्टाईनला याची माहिती होती, सापेक्षवादाच्या सिध्दांतावर त्यांनी मत व्यक्त केले होते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग सायन्सची निर्मिती विवेकानंद व जमशेदजी टाटा यांच्या कल्पनेतून झाली, संन्याशाने धर्माबरोबर विज्ञानाचा प्रसार करावा असे त्यांचे मत होते, अशी माहिती प्रा. सहस्रबुध्दे यांनी दिली.
जपानमधील युवक स्वतःच्या ज्ञानावर देशाचा विकास करीत आपल्या देशाला पुढे नेत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारताना ते पश्‍चिमेचे अनुकरण करत नाहीत. जपानमधील युवकांची देशभावना भारतीयांनी जाणीव घ्यावी अशी विवेकानंदांची अपेक्षा होती.
डॉ. करमळकर म्हणाले, ‘मी भूगर्भशास्त्राचा विद्यार्थी आहे. ब‘म्हांडाची निर्मिती कशी झाली याची वेदविज्ञानात माहिती आहे. आधुनिक विज्ञानाशी ती सुसंगत आहे. त्यामुळे वेदविज्ञानाकडे दुर्लक्ष न करता त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’
तिसर्‍या वेदविज्ञान संमेलनात आज सकाळी ‘सूर्यनमस्कार सहपरिवार’ या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या उपक‘माला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रा. बी. व्ही. जोशी यांनी वास्तुकला आणि वैदिक विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. संस्कृत, योगा, जीवनशास्त्र, वेदिक व्यवस्थापन, पुरातत्वशास्त्र, वास्तुकला, कृषि व गोविज्ञान, आरोग्य या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

विश्व आर्थिक मंच ने 24 वें वार्षिक क्रिस्टल पुरस्कार के साथ शाहरुख खान को किया सम्मानित!

विश्व आर्थिक मंच ने 24 वें क्रिस्टल अवार्ड्स के साथ बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान को कल सम्मानित किया।

सोमवार 22 जनवरी की शाम, स्विटज़रलैंड के दावोस-क्लॉस्टर्स में फोरम की वार्षिक बैठक 2018 के शुरुआती सत्र में अभिनेता का स्वागत किया जाएगा।

शाहरुख खान, गैर-लाभकारी मीर फाउंडेशन के संस्थापक हैं, जो चिकित्सा उपचार, कानूनी सहायता, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वास और आजीविका समर्थन के माध्यम से एसिड हमलों और गंभीरता से जली महिला पीड़ितों को सहायता प्रदान करता है। अभिनेता ने विशेषतौर पर बच्चों के अस्पताल वार्ड का निर्माण किया है और कैंसर के उपचार से गुजर रहे बच्चों के लिए नि: शुल्क बोर्डिंग के साथ चाइल्डकैअर केंद्रों का समर्थन भी किया है।

यह पुरस्कार प्रमुख कलाकारों की उपलब्धियों का जश्न मनाता है जो समाज के सभी नेताओं के लिए रोल मॉडल का काम करता हैं।

सम्मान को स्वीकार करते हुए शाहरुख खान ने ट्वीट किया, “इस सम्मान के लिए धन्यवाद। मैं इन बहादुर और खूबसूरत महिलाओं के साथ मेरे काम को एक महान विशेषाधिकार मानता हूं क्योंकि यह मेरे जीवन के प्रति सम्मान और उद्देश्य प्रधान करता है। मैं उम्मीद करता हूं कि इन महिलाओं के अद्वितीय वीरता के बारे में जागरूकता फैलाकर, अन्य लोगों के साथ मिलकर इस काम को सफलतापूर्वक परिणाम तक पहुंचाने में सफल रहु।”

क्रिस्टल पुरस्कार प्रमुख कलाकारों की उपलब्धियों का जश्न मनाता हैं जो समाज के सभी नेताओं के लिए रोल मॉडल का काम करता हैं।

साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी स्पर्धेचे 11फेब्रुवारी रोजी आयोजन

0

पुणे: चॅम्प एन्ड्युरन्स टीम यांच्या तर्फे साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी स्पर्धेचे शिर्डी येथे  11फेब्रुवारी रोजी आयोजन  करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन 3,5,10,21 व 42किलोमीटर प्रकारात होणार आहे.

स्पर्धेत एकूण 10लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. श्री साई बाबा हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असल्यामुळे शिर्डी हे अतिशय पवित्र असे तीर्थक्षेत्र बनले आहे. साई बाबांच्या समाधी वर्षाची यंदा शताब्दी साजरी होत असून या मॅरेथॉनच्या माध्यमातून श्रद्धा व सबुरी हा श्री साई बाबांचा संदेश सर्वदूर पसरविणायचा उद्देश आम्हाला साध्य करायचा आहे. तसेच भारताचे पहिले आर्यनमन सनदी अधिकारी कृष्णा प्रकाश (आयपीएस आयजी व्हीआयपी सेक्युरीटी)यांच्या स्वप्नातील मेकिंग इंडिया रन या भव्य मोहिमेचा प्रारंभ या मॅरेथॉनच्या माध्यमातून होत आहे. शिर्डी आणि संभोवतालच्या परिसरासाठी पर्यटन आणि सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठीही या मॅरॅथॉनचा उपयोग होणार आहे.

मॅरेथॉन शर्यतीस व्दारावती भक्त निवास येथून प्रारंभ होणार असून काकडी गाव (एअरपोर्ट पोर्ट) येथे या शर्यती चा समारोप होणार आहे. या मॅरेथॉनचे वैशिष्ट म्हणजे सर्वाधिक अंतराची अनवाणी शर्यत असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे आणि यासाठी नावनोंदणी मोफत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, याशिवाय सहभागी स्पर्धकांना पदक, नाश्ता, टी-शर्ट, गुडी बॅग आणि टाईम बीब देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी या वेबसाईटवर संपर्क साधावा. स्पर्धेसाठी आतापर्यंत देशभरांतून 800हुन धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला असून कमीतकमी 15000हुन अधिक  स्पर्धक व 15आंतरराष्ट्रीय इलाईट धावपटू सहभागी होण्याची आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेला माउंट एव्हरेस्ट सर करणा-या  अपर्णा प्रभुदेसाई,  आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे ट्रेनर अमोद भाटे, चॅम्प एन्ड्युरन्सचे संचालक निखिल शहा, अरविंद बिजवे, रविंद्र वाणी, तसेच अनवाणी धावपटू प्रविण झेले आदी मान्यवर उपस्थित होते.

“महाराष्ट्र कुस्ती लीग”- ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती रंगणार केवळ झी टॉकीजवर

0

 

आपल्या रांगड्या संस्कृतीचा वारसा पुढे
नेत, आपल्या मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवण्यासाठी ताकदीची
कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती हे घोषवाक्य घेऊन झी टॉकीज महाराष्ट्र कुस्ती लीग ‘;या भव्यदिव्य
स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ‘झी टॉकीज’ने आजवर अनेक वैविध्यपूर्ण सिनेमे आणि मनोरंजनात्मक
कार्यक्रमांची पर्वणी देत आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी माणसाने कितीही प्रगती केली,
तंत्रज्ञानाची शिखरं गाठली तरी त्याच्या मनात या मातीविषयीची ओढ रुजलेली असते. याच मातीशी
नाळ जोडणारा क्रीडाप्रकार म्हणजे कुस्ती. झी टॉकीज महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आपल्या
प्रेक्षकांसाठी घेऊन आलं आहे. त्यासाठी “महाराष्ट्र कुस्ती लीग” हा एक विलक्षणीय उपक्रम झी
टॉकीजतर्फे आयोजित केला आहे. याच उपक्रमाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन
करण्यात आलं असून प्रमुख अतिथी म्हणून श्री. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अध्यक्ष,
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, खासदार ) आणि श्री सुभाष चंद्रा, (सदस्य, राज्यसभा ) यांची उपस्थिती
असणार आहे.
झी टॉकीज आणि झी युवाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, "महाराष्ट्राला
कुस्ती या क्रीडाप्रकाराची वैभवशाली परंपरा लाभली आहे. या रांगड्या मातीत घडलेल्या पैलवानांनी
महाराष्ट्रासोबत देशाचेही नाव उंचावले आहे आणि म्हणूनच हा खेळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचावा,
या क्रीडाप्रकाराची लोकप्रियता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आम्ही हा अभूतपूर्व उपक्रम राबवत
आहोत. आमच्या या उपक्रमातून २०२० साली जपान येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे
प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आम्ही तयार करू शकू असा मानस आम्ही बाळगतो

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

0

पुणे : मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा अस्तित्वात आहेत. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. वीजप्रवाह सुरु असताना वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. असा धोका पत्करल्यास विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय अडकलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो व अपघात होऊ शकतो.

नागरिक व विशेषतः लहान मुलांनी वीजवाहिन्या तसेच वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पतंग उडविताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. वीजयंत्रणमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजप्रवाह सुरु असलेल्या वीजयंत्रणेपासून दूर अंतरावर पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजमीटरचे रिडींग अचूक करा अन्यथा फौजदारी कारवाई – प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा

0

पुणे : वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग अचूक करा. चुकीच्या रिडींगमुळे वीजग्राहकांना विनाकारण मनस्ताप होतो तसेच महावितरणचा महसूलही ठप्प होतो. मीटरचे अचूक रिडींग घेण्यामध्ये हयगय झाल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी मीटर रिडींग एजन्सीजला दिला आहे.

पुणे प्रादेशिक विभागात चुकीचे व सदोष रिडींग घेणाऱ्या तसेच वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणार्‍या मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत. तसेच वीजवापरानुसार योग्य व अचूक वीजबिल ग्राहकांना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मीटर रिडींगच्या प्रक्रियेत कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

पुणे परिमंडलातील वीजमीटर रिडींग संदर्भात येथील ‘प्रकाशभवन’मध्ये नुकतीच बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, गौतम गायकवाड यांच्यासह पुणे परिमंडलातील कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुख व 27 मीटर रिडींग एजन्सीजचे संचालक व सुमारे 225 मीटर रिडर्स उपस्थित होते.

पुणे प्रादेशिक विभागात वीजमीटरच्या अचूक रिडींगसाठी उपाययोजना सुरु आहेत. यात कामचुकार मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध महावितरणने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. थेट फौजदारी कारवाईचा पर्याय खुला ठेवला आहे. महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग सुरु असल्याने पूर्वीच्या तुलनेत मीटर रिडींग व वीजबिलात आणखी अचूकता आलेली आहे. रिडींग घेण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे. पुणे परिमंडलात मीटर रिडींगमध्ये आणखी अचूकता यावी यासाठी मीटर रिडींग एजन्सीजसह त्यांचे मीटर रिडर्स यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सदोष मीटर रिडींग चालू राहिल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध आर्थिक दंड, काळ्या यादीत टाकणे यासोबतच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई सुरु

0

पुणे: पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम नोव्हेंबरपासून सुरु केली आहे. ही मोहीम या महिन्यात आणखी तीव्र करण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहे. थकीत वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणारच हा संदेश वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईतून देण्याचे निर्देश त्यांनी पाचही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांची वसुली आणखी वेगाने होण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

दि. 13 व 14 रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 13) व रविवारी (ता. 14) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

मानसी किर्लोस्कर यांचे यशस्वी कुटूंब व्यवसायाला चालना देणे किती अवघड/किती सोपे?’ या विषयावर व्याख्यान

0

नवी दिल्ली- ल मेरिडियन हॉटेलमध्ये नुकतेच ‘बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यंग आंत्रप्रेन्युअर समिट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही परिषद असे संवादात्मक आणि उद्बोधक व्यासपीठ ठरले ज्याने भारतीय नवउद्योजकीय परिसंस्थेशी संबंधित विषयांवर रंजक विचारमंथन घडवून आणले.या प्रतिष्ठित परिषदेत एक प्रमुख वक्त्या म्हणून ‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘यशस्वी कुटूंब व्यवसायाला (फॅमिली बिझनेस) चालना देणे किती अवघड/किती सोपे?’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.

त्या म्हणाल्या, “ताकद ही स्पर्धात्मकता आणि कामगिरी यांचे फलित असून स्पर्धात्मक व आव्हानात्मक वातावरणच त्याची मागणी करते. त्यामुळे कुटूंब व्यवसाय उदयाला यायला हवेत. वारसा पुढे नेण्याच्या इच्छेतून अनेक कुटूंब व्यवसायांचे छोट्या गटांत विभाजन होते, परंतु त्यांनी स्वतःची व्यवसाय प्रारुपे व पद्धती विकसित कराव्या लागतात. संशोधनातून असे दिसून आले आहे, की कुटूंब चालवत असलेल्या व्यवसायांपैकी ३० टक्क्यांहून कमी व्यवसायच तिसऱ्या पिढीपर्यंत टिकून राहतात. मी तर दीडशे वर्ष जुन्या व्यवसाय समूहातील पाचव्या पिढीतील आहे. तरीही माझे ठाम मत आहे, की सदैव काळाशी सुसंगत राहणे फार महत्त्वाचे असते. काळानुसार व्यवसाय प्रारुपे, व्यूहरचना, प्रक्रिया व नवउद्योगांची निर्मिती सुरुच राहील. वारसा पुढे चालवणे महत्त्वाचे असते, पण त्याची चाकोरी मोडणेही अत्यावश्यक असते.”

या परिषदेत दिवसभर चाललेल्या सत्रांना विविध उद्योगांतील दिग्गज, सदस्य व आमंत्रितांनी उपस्थिती लावून प्रचंड प्रतिसाद दिला.

खा. अनिल शिरोळेंच्या कारकिर्दीविषयी भाजपकडे नकारात्मक अहवाल

0

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रबळ उमेदवारांची आणि दुर्बल उमेदवारांची माहिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी जमविण्यास प्रारंभ केला असून पुण्याचे खासदार दुर्बल उमेदवार ठरतील असा अहवाल त्यांना मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे . मात्र याबाबत नितीन गडकरी यांच्याकडून ही शिरोळे यांच्याकार्याबाबतचे मत जाणून घेण्यात येणार आहे.यापार्श्वभूमीवर  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शिरोळे यांच्या ऐवजी नवा चेहरा शोधण्याची मोहीम हि आता राबविली जावू शकणार असल्याचे वृत्त आहे .
नुकत्याच झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच भाजपने राज्याराज्यातील लोकसभा सदस्यांचे कामकाज पत्रक तपासून घ्यायला सुरुवात केली .आणि आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्णही झाल्याचा दावा करण्यात येतो आहे .
पुण्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सखोल कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता हि माहिती सूत्रांनी दिली . मेडिक्लेम विषयी पुण्यातील डॉक्टरांशी अनिल शिरोळे यांनी केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या . त्याचा परिणाम डॉक्टरांना फायदा होण्यात झाला मात्र रुग्णांना त्याची दुप्पट किंमत मोजावी लागते आहे  .याबाबत मेडिक्लेम करणाऱ्या सर्व कंपन्या आणि आधिकारी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे .  पाॅलीसिंची संख्या कमी होत आहे. नवीन पॉलिसि मिळणे दुरापास्त होत आहे .याशिवाय शिरोळे यांनी पीएमपीएमएल वर स्वतःच्या मुलाची निवड करूनही तेथील कामगार अत्र त्यांच्या कार्य्पाधातीवर नाराज आहेत . कोणाच्या अध्या मध्यात नसलेले शांत व्यक्तिमत्वाचे असले तरी एकंदरीत पाट्या टाकणारे खासदार अशी त्यांची प्रतिमा बनली आहे . कार्यकर्त्यांचा मोठा समूह अथवा नागरिकात स्वतःचे कर्तुत्व ते सिद्ध करू शकलेले नाहीत . असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे .
दरम्यान काल अनिल शिरोळे आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी दुपारी पुण्यात  राजकारणावर सुमारे दीड तास खलबते केल्याचे समजले आहे .

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलमुळे पर्यटन विकासाबरोबर राज्याच्या जीडीपीतही होईल वाढ – मुख्यमंत्री

0

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग आता सामान्य लोकांसाठी खुला होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा, प्लोटींग रेस्टॉरन्ट अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे देश – विदेशातील पर्यटक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या जीडीपी वाढीमध्ये मोठे योगदान मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्टच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे स्वप्न बघितले होते. सागरमाला अभियानाच्या माध्यमातून ते साकार होत आहे. मुंबईतील रोरो टर्मिनलचे काम 25 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. साधारण एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. मांडवा, नेरुळ येथे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल. जेएनपीटी येथे सेझच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी वाढीसाठी याचा फार मोठा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

मेट्रोच्या कामातून निघणाऱ्या मातीचा उपयोग करून सागरी भराव तयार करून उद्यान तयार करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. मुंबईच्या विकास आराखड्यास मान्यता देताना या प्रकल्पाला निश्चित मान्यता देऊ. ‘वेस्ट पासून वेल्थ’ तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरेल. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला प्लॅनिंग ॲथॉरिटीचे अधिकार देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठी चालना – नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले, अरबी समुद्र आणि त्याचा सागरी किनारा ही मुंबईची सर्वात मोठी ताकद आहे. पण आतापर्यंत त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. राज्याच्या विकासाला मोठी गती देऊ शकेल अशा क्रुझ पर्यटनाकडे लालफितीच्या कारभारामुळे मोठे दुर्लक्ष झाले होते. पण आता त्यातील अडथळे दूर करण्यात आले असून मुंबईत क्रुझ पर्यटनाला मोठी चालना देण्यात येईल. सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राला मोठा लाभ मिळत आहे. या प्रकल्पांतर्गत २.४१ लाख कोटींच्या ८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जेएनपीटी मधील सेझ प्रकल्पात मोठी गुंतवणूक येत असून तिथे येत्या काळात दीड लाख नवीन रोजगार निर्माण होतील. यातील ८० ते ९० टक्के रोजगार हे स्थानिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठा वाव आहे. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून फक्त २ लाख पर्यटक येतात. भविष्यात ही संख्या वार्षिक साधारण ९५० क्रुझेस आणि ४० लाख पर्यटकांपर्यंत वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझ टर्मिनलचे काम आम्ही हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले जाईल, असे श्री. गडकरी म्हणाले. मिठी नदीची स्वच्छता आणि मुंबईतील समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनवू – जयकुमार रावल
राज्याचे पर्यटन मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले, जगातील चांगले आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल येथे उभे केले जाईल. भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्र महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. त्यादृष्टीनेच केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून पर्यटनविषयक विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा, वन्यजीव, जंगले, गड किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारती असा पर्यटनाचा मोठा वारसा आहे. राज्याचा हा मोठा वारसा जागतिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनविण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी कोचीन शीप यार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

क्रुझ टर्मिनलची वैशिष्ट्ये
आज भूमिपूजन करण्यात आलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलची अनेक वैशिष्ट्ये असणार आहेत. याची अंदाजित किंमत सुमारे ३०० करोड रुपये इतकी असून त्याचे क्षेत्रफळ हे साधारण ४.१५ लाख वर्गफूट इतके असेल. वर्षातील सर्व दिवशी ते कार्यान्वित असेल. जून २०१९ पर्यंत याचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. देशातील ८० टक्के क्रुझ प्रवाशांची या टर्मिनलमधून ने-आण करण्यात येईल. तळमजला अधिक तीन मजले असे या टर्मिनलचे स्वरुप असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या टर्मिनलमुळे मुंबईतील आयकॉनिक इमारतींमध्ये अजून एका भव्य इमारतीची भर पडणार आहे.